Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निवडणुकीसाठी बीडबाहेरून कर्मचारी

$
0
0
बीड जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची पोटनिवडणूक एकाच वेळी होणार आहे. या प्रक्रियेसाठी वीस हजारांच्या जवळपास मतदान कर्मचारी लागणार आहेत. गरज पडल्यास जिल्हाबाहेरून कर्मचारी आणावे लागतील, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यात डेंगीचा आणखी एक बळी

$
0
0
घुंघर्डे हादगांव (ता. अंबड) येथे डेंगीसदृश तापाने आणखी एक बळी घेतला असून, त्यामुळे या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली आहे.

विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे शिक्षकाला चोपले?

$
0
0
शिक्षकाने मारल्यानंतर शिक्षेच्या धास्तीने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप वाळूजजवळील लांझीच्या ग्रामस्थांनी केला आणि संबंधित शिक्षकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजता लांझी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घडली.

विद्यापीठ वसतिगृहांचे ‘गणित’ बिघडले

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संख्येच्या तुलनेत वसतिगृह अपुरे आहेत. विविध विषयांत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे अडीच हजार आहे. या तुलनेत विद्यापीठ केवळ ५५ विद्यार्थ्यांचीच वसतिगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते.

इंजिनीअरिंग द्वितीय वर्षाच्या ३० हजार जागा रिक्त

$
0
0
इंजिनीअरिंग प्रथम वर्षाप्रमाणे द्वितीय वर्षाचेही ‘तंत्र’ बिघडले आहे. प्रवेशाच्या तीन फेरीनंतरही राज्यात तब्बल तीस हजारांपेक्षा अधिक रिक्त राहणार आहेत. १९ ऑगस्टपासून सुरू असलेली प्रवेशाची फेरी शनिवारी (१३ सप्टेंबर) संपली.

औरंगाबाद पंचायत समितीवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार?

$
0
0
पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक रविवारी (१४ सप्टेंबर) होत आहे. संख्याबळ पाहता औरंगाबाद पंचायत समितीवर पुन्हा काँग्रेसचाच झेंडा फडकण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद पूर्वमधून पँथरकडून भुतकर

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय दलित पँथरने कंबर कसली असून, दहा उमेदवाराची पहिली यादी शनिवारी (१३ सप्टेंबर) जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षनेते लक्ष्मण भुतकर व ‘मध्य’मधून लक्ष्मण मोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

‘राष्ट्रवादी युवक’च्या जिल्हाध्यक्षपदी औताडेच

$
0
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी शुक्रवारी (१२ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत जाहीर केली.

जीवघेण्या पाण्यातील नऊ दिवस...

$
0
0
‘मुसळधार पावसामुळे पाण्याने वेढलेले रस्ते..., एटीएम बंद..., मोबाईल बंद आणि परतीच्या प्रवासासाठी यातायात आठवली तरी अंगावर काटा येतो. पहलगाम शहरात अडकलो म्हणूनच औरंगाबादला परतलो; अन्यथा, श्रीनगर शहरातून अजूनही परतलो नसतो.

भाजप इच्छुकांची नेत्यामागे धाव

$
0
0
उमेदवारीची माळ गळ्यात पडावी, यासाठी भारतीय जनता पक्षातील इच्छुकांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहे. जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड आणि औरंगाबाद पूर्व या मतदारसंघासाठी एकूण ३२ जण इच्छुक आहेत. मुंबईवारी करण्याबरोबरच शहरात येणाऱ्या नेत्यांशी ‘बंद खोलीत’ चर्चा करण्याचा आग्रह त्यांच्याकडून सुरू आहे.

राजकीय पक्षांच्या तंबूत सामसूम

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकी जाहीर झाल्यानंतरही शहराच्या पातळीवर राजकीय पक्षांत सध्यातरी सामसूम आहे. युतीचा निर्णय कधी होईल, जागा वाटप कसे असेल, आघाडीचे काय होणार, जागांची आदलाबदल होणार की नाही या प्रश्नांची सोडवणूक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेली नाही.

मनसेच्या गोटात धाकधूक

$
0
0
नाशिक महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली हातमिळवणी आणि प्रतिकूल निवडणूकपूर्व सर्वेक्षणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात धाकधूक वाढली आहे. मराठवाड्यातील सर्व ४६ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी पक्षप्रमुख राज ठाकरे मुलाखती घेणार आहेत.

‘संघ’ अधिकच ‘दक्ष’

$
0
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शहरात अधिक दक्ष झाला आहे. गेल्या १०० दिवसांत संघाच्या शाखांवर जाणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या तिपटीने वाढली आहे. ‘प्रभात’,‘सायं’ ‘रात्र’ अशा तीन पद्धतीत शहरात २५ उपनगरात ५० ठिकाणी शाखा लागत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

बँक ऑफ इंडियाकडूनही फसवणूक

$
0
0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे बिनव्याजी आणि त्यानंतरचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे दोन टक्के व्याज या दराने देण्यात येत असल्याचा गवगवा राज्य सरकार व केंद्र शासन यांचेकडून केला जात आहे.

नवरात्रासाठी तीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती

$
0
0
तुळजापूर येथील नवरात्र महोत्सवास २५ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. देवीभक्तांना सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा विनाविलंब उपलब्ध व्हाव्यात, शहरातील साफ-स्वच्छता व पाणीपुरवठा यावर प्रशासनाचे नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील तीन नगरपालिकांचे मुख्याधिकारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

भोकर, मुखेडची जागा भाजपला सोडण्यास शिवसेना राजी?

$
0
0
विधानसभा निवडणुकीत भोकर, मुखेडची जागा लढविण्यास शिवसेना इच्छूक नसल्याने या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्यास शिवसेनेने हिरवा कंदील दर्शविला असल्याचे समजते. त्यामुळे आता या दोन्ही जागांवरील उमेदवारांची चाचपणी भाजपने सुरू केली आहे.

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

$
0
0
जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा आणि परंडा या चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. यासर्व ठिकाणी मतदान १५ ऑक्टोबरला मतदान होईल.

धारूर, केजमध्ये राष्ट्रवादीला धक्का

$
0
0
विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या पंचायत समिती पदाधिकारी निवडीकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीचा कार्यक्रम रविवारी पार पडला.

जालन्यात युतीची सरशी

$
0
0
जालना जिल्हयातील आठपैकी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने प्रत्येकी तीन व राष्ट्रवादी काँग्रेसने दोन पंचायत समितीवर ताबा मिळवला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकांमध्ये चूरस दिसून आली.

पंचायत समित्यांमध्ये ‘नाशिक ढोल’

$
0
0
शहरामध्ये कोणतीही लाट असली तरी ग्रामीण भागात काँग्रेस राष्ट्रवादीचाच बोलबाला असल्याचे पंचायत सभापतीपदाच्या निवडणुकांमधून स्पष्ट झाले. स्थानिक पातळीवर कोणतीही आघाडी किंवा युती मजबूत नसल्याचेच दिसून आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images