पैठण रोडवरील माँबापच्या दर्ग्याजवळील वळणावर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता झालेल्या अपघातात ज्येष्ठ वकिलाचा मृत्यू झाला आहे. पुरेसा रुंद नसलेला रस्ता, धोकादायक वळणे आणि अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक यांमुळे सातत्याने अपघातांना आमंत्रण देणाऱ्या या रस्त्यावर आणखी एका नागरिकाचा बळी गेला आहे.
↧