Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राज्यात होणार नवी १५ वीज उपकेंद्रे

$
0
0


Abdulwajed.Shaikh@timesgroup.com
औरंगाबाद ः ‘स्पर्धेच्या युगात शासकीय कंपन्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सेवा आणि सुविधा वाढविण्यासाठी महापारेषणाचा कारभार अधिक चांगला करण्याची गरज आहे. मागील तीन वर्षांपासून आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे आगामी वीस वर्षांचे नियोजन होईल. राज्यात दरवर्षी नवे १५ उपकेंद्र सुरू करू,’ असे प्रतिपादन महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष राजीवकुमार मित्तल यांनी ‘मटा’शी बोलताना केले.
- आकृतिबंध तयार करताना तंत्रज्ञ आणि यंत्रचालक यांच्याबाबत तुम्ही काय विचार केला आहे?
- आकृतिबंध तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा आकृतिबंध तयार करताना पुढीच वीस वर्षांचा विचार केला आहे. यात प्रत्येक वर्गाचे काम, भविष्यात लागणारी गरज याचा विचार करून सध्या प्रारूप तयार करण्यात आले आहेत. यात आवश्यक तो बदल केला जाईल.

- कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा विचार होणार का?
- आकृतीबंध तयार करताना संघटनांच्या सूचनांची दखल घेतली जाईल. सध्याचे प्रारूप तुम्ही पाहिल्यास काही वर्गात जास्त कर्मचारी, तर काही वर्गात कमी कर्मचारी आहेत. या प्रारूपमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांचे नुकसान न करता त्यांचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.

- भविष्याच्या दृष्टीने काय उपाययोजना आहे?
- २००० नंतर वीज क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. वीज मंडळाचा एकछत्री कारभार संपुष्टात आला. महानिर्मितीसह रिलायन्स, टाटा आणि बेस्ट कंपन्या वीज निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या. त्यामुळे महापारेषणामध्ये कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. महापारेषणाचा सध्याचा व्याप मोठा आहे. कंपनीत १६८५९ कर्मचारी आहेत. हे कर्मचारी ६३३ उपकेंद्राच्या माध्यमातून वीज व्यवस्थेचे काम पाहतात. आगामी काळात दरवर्षी १५ उपकेंद्र अधिक वाढवावे लागतील. त्या दृष्टीने कामाचे नियोजन सुरू आहे.

- आकृतीबंधाचे काम केव्हापर्यंत पूर्ण होईल?
- आकृतीबंधाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. संघटनांचे मत घेतल्यानंतर हा आकृतीबंध तयार करण्यात येईल. स्पर्धेच्या युगात भविष्याची गरज आणि सध्याचे मनुष्यबळ याचा विचार करून आकृतिबंध लवकरच सर्वसंमतीने लागू केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डॉक्टर रख्माबाई’ची भुरळ!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी रसिकांना दहा दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. ‘डॉक्टर रख्माबाई’, ‘द रोड’, ‘स्टुडंट लाइव्ह अॅक्शन कॉम्प १’ सारख्या वैविध्यपूर्ण चित्रपटांनी रिसकांना भुरळ घातली.
नाथ ग्रुप आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे शुक्रवारपासून सुरुवात झाली. शनिवारी महोत्सवात विविध धाटणीचे दहा चित्रपट दाखविण्यात आले. त्यात ‘डॉक्टर रख्माबाई’ मराठी चित्रपटही रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला. बालविवाहामुळे मुलींना विविध पातळ्यांवर समस्यांना तोंड द्यावे लागते. या विषयी रख्माबाईने दिलेला लढा हा सिनेमातून मांडण्यात आला आहे. त्यांच्या जीवनपटाची मांडणी, अठराव्या शतकातील तो काळ दाखविण्याचे कसब दिसून आले. अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आहे. दोन सिनेमागृहात दिवसभरात प्रत्येकी पाच-पाच सिनेमे दाखविण्यात आले. त्यासह ‘द रोड’, ‘स्टुडंट लाइव्ह अॅक्शन कॉम्प १’, ‘द रोड’, ‘स्टुडंट लाइव्ह अॅक्शन कॉम्प २’ अशा सर्वच चित्रपटांना औरंगाबादमधील रसिकांनी दाद दिली.
चित्रपट महोत्सवाला रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. आयोजकांनी तरुणांच्या मदतीने कॉलेजांमध्ये जनजागृती केली. चित्रपटविषयक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. इंजिनीअरिंग, नाट्यशास्त्रसह विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी महोत्सवात हजेरी लावत सिनेमांचा आनंद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​राज्यातील प्राचार्यांचे ‘पूश’ ट्रेनिंग

$
0
0

पृथा वीर, औरंगाबाद

‘प्रत्येक महाविद्यालयात तक्रार निवारण समिती अर्थात विशाखा स्थापन करून त्यांचे काम चोख होण्यासाठी राज्य महिला आयोगाने प्राचार्यांचे ट्रेनिंग घेत आहे. त्यासाठी ‘पूश’ म्हणजेच पीपल युनायटेड अगेनस्ट सेक्श्युअल हरासमेंट हा उपक्रम सुरू केला आहे,’ अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

रहाटकर या अभियानाबद्दल म्हणाल्या, ‘गेल्या २८ जानेवारीपासून राज्यातील पाच विद्यापीठांमध्ये ‘पूश’ कार्यशाळा घेण्यात आली. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती गठित करणे बंधनकारक असताना अद्यापही अनेक आस्थापना, विशेषतः महाविद्यालयांमध्ये ही समिती स्थापन झाली नाही. लैंगिक छळाच्या तक्रारीही वाढल्या असून, यूजीसीच्या सक्षम अहवालामध्येही सर्व प्रकारच्या महाविद्यालयांना ‌विचारणा झाली आहे. त्यामुळे मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी आयोगाने पूशद्वारे सर्वप्रथम प्राचार्य व समित्यांच्या सदस्यांना विशाखाची संपूर्ण माहिती दिली. दोन महिन्यांचा अभ्यास करून इंग्रजी व मराठीमध्ये अभ्यास साहित्य तयार करण्यात आले असून, अॅड. विशाखा केडिया (मुंबई) प्रशिक्षण देत आहेत. नागपूर, न‌ाशिक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, नांदेड व पुणे इथे कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. ६ फेब्रुवारीपासून सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, मुंबई व सर्वात शेवटी २१ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यशाळा घेण्यात येईल.’

२ मे २०१५ मध्ये यूजीसीच्या सक्षम अहवालामध्ये अंतर्गत समितीबाबत विद्यापीठ व सर्व महाविद्यालयांना विचारणा झाली होती. जेंडर सेन्सेटायझेशनसाठीही विशाखा समिती असणे बंधनकारक असून, मुली व महिलांइतकेच पुरुषांनाही कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महाविद्यालयांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी व आपल्या विद्यार्थ्यांना या कायद्याचे ज्ञान द्यावे, असा आयोगाचा उद्देश आहे. यासाठी आम्ही इंग्रजीतून साहित्य तयार केले असून, विशाखासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काम करणारा देशातील हा पहिला आयोग आहे. - विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

पूशद्वारे काय होईल?

- महाविद्यालयांना विशाखा समितीचे प्रशिक्षण बंधनकारक.
- प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र घेण्यापूर्वी प्रत्येक महाविद्यालयाकडून संबंधित महाविद्यालयात समिती असल्याचा फॉर्म भरून घेण्यात येत आहे. याद्वारे आयोगाचा डेटाबेस तयार होईल.
- राज्यामध्ये विशाखा कायदा माहित असलेले १० हजार प्रशिक्षक तयार होतील.
- विशाखा कायद्याचे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण ‌देणारा राज्य महिला आयोग देशातील पहिला आयोग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘काठी न् घोंगडं’ची जादू!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘काठी न् घोंगडं...’ च्या तालावर शनिवारी ललित कला महोत्सव रंगला. या गाण्यावर नृत्य सादर करणाऱ्या हंसराज जगताप आणि राजश्री खरात या सिनेकलावंतांबरोबर रंगमंदिरातील कलाकारांनी ठेका धरला, जागेवर उभे राहून डान्सही केला.
मराठवाडा कला विकास महामंडळातर्फे संत एकनाथ रंगमंदिरात २८ व्या ललित कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उदघाटन चित्रपट कलावंत हंसराज जगताप व राजश्री खरात यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राजेंद्र काळे होते. माजी आमदार जयंतराव ठाकरे, प्रा. अशोक तांबटकर, प्रल्हाद शिंदे - हस्तेकर, संगीता भापकर - शिंदे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या महोत्सवात संगीत, नाट्य, नृत्य आदी कला प्रकार बाल कलाकारांनी सादर केले. या सर्वांचे आकर्षण हंसराज आणि राजश्री हेच होते. उदघाटक म्हणून या दोघांनी उपस्थित बाल कलाकारांनी मार्गदर्शन तर केलेच, पण कला महोत्सवाचे संयोजक प्रल्हाद शिंदे यांच्या विनंतीवरून हंसराजने ‘काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं, मला भी जत्रेला येऊ द्या की रं’ या गाण्यावर भन्नाट नृत्य केले. उपस्थितांनी या नृत्याला वन्समोअर दिल्यावर हंसराजच्या जोडीला राजश्री खरातने देखील सहभान नोंदवत याच गाण्यावर नृत्य केले. त्यांची अदाकारी पाहून अख्खे रंगमंदिर गाण्यात व नृत्यात न्हावून निघाले. यानंतर विविध क्रीडा प्रकारासाठीचे बक्षीस वितरण झाले. स्पर्धेचे परीक्षण राजेश निंबेकर, पूजा कातकडे, संगीता कार्ले यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली बल्लाळ, हरजित कौर यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नीलाक्षी राव, मीरा मगर, स्वाती देशमुख, अजिंक्य शिंदे, पवन निर्मळ, अंकुश जगताप, कुणाल पवार, सुवर्णा क्षिरसागर आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुंदर केकने तरळले जीभेवर पाणी...!

$
0
0


औरंगाबाद : सुंदर सजावट केलेले केक, त्यांचा विशिष्ट प्रकारचा रेंगाळणारा गंध आणि परीक्षकांनी व्वा म्हणून दिलेली दाद...उपस्थितांचे तोंड यामुळे नक्कीच पाणावले.
रेल्वे कॉटर्सच्या रेस्ट हाऊसमध्ये आयोजित केक स्पर्धेमध्ये महिला आणि अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढवले. बीई करणाऱ्या सैय्यदा सना हीने आपल्या केकला तिरंग्याची जोड देत सुंदर सजावट करून स्पर्धा जिंकली. माधवी महाजन व सुनील महाजन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते. क्वार्टसच्या युवतींची स्पर्धेत सहभागी होण्याची पहिलीच वेळ असली, तरी सादरीकरणामध्ये सर्वजणी अव्वल ठरल्या. केवळ व्हेज केक बनवण्याची अट होती. बन्सिलालनगरच्या ज्योती महेश्वरी यांनी परीक्षणासोबतच स्पर्धकांना मार्गदर्शन केले. केकवर गडद रंगाचा वापर करू नये, डार्क कलर्स टाळावे, बेस व क्रीम दोन्ही गोड असल्याने केक फार गोड नसावा, असे त्या म्हणाल्या.
रेसिपी स्पर्धेत भाग घ्यायचा, तर चव व सादरीकरण महत्त्वाचे आहे. सोशल एटीकेटस स्पर्धकांनी आर्वजून सांभाळायला हवे. केक केकबोर्डवर सर्व्ह करावा. आयोजकांनी व्यवस्था करो की न करो स्पर्धकांनी आपल्या सोबत पाणी व चमचा ठेवावा. आपली रेसिपी स्वच्छ व कोऱ्या कागदावर किमान समजेल अशा शब्दांमध्ये लिहावी, अशा टीप्स त्यांनी दिल्या. सय्यदा सनासह मेनका नवगिरे, प्राची बोरकर, शांती लहिरे, प्राजक्ता गडलिंगे, आशालता नलवाडे विजेत्या ठरल्या. यावेळी रेल्वेस्थानक व्यवस्थापक ए. सी. निकम, धनंजय कुमार ‌सिंग, राजीव राय, नीलिमा ठाकरे, राणी संजयकुमार, जयश्री ठेमरे, तरोले आदी उप‌स्थित होते.

रेसिपीमध्ये करण्यासारखे व शिकण्यासारखे बरेच आहे. केक बनवणे ही कला असली, तरी सराव हवा. यासाठी आपल्या घरच्या कार्यक्रमांमध्ये, ‌वाढदिवशी किंवा कुणाला गिफ्ट म्हणून स्वतः तयार केलेला केक द्या. यामुळे सराव होईल.- ज्योती महेश्वरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांची ‘सिद्धार्थ’मध्ये सैर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
युवकांच्या ईग्नाईट सोशल फाऊंडेशनच्या ‘उत्सव आनंदाचा' उपक्रमामध्ये बालगृहातील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सिद्धार्थ उद्यानाची सफर घडवण्यात आली. कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही हा उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक कार्य करण्याची किंवा त्यात भाग घ्यायची हौस सर्वांना असते. मात्र, वेळेचा अभाव असतो. शिवाय आपली मदत योग्य व्यक्तींपर्यंत पोचेलच याची शाश्वती नसते. समाजातील अशाच गरजूंपर्यंत मदत पोचवण्याची जबाबदारी ईग्नाइट ग्रुपने उचलली. यासाठी 'उत्सव' उपक्रमाद्वारे दानशूर व्यक्तींसह ग्रुपच्या सदस्यांनीही निधी व शालेय साहित्य जमा केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उस्मानपुऱ्यातील गजानन बालसदनातील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या मुलांना सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची सफर घडवण्यात आली. बागेचा फेरफटका मारल्यानंतर मुलांना फराळ देण्यात आला. या मुलांसाठी खूप काही करणे शक्य नसले तरी या छोट्याशा उपक्रमातून चिमुकल्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ही मेहनत सत्कारणी लागली, अशी प्रतिक्रिया ग्रुपने ‘मटा’स दिली.

ग्रुपचे सदस्य
अध्यक्ष आनंद गावंडे, पवन खडके, वैभव बोडखे, दीपक कुमठे, शुभम चौधरी, समीर गावंडे, दीपक बोकील, भूषण चौधरी, ज्ञानेश्वर वाघ, शुभांगी थोरात, श्रुती काळे, प्रांजल महाजन, शुभम सपकाळ, दर्शना चव्हाण, संतोष होळकर, ऐश्वर्या बिरारे, ज्योती मोरे, मृणाल गायकवाड, अरुंधती जगताप, ऋतुजा हरकाळ, अंकुश जेऊघाले, समीक्षा थोरात, विशाखा देमरे, मंगेश दंबाळे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका-महावितरण वादात शहर अंधारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपापसांतील भांडणामुळे महापालिका व महावितरण या दोन सरकारी कार्यालयांनी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे. बिल न भरल्यामुळे महावितरणने पथदिव्यांची वीज खंडीत केली आहे. त्यामुळे अर्धेअधिक पथदिवे बंद पडले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
थकीत वीज बिलावरून गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू आहे. विजेचे बिल थकल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी महावितरणने महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसह सिद्धार्थ उद्यानाचे वीजकनेक्शन तोडले होते. सध्याचे बिल आम्ही भरत असताना महावितरणने अशी टोकाची भूमिका घेवून कारवाई करायला नको होती असे मत व्यक्त करीत पालिकेने महावितरणवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या ज्या जागांवर महावितरणच्या डीपी आहेत, तेथे व्यावसायिक दराने मालमत्ताकर आकारणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. शहरातील एकूण डीपींची संख्या (रोहित्र) ५७९ आहे. त्यापैकी २३५ पालिकेच्या जागेवर आहेत. या डीपींवर १ एप्रिल २०१०पासून व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारून महावितरण कडून १ कोटी ७६ लाख ९९ हजार ८०३ रुपयांची थकबाकी महापालिकेने काढली. त्यावसुलीसाठी महावितरणला नोटीसदेखील बजावली.
महापालिकेच्या भूमिकेनंतर महावितरणनेदेखील पालिकेला कोंडीत पकडले आहे. पथदिव्यांचे वीज बिल न भरल्याचे कारण पुढे करून शुक्रवारपासून पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. पथदिव्यांचे सुमारे २५ लाख रुपयांचे बिल महापालिकेकडे थकलेले आहे. पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे अर्धेअधिक शहर काळोखात बुडाले आहे. सायंकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यानच अंधार पडतो. त्यामुळे याच वेळी पथदिवे लागले पाहिजेत, पण शुक्रवारपासून पथदिवे बंद पडल्यामुळे प्रामुख्याने सिडको-हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, गारखेडा, पुंडलिकनगर या भागातील पथदिवे बंद झाले आहेत. शहराच्या अन्य भागातही काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणी शुक्रवारी महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांत बैठक झाली, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शनिवारीही आढावा बैठक घेतली, पण त्यानंतरही पथदिवे सुरू होऊ शकले नाहीत.

पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या प्रकरणात आयुक्तांशी चर्चा केली. महावितरणकडे थकीत एलबीटीच्या प्रकरणासंदर्भात सुनावणी सुरू आहे. तो निकाल लागेपर्यंत चालू महिन्याचे बिल भरण्याची पालिकेची तयारी असल्याचे आयुक्तांनी सांगूनही महावितरणचे अधिकारी ऐकत नाहीत. महावितरणने शहराला वेठीस धरू नये.
- भगवान घडमोडे, महापौर.

पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात शनिवारी ठोस काही निर्णय झाला नाही. कदाचित सोमवारी यातून मार्ग निघेल. सोमवारपर्यंत विजेचे बिल भरण्याइतपत पैसे आमच्याकडे जमा होतील, ते महावितरणकडे भरल्यानंतर पथदिवे सुरू होतील. सोमवारपर्यंत वाट पहावी लागेल.
- ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त, महापालिका.


शहर वेठीस...

२३५
महापालिकेच्या जागांवरील
डीपींची संख्या

१,७६,९९,८०३ रुपये
महावितरणकडे डीपींच्या जागांचा थकीत मालमत्ता कर

४० हजार
शहरातील पथदिव्यांची संख्या

२५ लाख रुपये
पथदिव्यांचे थकित वीज बिल

सुमारे २० हजार
बंद पडलेले पथदिवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ प्रकरणाचा अहवाल पाठवा

$
0
0

नगरविकास विभागाचे लातूर पालिकेला पत्र

म. टा. प्रतिनिधी, लातूर

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान करून रस्त्यावर अतिक्रमण करण्यास मदत केल्याप्रकरणी लातूर पालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अपात्र घोषीत करावेत, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक सुधीर धुत्तेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने गंभीर दखल घेत तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने अहवाल पाठवून द्यावा, असे पत्र पाठविले आहे.

लातूर पालिकेच्या स्थायी समितीच्या २५ जानेवारी २०१६ रोजीच्या बैठकीतील ठराव क्रमांक ६० च्या अनुषंगाने बसस्टँडच्या मागे असणाऱ्या अंबिका मंदिरच्या समोरच्या रस्त्यावर कायस्वरुपी शेड (सभा मंडप) उभारण्यास परवानगी दिलेली आहे. याच मंदिराच्या नियमितीकरणासाठी कुठलीही कारवाई न करता रस्त्यावर अतिक्रमणास मदत केली असल्याचे निवेदनात धुत्तेकर यांनी म्हटले आहे.

त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने २० संप्टेबर २००९ रोजी अतिक्रमणावर बंदी घातलेली असताना २५ जानेवारी २०१६ रोजी असा ठराव करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. तसेच अनधिकृत धार्मिक स्थळ निर्मुलन समितीने नियमितीकरण करावयाचे यादीत या मंदिराचा समावेश न करता सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून रस्त्यावर अतिक्रमण करण्यास मदत केल्याप्रकरणी स्थायी समितीच्या १६ सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अपात्र ठरवावे, असे पत्र धुत्तेकर यांनी पाठविले होते.

या पत्राची राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने गंभीर दखल घेतली आहे. दोन फेब्रुवारी २०१७ रोजी कक्ष अधिकारी संजय वारंग यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून धुत्तेकर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अभिप्राय तातडीने सरकारकडे पाठवून द्यावा. वास्तीवक पाहता २५ जानेवारी २०१६ चा ठराव राज्य सरकारने ५ जानेवारी २०१७ ला विखंडीत केल्याचे पत्रही पालिकेला दिलेले आहे. त्यामुळे आता कारवाई काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

याप्रकरणी केलेली तक्रार अत्यंत स्पष्ट आहे. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. पालिका आयुक्त ही त्यांना आलेल्या पत्राप्रमाणे तातडीने त्यांचा अभिप्राय पाठवतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबीकडे गांभिर्याने पाहिल्यामुळे जनतेलाही न्याय मिळेल याची खात्री आहे.

सुधीर धुत्तेकर, माजी नगरसेवक, लातूर.

प्रशासनाने अहवाल सादर करीत असताना प्रोसेडिंगवर आम्ही नोंदविलेल्या विरोधाचा विचार करावा. याबाबत नेमकी कारवाई काय होईल यावरून कोठे दाद मागायची याबाबत निर्णय घेऊ.

राजा मिनीयार, नगरसेवक, लातूर.

राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून या प्रकरणी पत्र आलेले आहे. त्यानुसार तातडीने अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे.

रमेश पवार, आयुक्त, मनपा लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्व विकासकामे शेतकऱ्यांसाठीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
‘निसर्गाने पाऊस दिला, हे पाणी अडवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवली. विहिरींना भरपूर पाणी आल्याने मुबलक वीज दिली. युरियाची टंचाई दूर झाली, कापूस पिकाचे अनुदान दिले, सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू अाहे. अडीच वर्षांत झालेली ही सर्व विकासकामे शेतकऱ्यांसाठीच अाहे,’ असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी रविवारी गणाेरी येथील प्रचार सभेत केले.
या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी ष्ठ कार्यकर्ते पंडितराव उबाळे होते. माजी मंत्री डाॅ. नामदेवराव गाडेकर, गणाेरी गटातील भाजप उमेदवार अनुराधा चव्हाण, पंचायत समिती गणातील उमेदवार साेनाली कैलास साेनवणे, वाणेगाव गणातील उमेदवार एकनाथ धटिंग यांची उपस्थिती होती.
‘ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लाेकसभा, अशी विकासकामांची साखळी आहे. दाेन वर्षांपासून काही कामांकरिता जिल्हा परिषदेला पत्र दिले. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष अापल्या विचाराचे असते, तर अातापर्यंत भरपूर विकासकामे झाली असती,’ असे बागडे म्हणाले. गेल्या दहा वर्षांत मिळाला नाही, एवढा लाभ शेतकऱ्यांना या अडीच वर्षात झाला आहे. राज्यात अब्जावधींची कामे होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाेट दाखवण्याची हिंमत कोणी केली नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी सरपंच पद्माबाई जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुहास शिरसाठ, मंगला वाहेगांवकर, सदू पाटील तांदळे, विवेक चव्हाण, सांडू जाधव, कल्याण चव्हाण, सजनराव चव्हाण, बाळासाहेब तांदळे, कृष्णा गावंडे, रामेश्वर भादवे, विलास उबाळे, मिठ्ठू उबाळे, उत्तमराव भादवे, शेषराव जाधव, बाळू म्हस्के, रवींद्र गायकवाड आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरारी पथकांची संख्या आरटीओत वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सध्या राज्यातील विविध आरटीओ कार्यालयात ६३ भरारी पथक आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही संख्या वाढवून १२३ करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली.
खटुआ समितीसोबत रिक्षा चालकांच्या मागण्यांचे निवेदन घेतल्यानंतर प्रवीण गेडाम यांनी शनिवारी मराठवाड्यातील आरटीओ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरटीओ कार्यालयाला प्राप्त होत असलेल्या महसूलबद्दल प्रथमच चर्चा करण्यात आली. ‘राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयाचा कारभार ऑनलाइन होणार आहे. औरंगाबाद आरटीओ कार्यालय ऑनलाइन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील उर्वरित आरटीओ कार्यालयामध्ये ही व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी टु एमबीपीएस लाइन आवश्यक आहे. हे कनेक्शन घेण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे,’ असे आवाहन गेडाम यांनी केले. याशिवाय चेक पोस्टची माहिती त्यांनी जाणून घेतली. मराठवाडयातील आरटीओ कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.
सध्या राज्यात ६३ भरारी पथक आहेत. वाहतूक नियमांच्या कडक अंमलबजावणीकरिता १२३ भरारी पथक तयार केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी एक पथक आहे, त्या ठिकाणी दोन पथकांची नेमणूक होणार आहे. दोन पथकांच्या ठिकाणी तीन पथके स्थापन केले जातील. भरारी पथकांच्या माध्यमातून अधिक कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती गेडाम यांनी दिली. औरंगाबाद व इतर शहरात बेशिस्त वाहतूक करणाऱ्यांत रिक्षाचालक हा एक घटक आहे. मूळ काम बाजुला सारून वाहतूक पोलिसांना रिक्षाचालकांना शिस्त लावावी लागते. आरटीओ विभागाकडे कर्मचारी कमी आहेत. भरारी पथकांची संख्या वाढल्यास बेशिस्त रिक्षाचालक व इतर वाहनधारकांवर कारवाई शक्य होणार आहे.

ओव्हरलोड वाहनांना ब्रेक
औरंगाबाद शहरातून ओव्हरलोड वाहने जात असतात. औरंगाबाद व मराठवाड्यातील आरटीओ कार्यालयात एक किंवा दोन फ्लाईंग स्क्वॉड असल्याने प्रत्येक ओव्हरलोड वाहनावर कारवाई शक्य नाही. स्क्वॉडची संख्या वाढल्यास या वाहनांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. भरारी पथकांची संख्या वाढल्यास ट्रॅव्हल्स बस, स्कूल बस या सारख्या वाहनांवर कारवाई सुरू होणायीच शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा शास्त्रज्ञांशी संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मोसंबी बागेचे व्यवस्थापन, उन्हाळ्यात पिकांचे पाण्याचे नियोजन, मधमाशापालन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांशी खुला संवाद साधला. कृषी विज्ञान केंद्राच्या ‘शेतकरी-शास्त्रज्ञ मंच’ उपक्रमात शेतकऱ्यांनी शंका निरसन करून घेतले. शेतीत नियोजनपूर्वक काम केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथे बुधवारी ‘शेतकरी-शास्त्रज्ञ मंच’ उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाला डॉ. एम. बी पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. जी. आर. टेकाळे, ईश्वर ठुबे, डॉ. एस. बी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘उन्हाळ्यात मोसंबी बागेचे व्यवस्थापन’ या विषयावर बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रत्र डॉ. एम. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ‘आंबा पिकाची लागवड’ या विषयावर हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. ‘उन्हाळी पिकांसाठी सिंचन व्यवस्थापन’ या विषयावर ‘वाल्मी’चे कृषीविद्या शास्त्रज्ञ डॉ. जी. आर. टेकाळे यांनी व ‘मधुमक्षिका पालनामुळे पिकांच्या उत्पादकतेवर होणारे परिणाम’ या विषयावर ईश्वर ठुबे यांनी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे संपर्क शेतकरी दीपक जोशी यांचा ‘किसान पुरस्कार’ मिळाल्याबद्दल डॉ. एस. बी. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. डी. देशमुख यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. गीता यादव, हनुमंत देवठाणकर, डॉ. संतोष केदार, रामेश्वर ठोंबरे व सविता मानकर यांनी सहकार्य केले.

मधमाशांचे संरक्षण करा
वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत असताना त्यांच्या नियंत्रणासाठी कायद्याचा अडसर आहे. मधमाशा मात्र शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत. माशांच्या पिकातील संचारामुळे उत्पादनात वाढ होते. पण, मध व मेणासारख्या उत्पादनासाठी कुणीही पोळे नष्ट करून मोहळाची खुलेआम विक्री करतात. शासनाने कायदा करून या प्रकारावर नियंत्रण आणून शेतीचे हित जोपासावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाॅक टाइम : योगासनांपेक्षा योगमुद्रा सोप्या अन् जीवरक्षक

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkheeMT
योगासने - प्राणायामपेक्षाही योगमुद्रा सोप्या आहेत. वृद्ध व आजारी व्यक्तींना योगासने-प्राणायाम करण्यासाठी मर्यादा येतात; किंबहुना आजारी व वृद्धांना योगासने करणे शक्य नसते, मात्र बहुतेक योगमुद्रा आजारी व्यक्तींनाही करणे शक्य आहे. महत्वाचे म्हणजे योगमुद्रा या जीवरक्षक आहेत आणि ते मी स्वतः अनुभवले आहे. कुठल्याही दुष्परिणामांशिवाय योगमुद्रा औषधांपेक्षा प्रभावी काम करीत असतील, तर मी औषधे का घ्यावीत, असा सवाल योगमुद्रांचे अभ्यासक डॉ. आर. डी. दीक्षित यांनी ‘मटा’ला दिलेल्या भेटीत उपस्थित केला.

- ‘अॅलोपॅथी’सोडून मुद्रांकडे कसे वळालात?
- मी देगलूरमधील पहिला एमबीबीएस डॉक्टर. तिथेच ५० वर्षे अॅलोपॅथीची प्रॅक्टिस केली. २००५मध्ये पहिल्यांदा हार्ट अटॅक आल्यानंतर बायपास झाली. २०१४मध्ये दुसऱ्यांदा हार्ट अटॅक आल्यानंतर पुन्हा बायपास सुचविण्यात आली. माझी बायपासची इच्छा नव्हती म्हणूनच गोळ्यांचा पर्याय स्वीकारला, मात्र तब्बल १६ गोळ्या देण्यात आल्या होत्या व त्याला मी खूप कंटाळलो होतो. मुलाकडे औरंगदाबादला सहजच राजेंद्र मेनन यांचे ‘दि हिलिंग पॉवर ऑफ मुद्राज्’ हे पुस्तक वाचले व मुद्रा या ‘लाईफ सेव्हिंग’ असल्याचे पहिल्यांदाच कळाले व पुस्तकातील शास्त्रोक्त मांडणीमुळे तार्किकदृष्ट्या पटले. त्यामुळेच पुस्तकानुसार ‘अपानवायू मुद्रा’ करून बघिततल्या व १५ दिवसांत दम लागणे व इतर त्रास कमी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आणखी खोलात शिरलो व नाशिकच्या सुमन चिपळूणकरलिखित ‘मुद्रा आणि आरोग्य सिद्धांत’ आदी ३-४ पुस्तकांसह इंटरनेटवरूनही माहिती मिळवत गेलो. त्याचवेळी वायू मुद्रा, अपान मुद्रा, अपानवायू मुद्रा, प्राण मुद्रा, व्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा आदींचा तासन् तास सराव केला. सुरुवातीला बोटे सहज वळत नव्हती, पण नंतर सहज वळू लागली. कुठल्या मुद्रा किती वेळ कराव्यात, कधी कराव्यात, कधी करू नये, हे तत्व समजून प्रत्यक्ष कृती केल्यामुळे त्रास कमी होत गेला तशा गोळ्या कमी-कमी केल्या आणि मागच्या १० महिन्यांपासून गोळ्या पूर्णपणे बंद आहेत. अर्थात, त्याला घरातून व परिचितांकडून कडाडून विरोध झाला. वरील पुस्तकांच्या एका लेखकाकडूनही ‘बीपी सायलेन्ट किलर आहे, हे माहीत असूनसुद्धा तुम्ही गोळ्या कशा बंद करता’ अशी तोफ माझ्यावर डागण्यात आली होती. मात्र अॅलोपॅथीचे इफेक्टस-साईडइफेक्टस माहीत असल्यामुळे आणि मुद्रा ‘लाईफ सेव्हिंग’ असल्याबद्दल विश्वास बसल्यामुळे गोळ्या बंद करण्याची रिस्क घेतली. ‘या वयात अशी रिस्क का घेऊ नये’ या माझ्या मूलभूत प्रश्नावर मीच उत्तर शोधले. आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त लोकांना मुद्रांबाबत मार्गदर्शन केले, पण कुणालाच गोळ्या बंद करण्याचे सुचवले नाही.

- मुद्रा कशा काम करतात?
- शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि बोटांद्वारे सर्व तत्वांचे नियंत्रण होऊन समतोल साधला जातो आणि आजार कमी होतो. मुद्रांमुळे ब्लॉकेजेस काढता येत नाहीत; पण रक्तप्रवाह निश्चितपणे चांगला होतो. त्यामुळेच माझा त्रास नाहीसा झाला. ३५ वर्षांपूर्वीच्या पॅरालिसिसच्या रुग्णाचा हात-बोटे मोकळी झाली. सर्दीने कमालीच्या त्रस्त असलेल्या महिलेचा त्रास पाचव्या-सहाव्या मिनिटात कमी झाला. वॉलची गंभीर समस्या असलेल्या रुग्णाचा त्रास केवळ अपानमुद्रा व अपानवायू मुद्रा या दोनच मुद्रांनी नाहीसा झाला. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. अर्थात, संयम-चिकाटीने व अचूक पद्धतीने मुद्रा कराव्या लागतात, तरच रिझल्ट मिळतात. अनेक मुद्रा बसून-चालता-फिरता व अगदी झोपूनही करता येतात व त्याचे परिणाम निश्चितपणे होतात. मी स्वतः अनेक मुद्रा टीव्ही बघत करतो. अर्थात, ध्यानात-वज्रासनात मुद्रांचे रिझल्ट जास्त मिळतात. ज्यांना कोणताही त्रास नाही, त्यांनी १०-१० मिनिटे ज्ञान मुद्रा, अपान मुद्रा, पृथ्वी मुद्रा, प्राण मुद्रा, ध्यान मुद्रा, शून्य वायू मुद्रा केल्यास ते आयुष्यभर निरोगी राहू शकतात.

तो अटॅक नव्हताच
काही दिवसांपूर्वी रात्री साडेअकरा वाजता डाव्या हाताच्या खांद्याजवळ तीव्र वेदना सुरू झाल्या. हार्ट अटॅक असावा असे वाटले, पण घाम नव्हता. त्या परिस्थितीत वायू मुद्रा केली व रात्री झोपताना तब्बल १० महिन्यांनी सॉर्बिट्रेट घेतली. दुसऱ्या दिवशी कार्डिओलॉजिस्टकडे तपासले असता, तो हार्ट अटॅक नव्हता, मसल पेन असल्याचे स्पष्ट झाले, जे वायू मुद्रेने थांबले होते, असाही किस्सा त्यांनी सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूलमध्ये दोन तास वाहतुकीचा खोळंबा

$
0
0

औरंगाबाद ः हर्सूल टी पॉइंट ते सावंगी फाटा यादरम्यान रविवारी सायंकाळी वाहनधारकांना दोन तास ट्रॅफिक जॅमचा त्रास सहन करावा लागला. एका लग्नासाठी आलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे हा प्रकार घडला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाला पोलिसांसमोर लग्नासाठी आलेल्या तरुणांनी धक्काबुक्की केली.
हर्सूल गावाजवळ रस्त्याच्या बाजूला एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या वेळी या ‌रोडवर वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली. हर्सूल टी पॉइंटपासून ते सावंगी फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तास ही कोंडी होती. अजय अंबुलगेकर हा तरुण मित्रांसह वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी लग्नासाठी आलेले तरूण दडपशाही करीत त्यांच्या वाहनांसाठी वाट मोकळी करण्याचा प्रयत्न करीत होते. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढत होती. अजय व त्याच्या मित्रांनी या तरुणांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजयला या तरुणांनी पोलिसांसमोर धक्काबुक्की केली. वाद सोडवणाऱ्या पोलिसांशी बोलताना देखील या तरुणांनी अरेरावीची भाषा वापरली. सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या दोन तासाच्या कोंडीनंतर या ठिकाणी वाहतूक सुरळीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते तपासणी ‘सीओईपी’कडे

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
Tweet : @unmeshdMT
औरंगाबाद ः महापालिकेचा निधीतून आणि डिफर्ड पेमेंटमधून करण्यात आलेल्या १५ रस्त्यांच्या कामाच्या तपासणीचे काम पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडे (सीओईपी) सोपविण्यात आले आहे. महापालिकेने या रस्त्यांची यादी कॉलेजला पाठवली आहे. त्यापैकी ज्योतीनगरमधील रस्त्याचा अहवाल महापालिकेला नुकताच प्राप्त झाला असून, या रस्त्यात दुय्यम दर्जाचे वापरण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.
गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात महापालिकेतर्फे डिफर्ड पेमेंटवर आणि महापालिकेचा निधी वापरून मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे करण्यात आली. प्रामुख्याने रस्ता रुंदीकरणाचे काम झाल्यावर रस्त्यांच्या डांबरीकरणाची व काँक्रिटीकरणाची कामे करण्यात आली. १४ रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग, दहा रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. या रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल अधिक चर्चा झाली नाही. कंत्राटदारावर विसंबून राहून पालिकेच्या यंत्रणेने रस्त्यांची कामे करून घेतली. काँक्रिटिकरणाच्या कामात वापरलेले सिमेंट, रस्त्याची करण्यात आलेली क्युरिंग आदींबद्दल पालिकेची यंत्रणा कंत्राटदार व पीएमसीवर विसंबून राहिली. त्यामुळे काही रस्ते मुदतीपूवीच खराब होत असल्याचे लक्षात आले. त्याची दखल घेवून आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी काही रस्त्यांची कामे ‘सीओईपी’कडून तपासून घेण्याचा निर्णय घेतला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; सीओईपीकडे सुमारे १५ रस्त्यांची यादी महापालिकेने पाठवली आहे. त्यात डांबरी रस्त्याबरोबरच काँक्रिटच्या रस्त्यांचाही समावेश आहे. यादीमधील सर्व रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासून द्यावा, अशी विनंती ‘सीओईपी’ला करण्यात आली आहे. यादीमधील एका रस्त्याच्या तपासणीचा अहवाल नुकताच पालिकेला प्राप्त झाला आहे.
स्टेट बँक कॉलनी ते ज्योतीनगर (दशमेशनगरला जोडणारा रस्ता) या रस्त्याचे काँक्रिटीकरण २०१४-१५ या आर्थिक वर्षात करण्यात आले. काँक्रिटच्या रस्त्याचे आयुष्य सुमारे दहा वर्षांचे असते. दहा वर्षांपर्यंत काँक्रिटचा रस्ता खराब होत नाही किंवा त्याच्या दखभाल-दुरुस्तीची गरज पडत नाही, असे मानले जाते, परंतु हा रस्ता अवघ्या एका वर्षात खराब झाला. रस्त्यावर जागोजागी भेगा पडल्या. त्या बुजवण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केल्याचे आताही लक्षात येते. सीओईपीच्या टीमने या रस्त्याचे सँपल घेतले. प्रयोगशाळेत त्यांची तपासणी करून महापालिकेला अहवाल पाठवला. रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या काँक्रिटचा दर्जा ‘एम ४०’चा नाही, असे लक्षात आले आहे. त्याशिवाय रस्त्याचे क्युरिंग देखील योग्य प्रकारे करण्यात आले नाही. त्यामुळे अल्पावधीत रस्त्याला भेगा पडल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या रस्त्याचे काम डिफर्ड पेमेंटवर करण्यात आले. सीओईपीचा हा अहवाल आवश्यक त्या कारवाईसाठी आयुक्तांनी विशेष शाखेकडे पाठवला आहे.

‘एम ४०’म्हणजे काय?
एम ४० म्हणजे काँक्रिटची स्ट्रेंथ समजली जाते. ही स्ट्रेंथ चाळीस दिवसानंतर ‘न्यूटन पर एमएम स्वेअर’ असावी लागते. ही स्ट्रेंथ तपासण्यासाठी रस्त्याच्या कामाच्या २८ दिवसानंतर क्युब टेस्ट केली जाते. काँक्रिटचा दर्जा आणि प्रमाण योग्य असेल, तर ही टेस्ट बरोबर येते. योग्य दर्जाच्या काँक्रिट बरोबरच क्युरिंग देखील काळजीपूर्वक झालेले असले पाहिजे.

रस्त्याबाबत सीओईपीचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो अहवाल विशेष शाखेकडे पाठविला आहे. आवश्यक त्या टिप्पणीसह विशेष शाखा तो अहवाल पुन्हा सादर करेल.
- ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, महापालिका, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी परीक्षेबाबत आज ‘मटा’तर्फे मार्गदर्शन सत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीची परीक्षा! वर्षभर तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता या परीक्षेचे वेध लागले आहेत. अनेकांना परीक्षेचे टेन्शन आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’सुद्धा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. दहावीचे पेपर नेमके कसे सोडवावेत, प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यावे, उत्तरांची रचना कशी, असावी याविषयी सोमवारी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना यात मार्गदर्शन करणार आहेत.
सिडको एन-२, एन-३, पुंडलिकनगर भागातील विद्यार्थ्यांसाठी एमआयटी हायस्कूलच्या सभागृहात सोमवारी (६ फेब्रुवारी) रोजी दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दहावीची परीक्षा जसजशी जवळ येत आहे, तसतसे अनेकांना टेन्शन आले आहे. हे परीक्षेचे टेन्शन दूर व्हावे या हेतूने ‘मटा’ने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमात तज्ज्ञ शिक्षक गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांचे पेपर कसे सोडवावेत, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रश्नोत्तरांचे सत्रही होणार आहे. विद्यार्थ्यांनी सोबत वही व पेन आणावा. आपल्या शंकाचे निरसन करून घ्यावे.

कार्यक्रमाचे स्थळ : एमआयटी हायस्कूल सभागृह, एन-३, सिडको
वेळ ः दुपारी १२ वाजता

तज्ज्ञ मार्गदर्शक
संजय बाजी पाटील ः गणित
विनायक पवार ः विज्ञान
योगेश जाधव ः इंग्रजी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरीसाठी लाखाचा बेरोजगाराला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंडिगो एअरलाइन्समध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत अनोळखी मोबाइलधारकाने एका तरुणाला एक लाख दहा हजाराचा गंडा घातला. ही रक्कम वेगवेगळया टप्प्यात पेटीएम व बँकेत जमा करण्यास भाग पाडले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहमंद नवाजुद्दीन मोहमंद नईमुद्दीन (वय २५ रा. टाऊन हॉल, मनपा कार्यालयाशेजारी) या तरुणाने नोकरीसाठी शाईन डॉट कॉम या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर नवाजुद्दीन याला इंडिगो एअरलाइन्समध्ये नोकरीची संधी असल्याचा ई-मेल आला. त्यानंतर त्याने नोकरीसाठी अर्ज पाठवला. अर्ज पाठवल्यानंतर १६ जानेवारी रोजी जॉब एक्स्प्रेस या वेबसाइटवरून नवाजुद्दीन यांना फोन आला. समोरील व्यक्तीने कंपनीच्या वेबसाइटवर अर्ज पाठवावा लागेल, असे सांगत नोंदणीसाठी १६५० रुपयांची मागणी केली. नवाजुद्दीनने पेटीएमद्वारे समोरील व्यक्तीने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर पैसे पाठवले. यानंतर नवाजुद्दीनची ऑनलाइन चाचणी घेण्यात आली. १७ जानेवारी रोजी पुन्हा नवाजुद्दीनला फोन आला. यावेळी त्याला अर्ज पडताळणीसाठी ५७०० रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कम देखील नवाजुद्दीनने पेटीएमद्वारे दिली. यानंतर त्याची मोबाइलवर मुलाखात घेण्यात आली. त्याची निवड करण्यात आल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. १८ जानेवारी रोजी नवाजुद्दीनला फोन करून ऑफर लेटरसाठी १४ हजार ५०० रुपये, १९ जानेवारी रोजी फोन करून २१ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी २५ हजार ९०० रुपये मागण्यात आले. नवाजुद्दीनने दोन्ही रक्कमा पेटीएमद्वारे आरोपीला पाठवली. यानंतर नवाजुद्दीनला ई-मेलद्वारे ऑफर लेटर पाठवण्यात आले. एअरपोर्ट अॅथारिटी ऑफ इंडियाच्या नावाने हे ऑफर लेटर होते. ऑफर लेटरची मूळ प्रत मागितल्यानंतर विमा उतरवणे व इतर कारण दाखवून नवाजुद्दीनकडून ७८ हजार रुपये उकळण्यात आले. तसेच त्याला २३ जानेवारी रोजी औरंगाबाद एअरपोर्टवर रुजू होण्यास सांगण्यात आले. २३ जानेवारी रोजी नवाजुद्दीनने या मोबाइलधारकाला कॉल केला असता ऑफर लेटर पोस्टाने पाठवण्यात अडचण आली असून नोकरीसाठी रुजू होण्याची तारीख पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराबद्दल संशय आल्याने नवाजुद्दीनने मित्राला ही बाब सांगितली. यावेळी त्याच्या मित्राने शहानिशा केली असता हा प्रकार बनावट असल्याचे निष्पन्न झाले. नवाजुद्दीनने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत तक्रार अर्ज दिला. या तक्रारअर्जावरून शनिवारी सिटीचौक पोलिस ठाण्यात मोबाइल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन पवार तपास करीत आहेत.

फ्लॅटचे आमिष
नवाजुद्दीनने ऑफर लेटरसाठी फोन केल्यानंतर या मोबाइलधारकाने त्याला विमानतळापासून पाच किलोमीटर अंतरावर कंपनी टु बीएचके फ्लॅट देणार असल्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याच्याकडे ४३ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या गोष्टीचा संशय आल्याने नवाजुद्दीनने ही रक्कम देण्यासाठी वेळ मागून घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस नेत्यांची सोनेरी मेजवानी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करत असतानाच, काँग्रेसच्या नेत्यांची सोनेरी मुलामा दिलेल्या ताटातील मेजवानीच जास्त चर्चेत आली. विशेष म्हणजे, या सभेसाठी दिवसभर कार्यकर्ते ताटकळत असताना, नेत्यांचा बादशाही पाहुणचार सुरू होता.

उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर (ता. उमरगा) येथे काँग्रेसच्या राज्यस्तरीय प्रचाराची सुरुवात झाली. यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवराज पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या नेत्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर, दुपारी तीन वाजता ते येणेगूरला पोहोचले. आमदार बसवराज पाटील यांनी या नेत्यांसाठी आलिशान मेजवानीचे आयोजन केले होते. या नेत्यांसाठी बसवराज पाटील यांच्या स्नेह्याचा बंगला होता आणि तोही सुशोभित करण्यात आला होता. या मेजवानीसाठी सोनेरी मुलामा असणाऱ्या ताट-वाट्या होत्या. तसेच, आलिशान टेबलासह या मेजवानीचा मेनूही शाहीच होता. या मेजवानीसाठी स्वयंपाकीही नांदेडहून मागविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते दुपारपासून ताटकळत असताना, ही मेजवानी बराच वेळ सुरू होती. त्यातच, या नेत्यांना हेलिकॉप्टरने जायचे होते आणि सायंकाळनंतर उड्डाणाला अडचण येण्याची शक्यता होती. त्यामुळे, या नेत्यांनी सभेतील भाषणेही आटोपती घेतली. विशेष म्हणजे, सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात पोलिसांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांश सिग्नल विजेअभावी बंद

$
0
0

औरंगाबाद ः थकित बिलामुळे महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याचा फटका वाहतूक सिग्नल्सलाही बसला आहे. रविवारी शहरात केवळ पाच सिग्नल्स सुरू होते. त्यामुळे चौकाचौकांत गर्दी आणि गोंधळाचे वातावरण होते. त्याचबरोबर सलग तिसऱ्या रात्री पथदिवे बंद होते.
महावितरणने बिल वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. बिल थकित असल्यामुळे महावितरणने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पथदिवे तीन दिवसांपासून बंद आहेत. रविवारी शहरातील बहुतांश सिग्नल बंद होते. क्रांतिचौक, डेअरी चौक, शाहनूरमिया दर्गा चौक, रोपळेकर हॉस्पिटल चौक हे सिग्नल सुरू होते.
सिग्नल बंद असल्यामुळे जालना रोड, बीड बायपाय रोड या वर्दळीच्या मार्गांवर पोलिसांनी वाहतूक नियंत्रित केली. अन्य चौकांमध्ये मात्र सिग्नल बंद असल्याने वाहनांची गर्दी होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी विवाह तिथी असल्याने दुपारी रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. विवाहासाठी बाहेर गावांहून आलेली अनेक वाहने वाहतूक कोंडीत सापडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कॅम्पेन ः स्टेडियम नसल्याचा खेळाडूंना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आणि क्रिकेट अकादमी नसल्याचा मोठा फटका औरंगाबादेतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना बसत आहे. या सुविधा नसल्यानेच अ‘नेक खेळाडूंना पुण्याला जावे लागत आहे. स्टेडियम उभारले, तर क्रिकेट विश्वात औरंगाबादकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. त्याचा फायदा युवा खेळाडूंना निश्चित होईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ क्रिकेटपटू प्रभुलाल पटेल आणि उद्योजक अभय जरीपटके यांनी व्यक्त केली.
‘एडीसीए मैदानावर दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना, रणजी लढती झालेल्या आहेत. या मैदानावर पूर्वीच स्टेडियम उभारणे सहज शक्य होते. आता आंतरराष्ट्रीय सामन्यांच्यादृष्टीने स्टेडियमच्या संकल्पना बदलल्या आहेत. त्यामुळे नवीन जागा घेऊनच स्टेडियम उभारावे लागणार आहे. त्यासाठी बीसीसीआय, एमसीआय संघटना एडीसीएलला निश्चित मदत करू शकतील; तसेच कॉर्पोरेट क्षेत्राचाही याला मदतीचा हात मिळू शकेल,’ असे पटेल यांनी स्पष्ट केले.
‘कामगिरी हेच आता खेळाडूंचे मुख्य भांडवल झालेले आहे. औरंगाबादेत अखेरचा रणजी सामना होऊनही अनेक वर्षे लोटली आहेत. सद्यस्थितीत युवा खेळाडू हे बेसिकच शिकत आहेत. अधिक अनुभवासाठी त्यांना पुण्याला जावे लागते. अनेक खेळाडू हे केडन्स व वेंगसरकर अकादमीतही आहेत. साखळी क्रिकेट सामने खेळण्याकरिताही अनेकजण नियमित जातात. या सर्व गोष्टी औरंगाबादेत करणे सहज शक्य आहे. त्यासाठी क्रिकेट स्टेडियम उभारणे याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. या विविध खेळांच्या इनडोअर सुविधा, जलतरण तलाव अशा सुविधा होतील. यातून मेंटेनन्स खर्च सहज निघू शकतो,’ असेही त्यांनी सांगितले.
आपला मुलगा राज्य; तसेच देशाकडून खेळावा याच स्वप्नाने पालकांना पछाडलेले असते. पूर्वी पालक खेळासाठी फार खर्च करायला तयार होत नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. युवा क्रिकेटपटूंचे भवितव्य हे क्रिकेट संघटनेच्याच हाती आहे. त्यादृष्टीने दीर्घकालीन योजना आखण्याची गरज आहे, असे मत मेडिकल इंजिनीअरिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभय जरीपटके यांनी सांगितले.
औरंगाबादकर एकाचवेळी ११४ मर्सिडीज घेऊ शकतात. त्याचप्रमाणे स्टेडियमही उभारणे शक्य आहे. डीएमआयसीमुळे औरंगाबादचे कॉर्पोरेट क्षेत्रही विस्तारणार आहे. कॉर्पोरेटच्या मदतीनेच स्टेडियम उभारण्याचे शिवधनुष्य पेलले जाऊ शकते. स्मार्ट सिटी होणाऱ्या औरंगाबादेत आता स्टेडियम उभारले गेलेच पाहिजे. ही सुविधा नसल्याने अनेकांना अन्य शहरात जाऊनच सामने पाहावे लागतात. किती वर्षे औरंगाबादकरांनी टीव्हीवरच सामने पहायचे. प्रत्यक्ष सामना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो, असे जरीपटके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ‌ठरणार शिक्षक आमदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. सुमारे १७ ते १८ तासांच्या मतमोजणीनंतर शिक्षक आमदार ठरणार आहे.
चिकलठाणा येथील मराठवाडा रियलटोअर्स प्रा. लि. येथे सकाळी आठपासून मतमोजणीला प्रारंभ होईल. ५६ टेबलांवर मतमोजणी करण्यात येणार असून, विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पहिल्या पसंतीच्या मोजणीत पूर्ण झाला, तर निकाल सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या पसंतीत विजयी कोटा पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या पसंतीक्रमांच्या मतांची मोजणी सुरू करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रीयेनंतर निकाल जाहीर करण्यासाठी १७ ते १८ तास लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ५० हजार ९६८ मतदारांनी (८७.२६ टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतमोजणी केंद्रासमोरील कलाग्राम येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी दुपारी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपायुक्त, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, अव्वल कारकून यांचे प्रशिक्षण पार पडले, यावेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मतमोजणी प्रक्रीयेची संपूर्ण माहिती देण्यात आली. आयोगाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपने पालन करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी ‌यावेळी दिल्या. निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यावेळी उपस्थित होते.

मतमोजणी सुरुवात ः सकाळी ८ वाजता
मतमोजणी टेबल ः ५६
प्रत्येक टेबलवर ः १ पर्यवेक्षक व ३ सहाय्यक
सहायक निवडणूक अधिकारी ः १४ टेबलांसाठी एक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images