Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महामंडळाच्या आदेशाने होणार ६० बस बंद ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
६० टक्के प्रवासी भारमान असलेल्या लांब आणि मध्यम लांब पल्‍ल्याच्या बस फेऱ्या बंद कराव्यात, असे आदेश एसटी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्‍थापकांनी जारी केले आहेत. या आदेशामुळे औरंगाबाद ‌विभागातील ६० बस बंद होण्याची शक्यता आहे.
जुलैच्या दुसऱ्या दहा दिवसांतील आढावा घेतला असता, काही लांब आणि मध्यम पल्‍ल्याच्या फेऱ्यांचे भारमान ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार, आरक्षण स्थिती लक्षात घेऊन व प्रवाशांची तक्रार येणार नाही, याची काळजी घेऊन फेऱ्या रद्द कराव्या, असे या आदेशात म्हटले आहे. औरंगाबाद विभागात एकूण १५०० पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात. त्यापैकी ६० बसच्या १५० ते २०० फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे जळगाव, धुळे, नाशिक, लातूर, अंबाजोगाई, अकोला, सोलापूर, निजामाबाद, गुलबर्गा, गांगापूर, विजापूर, अहमदाबाद, सुरत मार्गावरील बस बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धुळे विनावाहक बंद?

औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयातून धुळे व नाशिक विनावाहक सेवा सुरू करण्यात आली आहे. या आदेशानुसार, धुळे विनावाहक बस सेवा बंद पडण्याची भिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांचा तिसरा डोळा सिल्लोडमध्ये बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ठिकाणी शहर पोलिसांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवण्यात अडचणी येत आहेत. हे कॅमेरे तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.
सिल्लोड शहरातील बसस्थानक परिसर, तहसील कार्यालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी महाराज पुतळा परिसर, प्रियदर्शनी चौक, महावीर चौक आदी चौकात नगर पालिकेच्या साह्याने शहर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यातून टिपल्या जाणाऱ्या हालचाली शहर पोलिस ठाण्यामध्ये निरीक्षकांना दिसत होत्या. पण, शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे शहरात एखादी घटना घडण्यास पोलिसांना त्या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी किंवा तपासासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हे कॅमेरे सुरू गरजेचे आहे. शहरात अनेक वाहनांची रोज ये-जा सुरू असते. त्यांच्या हालचारी टिपल्या जात नाहीत.

उत्सवांचा काळ

आगामी काळ सण व उत्सवाचा आहे. दहीहंडी, पोळा, गणशोत्सव आदी महत्त्वाचे सण आहेत. त्यामुळे शहरातील हालचाली टिपण्यासाठी या तिसऱ्या डोळ्याची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सण उत्सवाच्या काळात कॅमेरे सुरू राहावेत, यासाठी हालचाल करणे गरजेचे आहे.

कॅमेऱ्याचा शहर पोलिस ठाण्यात असलेला डिस्प्ले खराब झालेला आहे. मी नव्यानेच रुजू झालो असून ही यंत्रणा हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली झाली आहे. ही यंत्रणा दुरुस्त करून दररोज माहिती घेतली जाईल.
-भगीरथ देशमुख, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर भाचीने विकला मावशीचा बंगला ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉक्टर भाचीने मावशीच्या लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारताना तिचा बंगला देखील ६७ लाखांत विकल्याचे उघड झाले आहे. ही माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.
अमेरिकेत राहत असलेल्या मावशीने एन ४ भागातील बंगला भाचीला राहण्यासाठी दिला होता. एमबीबीएसची विद्यार्थी असलेल्या भाचीच्या दिमतीला अलीशान कार व कारचालक राजू मोटे देखील होता. या दोघांनी फेब्रुवारी ते जुलै या काळात घरातील पाच लाख रुपये, सात लाखांचे दागिने, फर्निचर, भांडे, स्कुटी आदी ऐवज विकून पोबारा केला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस बंगल्यावर गेले असता तेथे तिसऱ्याच नावाची पाटी दिसली. त्यांनी तेथे चौकशी केली असता, त्या व्यक्तीने ६७ लाख रुपयांत बंगला खरेदीचा करार झाल्याचे पोलिसांना सांगितले. प्राथमिक तपासात बंगला विकल्याचे उघड होत असले तरी भाची व आरोपी राजू मोटे सापडल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल, असे पोलिस निरीक्षक कांबळे यांनी दिली. पुणे येथील एका नामांकित कॉलेजात भाचीचे अॅडमिशन आहे. त्यामुळे एक पथक पुणे व दुसरे पालम जि. परभणी या मूळ गावी गेल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलितांवरील अत्याचारात वाढः गंगाधर गाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. दलित आणि अल्पसंख्याक समाजावरील अत्याचाराच्या विरोधात राज्यव्यापी परिषदेद्वारे प्रत्येक जिल्हयात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या मागणीवर मुंबई येथे मोर्चा मोर्चा काढण्यात येणार आहे,’ अशी घोषणा माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी केली.
संत एकनाथ रंगमंदिर येथे पॅथर्स रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित राज्यव्यापी दलित-अल्पसंख्याक परिषद गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत माजी मंत्री गंगाधर गाडे, सहारनपूर येथील अग्निभास्कर बौद्ध, ‌मुंबईचे विद्रोही नेते सुबोध मोरे, सूर्यकांता गाडे, सिद्धांत गाडे, पंडित नवगिरे, एम. एन. पवळे, निवृत्ती आडू गुरूजी यांची उपस्थिती होती. या परिषदेत सहारनपूरचे दलित नेते अग्न‌िभास्कर बौद्ध यांनी तेथील परिस्थिती सांगितसी. उत्तर प्रदेशात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर जातीय दंगली सुरू झालेल्या आहेत. उचवर्गीय दलित समाजावर हल्ले करत असून पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत,असा आरोप त्यांनी केला. या परिषदेचे सूत्रसंचालन अशोक गरुडे, प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यांनी केले.

परिषदेतील ठराव

विविध महामंडळांचे कर्ज माफ करावे, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडून बेरोजगारांना कर्जवाटप सुरू करा, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण थांबवाष अट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप लागू करा, गुणवत्तेनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरीत खुल्या प्रवर्गातून समाविष्ट करा, महागाई निर्देशकांनुसार शिष्यवृत्ती वाढ करा, शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करा, नोकरीतील अनुशेष भरा, सहारनपूर येथील दलितांना न्याय द्या, आदी ठराव या परिषदेत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईला गालबोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने शुक्रवारपासून अवैध व बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली. या कारवाईला चिकलठाणा येथे नागरिकांनी विरोध करीत दगडफेक केली. त्यात जेसीबी मशीनच्या केबीनची काच फुटली. पोलिसांनी विरोध करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यात काही महिला व पुरुषांचा समावेश होता. अाविष्कार कॉलनीमध्येही नागिरकांनी मंदिर पाडण्यास विरोध केला. त्यामुळे पालिकेच्या पथकाला या ठिकाणाहून कारवाई न करताच परतावे लागले.

महापालिकेच्या क्षेत्रातील अवैध व बेकायदा धार्मिक स्थळे पाडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशाची प्रत तीन दिवसांपूर्वी महापालिकेला मिळाली. त्यानंतर आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईचे नियोजन करून शुक्रवारी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. कारवाईसाठी चार पथके नेमण्यात आली आहेत. यापैकी करमूल्य निर्धारक व संकलक वसंत निकम यांच्या नेतृत्वाखालील पथक चिकलठाणा भागातील संतोषीमाता नगरमध्ये कारवाईसाठी गेले असता, तेथे नागरिकांनी विरोध केला. तेथील बुद्ध विहार व हनुमान मंदिर ही धार्मिक स्थळे कारवाई करण्याच्या यादीत होती. पालिकेच्या पथकाने ही दोन्ही धार्मिक स्थळे पाडली. जवळच असलेला पुतळा पाडा व याच परिसरात आणखी एक मंदिर आहे. ते देखील पाडा, अशी मागणी करीत नागरिकांनी पालिकेच्या पथकाला गराडा घातला. काही जणांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळे जेसीबीच्या केबिनची काच फुटली. त्यावेळी पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. पोलिसांनी २० ते २५ नागरिकांना ताब्यात घेतले. त्यात काही महिलांचा देखील समावेश होता.

मंदिर पाडण्याची नागरिकांची ग्वाही
सिडको एन-६, अाविष्कार कॉलनीमधील पावन हनुमान मंदिर पाडण्यासाठी उपायुक्त अय्युब खान व नगररचनाकार जयंत खरवडकर यांच्या नेतृत्वाखालील पथक दुपारी तीनच्या सुमारास पोचले. यावेळी तेथील नागरिकांनी पथकाला विरोध केला. नगरसेवक मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक वीरेंद्र गादगे यांच्यासह अनेक नागरिक जमा झाले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन आम्हाला करू द्या, विरोध करू नका, असे पथकातील अधिकारी नागरिकांना सांगत होते. शेवटी नागरिकांनी, ‘पूजा, अभिषेक करून मंदिर आम्ही पाडून घेतो. त्यासाठी दोन दिवसांचा वेळ द्या,’ अशी विनंती केली. नागरिक विरोध करीत असताना पोलिस मात्र हस्तक्षेप करीत नव्हते. त्यामुळे मंदिर न पाडता पथक परतले. नागरिकांना त्यांनी एक दिवसाची मुदत दिली. या मुदतीत मंदिर पाडून घेण्याची ग्वाही नागरिकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसहा हजार मतदार बाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी पदवीधर वर्गात ४३ हजार मतदारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. ऑफलाइन नोंदणीत साडेसहा मतदार बाद झाले असून, अंतिम छाननीत बाद मतदारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या छाननीनंतर निवडणूक वेळापत्रक घोषित केला जाणार आहे.

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभा निवडणुकीसाठी ऑनलाइन मतदार नोंदणी पूर्ण झाली. या नोंदणीत सहा प्रवर्गात नोंदणी झाली पदवीधर प्रवर्गात तब्बल ४३ हजार ५२० मतदारांनी नोंदणी केली. आतापर्यंतच्या निवडणुकीतील ही विक्रमी नोंदणी असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले होते. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात जेमतेम २० हजार नोंदणी झाल्यामुळे मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. मुदतवाढ दिल्यानंतर आकडा ४३ हजारांवर पोचला. ऑनलाइन नोंदणीनंतर ऑफलाइन नोंदणीची प्रक्रिया झाली. फक्त ३६ हजार ९८८ मतदारांनी सत्यप्रत सादर केली आहे. शेवटच्या दिवसांपर्यंत साडेसहा हजार मतदार बाद ठरले आहेत. सध्या जमा झालेल्या सत्यप्रतींची छाननी सुरू आहे. या छाननीत आणखी मतदार बाद होण्याची शक्यता आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक वेळापत्रक जाहीर होणार आहे, असे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी सांगितले. अधिसभा निवडणुकीसाठी प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक, पदवीधारकांनी ऑनलाइन नोंदणी करून सत्यप्रत विद्यापीठात सादर करण्यासाठी २६ जुलैपर्यंत मुदत होती. एकूण प्रवर्गात ५० हजार ६५९ मतदारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. शेवटच्या दिवसांपर्यंत ४३ हजार मतदारांनी सत्यप्रत सादर केली आहे. सत्यप्रत जमा झाल्यानंतर छाननी सुरू आहे. या छाननीनंतर पुढील कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे, मात्र छाननीचे काम जास्त दिवस चालण्याची शक्यता आहे. सत्यप्रत नसलेल्या मतदारांची नव्याने नोंदणी केली जाणार नाही, असे कुलसचिवांनी सांगितले. या प्रक्रियेमुळे विद्यापीठाची अधिसभा निवडणूक लांबण्याची शक्यता आहे.

मतदार यादीवर आक्षेप
अधिसभा निवडणुकीच्या मतदार नोंदणीवर मराठवाडा विकास कृती समितीने आक्षेप घेतला आहे. चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी करणारांविरूद्ध कारवाई करावी, असे समितीने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पदवीधर प्रवर्गात इतर प्रवर्गातील मतदारांनी नोंदणी करू नये. अन्यथा, दोन ठिकाणी मतदान केल्यास नियमाचा भंग होईल. विद्यापीठ कायद्यानुसार दोन ठिकाणी मतदार नोंदणी केलेल्या मतदारांचे नाव रद्द करा किंवा गुन्हे दाखल करा अशी मागणी समितीने केली. या शिष्टमंडळात अॅड. मनोज सरीन, अॅड. शिरीष कांबळे, अॅड. सतीश साळवे, प्रा. दिगंबर गंगावणे, अमोल दांडगे, मुकेश खोतकर, सुचिता इंगले यांचा समावेश होता.

अधिसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी
वर्ग...............................ऑनलाइन....ऑफलाइन
विद्यापीठातील प्राध्यापक.......२६३...........१९९
अध्यापक...........................४,२६८........३,४४१
व्यवस्थापन प्रतिनिधी............२५८...........२०५
विभागप्रमुख.......................२,१४०.........१,८३६
प्राचार्य...............................२१०............१३१
पदवीधर............................४३,५२०......३६,९८८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नितीशकुमारविरुद्ध पक्षात राहूनच संघर्ष करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाआघाडीतून बाहेर पडत नितीशकुमार यांनी भाजपाची साथ दिल्याचे जनता दल युनायटेडचे नेते स्वामी अग्निवेश यांना रुचलेली नाही. महाआघाडीतून बाहेर पडून नवीन मित्र जोडताना नितीशकुमार यांनी पुन्हा जनादेश घ्यायला हवा, असे सांगितले. पण, पक्षात राहूनच नितीशकुमार यांच्या निर्णयाविरुद्ध संघर्ष करणार, असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काँग्रेस, जनता दल युनायटेड व राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीने बिहार विधानसभेच्या निवडणुकीत ८ नोव्हेंबर २०१५ रोजी २४३ पैकी १७८ जागा जिंकून भाजपचा धुव्वा उडवला होता; पण फक्त २० महिन्यांतच महाआघाडी फोडून नितीशकुमार हे भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत. एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या स्वामी अग्निवेश यांनी या विषयावर स्वतःची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत जनाधार मिळ‍वला. नवीन पक्षासोबत जाताना नव्याने निवडणूक घ्यावी व सत्तेत यावे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकारामुळे नितीशकुमार यांची प्रतिमा पूर्वीसारखी राहणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथसागरात ४० टक्के पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जुलै महिन्याच्या अखेरीस जायकवाडी प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा झाल्यामुळे कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या पैठण उजवा कालवा आणि पैठण डावा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. ऊर्ध्व भागातील धरणात सातत्याने पाऊस सुरू असून, धरणात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे.

मराठवाड्यात रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे जिल्ह्यातील धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. पावसाचे मोठे दिवस शिल्लक असून जलसाठा वाढण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. जुलै महिन्यात धरण ४० टक्के भरल्यामुळे खालील भागात पाणी सोडण्यात आले आहे. २५ जुलैपासून पैठण उजवा व डावा कालव्यातून पाणी सोडण्यात आले. उजव्या कालव्यातून ९०० क्यूसेक आणि डाव्या कालव्यातून १२०० क्युसेक पाणी सोडण्यात आले असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण प्रशासनाने (कडा) सांगितले. दोन्ही कालव्याचा शेतकऱ्यांना विशेष फायदा होणार आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन साखर कारखान्यांनी वार्षिक नियोजन निश्चित केले आहे.

दरम्यान, नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. एक्स्प्रेस कालव्यातून ६५३ क्युसेक, डावा कालवा १०० क्युसेक आणि उजवा कालव्यातून ३५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठा
जायकवाडी ः ४०.११
निम्न दुधना ः ३८.५४
येलदरी ः ३.३१
माजलगाव ः १३.१४
मांजरा ः २२.८६
निम्न तेरणा ः ५७.८६
विष्णुपुरी ः १५.५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंडगिरी मोडून काढा; उद्योजकांची अपेक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
‘महिनाभर व रोजंदारीवर काम करून त्यापोटी मिळणारा कामगारांचा पगार काही गुंड हिसकावून घेऊन कामगारांत दहशत निर्माण करत आहेत. यामुळे कामगारांत भितीचे वातावरण असून गुंडांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करावी. कामगारांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत,’ अशी मागणी उद्योजक, कंपनी व्यवस्थापकांनी पोलिस व उद्योजकांच्या संयुक्त स्नेह संमेलनात करण्यात आली.
वाळूज एमआयडीसीतील कॅनपॅक कंपनीच्या सभागृहात हे संमेलन गुरुवारी घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅनपॅक कंपनीचे चेअरमन हर्षवर्धन जाजू, ‘मासिआ’चे अध्यक्ष सुनील किर्दक, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व्हेरॉक कंपनीचे व्यवस्थापक सतीश मांडे, गुडईयर कपंनीचे दिलीप बसवले, लुमॅक्सचे खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उद्योजकांनी कंपनीतील मजूर कंत्राटदाराच्या दादागिरीची माहिती दिली. कामगारांची फसवणूक मजूर कंत्राटदाराच्या करतो, पण त्यासाठी जबाबदार ठरवून कंत्राटदार मोकळा होतो. त्याचा कंपनी व्यवस्थापकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी मजूर कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांची दादागिरी मोडून काढावी, अशी अपेक्षा काही व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी बजाज कंपनीचे सुरक्षा विभागप्रमुख अमित गंभीर, ऋचा कपंनीचे संजय कपाटे, बडवे इंजिनीअरिंग, कासबर्ग आदी कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅनपॅक कंपनीतील के. के. काळे, अभिनय जाधव, शेळके यांच्यासह पोलिस कर्मचारी राजू मोरे, राजेश वाघ, संजय हबीर, महेश कोमटवार, रामदास गाडेकर, बाळासाहेब आंधळे, गोकुळ वाघ आदींनी परिश्रम घेतले.

पोलिसांचे आश्वासन

यावर बोलताना पोलिस उपायुक्त ढाकणे म्हणाले की, कंपनीने दादागिरी, खंडणी, धमकी आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच पोलिस कायम तुमच्या सोबत आहेत. आतापर्यंत वाळूज परिसरातून १७ जणांना तडीपार केले आहे. काही घटना घडल्यास उद्योजक-कामगारांनी पोलिसांना तत्काळ कळवावे, असे अवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वादातून दोन गटात नारेगावात हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जुन्या वादातून नारेगावातील भाटनगर येथे दोन गटात गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान हाणामारी झाली. या घटनेत घरावर दगडफेक करत तीन दुचाकींचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गटांविरुद्ध विनयभंग, दगडफेक व दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या गटातर्फे एका ३८ वर्षांच्या महिलेने तक्रार दिली आहे. यामध्ये ही महिला आंघोळ करताना संशयित आरोपी दर्शनसिंग मलके याने तिचा व तिच्या भावजयीचा विनयभंग केला. या महिलेने प्रतिकार केल्यानंतर संशयित आरोपी दर्शन, भगवान, चरण व लखन मलके (सर्व रा. नारेगाव) यांनी मारहाण केली. महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या गटातर्फे दर्शनसिंग मलके (वय ४८ रा. भाटनगर, नारेगाव) याने तक्रार दिली. त्यांचा शेजारी संशयित आरोपी गोकुळ मलके यांने, तू लपून छपून काय उद्योग करतो, असे म्हणत वाद घालून मारहाण केली. तसेच दर्शनसिंगच्या वाड्याचे गेट तोडून दगडफेक करीत तीन दुचाकीचे नुकसान केले. या प्रकरणी संशयित आरोपी गोकुळ, सोहनसिंग, भारत, शंकुल मलके व इतर नऊ जणांविरुद्ध दगडफेक, दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजाराची लाच; दोन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
जात प्रमाणपत्रासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक सुनील सखाहरी माळे (वय ३९) याला वैजापूर जिल्हा व अतिरक्त सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी तीन महिने साध्या कैदेचे आदेश दिले आहेत.
गंगापूर तालुक्यातील योगेश त्रिंबक देवगणे या डी.एड्.च्या विद्यार्थ्याने २०१२ मध्ये गंगापूर तहसील कार्यालयात महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी फाइल दाखल केली होती. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी ते तहसील कार्यालयात गेले असता त्यांना ही फाइल वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे योगेश यांनी वैजापूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात येऊन तेथील लिपिक सुनील माळे यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा माळे यांने हे प्रमाणपत्र देण्यासाठी योगेश यांच्याकडे सात हजार रुपयांची मागणी केली. तडजोड करून तीन हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, योगेश यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून लाचलुचपत विभागाने १९ मे २०१२ रोजी सुनील माळे यास उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचून पकडले. पोलिस निरीक्षक के. एस. पवार यांनी याप्रकरणाचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षातर्फे एकूण पाच जणांची साक्ष घेण्यात आली. साक्ष व पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी आरोपी सुनील माळी याला दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फिर्यादीतर्फे सहायक सरकारी वकील कैलास पवार खंडाळकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम देशभक्तच, देशद्रोही नव्हेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भारतात गेल्या काही दिवसांपासून अविश्वास आणि भीतीचे वातावरण आहे. भारतात २० कोटींची लोकसंख्या असलेले मुस्लिम देशभक्त नसते, तर ते ‘आयएस’ सहभागी झाले असते,’ असे प्रतिपादन स्वामी अग्निवेश यांनी शुक्रवारी केले.
देशात गोहत्येच्या नावे मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीतर्फे शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रदीप साळुंखे, सलमान कश्मिरी, इम्रान प्रतापगढी, मौलाना तौखीर रजा यांची उपस्थिती होती.
स्वामी अग्निवेश म्हणाले की, इस्लामचा अर्थ शांती आहे, मात्र जगभरात मु‌स्लिमांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतात अशी बदनामी होता कामा नये. देशात मुस्लिमांवर झालेल्या अत्याचाराबाबत कोणालाच शिक्षा झालेली नाही. उलट सरकार नाटकीय घोषणाबाजी करत आहे.
‘आयएस’मध्ये जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडमधील लोक भरती होऊन सिरिया, लेबनॉनमध्ये लढत आहेत. भारतातही मुस्लिमांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. पण, देशातील मुस्लिम जर देशभक्त नसते, तर ते ‘आयएस’मध्ये गेले असते. एखाद्या गोष्टीला विरोध केला तर तो देशद्रोही ठरत नाही, असे स्वामी अग्निवेश म्हणाले. कोर्टाच्या निर्णयापर्यंत होईपर्यंत राम मंदिर नको, असे मत त्यांनी मांडले.
यावेळी प्रदीप साळुंखे म्हणाले की, देशात मुस्लिमांना लक्ष्य केले जात असून त्यांच्याविरोधात इतरांना उभे केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते, हे त्यांनी अनेक उदाहरणे देत पटवून सांगितले. त्याचे उपस्थित जनसमुदायाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
यावेळी शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. गोहत्येच्या नावाखाली जमावाने देशात २० जणांना ठार केले आहे, त्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अादी मागण्या करण्यात आल्या.

दबावात वंदे मातरम् नको

देशात सध्या वंदे मातरम् वरून वादंग सुरू आहे. ‘देश मे रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा’, असे म्हटले जात आहे. पण, मी वंदे मातरम् म्हणनार नाही, मला देशाबाहेर काढून बघा, असे आव्हान देत वंदे मातरम् कुणाच्या दबावात म्हणणे नको असे अग्निवेश यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ राष्ट्रीय पेयजल योजनेत गैरव्यवहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळूज येथे मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणावर दिरंगाई करण्यात आली. पाच वर्षे उलटून गेले तरी योजना कार्यान्वित झालेली नाही. दरम्यान बिले काढण्यासाठी बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून स्वाक्षऱ्या केल्या. या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी केला. सीईओ मधुकरराजे अर्दड यांनी याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले.

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत रमेश गायकवाड यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २०१२मध्ये वाळूजसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. ४ कोटी ९९ लाखांच्या या योजनेंतर्गत वाळऊजा गावाला पाणी देण्यात येणार आले होते. मंजूर योजनेतून काही प्रमाणात काम झाले. योजना मात्र कागदोपत्रीच राहिली. १४ ऑक्टोबर २०११ रोजी १ कोटी २५ लाख २४ हजार १९३ रुपयांचे बिल काढण्यात आले. प्रत्यक्षात बिल काढण्याआधी दहा दिवस शाखा अभियंत्यांची बीडला बदली झाली. शाखा अभियंता प्रतिनियुक्तीवर आले होते. ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सेवेत गेले. समिती सचिव आणि ग्रामसेवकांना सोबत घेऊन बदलीवर गेलेल्या अधिकाऱ्यांनी कार्यपुस्तिका दयार केली. आणि २०१७ पर्यंत बिले देली गेली. नियम डावलून केलेल्या या प्रकारामुळे गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकारात नसताना अधिकाऱ्यांनी कशा काय सह्या केल्या ? त्याला कुणी कसा विरोध केला नाही ? या प्रकरणी रितसर चौकशी व्हायला हवी. दोषी अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पाच वर्षांत टँकरच्या माध्यमातून सरकारला कोट्यवधीचा खर्च झाला. योजना पूर्ण झाली असती तर भुर्दंड झाला नसता,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

जेवढे काम, तेवढी बिले
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन करताना सांगितले, की वाळूजला पाणीपुरवठा ज्या धरणातून करावयाचा आहे, त्यात पाणी नाही, त्यामुळे योजना पूर्ण होण्यास अडचण झाली. दरम्यान जेवढे काम झाले. तेवढी बिले अदा केली गेली. कार्यपुस्तिकेवर जुन्या अधिकाऱ्यांनी सह्या करणे योग्य आहे काय ? असे विचारल्यावर अधिकाऱ्यांनी योग्य नसल्याचे सांगितले. याची दखल घेत सीइओ मधुकरराजे अर्दड यांनी सविस्तर चौकशीचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परराज्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज फेटाळले

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
परराज्यातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याबाबतच्या आदेशासंदर्भात राज्य शासन आणि काही विद्यार्थ्यांनी दाखल केलेले पुनर्विलोकन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. सुनील के. कोतवाल यांनी गुरुवारी फेटाळले.

परराज्यातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याबाबत आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाच जुलै रोजी दिला होता. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या माहिती पुस्तिकेतील नियम ४.५नुसार वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी दहावी आणि बारावी महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेले असावेत, असे म्हटले आहे, मात्र खंडपीठाने परराज्यातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशाचे पुनर्विलोकन करावे, अशी विनंती अर्जांमध्ये करण्यात आली होती.

राज्यातून दहावी उत्तीर्ण होण्याबाबतचा नियम ४.५ हा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी तयार करण्यात आला आहे, परंतु याचिकाकर्त्यांनी त्यापूर्वी परराज्यातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून, २०१५-१६मध्ये महाराष्ट्रात अकरावीला प्रवेश घेतले आहेत. त्यांच्या विनंतीचा विचार करून खंडपीठाने पाच जुलै रोजी परराज्यातून दहावी उत्तीर्ण झालेल्या याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याबाबत आदेश दिला असल्याचे या आदेशात म्हटले आहे. अर्जात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेरचे असल्याचे नमूद करीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरतपासणी, कॅरिऑनसाठी विद्यार्थी झाले आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवी परीक्षेचा निकाल अन्यायकारक लागला असून, वाणिज्य शाखेच्या एका विषयात जवळपास ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या प्रकाराची चौकशी करून उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याच्या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने जोरदार निदर्शने केली. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन लागू करण्यासाठी ‘एनएसयूआय’ने निदर्शने केली. या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी विद्यापीठ दणाणून गेले. दोन्ही मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिले.

२०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील पदवी परीक्षेचा निकाल वादग्रस्त ठरला आहे. परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवले आहे. त्याचबरोबर एकाच विषयात अनुत्तीर्ण केले आहे. या निकालावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. अन्यायकारक निकालाचा ‘एसएफआय’ने निषेध करीत विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. बीकॉम तृतीय वर्षाच्या ‘कॉस्ट अँड अकाउंट’ या विषयात जवळपास ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. काही विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षेतील गुण ग्राह्य धरण्यात आले नाहीत. या प्रकारामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा, पदव्युत्तर वर्ग प्रवेश आणि इतर संधी संपुष्टात आल्या आहेत. उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा सात दिवसात जलदगतीने निकाल जाहीर करावा. उत्तरपत्रिकांची तपासणी विनाशुल्क करून विद्यापीठ प्रशासनाने प्रवेशाची हमी द्यावी, अशी मागणी ‘एसएफआय’ने केली. एकाच विषयात जास्त विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्याने चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड, सुरेश सोनवणे, नितीन वाव्हळे, रखमाजी कांबळे, कृष्णा घुले, अभिमान भोसले, लोकेश कांबळे, सत्यजीत मस्के, ओम पुरी, प्राजक्ता शेटे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, उत्तपत्रिकांची विनाशुल्क पुनर्तपासणी लवकर करण्यात येईल आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वर्गात प्रवेश देण्यात येईल असे आश्वासन कुलगुरू डॉ. चोपडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

कॅरिऑन लागू करण्याची मागणी
शहरातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठाशी संलग्न झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. यावर्षी अभियांत्रिकीचा निकाल अत्यंत कमी लागला असून, जवळपास ७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. या विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याची मागणी ‘एनएसयूआय’ने केली. या मागणीसाठी विद्यापीठात निदर्शने करण्यात आली. संघटनेचे नीलेश आंबेवाडीकर, सागर साळुंखे, सूरज निकम, मीर इमाद अलीखान, अजय रनवरे, शारेक काजी यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले. याबाबत लवकरच निर्णय घेतो असे आश्वासन कुलगुरूंनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालना रोड विस्तारीकरणाचे भवितव्य अंधारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादची लाइफ लाइन असलेला जालना रस्ता आणि दक्षिण बाजूला वाढणाऱ्या शहरासाठी महत्त्वाचा असलेला बीड बायपासचे काँक्रिटीकरण व विस्तारीकरण करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) हे रस्ते करणार होते, पण निधीची तरतूद नसल्याने केंद्र सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे आता जालना रस्त्याच्या विस्तारीकरणाचे भवितव्य सध्या तरी अंधारात सापडले आहे.

सर्वाधिक रहदारीचा हा रस्ता महापालिकेच्या हद्दीत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता जालना रोडचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. जडवाहनांसाठी असलेल्या बीड बायपासच्या दक्षिण बाजूनेही मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत झाल्याने या रस्त्याचाही विस्तार आवश्यक असल्याचे सर्वेक्षणातून नोंदविण्यात आले होते. त्याची दखल घेत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी औरंगाबादेत विविध रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन करताना जालना रोड व बीडबायपाससाठी ८०० कोटींची तरतूद केली जाईल. दोन्ही रस्ते रुंद करून बीड बायपासचे काँक्रिटीकरण केले जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल दिल्लीला सादर केला. तांत्रिक त्रुटी दर्शविण्यात आल्या. त्या दुरुस्त करून पुन्हा अहवाल सादर केला गेला. या कामासाठी आर्थिक मंजुरी दिली जाईल आणि निविदा काढण्यात येतील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

टोलची अडचण
मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चार दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली. त्यावेळी ‘एनएच २११’च्या कामाचा आढावा, औरंगाबाद - जळगाव प्रस्तावित रस्ता; तसेच अन्य प्रकल्पांवर चर्चा झाली. जालना रस्ता व बीड बायपासच्या कामाबाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध नाही. केंद्र सरकारने जर निधी उपलब्ध करून दिला, तर काम सुरू करण्यास विलंब होणार नाही. कारण शहरांतर्गतचा रस्ता एनएचएआयएने बनविला, तर त्यावर टोल बसविणे अवघड आहे. शहरातील नागरिक रस्त्याचा वापर केल्यानंतर टोल भरणार कसा, असा प्रश्न आहे. कोल्हापूरसारखा प्रश्न औरंगाबादमध्येही निर्माण होऊ शकतो. त्यासाठी केंद्राच्या मदतीची मागणी करण्यात आली. आता केंद्र सरकार या प्रकल्पासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणार काय, हा प्रश्न आहे. तोपर्यंत जालना रस्त्याचे भवितव्य अंधारात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुख्यमंत्र्यांची गाडी अडविणाऱ्या सात जणांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठास देण्यात यावे या मागणीसाठी दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या गाडीसमोर उड्या घेतल्या होत्या. त्या ४१ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात न्यायालयाने तब्बल ३९ वर्षानंतर अटक वॉरंट जारी केले. वॉरंट हाती पडल्यानंतर पॅंथर कार्यकर्त्यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यु. पी. देवर्षी यांच्या न्यायालयात धाव घेत जामीनसाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्या सात जणाचा जामीन मंजूर करत अन्य आरोपींनी तातडीने हजर करण्याचे निर्देश दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास नाव देण्यात यावे या मागणीसाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी दलित पँथरच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे १० एप्रिल १९७८ रोजी औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यासाठी येणार असल्याची माहिती दलित पॅँथरच्या कार्यकर्त्यांना आणि महिलांना मिळाली. कार्यकर्ते औरंगाबाद विमानतळासमोर दबा धरून बसले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे वाहन येताच गंगाधर गाडे, रतनकुमार पंडागळे, रमेशभाई खंडागळे, माणिक साळवे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी उड्या मारल्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे वाहन अडवून दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून जोरदार लाठीहल्ला केला होता. यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते. तत्कालीन पोलिस अधीक्षक अरविंद इनामदार यांनी दलित पॅथरच्या ४१ कार्यकर्त्याना भादंवि १४७, १४८, १४९, ३५३, ३४१, ३३६, ३३७,३३२, ३२३ या कलमाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान ३९ वर्षानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यु. पी. देवर्षी यांच्या न्यायालयाने या खटल्यातील ४१ आरोपी विरोधात अटक वॉरंट जारी केले. या गुन्ह्यामध्ये गंगाधर गाडे, रतनकुमार पंडागळे, माणिक साळवे, भीमराव मगरे, के. डी. मगरे, पंडित मगरे यांची नावे असल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेऊन जामीन घेण्यासाठी अर्ज दाखल केला. कोर्टाने या सात जणांना जामीन मंजूर करत उर्वरित आरोपींना हजर करण्याचे निर्देश दिले आहे. या गुन्ह्यात सहभाग असलेल्या जवळपास ११ कार्यकर्त्यांचा (७ महिला, ४ पुरुष) मृत्यू झाला असल्याचे संतोष पंडागळे, सुमेध भिंगारदेव, प्रवीण कांबळे, आर. एस. म्हस्के आणि नामदेव सावते यांनी निदर्शनास आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ प्लॉट मोजणीच्या वादातून जालन्यात गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
प्लॉट मोजणीच्या क्षुल्ल्क वादातून दोन तरुणांवर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहरातील संतोषीमाता मंदिर जवळील गोपीकिशन नगरात घडली. याघटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
शहरातील बक्कलगुडा येथील आकाश ऋषीकुमार टेकूर (वय २२) हा तरुण शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास मित्र सुदर्शन चौधरी याच्यासोबत स्कुटीवरून घराकडे जात होता. यावेळी गोपीकिशननगर परिसरात गर्दी जमल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघे जण त्याठिकाणी गेले असता तेथे एका प्लॉटची मोजणी सुरू होती. सुदर्शनने शेजारी त्याचा पण प्लॉट असल्याने मला नोटीस न पाठवता प्लॉटची मोजणी कसे काय करीत आहेत, असा जाब विचारला. त्यावरून जगदीश गौडसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी जगदीश गौडने दोघा मुलांना इशारा करून सुदर्शन चौधरी यास लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आकाश टेकूरने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जगदीश गौडने कमरेला लावलेली पिस्तूल काढून सुदर्शनवर गोळ्या झाडल्या. बचावासाठी सुदर्शन खाली वाकला. आकाशने जगदीश गौडच्या हातातून पिस्तूल हिसकविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने आकाशवर गोळी झाडली. याघटनेत आकाश याच्या मांडीला एक गोळी लागली. जखमी आकाशला जवळच्या विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे
याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुष्का, श्रद्धा, पूनम, पियुषला सुवर्ण

$
0
0

अनुष्का, श्रद्धा, पूनम, पियुषला सुवर्ण
धनश्री रेगे ‘बेस्ट लिफ्टर’
वेटलिफ्टिंग स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा विद्यानगरतर्फे आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत विविध गटांत अनुष्का म्हस्के, श्रद्धा यादव, पूनम उबाळे, पियुष रूईकर, हर्षल काळे यांनी सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेत धनश्री रोगे हिला ‘बेस्ट लिफ्टर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. स्पर्धेत १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक राजू वैद्य, उपशहरप्रमुख संतोष खेंडके, दिग्विजय शेरखान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी किसनराव गवळी, संजय दराडे, प्रशिक्षक दीपक रुईकर, राजेंद्र जाधव, राजू चव्हाण, राम केकान, शीला साळवे, अनिता बोंगाने, सविता तळोकार, महेश बोटवे, प्रणव प्रतापुरे, संदीप अहिरे, पियुष कोयाळकर यांची उपस्थिती होती.
विजेते खेळाडू - १४ वर्षे मुली - (४४ किलो) : १. अनुष्का म्हस्के, २. गौरी पलसकर. (४८ किलो) : १. पूनम उबाळे, २. गायत्री घुगे. (५३ किलो) : धनश्री रोंगे, स्मिता पवार. (५८ किलो) : १. ऋतिका कांबळे, २. शीतल जाधव. (६३ किलो) : १. श्रद्धा यादव, २. मंजिरी गीते. (६९ किलो) : १. साक्षी सोनवणे, २. ज्योती बागूल. मुले - (५० किलो) : १. पियुष रूईकर, २. कृष्ण रूईकर, ३. अभिषेक आरपडे. (६२ किलो) : १. अविनाश पांढरे. (६९ किलो) : १. तेजस खरात.
१७ वर्षांखालील मुले - (५० किलो) : १. अनिकेत मागुलकर, २. रितेश घाडगे. (५६ किलो) : १. हर्षल काळे, २. तौफिक ताहेर, ३. आकाश जोनवाल. (६२ किलो) : १. किशोर राठोड, २. राजीक रफिक, ३. विजय गायकवाड. (६९ किलो) : १. अब्दुल रहेमान, २. ओंकार पातुरकर. (८४ किलो) : १. अक्षय हजारी, २. विशाल महेर. (७७ किलो) : १. प्रथमेश शेकाडे. (९४ किलो) : १. अरबाज पठाण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकापुढे शेतकऱ्यांचा फेरा

$
0
0


विमा हप्ता, कर्जमुक्तीचा अर्ज भरण्यासाठी रांग, मुखेडमध्ये लाठीमार तर बोरीत गुन्हे
टीम मटा, औरंगाबाद
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी व कर्जमुक्तीचा अर्ज भरण्यासाठी बँकासमोर मोठी रांग लावली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन असल्याने शेतकऱ्यांचा बराचसा वेळ बँकासमोरच जात आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शुक्रवारी पोलिसांनी मुखेडमध्ये लाठीमार केला. यावेळी दगडफेकीत एक महिला जखमी झाली तर बोरीमध्ये रास्ता रोको केल्याप्रकरणी २४ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मुखेडमध्ये दगडफेकीत महिला जखमी
नांदेड - मुखेड यथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या रांगेत घुसणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यामुळे कोणी तरी चिडून दगडफेक केली. त्यात पद्मिनीबाई डोईफोडे यांच्या डोक्याला मार लागला. हा प्रकार शुक्रवारी घडला.
विमा भरणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी दिवसभर बँकेच्या वेळात रांगा लावल्या होत्या. वेळ संपल्याने अनेकांना घरी परतावे लागले. सध्या शेतातील मशागतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असताना जागोजागी शेतकरी पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभा आहे. नियोजनाअभावी होणारे हाल खरच किती मनुष्यशक्ती वाया घालणारे ठरत आहेत. त्यामुळे याचा जाब कुणाला विचारावा ? असा सवाल मालेगाव येथील सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.



बोरीच्या २४ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
परभणी - पीक विमा भरण्यसाठी राहिलेल्या अल्पकाळामुळे शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी बँका आणि ई-महासेवा केंद्रांवर गर्दी केली. मात्र, इंटरनेट सेवेत येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना दिवसरात्र रांगेत उभे राहावे लागत असल्याने अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. गुरूवारी जिंतुर तालुक्यातील बोरीच्या शेतकऱ्यांनी असेच रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. शिवाय, शुक्रवारी आंदोलनकर्त्या २४ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने बोरीकरांनी कडकडीत बंद पाळला.
जिल्हाभरात शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्याने बँका आणि ई-महासेवा केंद्रांबाहेर तोबा गर्दी केली आहे. परंतु, इंटरनेट सर्व्हरमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे पिक विमा भरण्याची प्रक्रिया वारंवार खंडीत होऊ लागली आहे. त्यामुळे तासाभराच्या कामाला शेतकऱ्यांना दिवस-रात्र रांगेत उभे राहावे लागत आहे.
लाठीमाराचे विधानसभेत पडसाद
ऑनलाइन पीक विमा भरण्याच्या प्रक्रियेत सतत होत असलेल्या बिघाडामुळे विमा भरून घेण्यास अनेक अडचणी येत आहेत. बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उद्भवलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलन करणाऱ्यां या सर्व शेतकऱ्यांवर दंगा नियंत्रण पोलीस पथक बोलावून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. पिक विमा भरण्याची तारीख वाढवून देऊन याबाबतचे परिपत्रक शासनाने तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावे, अशी मागणी शुक्रवारी आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत केली आहे.

शेतकऱ्यांची रात्र रस्त्यावर
परभणीसह तालुक्याच्या शहरी भागात ऑनलाइन केंद्रांवर पिकविमा भरण्यासाठी शेतकरी मोठी गर्दी करत आहेत. मात्र, विमा कंपनीची वेबसाईट जाम होत असल्याने दिवस भरात पाच-सहा शेतकऱ्यांचे अर्ज भरल्या जात आहेत. यासाठी रात्री तरी वेबसाईट चालेल म्हणून शेतकरी किरायाचे वाहन करून शहरात दाखल होत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर रस्त्यावर जागुन काढावी लागत आहे. शहरातील बँका आणि ई-महासेवा केंद्रांबाहेर हे चित्र दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images