Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अज्ञात वाहनाने महिलेला चिरडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
फुलंब्री-औरंगाबाद मार्गावरील मठपाटी येथील पुलाजवळ मोपेडला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडली आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनाचे चाक या महिलेच्या डोक्यावरून गेले.
एकनाथ पांडुरंग भानुसे (वय ६५) व पत्नी सुमनबाई एकनाथ भानुसे (वय ६०) हे दोघे मोपेडवरून (एम.एच. २०, ए. आर. ६६३४) लग्नासाठी हसनाबादकडे जात होते. यावेळी फुलंब्री जवळील मठपाटी पुलाजवळ औरंगाबादवरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मोपेडवरील दोघेही खाली पडले. धडक देणाऱ्या वाहनधारकाने वाहन न थांबवता जलद गतीने पळविले. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या सुमनबाईच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्या जागीच मरण पावल्या. एकनाथ भानुसे यांचा पाय फॅक्चर होऊन बऱ्याच जखमा झाल्या आहेत.
महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मृतास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. भानुसे यांच्यावर प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जहिरात क्षेत्रात कार्ररत रवींद्र भानुसे यांचे हे आई-वडील आहेत.

किती बळी घेणार ?
औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर पाच वर्षांपासून अपघात वाढले आहेत. हा रस्ता चौपदरी व्हावा यासाठी अनेकदा मोजमाप झाले. पण, रस्ता रूंद होत नाही. औरंगाबाद-फुलंब्री प्रवास फक्त २५ ते ३० मिनिटांचा आहे. पण वर्दळीमुळे एक तास लागत आहे. या रस्त्यावर वाहने संख्या कमी असल्याचे कारण देऊन चौपदरीकरण टाळले जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी चौपदरीकरणाची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गायकवाडांवर हल्ला; सहा जणांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा भारिप बहुजन महासंघाचा माजी नगरसेवक अमित भुईगळ याच्यासह ६ पदाधिकाऱ्यांना शनिवारपर्यंत (२२ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहंम्मद यांनी मंगळवारी दिले.
‘मुंबईतील आंबेडकर भवन का पाडले’ असे म्हणत औरंगाबाद दौऱ्यावर आलेले राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, उपाध्यक्ष श्रीरंग ससाणे, दिनेश साळवे, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे, गौतम गवळी व अन्य दोन महिलांनी सोमवारी मारहाण केली. रत्नाकर गायकवाड यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अमित भुईगळसह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून अमित भुईगळसह ८ जणांना अटक केली असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या आठ जणांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींच्या इतर साथीदारांना अटक करावयाची आहे, त्या साथीदारांची नावे व इतर माहिती घेणे आहे, त्यांच्यावर हल्ला करताना वापरण्यात आलेली चप्पल जप्त करावयाची आहे, त्यांच्यावर हल्ला करण्यामागाचा उद्देश काय होता, हल्ला करताना कोणते शस्त्र वापरले आहे का आदी बाबींची चौकशी करावयाची आहे. त्याचवेळी भुईगळ याच्याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने अधिक तपास करावयाचा आहे. त्यामुळे ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात विनंती सहायक सरकारी वकील अ‍ॅड. बी. एम. राठोड यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने वरील सहा जणांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयित आरोपींतर्फे अ‍ॅड. बी. एच. गायकवाड, अ‍ॅड. संजय भिगारदेव, अ‍ॅड. एम. एन. देशमुख, अ‍ॅड. एस. एम. पटेल, अ‍ॅड. विलास वाघ, अ‍ॅड. प्रवीण कांबळे यांच्यासह २८ वकिलांनी काम पाहिले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकूण आठ जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्या दोन महिलांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची हर्सूल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

३०७ कलम रद्द करण्याची मागणी
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केल्याप्रकरणी लावण्यात आलेले संशयित आरोपींवरील ३०७ कलम मागे घेण्यात यावे या मागणीसाठी एका शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. पोलिस आयुक्तांनी घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करीत या कलमाबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले.
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर सोमवारी दुपारी भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हल्ला करीत मारहाण केली होती. मुंबईतील आंबेडकर भवन पाडण्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी भारिप बहुजनचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह सात जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दंगल करणे आदी कलमानुसार गुन्हे दाखल केले असून अटक केली आहे. आहे. खुनाचा प्रयत्न करण्याचे कलम ३०७ लावणे म्हणजे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. यावेळी आयुक्तांनी, आरोग्य तपासणी व प्राथमिक तपासानंतर कलमांचा विचार करण्यात येईल व यामध्ये कलम ३०८ लावता येईल का याचा पुनर्विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात पँथर्स रिपब्लिकनचे अध्यक्ष गंगाधार गाडे, प्रा. अविनाश डोळस, अॅड. अभय टाकसाळ, बुद्धप्रिय कबीर, रमेश खंडागळे, मिलींद दाभाडे, गौतम खरात, मिलींद बनसोडे, बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांच्यासह सुमारे १०० ते १५० कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते.

पोलिस आयुक्तांची नाराजी
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घडलेली घटना लज्जास्पद असून एका अतिमहत्त्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्नीसमोर मारहाण करणे चूक असल्याचे सांगितले. या घटनेमुळे राष्ट्रीय स्तरावर नकारात्मक संदेश गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या घटनेत पोलिसांही मारहाण करण्यात आली असल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा मारहाण करणाऱ्यामध्ये समावेश असल्याने दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

तक्रार आल्यास विनयभंगाचा गुन्हा
रत्नाकर गायकवाड यांचा बचाव करण्यासाठी सरसावलेल्या त्यांच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आली. गायकवाड यांच्या पत्नीची तक्रार आल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात ३० मे रोजी पदवी प्रदान समारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ ३० मे रोजी होणार आहे. माजी परराष्ट्र सचिव डॉ. निरुपमा राव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. प्रमुख पाहुणा निश्चित होत नसल्याने अनेक महिन्यांपासून पदवी प्रदान समारंभाची प्रतिक्षा होती.
विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा निश्चित होत नव्हता. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१६मध्ये हा समारंभ होणार होता. त्यानंतर प्रमुख पाहुणे निश्चित होत नसल्याने हे कार्यक्रम होत नव्हता. विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान सोहळ्यासाठी अर्ज केले, परंतु वेळापत्रक निश्चित होत नव्हते. त्यामुळे हा प्रदवी प्रदान सोहळा केव्हा होणार असा प्रश्न पडला होता. विद्यापीठाने अनेकांना निमंत्रण दिले होते. त्यात माजी परराष्ट्र सचिव डॉ. निरुपमा राव यांनी विद्यापीठाचे आमंत्रण स्वीकारले. त्यानुसार विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा ३० मे रोजी निश्चित करण्यात आला आहे. डॉ. राव विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. विद्यापीठाच्या नाट्यगृहात सायंकाळी ४ वाजता हा पदवी प्रदान सोहळा पार पडणार आहे.

१३ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज
पदवी प्रदान सोहळ्यादरम्यान पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यापीठातर्फे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. विविध अभ्यासक्रमाच्या सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज परीक्षा विभागाकडे आले आहेत. त्यांचे पदवी प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहेत. त्यासह ऑक्टोबर-२०१६ परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रासाठीचे अर्ज ३१ एप्रिलपर्यंत स्वीकारले जाणार असल्याची माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीरबावडा ते धानोरा रस्त्यावर मरणयातना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील पीरबावडा ते धानोरा या पाच किलोमीटर रस्त्यापैकी फक्त दीड किलोमीटरचे डांबरीकरण करण्यात आले. उर्वरित रस्त्यावरून प्रवास करणे अशक्य आहे. रस्त्यावर दगडांचा थर, मोठे खड्डे आहेत, यामुळे वाहन असो की पायी, प्रवास मात्र तारेवरची कसरत करतच पूर्ण करावा लागत आहे.
तालुक्यातील पीरबावडा ते धानोरा हा रस्ता १२ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला आहे. पण, त्यानंतर दुरुस्ती करण्यात आलेली नाही, किंवा डांबरीकरण झालेले नाह. चार महिन्यांपूर्वी धानोरा गावापासून १४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु, उर्वरित तीन किलोमीटर रस्ता व त्यावरील एका पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हा पूल अत्यंंत धोकादायक आहे. रस्त्यावरील दगड सैल झाले आहे, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. परिणामी, चारचाकीचा विचार न केलेलाच बरा; दुचाकी चालवणे सुद्धा अशक्य झाले आहे. पायी चालताना सुद्धा कधी पाय मुरगळेल हे सांगता येत नाही. या रस्त्यावरून पावसाळ्यात प्रवास करणे अशक्य आहे. पुलावर फक्त नाल्या टाकल्या आहेत, त्या झाकलेल्या नाहीत; त्यामुळे अनेक मोटारसायकलस्वार येथे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उर्वरित तीन किलोमीटरचे डांबरीकरण त्वरित करावे, अशी या रस्त्यावरील गावकऱ्यांची मागणी आहे.

विद्यार्थ्यांना धोका
या रस्त्यावर ५० ते ६० वस्त्या आहेत. त्यावरील नागरिकांना दररोज प्रवास करावा लागतो. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या वापरातील हा रस्ता आहे. पण, तो खराब झाल्याने विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात विद्यार्थी एकटे शाळेत जाऊ शकत नाहीत, त्यामुळे सुरक्षेसाठी पालकांना सोबत जावे लागते.

भाविकांची गैरसोय
हा रस्ता पीरबावडा व धानोरा या दोन गावांना जोडणार आहे. या रस्त्याने श्रीक्षेत्र देवदरी येथे भाविक जातात. पण, एकदा गेल्यानंतर भाविक त्यावरून परत येत नाहीत. रस्ता खराब असल्याने ते टाकळी कोलते या दूरच्या मार्गाने परत जातात. पण, स्थानिक नागरिकांना हा रस्ता वापरण्याशिवाय गत्यंतर नाही.

बाळआमराई रस्त्याची दुरवस्था
फुलंब्री तालुक्यातील गणोरी ते बाळआमराई या दीड किलोमीटर रस्त्याची चाळण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंक कठीण झाले आहे. या रस्त्याचे काम आठ वर्षांपूर्वी करण्यात आले. पण, सिलकोट न करताच निधी उचलण्यात आला. रस्त्यावरील खड्यांमुळे दहा मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ द्यावा लागत आहे. गणोरी गावाशी पंचक्रोशीमधील २५ गावे संबंधित आहे. शिवाय औरंगाबाद शहर फक्त २२ किलोमीटर आहे. त्यामुळे शेकडो नागरिक या रस्त्याने नोकरी व दैनंदिन कामासाठी ये-जा करतात. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या पुढाकाराने गणोरी फाटा ते येसगाव फाट्यापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बाळआमराई ते गणोरी हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दीपक चव्हाण व ग्रामस्थ तांदळे यांनी केली आहे.

हा रस्ता होऊन १२ वर्षे झाली आहेत. परंतु, त्यानंतर दुरुस्ती किंवा डांबरीकरण झालेली नाही. त्यामुळे रस्त्यावर खूप खड्डे पडले आहेत. त्यावरून मोटारसायकल चालवणे सुद्धा अशक्य आहे. संबंधितांनी पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करावी.
-जयराम गाडेकर, शेतकरी

हा रस्ता पीरबावडा ते धानोरा, असा आहे. धानोरा गावापासून फक्त दीड किलोमीटरचा रस्ता झाला. उर्वरित तीन किलोमीटरचा रस्ता व पुलाचे काम करण्यात आलेले नाही. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
- बळीराम गाडेकर, शेतकरी

या रस्त्यावर जागोजागी अनेक खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील पूल धोकादायक झाला आहे. पुलाला फक्त नाल्या आणून टाकल्या. हा रस्ता पूर्ण करण्याबद्दल निर्णय घेतला जात नाही. मुलांना दररोज शाळेत घेण्यासाठी जावे लागते.
-साडू गाडेकर, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑनलाइन’म‌ुळे एमआयडीसीतील कामात पारदर्शकता

$
0
0

‘ऑनलाइन’म‌ुळे एमआयडीसीतील कामात पारदर्शकता
dhananjay.kulkarni@timesgroup.com
@dhananjaykMT


शहरातील एमआयडीसीचे काम वाढतेय, सध्या औद्योगिक क्षेत्रातील जागा, ऑनलाइन निविदा, शहरातील ४ औद्योगिक भागात असलेल्या सुविधा, रस्त‌े या मुद्यांवर अधिक चर्चा होत आहे. एमआयडीसीत अनेक कामे होत आहेत. उद्योजकांसह विविध अधिकारीही अधिक सजग झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी तथा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यां‍नी विविध मुद्यांवर मटा टॉकटाइममध्ये चर्चा केली.

- एमआयडीसीतील जागांविषयी काय सांगाल? किती शिल्लक आहेत?

- औरंगाबाद वाळूज एमआयडीसीत आता जागाच शिल्लक नाही. जागा मागणारे लाखो जण आहेत, पण आता जागेअभावी औरंगाबादकर उद्योजक किंवा नवतरूण जरा नाराज होत आहेत हे वास्तव आहे, पण त्यांनी औरंगाबाद जवळील एमआयडीसीत गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही. शहराचा व्याप जसा वाढतच चालला आहे तसा एमआयडीसीचाही व्याप वाढतोय उद्योग क्षेत्राचा परिघही त्याबरोबर वाढतोय. उद्योजकां‍च्या संख्येतही वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता अधिक जागा हवी असल्यास डीएमआयसी किंवा शहराजवळील इतर गावांजवळ असलेल्या एमआयडीसीचा विचार करावा.

- औरंगाबाद व्यतिरिक्त सध्या कुठे-कुठे एमआयडीसीच्या जागा उपलब्ध आहेत?

- आता औरंगाबादेत जागा शिल्लक नाहीत हे जगजाहीर आहे. कन्नड, भोकरदन, पैठण, जाफ्राबाद, जालना फेज -३ या भागात सध्या जागा शिल्लक आहेत. याशिवाय दिल्ली मुंबई इंडस्ट्र‌िअल कॉरिडोरमध्ये (डीएमआयसी) जागा उपलब्ध असल्याने त्यातही विचार करायला हरकत नाही.

- जागांसाठी कशा पद्धतीत अर्ज करावे किंवा काय करता येईल त्या विषयी काय सांगाल?

- आजकाल ऑनलाइन पद्धतीत एमआयडीसीच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागतो. ऑक्शन्स (निविदा) असतात. आम्ही जागांचे नकाशे, किंमती आणि बेसिक सर्व माहिती वबेसाईटवर टाकून देत असतो. त्यानुसार जागा निवडायची ऑक्शनमध्ये भाग घ्यायचा, ज्याचा सर्वात अधिक रेट असेल त्याला एमआयडीसी ९९ वर्षांच्या कराराने जागा देऊन टाकते. ऑनलाइन पद्धतीतील निविदा निघू लागल्या आहेत. यामुळे आता या संदर्भात नवउद्योजकांनी, नवतरुणांनी सजग राहून ऑक्शन संबंधी माहिती, जाहिरात कधी येते ते पाहावी आणि जागा विकत घ्यावी.

- जागेसंबंधी हीच ऑनलाइन पद्धत अवलंबवावी लागते की आणखी दुसरी काही पद्धत आहे?

- एमआयडीसीत जागांसंबंधी दोन प्रकारच्या निविदा निघत असतात. एमआयडीसी सरळ पद्धत आणि ऑनलाइन पद्धत अशा दोन पद्धतीत जागा विकत असते. सरळ पद्धतीत जागेचा बेसिक रेट एमआयडीसी लावत असते. त्यापेक्षा अधिक रेटचा भाव येतोच. त्यात ज्याने सर्वाधिक रेट कोट केला असेल त्याला जागा दिली जाते. एमआयडीसी यासंबंधी जागा खरेदीदारांना समोरासमोर बसवून हे सगळं सांगत असते. दुसरी पद्धत ऑनलाइनची आहे त्यात तर रेट कोट करणे, जागा निवडणे, नकाशांनुसार माहिती करून घेणे, हे सगळे ऑनलाइन होते. यामुळे आजकाल अधिक पारदर्शकता आली आहे. अनेक जण या पद्धतीत आता जागा विकत घेत आहेत.

- एमआयडीसीचा विस्तार होणार आहे का? जागा तर उपलब्ध नाही, जागांचे दरही वाढत आहेत. अशावेळी काय होणार?

- उपलब्ध जागेतच सर्व काही करावे लागणार आहे. जागांची मर्यादा तर पडतेच आहे, पण सध्या कन्नड, जाफ्राबाद, माजलगाव, भोकरदन आणि जालना फेज ३ मध्ये जागा उपलब्ध असून त्यातून जागा विकत घेता येऊ शकते. दर कोट करून ऑनलाइन पद्धतीतच जागा विकत घेता येणार आहे.

- ज्यांच्याकडे पैसा आहे, तेच जागा विकत घेणार पण जे गरीब आहेत, होतकरू तरुण आहेत त्यांनी काय करावे? त्यांच्यासाठी जागा उपलब्ध होत नाहीत का?

- हो, हे अगदी खरं आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचीच एमआयडीसीत जागा होऊ शकते, पण होतकरू तरुण व बेरोजगारांसाठी शासनाच्या इतर काही योजना आहेत, त्यात त्यांनी लक्ष घालावे. स्टार्टअप वगैरे सारख्या योजना नक्कीच त्यांना उपयोगी पडू शकतील. याशिवाय त्यांचा आर्थिक प्रश्नही सुटावा यासाठी विविध अनुदान आणि बँकांच्या योजनांदवारे ते कर्ज घेऊन जागा घेत व उद्योग सुरू करू शकतात.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक नृत्य दिनानिमित्त ‘महागामी’तर्फे कार्यक्रम

$
0
0

जागतिक नृत्य दिनानिमित्त ‘महागामी’तर्फे कार्यक्रम
तब्बल दोन आठवडे कार्यक्रमांची रेचलेच
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जागतिक नृत्य दिनानिमित्त ‘महागामी’तर्फे १६ ते ३० एप्रिलपर्यंत कार्यशाळा, नृत्यसंरचना, एकल सोलो प्रस्तुती, पोस्टर स्पर्धा, कॅलिग्राफी कार्यशाळा, नृत्यविषयक परिसंवाद असे विविधांगी कार्यक्रम होणार आहेत.
२२ व २३ एप्रिल रोजी सायंकाळी सातला रुक्मिणी सभागृहात ‘विस्तार’अंतर्गत दोन वेगळ्या नृत्य संरचना सादर केल्या जाणार आहेत. या रचनांची संकल्पना व संरचना ही ‘महागामी’च्या पार्वती दत्ता यांची आहे. २२ रोजी ‘कॅलिग्राफी’ (सुलेखन) आकृत्यांना कथक नृत्याच्या माध्यमातून दाखविणयात येणार आहे. प्राचीन भारतीय, अरबी, चिनी, जपानी कॅलिग्राफीच्या विचारांना नृत्यरुपात प्रस्तुत केले जाणार आहे. २३ एप्रिल रोजी ‘प्रवाही’ ही संरचना प्रस्तुत केली जाणार आहे. यात ‘अजरा’, ‘वारी’ व ‘वेगिनी’ या तीन नृत्य प्रस्तुती होतील. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमानंतर कलाकारांसोबत चर्चा होणार आहे. २० रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत आईन्स्टाईन हॉलमध्ये कॅलिग्राफी कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत शशिकांत पेंडसे हे मार्गदर्शन करणार आहेत. ३० रोजी सायंकाळी सातला महागामी परिसरातील ‘द्यावापृथ्वी’ येथे ‘क्षितिजातीत’ हा कार्यक्रम होणार आहे. यात पार्वती दत्ता यांच्यासह दर्शना कणसे, कन्नगी गोसावी व शितल भामरे हे कलाकृती सादर करणार आहेत. त्याचवेळी जागतिक नृत्य दिनानिमित्त ‘महागामी’ने नावारुपाला आणलेला शारंगदेव महोत्सव हा दिल्लीमध्ये २७ व २८ एप्रिल रोजी होणार आहे असून, यात दोन दिवसीय परिषद होणार असल्याची माहिती पार्वती दत्त यांनी मंगळवारी (१८ एप्रिल) पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ‘एमजीएम’चे विश्वस्त अंकुश कदम, रेखा शेळके यांची उपस्थिती होती.
कैद्यांनीही घेतला नृत्याचा आनंद
नृत्य दिनानिमित्त अलीकडेच ‘महागामी’ने हर्सूल जेलमध्येही नृत्याचा कार्यक्रम सादर केला होता आणि त्याचा एक हजारपेक्षा जास्त कैद्यांनी मनसोक्त आनंद घेतला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी सुरुवातीला केवळ कमी शिक्षेच्या कैद्यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र गंभीर गुन्ह्यातील कैद्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खूप आग्रह केल्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली होती. महिला कैद्यांनाही नंतर कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. अर्थातच, कार्यक्रमाचा सगळ्या कैद्यांनी मनसोक्त व अतिशय शांततेत व शिस्तीत आनंद घेतल्याची आठवणही दत्ता यांनी यानिमित्ताने करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकबधीर महिलेचा घरात घुसून विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरात घुसून मुकबधीर महिलेचा दोघांनी विनयभंग केला. घरातून जाण्यास सांगितल्यानंतरही त्यांनी महिलेला त्रास दिला. हा प्रकार पाहिल्यानंतर घरमालकीणीने या मुकबधीर महिलेची सुटका केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुंदवाडी प‌रिसरात एक मुकबधीर महिला भाडेकरू आहे. या मुकबधीर महिलेच्या घरी तिच्या परिचयाचा श्रीक‌ांत नावाची व्यक्ती आली होती. श्रीकांत देखील मुकबधीर आहे. हे दोघे घरात बसले असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी आनंद सहाने व राहुल तिडके हे आले. त्यांनी दोन्ही मुकबधिरांना चिडवण्यास सुरुवात केली. दोघा मुकबधिरांनी त्यांना घरातून जाण्याचा विनंतीवजा इशारा केला. यावेळी आनंद व राहुल यांनी जाण्याऐवजी मुकबधीर महिलेसोबत शारीरिक लगट करण्यास सुरूवात केली. घरमालकिणीला त्यांच्या खोलीतून आरडाओरडा ऐकू आल्याने त्यांनी धाव घेतली. घरमालकिणीने दोघांना बाहेर जाण्यास सांगूनही त्यांची दादागिरी सुरूच होती. अखेर तिने आरडाओरड केल्यानंतर दोघे पळून गेले. मुकबधीर महिलेला बोलता येत नसल्याने व हा प्रकार स्वतः सोबतही घडल्याने घरमालकिणीने तक्रार दिली. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार शिरसाठ हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भररस्त्यावर पेटवून घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

दुचाकीवरून आलेल्या एका २२ वर्षीय तरुणाने स्‍वतःच्‍या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्‍महत्‍या केली. ही खळबळजनक घटना दहेगाव बंगला येथे मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

एक अनोळखी तरूण दहेगाव बंगला येथे मोटारसायकवरून (एम एच २०, डी वाय ३९६४) आला. त्याने किसान एजन्सीसमोर मोटारसायकल उभी केली व दुकानात येऊन दुकानदार जावेद खान यांना त्‍याने देशी दारूची बाटली मागितली. हे कृषी सेवा केंद्र आहे, दारूचे दुकान नाही, असे बजावल्यावर त्याने काढता पाय घेतला. त्‍यानंतर समोर उभ्या असलेल्‍या कार भोवती फेरी मारली, हा प्रकार संशयास्पद वाटल्याने कारमालक जावेद खान यांनी चालकास कार बाजूला घेण्याचा इशारा केला. ह हा तरूण थोडा वेळ रस्त्याकडे लक्ष देऊन बघत होता. त्याने विरुद्ध बाजूने जाऊन स्वतःच्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढले व रसवंती गृहाच्‍या मागील बाजूस जाऊन स्‍वतःच्‍या अंगावर पेट्रोल टाकून घेऊन पेटवून घेतले. त्या घटनेत तो जागीच मरण पावला.

आग दिसताच उपस्थितांना धाव घेतली पण, आगीमुळे त्याला वाचवण्याचे धैर्य कोणालाच झाले नाही. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वाळूज पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दत्‍तात्रय साठे, प्रदीप बोरुडे, हरीश्चंद्र कचे, दीपक सोनवणे, चालक खोतकर यांनी धाव घेऊन गावकऱ्यांच्‍या मदतीने मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केला.

मयत साताऱ्यातील ?

या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, त्याच्या मोटारसायकल क्रमांकावरून पोलिसांनी शोध घेतला. ही मोटारसायकल सुमित हरीचंद्र सूर्यवंशी, (रा. भीमशक्‍तनगर, खंडोबा मंदिर परिसर, सातारा औरंगाबाद या नावे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमबीए’ परीक्षेचे ‘मॅनेजमेंट’ बिघडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकात अचानक वेळापत्रकात त्याची विद्यार्थ्यांना माहितीच देण्यात आली नाही. पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटवर दुपारी दोन ते पाच यावेळेत पेपर होतील, असे स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्षात ही परीक्षा सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत होते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांना ३० मार्चपासून सुरुवात झाली. २० एप्रिलपर्यंत या परीक्षा होणार आहेत. व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकातील बदलाने परीक्षार्थींची धांदल उडाली. पहिल्या वेळापत्रकानुसार प्रथम सत्र व तृतीय सत्राचे पेपर दुपारी दोन ते पाच यादरम्यान होतील असे दर्शविण्यात आले. विद्यार्थ्यांना हॉलतिकीटही देण्यात आले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला लक्षात आले, की प्रथम व तृतीय सत्रांचे पेपर एकाच वेळेत नसतात. त्यानंतर हे वेळापत्रक बदलण्यात आले. प्रथम सत्राचे पेपर सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत घेण्याच्या सूचना कॉलेजांना देण्यात आल्या. या प्रकारामुळे विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. आज वेळापत्रकानुसार श्वेता जाधव ही विद्यार्थीनी वसंतराव नाईक परीक्षा केंद्रावर पोचली, परंतु तेथे तिला, पेपर होऊन गेल्याचे कळाले. तिने परीक्षा विभागात विचारणा केली, परंतु तिला अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला. हाच गोंधळ १३ एप्रिल रोजी ही झाल्याचे विद्यार्थ्यांनी ‘मटा’ला सांगितले. त्यादिवशी हॉलतिकिटावर वेळापत्रकानुसार विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोचले. तेथे गेल्यानंतर बदलेले वेळापत्रक माहिती झाले. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर परीक्षा केंद्रावर नवीन प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली आणि दुपारी राहिलेल्या विद्यार्थ्यांचा पेपर घेण्यात आला.

मी हॉलतिकिटावर दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रावर गेले, परंतु पेपर झाल्याचे सांगण्यात आले. मी परीक्षा विभागात विचारणा केली. अर्ज करण्याची सूचना मला करण्यात आली. त्यांनी बदलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांना कळवायला हवे होते. ते न कळविल्यामुळे आमचे नुकसान झाले.
- श्वेता जाधव, परीक्षा‌र्थी.

बदलेले वेळापत्रक अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने हा गोंधळ उडाला आहे. विशेषतः काही विषयांत अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. प्रथम सत्राचे ३० ते ४० टक्के विद्यार्थी सकाळी दहा ते दुपारी एक यावेळेत परीक्षेला आलेच नाही. त्यामुळे त्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी लागली.
- एस. के. सूर्यवंशी, परीक्षा समन्वयक, वसंतराव नाईक कॉलेज.

वेळापत्रकावर चुकीची वेळ देण्यात आली आहे, परंतु झालेल्या बदलाबाबत आम्ही कॉलेजांना कळविले होते. विद्यार्थ्यांना फोन करूनही सांगण्यात आले. त्यानंतरही अनेकजण पेपरला आले नाहीत. आज दोन विद्यार्थी नव्या वेळापत्रकानुसार पेपरला आले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था केली जाईल.
- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तीर्ण घोषित करून राखीव पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

$
0
0

उत्तीर्ण घोषित करून राखीव पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
मॅटचे आदेश, चार पोलिस कर्मचाऱ्यांना दिलासा
म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
राखीव पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीसाठी घेण्यात आलेल्या विभागीय अर्हता परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट) अध्यक्ष राजीव अग्रवाल आणि सदस्य बी. पी. पाटील यांनी उत्तीर्ण झाल्याचे घोषित करून त्यांना राखीव पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश दिले.
औरंगाबाद जिल्ह्यातील आणि आयुक्तालयातील सशस्त्र पोलिस हवालदार/सहायक पोलिस उपनिरीक्षक यांच्या पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीसाठीची विभागीय अर्हता परीक्षा २०१४ रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात ५० टक्के गुण मिळणे आवश्यक होते. अर्जदार पोलिस कर्मचारी शिवाजी वाघ, लक्ष्मण सोरमारे, नानासाहेब गायकवाड आणि आबा बोराडे यांनी परीक्षा दिली. चौघांनाही परीक्षेच्या दोन्ही भागात ५० टक्के गुण मिळालेले असताना देखील त्यांना अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले होते. या नाराजीने या चौघांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात दाद मागितली होती. प्रकरणाच्या सुनावणीअंती न्यायधीकरणाने अर्जदार हे दोन्ही भागात उत्तीर्ण असल्याचे स्पष्ट नमूद करत त्यांना राखीव पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पदोन्नती देण्याचे आदेश दिले. अर्जदारांतर्फे प्रमोद कुलकर्णी यांना बाजू मांडली. त्यांना सुनील जाधव यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्याची जमीन उद्योजकास विकली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जमीन नावावर नसताना बनावट इसारपावती करून देत उद्योजकाची ४४ लाखा रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार आसेगाव ता. गंगापूर येथे घडला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज राजाराम निंबाळकर (रा. समर्थनगर) यांची वाळूज एमआयडीसी येथे रुद्रा पेट्रोलियम नावाने फर्म आहे. निंबाळकर यांना जमीन विकत घ्यायची असल्याने त्यांनी त्यांच्या परिचयाचे कैलास जनार्धन गावंदे (रा. इमामपूरवाडी ता. पैठण) यांना जमीन पाहण्यास सांगितले होते. गावंदे यांनी आसेगाव येथील गट क्रमांक २४ मध्ये माझी जमीन असून मला एक एकर विक्री करायची असल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत निंबाळकर यांनी ७५ लाख रुपयात त्यांच्यासोबत करार केला. त्यांना १५ लाख रुपये रोख व १० लाखांचा चेक देण्यात आल. ८ ऑगस्ट २०१३ रोजी सिडको एन-३ येथील ह‌ायकोर्टाजवळ अॅड. नोटरी एस. पी. दौंड यांच्या कार्यालयात इसारपावती देखील करण्यात आली. यानंतर गावंदे यांनी पुन्हा निंबाळकरकडून १९ लाख १० हजार रुपये घेतले. निंबाळकर यांनी गावंदे यांना जमिनीची रजिस्ट्री करून देण्याची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. निंबाळकर यांनी आसेगाव येथे ‌जाऊन जमिनीचे रेकॉर्ड तपासले असता ही जमीन त्रिंबक शंकरराव थोरात (रा. वाळूज) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार उघड झाल्यानंतर निंबाळकर यांनी गावंदे यांना पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र त्यांनी टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर निंबाळकर यांनी गावंदे यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हेशाखा गाठून गुन्हा दाखल केला.

जमीन मालक तिसराच
उद्योजक मनोज निंबाळकर यांनी गावंदे यांना जमिनीची रजिस्ट्री करून देण्याची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. निंबाळकर यांनी आसेगाव येथे ‌जाऊन जमिनीचे रेकॉर्ड तपासले असता ही जमीन त्रिंबक शंकरराव थोरात (रा. वाळूज) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा वर्षीय मुलीला पळवून नेऊन बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उपलखेडा (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील १५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याच्या प्रकरणात दोन आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, गुरुवारपर्यंत (२० एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची मुलगी ही १६ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान फिर्यादीच्या घराजवळ शौचासाठी गेली असता, संशयित आरोपी भावडू अशोक सोनवणे याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व शेतातील वीटभट्टीवर बलात्कार केला. याकामी त्याला संशयित आरोपी विनोद उत्तम सोनवणे व फारुख युसूफ पठाण यांनी मदत केली. तसेच संशयित आरोपी विनोद त्र्यंबक सोनवणे याने जेवणाचा डबा पुरवला. या प्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर सोयगाव पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ३६३, ३६६ (अ), ३७६, ३४ तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ६, ८, १०, १२ अन्वये मंगळवारी (१८ एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद त्र्यंबक सोनवणे (वय २०) व विनोद उत्तम सोनवणे (वय २०, दोघे रा. उपलखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) यांना बुधवारी अटक करण्यात आली. दोघांना कोर्टात हजर करण्यात आले असता, इतर आरोपींना अटक करणे बाकी आहे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे आहे, तसेच आरोपीने पीडित मुलीला कुठे कुठे नेले, याचा तपास करावयाचा असल्यामुळे दोघा आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने दोघा आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून शिवसेनेवर कुरघोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्य निवडीत काँग्रेसने अनुभवाच्या बळावर शिवसेनेवर कुरघोडी केली. स्थायी व अन्य विषय समित्यांमध्ये महत्वाच्या पदांवर आपले सदस्य बसविण्यात काँग्रेसने यश मिळविले. दुसरीकडे भाजपने सिल्लोड तालुक्याला स्थायी समितीमध्ये स्थान न देता डावलले आहे.
जिल्हा परिषद विषय समिती सदस्यांची निवड मंगळवारी झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतीपदांच्य निवडीनंतर विषय समिती सदस्यांची निवड केली जाते. आजवर या प्रक्रियेसाठी कधीच निवडणूक झाली नाही. सर्वपक्षीय सदस्यांमध्ये एकमत होऊन प्रक्रिया बिनविरोध पार पाडली जाते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने जिल्हा परिषदेत काँग्रेसची साथ स्वीकारली. किमान पुढचे अडीच वर्षे तरी ही नवीन युती सत्तेवर असणार आहे. विषय समित्यांमध्ये सर्वात महत्वाची स्थायी समिती असते. संख्याबळानुसार भाजपला सर्वाधिक ३ जागा अपेक्षित होत्या. त्याखालोखाल शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी २ जागा आणि उर्वरित १ जागा मित्रपक्षांसाठी मिळणार होती. सामोपचाराच्या चर्चेत भाजपने ४ जागांवर दावा केला. शिवसेनेलाही ३ जागा हव्या होत्या. काँग्रेसच्या मंडळींनी मात्र सावध पावित्रा घेतला. संख्याबळात आपण कमी असल्याने अधिकच्या जागेवर दावा करू शकत नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सेनेच्या नेत्यांना सांगितले. त्यामुळे भाजपला ३ जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले. स्थायी समिती खालोखाल बांधकाम व जलसंधारण समित्यांचा नंबर लागतो. राज्यात भाजप - शिवसेना युतीची सत्ता आहे. पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यामुळे भविष्यात जलसंधारण समितीला मोठा निधी मिळू शकतो. बांधकाम समितीच्या बाबतही असे होऊ शकते. हे हेरून काँग्रेसने दोन्ही समित्यांवर आपल्या सदस्यांची वर्णी लावून घेतली. निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडेपर्यंत कुणालाच कळाले नाही. समिती सदस्य निवडीच्या पहिल्या प्रक्रियेत तरी काँग्रेसने शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. स्थायी समितीमध्ये सत्ताधारी काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी २ तर भाजप व मित्रपक्षाचे ४ सदस्य आले आहेत. सदस्यांची बरोबरी झाल्याने सत्ताधाऱ्यांना कुठलेही निर्णय घेताना विरोधकांना आधी विचारात घ्यावे लागणार आहे. विषय समिती सदस्यांच्या निवडीवरून झालेल्या राजकारणाचे दूरगामी परिणाम भविष्यात जिल्हा परिषदेत पाहावयास मिळणार आहेत.

सिल्लोडला डावलले
जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सिल्लोड तालुक्यातून भाजपने चांगले यश मिळविले. साहजिकच महत्त्वाच्या विषय समित्यांवर सिल्लोडमधील सदस्यांमधून एखाद्याला संधी मिळणे अपेक्षित होते. पण भाजपने वैजापूर आणि फुलंब्री तालुक्याला संधी देऊन सिल्लोडला एकप्रकारे डावलले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळवून नेऊन बलात्कार; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंधानेर (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मंगळवारी (१८ एप्रिल) अटक करण्यात आली. त्याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची मुलगी ही १६ एप्रिल रोजी सकाळी पावणे सात वाजता ‘कन्नड येथे क्लासला जाते’ असे सांगून गेली; पण परत न आल्याने तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र सापडली नाही म्हणून फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस तपासात मुलगी रांजणगाव (वाळूज एमआयडीसी) येथे आढळून आली. दरम्यान, कन्नड बसस्थानकावरून संशयित आरोपी सलमान शेरखान पठाण (२१, रा. जयभवानीनगर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याने लग्नाचे आमिष दाखवून रांजणगावातील एका इमारतीमध्ये आणले व तिथे दोनदा बलात्कार केल्याचा जबाब संबंधित मुलीने महिला दक्षता समितीच्या सदस्या तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांसमोर दिला. त्यावरून सलमानविरुद्ध कलम ३६३, ३६६ (अ), ३७६, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल होऊन मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, पीडितेला कोणकोणत्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला, इतर कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करणे बाकी असून, आरोपी व पीडितेची वैद्यकीय तपासणी करावयाची असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रस्ता रुंदीकरण खोळंबले

$
0
0

रस्ता रुंदीकरण खोळंबले
एमआयएम नगरसेवक काळ्या फिती लावणार
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
राजाबाजार ते बायजीपुरा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खोळंबल्याचा आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी केला आहे. हे सर्व नगरसेवक काळ्या फिती लावून गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत सहभागी होणार आहेत.
शहर विकास आराखड्यातील राजाबाजार ते बायजीपुरा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. रुंदीकरणासाठी काही मालमत्ता पाडण्यात आल्या. रस्त्यातील विद्युत खांब, डीपी, जलवाहिनी, ड्रेनेज लाइन स्थलांतरीत करण्याचे काम बाकी आहे. ही कामे करण्यास कंत्राटदार तयार असून पालिकेचे अधिकारी मात्र काम करून घेण्यास चालढकलपणा करीत आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी पाच महिन्यांपासून या भागात पाडापाडी सुरू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. रस्त्यावर मातीचा खच पडल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दम्यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. रुंदीकरणाचे काम संपवून रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आपण स्वतः अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभेत काळी फित लावून येणार असून एमआयएमचे अन्य नगरसेवकही त्याला समर्थन देतील, असे नगरसेवक फेरोज खान यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जड वाहनांचा शहराबाहेरील रस्‍त्यांवर ठिय्या

$
0
0

जड वाहनांचा शहराबाहेरील रस्‍त्यांवर ठिय्या

ग्रामीण भागातून जाण्यासाठी रस्ता नसल्याने पैठण रस्‍त्यावर वाहनांच्या लागल्या रांगा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

पोलिस आयुक्तांच्या तुघलकी फर्मानामुळे दुसऱ्या दिवशीही जड वाहनांची कोंडी काय होती. शहर पोलिसांनी सुचविलेल्या मार्गावर जड वाहने जाऊ शकत नाहीत. त्यामुळे केंब्रीज हायस्कूलजवळ, पैठण मार्ग व वाळूज लिंक रोडवर जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनाही भर उन्हात घाम गाळावा लागला.

बीड बायपासवर होणारे अपघात रोखण्यासाठी केलेल्या सर्व उपाययोजना फेल गेल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जड वाहनांना या रस्त्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. शहराबाहेरून येणाऱ्या मार्गावर जड वाहने खोळंबली. बीडकडून येणारी जड वाहने नगर किंवा धुळेकडे जाण्यासाठी व नगर, धुळेकडून येणारी वाहने बीडकडे जाण्यासाठी पाचोड-पैठण रिंग रोडचा वापर करतील, तसेच जालनाकडून येणारी ही वाहने धुळे किंवा नाशिककडे जाण्यासाठी व धुळे, नाशिककडून येणारी वाहने पाचोड-पैठण रिंग रोड किंवा केंब्रीज-सावंगी - फुलंब्री - खुलताबाद - कसाबखेडा या मार्गाचा वापर करतील, असे पोलिस आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे. मात्र केंब्रीज-सावंगी - फुलंब्री - खुलताबाद - कसाबखेडा मार्ग सध्या अत्यंत खराब आहे. हा रस्ता पूर्णपणे तयारही केलेला नाही. त्यामुळे या मार्गावरून जड वाहने धोकादायक असून इंधनाचा खर्चही वाढणार आहे.

पाचोड रस्ता अरुंद असल्याने त्या मार्गावरूनही जड वाहने जाणे अतिशय अवघड आहे. ग्रामीण भागातून प्रवास करताना जड वाहनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ट्रकचालकांनी दुसऱ्या दिवशीही या मार्गावरून जाण्याऐवजी दिवसभर आपली वाहने शहराबाहेरील रस्त्यावरच उभी केली.

पैठण रोडवर तसेच चिकलठाणा रोडवर वाहने रस्त्यावरच उभी करण्यात आल्याने या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या अन्य वाहन चालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला.

ग्रामीण भागातील रस्त्यावर कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी ग्रामीण पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पाचोड रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक सध्या बंद असल्याची माहिती मिळाली आहे.

नवीन चंद्र रेड्डी
पोलिस अधिक्षक, ग्रामीण औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसींचा रविवारी भोकरदन येथे मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यघटनेत आतापर्यंत १४० वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. शेवटी राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारात बदल करून ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी ओबीसी जनक्रांती परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासह इतर मागण्यांसाठी भोकरदन (जि. भोकरदन) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर रविवारी (२३ एप्रिल) मराठवाडा-विदर्भ विभागीय ओबीसी बहुजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओबीसी जनक्रांती परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात सुमारे एक लाख ओबीसी बहुजन समाजातील १८ पगड जाती व १२ बलुतेदारांची उपस्थिती राहणार आहे. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी या मेळाव्यात निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी बोलताना महाजन यांनी सांगितले की, मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी जनक्रांती परिषदेचा ‌विरोध नाही. मात्र, ओबीसी कोट्यातून हे आरक्षण देण्यास आमचा विरोध राहणार आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. म्हसे पाटील यांची नियुक्ती तत्काळ रद्द करावी, या मागणीचा ठराव मेळाव्यात घेण्यात येणार असल्याची माहिती अनिल महाजन यांनी दिली. यावेळी विनायक यादव, आर. बी. माळी, सत्यनारायण गाजंगी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक, व्यापाऱ्यांचा जीएसटीमुळे फायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फायदा ग्राहक व व्यापाऱ्यांना होणार आहे. या करामुळे सुलभीकरण होवून १ जुलैपासून देशात अंमलबजावमी करण्यात येणार आहे. याची व्यापारी व व्यावसायिकांनी भीती न बाळगता ही नवीन प्रणाली आत्मसात करावी, असे आवाहन सहायक विक्रीकर आयुक्त एकनाथ पावडे यांनी केले.
नगर पालिका सभागृहात बुधवारी पार पडलेल्या जीएसटी कायदा कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबादचे विक्रीकर उपायुक्त जे. एस. मेश्राम होते. नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, कन्नड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हुकुमचंद पांडे, उपाध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल गणीशेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत विक्रीकर विभागकडून स्लाइड शोद्वारे व्यापाऱ्यांचे शंकानिसरन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑनलाइन प्रणालीमुळे सर्व नोंदी ऑनलाइन, पेपरलेस व कमी वेळ लागणाऱ्या आहेत. व्यवसायानुसार वर्गीकरण असल्याने एकच टिन क्रमांक मिळणार आहे. नोंदणी, कर परतावा, आंतरराज्य व अंतरराष्ट्रीय व्यवहाराची व्याप्ती, परतावे भरणे आदींची सखोल माहिती देण्यात आली. यावेळी विक्रीकर अधिकारी सुनील ठोंबरे, विक्रीकर निरीक्षक अनंत जोशी, प्रदीप पहाडे, प्रकाश अग्रवाल, अब्बास कोठारी, अनिल सेठी, भरत सोनवणे यांच्यासह व्यापाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात कोरडवाहू फळबागांवर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील सततच्या कमी पर्जन्यमानामुळे फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील काळात कोरडवाहू फळबागांवर भर दिला जावा, यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या येथील हिमायत बाग फळ संशोधन केंद्राकडून विशेष प्रयत्न होत आहेत. केंद्रात हजारो रोपांची निर्मिती करण्यात आली असून ती जून महिन्यात शेतकऱ्यांना दिली जातील.
मराठवाड्यात मोसंबी, डाळिंब, पेरू, आंबा या फळबागांचे अधिक क्षेत्र आहे. अपवाद वगळता गेल्या काही वर्षापासून कमी पाऊस झाला. त्यामुळे या फळबागांना पाणी देण्यात अडचणी निर्माण झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेत फळबागा जगविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. पण, अनेकांना त्यात यश आले नाही. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवर फळबागा जळाल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. मराठवाड्यातील हवामान आणि पाणी टंचाई लक्षात घेऊन कृषी विभागाने कोरडवाहू फळबागांवर भर दिला आहे. या फळबागांना पावसाचे पाणी पुरेसे असते. इतर खर्च जास्त नसल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी या फळबागा आधार ठरणार आहेत. दरवर्षी निश्चित उत्पन्न असल्यामुळे कृषीतज्ज्ञांनी कोरडवाहू फळबागांची शिफारस केली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. हिमायतबाग फळ संशोधन केंद्रातील रोपवाटिकेत केंद्र प्रभारी डॉ. एम.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोप निर्मितीचे काम सुरू आहे. चिंच, आंबा, सीताफळ, कवठ, रामफळ या फळांची रोप निर्मिती करण्यात आली आहे. पाऊस पडल्यानंतर जून, जुलै महिन्यांत शेतकऱ्यांना लागवडीसाठी रोप उपलब्ध करुन देण्यात येतील. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कोरडवाहू फळबाग लागवडीवर भर द्यावा, यासाठी त्यांना माफक दरात रोपे दिली जाणार आहेत.

तयार रोपे
चिंच १० हजार
आंबा १० हजार
सीताफळ १० हजार
कवठ ३ हजार
रामफळ ३ हजार रोप

मराठवाड्यातील हवामान आणि पर्जन्यमान लक्षात घेऊन कोरडवाहू फळबागांवर भर देणे योग्यच ठरले. चिंच, आंबा, सीताफळ, कवठ आदी फळांची रोप निर्मिती करण्यात आली आहे.
- डॉ. संजय पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हिमायतबाग फळ संशोधन केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वा‌‌र्षिक धान्य खरेदीची बाजारात धूम

$
0
0

वा‌‌र्षिक धान्य खरेदीची बाजारात धूम; डाळींचे दर उतरल्याने दिलासा; गव्हाचे १० प्रकार बाजारात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच वेध लागतात ते वार्षिक धान्य खरेदीचे. यंदा वार्षिकधान्य खरेदीला जात असलेल्यांना दिलासादायक बातमी आहे. गव्हाचे दर आणि डाळींचे दर उतरल्याने वरण-पोळी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. आवकही बंपर झाली आहे. गव्हाचे दहा प्रकार असून सरासरी २ हजार २ हजार ५०० पर्यंत क्विंटलचा भाव आहे. तूर ६०ते ६५, मूग ७० ते ७५, मसूर ६० ते ६२ रुपये ‌किलो या दराने विकली जात अाहे.

ज‌ुन्या मोंढ्यातील व्यापारी प्रकाश कांकरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार रोज सरासरी मोंढ्यातून ३० ते ४० टन माल विकला जात आहे. यंदा गव्हाची आवक बंपर झाली असून गु‌जराथ, राजस्थान, मध्यप्रदेश येथूनही गहू आला आहे. आता वार्षिक खरेदी सुरू झाली असून महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीस मोंढ्यात अधिक गर्दी होईल, असे संकेत आहेत. गेल्या १५‌ दिवसांत ८०० टनहून अधिक गहू विकले गेले आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा गहू किलोमागे ५ ते १० रुपये स्वस्त तर ज्वारी-बाजारी किलोमागे १० ते १५ रुपये महाग झाल्याचे व्यापारी सांगतात. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडीत रोज सुमारे १५ ते २० ट्रक माल रोज आहे. एका ट्रकमध्ये ३० ते ४० टन माल गहू बसत असून यावरून रोजच्या विक्रीचा अंदाज येऊ शकतो. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून ज्वारी आणि बाजारीचे चांगली आवक होत आहे. औरंगाबाद शहरी भाग असल्याने व नोकरदार वर्ग अधिक असल्याने वार्षिक धान्य खरेदीत चैतन्य असल्याचे व्यापारी हरिष पवार यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी तांदूळ महोत्सवही काही ठिकाणी सुरू झाले आहेत.

मध्यप्रदेश-गुजराथच्या गव्हाला पसंती अधिक

गहू मध्यप्रदेश, गुजराथ आणि राजस्थानहून अधिक येत आहे. गव्हाचे दहा प्रकार असून सरासरी २ हजार २ हजार ५०० पर्यंत क्विंटलचा भाव आहे. राजस्थानी गोलदाणी गहू प्रकार साधारण २५०० ते २८०० रुपये क्विंटल यानुसार विकला जात आहे. गुजराथ आणि मध्यप्रदेशचा गहू अधिक खपत असून औरंगाबादकर या गव्हाला अधिक पसंती देत आहेत. सिहोर, चंदोसी आणि शरबती अशा तीन गहू प्रकाराला अधिक उचल असल्याचेही व्यापारी सांगतात. सिहोर, चंदोसी, शरबती अशा विविध प्रकारांचे दर क्वालिटीनुसार व क्विंटलनुसार वेगवेगळे आहेत. शहरातील ठराविक मॉलमध्ये अजूनही मोंढ्यापेक्षा ५ ते १० रुपयांनी गहू महाग आहे. मोंढ्यात २० ते २२ रुपये किलोनुसार मिळणारा गहू मॉलमध्ये सुमारे २५ रुपयांपर्यंत मिळत आहे. यामुळे मॉलमध्ये धान्यखरेदी कमी होत असल्याचेही व्यापारी सांगत आहेत.

एप्र‌िल महिन्यात वार्षिक धान्य खरेदीचा उत्तम काळ असतो. यंदा मागील वर्षापेक्षा दर उतरले असून आवकही मोठी आहे. गव्हाचे दहा प्रकार उपलब्ध झाले असून नागरिकांनी याच काळात काळात वार्षिक धान्य खरेदी करायला हवी.

प्रकाश कांकरिया, व्यापारी, जुना मोंढा

जाधववाडीतील आवक वाढली
जाधववाडी नवा मोंढ्यात रोज २०० क्विंटल हून अधिक धान्याची आवक होत आहे. १९ एप्र‌िलला जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या धान्यांचे प्रकार, दर आणि आवक पाहता हे लक्षात येईल की आवक रोज वाढत चालली आहे. गहू १२३ क्विंटल (१७०० ते १८००); ज्वारी १९६ क्विंटल (१७७१ ते १८००) मका १४८ क्विंटल (१२८८ ते १३००) हरभरा २२ क्विंटल (५६००ते ६०००); तूर ७६ क्विंटल (३९०० ते ४०००), सोयाबीन - ९ क्विंटल (२७०० ते २८००) अशा पद्धतीत आवक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images