Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मोदींशी संवाद नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्किल इंडिया उपक्रमाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आयटीआयमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार होते. त्यासाठी विद्यार्थीही तयारी करून आले होते, मात्र पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला नाही. त्यामुळे या कार्यक्रमचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या प्रक्षेपणाला हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

जागतिक युवक कौशल्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. या दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत स्किल इंडिया उपक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाचे देशातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. महाराष्ट्रात औंध आणि औरंगाबाद येथील आयटीआयमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा आहे. औरंगाबादमध्ये भडकल गेट येथील मुलींच्या आयटीआय, रेल्वे स्टेशन परिसरातील मुलांच्या आयटीआयमध्येही कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याच कार्यक्रमात काही ठराविक आयटीआयमधील मुलांशी पंतप्रधान थेट संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी तयारी करण्यात आली.

रेल्वे स्टेशन परिसरातील आयटीआयमध्ये याची संपूर्ण तयारी करण्यात आली. प्रश्न विचारता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यासाठी प्रशासनाने विविध ट्रेडच्या २५ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात संवाद झालाच नाही. विद्यार्थी तीनपासून व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये बसून होते.

या कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबद आयटीआयच्या प्रशासनाला वरिष्ठ पातळीवरून सूचना देण्यात आल्या होत्या. सायंकाळी पंतप्रधानांचे भाषण झाल्यानंतर संवादाची प्रक्रियाच झाली नाही. यामुळे तीन तासांपासून बसलेले विद्यार्थी हिरमुसले. पंतप्रधानांनी संवाद साधता आला नाही याची खंत असली तरी पंतप्रधानांनी केलेले भाषण अत्यंत प्रभावी असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रोफेशनल डिग्रीसोबत आवडीचे शिक्षण

$
0
0

पूनम अहिरे

साधारणतः पाच-सहा वर्षांपूर्वी इंजिनीअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट यांसारख्या शाखांचा समाजावर प्रभाव दिसून येत होता. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आर्टस, कॉमर्सलाही सुगीचे दिवस आले आहेत. सध्या तर इंजिनीअरिंगच्या पदवीबरोबरच आर्टस, कॉमर्स, संगीत यांसारखे शिक्षण घेण्याचा ट्रेंड दिसत आहे.

इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी यांसारख्या शाखांना पुष्कळ वाव, तसेच यामध्ये अर्थार्जनाच्या चांगल्या संधी आहेत. तरीही पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन टेक्निकल, तसेच प्रोफेशनल शिक्षणाबरोबरच कला, सोशल सायन्सेस याचेही शिक्षण विद्यार्थी घेऊ लागले आहेत. पारंपरिक विद्यापीठांमधून शिक्षण घेत असतानाच मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून अन्य अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांसारख्या मुक्त विद्यापीठांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

आर्टस, कॉमर्ससारख्या शाखांना प्रवेश घेणे या विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी फारसे उपयुक्त नसले तरी यातून वेगळ्या शाखेची ओळख होत असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. याचबरोबर संगीतासारखा विषय शिकणे हे विद्यार्थ्यांना रिफ्रेशिंग करणारे, तसेच त्यांना करिअरचा एक वेगळा ऑप्शन उपलब्ध करून देणारे ठरते. कॉमर्सचे शिक्षण दैनंदिन जीवनात, तसेच व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त ठरत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने आर्टसला आधीपासूनच महत्त्व आहे. मात्र, आता त्यापलीकडे जाऊनही या शाखेचा विचार होत आहे. एकीकडे रोजगाराच्या उत्तम संधी देणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या शाखांनाही प्राधान्य देत असल्यामुळे समाजाचा आर्टस, कॉमर्स शाखांच्या विविध अभ्यासक्रमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक, तसेच व्यापक बनत आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना इंग्रजी भाषेचा जवळचा संबंध येतो; पण मातृभाषेपासून लांब राहू नये म्हणून इंजिनीअरिंग करताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मी बीएची पदवी घेतली व मातृभाषेची आवड जोपासली.- रोहिणी अहिरे

इंजिनीअरिंगसोबत बी.कॉम. करण्याचा वेगळा अनुभव मला मिळाला. दोन्ही अभ्यासक्रम सांभाळताना थोडीफार तारांबळ उडते; पण स्वतःची आवड म्हणून करत असल्यामुळे सर्व काही छान जमतं. या अभ्यासाचा निश्चितच मला फायदा होणार आहे. - प्रतीक वाणी

'इंजिनीअरिंगच्या पलीकडे जाऊन स्पर्धापरीक्षा देण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे, जेणेकरून समाजातल्या घटकांपर्यत मी पोहोचू शकेन. स्पर्धापरीक्षेच्या दृष्टीने इंजिनीअरिंगसोबत बीए करतेय, तसेच संगीताची पदवीही मी घेतेय.- मानसी जगळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी कलेक्टर थेट बांधावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर जिल्ह्यावर दुबार पेरणाचे संकट उभे टाकले आहे. शेतकरी चिंतातूर झालेला असताना कोणत्याही राजकीय नेत्यानी शेतकऱ्यांना आतापर्यंत धीर देण्याचे काम केलेले नाही. परंतु, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी करून तुषार सिंचनाचा वापर करण्याचे मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांना धीर देण्याचा

प्रयत्न केला.

खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख २५ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. परंतू सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी रेणापूर तालूक्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थितीची माहिती घेतली. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे. त्यांनी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याच्या सूचना केल्या.

शेतकऱ्यांना पीक विमा आणि कर्जाचे वितरण व्यवस्थित होते का नाही ते तपासण्यासाठी पोले यांनी पानगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट देऊन माहिती घेतली. त्यासोबतच खत, औषधे विक्री दुकानांची तपासणी देखील त्यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम, तालूका कृषी अधिकारी वीर यांची उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यात तीन लाख २५ हजार हेक्टरवर खरीपाचे पेरणी झाली आहे. परंतु पाऊस कमी झाल्याने पिकांचे नुकसान होत आहे. परंतू येणाऱ्या काही दिवसांत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने केला असल्याने, शेतकऱ्यांनी निराश न होता, पेरणी केलेले पिके वाचविण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सोयाबिनचे क्षेत्र असलेल्या ज्या शेतकऱ्यांकडे सद्यस्थितीत सिंचनाची सोय उपलब्ध आहे. त्यांनी पिकांना तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी द्यावे. तसेच अंतर मशागातीमध्ये हलकी कोळपणी करावी. जमिनीमध्ये आलोवा असल्यास पिके वाचविण्यासाठी पोटॅशियम नायट्रेटची एक टक्का या प्रमाणात फवारणी करावी.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगनमताने पाण्याची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही मांजरा धरणातील मृत साठ्यातील संरक्षित पाणी लातूर येथील औद्योगिक वसाहतीला (एमआयडीसी) चोरून नेले जात असल्याचे उघड झाले आहे. पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि लातूर एमआयडीसीमधील उद्योजक यांच्या संगनमताने हा पाणी चोरीचा उद्योग सुरू आहे.

उस्मानाबाद जिल्हा गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. यंदाही अद्याप जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा असल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडेठाक आहेत. जिल्ह्यात उपयुक्त जलसाठा १.५ टक्के इतकाच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील जलसाठे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून संरक्षित केले व त्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत. इतकाच पाऊस झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. भर पावसाळ्यातही जिल्ह्यात १४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पाण्याची स्थिती इतकी गंभीर असताना शिवाय मांजरा धरणातील पाणी मृतसाठ्याच्या मर्यादेत असताना शिवाय हे पाणी पिण्यासाठी म्हणून संरक्षित केले असतानाही या मांजरा धरणातील पाणी लातूर एमआयडीसीला दिले जात आहे. हे पाणी चोरून नेण्यासाठी संबंधितांनी ठराविक आकाराचे कालवे निर्माण केले आहेत. मांजरा धरणातून कळंब शहरासह अन्य तीस गावांची पाण्याची तहान भागते. या धरणात केवळ एक महिना पुरेल एवढा जेमेतेम जलसाठा शिल्लक आहे. याची माहिती लातूर पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासनाला आहे. तरी देखील येथील पाणी प्रशासनाला अंधारतच ठेवून दिले जात आहे.

मांजरा धरणातून पाणी नेण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी विरोधही दर्शविला. मात्र, त्यांना न जुमानता हा पाण्याचा उपसा स्वतंत्ररित्या खोदण्यात आलेल्या कॅनॉलमधून रात्रभर चालू असतो. मांजरा धरणातील पाणीसाठा जोत्याखाली गेल्यामुळे येथील पाणी उद्योगासाठी उचलता येत नाही. जोत्याखालील पाण्याचा उपसा होऊ नये यासाठी वीजपंप देखील जोत्या खालच्या नळीवर बसविण्यात आले आहेत. याला बगल देत चक्क त्याखालील पाण्याला एक कॅनॉल तयार करून तेथून दररोज लातूर एमआयडीसीसाठी दोन पंपांद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी उपसले जात आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागातील अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. प्रकल्पात केवळ एक माहिनाच पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र ज्या वेगाने एमआयडीसीकडून पाण्याची चोरी केली जात आहे, तो वेग कायम राहिल्यास काही दिवसातच प्रकल्प कोरडाठाक पडण्याची शक्यता आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमधील माता मृत्यू दरात घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील माता मृत्यू दरात कमालीची घट झाली आहे. २००५-०६ मध्ये माता मृत्यूचे प्रमाण १.१० टक्के इतके होते. ते २०१४-१५ मध्ये ०.४५ टक्के इतके म्हणजे निम्यापेक्षा अधिक घटले आहे. ही बाब दिलासादायक आहे, अशी माहिती सीईओ सुमन रावत यांनी दिली.

माता व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनआरएचएम) माध्यमातून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत (आरोग्या विभागामार्फत) महिन्यातून दोनवेळा मातृसंवर्धन दिन उपक्रमाचे आयोजन केले जाते. २००५-२००६ च्या तुलनेत २०१४-१५ या वर्षामध्ये जिल्ह्याचा माता मृत्यूदर हा निम्यापेक्षा अधिकने घटला आहे. हा दर १.१० टक्क्यावरून ०.४५ टक्केपर्यंत खाली आला आहे.

माता मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‌विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. उपकेंद्र व संदर्भ सेवांचे बळकटीकरण करण्यात आले आहे. तसेच आरोग्य संस्थांमध्ये रक्तपुरवठा व सिझेरियन विभागची विशेष सोय केली आहे. गरोदर मातांना संपूर्ण संरक्षण देण्यासाठी तीन प्रसूतीपूर्व तपासण्या, प्रतिबंधात्मक शंभर व उपचारात्मक २०० लोहयुक्त (आयर्न) गोळ्यांचे वाटप केले जाते. तीव्र रक्तक्षम असणाऱ्या गरोदर मातांना शिरेद्वारे आयर्न औषधांची इंजक्शने दिली जातात. जेणे करून गरोदर मातांची तब्येत व्यवस्थित राहून बाळाची वाढ होण्यास मदत होते.

या व्यतिरिक्त बाळांतपणासाठी व आकास्मिक कारणांसाठी गरोदर महिलांना मोफत वाहतूक सेवा, भोजन, तपासण्या व औषधोपचार दिले जातात, अशी माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात प्रसुती पश्चातही आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व मोफत सोयी सुविधांमुळे आता शहरी तसेच ग्रामीण भागातील बाळांतपणाचे प्रमाण हे शासकीय रूग्णालयातून वाढले आहे. घरी बाळंतपण करण्याची पूर्वापार पद्धत आता जवळयास संपुष्टात आली आहे. यामुळे गरोदर माता किंवा बाळ दगावण्याचे

प्रमाण अत्यल्प झाले आहे. राज्याचा मृत्यूदर हा ०.६८ टक्के इतका आहे तर तोच दर उस्मानाबाद जिल्ह्याचा ०.४५ टक्के इतका आहे. भविष्यात हा दर आणखी घटत नगण्य असा होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन‍् आरोपी कोर्टात कोसळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

बलात्कार प्रकरणातील 'त्या' दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यातील एकाला अचानक फीट आल्याने तो न्यायालयातच गलपटला. या दोन्ही आरोपीच्या पोलिस कोठडीत २३ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली.

जालन्यातील त्या बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले. तपासासाठी पोलिस कोठडीत वाढ करावी अशी मागणी पोलिसांच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालायाने त्या दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी २३ जुलैपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, याच प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना पुन्हा हजर करायचे असल्याने पोलिस थांबले होते. यावेळी अचानक फिट आल्याने यातील मुख्य आरोपी हा न्यायाल्याच जमिनीवर कोसळला. या प्रकारामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. वकिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तालुका जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक शेख रफीक यांनी आपल्या पोलिस जीपमधून त्या आरोपीला तडकाफडकी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादी शेवयांची ५० लाखांची उलाढाल

$
0
0

विजय चौधरी, खुलताबाद

रमजान ईदचा भाईचारा शिरखुर्मा वाढवत असतो. या शिरखुर्म्यात सुक्यामेव्यासह शेवयांची गरज असते. त्यामुळे विशिष्ट पद्धतीने हातावर तयार केलेल्या खुलताबादी शेवया यावर्षी दुबई व अमेरिकेतही पोहोचल्या आहेत. यावर्षी खुलताबादमध्ये पाच टन शेवयांची निर्मिती होऊन साधारणतः पन्नास लाख रुपयांची उलढाल झाली आहे.

खुलताबाद येथील कुटुंबांचे शेवया तयार करण्याचे कसब लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. राधा यांनी या गृहउद्योगाला प्रोत्साहन दिले. त्यावेळी शासनातर्फे काही प्रमाणात अनुदानही देण्यात आले होते. त्यानंतरच्या काळात हळुहळु खुलताबादमध्ये रमजानसाठी शेवया पुरविण्यारे गाव अशी ओळख तयार होत आहे. या व्यवसायात खुलताबाद येथील सुमारे पाचशे कुटुंब आहेत. ही मंडळी स्वतःईच्या काळात स्वतःच्या आर्थिक कुवतीनुसार गहू

खरेदी करतात.

रमजान ईदच्या दोन महिनेआधीपासून शेवया तयार करण्यास सुरुवात करतात. बारीक शेवया वळण्यासाठी हाताला सतत तुप लावावे लागते. त्यामुळे गव्हासोबतच कच्चामाल म्हणून तुपाचीही गरज लागते.

हा व्यवसाय आता जवळपास स्थिरावत आहे. ईदच्या दोन महिने आधीपासूनच मुंबई व सुरत येथील व्यापारी येथील कुटुंबांकडे शेवयांची ऑर्डर कळवतात. त्यानुसार शेवया तयार करून मुंबईकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्या

व्यापाऱ्यांमार्फत खुलताबादच्या शेवया सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. पण गेल्या दोन वर्षांपासून खुलताबाद येथून दुबई, अमेरिका व इतर देशांतील ग्राहक थेट मागणी नोंदवत आहेत व ती पुरविली जात आहे.



हवामानाचा फटका

या व्यवसायाला हवामानाचा सर्वाधिक फटका बसतो. हिवाळा व पावसाळ्यात ईद असलेल्या वर्षी ढगाळ वातावरणामुळे बांबुवर वाळत घातलेल्या शेवयांची तार तुटते. खूप आधी उन्हाळ्यात शेवया तयार केल्यास साठवणुकीचा प्रश्न सोडवावा लागतो. त्यामुळे दोन महिनेआधी शेवया तयार करण्यास प्राधान्य दिले जाते.

दोनशे रुपये किलो

खुलताबाद येथील शेवया हातावर वळून तयार केल्या जातात. इतर ठिकाणच्या शेवया यंत्रावर तयार केल्या जातात. हाताने केलेल्या शेवया मऊ व केसाएवढ्याही बारीक असल्याने त्यास मागणी असतो. त्यामुळे या शेवयांची किंमतीही तुलनेने जास्त आहे. यावर्षी प्रतिकिलो दोनशे रुपये या दराने शेवया विकल्या जात आहेत.

तत्का‌लीन जिल्हाधिकारी व्ही. राधा यांच्या प्रोत्साहनामुळे शेवयांचा गृहउद्योग सुरू झाला. या उद्योगाला हवामानाचा फटका बसतो. त्यामुळे शासनाने विमा उतरवून मदत केली पाहिजे.

- सय्यद हमीद, शेवया उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंमळनेरकर महारांजांचे शाही स्नान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

येथील गोदावरी नदीच्या कृष्णकमल तीर्थावर प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या शिष्य परिवारातर्फे प्रसाद महाराज अमळनेरकर व नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांचा भव्य शाही स्नान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कुंंभमेळा व अधिक मास समाप्तीनिमित्त हे आयोजन करण्यात आले होते.

गावातील नाथ मंदिरापासून कृष्णकमल तीर्थापर्यंत सकाळी सातच्या दरम्यान प्रसाद महाराज अमळनेरकर व नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांची ढोल-ताशा, तुताऱ्यांच्या निनादात शाही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पोपट शास्त्री चौथाईवाले. कमलाकर शिवपुरी, रेणुकाशास्त्री गर्गे, दत्तागुरू शेवणकर, सुयश शिवपुरी यांच्यासह जवळपास दहा हजारांपेक्षा जास्त अमळनेरकर भक्त व शहरातील नागरिक सामील झाले होते. कृष्णकमल तीर्थावर पोहचल्यावर १११ ब्राह्म्वंदांच्या मंत्रघोषात प्रसाद महाराज अमळनेरकर व नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते गोदावरीचे पूजन व जलाभिषेक करून शाही स्नानाला सुरुवात करण्यात आली. त्यांच्यासोबत भक्तांनीही शाही स्नान केले. यावेळी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, राजू परदेशी, प्रकाश वानोळे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीककर्जासाठी खेट्या

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यात खरीप हंगामात फक्त ३०६ कोटी रुपयांचे (५७ टक्के) पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी ६०९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान कर्ज घेतलेले शेतकरी दुबार पेरणीसाठी बँकेत खेटे मारत आहेत. पण बँका दुबार पेरणीसाठी कर्ज देण्यास तयार नाहीत.

बँकांना खरीप पेरणीसाठी ६०९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पण ग्रामीण भागात बँकांचे मनुष्यबळ कमी असल्याने १५ जुलैपर्यंत ५७ टक्के कर्ज वितरीत झाले, असे बँकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण ४ ते ५ टक्के अधिक असल्याचे सांगण्यात आले. जूनमध्ये भरभरून बसलेला पाऊस रुसल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यासाठी बँकांत जात आहेत. पण शासनाकडून दुबार पेरणीसाठी कर्ज द्यायचे की नाही याबद्दल निर्देश न आल्याने बँक अधिकारी व शेतकरी यांच्यात वाद होत आहेत. विशेषतः सिल्लोड, ‌फुलंब्री, सोयगाव, पैठण, खुलताबाद, वेरूळ येथे रोज वाद होत असल्याची माहिती आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आहेत. या परिस्थितीत दुबार पेरणीचे संकट पुढे आले आहे. त्यात बँका दारात उभे करीत नाहीत. या परिस्थितीत बळीराजा संकटात सापडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील २२ राष्ट्रीयकृत बँका, सात खासगी बँका, जिल्हा बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांना यावर्षीसाठी ७८५ कोटी रुपयांचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी खरिपाकरीता ६०९ कोटी, तर रब्बीकरिता १७६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यात ६०९ कोटी रुपयांचे पीककर्ज देण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ३०६ कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांमार्फत वितरीत करण्यात आले आहे. दुबार पेरणी कर्जासाठी मार्गदर्शक तत्वे नसल्याने अडचणी येत आहेत. - अनंत घाटे, व्यवस्थापक, महाबँक, लिड बँक

जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर बँकांचा हवा तसा प्रतिसाद नसल्याने शेतकरी व बँक अधिकाऱ्यांत भांडणे होत आहेत. कर्ज पुर्नगठणाचे आदेश असतानाही बँकांची अरेरावी सुरूच आहे. - कैलास तवार, मराठवाडा संघटक, शेतकरी संघटना




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरेश्वर सावे यांचे निधन

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार आणि औरंगाबादचे सेनेचे पहिले महापौर मोरेश्वर दीनानाथ सावे (वय ८४) यांचे गुरुवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी लीलावती, अनिल, अजित आणि अतुल ही मुले आणि अंजली ही कन्या, सुना-नातवंडे असा परिवार आहे. अंजली सिनेमागृहापासून शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मंगळवारी दुपारी सावे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. औरंगाबाद शहराच्या कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण आणि राजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सावे यांची ओळख होती. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरचे ते दोन वर्षे अध्यक्ष होते. औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून समर्थनगर वॉर्डातून ते निवडून आले होते. शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. महापौरपदाच्या कार्यकाळात शहराची निकड लक्षात घेता त्यांनी पाण्याच्या टाक्या उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर १४०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीचा निर्णयही त्यांच्याच कार्यकाळात झाला होता.

'कर्मयोगी'

प्रा. डॉ. शरद भोगले, अध्यक्ष, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ

मोरेश्वर उपाख्य अण्णासाहेब सावे यांच्याशी माझी ओळख गेल्या ५३ वर्षांपासून आहे. १९६२मध्ये सावे यांनी औरंगाबाद शहरातील अप्सरा सिनेमा चालवायला घेतला होता. त्यांचे बंधू बाळासाहेब सावे, कै. केशवराव देशपांडे आणि अॅड. वसंत डंख या त्रयींबरोबर मीही सिनेमाचे परीक्षण आणि जाहिरातीचा मजकूर लिहिणे अशी कामे करीत असे. त्यातूनच अण्णांशी ओळख झाली. मैत्री वाढली, तारा जुळल्या. तब्बल पाच दशकं हा स्नेह टिकला. वारंवार भेटी आणि गप्पांमुळे आमचं एक उचापती मंडळ तयार झालं होतं. या मंडळाचा केंद्रबिंदू अर्थातच अण्णा असायचे. या मंडळात विविध व्यवसायांतील पंधरा जण सहभागी असायचे. चांगल्या कामांसाठी सार्वजनिक हिताच्या आणि समाजोपयोगी कार्यात हे मंडळ सहभागी होत असे. नादब्रह्म संगीत महोत्सवात पं. भीमसेन जोशी, बिरजू महाराज, बेगम परवीन सुलताना या दिग्गजांनी हजेरी लावली होती. संगीतातलं एक अक्षर किंवा स्वर न कळणारे उचापती मंडळाचे सर्व सदस्य घरचं लग्न असल्यासारखे राबत होते.

अंधांच्या क्रीडा स्पर्धा, टेबल टेनिस, बुद्धिबळाच्या स्पर्धा होत असत. जिथे जिथे अण्णा, तिथे तिथे उचापती मंडळाचे सदस्य तयार होत होते. खरेतर माझ्यातला निवेदक त्यांनीच ओळखला. गुणग्राहक म्हणून अण्णा प्रसिद्ध होते. नादब्रह्मच्या एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे नियोजित निवेदक न आल्यामुळे अण्णांनी ही कामगिरी माझ्यावर सोपविली आणि पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून यानंतर शेकडो कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मी केले. उत्तम निवेदकाचा गुण त्यांनीच हेरला. मी त्यांचे ऋण कसे फेडू शकेन? गेल्या पाच दशकांत अण्णांनी विविध क्षेत्रं आपल्या कर्तृत्वानं गाजवली. बांधकाम कंत्राटदार म्हणून धरणे, कालवे आणि इमारती बांधल्या. चित्रपट प्रदर्शक म्हणून ते नावाले होते. औद्योगिक क्षेत्रात 'सवेरा' उद्योग समूहाने औषधनिर्माण, इंजिनिअरिंग, वाहतूक, करमणूक आदी क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी म्हणून नाव कमाविले आहे. सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. बिग इव्हेंट मॅनेजमेंटचे तंत्र त्यांनी अनुभवाने साध्य केले होते. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे त्यांनी केलेले नियोजन परिपूर्ण असायचे. अण्णा पुस्तकप्रेमी होते. वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांची ग्रंथसंपदाही वैविध्यपूर्ण होती. एखाद्या व्यक्तीचा व त्यांचा स्नेह जुळला की तो कायम राहतोच. साठ-साठ वर्षे ऋणानुबंध असलेल्या व्यक्तीचे दूरध्वनीवरून शुभेच्छा संदेश त्यांना येत होते आणि तेही तत्परतेने त्यांना प्रतिसाद देत होते. जुनी पत्रं, फोटो, निमंत्रणपत्रिका ते अगत्यपूर्वक सांभाळून ठेवत असे. पुस्तक, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतील कात्रणांचे महत्त्वाचे विषय, स्थानिक व देशभरातील घटना आदींची हजारो कात्रणे त्यांच्या संग्रहात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचा सिनेमा संपला !

$
0
0

रसिकांच्या जीवनात दोन घटका मनोरंजन करणाऱ्या चित्रपटगृह व्यवसायाला शिस्तबद्ध रूप देण्यात मोरेश्वर सावे यांचा मोलाचा वाटा आहे. औरंगाबाद शहरातील चित्रपटगृहांत अॅडव्हान्स बुकिंग, खुर्च्यांना क्रमांक आणि बाल्कनी सुरू करण्याचे श्रेय सावे यांचे आहे. प्रेक्षकांना सुविधा देण्यासाठी दक्ष असलेल्या सावे यांच्या निधनाने चित्रपट व्यवसायाचा आधारवड हरपला आहे.

मराठवाड्यातील चित्रपट व्यवसाय आणि मोरेश्वर सावे यांचे अतूट नाते आहे. उदगीर शहरात सावे यांनी पहिले चित्रपटगृह सुरू केले. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन चित्रपटगृह व्यवसायात नवे प्रयोग केले. लातूर आणि औरंगाबाद शहरात चित्रपटगृह सुरू केल्यानंतर अधिक व्यापक स्वरूप दिले. १९८१ मध्ये औरंगाबादेत 'अंजली' चित्रपटगृहाच्या उदघाटनासाठी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार आले होते. प्रचंड गैरसोयी व अनागोंदी असलेल्या चित्रपटगृह व्यवसायाला शिस्तबद्ध करण्यासाठी सावे यांनी प्रयत्न केले. प्रत्येक चित्रपटाची तिकीटे ब्लॅकमध्ये विकली जात असत. हा प्रकार रोखण्यासाठी सावे यांनी औरंगाबाद शहरात प्रथमच 'अॅडव्हान्स बुकिंग' सुरू केले. काही वेळेस 'ब्लॅक' करणाऱ्याची गचांडी पकडून पोलिसांच्या हवाली करण्याचे प्रसंगही घडले. तिकीट घेताच प्रेक्षक सोयीची खुर्ची पटकावण्यासाठी झुंडीने चित्रपटगृहात घुसत असत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सावे यांनी खुर्च्यांना क्रमांक टाकले. त्यामुळे तिकीट क्रमांकानुसार प्रेक्षक शिस्तीत बसू लागले. निजामकालीन प्रथांचा पगडा औरंगाबाद शहरातील चित्रपटगृहांवरही होता. चित्रपटगृहात महिला व पुरुषांसाठी वेगळी आसनव्यवस्था होती. तसेच, दोन्ही भागात मोठा पडदा होता. प्रत्येकाला कुटुंबासह चित्रपटाचा आनंद मिळावा म्हणून सावे यांनी गोषा पद्धत बंद केली. या निर्णयाला विरोध झाल्याने त्यांनी चित्रपटगृहचालकांची बैठक घेऊन सामंजस्याने तोडगा काढला होता. 'मल्टिप्लेक्स कल्चर'बाबतही सावे उत्सुक होते. चित्रपटगृह व्यवसायात असल्यामुळे राजेश खन्ना, दिलीपकुमार, अनिल कपूर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, दादा कोंडके, अलका कुबल, स्मिता तळवलकर या मोठ्या कलाकारांशी सावे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मराठवाड्यातील चित्रपट व्यवसायाला घडवणारा अवलिया गेल्याने कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.

१९८५ मध्ये माझा 'धूमधडाका' संगीता चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटापासून सावे यांच्याशी स्नेह वाढला. राजकारणात सक्रिय असूनही त्यांचे चित्रपटप्रेम कायम होते. उत्तम मराठी चित्रपटांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. एका उमद्या माणसाला मराठी चित्रपटसृष्टी मुकली आहे.

- महेश कोठारे, प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक

अंजली-संगीता चित्रपटगृहात दादा कोंडके यांचे चित्रपट प्रदर्शित करताना मोरेश्वर सावे यांच्याशी मैत्री झाली. १९९१ मध्ये 'माहेरची साडी' चित्रपट 'अंजली'त ५२ आठवडे चालला. औरंगाबादमध्ये मराठी माणसाचे थिएटर असल्याचा आम्हाला अभिमान होता. मराठी चित्रपटांना आधार देणारा चांगला माणूस गेल्याचे दुःख आहे.

- विजय कोंडके, दिग्दर्शक-वितरक

वितरकांची संघटना स्थापन करून चित्रपट व्यवसायाला शिस्तबद्ध करण्याचे काम मोरेश्वर सावे यांनी केले. चित्रपटगृहाचे जाळे पसरवलेल्या सावे यांनी मराठवाड्यातील प्रेक्षकांचा प्राधान्याने विचार केला. सावे यांच्या निधनाने औरंगाबादेतील सिनेमा संपला आहे.

- अशोक उजळंबकर, ज्येष्ठ सिनेपत्रकार

चित्रपट व्यवसायात आलेल्या नवीन वितरकांनाही सावे यांनी पाठबळ दिले. 'सातच्या आत घरात' चित्रपटापासून त्यांच्याशी ओळख झाली. नेहमी हसत-खेळत राहत प्रत्येक नवीन गोष्ट माहीत करून घेण्यासाठी ते उत्सुक असत.

- शौकत पठाण,

चित्रपट वितरक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाचणीच्या टोकावर ठरले महापौरपद

$
0
0

प्रमोद माने, औरंगाबाद

pramod.mane@timesgroup.com

मोरेश्वर सावे हे पहिल्यांदा महापौर झाले ते मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने. औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदाची दुसरी निवडणूक १८ मे १९८९ रोजी झाली. ६० पैकी ५९ नगरसेवकांनी मतदान केले. शिवसेनेतर्फे मोरेश्वर सावे आणि काँग्रेसतर्फे नरेंद्र पाटील हे महापौरपदाचे उमेदवार होते. मतदान संपल्यानंतर पीठासीन अधिकारी व महापौर शांताराम काळे यांनी मतपेटी बोलावली. त्या मतपेटीत ५९ मतपत्रिका होत्या. मतमोजणी झाली आणि मतमोजणीनंतर सावे यांना ३० तर पाटील यांना २९ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडली तर पीठासीन अधिकाऱ्यांना निर्णायक मत टाकण्याचा अधिकार होता. मात्र, या घटनेत सावे यांना एक मत जास्त मिळाले होते. मतमोजणीनंतर पीठासीन अधिकारी डॉ. काळे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीनंतर सावे एका मताने निवडून आले असे जाहीर केले नाही. त्यावेळी सुभेदारी विश्रामगृहात असलेले काँग्रेसचे दोन मंत्री विलासराव देशमुख व डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या आदेशानुसार पीठासीन अधिकाऱ्यांना कास्टिंग व्होट टाकण्यास सांगण्यात आले. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपेट्या डॉ. काळे यांच्याकडे आणून दिली. काळे यांनी स्वतः जवळील स्केचपेनने खूण केली आणि नरेंद्र पाटील यांच्या मतपत्रिकेत ही मतपत्रिका टाकण्यात आली. याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. तसेच काही नगरसेवकांनी निवडणूक प्रक्रिया नव्याने घ्यावी अशी मागणी केली. अखेर ३१ मे १९८९ रोजी नव्याने महापौरपदाची निवडणूक होईल, असा ठराव मोरेश्वर सावे यांनी मांडला आणि तो संमत झाला. या सभेलाच औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. खंडपीठासमोर प्रश्न आला तो महापौर कोण? डॉ. काळे यांनी टाकलेले मतदान वैध की अवैध?, खंडपीठाचे न्या. बी. एन. देशमुख, न्या. आय. जी. शहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्टाने पहिल्याच दिवशी महापालिकेला मतपत्रिका सीलबंद पाकिटात कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले. या याचिकेत सावे यांचे वकील संतोष बोरा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून टेप रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सहा अधिकाऱ्यांना बोलावून निवडणुकीच्यादिवशी नेमके काय घडले याचे सत्यकथन समोर आले. सहा अधिकाऱ्यांच्या या कॅसेट्स कोर्टासमोर सादर करण्यात आल्या. सर्वात वरच्या मतपत्रिकेवर पेनने फुली मारण्यात आली. जो स्केचपेन सर्वांसाठी वापरण्यात आला. त्याच पेनने त्या फुलीवर गिरवण्यात आले होते. त्या मतपत्रिकेवर टाचणीचीही खूण होती. डॉ. काळे यांनी आपल्या वॉर्ड क्रमांकाच्यावेळी मतदान केले नव्हते. ती मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्यांनी काऊंटर फाइलला टाचणीने जोडून ठेवली होती. मतमोजणी झाल्यानंतर सावेंना ३० मते, तर पाटील यांना मत देण्यास भाग पाडले. टाचणीने जोडलेली मतपत्रिका घेऊन स्वतःच्याच पेनने घाईघाईने फुली मारली आणि नरेंद्र पाटील यांच्या मतपत्रिकेत टाकली. ही मतपत्रिका खंडपीठाने अवैध ठरवली आणि महापौर म्हणून मोरेश्वर सावे निवडून आले. टाचणीने आघाडीचा फुगा फोडला, असेच या महापौर पदाच्या निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. या विजयानंतर सावे यांनी दोनवेळा खासदारपद भूषवले. शिवसेनेचा पहिला महापौर निवडून आल्यानंतर शिवसेनेचा झंझावात सुरू झाला तो आजपर्यंत कायम आहे.



लातूरचे मोरेश्वर!

ठाणे जिल्ह्यातील चिंचणी येथून मोरेश्वर सावे यांचे वडील दिनानाथ सावे लातूरला राहायला आले. शहरात सध्या सावेवाडी म्हणून परिचित असलेल्या भागात त्यांचे वास्तव्य होते. दिनानाथ यांना तीन मुले भालचंद्र, मोरेश्वर आणि जयवंत. भालचंद्र सावे हे लातूरचे नगराध्यक्षही झाले होते. मोरेश्वर सावे यांनी हैदराबाद येथे बी कॉमचे शिक्षण घेतले. याच काळात त्यांचा तत्कालीन काँग्रेसशी संपर्क आला. स्वामी रामानंदतीर्थ आणि बाबासाहेब पराजंपे यांचा सहवास लाभल्यामुळे सावे यांनी काँग्रेसचे कार्य केले. स्वामीजी व पराजंपे खासदार असताना त्यांच्या सोबत दिल्लीत राहूनच सावे यांनी आय.ए.एस.चा अभ्यास केला. लेखी परीक्षेत ते उत्तीर्ण ही झाले. मात्र, मुलाखतीवेळी वडील आजारी पडल्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही. मोरेश्वर सावे यांनी नांदेड येथे राहून कंत्राटदार म्हणून खूप चांगले काम केले. मण्याड आणि सिध्देश्वर धरणाचे बांधकाम त्यांनी केले. त्यानंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले. तेथेच त्यांनी उद्योग वाढविले. सवेरा ट्रान्सपोर्ट कंपनी, अंजली थिएटर आणि त्याच्या अनुषंगाने इतर उद्योग सुरू केले. औरंगाबादचे महापौर आणि शिवसेनेचे खासदार म्हणून ही त्यांनी काम पाहिले. सावे यांची आठवण म्हणजे लातुरातील त्याकाळात जी उत्तम बांधकामे झाली, त्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. सर्वांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. - जीवनधर शहरकर



विविध क्रीडा संघटनांच्या कामकाजात सावे यांचा सहभाग होता. ते स्पर्धांचे आश्रयदाते होते.

माझा उमदा मित्र गेला. ४० वर्षांपासूनचा माझा संबंध आहे. स्पोर्टस अॅक्टिव्हीटीज आमच्या अधिक असायच्या. काही जणांनी मिळून आम्ही 'उचापाती मंडळ' स्थापन केले होते. खरोखरच उचापातीच करायचो आम्ही. मोरेश्वर सावे त्या मंडळाचे अध्यक्ष असायचे. दर महिन्याला आम्ही गेट टूगेदर करायचो. आम्ही खूप मजाही केली, खूप समाजसेवाही केली आणि खूप राजकारणावरही बोललो. सुखदु:खात सहभाग होतो. फॅमिली फ्रेंड म्हणून मोरेश्वर नेहमीच लक्षात राहतील. अंधांसाठी त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. ते नॅबचे अध्यक्षही होते. आमचा नादब्रह्म नावाचा सांस्कृतिक समूह असायचा; त्यात आम्ही अनेक दिग्गजांच्या मैफली घडवल्या आहेत. अशा कितीतरी आठवणी येतात. पण सच्चा आणि जिंदादिल माणूस गेल्याचे दु:ख आहे. - राम पातूरकर, सचिव, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ



अतिशय सज्जन गृहस्थ अशी मोरेश्वर सावेंची ओळख होती. औरंगाबादचा शैक्षणिक दर्जा वाढावा, यासाठी त्यांनी 'एज्युकेशनल कॉम्प्लेक्स' उभारले. सावेंनी औरंगाबादच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. - बद्रीनारायण बारवाले, उद्योगपती

मोरेश्वर सावे अत्यंत कठोर शिस्तीचे होते. पण तेवढेच प्रेमळ व मनमिळाऊ होते. जे काम हाती घेतले ते पूर्ण करणारच अशी त्यांची ख्याती होती. आमच्यातील एक ज्येष्ठ, कर्मठ शिस्तीचे आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. - प्रा. डॉ. चंद्रदेव कवडे.

मोरेश्वर सावे कडक शिस्तीचे आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत परिपक्व होते. सर्वांना वळण लावणारा माणूस म्हणून त्यांची ओखळ होती. ते स्वतः शिस्तीने वागायचे. त्यांना समोरच्या माणसाची चांगली पारख होती. माझे लग्न त्यांनीच जमवले होते. आमचे मतभेद व्हायचे, पण ते तेवढ्यापुरतेच असायचे. त्यांची आणि माझी मैत्री अखंड होती. चार दिवसांपूर्वी ते बोलू शकत होते, तेव्हा त्यांच्याशी शेवटचे बोलणे झाले. काल रात्री अडीच वाजताही मी दवाखान्यात त्यांच्या सोबत होतो. मैत्रीचा मोठा आधार गेल्याची भावना या क्षणी माझ्या मनात आहे. - अॅड. वसंतराव डंख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाचे चटके सुरू; प्रकल्पात ६ टक्के पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी मराठवाड्याला उन्हाचे चटके जाणवू लागले असून पावसाळ्यातील उन्हामुळे विभागात असलेल्या लहान मोठ्या प्रकल्पांमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. सध्या विभागातील ८३३ प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के (५११.७४ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा शिल्लक आहे.

ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट पसरले आहे. मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाडयातील चार जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे विभागात असलेले लहान - मोठे बंधारे भरण्यास सुरुवात होऊन प्रकल्पांमधील पाणीपातळीही वाढणे सुरू झाले होते. मात्र, गायब झालेल्या पावसामुळे आता पुन्हा एकदा दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या विभागामध्ये असलेल्या पाणीसाठ्यांमध्ये प्रचंड घट होत आहे. १२ जून रोजी विभागातील पाणीसाठा ३३०.९३ दलघमी (४ टक्के) होता, यानंतर झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होणे सुरू झाल्याने हा साठा ७ टक्क्यांपर्यंत पोचला होता. आता पुन्हा पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाणीसाठा तळाला जात आहे. सध्या मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सीना-कोळेगाव या चार मोठ्या प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली गेले आहे.

मराठवाड्यातील ११ मोठे, ७५ मध्यम, ७२३ लघु प्रकल्प, गोदावरी नदीवरील ११ व मांजरा नदीवरील १७ बंधारे अशा ८३७ प्रकल्पांत सध्या ५१२ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा वेगाने कमी होत असल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

जायकवाडीच्या मृतसाठ्यातून आजपासून उपसा ?

जायकवाडीमध्ये सध्या केवळ ०.८९२ दलघमी (०.०४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे बाष्पीभवन व दररोजचा उपसा याची आकडेवारी पाहता शुक्रवारपासून मृतसाठ्यातून उपसा करावा लागण्याची शक्यता आहे. जायकवाडीतून औरंगाबाद, जालन्याची तहान भागवण्यात येत असून, दररोज ५० एमएलडी पाणी उद्योगांसाठी पुरवण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंविरोधात याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यभरातील अंगणवाड्यांसाठी खाद्यान्न आणि वस्तूंच्या खरेदीत २०६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी आता मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सीबीआय मार्फत चौकशी करून, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

येथील पत्रकार अशोक गोवर्धन गिते यांनी ही याचिका केली आहे. मुंडे यांनी ई-निविदा न मागवताच दरकरार पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदीची कंत्राटे काही कंत्राटदारांना दिली. तीन लाख रुपयांपेक्षा अधिकची खरेदी ई-निविदेविना करू नये, या सरकारच्या नियमाचाच त्यांनी भंग केला. या खरेदी कंत्राटांबाबतचे आदेश घाईघाईत काढण्यात आले आणि १३ फेब्रुवारी या एकाच दिवसात २४ 'जीआर' काढण्याचा विक्रमही सरकारने केला, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. बेकायदेशिरपणे केलेल्या खरेदी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी याचिकेची सुनावणी दोन आठवड्याने ठेवली आहे. शासनाच्या धोरणानुसार तीन लाख

रुपयांपेक्षा अधिक खरेदी ई -टेंडरिंग पद्धतीने केली पाहिजे, असे असतानाही ही खरेदी चुकीची करण्यात आली आहे, असा आक्षेपही याचिकेत घेण्यात आला आहे.

ही याचिका एफ.आय.आर. म्हणून गृहित धरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. या याचिकेत मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह सीबीआय संचालक, मुख्य सचिव, महिला व बालविकास सचिव तसेच कंत्राट मिळालेले सर्व कंत्राटदार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. मुंबई हायकोर्टातही याविषयी याचिका करण्यात आली आहे. सर्व याचिका एकाच ठिकाणी चालविण्याची विनंती मुख्य न्यायमूर्तीकडे करण्यात येणार आहे. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे हे मांडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग आवश्यक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी म्हणजे केवळ सरकारने पुरविलेल्या अत्याधुनिक सुविधा नसून, त्यात लोकसहभागही अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या शहरांची स्मार्ट सिटीच्या यादीत येण्याची इच्छा आहे तेथील नागरिकांनाही सोयी-सुविधांचा भार उचलावा लागेल, असे अर्बन प्लॅनर आणि आर्किटेक्ट लक्ष्मीकांत सुर्वे यांनी सांगितले.

गेल्या १० ते १२ जुलैदरम्यान अहमदाबादच्या गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये स्मार्ट सिटीच्या संदर्भातील पहिला राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. त्यात सुर्वे यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात देशभरातील विविध महापालिकांचे अधिकारी, आर्किटेक्ट आणि अर्बन प्लॅनर सहभागी झाले. स्मार्ट सिटी प्रकल्पात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेतले जावे, अधिकाऱ्यांनी कल्पकता वापरावी आणि विकासाचे प्रस्ताव तयार केले जावेत, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. पुरेसा पाणीपुरवठा व जलनि:सारण, सौरऊर्जेचा कल्पक वापर, वित्तसाह्य इत्यादी विषयांवर कार्यक्रमात चर्चा झाली. यादरम्यान विविध प्रकल्पांना भेटीही देण्यात आल्या. शहराचे व्हिजन, एक स्मार्ट कल्पना, शहरव्यापी कल्पना आणि वित्तीय पर्याय या विषयांवर चर्चासत्रे झाली, अशी माहिती सुर्वे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हरवलेली रेल्वे नाशकात सापडली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन-८ मधील महापालिकेच्या बॉटनिकल गार्डनमधून हरवलेली रेल्वे नाशिक शहरात असल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकल्पावर ५५ लाख रुपये खर्च करण्यात येत असूनही, रेल्वे कधी धावणार याचे अचूक उत्तर कोणापाशीही नाही.

गणेशनगर वॉर्डाची तत्कालीन नगरसेविका प्राजक्ता भाले यांनी बालगोपाळांच्या मनोरंजनासाठी बॉटनिकल गार्डनमध्ये रेल्वेचा प्रस्ताव दिला होता. सिद्धार्थ उद्यानाप्रमाणे सिडकोकरांनाही उद्यानात रेल्वेचा आनंद घेता यावा, ही त्यामागची भूमिका होती. रेल्वेच्या तीन बोग्या शहरात आणून उदघाटनाचा 'शो' करण्यात आला. मात्र, रेल्वे रुळाचेच काम न झाल्यामुळे रेल्वे उद्यानात एका बाजूला ठेवण्यात आली होती. तिन्ही बोग्यांचे काम फायबरमध्ये असल्याने कडक उन्हाचा फटका बोग्यांना बसला. रंगही उडाला. रंग उडाल्याने रेल्वे जुनाटच वाटू लागली. साधारणः तीन महिन्यांनी तिन्ही बोग्या नाशिकला पाठवून देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ शाळा बंद पडणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या आठ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या शाळा वाचवण्यासाठी किंवा त्या अन्य शाळांमध्ये विलीन करण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. पंधरा दिवसांपूर्वी महापौरांनी या शाळांची पाहणी करून शाळा विलीन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणी अद्याप पुढाकार घेतलेला नाही.

शहरात सध्या महापालिकेच्या ७७ शाळा आहेत. त्यापैकी पहाडसिंगपुरा येथील शाळा चौथीपर्यंत असून त्यात दोनच विद्यार्थी आहेत. घाटी रुग्णालयाच्या जवळची शाळा सातवीपर्यंत आहे आणि तेथे नऊ विद्यार्थी आहेत. जयभवानीनगरातील शाळेत तीन विद्यार्थी आहेत. ही शाळा चौथी पर्यंत आहे. कैसरकॉलनीची शाळा चौथीपर्यंत असून, या शाळेत पाच विद्यार्थी आहेत. सिडको एन ६ येथील शाळा सातवीपर्यंत असून १७ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. सिडको एन ११ येथील शाळेत १५ विद्यार्थी असून, ही शाळा सातवीपर्यंत आहे. हनुमाननगर येथील शाळा चौथीपर्यंत असून या शाळेत चारच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मित्रनगर मधील शाळेत तीन विद्यार्थी असून ही शाळा चौथी पर्यंतच आहे. विद्यार्थी संख्या अत्यंत कमी

असल्यामुळे या सर्व शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

या शाळांना संजीवनी देण्याचे किंवा शाळांचे विलीनीकरण करण्याचे काम पालिका प्रशासनाने केले नाही. महापौर त्र्यंबक तुपे यांनी या शाळा विलीन कराव्यात अशी सूचना केली होती, पण त्याकडे अद्याप लक्ष देण्यात आले नाही. दरम्यान या शाळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाण्यावर गोळी लागून वाचलो!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शिवाजी महाराज माझे पूर्वज. त्यांचा अंश माझ्यात आहे. कारगिल युद्धात आपण मागे राहिलो तर आपल्या पूर्वजांचा अपमान केल्यासारखे होईल म्हणून मरणासन्न अवस्थेतही शत्रूवर तुटून पडलो. माझ्या खिशातल्या पाच रुपयांच्या नाण्यावर शत्रूची गोळी लागली अन् वाचलो', युद्धातला हा थरार परमवीरचक्र विजेते सुभेदार योगेंद्र सिंह यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

एमजीएम कॅम्पसच्या आइनस्टाइन सभागृहात परमवीरचक्र प्राप्त योद्ध्यांनी एमजीएम वृत्तपत्र विद्याविभागाचे विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर परमवीर पुरस्कार प्राप्त कॅप्टन बाणा सिंग, सुभेदार योगेंद्र सिंह, नायब सुभेदार संजयकुमार यांची उपस्थिती होती. तिन्ही योद्ध्यांनी सियाचिन, कारगिल युद्धांच्या आठवणींचे प्रसंग सांगून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. उपस्थितांनी टाळ्या व घोषणांनी त्यांना भरभरून साथ दिली.

यादव म्हणाले, 'माझ्या दोन्ही पायाला गोळ्या लागलेल्या होत्या. येणाऱ्या शत्रू सैन्याकडे पाहून मी बेशुद्ध पडून राहिलो. त्यांनी माझ्यावर बॅनेटचे वार केले. भारताच्या पोस्टकडे निघाल्यानंतर मी खडबडून जागा झालो आणि त्यांच्यावर तुटून पडलो. पाच जणांना यमसदनी पाठवले. त्यानंतर टाइगर हिलवर विजय मिळविला. युवकांनी प्रथम स्वत:चे व्यवस्थापन करावे. यातून देशाचे व्यवस्थापन होईल. कर्मवीरास कुणीच रोखू शकत नाही', हे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. याप्रसंगी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना कॅप्टन बाणा सिंगांसह तिघांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. कार्यक्रमास एमजीएमचे रणजित कक्कड, सैनिक कल्याण विभागाचे ग्रुप कॅप्टन एस. एस. पाठक, सहायक सैनिक कल्याण अधिकारी शिवकुमार कहाळेकर, डॉ. रेखा शेळके आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवरील मैत्री महागात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

तुळजापूर येथील उच्चशिक्षित डॉक्टरला फेसबुकवरून मैत्री करणे महागात पडले आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून (सोशल मिडीया) आकर्षित व भुरळ पाडणारे फोटो दाखवत लग्नाचे आमिष दाखवून एका तरुण डॉक्टरला २५ लाखाचा गंडा एका टोळीने घातला.

तुळजापूर येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पवन पाटील (रा. पाटोदा) याने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे येथील व्हॉट्सअप ग्रुपमधील बारा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. पवन पाटील (अस्थिरोग तज्ज्ञ) हे तुळजापूर येथील नामांकित डॉक्टर आहेत. फेसबुकवर चॅटींगचा खेळ करीत असताना त्यांची मैत्री एका मुलीसोबत झाली. त्यावेळी प्रियांका शहा नावाच्या या मुलीने डॉक्टर पवन यांच्याशी सलगी वाढवित त्यांना आकर्षित केले. डॉक्टर पवनला अपर्णा बसवंती हे मूळ नाव असलेल्या या मुलीने प्रियांका शहा या नावाने खोटे फेसबुक अकाउंट उघडले. त्यावर तिने दक्षिणेकडील सुंदर मॉडेलचा फोटो फेसबुकसाठी वापरला व डॉक्टर पवनला प्रेमजाळ्यात ओढले. तिने एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप निर्माण करून पवनची दोस्ती वाढवली.

दरम्यानच्या काळात अपर्णाने सुंदर फोटोद्वारे डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखविले व आई-वडिल म्हणून इतर लोकांना डॉ. पवन बरोबर फोनद्वारे बोलायला लावले. अपर्णाच्या भुल भुलैय्या प्रेमात डॉ. पवन पाटील फसले. वेळोवेळी वेगवेगळ्या अडचणी सांगून तिने डॉक्टरकडे पैशाची मागणी केली व ते ही पैसे देत गेले. डॉ. पवन यांनी या तरुणीच्या व तिच्या साथीदारांच्या बँक खात्यावर आतापर्यंत २५ लाख रुपये भरले.

जेव्हा डॉक्टर संभाव्य पत्नी होणाऱ्या या सुंदर मुलीला भेटण्यास गेले तेव्हा या मुलीने भेट टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टरचा संशय बळावला व आपली फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रियांका उर्फ अपर्णाने दिलेल्या पत्त्यावर घराचा शोध घेतला. तेव्हा सत्य समोर आले.

अनेकांची लुबाडणूक झाल्याची शंका

या लुबाडणूक प्रकरणात प्रियंकाने ९१६८०४८४८०, ३५०३३९६७०, ८३०८७३८६८७ या नंबरचा वापर केला आहे. या नंबरवरून तिने अनेकांना गंडविले असल्याचे शंका पोलिस व्यक्त करीत असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास चालू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांजरा ट्रस्टवर झेडपी मेहरबान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मांजरा चॅरिट्रेबल ट्रस्टच्या मांजरा आयुर्वेद महाविद्यालयासाठी जिल्हा परिषदेची शाळा शासन मान्यतेशिवाय भाड्याने दिल्याचे माहितीच्या अधिकारात उजेडात आले आहे. जिल्हा परिषदेने भाडे करारात दाखविलेली मेहरबानी ही आश्चर्यकारक आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकाराचे कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

या प्रकारामुळे जिल्हा परिषद, राज्य शासन आणि केंद्र शासनाची केलेल्या नुकसानीची माहिती उजेडात आली आहे. या सर्वांचे लिखित कागदपत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी निवेदनासोबत जोडले आहेत. तब्बल १३ वर्षांपूर्वी मांजरा ट्रस्टला जिल्हा परिषदेने शासन मान्यतेनुसार दहा वर्षांकरीता दरमहा ४५ हजार ५०० रुपये भाडे तत्त्वावर देण्याचा ठराव पारीत करण्यात आला. त्यानंतर एक वर्ष आणि सहा महिन्यांचे भाडे मांजरा ट्रस्टने भरल्याचे कागदपत्रावरुन सिद्ध होत आहे. त्यानंतर सात वर्षाचे म्हणजे ३१ डिसेंबर २००४ ते ३१ डिसेंबर २०१० या काळाचे भाडे १५ जानेवारी २०११ रोजी दिले. त्या काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दरमहा भाडे भरण्यासाठीच्या तब्बल ८० नोटीसा ट्रस्टला बजावल्या आहेत. त्याचे एकाचेही उत्तर ट्रस्टने दिले नसल्याचा दावा निवेदनात केला आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी भाडे वाढीसाठी दुय्यम सहनिबंधकाच्या मुल्यांकन पत्राच्या आधारे २० नोब्हेंबर २०११ रोजी मांजरा ट्रस्टकडून दरमहा एक लाख ९५ हजार ५८५ रुपये ए‌क जानेवारी २०१३ पासून वसूल करण्याचे पत्र दिले. परंतु याच कार्यकारी अभियंत्याने स्वताच्या २४ डिसेंबर २०१२ च्या कार्यालयीन टिपणीत मांजरा ट्रस्ट वाढिव भाडे अमान्य केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहे.

त्यानंतर ८ मार्च २०१३ रोजी जिल्हा परिषदेने मांजरा ट्रस्टला दरमहा ८२ हजार २१५ रुपये भाडे आणि ते ही पुढील २० वर्षांसाठी वसुल करण्याचा ठराव पारीत करण्यात आला आहे. या सर्व कागदपत्रातील धक्कादायक बाब म्हणजे १४ नोव्हेंबर २०१४ रोजी जिल्हा परिषदेने कळविले आहे की, मांजरा ट्रस्टशी केलेल्या भाडे कराराला शासनाची परवानगी घेतलेली नाही.

या सर्व प्रकाराबाबत सहा प्रश्न निवेदनात मुख्यकार्यकारी अधिकारी यांना विचारण्यात आले आहेत. करारनामा न करता दहा वर्षांसाठी जागा भाड्याने का दिली गेली, ठरावाप्रमाणे शासनाची मंजुरी का घेतली गेली नाही, सात वर्ष भाडे वसूल का करण्यात आले नाही, सात वर्षांचे भाडे एकदम घेताना व्याज आकारण्यात का आले नाही, दहा वर्षांच्या ऐवजी ३० वर्षाचा करार करताना एक लाख ९५ हजार ५५८ रुपये भाडे निश्चीत केले गेले असतानानंतर ८२ हजार २३५ रुपये भाडे आकारण्यासंदर्भात कोणतीही हरकत का घेण्यात आली नाही, जिल्हा परिषदेच्या नुकसानीस जबाबदार कोण असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

याबाबत ८ जुलैला निवदेन प्राप्त झाले आहे. या निवेदनाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून करण्यात येणार आहे. त्यावर अजून काही कारवाई करण्यात आलेली नाही. चौकशीनंतर कारवाई केली जाईल.

- दिनकर जगदाळे, सीईओ, जिल्हा परिषद, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images