Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेंची सरशी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. परळी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहे. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीडमध्ये पराभव: पंकजा मुंडे राजीनामा देणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काही महिन्यांआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पंकजांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कामे करूनदेखील जनतेने असा कौल का दिला, याचे विश्लेषण करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबासाहेबांच्या विचारांची देशाला गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवत देशातील सर्व भाषा, संस्कृती यांना समान बहुमान दिला आहे. डॉ. बाबासाहेबांनी देशात विषमता राहू नये, अशा प्रकारची राज्यघटना तयार केली. त्यांच्या या विचारांचे अनुकरण केल्यास, देशातील सर्व समस्यांवर मात करणे शक्य आहे,’ असे प्रतिपादन सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी आज केले.
नागसेन वनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मिलिंद परिसरातील लुम्बिनी उद्यान येथे आयोजित दुसऱ्या नागसेन फेस्टिवल कार्यक्रमात ते मंगळवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, के. व्ही. मोरे, रेखा खोब्रागडे, राहुल पोहूरकर, प्राचार्य बी. एस. गंगावणे यांची उपस्थिती होती.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे हे विचार प्रत्येकाने आत्मसात करायला हवे. बाबासाहेबांचे सामाजिक, आर्थिक विचार देशाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. या विचारांमुळे भारत जगातला प्रमुख देश बनला. तो सर्वोत्तम करणे आपले काम असून डॉ. आंबेडकरांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,’ असे मत खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
प्रारंभी प्रकाश सिरसाठ, मिलिंदचे सेवानिवृत्त लेखापाल आर. पी. गलाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य निमंत्रक सचिन निकम, प्रा. विजय घोरपडे, दिनकर ओंकार यांची उपस्थिती होती. रवींद्र आंबेकर यांनी ‘सामाजिक अभिसरणात समाजमाध्यमांची भूमिका’ विषयावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील मोर्चाचे राजकारण अंकित करणारी ‘खडकेवाडी कांड’ ही एकांकिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.

नागसेन फेस्टिवलमध्ये आज
नागसेन फेस्टिवलमध्ये २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता जेष्ठ नाटककार व लेखक प्रेमानंद गज्वी यांचे ‘बौद्ध कला संस्कृतीचा इतिहास वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बोधीनाट्य संस्थेचे अशोक हंडोरे असतील. माजी मंत्री गंगाधर गाडे यांचा आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल विशेष सत्कार यावेळी करण्यात येईल. सायंकाळी ८ वाजता ‘एल्गार समतेचा’ राज्यस्तरीय अभिनव कवी संमेलन होईल. सुनील उबाळे, प्रा. देवानंद पवार, रामदास वाव्हळे, धम्मपाल जाधव, अविनाश भारती, राकेश शिर्के, प्रशांत वंजारे, डॉ. अरूण रसाळ, संजयानंद, नारायण पुरी हे कवी यात सहभागी होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी ‘सीएचटूएम’ पीएमसी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने सीएचटूएम या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नियुक्ती केली आहे. ही कंपनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात काम सुरू करेल.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी औरंगाबादची निवड झाल्यावर पालिकेने या प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीव्ही) स्थापन केली. राज्य शासनाच्या उद्योग खात्याचे प्रधानसचिव अपूर्व चंद्रा एसपीव्हीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत, तर पालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पहात आहेत. एसपीव्हीच्या स्थापनेनंतर शासनाच्या निर्देशानुसार पीएमसीची नियुक्ती करणे गरजेचे होते. त्यासाठी पालिकेने आंतरराष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागवले. त्यानुसार सीएचटूएम, पीडब्ल्यूसी व मॅकेन्झी या संस्थांनी पालिकेशी संपर्क साधून ‘पीएमसी’ म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या संस्थांच्या कामांचे सादरीकरण प्रथम पालिकेच्या स्तरावर बकोरिया यांच्या समोर झाले. त्यानंतर २ मार्च रोजी मुंबईत अपूर्व चंद्रा यांच्या उपस्थितीत तिन्हीही संस्थांचे सादरीकरण झाले. त्यानंतर चंद्रा यांनी काही सूचना केल्या व पालिका स्तरावर निर्णय घेऊन पीएमसीची नियुक्ती करण्यास सांगितले. त्यानुसार संस्थांच्या कामाचा अनुभव व अन्य तांत्रिक बाबी लक्षात घेऊन पालिकेने ‘सीएचटूएम’ कंपनीची निवड केली. सोमवारी हा निर्णय घेतला. बकोरिया यांनीच पत्रकारांना ही माहिती दिली. याबाबत ‘एसपीव्ही’ला माहिती दिली जाणार आहे. विधानसभेचे अधिवेशन संपल्यावर ‘एसपीव्ही’ची बैठक होणार आहे.

काय आहे सीएचटूएम कंपनी ?
सीएचटूएम ही कंपनी आंतरराष्ट्रीयस्तरावर शहर विकास आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. युनायटेड स्टेटस् , वॉशिंगटन डीसी, लंडन, टोरँटो (कॅनडा), दुबई, आबुधाबी, पोलंड आदी देशात या कंपनीचे विविध प्रकल्पावर काम सुरू आहे. सिंगापुरच्या पाणीपुरवठा योजनेचे काम देखील याच कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. दिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडोरच्या (डीएमआयसी) पीएमसीचे काम देखील याच कंपनीला मिळाले आहे. डीएमआयसीच्या शेंद्रा या औद्योगिक वसाहतीचे काम औरंगाबादअंतर्गत होणार आहे, हे काम देखील सीएचटूएमच्या माध्यमातून केले जाणार आहे. आता स्मार्टसिटी साठी या कंपनीची पीएमसी म्हणून निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर औरंगाबादमध्ये पासपोर्ट केंद्र सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विदेशवारीची इच्छा बाळगून असणाऱ्या शहरवासीयांसाठी एक खूषखबर. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी शहरात निजाबाद पोस्ट ऑफिसमध्ये खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पासपोर्ट केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
खैरे म्हणाले, ‘औरंगाबादचे पासपोर्ट केंद्र काही कारणास्तव बंद पडले. शहरातील २००० कुटुंबांमधील एक सदस्य अमेरिकेत वास्तव्यास आहे. हज यात्रा, पर्यटनासाठीही परदेश दौरे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पासपोर्ट सेवा केंद्र असावे, अशी मागणी मी सातत्याने करत होतो. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी प्राधान्याने हा प्रश्न मार्गी लावला. निरुपमा राव, ज्ञानेश्वर मुळे, स्वाती कुलकर्णी यांच्या सहकार्याने औरंगाबादेत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत आहे. पासपोर्टसाठी पोलिस तपासणी आवश्यक असते. ती लवकर व्हावी, यासाठी सर्व पोलिस ठाण्यांसाठी माझ्या खासदार निधीतून अॅँड्रॉइड टॅब्लेट दिले जातील,’ अशी घोषणा त्यांनी केली.
खासदार दानवे म्हणाले, ‘औरंगाबादच्या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते. केंद्रात एका मंत्र्यांच्या गटात २० खासदारांचा समावेश आहे. मी सुषमा स्वराज यांच्या गटात आहे. त्यामुळे औरंगाबाद केंद्रासाठी मी वारंवार विनंती केली. देशभरात ५८ ठिकाणी अशी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. पासपोर्ट सेवा केंद्राची सुविधा जालना व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे.’
खासदार खैरे यांना टोला लगावित दानवे म्हणाले, ‘औरंगाबादहून परदेशी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी खैरेसाहेब तुम्ही पुढाकार घ्या. कारण या शहराने तुम्हाला भरपूर दिले आहे. तुम्हाला मोठे केले आहे. पुढेही अजून मोठे करतील. पुढच्या दोन महिन्यात परदेशी विमानसेवेसाठी पुढाकार घ्या त्यानंतर जर सेवा सुरू झाली तर त्याचे श्रेय घेऊ नका.’
हरिभाऊ बागडे म्हणाले, ‘पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालावधीत गेल्या तीन वर्षांत अनेक नवनवीन व लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.’ प्रणवकुमार यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, माजी महापौर किशनचंद तनवाणी, रशीद मामू, नंदकुमार घोडेले, रेणुकादास वैद्य, जयवंत ओक, माजी उपमहापौर प्रमोद राठोड आदींसह उद्योजक, नागरिक उपस्थित होते.

दररोज ५० मुलाखती
विभागीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी म्हणाल्या, ‘परराष्ट्र व्यवहार खाते आणि पोस्ट खात्याच्या सहकार्याने हे केंद्र सुरू होत आहे. लोकांना सेवा सुलभतेने मिळेल. मुंबईला जाण्याची गरज नाही, पण ज्यांना तत्काळ, वैद्यकीय कारणास्तव व लवकर पासपोर्ट हवा असेल त्यांना मुंबईलाच जावे लागेल. औरंगाबादमधील केंद्रातून पहिल्या टप्प्यात दररोज ५० जणांना अपॉइंटमेंट दिल्या जातील. गरजेनुसार ही सुविधा वाढविली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडला होणार पासपोर्ट सेवा केंद्र

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘औरंगाबादेत पोस्ट खात्याच्या सहकार्याने मंगळवारपासून पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले. असे केंद्र लवकरच बीड आणि जळगावमध्ये सुरू होईल. औरंगाबादकरांनी पासपोर्ट काढण्यासाठी सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, पासपोर्ट खात्याची वेबसाइट दोन वेळा वाचून जर अर्ज भरला तर पुढच्या त्रुटी टाळता येईल,’ अशी माहिती विभागीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘औरंगाबादेतील केंद्रात पोस्टऑफिसचे सहकारी मदत करणार आहेत. त्यांना पुढील दहा दिवसात ट्रेनिंग देऊन अर्ज स्वीकारणे, मुलाखती, फोटो, बोटांचे ठसे या प्रक्रियांबाबत मार्गदर्शन केले जाईल. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद केंद्र कँप मोडमध्ये असेल. पहिल्या टप्प्यात दररोज ५० जणांना मुलाखतीसाठी अपॉइंटमेंट दिली जाईल. पुढे गरज भासल्यास ती १०० व त्या पटीत वाढवून दिली जाईल. नागरिकांच्या सोयीसाठी ही सुविधा आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी एकदम गर्दी न करता प्राधान्यक्रम ठरवून ऑनलाइन नोंदणी करावी. सर्व कागदपत्रे योग्य त्या पद्धतीने सोबत आणली तर त्रुटी राहणार नाहीत. मुंबईला जाण्याचा त्रास यामुळे वाचणार आहे, पण ज्यांना अतितत्काळ किंवा वैद्यकीय कारणांसाठी पासपोर्ट घ्यावयाचे आहे अशांना मुंबईत जावे लागेल. वाढती गरज लक्षात घेऊन आम्ही भविष्यात बीड, जळगाव, सिल्व्हासा येथे पासपोर्ट सेंवा केंद्रे सुरू करत आहोत. तिसऱ्या टप्प्यात मुंबईत तीन ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे प्लॅनिंग आहे,’ असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट केंद्रात सहा जिल्हे वंचित

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले तरी मराठवाड्यातील जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना नागपूर पासपोर्ट कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. बीडला लवकरच सेवा केंद्र सुरू होणार आहे. दरम्यान या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी बुधवारी होणार आहे.
इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेडचे जालना जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी जनहित याचिका केलेली आहे. पासपोर्ट कार्यालय स्थापन होईपर्यंत सहा जिल्हे नागपूरऐवजी मुंबईला जोडावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांतील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी नागपूर पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. बीड व औरंगाबाद येथील नागरिकांना मुंबई कार्यालय गाठावे लागते. नागपूरला जाण्यासाठी थेट रेल्वे नाही. एका व्यक्तीला सात हजार रुपये खर्च येतो. शिक्षण, हज यात्रा, विदेशी पर्यटनस्थळ पाहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने पासपोर्टची आवश्यता असते. पासपोर्ट अर्जात त्रुटी असेल तर पुन्हा नागपूरला जाण्याचा खर्च वाढतो. बीडमधून पाच वर्षांत १४ हजार८८२ लोकांनी पासपोर्ट काढला, तर आकडेवारीनुसार पाच वर्षांत पासपोर्टसाठी २४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. गेल्या शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी पासपोर्ट सेवा केंद्र औरंगाबादमध्ये सुरू झाल्याने याचिका निकाली काढण्याची विनंती केंद्र शासनातर्फे संजीव देशपांडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...प्रभू रामचंद्र की जय!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘प्रभू रामचंद्र की जय,’च्या घोषणा, घोडे आणि उंटावर काढलेल्या सजीव देखाव्याने शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फडले. हिंदू नववर्ष समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शहरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. संस्थान गणपती येथून निघालेल्या या मिरवणुकीचा खडकेश्वर येथे समारोप करण्यात आला.
सायंकाळी पाच वाजता संस्थान गणपतीची महाआरती केल्यानंतर मिरवणूक सुरू झाली. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर बापू घडमाडे, आमदार अतुल सावे, उपमहापौर स्मिता घोगरे, प्रदीप जैस्वाल, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, नंदू घोडेले, महिला आघाडीच्या रंजना कुलकर्णी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मिरवणुकीत हिंदू नववर्ष समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबतच नरेंद्र स्वामी महाराज परिवार, सुधांधू महाराज भक्तगण परिवार, सावरकर मित्र मंडळ, हिंदू जनजागरण समिती, सनातन संस्था तसेच इतर हिंदूत्ववादी संघटना सहभागी झाल्या. संस्थान गणपती, शहागंज, सराफा, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे खडकेश्वर येथील मंदिराच्या प्रांगणात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
सनई चौघडा ते ढोल ताशे : सनई चौघड्याच्या सुरांसोबत चाळीसगावचे प्रसिद्ध बँड पथक, प्रिंप्री राजा येथील बँड पथक तसेच शिवाजीनगर येथील विघ्नहर्ता क्रीडा मंडळाचे ढोल पथक मिरवणुकीत सहभागी झाले. बँड पथकाने आकर्षक चालीवर धार्मिक व देशभक्तीपर गीते सादर करत चांगलीच रंगत आणली.

आकर्षक देखावे
मिरवणुकीत धार्मिक सजीव देखावे सादर करण्यात आले. यामध्ये महिला आघाडीचा सीता स्वयंवर देखावा, बाल शिवाजी, शिवाजी महाराज, खंडेराय, रथामधील नरेंद्र महाराजांचा देखावा, शिवरायांचे घोडे व उंटावर असलेले मावळे आदी देखाव्यांचा समावेश होता. पारंप‌रिक वेषभूषेत सहभागी झालेले हे देखावे बघण्यासाठी गर्दी झाली होती.

बालवारकऱ्यांनी धरला ताल
मिरवणुकीच्या सुरुवातीला सिल्लोड येथील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांनी ताल धरला. टाळ मृदंगांच्या सुरेल तालात या प‌थकाने पावली सादर केली. तसेच कलशधारी महिला व महिला भजनी मंडळाने आकर्षक चालीत भजने सादर करत पावली खेळली.

गारखेड्यात मिरवणूक
गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्षाच्या स्वागतासाठी गारखेडा भागातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात अबालवृध्द या मिरवणुकीत सहभागी झाले. गारखेडा येथील मारुती मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता झाली.
नववर्षाच्या स्वागतासाठी जुन्या शहरातून जशी मिरवणूक निघते, तशीच मिरवणूक गारखेडा भागातून काढली जाते. यंदा काल्डा कॉर्नरपासून एक मिरवणूक सुरू झाली. दुसरी मिरवणूक जयभवानीनगरमधून सुरू झाली. या दोन्हीही मिरवणूकीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
महापौर भगवान घडमोडे, आमदार अतुल सावे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख रेणुकादास वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूकीला सुरुवात झाली. यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे विलासराव देशमुख यांच्यासह अन्य
सेवेकरी सहभागी झाले. भाजपचे डॉ. भागवत कराड, बसवराज मंगरुळे, माजी सभापती दिलीप थोरात, महापालिकेचे सभागृहनेते गजानन मनगटे यांच्यासह गारखेडा भागातील बहुतांश नगरसेवक सहभागी झाले होते.
मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. घोड्यांवर बसलेले मावळे मिरवणुकीचे आकर्षण होते. ढोल - ताशाचा समावेश, मिरवणुकीत होताच, पण त्याचबरोबर मुलींचे ढोल पथक देखील मिरवणुकीत सहभागी झाले. पालखी खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करणारे वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पारंपारिक वेशात नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरुजींकडून अनोखी भेट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शारीरिक अपंगत्वामुळे विक्रमसिंग तातूला सहजपणे चालणे फिरणे, प्रवास करणे अवघड. घरची जेमतेम परिस्थिती असल्याने तीन चाकी सायकलवर ७-८ किलोमीटरचे अंतर कापत तो अभियांत्रिकीचे जिद्दीने शिक्षण घेत आहे. आपल्या विद्यार्थ्याची जिद्द आणि त्याची परिस्थिती लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी एकत्र येत अपंगासाठी असलेली मोटारसायकल त्याला गुढी पाडव्याला भेट दिली.
देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन्ही पायांनी दिव्यांग असलेला विक्रमसिंग तातू हा विद्यार्थी संगणकशास्त्राच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. दिव्यांगासाठी असलेल्या तीन चाकी सायकलवरून रोज ८ किलोमीटरचा प्रवास करून तो महाविद्यालयात येत असे. वडील शेतकरी, घरची परिस्थिती बेताची. दिव्यांग असूनही शिक्षणाप्रती असलेली त्याची जिद्द व धडपड कौतुकास पात्र ठरते. त्याची जिद्द लक्षात घेत, कॉलेजच्या प्राध्यापकांनी एकत्र येत त्याला दुचाकी भेट देण्याचा निर्णय घेतला. प्राध्यापकांनी एकत्र येत ८० हजार रुपयांचा निधी जमा केला. त्यानंतर दिव्यांगासाठी असलेली दुचाकी तयार करून घेण्यात आली. मंगळवारी गुढीपाडव्याचे औचित्य साधून विक्रमसिंगला ही अनोखी भेट दिली. प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्याच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम करत आदर्श उभा केला. अचानकपणे अनोखी भेट मिळाल्याने विक्रमसिंगही गहिवरला. त्याच्यासाठी ही अनोखी भेट कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सरचिटणीस सतीश चव्हाण यांच्याहस्ते देण्यात आली.

अशीही भेट..
विविध कार्यक्रमानिमित्त पुष्पगुच्छांवर होणारा खर्च टाळून कॉलेजने विद्यार्थी कल्याण निधीमध्ये हा निधी जमा करते. घरची आर्थिक परिस्थिती खडतर असताना शिक्षण घेत असलेल्या कॉलेजच्या निवडक विद्यार्थ्याना दिला जातो. यंदा ८० हजारांचा निधी जमा झाला. अमोल खिस्ते, नवनाथ कामत, संदीपान ढवळे, मंगेश पालकर, अजय शिरसाठ, शिवम देशपांडे, रचना कुलकर्णी, स्वप्निल पवार आदी विद्यार्थ्यांना हा निधी देण्यात आला.

विक्रमसिंग गुणी विद्यार्थी आहे. त्याला दुचाकी घेऊन देण्याचे शुक्रवारी निश्चित झाले. सगळ्यांनी लगेच होकार देत निधी जमवला. त्यानंतर आज त्याला हे गिफ्ट दिले. - डॉ. उल्हास शिऊरकर, संचालक, देवगिरी इंजिनीअरिंग

मला अतिशय आनंद होत आहे. तीन चाकी सायकल चालवतो, परंतु रस्त्यात चढ आला की प्रचंड त्रास होतो. माझ्या शिक्षकांनी मला दिलेले हे गिफ्ट कायमचे लक्षात राहणारे आहे. - विक्रमसिंग तातू, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात हजार घरे उभारणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७००० घरकुले उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरवात मंगळवारी एकाच दिवशी जिल्ह्यात झाली. नायगाव (ता. औरंगाबाद) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन झाले. याशिवाय जिल्ह्यात १० हजार शौचालये आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एमआरइजीएस) अंतर्गत शोषखड्डे करण्याच्या उपक्रमाचीही सुरुवात झाली.
जिल्ह्यात एकाच वेळी ७००० घरकुलांचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. नायगाव येथे डीआरडीएच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त सीईओ सुरेश बेदमुथा, कार्यकारी अभियंता आर. आर. पवार, गटविकास अधिकारी व्ही. आर. हरकळ, जिल्हा परिषद सदस्य संतोष शेजूळ, पंचायत समिती सदस्य सुभाष भालेराव, सरपंच डॉ. फरहाना पटेल, उपसरपंच गुलशनबी यासीन पठाण, विस्तार अधिकारी एस.पी. साळुंके, उपअभियंता खनके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अर्दड म्हणाले, ‘घरकुल योजनेतून घरे साकारले जातील. जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी आता नागरिकांनी युद्धपातळीवर कामाला लागले पाहिजे. शौचालये बांधण्यासाठी पुढाकार घ्या. ज्या गावातून अनास्था दिसून येईल तेथील सरपंच व सदस्यांना आम्ही जबाबदार धरणार आहोत. गावाच्या विकासात हातभार लावायचा असेल तर शौचालयांचा आग्रह धरा. स्वच्छ भारत योजनेतून शौचालये आणि शोषखड्डे करण्यात येणार आहेत.’

काम जोरात
‘नायगाव भिकापूरची लोकसंख्या ४९०० आहे. गावात ७३ घरकुले पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झाली असून रमाई योजनेंतर्गत ३ घरकुले मंजूर आहेत. निर्मल ग्राम योजनेंतर्गत वर्षभरात ६६९ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे,’ असे बेदमुथा यांनी सांगितले. यावेळी शेखलाल पटेल, शेख अय्युब भिकन, रवी कसारे, डॉ. तय्यब पटेल, नवाब पटेल आदींसह गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...सब शुद्ध कर देंगे!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गंगा शुद्धीकरण होईल तेव्हा होईल. मात्र, उस्मानपुऱ्यातल्या मित्रमंडळ सोसायटीने दहा घरांचे सांडपाणी शुद्ध करण्याचा पण केला आणि तो पूर्णत्वासही नेला. तब्बल १२ लाख रुपये खर्चून सोसायटीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात आला असून, येथे दरररोज दहा हजार लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाणार आहे.
मित्रमंडळ सोसायटी भागात या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन मंगळवारी (२८ मार्च) नगरसेवक रेणुकादास वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष तथा उदयोजक राम भोगले, डॉ. आर. बी. भागवत यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
वैद्य म्हणाले, ‘छोट्या-छोटया सोसायटीमध्ये असे प्रयोग झाल्यास असे प्रकल्प मार्गदर्शक ठरतील.’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सोसायटीचे सदस्य तसेच नागरिकांची उपस्थिती होती. हा प्रकल्प राबविणारे कंत्राटदार कफिल जमाल आणि फारूख भाई यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.

महापौरांचा ‘मान’ हुकला
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन महापौर भगवान घडमोडे यांच्या हस्ते होणार होते. महापौरांची संयोजकांनी वाट पाहिली. मात्र, त्यांना अधिकच उशीर लागत असल्याचे पाहून अखेर संयोजकांनी नगरसेवक रेणुकादास वैद्य यांच्या हस्ते प्रकल्पाचे उदघाटन केले. अखेर उशिरा आलेल्या महापौरांना भोगले यांनी स्वतः या प्रकल्पाची माहिती दिली.

फुलांचे ताटवे फुलणार
भोगले म्हणाले, ‘मित्रमंडळ हौसिंग सोसायटीमधील दहा घरांच्या ड्रेनेज लाइन नेहमीच चोकअप होत. ही समस्या दूर करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. सध्या आठ घरांचे सांडपाणी या प्रकल्पाला जोडले आहे. शुद्ध झालेल्या पाण्यावर मित्रमंडळ सोसायटीच्या जागेत उद्यान तयार केले जाणार आहे.

असा आहे प्रकल्प
मित्रमंडळ सोसायटीमध्ये तयार केलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी अडीच लाखांपर्यंत खर्च आला. दहा बाय वीसची सांडपाणी प्रक्रिया खोली बांधली. त्या खोली खाली दोन हौद उभारले. या हौदात हे सांडपाणी सोडले जाणार आहे. विशेष प्रक्रिया करून हे सांडपाणी अधिक शुद्ध केले जाईल. या पाण्याचा वापर उदयान निर्मितीसाठी केले जाणार आहे. हा प्रकल्प शून्य सांडपाणी प्रकल्प म्हणूनही ओळखला जाण्याची शक्यता आहे.

असे झाले काम
- २ लाख ५० हजार खर्च
- १० हजार लिटर पाणी शुद्ध
- १० बाय २०ची खोली
- २ हौद उभारले
- ८ घरांचे सांडपाणी प्रकल्पात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानदान योजनेतून गरजूंना मदत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षणाची आवड असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना अनेकवेळा शैक्षणिक साहित्य नसल्याने शाळा सोडावी लागते. असा प्रसंग कुणावरही येऊ नये यासाठी आमची संस्कृती प्रतिष्ठाने ‘ज्ञानदान योजना’ उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आपले जुने शैक्षणीक साहित्य इच्छुकांना गरजू विद्यार्थ्यांना देता येणार आहे.
देवानगरी, प्रतापनगर भागातील तरुण तरुणींनी ‌एकत्र येऊन या प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. ‘हो मला ही शिकण्याची इच्छा,’ आहे हे ब्रिदवाक्य घेत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी दानशूर व्यक्ती जुन्या, नवीन वह्या, पुस्तके, दप्तर, वॉटर बॅग, कंपास, ड्रेस, बूट, स्टेशनरी, शालेय साहित्य दान करू शकतात. प्रतिष्ठानच्या सदस्यांकडे या वस्तू जमा केल्यानंतर मनपा व जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना या वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे संदीप कुलकर्णी व संग्राम पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असून ज्या इच्छुकांना ज्ञानदान योजनेत सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वह्या, पुस्तके, पेन द्याव्यात
‘अनेक गरीब विद्यार्थी शैक्षणिक साहित्य घेण्याची ऐपत नसल्याने शिकू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा,’ असे आवाहन प्रतिष्ठानचे संदीप कुलकर्णी आणि संग्राम पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जय विश्वकर्मा संस्थेला व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा गौरव पुरस्कार औरंगाबादच्या जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेस अमरावती येथे प्रदान करण्यात आला.
अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. व्यसनमुक्ती कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे संचालक विलास चंदणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सत्यपाल महाराज, डॉ. निशिगंधा वाड, समाजकल्याण आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी किरण गिते, किरण कुलकर्णी, मुक्ता पुणतांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेतर्फे व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम सात्यत्याने राबवण्यात येतात.
शाळा, महाविद्यालयांत व्यसनमुक्ती शिबिरे, कार्यशाळा, पोस्टर प्रदर्शन, रॅली असे विविध उपक्रम घेण्यात आले. अनेक कारखाने, ग्रामीण भागातही व्यसनमुक्तीविषयी प्रबोधन करण्यात आले. तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारू सोडवण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.

आतापर्यंत सहा राष्ट्रीय कार्यशाळा, दहा राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आल्या. तसेच व्यसनमुक्तीवर आधारित सहा पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले आहे. वर्षभर विविध शिबिरे, रॅलीचे आयोजनातून व्यसनमुक्ती जनजागरण करतो. - विलास चंदने, संचालक, जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रवणीय गीतांनी गाजवली पहाट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भक्तिगीते, भावगीते, लावणी अन् प्रेमगीतांनी ‘गुढीपाडवा पहाट’ कार्यक्रम श्रवणीय ठरला. गायकांची जादू आणि निवेदकांची उत्स्फूर्तता कार्यक्रमाची रंगत वाढवणारी ठरली. नवीन वर्षांच्या पारंपरिक वातवरणात संगीताची जादू अनुभवण्यासाठी शेकडो रसिक उपस्थित राहिले.
वर्धमान नागरी पतसंस्थेच्या वर्धमान सांस्कृतिक मंच यांच्या वतीने ‘गुढीपाडवा पहाट’ कार्यक्रम घेण्यात आला. संत एकनाथ रंगमंदिरात मंगळवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. गायक चैतन्य कुलकर्णी, मधुरा कुंभार, संगीता भावसार आणि निशांत घाटे यांनी दर्जेदार गाणी सादर केली. चैतन्य आणि मधुरा यांच्या ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोद्य झाला’ या गीताने कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर चैतन्यने सलग भक्तिगीते सादर करून रसिकांना भक्तिमय वातावरणाची अनुभूती दिली. ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘देव नाही देव्हाऱ्यात’, ‘कानडा राजा पंढरीचा’ अशी एकापेक्षा एक सरस भक्तिगीते सादर झाली. ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या गीतातून निशांत घाटे यांनी रसिकांना खिळवून ठेवले. मधुरा कुंभार यांच्या ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’ या भावगीताने ‘वन्स मोअर’ मिळवला. ‘मनमोराचा कसा पिसारा फुलला’ या अप्रतिम गीतातून संगीता भावसार यांनी दाद मिळवली. निशांत आणि संगीता यांनी ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ युगूलगीत सादर केले. तर मधुरा व चैतन्य यांनी ‘जीव रंगला दंगला’ या गीतासाठी भरभरून टाळ्या मिळवल्या. ‘पाहिले न मी तुला’, ‘मी राधिका मी प्रेमिका’, ‘एक लाजरा न साजरा मुखडा’, ‘चौदहवी का चांद हो’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘डोलकर दर्याचा राजा’ अशा लोकप्रिय गाण्यांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला. ‘लागा चुनरी में दाग’ गीताने सांगता झाली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन जीवन कुलकर्णी यांनी केले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह हेमंत जोशी, समरसता मंचाचे अध्यक्ष रमेश पांडव, महापौर भगवान घडमोडे, वर्धमान नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शांतीलाल शिंगी, राजेश भारूका, माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. तर पद्माकर कदम, प्रणयकुमार देशमाने, पारस चोरडीया, अनंत घडमोडे, पवन सिंगी, अतुल घोगरे यांनी कलाकारांचा सत्कार केला. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारंपरिक वातावरण
‘गुढीपाडवा पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती भागवत व महेश अचिंतलवार यांनी केले. कविता, प्रसंगनिष्ठ विनोद आणि हजरजबाबी कोट्या करून अचिंतलवार यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. रसिकांचे स्वागत ‘इस्कॉन’ने टिळा लावून व प्रसाद देऊन केले. सर्व रसिकांनी गांधी टोपी घातल्याने कार्यक्रमात पारंपरिक नववर्षाचे वातावरण तयार झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...कृष्णगुंजमध्ये वेणू नाद!

$
0
0


औरंगाबाद : सिडकोतल्या गीताभवनमध्ये पुण्यातील प्रसिद्ध बासरीवादक दीपक भानुसे यांची वेणूसभा झाली. या सभेला शहरासह परभणी, जालना, बार्शी येथील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अशा सहा वेणू सभा घेण्यात येणार आहेत. त्यातील ही दुसरीच सभा होती.
भानुसे यांनी कार्यशाळेत मुलांना मार्गदर्शन केले. भानुसे म्हणाले, ‘गुरुंकडे जाऊनच बासरीचे शिक्षण घ्यावे. ऑनलाइन किंवा यू-ट्यूबवरून शिकणे धोकादायक असते. बासरी वादनात सहजता असावी. रियाजाने स्पष्टता येते. खाली बसूनच बासरीचा रियाज करावा. त्यात फुंकीचा दाब महत्वाचा असतो.’
सायंकाळच्या सभेत दीपक भानुसे यांचे बासरी वादन झाले. पुण्याचे अतुल कांबळे पुणे यांनी तबलासाथसांगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी पांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी विजय आहेरकर, गीता भवनचे अध्यक्ष रमेश दुसे, तबला वादक अविनाश बहिर्गावकर, जयराम गीसावी, प्रफुल्ल काळे, गायक सुधीर बहिर्गावकर, रोहन गावडे, शास्त्रीय कथक नृत्यकार नितीन शिराळे उपस्थित होते.

मेमध्ये तिसरी सभा
‘मे महिन्यच्या पहिल्या आठवड्यात तिसरी वेणू सभा होईल. इच्छुकांनी http://bit.ly/Venusabha या लिंक वर जाऊन आपली नाव नोंदणी करावी व krishnagunjgurukul@gmail.com यावर संपर्क करावा,’ असे बासरीवादक निरंजन भालेराव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरणची वसुली फसली

$
0
0


औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात यंदा २२२ कोटींच्या वीजबिल वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, महावितरण फक्त एकशे वीस कोटींच्या बिल वसुलीचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. टार्गेट आणि वसुलीमध्ये प्रचंड अंतर असल्याने वीजबिल वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
औरंगाबाद परिमंडळात वीज वसुलीत वाढ करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी महामोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत दोन हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांकडून वीज वसुलीची जबाबदारी महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आली. या कारवाई अंतर्गत ४४ हजार वीज ग्राहकांची वीज तोडण्यात आली.
महावितरण कार्यालयाने निश्चित केलेल्या २२२ कोटीच्या कर वसुलीच्या तुलनेत मार्चच्या अखेरिस १२० कोटीपर्यंतची वसुली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी महावितरणाची महावसुली मोहीम आगामी जून महिन्यापर्यंत चालविणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​महसूलमध्ये ८८ टक्के वसुली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे कोणतीही सक्ती न करता प्रशासनाने मार्च अखेरीस करवसुलीचे टार्गेट पूर्ण केले होते. मात्र, यंदा मार्च महिना संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असतानाही ८८.३० टक्के वसुली करण्यात आली आहे. ५०८ कोटी ९५ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना प्रशासनाने आतापर्यंत ४४९ कोटी ४१ लाख रुपयांची वसुली केली आहे.
मार्च महिन्याच्या प्रारंभापासूनच जिल्हा प्रशासन महसुली वसुलीच्या कामाला लागले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाकडूनही दररोज वसुलीचा आढावा घेण्यात येत असला, तरी प्रशासनाला शंभर टक्के महसूल वसुली करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांत ५९ कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे. प्रशासनाला मार्चअखेरपर्यंत जमीन महसूल, करमणूक, गौणखणिज तसेच इतर असे ५०८ कोटी ९५ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च महिन्याच्या २८ तारखेपर्यंत ४४९ कोटी रुपयांपर्यंत वसुली झाली होती. महसुली करवसुलीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असल्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये शंभर टक्के वसुलीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. करवसुलीसाठी तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून करमणूक कराची वसुली कर निरीक्षकांमार्फत करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुलेलाल जयंतीनिमित्त शहरात अपूर्व उत्साह

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयोलाल झुलेलालच्या जयघोषात बुधवारी सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची १०६७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रभात फेरी, वाहन फेरी यासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शहागंज येथून सिंधी कॉलनीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
शहरात ४० वर्षांपासून झुलेलाल जयंती साजरी करण्यात येते. जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता झुलेलाल भगवान यांची पंचामृत स्नान सोहळा पार पडला. त्यानंतर प्रभातफेरी, सामूहिक आरती, संत कंवर राम कुटीया येथून वाहनफेरी काढण्यात आली. जवाहर कॉलनी, अमरप्रित चौक, क्रांतिचौक, टिळक पथ, सिटीचौक, सराफा, शहागंज, किराणा चावडी, चौराहा, लक्ष्मण चावडी, मोंढानाकामार्गे या फेरीची सांगता सिंधी कॉलनी येथे झाली. दुपारी समितीच्या मैदानावर महाप्रसाद, सायंकाळी वरणदेव जलाश्रम, शहागंज येथून शोभायात्रा काढण्यात आली. मोंढा नाकामार्गे निघणाऱ्या या शोभायात्रेची सांगता सिंधी कॉलनी करण्यात आली. सिंधी कॉलनी येथील कंवर कुटिया मैदानात रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.या कार्यक्रमांसाठी सिंधीसमाज अध्यक्ष किशनचंद तनवाणी, नानकराम परसवाणी, राजू परसवाणी, भरत निहालानी, शंकरलाल गुनवाणी, विनोद चोटलानी, शंकर बजाज, आनंद दयालानी, देवानंद मदनानी, पुरूषोत्तम इसराणी, बाब‌ुभाई कारिया, सेवकराम तोलवाणी, राजकुमार रामचंदानी, कल्याणदास माटरा, प्रकाश किंगर, अमृतलाल नाथानी, श्रीचंद मलकानी, जगदीश बजाज, शिव तोलवाणी यांनी प‌रिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीसाठी टाचेखाली नाणे!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नकली केसांचा विग परिधान करून उंची वाढवणाऱ्या एका उमेदवाराला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी एका उमेदवाराने चक्क टाचेला पाच रुपयांची नाणे चिटकावत उंची वाढविण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलिस भरतीत हा प्रकार उघड आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर सकाळी सहापासून पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक दिवशी एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. नाशिक येथे केसांचा विग लावून उंची वाढविण्याचा प्रकार घडला. तसे प्रकरण घडू नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी खास दक्षता घेतली आहे. सर्व भरती प्रक्रियेवर कॅमेऱ्यांची करडी नजर असून संशयित उमेदवारांवर नजर ठेवण्यासाठी खास पथकही तैनात करण्यात आले आहे.
खुलताबाद तालुक्यातील राजेश (नाव बदलले आहे, वय २२) हा युवकही पोलिस दलात नोकरीची चांगली संधी मिळेल, अशी स्वप्न पाहात मोठ्या जिद्दीने भरतीसाठी उतरला. मैदानी चाचणी तसेच लेखी परीक्षेसाठी त्याने जय्यत तयारीही केली. त्यात तो पास होईल, अशी त्याला खात्री होती, पण यात अडसर होती ती उंचीची. पोलिस भरतीसाठी १६५ इंच उंची आवश्यक असते. मात्र, राजेशची उंची सुमारे पाच मिलिमीटर कमी होती. त्यामुळे त्याने चक्क टाचांना पाच रुपयांचे नाणे चिकटावत उंची वाढविण्याची नामी शक्कल लढवली. राजेश हा मैदानावर तयारीने आला, पण तो आल्यापासूनच काहीसा भेदरलेला दिसत होता. पोलिसांच्या नजरेतून ही बाब काही सुटली नाही आणि पोलिस उपअधीक्षक शरद बरडे, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांना त्याच्यावर संशय आला. राजेशची उंची तंतोतत भरली. पोलिसांनी त्यास बाजूला येण्यास सांगताच तो आणखी भेदरला आणि त्याची चलाखी लागलीच उघडकीस आली. पोलिसांनी पाय वर करण्यास सांगताच दोन्ही टाचेला पाच पाच रुपयांचे नाणे चिटकावल्याचे उघडकीस आले. यानंतर त्याला भरतीप्रक्रियेतून बाद ठरवण्यात आले असून याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते अपघातात वर्षात ४८१ बळी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात जिल्ह्यातील ४८१ जणांनी जीव गमावला. २०१६मध्ये जिल्ह्यात तब्बल १२४७ अपघात झाले असून भरधाव वेग, चालकांचा बेजबाबदारपना यासोबत रस्त्यांवरील खड्डेही दुर्घटनांना कारणीभूत ठरले आहेत.
जिल्ह्यात वाहनांची संख्या ११ लाखांच्या घरात पोचली असली तरी अरुंद रस्ते, खड्डे व बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. दररोज तीन ते चार अपघात होतात. यामध्ये आठवड्यातून एक ते दोघांचा मृत्यू रस्ता अपघातामुळे होतो.
बीड बायपासर, नगर रोड, दौलताबाद रोड, सिल्लोड व पैठण रस्ता तसेच जालना रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. या रस्त्यांवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या काळीपिवळी तसेच अवैध वाळू वाहतुकदारांची दादागिरी असते. मात्र, याकडे पोलिस, महसूल तसेच परिवहन विभागाने सपशेल दुर्लक्ष केले असल्याचे आकडेवारीवरून दिसते. चौकाचौकात वाहतूक पोलिस उभे असले तरी त्याच चौकामध्ये बेशिस्तपपने काळीपिवळीचालक आणि रिक्षा उभ्या असतात. या गर्दीमुळेही अपघाताला निमंत्रण मिळते. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या अपघातात ४८१ जणांना जीव गमवावा लागला. या अपघातांमध्ये १०२१ जण गंभीर जखमी तर १९५ जण किरकोळ जखमी झाल्याची नोंद आहे.
बैठकीत केवळ सूचना : जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीच्या नियमित होणाऱ्या बैठकीत अपघात तसेच अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून सूचनांचा भडिमार करण्यात येतो. मात्र, या सूचनांचे पालन होते काय, याकडे दुर्लक्ष होते. बैठकीमध्ये रस्त्यांवरील गतिरोधकांचे प्रमाण, दुभाजक याबाबत सूचना देण्यात येतात. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये राज्य परिवहन महामंडळाने १९ ठिकाणे अपघातप्रवणस्थळ म्हणून निवडले आहेत. ज्यामध्ये गंगापूर बायपास, जुना कायगाव, वरखेडा फाटा, अजिंठा घाट, दहेगाव बंगला, इसारवाडी फाटा, लिंबेजळगाव पुलाजवळील भाग, झोलेगाव पूल आदींचा समावेश आहे. या ठिकाणी पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागांना यासाठी कालबद्ध सुधारात्मक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

११ लाख वाहने
शहराची लोकसंख्या १५, तर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३६ लाखाच्या घरात पोहोचली आहे. जिल्ह्यात वाहनसंख्येचा आकडा ११ लाखांवर गेला आहे. यामध्ये साडेपाच लाख दुचाकी, ३ लाख कार, जीप, अॅम्ब्युलन्स व अन्य वाहने तर सुमारे दीड लाख ट्रक, ट्रॅक्टर, टँकर व इतर वाणिज्यिक वापराची आहेत. जिल्ह्यात अॅटोरिक्षांची संख्याही ३६ हजारांवर आहे. दरवर्षी वाहनांचा आकडा वाढत असला तरी रस्ते ‌मात्र आहे तसेच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images