भाजी मंडईत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या किरकोळ दरात प्रतिकिलो २० ते ३० रूपये इतकी घट झाली आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या उस्मानाबाद शहरातील भाजी मंडईत चांगल्या प्रतीचा कांदा ३० रूपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे.
↧