नांदेड येथील विष्णुपुरी भागात असलेल्या कै. शंकरराव चव्हाण उपसा जल सिंचन प्रकल्प भरल्याने त्यातून तीन दरवाजे उघडून गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले होते. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला होता. बुधवारी फक्त एकच दरवाजा उघडा असून हे अतिरिक्त पाणी फुकटच वाहत आहे.
↧