Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लोहमार्ग पोलिसांची एकाच वाहनावर भिस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद, नांदेड, परळी येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यातील आरोपींना औरंगाबाद येथील कोर्टात हजर करण्यासाठी फक्त एकच वाहन आहे. त्यामुळे अनेकवेळा खासगी वाहन, रिक्षातून आरोपींची वाहतूक करावी लागते. शिवाय एकच वाहन असल्याने तपासावरही परिणाम होत आहे.
मॉडेल रेल्वेस्टेशन असलेल्या औरंगाबादच्या रेल्वे स्थानकाबाबत प्रवाशांची ओरड आहेच. त्यासोबतच आत लोहमार्ग पोलिसांच्या अपुऱ्या सुविधांकडेही लक्ष वेधले जात आहे. औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांकडे रोटेगावपासून सेलूपर्यंत लोहमार्ग सुरक्षेची जबाबदारी आहे. या मार्गावर प्रवाशांची लूटमार होण्याच्या घटना होत आहेत. परिणामी, अपघात स्‍थळी पोहचण्यासाठी पोलिसांना अनेक वेळा वाहन उपलब्ध नसल्याने पायपीट करावी लागते. रेल्वे रुळावर अपघात झाल्यानंतर रुग्णाला उपचारासाठी नेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडे सुविधा नाहीत. शासकीय अ‍ॅम्बुलन्स किंवा खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. शासकीय अॅम्बुलन्स येण्या उशिर झाल्यास प्राण वाचवण्यासाठी खासगी वाहनांवर पदरमोड खर्च करावी लागते. हा भुर्दंड लोहमार्ग पोलिस किंवा प्रवाशांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. लोहमार्ग पोलिसांकडे सध्या एकच वाहन असून त्याचा वापर सहायक पोलिस निरीक्षक करतात. तपासकामासाठी हे वाहन दौऱ्यावर असते. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांची मोठी अडचण होत आहे.

आरोपी पळण्याची भिती
वाहनाची कमरता असल्याने लोहमार्ग पोलिसांना अनेकदा आरोपीला खासगी वाहनातून कोर्टात हजर करावे लागते. यावेळी आरोपी पळून जाण्याची भिती असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. सुधीर गव्हाणे यांचा सेवागौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पत्रकारिता, शिक्षण व समाजकार्य क्षेत्रात गेली चार दशके कार्यरत असणारे डॉ. सुधीर गव्हाणे यांचा सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तापडिया नाट्य मंदिरात सोमवारी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा होईल, अशी माहिती सेवागौरव समितीचे निमंत्रक प्रा. सुरेश पुरी यांनी दिली. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे येत्या ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यानिमित्त सेवागौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पत्रकारिता, माध्यम, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात डॉ. गव्हाणे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तापडिया नाट्यमंदिरात हा कार्यक्रम होईल. यावेळी कुलगुरु डॉ. मानसिंह परमार (कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता व जनसंवाद विद्यापीठ, रायपूर), विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सेवागौरव समितीच्या वतीने डॉ. सुधीर गव्हाणे व डॉ. शुभांगी गव्हाणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे सदस्य प्रा. अशोक नाईकवाडे, माहिती संचालक यशवंत भंडारे, आनंद काळे, संजय शिंदे, डॉ. संध्या मोहिते, सतीश सुराणा आदी उपस्थित होते.

गौरवग्रंथाचे प्रकाशन
या सेवागौरव सोहळ्यात डॉ. गव्हाणे यांच्यावरील गौरवग्रंथ व ‘माध्यमाचे अर्थकारण’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गौरव समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकिट विक्रीला अल्प प्रतिसाद

$
0
0

तिकिट विक्रीला अल्प प्रतिसाद
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन आरक्षण केंद्राची अवस्था
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
मुकुंदवाडी रेल्‍वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे तिकिट आरक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या स्टेशनवरून दररोज फक्त २० ते २५ तिकिटांची बुकिंग केली जात आहे. आरक्षण तिकिट विक्री केंद्राला प्रतिसाद कमी मिळत असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचा दर्जा वाढविण्यात आला आहे. हे रेल्वे स्टेशन आता ड वर्गात आले आहे. ड वर्गाच्या रेल्वे स्टेशनमध्ये आरक्षण तिकिट विक्री केंद्राची सुविधा असावी, अशी मागणी शहरातील रेल्वे संघटनांकडून तसेच उद्योजकांकडून करण्यात आली होती.
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर येथे पॅसेंजर थांबतात. शेकडो प्रवासी येथून प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे आरक्षण ‌तिकिट विक्री केंद्र देण्याची मागणी पूर्ण केली. मात्र, येथे दररोज फक्त २० ते २५ तिकिटांची विक्री होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडोबा मंदिराचे काम खोळंबले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
साताऱ्यातील पुरातन अशा हेमाडपंती मंदिराची दुरावस्था झाली असून, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये मंदिराच्या दुरुस्तीसाठी, सभामंडप व दीपमाळेच्या कामासाठी १ कोटी १३ लाख रुपये मंजूर झाले. पण, दीड वर्ष उलटल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही. त्याबद्दल आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी पत्र देऊन पुरातत्व खात्याकडे विचारणा केली आहे.
३०० वर्षे जुन्या असलेल्या साताऱ्यातील खंडोबा मंदिराच्या कामासाठी पुरातत्व खात्याला कंत्राटदार मिळत नसून, निधी मंजूर झाल्यापासून तीन वेळेस निविदा काढण्याचेच काम करण्यात आले आहे. उन्हाळा संपायला अवघा एक महिना शिल्लक असून पावसाळ्यात काम करता येत नाही. पावसाळा संपत नाही तोच यात्रा जवळ येते. त्यामुळे यावर्षीही मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यासंदर्भात पुरातत्व खात्याकडून कोणतीच पावले उचलली जाण्याची शक्यता दिसत नाही. दोन वर्षापूर्वी झालेल्या पावसामुळे दीपमाळेचे दिवे पडले होते. त्यानंतर तेही काम पुरातत्व खात्याने नियमबाह्यपणे सिमेंट चोपडून केले. त्यांच्या दुर्लक्षामुळे गावकरी, विश्वस्तांमध्ये संतप्त भावना आहे.

‘काम सुरू करा’
आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात पुरातत्व खात्याला पत्र लिहून निधी मंजूर असताना आतापर्यंत काम का झाले नाही त्याची संपूर्ण माहिती मागितली आहे. तसेच लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणीही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी सोडण्यास ‘नांमका’चा नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
उन्हाचा तडाखा वाढल्याने वैजापूर व गंगापूर तालुक्यातील नांदूरमधमेश्वर कालवा क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, नांदूरमधमेश्वर पाटबंधारे विभागाने पाण्याची मागणी नसल्याने जलदगती कालव्यातून पाणी सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात पाटबंधारे विभागाबाबत नाराजी पसरली आहे.
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी खरीपाचे एक, रब्बीचे दोन व एक उन्हाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन कालवा सललागार समितीच्या बैठकीत करण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यत दोन आवर्तनातून तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले असून अजून दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. हे पाणी उन्हाळी आवर्तनातून सोडण्यात येईल, अशी लाभधारक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण मार्च महिना संपला तरी पाटबंधारे विभागाने उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत कुठलीही हालचाल न केल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. पाटबंधारे विभागाने नाशिक विभागाकडे १३२० दलघफू पाण्याची मागणी केली असली तरी त्यांना औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे आम्हाला आदेश नाहीत, असे म्हणून ‘नांमका’ने हात झटकले आहेत. त्यामुळे ग्रामस्थाच्या संतापात आणखी भर पडली. ‘नांमका’ विभागाने पाण्याच्या मागणीसंदर्भात मार्गदर्शन न केल्याने आतापर्यत मागणीचे ठराव दाखल होऊ शकले नाहीत, असा आरोप होत आहे.
दरम्यान, वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ६९ गावांनी पाण्याच्या मागणीसाठी ठराव घेण्यास सुरुवात केली असून हे ठराव लवकरच पंचायत समितीकडे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे निदान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तरी कालव्यातून पाणी सुटेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. तालुक्याचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याना पत्र पाठवले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने या दोन्ही तालुक्यात ११६ पाण्याचे टँकर सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील चार धरणात पिण्याचे आरक्षण वगळून यावर्षी साडेचार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यापैकी आतापर्यत तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले असून दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. हे पाणी त्वरित कालव्यातून सोडण्यात यावे, अशी मागणी आमदारांनी केली आहे.

ठराव घेणे सुरू
पाण्याची मागणी करण्यासाठी गावागावात ग्रामपंचायतीने ठराव घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या आठ दिवसात जलदगती कालव्यातुन पाणी न सोडल्यास ग्रामस्थ आक्रमक होण्याच्या मार्गावर असून कालव्याचे पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमदारांची मागणी
जलदगती कालव्यातुन पाणी सुटावे म्हणुन आमदार भाऊसाहेब पाटील यांनी हस्तक्षेप केला असून जलदगती कालव्यातून सव्वा टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने या दोन्ही तालुक्यात ११६ पाण्याचे टँकर सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६० हजारांचा ऐवज घरफोडीत लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
लग्न समारंभाला गेलेल्या विरमगाव येथील शेतवस्तीवर राहणारे सोमीनाथ पुंजाराम अधाने यांच्या घर फोडून चोरांनी ६० हजारांचा ऐवज लांबवला. ही चोरी बुधवारी रात्री झाली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमीनाथ पुंजाराम अधाने हे विरमगाव शिवारातील गट नंबर २२३ मध्ये वस्तीवर राहतात. शेताचे शेजारी अशोक त्रिंबक अधाने यांच्या भाचीच्या लग्नासाठी बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता गेले. जाताना घराच्या लोखंडी चॅनल गेट व दाराला कुलूप लावून घरातील लाइट लावले होते. लग्नासाठी आलेले पाहुणे अजिनाथ नागे त्यांची मोटारसायकल घेऊन जाण्यासाठी रात्री साडेआठ वाजता आले असता त्यांना वस्तीवरील सर्व लाइट बंद दिसले. घरातील मधल्या खोलीचे लाइट चालू आणि कपाट उघडे दिसल्याने त्यांनी फोन करून सोमीनाथ यांना बोलावले. मोबाइलच्या उजेडात पाहिले असता चॅनल गेटचे कुलूप तोडलेले, सर्व दरवाजे उघडे, कपाटाचे दरवाजे तोडलेले व वाकलेले दिसले. कपाटातील कपडे अस्थाव्यस्त होते. सोमीनाथ अधाने यांचे भाऊ साहेबराव अधाने यांच्या घरात देखील अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सोमीनाथ अधाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. तज्ज्ञांनी कपाटावरील ठसे घेतले. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल गणेश काथार तपास करीत आहेत

देवघरातील रक्कम चोरी
चोरांनी कपाटात ठेवलेले रोख १० हजार रुपये, देवघराखाली ठेवलेले २५ हजार रुपये, २० हजार रुपये किंमतीची सोन्याची एकदानी, ४ हजार रुपयांची सोन्याची नथ, एक हजार रुपयांचे चांदीचे कडे व चांदीचा गोफ, असा ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठ्याच्या डोंगरात रानमेवा लगडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोयगाव परिसरातील अजिंठा डोंगररांगातील झाडे रानमेव्याने बहरली आहे. सध्याच्या उष्ण वातारणाता सोयगाव परिसरातील डोंगररांगा अनेक रंगाने उजळून निघाल्या आहेत. येथे निसर्गाने विविध रंगांची उधळण केल्याचे दिसत आहे.
अजिंठा डोंगररांगांतील विविध पर्णवनस्पती चैत्र महिन्यातच विविध फुलांनी व सुक्या मेव्यांनी बहरून येतात. चैत्रामध्ये बहरलेल्या वनस्पती पाहण्यासाठी व रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी निसर्गप्रेमींची मोठी गर्दी होत आहे. सोयगावच्या अजिंठा डोंगररांगांसह जंगलातील डेरेदार वृक्षांना नवीन पालवी फुटत असतानाच रानमेवा मोठ्या प्रमाणावर बहरला आहे. डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या सोयगावच्या जंगलात डेरेदार वृक्षांना नवीन पालवी फुटत आहे. त्यासोबतच जंगलातील रानमेवा मोठ्या प्रमाणावर बहरल्याने सोयगावला निसर्गाच्या रंगीबेरंगी छटा दिसून येत असल्याने निसर्ग रखरखत्या उन्हातही विविध रंगांची मुक्त उधळण करत आहे. त्यामुळे तीव्र उन्हात हे निसर्गाचे विभोभनीय रूप आगळाच आनंद देत आहे. या वातावरणात वन्यप्राण्यांचा संचार मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. जंगलातील विविधतेने नटलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या मोहक वातावरणात मोर, हरीण आदींचे कळप सायंकाळी मुक्तसंचार करताना दिसत आहेत. जंगलातील रानमेवा मोठ्या प्रमाणावर लगडल्याने वन्यप्राणी, माकडांच्या टोळ्या आदींच्या दाणापाण्याची सोय झाली आहे. निसर्गप्रेमीही सुकामेवा खाण्यासाठी पुढे येतांना दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूपीआय’घोटाळा; तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तब्बल ६ कोटी ७ लाख रुपयांच्या यूपीआय अ‍ॅप घोटाळ्यातील तीन प्रमुख संशयित आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता सोमवारपर्यंत (२४ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. जी. एम. शेख यांनी दिले. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत १२ संशयित आरोपी जेरबंद झाले असले तरी अनेक जण पसार आहेत.
याप्रकरणी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या विभागीय कार्यालयाचे सहव्यवस्थापक रवींद्र सोनजे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, बँकेतील सुमारे ८४ खातेधारकांनी यूपीआय अ‍ॅपचा वापर करून १६ शाखांमध्ये बँकेची ६ कोटी ७ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी राजेश निर्मल बिसवास, किशोर कृष्णराव देशमुख, गोपाल गोविंद वानखेडे, ज्ञानेश घनश्याम भावसार, विजय गोवर्धन जाधव, किरण अण्णासाहेब गावडे, आनंद मदनलाल लाहोटी यांना यापूर्वीच अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. संशयित आरोपी विजय बबनराव गायकवाड व बबनराव नामदेव गायकवाड यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (२१ एप्रिल) वाढ करण्यात आली. अटकेतील आरोपींकडून आतापर्यत सुमारे ३७ लाख ९५ हजार ६३० रुपयांचा ऐवज तसेच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी संदीप अशोक मुळे (वय ३०, रा. गोवर्धन, ता. रिसोड, जि. वाशिम), दीपक सर्जेराव खराट (वय २६, रा. सिंदखेडराजा रोड, जि. बुलडाणा) व जितेंद्र मारुती रिंढे (वय ४२, रा. सेलसूर, ता. चिखली, जि. बुलडाणा) यांना गुरुवारी अटक करण्यात येऊन कोर्टात हजर करण्यात आले. त्यांचा मुख्य साथीदार विनोद पाटील याला अटक करणे बाकी आहे, गुन्ह्यातील विविध सिम कार्ड व मोबाइल हँडसेट जप्त करणे बाकी आहे, संशयित आरोपींच्या खात्यातील व्यवहारांचा तपास करणे बाकी आहे, गुन्हा करणारी टोळी औरंगाबाद शहरात कार्यरत असून, त्याचा तपास करावयाचा आहे, तसेच तिघा संशयित आरोपींनी सुमारे सव्वा कोटींची फसवणूक केली असून, या रकमेची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली, याचा सखोल तपास करावयाचा असल्यामुळे तिघांना १० दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तिघांनी केली दीड कोटीची फसवणूक
या प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी संदीप मुळे याने बँकेच्या विविध खात्यातून १ लाख १० हजार रुपयांची रक्कम वळती करून बँकेची फसवणूक केली आहे. दीपक खराट याने औरंगाबाद विभागातील विविध खात्यांवरून ६ लाख ८८ हजार ५०० रुपये, तर राज्यातील वेगवेगळ्या खात्यांवरून ४१ लाख ३८ हजार ४०० रुपयांची रक्कम वळती करून फसवणूक केली आहे. त्याचवेळी जितेंद्र रिंढे याने औरंगाबाद विभागातून १६ लाखांची, तर राज्यातील विविध खात्यातून १ कोटी ६५ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम वळती करून फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन वर्षांच्या मुलाचा पित्याकडून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
पती-पत्नीत नेहमी होणाऱ्या भांडणात एका तीन वर्षांच्या बालकाला जीव गमवावा लागला. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात बापाने मुलाचे पाय धरून डोके रस्त्यावर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील नागद तांडा येथे ३ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी पत्नीने १५ दिवसांनंतर पतीविरुद्ध बुधवारी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मंगलबाई संतोष चव्हाण (वय ३२) व तिचा पती संतोष उत्तम चव्हाण (वय ३५) हे सध्या मूळ खादगाव (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असून सध्या नागद तांडा येथे राहतात. या पती-पत्नीत नेहमी भांडणे होत असत. असेच भांडण झाल्यानंतर त्याचा राग मनात धरून ३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता संतोष चव्हाण याने तीन वर्षांचा मुलगा सुंदर याचे पाय धरून रस्त्यावर नेले, राहत्या घरापासून ४० फूट अंतरावर रस्त्यावर त्याचे डोके आपटून ठार मारले, अशी फिर्याद आहे. पती व पत्नीच्या भांडणात तीन वर्षाच्या मुलाचा हकनाक बळी गेला.
पोलिसांनी याप्रकरणी पती संतोष चव्हाण याच्याविरुद्ध दंड संहिता ३०२, ३०४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या दांपत्यास हत्या झालेले बालक वगळून इतर दोन मुले व दोन मुली आहेत. मृत बालक सर्वांमध्ये लहान व गोंडस होते.

वडिलास अटक
पोलिसांनी मृत बालकाचा पिता संतोष चव्हाण यास अटक करून कोर्टासमोर उभे केले. कोर्टाने त्याला २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मारुती पंडित हे पुढील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेश घेता का प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अध्यापक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची गर्दी गेल्या काही वर्षांपासून ओसरत आहे. खाजगी कॉलेजांप्रमाणे शासकीय कॉलेजनेही आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आता धडपड सुरू केली आहे. सध्या बीएड, एमएड प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी सुरू आहे. आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालय विविध कॉलेजांत प्रचार करीत आहे.
काही वर्षांपूर्वी प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असलेल्या अध्यापक पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. सध्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेची प्रक्रिया सुरू आहे. एमएड अभ्यासक्रमाचीही प्रक्रिया सुरू होणार आहे. डीटीएड, बीएड आणि एमएड अभ्यासक्रमांना विद्यार्थी मिळणे कॉलेजांना अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक खाजगी कॉलेजांना टाळे लागले. शासकीय अध्यापक महाविद्यालयांची अवस्थाही चिंताजनक होते आहे. औरंगाबादच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात एमएड अभ्यासक्रमाला मागील वर्षी सर्व ५० जागा रिकाम्या होत्या. बीएड अभ्यासक्रमाच्या ५०पैकी केवळ २४ जागांवरच प्रवेश झाले. आता आपले अस्तित्व टिकविण्याची धडपड शासकीय कॉलेज करू लागले आहेत. बीएडनंतर एमएड अभ्यासक्रमाला प्रवेश विद्यार्थ्यांनी घ्यावा म्हणून औरंगाबादच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाने विविध खाजगी बीएड कॉलेजांमध्ये मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. या अभ्यासक्रमातील संधी काय आहेत, शासकीय कॉलेजांमधील सुविधा, शिक्षक, प्रयोगशाळा इतर सुविधांबाबत विद्यार्थ्यांना सांगितले जाते. त्यासाठी खास माहितीपटही तयार करण्यात आला आहे. इतर कॉलेजांसह आपले अस्तित्व ठिकविण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेत शासकीय कॉलेजही चर्चेचा विषय ठरते आहे.

अनास्था कायम
सध्या बीएड अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. २६ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत अाहे. सध्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांची अनास्था कायम असल्याचे चित्र आहे. मार्गदर्शनपर वर्ग, मेळावे घेऊन विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याची वेळ कॉलेजवर आली आहे.

अध्यापक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश कमी झाले. आमच्याकडेही मागील वर्षी निम्मेच प्रवेश झाले होते. अध्यापक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत आमच्याकडे उपलब्ध साधनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याची गरज वाटली. त्यामुळे आम्ही विविध कॉलेजांमध्ये जाऊन त्यांना या अभ्यासक्रमातील संधी, आमच्याकडील उपलब्ध साधनसामग्री, पायाभूत सुविधांबाबत माहिती देतो. शिक्षक, कर्मचारी त्यासाठी मेहनत घेत आहेत.
- डॉ. संजीवनी मुळे, प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इरासमस प्लस’ची विद्यापीठाला नवी संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘युरोपियन युनियन’च्या ‘इरासमस् प्लस’ योजनेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ‘इक्विसा एचईआय’ हा इकॉलॉजीकल रिल्होरेशन वॅफसिटी बिल्डिंग’ प्रकल्प मंजूर झाल्याची माहिती ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल’चे संचालक डॉ. यशवंत खिल्लारे यांनी दिली.
‘युरोपियन युनियन’ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आतापर्यंत सहा प्रकल्प मंजूर केले आहेत. यात इरासमस् मुंडस, इरासमस् प्लस, इरासमस (न्यू), मर्जिंग व्हाइस, युप्रेटस, इक्विसा या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर युरोपियन युनियनने वॅपॅसिटी बिल्ड‌िंग इन इकॉलॉजीकल रेस्टोटेशन’ हा महत्त्वाचा प्रकल्प तयार करण्यासाठी विद्यापीठाची निवड केली आहे. याअंतर्गत ४० हजार युरो प्राथमिक खर्च निधी मंजूर करण्यात आला आहे. श्रीलंका, फिलिपाइन्स, थायलंड, इंग्लंड, भारत देशात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात वॅपॅसिटी बिल्डिंग प्रोजेक्ट इन इकॉनॉमिकल रेस्टोरेशन’अंतर्गत प्रकल्प करून युरोपियन युनियनकडे पाठविण्यात येणार आहे. नवीन प्रकल्प हा ‘एज्युकेशनल क्वालिटी अॅश्यूरन्स इन साउथ इस्ट अशिया इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटस्’ याअंतर्गत उभय देशांमध्ये संशोधन कार्य राबविण्यात येणार आहे. या कामासाठी सात लाख युरो अर्थात जवळपास पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेतील पदव्युत्तर विद्यार्थी, पीएच.डी संशोधक, पोस्ट डॉक्टर रिसर्च फेलो व प्राध्यापकांना युरोपियन विद्यापीठात जाण्याची संधी मिळणार आहे.

सातत्यपूर्ण प्रयत्न
‘सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स’च्या संचालकपदाची सूत्रे डॉ. यशवंत खिल्लारे यांनी पाच वर्षांपूर्वी हाती घेतली. आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबतचे सहा महत्त्वाचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. विद्यापीठाला २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, ३००पेक्षा अधिक संशोधक, प्राध्यापकांनी लाभ घेतला आहे. युरोपियन युनियन व विद्यापीठाचे संयुक्त सहा संशोधन प्रकल्प राबविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारी तरुणाची कोठडीत रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठण तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून शिर्डी येथे पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (२४ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची बहीण ८ एप्रिल रोजी घरासमोर खेळत असताना ती शोधूनही सापडली नाही. पोलिसांनी तपास करून पीडितेसह संशयित आरोपी दादासाहेब महादेव फुलवारे याला ताब्यात घेतले. पीडितेच्या जबाबानुसार, दोघांची गेल्या वर्षी ओळख झाली व प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान, पीडितेच्या भावाने तिच्या लग्‍नासाठी स्थळ आणले होते व पीडितेला संशयित आरोपीशी लग्‍न करावयाचे असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर फुलवारे याने तिला शिर्डी येथे नेऊन गळ्यात मणीमंगळसूत्र टाकले. तसेच तेथील एका हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा जबाब पीडितेने दिला. पीडितेच्या जबाबावरून संशयित आरोपीविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात कलम ३७६, ३६३, ३६६ सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची दुचाकी जप्‍त करणे, वैद्यकीय तपासणी व इतर साथीदारांचा तपास करायचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्या जलतरण तलावावर झुंबड

$
0
0

मनपाच्या जलतरण तलावावर झुंबड
२० दिवसांत १३०० सभासद, सर्व बॅचेस फुल्ल
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक लाभ महापालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलावाला झाला आहे. अवघ्या वीस दिवसांत १३०० सभासद वाढले असून १३ लाख रूपयांचे उत्पन्नही झाले आहे.
गतवर्षी दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे महापालिकेचा जलतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दुरूस्तीसाठी तीन महिने जलतरण तलाव बंदच होता. १७ डिसेंबरला जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यात आला. आत्तापर्यंत जलतरण तलावावर नियमित जलतरण करणाऱ्या सभासदांची संख्या १८०० पर्यंत पोहचली आहे. एप्रिल महिन्यात तब्बल १३०० सभासद वाढल्याने सभासद संख्या बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सध्या सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी चार ते आठ अशा दोन सत्रात बॅचेस चालतात. या सर्व बॅचेस हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांबरोबरच लहान मुले, युवकही मोठ्या संख्येने जलतरणासाठी येत आहेत. जलतरण शिकण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलींसाठी धनंजय फडके व अनिकेत देशमुख हे दोन प्रशिक्षक आहेत. जीवरक्षक म्हणून विठ्ठल पाटील, सॅमसन साबळे, मोहन सोमवंशी हे काम पाहातात. तसेच एकूण १४ कर्मचाऱ्यांचा स्टाफ जलतरण तलावावर कार्यरत आहे. दरमहा ७५० रुपये प्रत्येकी एका सभासदाकडून शुल्क आकारले जात आहे. जलतरण तलावाची दुरुस्ती करण्यात आल्यामुळे आता पाणी गळतीचे प्रमाण थांबले आहे. तसेच शॉवर आणि फिल्टर प्लँटही व्यवस्थित सुरू असल्याने स्वच्छ पाण्यात जलतरण करण्याचा आनंद जलतरणप्रेमी घेत आहेत. सायंकाळी फॅमिली बॅचही चालवण्यात येते. यात राष्ट्रीय व राज्य पातळीवर चमकणारे जलतरणपटू नियमित सराव करीत आहेत.
दिवेच बंदच
जलतरण तलावावर दररोज सायंकाळी साडेआठपर्यंत बॅचेस चालतात. मात्र, सायंकाळच्या वेळेस तलाव परिसरातील विद्युत दिवे बंदच असतात. त्याचा त्रास सभासदांना होत आहे. सायंकाळच्यावेळेस फॅमिली बॅचेसमध्ये पालक व लहान मुले यांची संख्या अधिक आहे. जवळपास आठ ते दहा दिवे बंदच आहेत. तलावाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असताना विद्युत दिवे बंद आहेत. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची गरज असल्याचे मत काही सभासदांनी व्यक्त केले.
विद्यापीठाचा जलतरण तलाव बंदच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील जलतरण तलाव दुरूस्त होऊन अनेक महिने झाले असूनही अद्यापही बंदच आहे. जलतरण तलावासाठी पाणी मिळत नसल्याने हा तलाव बंद असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेने पाणी पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे. विद्यापीठ परिसरातील विहीरीतून पाणी आणण्यासाठी चाचपणी देखिल करण्यात आली. वसतीगृहांसाठीच पाणी लागत असल्याने सद्यस्थितीत तलावासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात विद्यापीठाचा जलतरण तलाव सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परशुराम जयंतीनिमित्त २८ रोजी मिरवणूक

$
0
0

परशुराम जयंतीनिमित्त २८ रोजी मिरवणूक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखिल भारती ब्राह्मण संघटनेकडून भगवान परशुराम जन्मोत्सव २८ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. वाहन फेरीने कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. याशिवाय क्रांती चौक येथून मिरवणूक निघणार आहे. गुलमंडी येथे समारोप होणार आहे.
यासाठी एबीबीएमचे अध्यक्ष अनिल मुळे, रंजना कुलकर्णी, मृणाल देशपांडे, वेदांत जहागीरदार, अमोल तिवारी, सतीश मंडपे, मिलिंद पिंपळे, नारायण पांडव, श्रीकांत गोसावी, संदीप कुलकर्णी, अमित पुजारी यांच्यासह अखिल ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. २८ एप्रिल रोजी जयंतीच्या दिवशी सकाळी सावरकर चौकातून फेरी काढण्यात येणार आहे. ती क्रांती चौक, एसबीआय चौकमार्गे सिडको टीव्ही सेंटरपर्यंत जाईल, तर दुपारी वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, माधवानंद महाराज, माई महाराज, अप्पा महाराज, मुळे गुरुजी आदींची उपस्थिती राहणार आहे. मिरवणुकीवेळी दोनशे मुलांचे ढोल-ताशा, झांजपथक सहभागी होणार असून पुढील आठ दिवस संजय कुलकर्णी यांचे कलापथक भगवान परशुराम यांच्या जीवन चरित्रावर अाधारित पथनाट्याचे सादरीकरण करणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेल्या डिजिटल स्टुडिओचे दशक!

$
0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com
Tweet : @tusharbMT
औरंगाबाद ः जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करण्याच्या उद्देशाने २००६मध्ये डिजिटल स्टुडिओची घोषणा करण्यात आली. तब्बल दहा वर्षे उलटूनही हा स्टुडिओ पूर्णत्वास गेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात स्टुडिओसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद आहे, मात्र देशातील पहिलाच डिजिटल स्टुडिओ असा गाजावाजा झालेल्या स्टुडिओची भग्नावस्था झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवनवीन प्रकल्पांची घोषणा नियमित होते, पण या प्रकल्पांपैकी मोजकेच प्रकल्प पूर्ण होतात. गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत असलेला डिजिटल स्टुडिओ प्रकल्प प्रशासनाच्या उदासिनतेने रखडला आहे. जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानात पारंगत करणे आणि माध्यमातील संधीसाठी अधिक कौशल्य शिकवणे या उद्देशाने डिजिटल स्टुडिओ उभारणीचा निर्णय घेण्यात आला. २००६मध्ये स्टुडिओला मंजुरी मिळाली होती. वृत्तपत्रविद्या विभागाच्या आवारातच स्टुडिओ उभारण्याचा प्रस्ताव होता, मात्र परिसरात मोठी झाडे असल्यामुळे ग्रंथालयाच्या मागील जागेवर स्टुडिओ उभारण्याचा निर्णय तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कोटी १५ लाख रुपये निधी खर्च करून २०११मध्ये इमारत उभारली. सद्यस्थितीत स्टुडिओ इमारतीचे काम रखडले आहे. बांधकामाची रक्कम ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम करून घेणे बंधनकारक असते, मात्र विद्यापीठ प्रशासनाने अधिक चांगले काम करण्याची तयारी दाखवल्यामुळे हा तिढा सुटला आहे. ‘२०१७-१८ यावर्षीच्या अर्थसंकल्पात स्टुडिओ इमारतीसाठी दीड कोटी रुपये निधी आहे. त्यामुळे विद्यापीठाचा स्थावर विभाग काम पूर्ण करील,’ असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. तब्बल दहा वर्षे उलटल्यानंतरही स्टुडिओचे काम झाले नाही. दहा वर्षांत स्टुडिओची प्रतीक्षा करीत दहा बॅच माध्यमात रुजू झाल्या. ‘देशातील पहिलाच डिजिटल स्टुडिओ’ असा मोठा गाजावाजा करूनही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतले गेले नाही. परिणामी, प्रगत तंत्रज्ञानापासून शेकडो विद्यार्थी वंचित राहिले आहेत. यावर्षी तरी स्टुडिओ पूर्ण होईल का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

डिजिटल लॅब बंद
वृत्तपत्रविद्या विभागात टीव्ही, रेडिओ, अॅनिमेशन, चित्रपट क्षेत्राशी संबंधित यंत्रणा आणि विद्यार्थ्यांना वृत्तपत्राचे तांत्रिक कौशल्य शिकवण्यासाठी डिजिटल लॅब सुरू करण्यात आली. लॅबमध्ये २५ अॅपल कम्प्युटर असून संकलन, अॅनिमेशन आणि ग्राफिक्सच्या प्रात्यक्षिकांसाठी नवीन सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आले, मात्र मागील तीन वर्षांपासून लॅब कुलूपबंद आहे. फक्त कुणी मान्यवर पाहुणे आल्यास लॅब दाखवण्यात येते. टीव्ही-रेडिओचे स्टुडिओ कधीच उघडण्यात आले नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठाचे एक उच्चपदस्थ अधिकारी फावल्या वेळेत लॅबमध्ये ‘कराओके’वर गाणी ऐकण्याचा आनंद घेतात. विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना लॅबचा जास्त उपयोग झाला, अशी चर्चा विभागात रंगली आहे.

२००६ यावर्षी डिजिटल स्टुडिओला मंजुरी मिळाली. इमारत उभारणीचे काम पूर्ण झाले आहे, मात्र अंतर्गत काम बाकी आहे. मोठे काम असल्यामुळे उशीर झाला.
- प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, विभागप्रमुख, वृत्तपत्रविद्या विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जगभरातील रसिकांपर्यंत ‘गीत भीमायण’

$
0
0

जगभरातील रसिकांपर्यंत ‘गीत भीमायण’

म्युझिक अल्बमची निर्मिती पूर्ण; पेंटटसाठी विद्यापीठाचा प्रस्ताव

Tushar.bodkhe@timesgroup.com

@tusharbMT

औरंगाबाद - लोककवी वामनदादा कर्डक यांची लोकगीते शास्त्रीय रागदारीत सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागाने लक्षवेधी कामगिरी केली आहे. या गाण्यांचे ‘पेटंट’ मिळवण्यासाठी विद्यापीठाने केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. म्युझिक अल्बमसाठी सोनी कंपनीशी करार करण्यात आला असून वामनदादांची गाणी जगभर पोहचवण्याचा बहुमान विद्यापीठाला मिळणार आहे.

दिवंगत लोककवी वामनदादा कर्डक यांच्या प्रबोधनगीतांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली. वंचितांचे दुःख मांडत कर्डक यांनी प्रसंगी समाजव्यवस्थेवर परखड टीका केली. आशयपूर्ण सोपी शब्दकळा आणि सादरीकरणाचा प्रभावी ढंग ही वामनदादांच्या गीतांची वैशिष्ट्ये आहेत. लोकसंगीताच्या बाजात वर्षानुवर्षे ही गाणी सादर होतात. मात्र, या गीतांना शास्त्रीय सुरावटीचे कोंदण देण्याचा यशस्वी प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगीत विभागाचे समन्वयक प्रा. संजय मोहड यांनी केला. मागील काही वर्षांपासून ते कर्डक यांची गाणी सादर करतात. सुश्राव्य शास्त्रीय रागदारीतील लोकगीते ऐकल्यानंतर रसिकांचाही प्रतिसाद वाढला. या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. या गीतांचे पेटंट मिळवण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. वामनदादांच्या शंभर गाण्यांचा म्युझिक अल्बम काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकूण दहा अल्बमची निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या अल्बमसाठी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, रवींद्र साठे, कविता कृष्णमुर्ती, सावनी शेंडे आणि शोभा जोशी यांनी गायन केले असे प्रा. संजय मोहड यांनी सांगितले. ‘भूप कल्याण’, ‘पहाडी’, ‘तिलक’ ‘कामोद’, ‘केदार’, ‘तिलक कामोद’, ‘यमन’, ‘भूप’ अशा वैविध्यपू्र्ण रागदारीत गाणी ऐकता येणार आहेत. या अल्बमच्या निर्मितीसाठी ‘सोनी’ कंपनीशी चर्चा झाली आहे. लोकगीतात शास्त्रीय रागदारीचा किती प्रभावी वापर होतो याची रसिकांना पहिल्यांदाच अनुभूती येईल असे प्रा. मोहड म्हणाले. विज्ञान क्षेत्रात विद्यापीठाने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. आता संगीत क्षेत्रात आश्वासक कामगिरी करण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत.

-----पेटंट की कॉपीराइट ?

आतापर्यंत विज्ञान शाखेतील प्रयोगांनाच पेटंट मिळाले आहे. सामाजिकशास्त्रात पहिल्यांदाच पेटंट मिळवण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. ‘गीत भीमायण’ संगीत उपक्रमाच्या पेटंटसाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे पाच प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. लोकगीते बौद्धिक संपदा म्हणून स्वीकारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रायोगिक तत्त्वावर पाच प्रस्ताव दिले असून पेटंट मिळाल्यास आणखी प्रस्ताव सादर करण्यात येतील. अन्यथा, केवळ ‘स्वामित्व हक्क’ विद्यापीठाकडे राहणार आहेत.

वामनदादा कर्डक यांच्या गीतांवरील ‘गीत भीमायण’ कार्यक्रम जगभर पोहचवण्याचा प्रयत्न आहे. म्युझिक अल्बम आणि पेटंटच्या माध्यमातून प्रबोधनगीतांना वेगळा आयाम प्राप्त होईल.

- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

सामाजिक समानतेचे तत्त्व सांगणारे ‘गीत भीमायण’ व्यापक स्तरावर पोहचणार आहे. म्युझिक अल्बमचे काम पूर्ण झाले आहे. पेंटट मिळवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शास्त्रीय रागात लोकगीते ऐकणे वेगळा प्रयत्न ठरणार आहे.

- प्रा. संजय मोहड, गायक-संगीतकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर हजार कोटींना मुकावे लागेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्टेट हायवे महापालिकच्या हद्दीत घेतल्यास एक हजार कोटी रुपयांना मुकावे लागेल, अशी भूमिका महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या लगतचे बीअरबार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातून जाणारे महामार्ग महापालिकेच्या हद्दीत घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. यासंदर्भात पत्रकारांनी आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले, ‘हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी भेटले होते. औरंगाबाद शहरातून पाच राज्य महामार्ग जातात. हे महामार्ग महापालिकेच्या ताब्यात घेतल्यास त्यांच्या मजबुतीकरणाचा मोठा खर्च महापालिकेला सुरुवातीलाच करावा लागणार आहे. शिवाय दरवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी १७ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.’
पाच राज्य महामार्गांपैकी जालना रोड व बीड बायपास हे दोन रस्ते आहेत. हे रस्ते आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेले आहेत. या दोन्ही रस्त्यांच्या कामांचे एक हजार कोटींचे टेंडर प्राधिकरणाचे तयार केले असून, ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. हे दोन्ही रस्ते महापालिकेत सामावून घेतले, तर एक हजार कोटींच्या कामाला आपल्या शहराला मुकावे लागेल आणि दरवर्षी १७ कोटींचा खर्च करावा लागेल. एक हजार कोटी रुपयांचे काम महत्त्वाचे की काही लाख रुपयांची कमाई महत्त्वाची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्य महामार्ग महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा प्रस्ताव आज झालेल्या सर्वसाधारण सभेत आला नाही, असा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठड्याला कार धडकून एक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
फुलंब्री-खुलताबाद मार्गावर भरधाव कार किनगांव फाट्याजवळील पुलाच्या कठाड्यावर अादळून एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली. ज्ञानेश्वर अंबादास बचाटे (वय ३१, रा. सिल्लोड), असे मृताचे नाव आहे.
ज्ञानेश्वर बचाटे हे शेख शफिक शेख भिकन (वय ३८, रा. सिल्लोड) हे कारमधून (एम. एच. २०, सी. एस. ०३९७) मधून बुधवारी रात्री खुलताबादकडे जात होते. त्यावेळी किनगांव फाट्यावरील पुलाच्या कठड्यावर कार अादळली. या अपघातात शेख शेफिक गंभीर जखमी झाले. मयत व जखमीला महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या अँम्बुलन्समधून चालक विजय देवमाळी यांनी दोघांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. बचाटे हे हायटेक सिड्स कंपनीत विभागीय व्यवस्थापक होते. या अपघाताची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसई विद्यार्थ्यांना खासगी पुस्तकांची मुभा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या (सीबीएसई) मान्यता प्राप्त शाळांमध्ये एनसीआरटीईच्या पुस्तकांची सक्ती करण्यात आली आहे. ही सक्ती केली असली तरी पालक व विद्यार्थ्यांना खासगी पुस्तक विकत घेण्याची मुभा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. संगीतराव पाटील यांनी दिली आहे.
सीबीएसईने मान्यता प्राप्त शाळांना १४ फेब्रुवारी रोजी एनसीआरटीईच्या पुस्तकांच्या सक्तीचे आदेश दिले. ६ एप्रिल रोजी यासंबंधीचे पत्र पाठविले होते. या आदेशाला महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनचे (मेस्टा) अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील व सुनील गंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.
सीबीएसई शाळांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू झाले आहे. त्यातच सीबीएसईने काढलेल्या आदेशाने पालक व विद्यार्थ्यांची तारंबळ उडाली आहे. एनसीआरटीईची पुस्तके खरेदी करण्यासाठी राज्यात कुठेही मान्यता प्राप्त पुस्तक खरेदी-विक्री केंद्र उपलब्ध नाही. एनसीआरटीईचे पुस्तक प्रकाशन आवृत्ती ही २००६पूर्वीची आहे. खासगी पुस्तकांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम सोप्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे एनसीआरटीईच्या पुस्तकांची सक्ती करता येणार नाही, असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील ज्ञानेश्वर पोकळे यांनी केला.
याचिकाकर्त्याची बाजू ज्ञानेश्वर पोकळे हे मांडत आहेत. त्यांना के. एस. पाटील व डी. डी. सरवदे यांनी सहकार्य केले. केंद्र सरकारतर्फे संजीव देशपांडे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संहिता मिळणार ऑनलाइन

$
0
0

संहिता मिळणार ऑनलाइन
नाट्य परिषदेचे कार्यवाह करंजीकर यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
राज्यभरातील रंगकर्मींना नव्या संहिता उपलब्ध व्हाव्या आणि ग्रामीण व शहरी भागातील उदयोन्मुख लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने राज्यात ठिकठिकाणी ‘स्क्रिप्ट बँक’ उभारण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाही दीपक करंजीकर यांनी दिली. या संहिता डिजिटल स्वरुपात रुपांतरित करून नाट्य परिषदेच्या वेब पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणतेही नाटक रंगभूमीवर यशस्वी होण्यासाठी नेपथ्य, दिग्दर्शक, निर्माता, योग्य कलावंतांची फळी यांच्या बरोबरीने संहिताही तितकीच महत्त्वाची असते. चांगली व कसदार संहिता मिळवताना दिग्दर्शक व निर्मात्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर नाट्य परिषदेने विविध एकांकिका व नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत अशाप्रकारे चारशे संहिता जमा करण्यात आल्या असून त्यांपैकी दोनशे संहितांचे डिजिटलायझेशन झाले आहे. उर्वरित संहितांचे डिजिटलायझेशनही लवकरच पूर्ण करून त्या परिषदेच्या वेब पोर्टलवर टाकण्यात येतील. उस्मानाबादमध्ये २१ ते २३ एप्रिलदरम्यान रंगणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानंतर लगेचच हे वेबपोर्टल रंगकर्मींसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती कारंजीकर यांनी दिली.
परिषदेच्या वेब पोर्टलमध्ये एका क्लिकवर या संहिता नाट्यकर्मींना उपलब्ध होतील. या संहितेसोबत लेखकाचे संपूर्ण तपशील देण्यात येणार असून त्याद्वारे दिग्दर्शक व निर्मात्यांना थेट लेखकाशी संपर्क करून प्रयोगाची परवानगी मिळवणे शक्य होणार असल्याचेही करंजीकर म्हणाले.
कोट
या उपक्रमाद्वारे कलावंतांची संहिता मिळवण्यासाठी होणारी धावपळ कमी होईल. त्याचप्रमाणे नव्या दमाच्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल व ग्रामीण भागातील लेखक मुख्य प्रवाहात येऊ शकतील.
दीपक करंजीकर, कार्यवाह, अ. भा. मराठी नाट्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images