Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मान्सूनपूर्व सरींनी मराठवाडा चिंब

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी प्रदेश म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही जून महिन्याच्या प्रारंभीच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या चार दिवसांमध्ये मराठवाड्यातील सर्व ७६ तालुक्यांना पावसाने चिंब केले आहे.

गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता, मात्र गेल्यावर्षी पावसाने सरासरी गाठली. यंदाही गेल्यावर्षीप्रमाणेच पाऊस असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच संपूर्ण मराठवाड्याला भिजविणारा पाऊस सुरू झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रविवारी (४ जून) औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, सोयगाव, जालना जिल्ह्यातील जाफराबाद, परतूर, अंबड, घनसावंगी, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व मानवत, नांदेड जिल्ह्यातील कंधार व मुखेड, बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, आष्टी, वडवणी, लातूरमधील उदगीर, अहमदपूर, चाकूर, तर उस्मानाबाद तालुक्यात १० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. १ ते ४ जूनदरम्यान औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यांत सरासरी दहा मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाने चिंब केले आहे.

बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

मान्सूनच्या पूर्वीच बीड जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली आहे. १ ते ४ जूनदरम्यान बीड जिल्ह्यात १७.१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते, मात्र जिल्ह्यात या चार दिवसांत २०.२ मिलिमीटर पाऊस झाला. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ११२ टक्के आहे.

मराठवाड्यात ७ ते ८ जूनपर्यंत पाऊस दाखल होत असतो, मात्र सध्या बंगालच्या उपसागरातील परि‌स्थिती पाहता आपल्याकडे पाऊस तीन ते चार दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे. मान्सूनची प्रगती गेल्या १३२ तासांपासून एकाच ठिकाणी स्थिरावलेली आहे. मान्सूने केरळच्या दक्षिण-मध्य प्रदेशापर्यंतच मजल मारली आहे.
- श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ.

आतापर्यंत पावसाची स्थिती (४ जून पर्यंत)
जिल्हा..........अपेक्षित.....प्रत्यक्ष.....टक्केवारी
औरंगाबाद........१७.५........१२.९........७३.६
जालना............१८.५........१२.७.........६८.६
बीड................१७.१........२०.२.........११८.४
लातूर..............१९.४........१४.३.........७३.७
उस्मानाबाद......२१.८........९.३..........४२.७
नांदेड...............२२.०........१०.०.......४५.५
परभणी............१६.९........५.६.........३३.२
हिंगोली............२२.५........१.४..........६.२
एकूण..............१९.४........१३.६........७०.१
(पाऊस मिलिमीटरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीडशे विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी व शेतमजुराच्या मुलांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. सध्या दुष्काळ नसल्यामुळे विद्यापीठ निधीतून शिष्यवृत्ती देणे शक्य नसल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. शिष्यवृत्ती द्यायची नव्हती, तर अर्ज का मागविले, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.
मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना २०१५-१६ यावर्षी दरमहा सहा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. मात्र, यंदा शिष्यवृत्ती देण्यास विद्यापीठाने नकार दिला आहे. मागील सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकली आहे. शिष्यवृत्ती विभागात बिल व अर्ज सादर करून अनेक दिवस झाले आहेत. शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. हा प्रश्न ऐरणीवर येताच कुलगुरू डॉ. चोपडे यांनी शिष्यवृत्ती देणे शक्य नसल्याचे सांगितले. दुष्काळ असल्यामुळे गेल्या वर्षी विद्यापीठ निधीतून शिष्यवृत्ती देण्यात आली. यावर्षी दरमहा सहा हजार रुपये शिष्यवृत्ती देणे शक्य नाही, असे डॉ. चोपडे म्हणाले. ऐनवेळी शिष्यवृत्तीस नकार दिल्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. अर्ज मागवून विद्यापीठाने भूमिका बदलल्यामुळे रोष वाढला आहे.
जवळपास १४२ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची गरज आहे. गरजू विद्यार्थ्यांना नाकारणाऱ्या विद्यापीठाचा विद्यार्थी संघटनांनी निषेध केला आहे. शिष्यवृत्ती द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली नव्हती. दुष्काळात शिष्यवृत्तीची घोषणा करून विद्यापीठाने राज्यभर गाजावाजा करून घेतला, मात्र निर्णयावर ठाम न राहता कुलगुरूंनी नवीन वाद निर्माण केला आहे.

आंदोलनाची तयारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने निवृत्त प्राध्यापकांना वेगवेगळ्या संशोधन केंद्रावर नियुक्त करून विद्यापीठाच्या निधीतून वेतन सुरू केले आहे. विद्यापीठ कायद्यातील वयोमर्यादेच्या नियमाचा भंग करून काही संचालक कार्यरत आहेत. या बेकायदा नियुक्त्यांवर खर्च करणारे विद्यापीठ गरीब विद्यार्थ्यांची अडवणूक करीत असल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली आहे. शिष्यवृत्ती मुद्द्यावर विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाची तयारी केली आहे.

मागील वर्षीप्रमाणेच शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांची दयनीय अवस्था आहे. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे आवश्यक आहे. बेकायदा नियुक्त्यांवर भरमसाठ खर्च करणाऱ्या विद्यापीठाने गरजूंना वंचित ठेवू नये.
- सुनील राठोड, एसएफआय

शेतकरी-शेतमजुरांच्या मुलांना हक्काची शिष्यवृत्ती नाकारणे विद्यापीठासाठी बदनामीकारक आहे. विद्यापीठाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य गरजेचे आहे. परस्पर नियुक्तीच्या प्राध्यापकांवर वर्षाकाठी साडेपाच कोटी रुपये उधळणाऱ्या विद्यापीठाने ठोस कारण द्यावे.
- तुकाराम सराफ, भारतीय विद्यार्थी सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ एक विद्यार्थी एक वृक्ष संगोपन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
वृक्ष लागवडीसाठी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालाघाट डोंगररांगा तसेच टेकड्या आहेत. या टेकडी जवळील गावच्या शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या हस्ते झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित चार कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयकुमार फड, विभागीय वन अधिकारी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना भापकर म्हणाले, ‘आपण आपली मानसिकता बदलून वृक्ष लागवड करावी मांजरसुंबा घाटात वृक्ष लागवड करून ते उजाड डोंगर हरित कसे होतील याची काळजी घ्यावी. मनरेगाच्या माध्यमातून लावलेली झाडे कशी जगतील याची परिपूर्ण काळजी घेण्यात यावी. ही झाडे जगविण्याची ताकद मनरेगात आहे यामधून आपण वृक्षाचे संवर्धन करू शकतो. बीड जिल्ह्यात डोंगर आहेत तेथे आपण झाडे लावून डोंगररांग हिरवीगार कशी होईल याची काळजी घ्यावी. शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक मुलाला एक झाड लावायला प्रोत्साहित करावे यासाठी मुलांचा संवाद झाडांशी, हवेशी, पाना-फुलांशी, डोंगररांगाशी कसा होईल यासाठी प्रयत्न करायला हवीत. डोंगराजवळच्या शाळांनी तेथील डोंगरावर झाडे लावून डोंगरे हिरवीगार करावीत. बीड जिल्ह्यात अंदाजे सहा लाख मुले पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. टेकडीवर मुलांनी झाडे लावावीत आणि आठवड्यातून दोनदा - तीनदा त्याला पाणी घालून वृक्ष संवर्धन करावे या माध्यमातून झाडांचे संवर्धन करणे सोपे होईल.’
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजूर असून ते काहीकाळ स्थलांतर करत असतात त्यामुळे त्यांच्या पाल्याच्या शिक्षणावर परिणाम होवून शाळा बाह्यमुलांची संख्या वाढू नये याकरीता शिक्षकांनी जागरुक असावे. तसेच फक्त शिक्षण न देता त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देण्यात येईल, याकडे महत्वपूर्ण नजरेने पाहणे गरजेचे आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील वातावरण कसे प्रसन्न राहिल याची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

प्रास्ताविक विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांनी केले. यामध्ये त्यांनी पन्नास कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम शासनाने पुढील तीन वर्षात राबविण्याचे ठरविले असून आपल्या विभागीय आयुक्तांनी चला गावाकडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ हे अभियान राबविण्याचे ठरविले असून त्यात वृक्ष लागवड कार्यक्रमाचा समावेश केला आहे, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ४० घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा परिसरातील सह्याद्रीनगरच्या एकता कॉलनीतील ४० घरांमध्ये ड्रनेजचे पाणी घुसल्याने हाहाकार झाला आहे. पावसाचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी चक्क टॉयलेट बाथरुममधून बाहेर आल्याने नागरिकांना दैनंदिन विधी उरकणेही अवघड झाले आहे. सोमवारी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी या भागाला भेट दिली. तेव्हा नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.
एकता कॉलनीच्या मागच्या बाजूला नाला वाहतो. पावसाळ्यात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. कॉलनीमधून पाणी जायलाच जागा नसल्याने जागोजागी तुंबले. त्यातच आसपासचे सर्व ड्रेनेज तुंबल्याने ड्रेनेजचे पाणी चक्क नागरिकांच्या टॉयलेट बाथरुममध्ये घुसले आहे. यामुळे नागरिकांना केवळ घरासमोरचे नव्हे, तर घरातील पाणीही बादलीत भरून फेकावे लागत आहे. नाल्यामध्ये प्रचंड कचरा साचला असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. जागोजागी गाळ साचल्याने पाणी वाहत नाही आहे. यामुळे कॉलनीतील ४० घरांना धोका निर्माण झाला आहे. स्मिता घोगरे यांनी या भागाला भेट दिली तेव्हा नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. या भागात कचरा गाडी येत नाही. त्यामुळे आसपासचे नागरिक नाल्यात कचरा फेकतात. प्लास्टिकमुळे नाला दिसतच नाही .नालेसफाई न झाल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. पर्यावरण दिनीच इतका विसंगत कारभार पाहून उप महापौरही चक्रावल्या होत्या. या भागातील खूप वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांनी बिल्डरवरही आरोप केले. ड्रेनेज व पाण्याचे कोणतेच नियोजन न केल्यानेच या समस्या उद्भवल्या आहेत असे नागरिकांनी सांगितले. नागरिकांच्या समस्यांची दखल घेत सिद्धांत शिरसाट यांनीही या भागाला भेट दिली. यावेळी आमदार निधीतून कॉलनीचा रस्ता केला जाईल, असे घोगरे यांनी सांगितले. तसेच नालेसफाई होईल असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी शिवसेना उप शहरप्रमुख रमेश वाहुळे, विभागप्रमुख रंजित ढेपे, उप विभागप्रमुख बाळू मिसाळ आदी उपस्थित होते.

प्रत्येक वर्षी आम्हाला पाण्याचा प्रचंड त्रास होतो. आमच्या खऱ्या समस्यांकडे साफ दुर्लक्ष होते. ड्रेनेजलाइन साफ करून रस्ता करावा अशी आमची मागणी आहे. - प्रकाश त्रिभुवन

आम्हाला पाण्याचा प्रचंड त्रास होतो. पावसाळ्यात तर घरात पाणी घुसत. टॉयलेट बाथरूममध्येही पाणी घुसल्याने आमची जायबंदी होते. - उषा लांडगे

आमदार निधीतून कॉलनीचा रस्ता केला जाईल. या भागाची नालेसफाई नियमित करण्यावर भर असेल. लवकरच या समस्या सोडवू. - स्मिता घोगरे, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’च्या कामाची चौकशी करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाची सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी करा, अशी मागणी माजी नगरसेवक समीर राजूरकर व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देशमुख यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांसह विभागीय आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात राजूरकर - देशमुख यांनी म्हटले आहे की, ‘भूमिगत गटार योजनेचे तांत्रिक लेखा परीक्षण करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याने २ मार्च २००९ रोजी दिले होते. त्रयस्थ संस्थेकडून हे लेखा परीक्षण करून घेण्याचेही सूचित करण्यात आले होते, पण अद्याप अशा प्रकारचे कोणतेही लेखा परीक्षण करण्यात आले नाही ही बाब गंभीर आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने निधी दिला आहे. शासनाने दिलेल्या निधीचा विनीयोग कसा करण्यात आला याचा अहवाल दर तीन महिन्यानी शासनाला पाठवणे बंधनकारक आहे. शासनाने तसे निर्देश दिले आहेत, पण महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेला अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. भूमिगत गटार योजनेचे काम करारानुसार ३० जून २०१७ रोजी संपायला हवे, परंतु या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येत नाही त्यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्त्वाबद्दल शंका निर्माण होते. या योजनेसाठी नियुक्त केलेल्या पीएमसीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. या अहवालात वेळोवेळी बदल करण्यात आले. केलेल्या बदलाची माहिती केंद्र, राज्य शासनाला तसेच प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या तांत्रिक लेखा परीक्षण करणाऱ्या संस्थेला (आयआयटी, पवई) देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक त्रुटी या प्रकल्पात राहून गेल्या आहेत. या त्रुटींमुळे प्रकल्पाच्या यशस्वीतेबद्दल खात्री वाटत नाही.
राजूरकर यांनी बारा मुद्यांचे निवेदन आयुक्तांच्या नावे दिले आहे. भूमिगत गटार योजनेचे काम योग्यप्रकारे होत नसल्यामुळे महापालिकेचे व पर्यायाने शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शहरातील मलनिःसारण व्यवस्था कोलमडणार असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. या सर्व मुद्यांचा विचार करून भूमिगत गटार योजनेच्या कामाची राज्य शासनाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्या मार्फत करण्यात यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अट्टल दुचाकी चोर जाळ्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्थानिक गुन्हे शाखेने दोन अट्टल दुचाकी चोरांना कन्नड येथून अटक केली. त्यांनी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या.
ग्रामीण गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना कन्नड ये‌थील शफीक शहा शब्बीर शहा (रा. आधार तांडा, ता. सिल्लोड) व जाबेरशहा युसूफशहा (रा. रिठ्ठी ता. कन्नड) हे दोघे दुचाकीचोर असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. या माहितीवरून गुन्हेशाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत या दोघांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून विविध दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी चोरी संदर्भात कन्नड, भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या दोघांना कन्नड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, एपीआय ब्रह्मा गिरी, पीएसआय भगतसिंग दुलत विवेक जाधव, गफार पठाण, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, गणेश मुळे, रतन वारे, सुनील ‌शिराळे, सागर पाटील, विनोद तांगडे, राहुल पगारे, प्रमोद साळवी, संजय तांदळे, सय्यद झिया यांनी केली.

मास्टर कीचा वापर
दोन्ही आरोपी दुचाकी चोरण्यासाठी मास्टर कीचा वापर करीत होते. या चावीचा वापर होत नसल्यास हँडल लॉक तोडून दुचाकी लांबवत होते. तसेच कागदपत्रे नंतर आणून देतो असे सांगत कमी किमतीत दुचाकी विक्री करीत होते. चोरट्यांच्या तपासातून अजून काही दुचाकी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांनी औरंगाबादसह जालना जिल्ह्यात दुचाकी चोरीचे कारनामे केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छेविरुद्ध गर्भपात; जामीन फेटाळला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेगवेगळ्या शंका-कुशंका घेत विवाहितेच्या इच्छेविरुद्ध आरोपी व जिन्सी परिसरातील डॉ. शांताबाई उर्फ चंद्रकला गायकवाड हिच्या गर्भपात केंद्रामध्ये सक्तीने केलेल्या गर्भपात प्रकरणातील आरोपी पती, सासू व नणंदेचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी सोमवारी (५ जून) फेटाळला.
या प्रकरणी विवाहिता सुमैय्या अंजुमन सैय्यद सलाऊद्दीन (२५, रा. किलेअर्क, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा आरोपी सय्यद सलाउद्दीन सय्यद शहाबुद्दीन याच्याशी ५ मार्च २०१७ रोजी विवाह झाला होता व विवाहानंतर फिर्यादी ही अंगुरीबाग येथे सासरी नांदायला आली होती. ९ एप्रिल २०१७ रोजी फिर्यादीची प्रकृती बिघडली म्हणून पती सय्यद, सासू व आरोपी सायरा बेगम सय्यद शहाबुद्दीन आणि नणंद व आरोपी उजिना बेगम सय्यद शहाबुद्दीन यांनी फिर्यादीला भारतिया मॅटर्निटी नर्सिंग होममध्ये तपासणीसाठी नेले. तपासणीनंतर फिर्यादी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. घरी गेल्यानंतर फिर्यादीला सासरच्या मंडळीकडून शारीरिक-मानसिक त्रास सुरू झाला. पुन्हा १५ एप्रिल रोजी फिर्यादीला तपासणीसाठी नेण्यात आले. फिर्यादीची सही घेऊन सोनोग्राफी केल्यानंतर ती सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पतीसह सासरच्या लोकांनी वेगवेगळ्या शंका घेतल्यानंतर डॉक्टरांनी शंका घेण्याचे कारण नसल्याचे सांगितले; परंतु त्यावर सासरच्या लोकांचे समाधान झाले नाही. त्यानंतर उपचारासाठी जाण्याचा बहाणा करून पती, सासू व नणंदेने फिर्यादीला १९ एप्रिल रोजी आरोपी व जिन्सी परिसरातील डॉ. गायकवाड हिच्या गर्भपात केंद्रामध्ये फिर्यादीला आणण्यात आले. तिथे फिर्यादीची सही घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध व तिला पूर्णपणे अंधारात ठेऊन तिचा गर्भपात करण्यात आला. या प्रकारानंतर आरोपी पती पळून गेला. घडला प्रकार फिर्यादीने तिच्या भावाला व वहिनीला सांगितला आणि पती, सासू व नणंदेविरुद्ध पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी २४ मे रोजी डॉ. गायकवाड हिचे केंद्र सील केले.

समाजविघातक गुन्ह्याची नोंद
या प्रकरणी पती, सासू व नणंदेने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. अर्जावरील सुनावणीवेळी, आरोपींचा गुन्हा हा अतिशय गंभीर व समाजविघातक असून, फिर्यादी विवाहितेला मानसिक त्रास देऊन तिच्या इच्छेविरुद्ध सक्तीने गर्भपात करण्यात आला. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकाची ऑनलाइन फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निवृत्त प्राध्यापकास सायबर ठकाने ऑनलाइन ४५ हजारांची खरेदी करत गंडा घातला. बँकेतून बोलत असल्याची थाप मारीत एटीएम कार्डची माहिती जाणून घेत हा प्रकार करण्यात आला. २६ मे ते ३ जूनच्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश रामचंद्र कुरेकर (रा. एन तीन, गणपती मंदिराजवळ, सिडको) हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. कुरेकर यांच्याकडे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड आहे. २६ मे रोजी कुरेकर यांच्या मोबाइल क्रमांकावर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. समोरील व्यक्तीने दीपक शर्मा नाव सांगत एसबीआय बँकेच्या मेन ब्रँचमधून बोलत असल्याची थाप मारली. तुमचे एटीएम कार्ड बंद होणार आहे, असे सांगत कार्डची माहिती विचारून घेतली. कुरेकर यांना हा प्रकार खरा वाटल्याने त्यांनी समोरील व्यक्तीला कार्डचा क्रमांक सांगितला. यानंतर २६ मे रोजी कुरेकर यांच्या खात्यातून दोन वेळा पस्तीस हजाराची रक्कम तसेच तीन जून रोजी दहा हजारांची रक्कम कपात झाली. ऑनलाईन शॉपिंग करीत ही रक्कम सायबर ठक‌ाने लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रविवारी कुरेकर यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक शर्मा विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मुदिराज या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मानांकन प्रक्रियेविषयी ९ जून रोजी कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिएशनच्या मानांकनाच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ९ जून २०१७ रोजी एका दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी दिली.
या कार्यशाळेंतर्गत अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए व पॉलिटेक्निक अशा तांत्रिकी व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता पडताळणी, त्याचे निकष व परिमाणांचे मूल्यांकन या विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत ए. पी. मित्तल (सदस्य, एआयसीटीई, नवी दिल्ली), रमेश उन्निकृष्णन (संचालक, एआयसीटीई, मुंबई), सुनील भिरूड, दीपेश दिवाकरण हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डॉ. व्ही. जी. गायकर (कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ), आमदार सतीश चव्हाण (सरचिटणीस, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विविध महाविद्यालयांना ‘एनबीए’चे मानांकन मिळवण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सर्व प्रमुख मार्गदर्शकांशी संपर्क साधून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या तत्रंज्ञानाचा वापर, विविध माहितीचे संकलन, सध्य परिस्थितीत उद्‍भवत असलेल्या विविध शैक्षणिक व तांत्रिक समस्यांचे निराकरण यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन मिळणार अाहे.

नोंदणीसाठी आवाहन
मराठवाड्यासह संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शिऊरकर यांनी केले आहे. महाविद्यालयांना या कार्यशाळेमुळे एनबीएचे मानांकन मिळवण्यासाठी निश्‍चितच फायदा होणार असल्यामुळे इच्छुक महाविद्यालयांनी देविगरी अभियांत्रिकीच्या www.dietms.org या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. शिऊरकर यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅनेमिया फ्री’मध्ये ६०८ जणांची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका फार्मा कंपनीच्या वतीने एकाच दिवशी एकाच वेळी देशभरातील ३५ केंद्रांवर हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. ‘अॅनेमिया फ्री इंडिया’ या विशेष उपक्रमाअंतर्गत सोमवारी १० हजारांवर व्यक्तींची तपासणी करण्याचे टार्गेट ठरविण्यात आले होते, तर प्रत्यक्षात १६ हजारांवर व्यक्तींची तपासणी करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव केंद्र असलेल्या घाटीमध्ये केंद्रनिहाय टार्गेटच्या दुप्पट म्हणजेच ६०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, हे विशेष.
‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’साठी हा विशेष मोफत उपक्रम देशभर राबविण्यात आला आणि या उपक्रमाअंतर्गत देशभरातील ३५ केंद्रांवर सर्व वयातील व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सकाळी दहा ते दुपारी चार या सहा तासांमध्ये ही तपासणी करण्यात आली व प्रत्येक केंद्रावर किमान ३०० व्यक्तींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या दुप्पट म्हणजे ६०८ व्यक्तींची तपासणी घाटीमध्ये अवघ्या दोन तासांत पूर्ण झाली. या उपक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाने समन्वयाचे काम केले. ऑटोमॅटिक मशीनवर ही तपासणी करण्यात आली. तसेच तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींना, रुग्णांना, नातेवाईकांना अॅनेमियाविषयी माहिती देण्यात आली तसेच मार्गदर्शनही करण्यात आले. रक्तातील लोहाच्या प्रमाणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या वेळी गुळ-शेंगदाण्याच्या चिक्कीचे वाटपही करण्यात आले. तपासणीच्या अहवालाबरोबरच कोणत्या खाद्यपदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे आणि या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण नेमके किती, याहीही माहिती देण्यात आली. या संपूर्ण उपक्रमाचे व्हीडिओ शुटिंग करण्यात आले आणि या उपक्रमाचे विशेष निरीक्षक म्हणून अॅड. संजय पटेल व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहा गडप्पा यांनी काम पाहिले.

४० टक्के व्यक्तींना अॅनेमिया
घाटीत करण्यात तपासणीच्या अहवालानुसार किमान ४० टक्के व्यक्तींना अॅनेमिया असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले. घाटीमध्ये मुले, पुरुष, महिलांची तपासणी करण्यात आली असली तरी, महिलांमध्ये अॅनेमियाचे प्रमाण अर्थातच जास्त आढळले, असेही या उपक्रमाचे समन्वयक व घाटीतील स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आजपासून अकरावीचे ऑनलाइन प्रवेश

$
0
0

आजपासून अकरावीचे ऑनलाइन प्रवेश

शाळांमध्ये नोंदणी व्यवस्था करणार; १०४ कॉलेजांत २२ हजारावर प्रवेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्याची सुरुवात मंगळवारपासून होत आहे. ऑनलाइन प्रवेशाचे पहिले वर्ष असून संभाव्य अडचणी लक्षात घेत विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या शाळांमध्ये नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तशा सूचना शाळांना देण्यात आल्या. शहरात १०४ कॉलेजांमध्ये २२ हजार ९४० जागांवर ऑनलाइन प्रवेश दिले जाणार आहेत.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या निकालाकडे पालकांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी अकरावी प्रवेशाची चिंता विद्यार्थी, पालकांना लागली आहे. यावर्षीपासून औरंगाबादमध्ये ऑनलाइन अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसूनही प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे. त्याची माहिती पुस्तिका, प्रवेश प्रक्रियेबाबत सुविधा विद्यार्थ्यांना शाळेतच उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मदत करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेशासाठी शहरात पाच झोन करण्यात आले असून प्रत्येक झोनला एक कॉलेज समन्वयक असणार आहे. त्या पाच ठिकाणीही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ६ जूनपासून प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत आहे. प्रवेशाचा टप्पा किती दिवस असेल, फेरी कशी असेल याबाबतचे वेळापत्रकही दहावीच्या निकालानंतर जाहीर केले जाणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे प्रवेशातील गैरप्रकारांना काही प्रमाणात आळा बसणार आहे. औरंगाबाद शहरात १०४ ज्युनिअर कॉलेज आहेत. त्यातील ठराविक कॉलेजांनाच प्रवेशासाठी गर्दी असते. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरायचा असून गुणानुसार विद्यर्थ्याला शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल.

शाळेतच माहिती पुस्तिका, स्वतंत्र ‘लॉग-इन आय.डी.’

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे हे पहिले वर्ष आहे. ही प्रक्रिया कशी राबवायची याबाबत मुख्याध्यापक, प्राचार्यांची सोमवारी बैठक घेत शिक्षण विभागाचे उपसंचालक वैजनाथ खांडके, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशासाठीचा अर्ज भरण्यासाठी मदत करावी, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शाळेत ‘माहिती पुस्तिका व नमुना अर्ज’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची किंमत दीडशे रुपये असणार आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शाळांनी कोणतेही शुल्क आकारू नये, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले. माहिती पुस्तिकेत विद्यार्थ्याला लॉग-इन आय.डी. व पासवर्ड दिला आहे. त्याला आपल्या लॉग-इनवरून अर्ज भरता येणार आहे. त्यासह पुढील प्रक्रियाही त्यावरूनच कराता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी...

माहिती पुस्तीकेसह विद्यार्थ्याला ‘लॉग-इन आय.डी. व पासवर्ड’ दिला जाईल. तो इतरांना शेअर करू नये, असे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यासह माहिती पुस्तिकेत प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आलेली आहे. त्यात अर्ज कसा भरावयाचा, त्याचा नमुना, आवश्यक कागदपत्रांची माहिती, शहरातील विद्याशाखानिहाय कॉलेज, त्यांची प्रवेश क्षमता देण्यात आली आहे. त्यामुळे पर्याय निवडताना विद्यार्थी, पालकांना अडचणी येणार नाहीत. सध्या फक्त नोंदणीची प्रक्रिया असून पुढील प्रक्रिया, प्रवेशाच्या फेरी याचे वेळापत्रक दहावीच्या निकालानंतर जाहीर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला लोकसहभागातून सहकार्य करा

$
0
0

महापालिकेला लोकसहभागातून विशेष सहकार्य करावे
आयुक्त मुगळीकर यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहराला स्मार्ट सिटी योजनेत हातभार लावण्यासाठी महापालिकेला लोकसहभागातून विशेष सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी केले.
महापालिका आणि औरंगाबाद जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था, रोटरी क्लब यांच्यावतीने रविवारी आयुक्तांच्या उपस्थितीत बीड बायपास येथील दिशानगरी सभागृहात सोसायटी अध्यक्ष व सचिवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुगळीकर बोलत होते.
संयोजक जे. सी. फ्रांसिस यांनी प्रास्ताविक करून परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडल्या. उपायुक्त व घनकचरा विभागाचे प्रमुख विक्रम मांडुरके यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून कचऱ्याची विल्हेवाट त्याच परिसरात करण्यात यावी, असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मुगळीकर यांनी नागरिकांना वृक्षारोपणाचे आवाहन केले. प्रा. प्रशांत अवसरमल यांनी स्वविकसित सोसायटीचे प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे लाईट, ड्रेनेज, उद्यान, साफसफाई व रस्ता याकरिता महापालिका प्रशासन मदतच करत नाही. याची दखल घेऊन मालमत्ता करामध्ये ५० टक्के सूट देण्यासाठी आयुक्तांकडे मागणी केली.
याप्रसंगी प्रदीप बुरांडे, डॉ. खडके साहेब यांच्यासह शेकडो सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होते. गणेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डी. डी. शिसोदे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरीपुत्रांचा विद्यापीठात एल्गार

$
0
0

शेतकरीपुत्रांचा विद्यापीठात एल्गार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील शेतकरी न्याय्य मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. मात्र, राज्य सरकार संवेदनहीन पद्धतीने व तडजोड करून वेळ मारून नेत आहे. या प्रकाराचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने निषेध केला. तर राज्यव्यापी बंदमध्ये सहभाग नोंदवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जोरदार निदर्शने केली.

राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी हवालदिल असून शेतकऱ्यांची मुले हताश झाली आहेत. राज्यात शेतकरी संप असताना शेतकऱ्यांची मुले अलिप्त राहू शकत नाही. संपाला पाठिंबा देत विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. राज्यव्यापी बंदला जाहीर पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधले. यावेळी कुलगुरुंना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला हमीभाव द्या, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती द्या अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात सुनील राठोड, रखमाजी कांबळे, अभिमान भोसले, सत्यजीत म्हस्के, लोकेश कांबळे, नितीन वाव्हळे, प्राजक्ता शेट्टे, ओम पुरी, मिलिंद वाव्हळे, गोविंद इंगळे, देव राजळे यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय स्तरावरील संगीत स्पर्धेत औरंगाबादचे यश

$
0
0

राष्ट्रीय स्तरावरील संगीत स्पर्धेत औरंगाबादचे यश
स. भु. प्रशाला औरंगाबाद आणि श्रीराम मुझीकल फौंडेशन औरंगाबाद ने बाजी मारली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड म. न. पा., नॅशनल इंटिग्रेशन फोरम, अरिहंत सेवाभावी संस्था आणि लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स. भु. प्रशाला औरंगाबाद आणि श्रीराम म्युझिकल फाऊंडेशनने बाजी मारली.
या स्पर्धेत दुबई, नेपाळसह भारतातील आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड व हरियाणा येथून एकूण ४५० स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये वैयक्तिक व सांघिक असे प्रकार होते. सांघिकमध्ये एकूण २० संघ सहभागी झाले होते. वैयक्तिक २६ आणि सांघिक ४ बक्षिसे औरंगाबादच्या गायक वादक स्पर्धकांनी मिळवली आहेत. विजेत्या स्पर्धकांना कर्नाल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कर्नाल कल्चरल व सोशल समीटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना विश्वनाथ दाशरथे, रतन बोऱ्हाडे, अविनाश आणदूरकर, गौरी दाशरथे यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व विजेत्यांचे स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, सरचिटणीस अॅड. दिनेश वकील गंगापूरवाला, मुख्याध्यापक शिरीष मोरे यांनी अभिनंदन केले आहे.
सुगम गायन स्पर्धा - खुला गट प्रथम क्रमांक श्रद्धा देशमुख, द्वितीय विशाल देशमुख, तृतीय पूर्वा कुलकर्णी, जेष्ठ गट द्वितीय भाविशा दाशरथे, तृतीय कल्याणी लोखंडे, उत्तेजनार्थ सिद्धी महालपुरे, कनिष्ठ गट प्रथम शाल्मली दाशरथे, द्वितीय अथर्व कंटक, तृतीय यश होले व लोकेश जैन
भक्तीगीत गायन स्पर्धा - कनिष्ठ गट, प्रथम आयुष पाठक, द्वितीय श्रेया कौडगावकर, तृतीय अनुराग धर्माधिकारी, उत्तेजनार्थ श्रावणी देवळाणकर व पुष्कर मुळजकर. भक्ती गायन मोठा गट - द्वितीय भाविशा दाशरथे, तृतीय कल्याणी लोखंडे, उत्तेजनार्थ शेखर भाकरे
वाद्य वादन स्पर्धा - खुला गट प्रथम शेखर भाकरे, वाद्य वादन वरिष्ठ गट - प्रथम दिग्विजय माथेकर, द्वितीय स्वप्निल कुलकर्णी, तृतीय वल्लभ अणदूरकर
वृन्द्वादन स्पर्धा - प्रथम स. भु. वार्बलर ग्रुप - ओमकार वाघचौरे, चिन्मय कुलकर्णी, जय दोशी, निशांत मोरखंडीकर, वल्लभ अणदूरकर, तनिष्क बोऱ्हाडे, दिग्विजय माथेकर, हर्षवर्धन मोहिते, स्वप्निल कुलकर्णी.
लोकगीत - प्रथम पार्थ देशपांडे, द्वितीय जय दोशी, तृतीय लोकेश जैन आणि तृतीय स्वराली मसाळ
समूह गीत स्पर्धा - वरिष्ठ गट प्रथम श्रीराम म्युझिकल फाऊंडेशन, द्वितीय श्रीराम म्युझिकल फाउंडेशन, तृतीय स. भु. विद्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर, आयुक्त सायकलवर

$
0
0

महापौर, आयुक्त सायकलवर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापालिकेने सोमवारी गरवारे क्रीडा संकुलात वृक्षारोपण केले. संपूर्ण शहरात विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून १० हजार झाडे लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी महापौर, आयुक्तांच्या पुढाकाराने सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीत काही नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी सहभागी झाले होते.

महापालिकेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर १ जून रोजी हर्सूल तलावाच्या परिसरातील जांभूळबनात पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या दिवशी सुमारे पाच हजार झाडे लावण्यात आली. सोमवारी गरवारे क्रीडा संकुलात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, विरोधीपक्षनेता फेरोज खान, नगरसेवक नंदकुमार घोडेले, राजु शिंदे, अर्चना निळकंठ, अंकिता विधाते, माधुरी अदवंत, नितीन साळवे, गोकुळसिंह मलके राठोड, आयुक्त डी. एम. मुगळीकर, उद्यान अधिक्षक विजय पाटील यांच्यासह प्रयास ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाल्यावर आयुक्त, महापौरांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी दिल्लीगेट परिसरातील आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी आले. या ठिकाणाहून महापालिकेच्या मुख्य कार्यालयापर्यंत सर्वजण सायकल चालवत आले. पर्यावरण दिन हा ‘नो व्हेकल डे’ म्हणून पाळण्याचे आवाहन मुगळीकर यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत सायकल फेरी काढण्यात आली.

अॅपचे उद्घाटन

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या वेळी महापौर भगवान घडमोडे यांच्या हस्ते ‘माय ग्रीन औरंगाबाद’ या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. शहरात कुठेही वृक्षारोपण केल्यास त्याची माहिती या अॅपद्वारे तात्काळ उपलब्ध होणार आहे. प्रयास युग फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ भूमिगत गटार योजनेच्या कामाची चौकशी करा

$
0
0

भूमिगत गटार योजनेच्या कामाची चौकशी करा
राजूरकर, देशमुख यांची मागणी
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
महापालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाची सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी करा, अशी मागणी माजी नगरसेवक समीर राजूरकर व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देशमुख यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांसह विभागीय आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात राजूरकर - देशमुख यांनी म्हटले आहे की, ‘भूमिगत गटार योजनेचे तांत्रिक लेखा परीक्षण करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याने २ मार्च २००९ रोजी दिले होते. त्रयस्थ संस्थेकडून हे लेखा परीक्षण करून घेण्याचेही सूचित करण्यात आले होते, पण अद्याप अशा प्रकारचे कोणतेही लेखा परीक्षण करण्यात आले नाही ही बाब गंभीर आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने निधी दिला आहे. शासनाने दिलेल्या निधीचा विनीयोग कसा करण्यात आला याचा अहवाल दर तीन महिन्यानी शासनाला पाठवणे बंधनकारक आहे. शासनाने तसे निर्देश दिले आहेत, पण महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेला अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. भूमिगत गटार योजनेचे काम करारानुसार ३० जून २०१७ रोजी संपायला हवे, परंतु या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येत नाही त्यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्त्वाबद्दल शंका निर्माण होते. या योजनेसाठी नियुक्त केलेल्या पीएमसीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. या अहवालात वेळोवेळी बदल करण्यात आले. केलेल्या बदलाची माहिती केंद्र, राज्य शासनाला तसेच प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या तांत्रिक लेखा परीक्षण करणाऱ्या संस्थेला (आयआयटी, पवई) देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक त्रुटी या प्रकल्पात राहून गेल्या आहेत. या त्रुटींमुळे प्रकल्पाच्या यशस्वीतेबद्दल खात्री वाटत नाही.
राजूरकर यांनी बारा मुद्यांचे निवेदन आयुक्तांच्या नावे दिले आहे. भूमिगत गटार योजनेचे काम योग्यप्रकारे होत नसल्यामुळे महापालिकेचे व पर्यायाने शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शहरातील मलनिःसारण व्यवस्था कोलमडणार असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. या सर्व मुद्यांचा विचार करून भूमिगत गटार योजनेच्या कामाची राज्य शासनाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्या मार्फत करण्यात यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शेतकरी संपाला पाठिंब्यासाठी उपोषण

$
0
0

शेतकरी संपाला पाठिंब्यासाठी उपोषण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील विविध संघटनांच्या पुढाकाराने शेतकरी आंदोलन समर्थन समितीने गांधी पुतळा शहागंज येथे सोमवारी (५ मे) उपोषण केले.
संपकरी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तत्काळ मार्गी लावा ही उपोषणकर्त्यांची एकमुखी मागणी होती. गेल्या २५ वर्षात जागतिकीकरणामुळे सुमारे तीन लाख शेतकऱ्यांचा आत्महत्यांमुळे बळी गेला आहे. संप करत असलेल्या शेतकऱ्यांमुळेच भाजप सत्तेवर आले आहे. संजय पाटील यांना पोलिसांनी पुण्यात डांबून ठेवले. मुंबईला बैठकीला जाऊ दिले नाही, याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या लाक्षणिक उपोषणात अण्णा खंदारे, डॉ. जनार्धन पिंपळे, प्रा. एच.एम. देसरडा, के. ई. हरीदास, मेजर सुखदेव बन, सुभाष लोमटे, देविदास कीर्तीशाही, अलीखान, आशाबाई डोके, उद्धव भवलकर, बुद्धीनाथ बराळ, अॅड. अभय टाकसाळ, प्रा. पंडित मुंडे, भगवान भोजने, भीमराव बनसोडे, प्रा. विष्णू गाडेकर, अॅड. विष्णू ढोबळे, प्रा. प्रकाश शिरसाट आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणपत्रिका नसल्याने अडचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. यंदा प्रक्रिया कशी असेल, याबाबत जाणून घेण्यासाठी पहिल्या दिवशी सुविधा केंद्रावर विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली. बारावीच्या गुणपत्रिका न मिळाल्याने केंद्रांवर कागदपत्र तपासणीची प्रक्रिया अद्याप सुरू नाही. या गुणपत्रिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुविधा केंद्रांनी तंत्रशिक्षण विभागाकडे केली आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्यातील प्रथम वर्ष इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले होते. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीसाठीची प्रक्रिया ५ जूनपासून सुरू झाली. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी १७ जूनपर्यंत करता येणार आहे. पहिल्यादिवशी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसह, कागदपत्र, प्रवेश प्रक्रिया कशी असेल, सीईटी स्कोअरनुसार कोठे प्रवेश मिळेल, असे विविध प्रश्न मनामध्ये असलेले विद्यार्थी, पालक सुविधा केंद्रावर पोचले. शहरातील विविध कॉलेजांमध्ये सुविधा केंद्र देण्यात आले आहेत. शासकीय अभियांत्रिकी कॉलेजसह इतर अभियांत्रिकी कॉलेजांमध्ये विद्यार्थी, पालकांनी हजेरी लावली.

९ जूनला मिळणार गुणपत्रिका
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल ३० मार्च रोजी जाहीर झाला, परंतु गुणपत्रिका ९ जून रोजी मिळणार आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांचे कागदपत्र तपासणीची प्रक्रिया सुविधा केंद्रांवर सुरू केलेली नाही. छायांकित प्रतींवर गुणपत्रिका कशी ओळखायची, असा प्रश्न सुविधा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना पडला आहे. ही अडचण लक्षत ऑनलाइन गुणांची पडताळणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती सुविधा केंद्राने केली आहे. शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुविधा केंद्राने सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला याबाबत पत्र पाठवून तोडगा काढण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले.

घसरलेल्या निकालाचीच चर्चा
अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल यंदा घसरला. या घसरलेल्या निकालाची चर्चा सुविधा केंद्रावर होती. सीईटीतील गुणानुसार कोणते कॉलेज मिळेल, आपली आवडती शाखा, कॉलेज मिळेल का, असे प्रश्न विद्यार्थी, पालकांचे सुविधा केंद्रावरील प्राध्यापकांना होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बारावीनंतर काय’; ९ जून रोजी मार्गदर्शन

$
0
0

औरंगाबाद : बारावीनंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या क्षमतेनुसार विविध क्षेत्रांत असलेल्या करिअरच्या संधीबाबत विद्यार्थ्यांना योग्य माहिती व्हावी. बुद्धिमत्ता, अभिरुची, व्यक्तिमत्व अशा निकषांवर स्वतःला ओळखत, करिअरचे योग्य क्षेत्र निवडणे समजावे. त्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र टाइम्सतर्फे ९ जून रोजी ‘बारावीनंतर काय’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. बारावीनंतर काय करावे, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह असते. भविष्यातील संधी ओळखत कोणत्या क्षेत्रात करिअर करावे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा ‘बारावीनंतर काय’ या उपक्रमागचा हेतू आहे. डॉ. अजित थेटे या उपक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. ‘इंजिनीअरिंग’, ‘हॉस्पिटॅलीटी मॅनेजमेंट’, ‘आयटी’, ‘कम्प्युटर सायन्स’, ‘अॅनिमेशन’ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी, कॉलेजांची माहिती याबाबत मार्गदर्शन, विद्यार्थी, पालकांशी संवाद साधणार आहेत.

स्थळ ः आइन्स्टाइन सभागृह, एमजीएम
दिनांक ः ९ जून
वेळ ः सकाळी ११ वाजता
मार्गदर्शक ः डॉ. अजित थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण दिनी पालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी

$
0
0

पर्यावरण दिनी पालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
प्रदूषण टाळण्यासाठी पालिका आयुक्तांच्या पुढाकाराने सोमवारी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सायकल फेरी काढण्यात आली. सायकल फेरीची चर्चा सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून प्रदूषणाची पातळी वाढविण्यास हातभार लावला. निमित्त होते विषय समितींच्या सभापतींना सुत्रे प्रदान करण्याचे. पालिकेच्या इतिहासात विषय समितीच्या सभापतींना सुत्रे प्रदान करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी प्रथमच आले.
शनिवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतींच्या निवडणुकीबरोबर पाच विषय समितींच्या सभापतींची निवडणूक झाली. पाच समितींचे सभापती बिनविरोध निवडून आले. निवडून आलेल्या शिवसेनेच्या किंवा शिवसेनेच्या गोटातील सभापतींना सभापतीपदाची सुत्रे प्रदान करण्यासाठी सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे दुपारी चार वाजेच्या सुमारास महापालिकेत आले, त्यांच्याबरोबर अन्य पदाधिकारीही होते. सर्वप्रथम त्यांनी महिला बालकल्याण समितीच्या नवनिर्वाचित सभापती आशा भालेराव यांचे स्वागत करून त्यांना सभापतिपदाच्या खुर्चीवर बसवले. त्यानंतर आरोग्य सभापती प्रेमलता दाभाडे, शहर सुधार समितीच्या सभापती ज्योती अभंग, समाजकल्याण समितीच्या सभापती खतीजा कुरैशी यांना दानवे यांनी सभापतिपदाची सुत्रे देऊन स्वागत केले.
नवनिर्वाचित सभापतींना सुत्रे देण्याचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा पालिका मुख्यालयाच्या बाहेर पदाधिकारी - कार्यकर्त्यांतर्फे फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर फटाक्यांच्या कागदांचा कचरा पडलेला होता. आतषबाजीमुळे पालिका परिसरातील प्रदूषणाची पातळी देखील वाढली होती. प्रदूषण टाळण्यासाठी एकीकडे सायकल फेरी तर दुसरीकडे पदाधिकारी - कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली फटाक्यांची आतषबाजी व त्यामुळे वाढलेले प्रदूषणाचे प्रमाण या परस्परविरोधी कृत्याची पालिकेच्या वर्तुळात चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images