Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बदलीनंतर अडचण आणखी वाढली

$
0
0

औरंगाबाद : वर्षानुवर्षे आपल्या जिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्नशील होतो. ऑनलाइन पद्धतीने यंदा प्रक्रिया राबवून आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. मात्र आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर मिळालेल्या शाळा पाहिल्यानंतर पूर्वीचीच नोकरी बरी होती, अशी म्हणण्याची पाळी आली आहे, अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी नोंदविल्या.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागमार्फत मंगळवारी आंतर जिल्हा बदलीने आलेल्या १५९ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या. समपुदेश पद्धतीने दिलेल्या समायोजनानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षक रूजू होण्यासाठी गेले तेव्हा अनेक महिला शिक्षकांना अडचणीच्या शाळेवर पदस्थापना मिळाल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ जालना जिल्ह्यातून एका महिला शिक्षकाची बदली औरंगाबादेत झाली. त्यांना सोयगाव तालुक्यात पदस्थापना मिळाली. त्यांचे पती पैठण तालुक्यात कार्यरत आहेत. पती-पत्नी एकत्रिकरणाचा नियम औरंगाबाद जिल्हा वगळता अन्यत्र राबविला गेला, असे या शिक्षकांनी सांगितले. शिक्षक पती-पत्नीच्या पदस्थापनेतील अंतर १२५ किलोमीटरहून अधिक आहे. अशीच स्थिती नगर जिल्ह्यातून आलेल्या एका शिक्षकाची आहे. वर्षानुवर्षे जिल्ह्यात बदलीसाठी हे शिक्षक मंडळी वाट पाहून होते. गेल्या वर्षी बदली प्रक्रिया राबविली गेली नव्हती.

नियमानुसार प्रक्रिया
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार; पदस्थापना देण्यापूर्वी सभागृहात सर्व शिक्षकांना याची कल्पना दिली गेली होती. त्यानंतर स्क्रिनवर गावे दाखवूनच पदे भरली गेली. असे असताना नियम पाळला नाही, असे म्हणणे योग्य होणार नाही. एकूणच एकमेकांच्या त्रुटी दाखविण्यात विद्यार्थ्यांची मात्र फरफट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एटीएम कार्डधारकाला ४७ हजाराला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एटीएम कार्ड बंद पडल्याची थाप मारीत माहिती मिळवून कार्डधारकाला ऑनलाइन ४७ हजारांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड वाजता घडला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानासाहेब लक्ष्मण पाटील (वय ५२ रा. बारावी योजना, शिवाजीनगर) यांच्याकडे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड आहे. त्यांना शुक्रवारी दुपारी संतोष शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. बँकेतून बोलत असल्याची थाप मारून एटीएम कार्ड बंद पडल्याची माहिती दिली. कार्ड बंद पडल्याची भिती वाटल्याने पाटील यांनी शर्माने विचालेला एटीएम कार्डच सिरियल क्रमांक सांगितला. यानंतर त्यांच्या मोबाइलवर आलेला वनटाइम पासवर्ड देखील कळवला. यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून आठ वेळा ४६ हजार ९९२ रुपये काढून घेण्यात आल्याचा मॅसेज त्यांच्या मोबाइलवर आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी बँकेला कळवत अकाउंट ब्लॉक केले. या प्रकरणी संशयित आरोपी संतोश शर्मा विरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टमाटे झाले ९० रुपये किलो

$
0
0

टमाटे झाले ९० रुपये किलो

उत्पादन घटले; विविध किडीचा प्रादुर्भाव

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात टमाट्यांचे भाव प्रचंड वाढले असून ते आता ९० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. औरंगाबादेत नाशिकसह इतर गावांतून टमाट्यांची होणारी आवक एकदम घटली आहे. आवक घटण्याचे प्रमुख कारण टमाट्यांवरील कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे सांगितले जात आहे. औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ ७० ते ८० क्विंटल टमाट्यांची आवक होत आहे. शेतकऱ्यांनाही टमाट्यासाठी बाजारपेठेत फार भाव मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या ठिकाणाहून होते आवक

नाशिक, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आदी ठिकाणाहून मुख्यत: तर काही प्रमाणात जालना, भोकरदन, नांदेड या भागातूनही टमाटे शहरात येतात, पण या भागातील शेती उत्पादनांवर सध्या रोग, किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे ‌या ठिकाणची आवक घटली आहे. टमाट्याला मुंबई-पुणे येथे पाठविण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या मुंबईत १००/१२० रुपये किलोनुसार टमाटे विकले जात आहेत. येथे अधिक भाव मिळत असल्याने उत्पादकांचा त्या बाजारपेठेत टमाटे पाठवण्याचा कल वाढला आहे.

टोपास्तो, दांड्या, घुबडा, करपा, पांढरी माशीचा परिणाम

जून महिन्यात पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या टमाट्यावर दांड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. टोपास्तो, दांड्या, घुबडा, करपा, पांढरी माशी रोगाने व किडीच्या विविध प्रकारांचा प्रादुर्भाव सध्या जाणवत आहे. अनेकांनी तर ठिबक सिंचनही करून पाहिले, परंतु उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले. अनेक शेतकऱ्यांना कीड प्रभावित रोप उपटून टाकावे लागत आहे.

टमाट्यांची आवक एकदम घटली आहे. कमीतकमी ६० रुपये व अधिकाधिक ९० रुपये किलो दराने सध्या टमाटे विकले जात आहे. ग्राहकांना गरज असल्याने ते या किंमतीतही टमाटे विकत आहेत.
- जर्नादन जाधव, भाजीविक्रेते, सिडको
टमाट्याच्या पिकावर रोग पडला आहे. किडीचा प्राद्रुर्भाव असलेली रोपे उपटून टाकावी लागत आहेत. याचा विपरित परिणाम टमाटे उत्पादनावर झाला आहे.
- महंमद शेख, शेतकरी, पळशी
टमाट्यावरील रोगामुळे अधिक पीक हाती येत नाही. यामुळे टमाटे महागले आहेत शेतकरी वर्गाचेही नुकसान अधिक होत आहे.
- संजय दळवी, शेतकरी, भोकरदन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बना औरंगाबादची ‘मटा श्रावणक्वीन’

$
0
0

बना औरंगाबादची ‘मटा श्रावणक्वीन’
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्रावण उद्यापासून सुरू होत आहे. श्रावणात निसर्गसौंदर्य कसं फुलून येतं, होना. अहो निसर्गाचं काय घेऊन बसलात, इतक्या रम्य अल्हाददायक वातावरणात आपल्यालाही आपलं सौंदर्य खुलल्यासारखं वाटतंच. नुकतंच तारुण्यात पाऊल टाकलेल्या तरुणींना तर नक्कीच वाटत असणार. होना. तुमच्या सौंदर्याला आणखी खुलविण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स घेऊन आलाय ‘मटा श्रावणक्वीन’ ही अनोखी स्पर्धा.
मैत्रिणींनो, तुमच्या सौंदर्याचा तुम्ही अभिमान नक्कीच बाळगत असणार. तर मग तुमच्या सौंदर्याला ‘चार चाँद’ लावण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स घेऊन आलाय तुमच्यासाठी, हो फक्त तुमच्यासाठीच ‘मटा श्रावणक्वीन’. औरंगाबादमध्ये होत असलेल्या मटाच्या या स्पर्धेचं यंदा दुसरं वर्ष आहे. श्रावणाच्या या आनंदी, उत्साहाच्या वातावरणात या मैत्रिणींनो, ‘मटा श्रावणक्वीन’ मध्ये सहभागी व्हा आणि तुमचे सौंदर्य अन् टॅलंटच्या जोरावर बना औरंगाबादची ‘मटा श्रावणक्वीन’.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी http://www.mtshravanqueen.com या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करता येईल. सहभागी होण्यासाठी अट एकच आहे ती म्हणजे तुमचे वय १८ ते २५ (अविवाहित) या वयोगटातील असावे. थोडक्यात काय तर कॉलेज तरुणींसाठी ही अनोखी स्पर्धा आहे. स्पर्धेच्या सहभागासाठी (अधिक माहितीसाठी) तुम्ही ९८२२६३०५५५ या क्रमांकावर संपर्कही करू शकता अथवा महाराष्ट्र टाइम्सच्या पत्त्यावर स्वतः येऊन नोंदणी करू शकता. तर मग वाट कशाची बघत आहात, चला तयारीला लागा... ‘मटा श्रावणक्वीन’ होण्यासाठी एक पाऊल पुढे टाका, मटा तुमचे स्वागत करायला तयार आहे.

नोंदणीसाठी काय कराल
http://www.mtshravanqueen.com या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करता येईल. ९८२२६३०५५५ या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करता येईल. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयात येऊन थेट नोंदणीही करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरसकट कर्जमाफी दरोडा ठरला असता’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी किंवा कर्जबेबाकी दिली, तर तो दरोडा ठरला असता. मुळात कर्जमाफी, कर्जमुक्ती किंवा इतर शब्द चुकीचेच आहेत. कर्जबेबाकी करायला हवी,’ असे प्रतिपादन शेतीप्रश्नांचे अभ्यासक, मुक्त पत्रकार अमर हबीब यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात रविवारी न. शे. पोहनेरकर व्याख्यानमालेत त्यांनी रविवारी ‘शेतकरी कर्जमाफी व शेतकरीविरोधी कायदे’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. त्यांनी पहिले व्याख्यान शनिवारी दिले. व्यासपीठावर मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह दादा गोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी हबीब म्हणाले, या सरकारचे मला अजबच वाटते. ज्याचा अभ्यास कच्चा त्याला जास्त अभ्यास करावा लागतो. यांनी ४० वर्षांत अभ्यास केला नाही का. इतकी वर्षे शेतकऱ्यांची नावे घेऊन आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातही शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. ज्या राज्यात शरद जोशींनी शेतकरी प्रश्नांवर मोठी शिकवण आणि सिद्धांत उभे केले, त्या राज्यात अजून अभ्यास करावा लागत असेल, तर सरकार म्हणून तुम्ही काय करता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘शेतीसाठी ६० वर्षांनंतरही आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार करावा लागतो ही शोकांतिका आहे. पण, तंत्रज्ञानाचा वापर करून देखील शेतकऱ्यांचे दुःख कायम आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तंत्रज्ञानाने सुटतात असे नाही. बागायती शेतीही सुखाची शेती आहे, असा समाज करून घेतला जातो. पण ते खोटे आहे. सिंचनाचे प्रमाण जास्त आहे तिथेही आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न नोकरशाहीने सोडवायचा, असा समज गृहित धरला गेल्याने नोकरशाहीला उखळ पांढरे करण्याची संधी मिळाली. तुमच्या शेतात सोनं पिकलं तरी ते लुबाडून नेण्याची व्यवस्था कायम आहे. सरकारी योजनाचा उपयोग अधिकारी आणि गावातल्या इतरांनाच होतो. त्यातून शेती सुधारत नाही,’ याकडे हबीब यांनी लक्ष वेधले.
‘शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याचे सल्ले दिले जातात. मात्र ज्यांचा मूळ धंदा तोट्यात आहे, त्याचा जोडधंदा फायद्यात कसा राहील? शेतकरी मेल्यावर विधवेला मदत करता. ती लालफितीच्या कारभारात त्या कुटुंबापर्यंत नीट पूर्ण पोहोचतच नाही. एक लाख मदत जाहीर झाली की ७० हजाराची एफडी त्याला दिली जाते, ३० हजारच रोख दिले जातात. यातून अंत्यंस्कार व इतर सोपस्कार पार पडावे हा उद्देश असतो. पण शेतकरी हयात असताना का मदत करत नाहीत,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ही चौथी कर्ज बेबाकी

माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग व मनमोहनसिंग यांच्यानंतर देवेद्र फडणवीस यांच्यामार्फत झालेली ही चौथी कर्ज बेबाकी आहे. या अगोदर सरकारी कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले नाही. यावेळी सरकारने हा धाडसी निर्णय घेतला. स्वामीनाथन यांच्या शिफारशी शेतीप्रश्नांवरील रामबाण उपाय म्हणून सांगितल्या जातात, पण त्याची तळी उचलून भांडणाऱ्यांनी तो वाचलाच नाही हे वास्तव आहे, असे अमर हबीब म्हणाले.

बंधने काढावीत

सिलिंग कायद्यामुळे शेतीत कर्तृत्व गाजवण्याची संधी संपली. आज कुणाला १०० एकर जमीन घ्यायची म्हटले, तर ते कायद्याने शक्य नाही. अमेरिकेत दोन हजार एकर, ऑस्ट्रेलियात पाच हजार एकर दरडोई शेतीचे प्रमाण आहे. भारतात ते एक एकर आहे. भांडवलदाराला मात्र याचे बंधन नाही. भविष्यात ही बंधने उठवावी लागणार आहेत. ते जितके लवकर कराल, तितक्या काही आत्महत्या वाचतील. जमीन अधिग्रहणाच्या कायद्यामुळे कारखानदारांचे भले झाले. शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, बेकारीचा प्रश्न अधिक तीव्र केला, अशी खंत अमर हबीब यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा प्रवेश देऊ नका : शिक्षण विभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑनलाइन अकरावी प्रवेशात होत असलेल्या विलंबामुळे आणि बारावीसाठी ग्रामीण भागातील कॉलेजांचे वाढते प्रमाण लक्षात घेता शिक्षण विभागाने अशा संस्थांच्या प्रवेश क्षमतेवर नियंत्रण आणण्याचे सूचित केले आहे. जादा प्रवेश दिल्यास कारवाई केली जाईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थांची असेल, असे पत्र शिक्षण विभागाने कॉलेजांना धाडले.

औरंगाबाद महापालिका हद्दीत अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. या प्रक्रियेला बिलंब होत आहे. अद्याप प्रवेशाची दुसरीच फेरी सुरू आहे. त्यासह ऑनलाइन प्रवेशातही तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी, पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यामुळे अनेक विद्यार्थी शहरापासून जवळ, ग्रामीण भागातील कॉलेजांकडे अकरावी प्रवेशासाठी विचारणा करीत आहेत. अनेक कॉलेजांमध्ये प्रवेश पूर्ण झाले. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देण्यावरही अनेक संस्थांचा भर असल्याची चर्चा असल्याने आणि परीक्षादरम्यान हे समोर आल्याने शिक्षण विभागाने कॉलेजांना क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश न देण्याचे निर्देश दिले. त्यासंदर्भातील पत्र कॉलेजांना पाठविण्यात येत आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांवरही जबाबदारी
याबाबत शिक्षणाधिकारी यांना शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११वीत प्रवेश देताना प्रवेश क्षमतेचा विचार करण्यात यावा. अनुदानित, विनाअनुदानित, उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांनी मंजूर वर्ग तुकड्या, शाखेची क्षमता विचारात घेऊन मंजून क्षमतेएवढेच प्रवेश द्यावेत. परवानगीशिवाय क्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, तर त्याला सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल, असे शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अकरावीसह बारावीलाही मागणी
शिक्षण विभागाच्या परवानगीविना क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देण्याचा प्रश्न मागील वर्षी बारावी परीक्षेतही समोर आला होता. अकरावीसह बारावीलाही ग्रामीण भागात जाण्याचा कल औरंगाबाद विभागात मोठा आहे. औरंगाबाद शहरातील अनेक कॉलेजांमध्ये अकरावी पूर्ण केल्यानंतर बारावीसाठी टीसी काढणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. हा प्रकार विचारात घेऊन शिक्षण विभागाने प्रवेश क्षमतेबाबत कारवाईबाबत सूचित केल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त टँकरग्रस्त गावांची तपासणी अद्याप गुलदस्‍त्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात तब्बल १३८ कोटी खर्चून २२८ गावे जलयुक्त करण्याचा दावा प्रशासन करत असले, तरी यावर्षी त्यापैकी ५५ गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले होते. हा प्रकार ‘महाराष्ट्र टाइम्स’ने समोर आणला होता. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र समितीने सकारात्मक अहवाल दिला असल्याचे सांगत, त्या ५५ गावांमध्ये टंचाईची तीव्रता कमी झाल्याचा दावा केला.

शिवारातील पाणी शिवारात जिरवण्यासाठी मोठा गाजावाजा करून जिल्ह्यात २०१५-१६मध्ये २२८ गावांत जलयुक्त शिवार अभियानाचे काम सुरू करण्यात आले. या गावांत अभियानाची कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आल्याचे जिल्हाप्रशासनाने जाहीर केले, मात्र मे महिन्यापर्यंत यापैकी ५५ जलयुक्त गावांची तहान ७२ टँकरने भागवण्यात येत होती. यामुळे या गावात जलयुक्त शिवार मोहिमेंतर्गत कामांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महिनाभरापूर्वी समिती तयार केली होती. या गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामे योग्य पद्धतीत झाली काय, याचा समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे.

जलयुक्त शिवार अभियानात काम पूर्ण होऊनही टँकरफेरा सुरू झालेल्या ५५ गावांमधील कामांची विशेष तपासणीचा अहवाल सकारात्मक आहे. जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्यामध्ये चांगलाच परिणाम झाला आहे. ज्या गावांमध्ये जानेवारी महिन्यात टँकर सुरू करावे लागत होते, अशा गावांमध्ये मे महिन्यात टँकर सुरू करावे लागत आहेत. हा सकारात्मक बदल आहे.
- नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात आतापर्यंत फक्त ३० टक्के पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तब्बल दीड महिना पावसाने हुलकावणी दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. आकवेडवारीत बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. निम्म्या मराठवाड्यात होत असलेल्या रिमझिम पावसामुळे दुबार पेरण्यांचे संकट टळले असले तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मराठवाड्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावली, अवघ्या १५ दिवसांमध्ये औरंगाबादसह बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाचा तब्बल दीड महिना खंड पडला. आता १७ जुलैपासून पुन्हा आठही जिल्ह्यांना पावसाने चिंब करणे सुरू केले आहे. मात्र अद्यापही मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जालना, बीड, उस्मानाबाद व लातूरच्या काही तालुक्यांमध्ये पावसाचा चांगला जोर असला तरी नांदेड व परभणी जिल्ह्याला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही फुलंब्री, सिल्लोड व वैजापूर वगळात एकाही तालुक्याने अद्यापही अपेक्षित सरासरी गाठली नाही. पैठण ४६, तर खुलताबाद तालुक्यात आतापर्यंत केवळ ६३ टक्के पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील केवळ भोकरदन तालुक्यात अपेक्षित सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. बदनापूर (४८.१) व अंबड (६७.५) तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परभणी जिल्ह्याची स्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बिकट आहे. पालम ५२.९, पाथरी ४५.६ जिंतूर ५३.६ व मानवत ६१.१ ‌टक्के असा तुलनेत कमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी ४६, तर नांदेड जिल्ह्यात माहूर ५७.३, हिमायतनगर ४६.६, देगलूर ४८.८, नायगाव ५८.६ असा पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत २७.२ टक्के पाऊस बरसला. बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, आष्टी, अंबेजोगाई, केज व धारूर तालुक्यात दमदार पाऊस झाला, तर इतर तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असून प्रत्येक तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

जिल्हानिहाय पाऊस

जिल्हा…… टक्केवारी
औरंगाबाद……२९.७
जालना… ३१.२
परभणी…… २३.५
हिंगोली… ३०.२
नांदेड…… २७.२
बीड… ३४.६
लातूर… ३५.१
उस्मानाबाद… ३६.२

एकूण…… ३०.८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा हवाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला तरच, मराठवाड्याचा संपूर्ण विकास शक्य आहे. विकासापासून दूर असलेल्या मराठवाड्यावर सातत्याने अन्याय करण्यात आला आहे. आता स्वतंत्र मराठवाड्याचा निर्धार पक्का, असे मत स्वतंत्र मराठवाडा या विषयावर रविवारी झालेल्या बैठकीत तज्ज्ञांनी मांडले. ही चळवळ वैधानिक आणि जनआंदोलनाच्या मार्गाने पुढे नेण्याचा निश्चय करण्यात आला.
स्वतंत्र मराठवाड्याच्याबाबतील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी चेतना ट्रेड सेंटरच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. पंजाबराव वडजे, जे. के. जाधव, अॅड. प्रदीप देशमुख, के. ई. हरिदास, चंद्रभान पारखे, प्रा. संजय गायकवाड, व्ही. एच. देशमुख, प्रा. सत्तार, व्ही. के. मठपती, एम. बी. काळे, ओमप्रकाश वर्मा, प्रशांत अवसरमल, एस. एल. जधव यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वतंत्र मराठवाडाबद्दलची भूमिका मांडताना वडजे म्हणाले, मराठवाड्याला सातत्याने विविध पातळीवर अन्याय सहन करावा लागला. छोट्या राज्यांची निर्मिती होत असताना, मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतंत्र मराठवाड्याचा नारा देण्याची गरज आहे. जाधव यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी योग्य असून विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल असे सांगितले. अॅड. प्रदीप देशमुख यांनी विविध क्षेत्रातील मराठवाड्याच्या अनुशेषावर भाष्य करत ही मागणी रास्त असल्याचे मत मांडले. एस. एल. जाधव म्हणाले रेल्वे, पाणी प्रश्नाबाबत मराठवाड्यावर कायम अन्याय सहन करावा लागला. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला कायम डावलण्यात आले. सातारा, वाळूज स्वतंत्र नगर पालिका झाली पाहिजे असेही मत त्यांनी मांडली. इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्याचा शैक्षणिक, आरोग्य, नोकरी अशा विविध पातळीवरी अनुशेषाकडे शासनस्तरावरून दुर्लक्ष केले जात आहे. मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला तरच मराठवाड्याचा विकास शक्य असून हा पक्का निर्धार असल्याचे तज्ज्ञांनी आपल्या मार्गदर्शनात मत मांडले.

आम्ही भीक मागत नाही

आम्ही मराठवाड्याच्या हक्काचे मागितले. परंतु, आम्हाला वेळोवेळी डावलण्यात आले. अनुशेष वर्षानुवर्षे वाढत गेला. इतर विभागाच्या तुलनेत मराठवाडा आज पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे आम्हाला या निर्धारावर ठाम रहावे लागेल असे के. ई. हरिदास म्हणाले. स्वतंत्र मराठवाड्याचा मुद्दा वैधानिक आणि जनआंदोलन अशा मार्गानेही पुढे न्यावा लागेल. त्यासह अभ्यासगटही तयार करण्यात यावा, असे मतही त्यांनी मांडले.

लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे

विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व आमदारांनी विधीमंडळात स्वतंत्र मराठवाड्याचा मुद्दा हाती घ्यावा अशी विनंती बैठकीत करण्यात आली. त्यासह केंद्र सरकारकडे खासदारांच्या माध्यमातून हा प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न व्हावा असाही विचार पुढे आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण तालुक्यात आणखी एक शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यातील कोळीबाेडखा येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. लहू कचरू मगरे, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. दुबार पेरणी व मुलीच्या लग्नाच्या तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली आहे.
अल्पभूधारक असलेल्या लहू मगरे यांना चार मुली व एक मुलगा आहे. यापैकी तीन मुलींची लग्ने झाली आहेत. यासाठी त्यानी सावकाराचे कर्ज घेतलेले आहे. गेल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने लहू मगरे यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. त्यातच लहान मुलीचे लग्न व सावकारी कर्ज कसे फेडायचे याकारणाने ते मागच्या अनेक दिवसापासून तणावात होते. अखेर, रविवारी लहू मगरे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश अंधाळे हे पुढील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व प्रकारच्या डाळी औरंगाबादेत स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुबलक आवक, डाळींचे मुबलक उत्पादन आणि छाप्यानंतर उपलब्ध झालेली डाळ यामुळे सध्या डाळींचे भाव कमी झाले आहेत. सध्या सर्वप्रकारच्या डाळी ६० ते ८० रुपये किलो यानुसार विकल्या जात आहेत.
गेल्या वर्षी तुलनेत यंदा पाऊस चांगला झाल्याने सर्वच धान्याचे उत्पादन वाढले. त्यातही कडधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यामुळे कच्चा माल स्वस्त उपलब्ध होत आहे. तसेच आयात होणाऱ्या डाळींचे भावही माफक आहेत. परिणामी, डाळींचे भाव कमी झाले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा वाढलेले कडधान्याचे उत्पादन, आयात होणाऱ्या डाळींचे योग्य भाव यामुळे गेल्या दोन महिन्यांत डाळींचे भाव निम्म्यावर आले आहेत. विशेष म्हणजे तूर व उडीद डाळीच्या भावाने वर्ष-दीड वर्षापूर्वी २०० रुपयांचा पल्ला गाठला होता. या डाळींचे भावही शंभरीच्या खाली आहेत. कडधान्य उत्पादनवाढीचा परिणाम शहर व जालन्यातील प्रसिद्ध डाळ उद्योगावर आहे. या उद्योगांतील उत्पादन सरासरी २० टक्‍क्‍यांनी वाढले आहे.
‘यंदा धान्याचे उत्पादन चांगले झाल्यामुळे सर्व प्रकारच्या डाळींचे भाव कमी झाले आहेत. सध्या मागणीही कमी आहे. येत्या महिना-दोन महिन्यांत मागणी वाढल्यानंतर भावात थोडीशी वाढ होईल,’ अशी माहिती मोंढ्यातील व्यापारी हरीष पवार यांनी दिली.

दोन वर्षांतील नीचांक

गेल्या आठवडा-पंधरवड्यात सर्व प्रकारच्या डाळींचे भाव निम्म्यावर आले आहेत. एकट्या तूर डाळीचे उदाहरण लक्षात घेतल्यास साधारण दिवाळीपूर्वी १५० ते १७० रुपये किलो असलेली तूर डाळ आज ६० ते ७० रुपये किलोने उपलब्ध आहे. मूग, उडीद आणि चणाडाळीचे भावही निम्म्याने घटले आहेत.
असे आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्नपत्रिकेतील चुकांची छाननी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) प्रश्नपत्रिकांमध्ये शुद्धलेखनाच्या झालेल्या चुकांची विषयतज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. राज्य परीक्षा परिषदेने यासंदर्भात सोमवारी तातडीची बैठकही बोलावली आहे. प्रश्नपत्रिकेतील चुका का, राहिल्या याची छाननी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील परीक्षार्थींचे निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शनिवारी ‘टीईटी’ परीक्षा झाली. राज्यभरात एक हजार १८ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात झाली. दोन लाख ९७ हजार ६७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पेपर-१ सकाळी साडेदहा ते दुपारी एक, तर पेपर-२ दुपारी दोन ते पाचदरम्यान घेण्यात आला. परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील शुद्धलेखनाच्या चुकांनी परीक्षार्थींची परीक्षा पाहिली. एका प्रश्नपित्रकेत सुमारे ५०पेक्षा अधिक चुका राहिल्या. काही शब्द बदलल्याने वाक्याचा अर्थच बदलून गेला. त्यामुळे नेमका कोणता प्रश्न अपेक्षित होता, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या गोंधळामुळे परीक्षार्थींना मनस्ताप आणि वेळही गेला.

या प्रकरणाची परिषदेने दखल घेतली असून, तातडीने याबाबत विषयतज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. कोणत्या प्रश्नांमध्ये चुका राहिल्या, शुद्धलेखनाच्या चुका कोणामुळे राहिल्या या सगळ्या बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी परिषदेने विषयतज्ज्ञांना सोमवारी बोलावले आहे. टीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत असा गोंधळ उडाल्याने डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे.

चारही प्रश्नपित्रका संचात चुका
‘टीईटी’ परीक्षेत पहिल्यांदाच बहुसंची प्रश्नपत्रिकांचे संच वापरण्यात आले. ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे प्रश्नपत्रिकांचे संच होती. प्रश्नपित्रकेतील शुद्धलेखनाच्या चुका एका प्रश्नप्रत्रिकेपुरत्या मर्यादित नव्हत्या, तर चारही प्रश्नपत्रिकेतील चुका होत्या. सगळ्याच प्रश्नसंचामध्ये चुका राहिल्याने याप्रकरणी परिषद नेमकी काय भूमिका घेते याकडे परीक्षार्थीचे लक्ष लागले आहे.

तज्ज्ञांसह परीक्षार्थींचेही मते विचारात घेणार
प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत विषयतज्ज्ञांकडून छाननी केली जाणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर विषयतज्ज्ञ अहवाल सादर करतील. त्याचवेळी उत्तरसूचीवर किंवा परीक्षार्थींकडून तक्रारी आल्यानंतर त्यांची मते ही विचारात घेतली जाणार आहे. तज्ज्ञ आणि परीक्षार्थींची मते जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत सोमवारी तातडीने तज्ज्ञांना बोलाविण्यात आले आहे. प्रश्नपत्रिकांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर परीक्षार्थींचेही विचारात घेतली जातील. त्यानंर काय करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. लगेच निर्णयाबाबत सांगणे उचित ठरणार नाही.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद, पुणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरोदे हल्लाप्रकरणी एका आरोपीस अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
आरटीआय कार्यकर्ते चंद्रकांत सरोदे हल्लाप्रकरणी पैठण पोलिसांनी १२ दिवसानंतर एका संशयित आरोपीला अटक केली आहे. मुकेश चंडाले,असे त्याचे नाव असून त्याला पैठण कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते व दावरवाडीचे उपसरपंच चंद्रकांत सरोदे व त्यांचे मित्र रावसाहेब चोरमले १० जुलै रोजी शहरातील प्रतिष्ठान कॉलेज येथून परत येत असताना तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात चंद्रकांत सरोदे हे गंभीर जखमी झाले. भरदिवसा व शहराच्या मध्यभागी सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने शहरात व तालुक्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. आरोपींना पकडण्याचे अाव्हान पोलिसांसमोर होते. अखेर, पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री मुख्य संशयित आरोपी मुकेश चंडाले याला शहरातील नाथमंदिर परिसरातून अटक केली. त्याला पैठण कोर्टाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर सोनावणे यांनी दिली. या प्रकारणातील उर्वरित दोन्ही आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सोनावणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीटलाइनची अडचण होणार दूर

$
0
0

पीटलाइनची अडचण होणार दूर

चिकलठाणा येथे पीटलाइन तयार करण्यास तत्वतः मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

लांबपल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीसंदर्भात औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाइनचा प्रस्ताव देण्यात आला होता. दक्षिण मध्य रेल्वेकडून त्याबाबत हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच चिकलठाणा येथे काम सुरू होण्याचे संकेत रेल्वे विभागाकडून मिळाले आहेत.

औरंगाबाद रेल्वे मार्गावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असले तरी या रेल्वेस्टेशनवरून सुटणाऱ्या रेल्वेची संख्या फक्त दोन आहे. येथील प्रवासी संख्या पाहता यात वाढ होणे, विशेष रेल्वे सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वे संघटना, स्थानिक खासदारांनी नवीन रेल्वे सुरू करण्याची वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, या ठिकाणी पीटलाइन नसल्याने या रेल्वे सुरू होऊ शकत नसल्याचे कारण दमरेकडून पुढे केले जात होते. आता या ठिकाणच्या पीटलाइनची दखल महाव्यवस्थापकांनी घेतली असल्याने हे काम पुढे जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी पीटलाइन करण्याबाबत वर्ष २०१२ पासून रेल्वे संघटना मागणी करीत आहेत. या मागणीचा विचार करून तत्कालीन अधिकाऱ्यांनी दौलताबाद, गेट क्रमांक ५३ आणि चिकलठाणा या तीन जागांची पाहणी केली होती. दौलताबाद व गेट क्रमांक ५३ येथे जागा उपलब्ध नसल्याने पीटलाइन होऊ शकत नसल्याची माहिती रेल्वे अभियांत्रिकी विभागाकडून देण्या आली. अखेर चिकलठाणा येथे पीटलाइन तयार करण्यासाठी रेल्वेने तयारी दर्शविली. ही पीटलाइन तयार करण्याबाबतचा प्रस्ताव सिकंदराबाद येथे अंतिम टप्प्यात आहे. या पीटलाइनसाठी सुमारे २२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चास मंजुरी मिळाल्यानंतरच हे काम सुरू होऊ शकणार आहे.
स्टेशनवरील पीटलाइनचा उपयोग बंद
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर १६ डब्ब्यांची पीटलाइन आहे. काही वर्षांपूर्वी पीटलाइनचा वापर केला जात होता. मात्र, कालांतराने तो बंद झाला. या ठिकाणी १६ डब्यांपर्यंतच पीटलाइनचा वापर होऊ शकतो. मात्र, त्यापेक्षा जास्त डब्यांच्या रेल्वेंसाठी त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठी पीटलाइन तयार आवश्यक असल्याचे दमरेचे म्हणणे आहे.
असा राहिला पीटलाइनचा इतिहास
औरंगाबाद रेल्वे स्टेशनला पीटलाइन तयार करण्यासाठी तत्कालीन विभागीय व्यवस्‍थापक सुनीलसिंह सोईन यांच्या काळात प्रयत्न सुरू झाले होते. यासाठी दौलताबाद, चिकलठाणा आणि गेट नंबर ५३ जवळ पीटलाइनसाठी जागेची पाहणी करण्यात आली होती. सुनीलसिंह सोईन यांच्यानंतर डॉ. पी. सी. शर्मा यांच्या काळात ही पीटलाइनचा विषयावर चर्चा करण्यात आली होती. पीटलाइन तयार करण्यासाठी नांदेड विभागीय व्यवस्‍थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी प्रयत्न सुरू केले होते. महाव्यवस्‍थापक विनोद कुमार यादव यांनी या विषयाला मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पीटलाइनचे फायदे
औरंगाबादहून सध्या औरंगाबाद हैदराबाद, औरंगाबाद रेनिगुंठा या दोन गाड्या सुरू आहेत. ही पीटलाइन झाल्यानंतर या स्टेशनवरून बंगळूर दिल्ली, हावडा, तसेच अन्य मार्गावरील लांबपल्‍ल्याच्या गाड्या सुरू होण्यास मदत होणार आहे. यामुळे पीटलाईन होणे आवश्यक आहे.

२०१२ पासून औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर पीटलाइन तयार करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीची महाव्यवस्‍थापक विनोद कुमार यादव यांनी दखल घेतली आहे. लवकरच चिकलठाणा येथे पीटलाइन तयार करण्याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

ओमप्रकाश वर्मा

मराठवाडा रेल्वे विकास समिती, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूला कारणीभूत; दुचाकीस्वारावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मोटारसायकल घसरून पडल्यानंतर एकाचा तरुणाचा मृत्यू झाला. पण, या प्रकरणी मृत व्यक्तिच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून मोटारसायकल चालवणाऱ्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हात्राळ (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील रहिवासी भगवान लक्ष्मण गर्जे हे मोटारसायकलवरून (एम एच १६ ए ए ७६५६) प्रवास करत होते. ते मोटारसायकल चालवत होते, तर मागे एकना‌थ यशवंत गिते हे बसले होते. ही मोटारसायकल इसारवाडी फाटा येथे ६ जुलै रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घसरली, तिच्यावरून पडल्याने एकनाथ गिते हे गंभीर जखमी झाले, त्यांचा उपचारादरम्यान मुत्यू झाला. या प्रकरणी २१ जुलै रोजी त्यांचा मुलगा सोमनाथ एकनाथ गिते यांनी, गर्जे यांनी निष्काळजीपणाने मोटारसायकल चालविल्यामुळे वडील एकनाथ गिते यांचा मुत्यू झाल्याची फिर्याद वाळूज पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून गर्जे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्ध मृत्युमुखी शौचालय बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला आहे. बालाजी गिरजुबा ठाकरे (वय ७० रा. सिंदखेडराजा) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडली. या प्रकरणी सिंडखेडराजा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पलंगावरून पडून मृत्यू झोपेत असतांना पलंगावरून पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे. शकुंतलाबाई कडप्पा नागरे (वय ७० रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा), असे या महिलेचे नाव आहे. नागरे या १७ जुलै रोजी सांयकाळी पलंगावरून पडून जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू सापाने चावा घेतलेल्या तरूण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान घाटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मृत्यू झाला. भगवान यादवराव सारेमारे (वय ३२ रा. नांजा, ता. भोकरदन) असे त्यांचे नाव आहे. शेतात काम करताना त्यांना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सापाने चावा घेतला होता. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मोटार सायकल चोरी पिसादेवी सारासिद्धी रोहाउस येथील रहिवासी कैलास अमृत काळे यांच्या घरासमोरून ८ जुलै ते ९ जुलै या काळात हँन्डल लॉक करून ठेवलेली मोटार सायकल (एम एच २० सी डी ९९९८) चोरीस गेली. या प्रकरणात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेसोबत मारहाण कारला टक्कर मारून महिलेला मारहाण करणाऱ्याविरुद्ध चौघांविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पीडित महिला शुक्रवारी वडिलांसोबत कारमधून गावी जात होती. त्याच्या कारला मागून येणाऱ्या दुसऱ्या मोटारीने (एम एच २० डी व्ही ६९१८) धडक दिली. त्यानंतर दुसऱ्या मोटारीतील चौघांनी महिला व तिच्या वडिलांना मारहाण केली. याशिवाय महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी शेख आसिफ व त्यांच्या सोब‌तच्या तिघांविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घरमालकावर गुन्हा पोलिस ठाण्यात भाडेकरूंची माहिती दिली नसल्याच्या आरोपावरून बारूदगर नाला, जुना बाजार येथील रहिवासी मोहम्मद फय्याजोद्दीन यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेला मारहाण को‌र्टात खटला दाखल असताना पतीच्या घरी आलेली महिला व तिच्या आईला पती व इतरांनी मारहाण केल्याचा गुन्हा सातारा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील खोपेचाळ येथील रहिवासी आरती विकास प्रधान यांना पती विकास प्रधान येना लग्नानंतर पटत नसल्याच्या कारणावरून हाकलून दिले होते. त्यानंतर कोर्टात पतीविरुद्ध खटला दाखल केल्यानंतर त्या हायकोर्ट कॉलनी (सातारा) परिसरातील घरी आली होती. त्यावेळी पती विजय प्रधान, लता प्रधान, अर्चना सोनंकांबळे, किशोर सोनकांबळे, माया सोनकांबळे यांनी विवाहिता व तिच्या आईला मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसूत्र पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन तडीपारांविरुद्ध गुन्हे शहरातून तडीपार केले असताना शहरातच वास्तव्य करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिटी चौक पोलिस ठाण्यात सिकंदर पटेल (रा. हर्सूल) व सातारा पोलिस ठाण्यात किरण प्रकाश सनान्से (रा. सूर्यदीपनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात एक जखमी बीडबायपास रोडवरील न्यु हिंदूस्थान न्यु तामिळनाडू ट्रान्सपोर्टसमोर आर. सिकंदर बादशाह यांना मोटार सायकलने (एम एच २० सी एन ०१६६) धडक देऊन जखमी केली. या अपघातात सिकंदर यांचे दोन्ही पाय तुटले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा अवैध दारू विक्रीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जनार्धन कन्हैय्या पिंपे, शेख मलंग (रा. गंगापूर) या दोघांकडून पोलिसांनी ७२ देशी दारूच्या बटल्या, मोटार सायकल जप्त करून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देशी दारूच्या २० बाटल्या विकताना दीपक राजेंद्र चव्हाण (वय २०, रा. हनुमान चौक, चिकलठाणा) याला अटक करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालना​ ड्रायपोर्टच्या कामाला गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
मराठवाडा आणि लगतच्या विदर्भातील उद्योग, व्यापार व शेतकऱ्यांच्या मुलभूत विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या जालन्यातील ड्रायपोर्ट जमिनीवरील बंदर उभारणीच्या कामाला गती मिळाली असून ड्रायपोर्टच्या संपूर्ण जमिनीवर संरक्षण भिंतीच्या उभारणीचे सुमारे चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे. दिनेगांव रेल्वे स्थानकावर मालधक्का उभारणी करण्यात येणार असून तेथूनच ड्रायपोर्टच्या अंतर्गत रेल्वे लाईन्स अंथरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ड्रायपोर्टच्या एकूण १८५ हेक्टर संपादित जमिनीवरील पहिल्या टप्प्यात ६० हेक्टर जमिनीवर कार्यालयीन इमारती, अंतर्गत रस्ते याचा विकास आराखडा तयार झाला आहे.
जालन्यातील औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतीला लागूनच औरंगाबादच्या दिशेने असलेल्या दिनेगांव या सध्याच्या परिस्थितीत बंद करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. इंडियन पोर्ट रेल कार्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) या केंद्र सरकारने नव्याने सुरुवात केलेल्या पोर्टवरून मालवाहतूक दळणवळणासाठी रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या महामंडळाचे कार्यकारी संचालक अनुप अग्रवाल यांनी जालन्यातील ड्रायपोर्टच्या अंतर्गत रेल्वे लाईन्स अंथरण्याच्या कामाच्या प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दिनेगांव रेल्वे स्थानकाची पाहणी केली.

ड्रायपोर्टच्या अंतर्गत कार्यालयीन इमारती व अंतर्गत रस्ते, वीज पुरवठा लाईन्स अंथरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या संदर्भातील नकाशे तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती ड्रायपोर्टच्या संकल्प अहवाल तयार करणाऱ्या ‘इ अॅँड वाय’ या कंपनीचे संचालक प्रशांत गुप्ता यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी ड्रायपोर्टच्या संपूर्ण उभारणी संदर्भात नुकतीच सविस्तर पाहणी केली. स्थानिक पातळीवरील अनेक महत्त्वाच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत. ड्रायपोर्ट हा जालना ते औरंगाबाद या महामार्गासोबत जोडला जाण्यासाठी जालन्यातील शासकीय तंत्रनिकेतन समोरच्या दिशेने दीड किलोमीटर विशेष चौपदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. हाच रस्ता पुढे सरळ मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासोबत जोडला जाणार आहे. औरंगाबाद-जालना हा सध्याचा चौपदरी रस्ता सहापदरी करण्यात येणार आहे. ड्रायपोर्ट ते औरंगाबाद आणि पुढे नगर अशी विशेष स्वतंत्र मालवाहतूकीसाठी रेल्वेमार्गाची लाईन अंथरण्याची योजना आहे.


जालन्यातील ड्रायपोर्ट हा जालना रेल्वे स्थानकापासून औरंगाबादच्या दिशेने दहा किलोमीटर अंतरावरील दिनेगांव रेल्वे स्थानकासोबत जोडला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ६० हेक्टर जमीन विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये अंतर्गत रेल्वे लाईन्स अंथरण्याच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ड्रायपोर्टच्या मालवाहतूकीसाठी विशेष प्लॅटफॉर्म, कंटेनर्सची वाहतूक व्यवस्था यांच्या संकल्पचित्रावर उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्याच्या उभारणीच्या कामाची जबाबदारी इंडियन पोर्ट रेल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आली आहे.
विवेक देशपांडे, संचालक, जेएनपीटी




केंद्रीय मंत्री गडकरींकडून सुखद धक्का
ड्रायपोर्टचा प्रकल्प मराठवाड्यात जालन्यात उभारावा यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे यांचे मोठे योगदान आहे. डॉ. पंढरे हे मुळचे जालन्यातील रहिवासी असून त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत जालन्यातील उद्योजकांच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणली. औरंगाबाद जवळच्या दौलताबाद माळीवाडा रेल्वेच्या स्थानकावर कंटेनर पासिंग व कस्टम क्लिअरन्स सुविधांची मागणी करणारे निवेदन गडकरी यांना देण्यासाठी ते गेले होते. त्यावेळेस डॉक्टर तुमच्या जन्मगावी ड्रायपोर्ट उभारतोय, असे म्हणत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सर्वांनाच सुखद धक्का दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ निसर्गाच्या कुशीतील रामलिंग सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
धो-धो कोसळणारा धबधबा, पिसारा फुलवून स्वागतासाठी सज्ज असलेले मोर, आणि अवखळ चाळ्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी वानरे, सोबतीला हिरवागार निसर्ग भाविक आणि पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.
सोमवारपासून सुरू होत असलेल्या श्रावणमासासाठी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री क्षेत्र रामलिंग देवस्थानही आता भाविकांच्या व पर्यटकांच्या
स्वागतासाठी सज्ज झाले आहे. उस्मानाबादसह बीड, लातूर, सोलापूर जिल्ह्यातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान आता श्रावण महिन्यात भाविकांनी फुलून जाणार आहे.
उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील येडशी गाव परिसरात बालाघाट पर्वतरांगेत वसलेल्या श्री क्षेत्र रामलिंग देवस्थानात श्रावण महिन्यात दरवर्षी भक्तांची मोठी गर्दी असते. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या देवस्थानाची ख्याती दूरवर पसरलेली आहे. हा परिसर पूर्वीचे दंडकारण्य म्हणूनही ओळखले जाते. डोंगराच्या कुशीत, चोहोबाजूंनी अभयारण्याचा वेढा घातलेल्या निसर्गरम्य वातावरणात श्री क्षेत्र रामलिंग देवस्थानाकडे दर्शनासाठी
येणाऱ्या भक्तांची व निसर्ग सौंदर्याचा आंनद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.
हेमाडपंती बांधणीचे मंदिर आणि कोरीव नक्षीकाम केलेल्या भिंती भक्तांचे लक्ष वेधून घेतात. श्रावण महिन्यात येथे सर्वदूर हिरवळ पसरलेली असते. मंदिरात जाण्यासाठी पूर्व, पश्चिम आणि उत्तरेला असे तीन दरवाजे आहेत. मंदिराच्या पूर्वेस गोमुख तीर्थ असून, तेथे पाण्याचा अखंड झरा वाहात असतो. त्यासोबतच
येथील नयनरम्य धबधबा भक्तांसह पर्यटकांचे आकर्षण आहे. मंदिराच्या चारही
बाजूला डोंगर, दाट वनराई असल्याने येथे माकडे, वानरे, मोर, ससे, हरणे
यासह अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे. वनविभागाने या परिसराला रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.

भाविकांच्या स्वागताची तयारी पूर्ण
श्रावणात येथील शिवलिंगाची भक्ती भावाने पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात. यांच्या स्वागताची जोरदार तयारी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून येथे हॉटेल्स, विविध साहित्यांची दुकानेही थाटण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाब विचारण्यापूर्वी योग्य धोरण ठरवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
शेती करणे अथवा शेतकयांच्या घरी जन्माला येणे गुन्हा आहे काय ? ज्यांच्यामुळे शेती आणि शेतकयांची दयनीय अवस्था झाली, त्यांना एक ना एक दिवस नवी पिढी जाब विचारल्याखेरीज राहणार नाही. आपल्या अधिकार आणि हक्काची जाणीव झालेली ही पिढी जाब विचारायला येण्यापूर्वी योग्य धोरण ठरवा. अन्यथा अराजकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्यावतीने रविवारी गरजू व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांना मदतनिधी आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई धनंजय पाटील, शिवनिश्चल ट्रस्टचे यशवंत गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याला आता ७० वर्षांचा काळ लोटून गेला. तरीदेखील अशा पद्धतीच्या मदत निधी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करावे लागते, ही आपल्यासाठी शरमेची बाब आहे. एका दाण्याचे हजार दाणे करणारा जादूगार म्हणजे शेतकरी मात्र आज त्याच्या पाल्यांना दुसर्यावर विसंबून राहावे लागते. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, हे शोधून त्यात बदल घडविण्यासाठी आपला अविरत संघर्ष सुरू असल्याचे प्रतिपादन शेट्टी यांनी यावेळी केले.
देशाला ९ हजार कोटींचा चुना लावून पळून जाणार मल्ल्या एकीकडे तर १५ हजार रुपयांसाठी आत्महत्या करणारा शेतकरी दुसरीकडे आहे. देशात सरळसरळ नवीन फाळणी झाली आहे. त्याविरोधात आज ना उद्या ही पिढी प्रश्न उठविल्याखेरीज राहणार नाही. त्यावेळी भलेही आपण नसू मात्र परिवर्तन अटळ आहे, असा आशावाद व्यक्त करून शिवनिश्चल ट्रस्टने सुरू केलेल्या कार्याचे खासदार शेट्टी यांनी कौतुक केले.

होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात
जिल्हा आणि परिसरातील आत्महत्याग्रस्त कुटूंबातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ३० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मदत देण्यात आली. कपडे, ब्लँकेट, शालेय शैक्षणिक साहित्य आणि रोख रक्कम देऊन शिवनिश्चल ट्रस्टच्यावतीने गतवर्षीप्रमाणे यंदाही होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीजी प्रवेशाचा गोंधळ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया समजत नसल्यामुळे शेकडो विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. प्रवेशाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाइन असली तरी पुरेशी माहिती मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे; तसेच पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या निकालावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांची भेट घेऊन उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सध्या ऑप्शन फॉर्म सुविधा केंद्रावर २९ जुलैपर्यंत जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरात मॅनेजमेंट सायन्स विभाग (विद्यापीठ कॅम्पस), देवगिरी कॉलेज, एस. बी. कॉलेज, मौलाना आझाद कॉलेज आणि विवेकानंद कॉलेज ही पाच सुविधा केंद्रे आहेत, मात्र बहुतेक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असून, प्रवेशाचा गोंधळ वाढला आहे. हेल्पलाइनला संपर्क साधल्यानंतर पुरेशी माहिती मिळत नसल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. पदव्युत्तर प्रथम वर्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. प्रात्यक्षिकाचे गुण गृहीत न धरणे, गैरहजर नोंद करणे अशा त्रुटींमुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या प्रकारावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे निकाल पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे.

शेकडो विद्यार्थी एकाच विषयात अनुत्तीर्ण आहेत. काही विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक विषयांचे गुण गृहीत धरलेले नाही. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही गुणपत्रकात गैरहजर दाखवले आहे. या प्रकाराचा स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाने निषेध करीत परीक्षा नियंत्रक डॉ. राजेश रगडे यांना निवेदन दिले.

जलदगती प्रक्रियेने सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सुनील राठोड, प्राजक्ता शेटे, ओम पुरी, सत्यजीत मस्के, लोकेश कांबळे, आकाश देऊळगावकर, कृष्णा घुले, सुरेखा सोनवणे आदी उपस्थित होते.

‘पेट’ चार महिन्यांत घ्या
तीन वर्षांनंतर झालेल्या पीएचडी पूर्वपरीक्षेचा (पेट) निकाल फक्त ३.२ टक्के लागला आहे. त्यामुळे हजारो संशोधक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. चार महिन्याच्या आत ‘पेट’ परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. याबाबत कुलगुरूंना निवेदन दिले आहे. पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे निकाल वेळेवर लावा, महाविद्यालयात पदवीच्या जागा वाढवून द्याव्यात आणि एमफिल, पीएचडी संशोधनासाठी शेतकरी-शेतमजुराच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाच्या वृद्ध वडिलास महिलेने लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका ९३ वर्षांच्या नागरिकाला चहा पिण्याचे आमिष दाखवून घरी नेऊन एका महिलेने ३० हजारांची अंगठी काढून घेतली. पण, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासात महिलेला अटक करून अंगठी जप्त केली.
सांडू सखाराम सिरसाठ (वय ९३, रा. रहिमाबाद ता. सिल्लोड) हे सध्या एन-११ साई मंदिराजवळ राहतात. ते पोलिस असलेल्या मुलाला भेटण्यासाठी १५ दिवसांपूर्वी आले होते. सिरसाठ हे रविवारी सकाळी दहा वाजता बाळासाहेब ठाकरे उद्यानाजवळ फिरत असताना एक महिला त्यांच्याजवळ आली. तिने बाबा माझ्या घरी चहा प्यायला चला, अशी गळ घातली. सिरसाठी यांनी होकार दिल्यानंतर त्यांना या महिलेने रिक्षातून घरी नेले. चहा पाजवून माझ्या मुलीचे शेत पाहून येऊ असे सांगत त्यांना पैठण रोडवर नेले. तेथील एका ठिकाणी पत्र्याच्या शेडजवळ दोघे उतरले. लक्ष्मी देवीच्या चबुतऱ्याकडे सिरसाठ यांना घेऊन जाऊन अंगठ्या काढून देण्यास फर्मावले, मारहाण करीत फेट्याने गळा आवळण्याची धमकी देत अंगठी काढून घेतली. कानातील बाळी ओरबाडत असताना सिरसाठ ओरडल्याने महिला पळून गेली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही मिनीटात जेरबंद

सिरसाट यांना लुटलेल्या महिलेचे नाव जयाबाई सुरेश मगरे, असे आहे. तिने तीन वर्षांपूर्वी ओळख झाल्याचे सांगून सिरसाट यांना टीव्ही सेंटर परिसरातील घरी नेले. त्यांच्या हातात दोन अंगठया व कानात बाळी असल्याचे हेरल्यानंतर रिक्षाने कांचनवाडीत नेले. जयाबाईने मधल्या काळात दोन वेळेस रिक्षा बदलली. तेथे तिने वृद्धाला लुबाडले. पण, सिरसाठ हे ओरडल्याने नागरिक जमा झाले. पण, त्यांना काय झाले ते नेमके सांगता येत नव्हते. याचा फायदा घेत जयाबाईने काढता पाय घेतला. दरम्यान, बिडकीन पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने महानुभाव चौकातील पोलिस चौकीजवळ सिरसाठ यांना आणून सोडले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला घटनास्थळी पाठवले. दरम्यान दयाबाई ही संशयास्पदरित्या येत असताना गुन्हे शाखेच्या नजरेस पडली व तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हा उघड झाला.

पोलिस कोठडी

संशयित आरोपी जयाबाई सुरेश मगरे (वय ४३, रा. आयोध्यानगर, हडको) हिला महिलेस मंगळवारपर्यंत (२५ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी दिले. तिला सोमवारी कोर्टात हजर केले असता पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images