टॉवर्सच्या कंपाउंडमध्ये असलेले सप्रर्णीचे वृक्ष हल्ली बऱ्यापैकी उंच झालेले आहेत. दुसऱ्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटच्याही वर गेलेत आता झाडांचे शेंडे. फ्लॅटसमोरच असलेल्या वृक्षाच्या शेंड्यावरच्या बेचक्यात महिन्यापूर्वी एक कुटुंब राहायला आलंय.
↧