Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महापौरपदाची रौनक गेली

$
0
0
‘आरटीओं’च्या आदेशामुळे महापौरांच्या गाडीवरील लाल दिवा काढून टाकण्याची कार्यवाही पालिका आयुक्तांनी मंगळवारी केली. या कार्यवाहीमुळे महापौरपदाची रौनकच गेली आहे. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना आता साध्या गाडीतूनच फिरावे लागणार आहे.

बारा लाख लोकसंख्येसाठी फक्त २९ बस

$
0
0
प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी सेवेमध्ये विविध प्रयोग राबविण्यात येत आहे. त्याचवेळी महामंडळाच्याच अखत्यारित असणाऱ्या औरंगाबाद शहरातील बससेवेकडे मात्र साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे.

विवाहितेचा छळ, सहा जणांवर गुन्हा

$
0
0
पैशासाठी २८ वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅपेरिक्षा खरेदीसाठी आणि दुकान टाकण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावे; यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला तसेच घराबाहेर हाकलून दिले.

गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची पिळवणूक

$
0
0
गॅस सिलिंडर वाटपाबाबत शासनाने नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे गृहिणी आणि वृद्धांचे हाल होत आहेत. शिवाय अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होण्याची शाश्वती नसल्यामुळे नव्या नियमांआड सुरू असलेली पिळवणूक थांबवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने केली आहे.

‘आप’ची २२ डिसेंबरला बैठक

$
0
0
दिल्ली विधानसभा निवडणुकीत करिश्मा दाखविणाऱ्या आम आदमी पार्टीने (आप) आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभेसह आगामी विधानसभा निवडणुक लढविण्याचा मनोदय पक्षाने घेतला असून त्यानिमित्त औरंगाबादेत येत्या २२ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय बैठक होणार आहे.

शाळांना वेतनेतर अनुदान द्या

$
0
0
राज्यभरातील शाळांचे २००४पासून बंद करण्यात आलेले वेतनेतर अनुदान पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, संबंधित शाळांना अद्यापही अनुदानाचे वितरण करण्यात आलेले नाही.

बाजारासम‌ितीत नवीन तूर दाखल

$
0
0
नवीन तुरीची आवक बाजारात सुरू झाली असून या तीन दिवसात ३५ क्विटंल पेक्षा अधिक आवक झाल्याची माहिती जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये मंगळवारी १५ क्विंटल तुरीचा आवक झाली.

आरटीओ ऑफिसला जागा द्या

$
0
0
रेल्वे स्थानकाजवळील सध्याच्या आरटीओ कार्यालयाची जागा अपुरी पडत असून, यामुळे हेविव्हीकल आणि अन्य गाड्यांची तपासणी करण्यासाठी जागा पुरत नाही. सदर जागे अभावी अनेक वेळा वाहतुकीच्या कोंडीचा सामना आरटीओ कार्यालयात आलेल्या वाहनधारकांना करावा लागतो.

हिरडपुरी, आपेगाव बंधारे पूर्णपणे भरले

$
0
0
जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हिरडपुरी व आपेगाव बंधारे पूर्णपणे भरले आहे. यामुळे आनंदी झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे संयोजक जयाजीराव सूर्यवंशी यांच्या हस्ते बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले.

‘अभाविप’चे बीडला अधिवेशन

$
0
0
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने येत्या २० ते २२ डिसेंबर दरम्यान बीड येथे राज्य अधिवेशन अायोजीत करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी अडीच हजारहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

अवैध बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा

$
0
0
वैजापूर शहरात मुरारी पार्क भागात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एका डॉक्टरच्या विरोधात मंगळवारी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. योगेश करमासे (रा. वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.

कागजीपुरा येथे युवकावर चाकूहल्ला

$
0
0
कागजीपुरा बस स्थानकावर उभे असतांना काहीही कारण नसताना तिघांनी जकीउद्दिन शेख अजिजोद्दिन यांच्या हातावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना १७ डिसेंबरला सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच

$
0
0
जालना लोकसभा मतदारसंघ मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

‘आधार’कार्डच्या मदतीने लाभार्थ्यांना देणार अर्थसहाय्य

$
0
0
तहसिल कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांना आधारकार्डाच्या सहाय्याने गावातच रोख स्वरुपात आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

संतापानंतर प्रशासन हलले

$
0
0
वैजापूर येथील वखार महामंडळाच्या गोदामात शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मका खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरीमुळे मंगळवारी शेतकरी चांगलेच संतापले होते.

तुळजाभवानी पुजारी मंडळाचे उपोषण

$
0
0
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील बेशिस्त कारभार आणि न्यायालयाच्या अनेक आदेशाची पायमल्ली करणाऱ्या श्री तुळजाभवानी देवस्थान समितीच्या विरोधात श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर १६ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

जुगार खेळताना १२ जणांना अटक

$
0
0
पोलिसांनी मंगळवारी दिवसभर परभणी जिल्ह्या कारवाई करून जुगार खेळणाऱ्या १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

‘वडगाव’च्या गृहप्रकल्पाला पुढल्या दिवाळीचा मुहूर्त

$
0
0
सिडकोच्या वडगाव कोल्हाटी येथील गृहप्रकल्पाचे तीन लेआउट मुख्य कार्यालयाला सादर झाले असून त्यापैकी एका लेआउटला एका आठवड्यात मान्यता मिळेल. असे असले, तरी शंभर कोटी रुपयांच्या हा गृहप्रकल्पाच्या बांधकामाला पुढील वर्षी दिवाळीनंतरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

अनधिकृत बांधकाम; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

$
0
0
महापालिकेच्या अनाधिकृत बांधकाम विरोधी पथकाने नोटीस दिल्यानंतरही बेकायदेशीर बांधकाम सुरुच ठेवणाऱ्या रहिमपूर येथील दोन तर वसरणीतील एका मालमत्ताधारकाविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रब्बीची पेरणी आटोपली

$
0
0
जिल्ह्यात समाधानकारक पावसानंतर वेग घेतलेल्या रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६२ टक्के पेरणी झाली असून सर्वाधिक क्षेत्र सिल्लोड तालुक्यात आहे. यंदा कापसाचे क्षेत्र वाढल्यामुळे तुलनेने हरभरा पिकाचे क्षेत्र घटले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>