Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘टीडीआर’ रडारवर

$
0
0

औरंगाबाद ः महापालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर (विकास हक्क हस्तांतर) गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर या विभागातर्फे आतापर्यंत देण्यात आलेल्या ‘टीडीआर’च्या चौकशीचे सत्र सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी या प्रकरणाच्या काही फाइल नगररचना विभागाच्या संचालकांकडे तपासणीसाठी पाठवल्या आहेत. या प्रकारामुळे पालिकेत खळबल उडाली आहे.

महापालिकेत दोन वर्षांपूर्वी ‘टीडीआर’ गैरव्यवहाराची सहा प्रकरणे उघडकीस आली. याप्रकरणी तत्कालीन आयुक्तांनी नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांना निलंबित केले. अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही ‘टीडीआर’ गैरप्रकाराची काही प्रकरणे उघड झाली. या प्रकरणाची विधीमंडळात देखील चर्चा झाली. घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देखील शासनातर्फे देण्यात आले. निलंबित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीची शिफारस तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे केली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेचे विद्यमान आयुक्त मुगळीकर यांनी ‘टीडीआर’च्या काही फाइल पुणे येथील नगररचना विभागाच्या संचालकांकडे तपासणीसाठी पाठवल्याची माहिती मिळाली आहे. ‘टीडीआर’च्या काही प्रकरणात मुगळीकर यांनाही संशय आला आहे. ‘टीडीआर’ चुकीच्या पद्धतीने दिल्याच शक्यता लक्षात घेऊन त्यांनी काही प्रकरणाच्या फाइल संचालकांकडे पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. संचालकांच्या अभिप्रायानंतर मुगळीकर ‘टीडीआर’च्या त्या फाइलबद्दल निर्णय घेणार असल्याचे मानले जात आहे.

संचालकांकडे पाठवण्यात आलेल्या फाइलमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असेही मानले जात आहे. नगररचना विभागाच्या फाइल आयुक्तांनी संचाकलांकडे तपासणीसाठी पाठवण्याची पालिकेत अलिकडच्या काही वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

टीडीआर प्रकरणातील फाइल नगररचना विभागाच्या संचालकांकडे पाठवण्यात आल्या, ही बाब खरी आहे. विधीज्ञांच्या मतांमध्ये भिन्नता असल्यामुळे संचालकांचे मार्गदर्शन मागवले आहे. काही फाइल शासनाकडे देखील पाठवल्या आहेत. संचालक व शासनाच्या मार्गदर्शनाची वाट पहात आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाणार आहे.
- डी. एम. मुगळीकर, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टराला गंडा; नियमित जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील डॉक्टरला सहा लाखांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आरोपीचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी फेटाळाला.
या प्रकरणी डॉ. राजेश रमेश सावजी (रा. रोकडिया हनुमान कॉलनी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील अब्दुल असद अब्दुल हनीफ याने स्वस्तात जमीन मिळत असून, जमीन विकत घेण्याचे आमीष दाखवले आणि संशयित आरोपी संदीप प्रकाश हिवराळे (वय ३१, रा. ज्युबली पार्क, औरंगाबाद) याच्यासह इतर आरोपींना जमिनीचे मालक म्हणून फिर्यादीसमोर आणले. जमिनीचा सात-बारा पाहून फिर्यादीने १३ लाखांत व्यवहार ठरवला आणि शंभर रुपयांच्या बाँडवर दहा एकर जमिनीची इसारपावती करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीने एक लाखाचा धनादेश, तर पाच लाखांची रक्कम संदीप हिवराळे याच्याकडे दिली. मात्र आरोपींनी रजिस्ट्री करण्यासाठी टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादीने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात आरोपी संदीप व इतर आठजणांवर गुन्हा दाखल होऊन संदीप याला २५ जुलै रोजी अटक करण्यात आली. संदीप हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, आरोपीच्या अन्य साथीदारांना अटक करावयाची आहे, तसेच आरोपीला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक लोकअभियोक्ता कैलास पवार खंडाळकर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपी संदीप हिवाळे याचा नियमित जामीन फेटाळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू वाहतुकीच्या पावत्यांची विक्री ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गौण खणिजाच्या वाळू वाहतुकीच्या पावत्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर तहसील कार्यालयाच्या पथकाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाजवळील हॉटेल सागर प्लाझा मधील खोली क्रमांक १०४ मध्ये छापा टाकून पावती पुस्तके जप्त केली.
पथकाने छापा टाकला त्यावेळी खोलीत शर्मा नावाची व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयाचा गौण खणिज वाहतूक परवाना देत असल्याचे आढळले. यावेळी पथकाला दोन पावती पुस्तकेही आढळून आली असून ही पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. या पावती पुस्तकात १ व २ ब्रास वाळू निर्गमित केल्याचे नमूद असून काही पावत्या कोऱ्या आहेत. या दोन्ही पावती पुस्तकातील वाळू ही जालना जिल्ह्यातील कोठाळा खुर्द, वाळू घाट क्रमांक ८० ते ८४ येथील वाळूपट्ट्याची आहेत. लिलावधारकाचे नाव मसुरे एन्टरप्रायजेस, प्रो. प्रा. विष्णू विठ्ठलराव मसुरे असून जप्त करण्यात आलेली दोन्ही पावतीपुस्तके जिल्हा खनिकर्म अधिकारी जालना यांनी प्रमाणित केलेले असल्याचे पंचनाम्यामध्ये नोंदवले आहे. ही कारवाई अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अहवाल मागवणार

जिल्हा खनिकर्म अधिकारी, जालना यांनी निर्गमित केलेल्या पावत्या खऱ्या आहेत की नाही, तसेच या पावत्या हॉटेलमधून देण्याची परवानगी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिली आहे की नाही याबाबत जालना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल मागवण्यात येणार आहे. या संदर्भात अप्पर तहसीलदार रमेश मुनलोड यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे माहिती पाठवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकांची झेरॉक्स विक्री; दुकानदारांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नामांकित प्रकाशकाच्या पुस्तकांच्या झेरॉक्स व स्कॅन कॉपी विकणाऱ्या सहा दुकानांवर सातारा पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा मारला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात कॉपीराइट अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून एक लाख १३ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी सचिन मारुती गायकवाड (वय ३२ रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे) यांनी तक्रार दिली होती. बीड बायपास व पैठण रोडवरील काही दुकानदार हे टेक मॅक्स पब्लिकेशन, टेक्निकल पब्लिकेशन आणि निराली प्रकाशनच्या पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती संगणकावर स्कॅन करून विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात विकत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी सिद्धार्थ झेरॉक्स अँड स्टेशनरी, देशमुख झेरॉक्स अँड नेट कॅफे, अनुश्री झेरॉक्स, जमीर झेरॉक्स, शिवनेरी मल्टी सर्व्हिसेस, मातोश्री मल्टी सर्व्हिसेस या दुकानात छापा टाकला. येथे पोलिसांना या पुस्तकांच्या झेरॉक्स व स्कॅन कॉपी सापडल्या. पोलिसांनी ही पुस्तके, झेरॉक्स मशीन आदी एक लाख १३ हजारांचा ऐवज जप्त केला. पीएसआय ओगले तपास करीत आहेत.

कॉपीराइट अॅक्टनुसार गुन्हे

संशयित आरोपी दुकानदार धनराज मोहन आभाळे, अनंत भाऊसाहेब देशमुख, चंद्रशेखर आसाराम घायाळ, जुबेर जब्बार बेग, गोपाळ बापुराव बोचरे व विशाल मुकुंदराव माने यांच्याविरुद्ध कॉपीराइट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकाऱ्यासह चौघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विधवेला वडिलोपार्जित जमिनीचा ताबा देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी फुलंब्री नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यासह चौघांवर अ‍ॅट्रासिटी कायद्याच्या नवीन नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चौघा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी फेटाळला.
या प्रकरणी शेवंताबाई किसन शंकपाळे (वय ७०, रा. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या पतीच्या निधनानंतर फुलंब्री येथील सिटी सर्व्हे ५४० मधील वडिलोपार्जित जमीन ही फिर्यादी व फिर्यादीच्या मुलीच्या नावाने झाली आहे. मात्र ही जमीन संशयित आरोपी सुरेश एकनाथ पारासर (वय ७७, रा. फुलंब्री) व संशयित आरोपी नागू दगडू ढंगारे (वय ९०, रा. फुलंब्री) यांनी संगनमत करून संशयित आरोपी भास्कर दादाराव वानखेडे (वय ४३, रा. फुलंब्री) याला जमीन परस्पर विकली. त्यानंतर भास्करने त्या जागेवर बांधकाम सुरू केले. या प्रकरणी फिर्यादीने भूमीअभिलेख कार्यालयाच्या उपसंचालकांकडे अपील केले असता, त्याचा निकाल फिर्यादीच्या विरोधात गेला. त्याविरुद्ध फिर्यादीने महसूल विभागाच्या प्रधान सविवांकडे अपील दाखल केले असता, त्याचा निकाल फिर्यादीच्या बाजुने लागला व संबंधित जागा फिर्यादीच्या नावार करून देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने फुलंब्री नगरपंचायतचे मुख्याधिकारी व संशयित आरोपी योगेश पाटील याच्याकडे अर्ज दाखल करीत जागेवरील बांधकाम काढून जागेचा ताबा देण्याची विनंती केली. या प्रकरणी मुख्याधिकाऱ्याने टाळाटाळ केल्याने फिर्यादीने फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून वरील चौघांसह अन्य एकाविरोधात कलम ४२०, ४६७, ४७१, ३४ तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३, १, जीडीएफ, डी १ अन्वये फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नियोजनबद्ध गुन्ह्याची नोंद

चौघा आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली असता, हा गुन्हा नियोजनबद्ध असून, आरोपी हे उच्चशिक्षित आहेत आणि ते पदप्रतिष्ठेचा गैरवापर करून फिर्यादीवर दबाव आणू शकतात. आरोपींकडून कागदपत्रे, रेकॉर्ड जप्त करणे बाकी आहे, त्यांच्याकडून हस्ताक्षराचे नमुने घ्यावयाचे आहेत, तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम १८ नुसार आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिसेस औरंगाबाद’साठी सज्ज व्हा

$
0
0


‘मिसेस औरंगाबाद’साठी सज्ज व्हा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मटा श्रावणक्वीन’ स्पर्धेने औरंगाबादच्या तरुणींमध्ये जबरदस्त क्रेझ निर्माण केल्यानंतर ‘मटा’ आता घेऊन येत आहे ‘मिसेस औरंगाबाद’ ही अनोखी स्पर्धा. श्रावण ऐन भरात असताना शहरातील २६ ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांसाठी मटाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. गृहिणींनो आता तुमचे सौंदर्य आणि तुमची अदाकारी अर्थात कला अन् बुद्धिमत्ता यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यातील कलाकाराला जागं करा आणि सज्ज व्हा ‘मिसेस औरंगाबाद’ बनण्यासाठी. स्पर्धेत ‘मिसेस औरंगाबाद’ किताबासह आठ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
गेल्या बुधवारी थाटामाटात ‘मटा श्रावणक्वीन’ स्पर्धा झाली. मोठ्या संख्येने युवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आपल्या मुलींची स्पर्धा बघण्यासाठी तेवढ्याच मोठ्या संख्येने महिलाही त्यावेळी उपस्थित होत्या. अनेकींकडून मटा युवतींसाठी घेत असलेल्या अनोख्या सौंदर्य स्पर्धेप्रमाणेच महिलांसाठीही अशी स्पर्धा असावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. अनेकजणींचे गृहिणींसाठी सौंदर्यस्पर्धा घ्यावी म्हणून मटा कार्यालयात फोन खणखणले. महिलांचा मोठा उत्साह पाहून ‘मटा’ने ‘मटा श्रावणक्वीन’ पाठोपाठ आता ‘मिसेस औरंगाबाद’ ही स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे.
येत्या २० ऑगस्ट रोजी ही स्पर्धा होणार आहे. ‘मिसेस औरंगाबाद’ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय २६ ते ४५ दरम्यान असायला हवे. या स्पर्धकाला चार राऊंडची परीक्षा द्यावी लागणार आहे. यात इंट्रोडक्शन राऊंड, रॅम्पवॉक, कोणताही एक कलाप्रकार तीन मिनीटांत सादर करणे व त्यानंतर प्रशोनत्तराचा राऊंड होईल. त्यातून परीक्षक विविध पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड करतील.
असे आहेत पुरस्कार
प्रथम - ‘मिसेस औरंगाबाद’
द्वितीय - ‘मिसेस औरंगाबाद’ उपविजेती
तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक असे तीन पुरस्कार
विशेष पुरस्कार
बेस्ट ड्रेस
बेस्ट मेकअप
बेस्ट परफॉर्मन्स
स्पर्धेची तारीख
२० ऑगस्ट २०१७
स्पर्धेचा वयोगट
२६ ते ४५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेव्हण्याला पत्नीसह भोसकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
घरगुती भांडणातून पंचायत समितीच्या कर्मचारी निवासस्थानात एकाने मेव्हणा व त्याच्या पत्नीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडला. या दोघांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी रत्नाकर दत्तू जाधव याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नाकर दत्तू जाधव (रा. सुरंगली ता. भोकरदन) हा राजेंद्र सखाराम वानखेडे (रा. पंचायत समिती क्वार्टर्स) यांचा मेव्हणा आहे. राजेद्र यांची बहिण मंगला यांचा रत्नाकर वानखेडेशी विवाह झाला आहे. घरगुती वादामुळे मंगला जाधव दोन वर्षांपासून भाऊ राजेंद्र यांच्याकडे राहतात. त्याचा राग धरून रत्नाकरने शुक्रवारी सकाळी दहा वाजता पंचायत समितीचे शासकीय निवासस्थान गाठले. त्याने राजेंद्र यांच्या पत्नी लक्ष्मी राजेंद्र वानखेडे यांच्या पोटात व इतरत्र चाकूचे वार केले. त्यामुळे जखमी होऊन लक्ष्मी या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. हा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पंचायत समितीमध्ये असलेल्या राजेंद्र वानखेडे यांना याची माहिती दिली. वानखेडे हे तातडीने घरी गेले असता रत्नाकरनेही त्यांच्याही पोटात व अंगावर चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले.

दरम्यान, शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक शैलेंद्र जोगदंड हे कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात पाठवले व संशयित आरोपी रत्नाकर जाधव याला ताब्यात घेतले. जखमीवर प्राथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठवण्यात आले आहे. राजेंद्र सखाराम वानखेडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात रत्नाकर जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज मोठ्या पावसाची

$
0
0



टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यात जूनमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने जुलैमध्ये पाठ फिरवली. त्यामुळे, विविध भागातील जलसाठ्यांमध्ये वेगाने घट होत असून, जलसाठ्यांमध्ये वाढ व्हावी, यासाठी मोठ्या पावसाची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या पावसाने मराठवाड्यात चांगली हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिली. संपूर्ण विभागात जुलैमध्ये काही दिवसच पाऊस झाला. त्यामुळे, जलसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. येत्या काही दिवसांमध्ये मोठा पाऊस झाला नाही, तर शेतीबरोबरच शहरांच्या पाणीपुरवठ्यासमोर मोठी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन ऑगस्टपासून आश्लेषा नक्षत्रास सुरुवात झाली असून, काही भागांमध्ये दोन दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. या नक्षत्रातील पुढील दिवसांमध्ये पाऊस होईल आणि परिस्थिती वेगाने सुधारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मानाबादमध्ये जलसाठ्यांमध्ये घट
उस्मानाबाद जिल्ह्यात दीड महिन्यांपासून पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
जिल्ह्यातील २१९ प्रकल्पांत चार ऑगस्टअखेर १७.१३ टक्के इतका उपयुक्त जलसाठा आहे. जुलैअखेर हा जलसाठा १८ टक्के, तर जुलैच्या प्रारंभी तो २० टक्के इतका होता. पावसाअभावी उपलब्ध जलसाठ्यात सतत घट होत आहे. आगामी काळात पावसाने कृपादृष्टी न दाखविल्यास उस्मानाबादकरांना पुन्हा जलसंकटाला तोंड ध्यावे लागणार आहे.
पावसाअभावी खरीप हंगामात पेरणी केलेली सोयाबीन, उडीद, मूग, तीळ ही पिके पिवळी पडली आहेत. अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकत आहेत. त्यामुळे खरीप पिकावर आपले सर्वस्व अवलंबून असलेला शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. येत्या चार दिवसांत पाऊस झाला नाही, तर पिके वाया जाण्याची भीती आहे. गेल्या चार वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळाशी सामना करीत आहे. मात्र यावर्षी पावसाची सुरुवात वेळेवर रोहिणी नक्षत्रात झाल्याने शेतकरी आनंदित होता व यंदा खरिपाच्या पिकाबाबत तो आशादायी होता. परंतु, दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरिप पिकांची वाढ खुंटली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ३७.३१ टक्के इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७६७ मिलिमीटर आहे. आकडेवारीत दिसून येणारा हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरत नसून, या पावसाने जिल्ह्यातील जलसाठ्यातही वाढ झालेली नाही.

विष्णुपुरीत १५ टक्के पाणी
नांदेड ः नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी येथील जलाशयात अवघे १५ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे, या प्रकल्पाच्या वरच्या बाजूला मोठा पाऊस झाला नाही तर नांदेड शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
नांदेड-वाघाळा महापालिकेच्या हद्दीतील उपनगरे, सिडको, हडको आणि एमआयडीसीसह आजूबाजूंच्या गावांना विष्णुपुरी येथील गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयात केवळ १५ टक्के पाणी शिल्लक आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैनगंगा नदीवरील इसापूर धरणातून पाणी घेण्यात येते. मात्र, या धरणातही केवळ पाच टक्के पाणी साठ राहिला आहे. शहरामध्ये सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाने कृपादृष्टी दाखविली नाही, तर पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला जाऊ शकतो.
नांदेड जिल्ह्यात पाच मोठे, नऊ मध्यम, ८७ लघु, तीन उच्च पातळी बंधारे, चार कोल्हापूरी बंधारे असे एकूण १०५ प्रकल्प आहेत. आहेत. बाभळी प्रकल्पाची दारे उघडी आहेत. या सर्व प्रकल्पांत मिळून एकूण १९.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटी हॉस्टेल चकाचक

$
0
0


वसत‌िगृहातील सुधारणांनी घेतला वेग; पाण्याचा प्रश्न मात्र सुटेना
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीस्तरीय मुलांच्या वसतिगृहामध्ये विविध सुधारणांनी वेग घेतला असून, नित्यनियमाने साफसफाई सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या वसतिगृहामध्ये काही महिन्यांपूर्वीपर्यंत घाण, अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य होते, त्याच वसतिगृहामध्ये आता बऱ्याच प्रमाणात स्वच्छता दिसून येत आहे. त्याचवेळी वसतिगृहामध्ये अनेक दुरुस्त्याही झाल्या असून, पुढच्या टप्प्यात आणखी सुधारणा होण्याचे संकेत आहे. मात्र अजूनही पिण्याच्या पाण्याचा तसेच वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) पदवीस्तरीय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच वसतिगृहाच्या दोन इमारती समोरासमोर आहेत. दोन्ही इमारती जुन्या झाल्या असून, त्यातील एक इमारत तर किमान ५० वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळेच वसतिगृहाच्या इमारती नव्याने बांधणे किंवा दोन्ही इमारतींची सर्वांगीण दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारती जुन्या झाल्यामुळेच ड्रेनेज लाईनसह इतर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. इमारतींच्या वरच्या मजल्यावरुन खालच्या मजल्यांवर पाणी गळणे, भिंतींमध्ये पाणी झिरपणे-मुरणे, भिंतींचे पापुद्रे निघणे, असे बांधकामाच्या एक ना अनेक गंभीर समस्या मागच्या काही वर्षांपासून भेडसावत आहेत. त्यातच वर्षानुवर्षे व्यवस्थित साफसफाई न होणे, आजुबाजुला कचरा-घाण साचणे, दुर्गंधींचा मारा सहन करावा लागणे आणि त्यामुळेच उंदीर-घुशी-सापांपासून ते कुत्री-डुकरांपर्यंतच्या जनावरांचा मुक्त वावर वसतिगृह परिसरात नेहमीच दिसून येत होता. पाण्याचा प्रश्न तर कितीतरी वर्षांपासून विद्यार्थ्यांना भेडसावतो आहे. या असंख्य प्रश्नांबाबत वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी त्या त्या वेळच्या अधिष्ठातांकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली, मागण्या मांडल्या, विनंतीही केली; तरीही बहुतांश अधिष्ठातांनी फारसे लक्ष न दिल्याने वसतिगृहाचे प्रश्न तसेच कायम राहिले व अधिक गंभीर होत गेले. मात्र मागच्या दीड-दोन महिन्यांपासून अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी वसतिगृहामध्ये जातीने लक्ष घातले असून, डॉ. सुक्रे यांनी वसतिगृहाचे चित्र बदलण्यासाठी पावले उचलण्यास सुरू केल्याचे दिसून येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बसवर दगडफेक; रिक्षाचालकास शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर बसचालकाला शिविगाळ करीत दगडफेक करणाऱ्या आणि बसचे दहा हजार रुपयांचे नुकसान करणाऱ्या रिक्षाचालकाला तीन महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. जी. शेख यांनी शुक्रवारी (४ ऑगस्ट) सुनावली.
या प्रकरणी बसवाहक निवृत्ती वानखेडे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ही शहरबस (एम. एच. २० डी. ८३१९) ११ जानेवारी २०१४ रोजी सिडकोहून मध्यवर्ती बसस्थानकाकडे हडकोमार्गे जात होती. लेबर कॉलनीजवळील वळणावर प्रवाशांनी बसला हात दाखवल्याने बसचालकाने बस थांबवली. बस थांबल्यामुळे पाठीमागून रिक्षाचालक (एम. एच. २० ए. डी. ६०७७) सचिन कचरू पवार हा रिक्षा घेऊन आला आणि बससमोर रिक्षा आडवी लावून चालकास शिविगाळ केली. तसेच बस थोडी पुढे गेल्यावर दगड फेकून मारला. यात बसची काच फुटून दहा हजार रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात रिक्षाचालक पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले होते. सुनावणीवेळी, कोर्टाने रिक्षाचालकाला दोषी ठरवून कलम ४२७ अन्वये तीन महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, तर कलम ३३६ अन्वये एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेट’चा तिढा सुटता सुटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पीएच. डी. प्रवेशपूर्व परीक्षेतील (पेट) वजा गुणांकन (निगेटिव्ह मार्किंग) पद्धतीचा वाद कायम आहे. निगेटिव्ह मार्किंग पद्धत रद्द करून नव्याने निकाल जाहीर करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिले होते, मात्र चार दिवस उलटल्यानंतरही निर्णय झाला नसल्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कुलगुरूंसमोर ठिय्या आंदोलन केले. निगेटिव्ह मार्किंगमुळे गुणवत्ता वाढीस लागणार आहे. त्यामुळे ‘पेट’ परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कायम राहील या भूमिकेवर कुलगुरू ठाम आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पेट-४’ परीक्षा वजा गुणांकन पद्धतीमुळे वादात सापडली आहे. नऊ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ३२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निगेटिव्ह मार्किंगचा निर्णय अचानक जाहीर करण्यात आल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. राज्यातील एकाही विद्यापीठाच्या ‘पेट’मध्ये वजा गुणांकन पद्धत नसताना याच विद्यापीठात अट्टाहास कशासाठी असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. दुसरीकडे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे वजा गुणांकन पद्धतीवर ठाम आहेत. संशोधनातील गुणवत्ता वाढीस लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला; तसेच ‘पेट-५’ परीक्षासुद्धा या पद्धतीने घेण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. या निर्णयाच्या विरोधात भारतीय विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू चोपडे यांच्यासमोर ठिय्या आंदोलन केले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या विद्यापीठाने गुणवत्तेची चिंता करू नये, असे ‘भाविसे’चे तुकाराम सराफ यांनी सांगितले. निगेटिव्ह मार्किंगचा निर्णय रद्द करून नव्याने निकाल जाहीर करा, अशी मागणी ‘भाविसे’ने केली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर येत्या पाच दिवसांत निकाल जाहीर करण्याबाबत निर्णय घेऊ, असे लेखी आश्वासन कुलगुरूंनी दिले.

निर्णयात चालढकल झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इशारा संघटनेने दिला आहे. या शिष्टमंडळात तुकाराम सराफ, पूनम सलामपुरे, संदीप लिंगायत, हनुमान शिंदे, ऋषिकेश जैस्वाल, पराग कुंडलवार, अजय चोपडे, निखिल चव्हाण, संकेत डोईफोडे, स्वप्नील डिडोरे, आकाश पवार, सागर खरगे आदी उपस्थित होते.

नियम डावलले
स्पर्धात्मक किंवा पात्रता परीक्षेत उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी एकच निकष असतो. या परीक्षेत पात्र होण्यासाठी विद्यापीठाने जाहिरातीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारास ५० टक्के व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुणांची अट आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी वजा गुणदान पद्धतीचा निकष लादणे अन्यायकारक आहे, असे ‘भाविसे’ने सांगितले. पदवीचे निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पदव्युत्तर परीक्षेबाबत संभ्रम होता. ‘पीजी सीईटी’पासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी संघटनेने केली.

रिक्त जागांचा गोंधळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. विभागनिहाय माहिती जमा करण्याचे काम विद्यापीठ प्रशासन करीत आहेत, मात्र मोजक्याच विभागांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या किंवा दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची नोंद माहिती साजर करण्यात आली. प्राध्यापकांच्या श्रेणीनुसार संशोधक विद्यार्थ्यांची संख्या निश्चित आहे. प्रत्यक्षात संपूर्ण माहिती एकत्रित नसल्यामुळे किती जागा रिक्त आहेत याचा उलगडा होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाहुबली, मोटूपतलू ‌‌राखीवर विराजमान

$
0
0

बाहुबली, मोटूपतलू ‌‌राखीवर विराजमान
कार्टून्सच्या राख्यांनी लहानमुलांचे चित्त वेधले
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या राखी पौर्णिमेसाठी बाजारात आलेल्या राख्यांवर बाहुबली, मोटूपतलू, मिस्टर बिन आदी पात्र विराजमान झाली आहेत. यंदा राख्या कमीतकमी ५ रुपये ते जास्तीत जास्त ८० रुपयांपर्यंत आहेत. बाजारपेठेत यंदा ५० लाखांहून अधिक उलाढाल होऊ शकते, असा अंदाज आहे.
राखी पौर्णिमा हा सण भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेला सण. गुलमंडी, कुंभारवाडा, शहरातील विविध दालनं, मॉल्ससह खास सिझनेबल असलेली राख्यांची दुकाने सध्या शहरात चित्त वेधून घेत आहेत. बाहुबली राखी ३०, मोटूपतलू राखी २० ते ४०, रुद्राक्ष राखी १० ते ५०, मोती राखी ३० ते ४०, कार्टून राखी ३० ते ५० रुपये या दराने विकल्या जात आहेत.
लहान मुलांसाठी विविध मालिकांतील कार्टून पात्रांनी राख्यांवर जागा मिळविली आहे. कुंदन, मोती, एडी, रुद्राक्ष आदी विविध प्रकारच्या डिजाइनर राख्यांची विक्रीही यंदा कायम आहे. या राख्यांच्या किंमती २० ते ३० रुपयांपर्यंत आहेत. हैदराबाद, राजस्थान, गुजराथ आणि स्थानिक राख्यांच्या मागण्यांनाही मागणी वाढली आहे. राख्यांवर ऑक्सिडाइज्ड मेटलद्वारे निर्मित स्वस्तिक, गणेश, रुद्राक्ष यांच्या राख्याही युवतींना पसंत पडत आहेत. मोठ्या राख्यांच्याऐवजी यंदा फॅन्सी, आणि डिझायनर राख्यांना जास्त पसंती दिली जात आहे. यात स्टोन, मोती, एडी, क्रिस्टल पासून र गोटा पट्टी, मोरपंख यांच्या डिजाइनर राख्याही बाजारात आल्या आहेत. या सर्व राख्या १५ पासून ते ८० रुपयांपर्यंत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात लाखांची वर्गणी उपोषणानंतर जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील कामांकरिता झालेल्या खर्चाची नऊ लाख रुपयांची देणी बाकी आहे. ही रक्कम उभारण्यासाठी लोकवर्गणीला ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सरपंच संतोष जोशी यांनी २७ जुलैपासून नऊ दिवस उपोषण केले. ग्रामस्थांनी सात लाख ३० हजार रुपये लोकवर्गणी जमा केली.
वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन गोळेगावने ४५ दिवसांत दोन लाख ९० हजार घनमीटर काम केले असून त्यामुळे २९ कोटी लिटर पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, भारतीय जैन संघटनेने पुरविलेल्या यंत्रसामुग्रीद्वारे काम करण्यात आले. पण, डिझेल व इतर खर्च लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता. यासाठी गावातील २४५९ नागरिक व ४५३ कुटुंबांनी समंती दिली होती. गावातील प्रत्येकाने एकरी ५०० रुपये व भूमिहीनांनी ३०० रुपये देण्याचे ठरले होते.काम पूर्ण झाल्यानंतर डिझेलची बिले व इतर खर्चाची ८ ते १० लाख रुपयांची देणी आहेत.
लोकवर्गणी जमा करण्याकरिता सरपंच संतोष जोशी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपोषण सुरू केले. दरम्यान, उपोषण नवव्या दिवशी शुक्रवारी आमदार प्रशांत बंब यांच्या जोशी यांनी उपोषण सोडले. गावकऱ्यांनी नऊ दिवसात सात लाख ३० हजार रुपये लोकवर्गणी जमा केली असून उर्वरित ग्रामस्थांनी १४ ऑगस्टपर्यंत लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती गणेश अधाने, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड, तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे, भारतीय जैन संघटनेचे गौतम संचेती, पारस चोरडिया, प्रफुल्ल श्रीश्रीमाळ, धनाजी आढाव, दिलीप औटे, नंदकुमार भालेराव, अस्लम बेग, गणेश जिते, किसन जिते, उत्तम फुलारे, चंद्रकांत आदमाने, अक्षय गोसावी, सुमतताई जिते, हिराबाई म्हस्ककर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जालन्यात क्रांती मोर्चाची झलक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना
मराठा आरक्षण, कोपर्डीच्या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा यांसह विविध मागण्यांसाठी नऊ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी शुक्रवारी जालना शहरामध्ये मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंबईतील महामोर्चासाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी तयारी करण्यात येत असून, औरंगाबादमध्ये नुकतीच मोटारसायकल फेरी काढण्यात आली. त्यानंतर अन्य जिल्ह्यांमध्येही रॅली काढण्यात येत आहे. जालना शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये भगवे झेंडे घेतलेले हजारो तरुण सहभागी झाल्यामुळे, शहर भगवेमय झाले होते. ही रॅली संभाजी उद्यान, कलेक्टर ऑफिस, अंबड चौफुली, नूतन वसाहत, उड्डाणपूल, शनी मंदिर, गांधी चमन, लक्कडकोट, बस स्टँड, शिवाजी पुतळा, रेल्वे स्टेशन मार्गे भाग्यनगर येथील मराठा सेवा संघ कार्यालय येथे संपली.

शिस्त आणि माणुसकी
मोटार सायकल रॅली आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार गांधी चमन परिसरातून जात असताना तेथे एक रुग्णवाहिका आली. या वेळी मराठा क्रांती मोर्चातील दुचाकीस्वारांनी घोषणा बंद करून रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला.

‘मुंबई अभी बाकी हैं’
रॅलीमध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’ यासह घोषणा देण्यात येत होत्या. त्याचवेळी ‘ये तो सिर्फ झांकी हैं.. मुंबई अभी बाकी हैं’ या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मराठा रॅलीने परभणी दुमदुमली
परभणी : ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा देत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथील क्रांती मोर्चा काढण्यात येणार असून, त्याच्या जनजागृतीसाठी शुक्रवारी परभणीत दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गासह सर्वच रस्त्यांनी निघालेल्या या रॅलीमुळे परभणी दुमदुमुन गेली.
शुक्रवारी काढण्यात आलेली ही दुचाकी रॅली मुंबई येथे आयोजित मोर्चाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आली होती. सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन ही रॅली स्टेशन रोडने निघाली. बसस्थानक, उड्डाणपूल, जिल्हा परिषद मार्गे विसावा फाटा, तेथून वळसा घेत जिल्हा शासकीय रुग्णालय, शिवाजी चौक, गांधीपार्क, विसावा कॉर्नर मार्गे परत पुतळा येथून वसमत रोडने संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर रॅलीचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यशास्त्र विभागात सीसीटीव्ही

$
0
0

नाट्यशास्त्र विभागात सीसीटीव्ही
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रवेशद्वाराची उभारणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभाग आणि क्रीडा विभागाला बाहेरील उपद्रवींचा प्रचंड त्रास आहे. संरक्षक भिंतीला भगदाड पाडले असून संरक्षक जाळी तोडण्यात आली आहे. या परिसरात जास्त सुरक्षा कर्मचारी नेमण्याची मागणी होती. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे नाट्यशास्त्र विभागात भक्कम प्रवेशद्वार उभारणीचे काम सुरू आहे. तसेच विभाग आणि परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
विद्यापीठ कॅम्पस सर्वांसाठी खुला असल्यामुळे उनाड मुलांची वर्दळ वाढली आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये अशा तरुणांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी अनेकदा झाली. मात्र, मुलांना रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले. पुरेसे सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे कठीण आहे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना प्रत्येकाची नोंदणी करण्याची गरज आहे. सध्या नोंदणीची यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे भटकंती करण्यासाठी बाहेरील विद्यार्थी सर्रास येतात. या प्रकाराचा विद्यार्थिनींना प्रचंड त्रास होतो. नाट्यशास्त्र विभाग आणि क्रीडा विभाग परिसरात उनाड मुलांचा अड्डा असतो. या विभागांच्या परिसरातील रहिवाशांनी संरक्षक भिंत तोडून घुसखोरी केली आहे. स्टेडियमवर दारूच्या पार्ट्या रंगतात. नाट्यशास्त्र विभागात उनाड मुलांची दादागिरी असते. या प्रकाराला रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नाट्यशास्त्र विभागाला भक्कम प्रवेशद्वार उभारले आहे. या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. या बंदोबस्तामुळे परिसरात उपद्रवींचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. सध्या प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, विभागात आणि परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी दिली. विभागाला शिस्त लावणे आणि उपद्रवींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. नाटकाची तालीम रात्री उशिरापर्यंत असते. विद्यार्थ्यांना कुणाचा त्रास होऊ नये यासाठी विभागाने खबरदारी घेतली आहे.
विद्यार्थिनींची छेडछाड
विद्यापीठात शिकत नसलेल्या बाहेरील उनाड तरुणांचा कॅम्पसमध्ये नेहमी वावर असतो. या मुलांना कुणी रोखत नसल्यामुळे विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार नेहमी घडतात. मागील वर्षी नाट्यशास्त्र विभागाजवळ थांबलेल्या एका विद्यार्थिनीची दुचाकीवर आलेल्या तरुणाने छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनी प्रचंड धास्तावली होती, असे विभागातील प्राध्यापकांनी सांगितले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीकविम्यासाठी फुलंब्रीत काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
सर्व शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नसल्याने मुदत वाढवून द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे शुक्रवारी तहसील कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात अाली. काँग्रेस कार्यकर्ते तहसील कार्यालयास कुलूप लावण्याच्या तयारीने आले होते, पण तहसीलदार व पोलिसांनी आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे अाश्वासन दिले. दरम्यान, यावेळी पीकविम्याच्या फाइल व सातबारा तहसीलसमाेर जाळण्यात अाले.
काँग्रेसच्या आंदोलनाचे नेतृत्व देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यलयापासून कार्यकर्ते तहसील कार्यालयावर पायी गेले. तेथे तहसीलदार संगीता चव्हाण यांना निवेदन देण्यात अाले. पावसाअभावी पीक जळत असल्याने पंचनामे करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुदाम मते, बाजार समिती सभापती संदीप बाेरसे, जिल्हा परिषद सदस्य किशाेर बलांडे, माजी सरपंच अनिल बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अानंदा ढाेके, कचरू मैंद, शेख रज्जाक, त्रिंबक नागरे, अांबादास गायके, विठ्ठल लुटे, मुक्तेश्वर जाधव, शेख फारूक, मंगेश मेटे, लहु मानकापे, दिगंबर तुपे, ज्ञानेश्वर बलांडे, रमेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ उद्योजकांचे ५४ हजार कोटींचे कर्ज माफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकीकडे शेतीची कर्जमाफी हा मोठा विषय असल्याचा बागुलबुवा करून विरोध करणाऱ्या २१ राष्ट्रीयकृत बँकांनी उद्योग जगतावर खैरात करत तब्बल ५४ हजार ११० कोटींची कर्जमाफी केल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी लोकसभेच्या पटलावर ही अधिकृत माहिती ठेवली असून, त्या माहितीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अहवाल जोडण्यात आला आहे. संपूर्ण कर्जमाफी देताना २१ राष्ट्रीयकृत बँकांनी २०१७ला तब्बल ५४ हजार ११० कोटी, २०१६ला ३७ हजार ६४२ कोटी, २०१५ ला २५ हजार ४६ कोटी, २०१४मध्ये १९ हजार ७३९ कोटी आणि २०१३मध्ये तब्बल २० हजार ३५१ कोटींचे कर्ज पाच वर्षांत माफ केले आहे.

केंद्रशासनानेच ही माहिती लोकसभेत दिली आहे. विविध बँकांचे एनपीए यामुळेच वाढले आहेत. थकित कर्ज माफ केल्यामुळेच विविध बँकांचे विलिनीकरणही भविष्यात होणार आहे. यातील बहुतांश कर्जमाफी कॉर्पोरेट सेक्टरला झाली आहे. - देविदास तुळजापूरकर, राष्ट्रीय सरचिटणीस, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज‌ असोसिएशन

बँकांच्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्टनुसार उद्योजकांना, कार्पोरेट सेक्टरला कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अडचणी येतात. त्यांच्याकडून जुने कर्ज नवे करण्यासाठीही आधीच सह्या घेतल्या जातात हे दुर्दैव आहे. कार्पोरेट आणि शेतकरी यांच्यातील हा फरक व दुजाभाव आहे. - कालिदास आपेट, शेतकरी नेते, शेतकरी संघटना

‘एसबीआय’ला विलिनीकरणाचा घाटा
स्टेट बँक ऑफ इंडियात पाच सहयोगी बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे बॅँकेचा घाटा झाला आहे. थकित कर्ज, कर्जमाफी आणि सहयोगी बॅंकांच्या तोट्यामुळे बॅँकेचे आर्थिक नाकेबंदी झाली आहे. स्टेट बँकेच्या कार्पोरेट बेवसाइटवर दिलेल्या वार्षिक अहवालात स्टेट बँकेचा ग्रॉस एनपीए रेशो डिसेंबर २०१५च्या तुलनेत वाढला आहे. ही वाढ ५.१२ टक्क्यांवरुन तब्बल ८.६५ टक्क्यांपर्यंत आहे. नेट एनपीए रेशो देखील २.८९ वरून ५.३० टक्के एवढा वाढला आहे. नेट प्रॉफिटदेखील १० हजार ९६५ वरून ३ हजार २१९ वर आला आहे.

कर्जमाफीची खैरात
बँकांची नावे..... वर्षे २०१३...... २०१४........ २०१५..... २०१६..... २०१७
अलाहाबाद बँक...........१३५२........८७२.........२१०९.......२१२६......२४४२
आंध्रा बँक.................३३४...........२६३............११२४........८१४....१६२३
बँक ऑफ बडोदा........२४१५.........१७६७..........८६६.........२३७४.....७३४६
बँक ऑफ महाराष्ट्र......६६३..........४०१........२६४............९०३.......१३७४
कॅनरा बँक................१५३५........१५९१........१४७२..........३३८७.....५५४५
सेंट्रल बँक ऑफ इंडिया..१०६१.....१९९५.......१३८६........१३३४........२३९६
कार्पोरेशन बँक....७०९.....४६३......७७९.......२४९५.....३५७४
देना बँक............२३७.....४७९.....५१५.....७६०....८३३३
आयडीबीआय......३८३.....१३९३....१६०९....५४५९...२८६८
इंडियन बँक....५२०.........६२८........५५०.......९२६......४३७
इंडियन ओव्हरसीज बँक...१६४२...१४७४....२०८७.....२०६७...३०६६
ओरिएंटल बँक......१४१६....१२५२......९२५....१६६८....२३०८
पंजाब अँड सिंध....५०.......२०४.....२६३......३३५......४९१
पंजाब नॅशनल बँक...९९७....१९४७.....५९९६...६४८५.....९२०५
सिंडिकेट बँक......१२९७.....१०२५......१०५५.....१४३०.....१२७१
युको बँक.....६१७........१४२३...........०००.......१५७३.....१९३७
युनियन बँक ऑफ इंडिया........११२९....९१३.....९३१.....७९२......१२६४
युनायटेड बँक ऑल इंडिया......१०९४....४८१.....७६१.......६४९.....७१४
विजया बँक........५४३......२९६....७९१....५१०......१०६८
एकूण..........२०३५१.....१९७३९....२५०४६....३७६४२.......५४११०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पेयजल योजनेच्या कामांत गैरव्यवहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत ५० योजनांमध्ये २५ कोटींचा गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करा,’ अशी मागणी शुक्रवारी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे केली.

गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांना सात पानी सविस्तर निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे, की झेडपीच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून दिल्या जातात. त्यात अंदाज पत्रक तयार करणे, त्यास मंजुरी देताना अनियमितता करणे, पाणीपुरवठा योजनांची अंदाजपत्रके फुगवून बनविणे, विशिष्ट कंत्राटदारांना डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रके बनविणे, योजनांच्या कामासाठी ६० ते ७० किलोमीटर दूरवरून वाळू, खडी आणावी लागणारे असे दर्शविणे आदी नोंदी आढळल्या आहेत. वास्तविक ही कामे मंजूर करण्यापूर्वी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी तपासणे आवश्यक असते, पण या कामांच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याचा आरोप करून याची चौकशी करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.

जनगणनेची दशकनिहाय लोकसंख्येची आकडेवारी सोयीप्रमाणे घेणे व त्याप्रमाणे चुकीची लोकसंख्या वाढ दर्शवून योजनेंतर्गत गावाची संकल्पित वर्षाची चुकीची लोकसंख्या वाढ परिगणित करणे, लोकसंख्या आधारित योजना मंजुरी प्रदान करणे आदी कामे यादरम्यान झाल्याचे गायकवाड यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.

...अन्यथा कोर्टात जाणार
‘जुलै २०१४ ते जून २०१७ दरम्यान तत्कालीन कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांच्या स्तरावर किमान ५० प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. गेल्यावर्षी जिल्ह्यात पाण्याच्या टँकरवर झालेल्या खर्चाचाही फेरआढावा घ्यावा. यासंदर्भात योग्य कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागू,’ असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सीएम’भेटीनंतरही अतिक्रमण हटाव सुरूच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढाव्यात धार्मिक स्थळावरील कारवाईचे स्वरूप बदलण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन यापुढे अधिक जोमाने ही कारवाई करेल, असे मानले जात आहे.

गंगापूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी सकाळी चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्याबरोबर शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात सुरू असलेल्या कारवाईबद्दल चर्चा केली व आढावाही घेतला. यावेळी महापौर भगवान घडमोडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल देखील उपस्थित होते.

या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही निर्देश दिल्याची माहिती नंतर काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘गल्लीबोळात जाऊन किंवा खासगी जागेवरील धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला. सुरुवातीला विकास आराखड्यातील रस्त्यांवरील धार्मिक स्थळे हटवा, आराखड्यातील रस्ते मोकळे करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोर्टाच्या आदेशाचा मान राखून कारवाई करा, पण त्याचा प्राधान्यक्रम ठरवा. धार्मिक स्थळांची वर्गवारी करा, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना सांगितले आहे,’ असे पदाधिकारी म्हणाले.

दर्गा हटविला
महापालिकेतर्फे धार्मिक स्थळांवरील कारवाई शुक्रवारी देखील सुरूच होती. दक्षता विभागाचे प्रमुख एम. बी. काजी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रोहिदासपुरा येथील सय्यद शहा वली दर्गा हटविला. सकाळी पहिल्या सत्रातच ही कारवाई करण्यात आली. अन्य पथकांनी मात्र दिवसभर धार्मिक स्थळांची पाहणी करून नागरिकांना स्वतःहून धार्मिक स्थळ पाडून घेण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्र्यांनी धार्मिक स्थळांवरील कारवाईचा फक्त आढावा घेतला. विकास आराखड्यातील रस्त्यांवरील कारवाईबद्दल नेमकेपणाने काहीच सांगितले नाही. धार्मिक स्थळांवरील कारवाईसंदर्भात शासनाचे जोपर्यंत लेखी आदेश येत नाहीत, तोपर्यंत कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई सुरूच राहील. - डी. एम. मुगळीकर, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अतिक्रमण काढलेल्या जागांचे संरक्षण करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढलेल्या जागा त्वरीत संरक्षित करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी दिले. या प्रकरणी वक्फ बोर्डाच्या वतीने दाखल याचिका मूळ याचिकेसोबत सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आली असून, त्यावर मंगळवारी (८ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. वक्फ बोर्डाच्या याचिकेत पाडापाडीस स्थगिती देण्यास खंडपीठाने नकार दिला आहे.

औरंगाबादमधील धार्मिक स्थळे पाडण्याच्या कारवाईला आक्षेप घेत बक्फ बोर्डाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वक्फ बोर्ड ही याचिका मागे घेते का, अशी विचारणा कोर्टाने केली होती; परंतु वक्फ बोर्डाचे वकील सुशांत दीक्षित यांनी एका दिवसाचा वेळ मागून घेतला होता. त्यामुळे या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

वक्फ बोर्डाच्या याचिकेत पाडापडीस स्थगिती देण्यास नकार देत उपरोक्त याचिका मूळ याचिकेसोबत सुनावणीत घेण्याचे निर्देश दिले. रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेने काढले तर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी रस्ता बांधून काढावा. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण काढले, तर त्या जागेस तार कंपाउंड करून संरक्षित केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत याची खबरदारी महापलिका प्रशासन, जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाने घ्यावी असे निर्देशही देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images