Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जिल्हा परिषद सीईओंवर अविश्वास तूर्तास अवघड

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेतील विकास कामांना चालना मिळत नसल्याच्या आरोपावरून सत्ताधारी काँग्रेस आणि शिवसेनेने मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात जाहीरपणे दोन्ही पक्षांनी भूमिका मांडली, पण झेडपीतील राजकीय परिस्थिती आणि राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका पाहता अर्दड यांच्यावर अविश्वास ठराव तूर्तास तरी अवघड असल्याचे मानले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दलित वस्ती सुधार योजनेचा निधी गेल्या दोन वर्षांपासून प्लॅनिंग न केल्याने अखर्चित आहे. २३४ प्रस्ताव मांडूनही सहा महिने उलटून गेले, पण प्रशासनाने त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ३४ कोटींचा निधी पडून आहे. त्यात आता वाढ होऊन हा आकडा ४३ कोटींपर्यंत गेल्याचा दावा सदस्यांनी केला आहे. या कारणावरून शुक्रवारी सत्ताधारी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सीईओंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती विलास भुमरे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन झेडपीतील विकास कामे तुंबली आहेत. सीईओंचे लक्ष नाही, या कारणावरून अविश्वास ठराव आणणार असल्याचे जाहीर केले.

जिल्हा परिषदेत ६२ सदस्य असून सत्ताधारी शिवसेना व काँग्रेसचे अनुक्रमे १८ व १६ सदस्य आहेत. त्यांची संख्या ३४ आहे. सत्ता स्थापनेनंतर राजकीय उलाढाली झाल्यात त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य सेनेकडे येण्याची शक्यता आहे. सर्वाधिक २३ जागा मिळवूनही भाजपला विरोधीपक्षात आहे. त्यांच्यासोबत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, मनसेचे एक व रिपाईंचे एक सदस्य गेले होते. आता परिस्थिती बदलली आहे. सीईओंवर अविश्वास ठराव आणायचा झाल्यास ठरावाच्या बाजूने ४२ मतदान असणे आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यांचा आकडा सध्यातरी ३८पर्यंतच अडला आहे. परिणामी त्यांना भाजपची मदत घेणे क्रमप्राप्त आहे. ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे श्रेष्ठी काय निर्णय घेणार त्यावरच अविश्वासाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या नेतेमंडळींशी सोमवारी किंवा बुधवारी काँग्रेस व सेनेचे नेतेमंडळी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढील चित्र निश्चित होणार आहे.

मोर्चेबांधणीसाठी आज बैठक
शिवसेना आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांसह सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अविश्वास ठरावाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्यावेळी शुक्रवारी शिवसेना, काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपच्या काही सदस्यांबरोबर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या काही सदस्यांना सोबत घेऊन अविश्वास ठरावासाठी आवश्यक असणारे संख्याबळ गाठण्याचा सत्ताधारी आघाडीचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देसरडा यांना ताब्यात घेणे, हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला

$
0
0

औरंगाबाद : प्रा. एच. एम. देसरडा यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जात असताना पोलिसांनी रोखून तीन तास सिडको एन-७ पोलिस स्टेशनमध्ये ठेवले. कोणतेही कारण न देता अशा पद्धतीने ताब्यात घेणे हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असल्याच्या प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सिंचन भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राम बाहेती, अण्णा खंदारे, के.ई. हरीदास, सुभेदार बन, जनार्धन पिंपळे, एच. एम. देसरडा, भगवान मुकने आदींची उपस्थिती होती. याबाबत खंदारे यांनी सांगितले, की देसरडा यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले याचे उत्तरच पोलिसांनी दिलेले नाही. आम्ही पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर स्टेशन डायरी याची नोंद केली आहे का, याबाबत विचारले असता, त्याची नोंद केली नसल्याचे सांगितले. ताब्यात का घेतले, याचे उत्तर पोलिसांनी दिले नाही. आम्ही पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांना विचारले असता, त्यांनी बार असोशिएशनने पत्र दिल्याचे सांगितले, मात्र त्या पत्राची प्रत त्यांनी आम्हाला दिली नाही.

यावेळी देसरडा म्हणाले की, मी केवळ कार्यक्रम ऐकण्यासाठी आलो होतो, मात्र एखाद्या गुन्हेगाराला उचलावे अशा पद्धतीने पोलिसांनी मला उचलले. कार्यक्रम उधळून लावण्याचा माझा उद्देश नव्हता, मग मला ताब्यात का घेतले हे अनाकलनीय अाहे.

आज पोलिस आयुक्तांना भेटणार
देसरडा यांच्या प्रकरणात नेमकी कारवाई कोणाच्या सांगण्यावरून केली याबाबतचे पत्र देण्याची मागणी पोलिस आयुक्ताकडे करण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी कऱ्ण्यात येणार असल्याचे खंदारे यांनी सांगितले.

औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने आयोजित केलेला कार्यक्रम निमंत्रितांसाठीच होता. प्रा. देसरडा यांच्याकडे निमंत्रणपत्रिका नव्हती. त्यांनी आम्हाला विनंती केली असती, तर आम्ही त्यांना आमंत्रित केली असती. सभागृहात येताना नेमके काय झाले याची आम्हाला माहिती नाही.
- आनंदसिंह बायस, सचिव, औरंगाबाद खंडपीठ वकील संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवः दररोजच्या अन्नदानात भाविक तृप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणेशोत्सवाच्या काळात राजाबाजार येथील संस्थान गणपती ट्रस्टतर्फे दररोज दुपारी अन्नदान (भंडारा) केले जाते. त्याचा दररोज पाच ते सात हजार भाविक लाभ घेतात.
शहराचे ग्रामदैवत म्हणून संस्थान गणपती ओळखला जातो. गणेशोत्सवात संस्थान गणपती ट्रस्टतर्फे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. येथील ट्रस्टची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी अन्नदान केले जाते. अन्नदानाचे यंदाचे सलग ५१ वे वर्ष आहे. दररोज दुपारी अडीच वाजता अन्नदानाला सुरूवात होते. यावेळी चारही बाजूचे मार्ग बॅरिकेड लावून वाहतूक शाखेतर्पे बंद केले जातात. किराणाचावडी, जाधवमंडी व बालाजी मंदिरासमोर भाविकांना भोजनासाठी बसवण्यात येते. या दोन तासांत सुमारे पाच ते सात हजार भाविक अन्नदानाचा लाभ घेतात. पुरीभाजी, मसालेभात व बुंदी असा दररोजचा मेनू असतो. अन्नदानाचे नियोजन रमेश काका घोडेले करतात. प्रसाद वाटपासाठी ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते व राजाबाजार मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते पूर्णवेळ परिश्रम करतात.

मुस्लिम बांधवाचे सहकार्य

संस्थान गणपतीच्या शेजारी शहागंज येथे भाजी व फळ मार्केट आहे. येथील हातगाडीधारक मुस्लिम बांधव गणेशोत्सवाच्या काळात दुपारी अन्नदानाच्या कार्या हातातील काम सोडून सहभागी होतात. त्यांच्या हातगाडीवर अन्नाचे ट्रे ठेवून पंगतीमध्ये वाढण्यासाठी अनेक वर्षापासून ते पुढाकार घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १६५ ग्रामपंचायतींची निवडणुका जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
या वर्षाच्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील १६५ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून,यासाठीचे मतदान ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. यंदा सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे.
जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या १६५ पैकी ७४ गावच्या सरपंचपदी महिलांची वर्णी लागणार आहे. या निवडणुकीत उस्मानाबाद तालुक्यातील ४५ तर
तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याचबरोबर लोहारा तालुक्यातील १३, उमरगा तालुक्यातील २२, कळंब ३०, वाशी ४, भूम २ आणि
परंडा येथील एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगा, येडशी, येवती, रुईभर, कनगरा, समुद्रवाणी, टाकळीबेंबळी, खानापूर, कौडगाव या ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या लढती लक्षणीय ठरणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
या निवडणुकीची घोषणा होणार असल्याने विविध राजकीय पक्षांनी यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीमूळे कार्यकर्ता मेळाव्यासह
बैठकांचे फड रंगात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या या ग्रामपंचायत निवडणुकीत तगडा मुकाबला व पैशांची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोगानाथ क्रीडा मंडळ; समाजोपयोगी संदेशाची परंपरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेगमपुरा परिसरातील गोगानाथ क्रीडा मंडळाचे ढोल ताशा पथक दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी संदेश विसर्जन मिरवणुकीत सादर करत असते. गेल्या ५७ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे.
या मंडळाची स्थापना १९६० मध्ये झाली. काळानुरूप क्रीडा मंडळाच्या कार्यपद्धतीत अनेक सकारात्मक बदल झाले. क्रीडा मंडळाच्या ताफ्यात ५० ढोले, ५० झांज, १५ ताशे आहेत. ६० युवक-युवती गेल्या महिनाभरापासून दररोज रात्री आठ ते दहा या वेळेत सराव करतात. अशोक पठाडे, भरत गहिरे, अशोक गंगुले, किशोर लहरे यांनी ही परंपरा सुरू ठेवली. तिला पुढे नेण्याचे काम अजय पंडुरे, बिरजू रासने, मंगेश पठाडे, शांतीलाल गहिरे, मनोज कुंडारे, वीरू कुसाले, राहुल राजपूत, योगेश कुंभकर्ण, संदीप जगताप, विशाल गहिरे, मेघा पठाडे, श्रद्धा कचरे, गौरव लहरे, नरेश गंगुले हे करत आहेत.
विसर्जन मिरवणुकीत गोगानाथ क्रीडा मंडळाचा सजीव देखावा हे शहरवासियांसाठी विशेष आकर्षण असते. मिरवणुकीत सामाजिक संदेश देण्याचे काम मंडळाकडून केले जाते. यंदा झांज पथकातून समाजोपयोगी संदेश दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावर तस्करीप्रकरणी दोघांना उद्यापर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कत्तल करण्यासाठी दोन बैल घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना मंगळवारपर्यंत (पाच सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी रविवारी दिले.

जीपमधून कत्तलीसाठी जनावरे आणण्यात येत असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल आडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी, फिरंगे यांनी शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास सिल्लेखान्यातील शादीखाना हॉलच्या पाठीमागे सापळा रचून कत्तलीसाठी जनवारे घेऊन जाणाऱ्या खाटकांना पकडले. त्याच्या ताब्यातून प्रत्येकी १५ हजार रुपये किंमतीचे दोन बैल आणि जीप जप्त करण्यात आली. याप्रकरणी गणेश वाघ यांच्या तक्रारीवरून शेख आरेफ शेख मोहमंद (रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) व शफिक अलीखान रफिक खान (रा. समतानगर) या दोघांविरोधात कलम ५ (अ) व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ व सह कलम ११ (१), (च), (ज), प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शेख आरेफ व आरोपी शफिक अली या दोघांना अटक करुन त्यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने दोघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएड’ची बॅच ऑक्टोबर टू ऑक्टोबर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अध्यापक पदवी अभ्यासक्रमाची (बीएड) प्रवेश प्रक्रिया तीन वेळा वेळापत्रक बदलल्यानंतरही सुरू झालेली नाही. आता पुन्हा बदल करत सोमवारपासून प्रवेशाची फेरी घेतली जाईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. ही फेरी चार ते सात सप्टेंबरदरम्यान राबविली जाणार आहे. अद्याप निवड यादी जाहीर झाली नसल्याने फेरी लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. सप्टेंबर उजाडला तरी, प्रवेशाच्या फेरीची प्रक्रिया निश्चित नाही. तीन वेळा प्रवेशाचे वेळापत्रक बदलले. आता पुन्हा वेळापत्रक बदलत तीन ते सात सप्टेंबरदरम्यान पहिली फेरी होणार असल्याचे कक्षाने शनिवारी जाहीर केले. त्यापूर्वी निवड यादी जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले. निवड यादी रविवार रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या फेरीवर प्रश्नचिन्ह आहे. प्रवेशाची प्रक्रिया तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. अद्याप पहिलीच फेरी पूर्ण झाली नसल्याने प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न कायम आहे.

बीएड अभ्यासक्रमासाठी १३ व १४ मे रोजी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. चार महिने उलटले तरी प्रवेशाच्या प्रवेश पहिलीच फेरी पूर्ण झालेली नाही. बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने अभ्यासक्रमाचे सत्र केव्हा सुरू करायचे आणि अभ्यासक्रम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न कॉलेजांना पडला आहे. सप्टेंबरमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, तर ऑक्टोबरला अभ्यासक्रमाचे सत्र सुरू होतील. त्यामुळे ‘ऑक्टोबर टू ऑक्टोबर’ हे नवे शैक्षणिक वर्ष बीएड अभ्यासक्रमाचे असेल असे चित्र आहे.

विद्यार्थी इतरत्र घेतले प्रवेश
अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यंदा सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांनी इतरत्र प्रवेश घेतल्या प्राचार्यांचे म्हणणे आहे. राज्यात यंदा ४० हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झांज, पावली, लेझिमचा अनोखा संगम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ढोल, ताशांचा निनाद, पावली पथक आणि लेझिमचा ताल यामुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. बेगमपुऱ्यातील रणसंग्राम क्रीडा मंडळाचे पथक हे प्रमुख पथकांपैकी एक आहे. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत झांज, पावली आणि लेझीमचा अनोखा संगम नागरिकांना पाहण्यास मिळणार आहे.
या क्रीडा मंडळाची स्थापना १९६३ मध्ये झाली. सुरवातीला डीजेवर लेझिम पथकाचे सादरीकरण होत असे. दहा वर्षांपासून ढोल ताशा पथक पुन्हा कार्यान्वित केले. रणसंग्रामच्या ताफ्यात ४५ ढोल, १२ ताशे आणि ४० युवक युवतींचे झांज व लेझिम पथक आहे. मंडळाचे ३२५ सदस्य असून महिनाभरापासून तयारी सुरू केलेली आहे.
रणसंग्रामच्या सहभागाने विसर्जन मिरवणुकीत एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो. सामाजिक देखाव्यांची या मंडळाची परंपरा आहे. बेटी बचाव-बेटी पढाव, बाहुबली सारखे देखावे सादर केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सर्जिकल स्टाइकचा देखावा सादर करण्यात येणार असल्याचे मंडळाचे लखन सलामपुरे यांनी सांगितले.

नवीन काँबिनेशन

यंदा रणसंग्राम क्रीडा मंडळाने झांज, पावली आणि लेझीम पथकाचे एकत्रित सादरीकरण करणारे नवीन काँबिनेशन तयार केले आहे. हा प्रकार शहरवासियांनी निश्चितपणे आवडेल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुंदी वाटून संविधान विजय सन्मान सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीतसिंग रामरहिमवर बलात्काराच्या आरोपावरून सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे ‘आवाज इंडिया’ या संविधानप्रेमी नागरिकांनी स्थापन केलेल्या संघटनेतर्फे बुंदीचे लाडू वाटून स्वागत करण्यात आले. क्रांती चौकात हा ‘संविधान विजय सन्मान सोहळा’ घेण्यात आला.

कार्यक्रमात रतनकुमार पंडागळे, दिनकर ओंकार, बाबा गाडे, स. सो. खंडाळकर, अॅड. बाबा वावळकर, मिर्झा अब्दुल कय्युम, अॅड. अशोक म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले. मानवी हक्क आणि अत्याचाराचे खटले लवकरात लवकर निकाली लावण्यासाठी सरकारने जलदगती न्यायालये सुरू करावीत, जेणेकरून वर्षानुवर्षे निकालासाठी पीडितांना प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजक मुकुंद सोनवणे आणि अनिलकुमार सोनकामळे संघटनेच्या स्थापनेमागची भूमिका मांडली. यावेळी ज्येष्ठ नागरिक निळकंठ गुरुजी, मिनोरू गाडे, विश्वनाथ दांडगे, वसंत गाडे, जीवन सिरसाठ, हिरामाण साळवे, विनोद पागोरे, रमेश वानखेडे, आदित्य सोनवणे, धम्मा वानखेडे, उत्तम जाधव, विकास हिवराळे, भानुदास घोरपडे, यशवंत दाभाडे, सुनिल खरात, एस. एस. जमधडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संग्राम गणेश मंडळाची यंदा रत्नजडित मूर्ती

$
0
0

म. टा .प्रतिनिधी, औरंगाबाद,
नवीन औरंगाबाद मधील टीव्ही सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंदनगर येथे असलेले संग्राम गणेश मंडळाकडून आकर्षक मूर्तीची परंपरा कायम आहे. मूर्तीवर अधिक खर्च न करता समाजउपयोगी कार्यक्रम तसेच गरजुंना मदत करणारे मंडळ, अशी ओळख आहे.
गेल्या १५ वर्षांपासून स्वामी विवेकानंदनगर डी सेक्टरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मंडळाला कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा शिक्का बसू नये याची काळजी सर्व सदस्यांकडून घेण्यात येते. कॉलनीत वर्गणी न मागता ती केवळ मोजक्याच घरातून जमा केली जाते. त्यातून आर्थिक गणित जुळवण्याचे कसब सदस्यांना अवगत झाले आहे. कमीत कमी खर्च करून आकर्षक गणेशमूर्ती ही मंडळाची परंपरा यंदाही कायम आहे. यंदा खास रत्नजडित गणेशमूर्ती मंडळाचे आकर्षण ठरत आहे.
मोठ्या आकाराच्या मूर्ती, ढोल ताशा किंवा डीजेवर अधिकचा खर्च न करता तो अन्नदान तसेच गरीब-होतकरू मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यात मंडळ अग्रेसर आहे. गणेशोत्सवाच्या काळात डी सेक्टरमधील चौकामध्ये असलेले प्रत्येक घर मंडळाच्या विविध कामांसाठी हिरीरीने सहभागी होते.
यंदा सर्व वयोगटातील मुला-मुली, महिलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांच्या संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धेने रंगत आणली. चिमुकल्यांसाठी संगीत खुर्ची, चमचा लिंबू, चित्रकला, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. विसर्जनादिवशी विजेत्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात येणार आहे.
यावर्षी प्रत्येक घराला आरतीची संधी देण्याचा प्रयत्न मंडळातील सदस्यांकडून करण्यात आला. यासाठी चिठ्ठ्या टाकून कुटुंबांची निवड करण्यात आली. आरतीची संधी न मिळालेल्यांना इतर कार्यात प्रतिनिधीत्व देण्यात आले.

शैक्षणिक साहित्य

अन्नदानाचे महत्त्व ओळखून यंदाही भंडारा आयोजित केला. यासाठीही वर्गणीतील पैसा खर्च करण्याऐवजी सदस्यांनी स्वतः सामुग्री एकत्र करून पैसे वाचवले. त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी अनाथाश्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. हा भंडारा केवळ डी सेक्टरपुरता मर्यादित नव्हता, परिसरातील सर्व कुटुंबांनी त्याचा लाभ घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाभिक समाजातील गुणवंतांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नाभिक समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा नाव लौकिक वाढवावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांनी केले. नाभिक महामंडळातर्फे पंचायत समिती सभागृहात पाचवी ते पदवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपानराव सोनवणे हे होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावकर, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, गटविकास अधिकारी पुष्पा मनचंदा, मुख्याधिकारी विठ्ठल घोडके, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गुंजाळ, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत, नाभिक महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तोपंत अनर्थे, राज्य सरचिटणीस भगवानराव बिडवे, मराठवाडा अध्यक्ष दिलीप अनर्थे, जिल्हाध्यक्ष विष्णुजी वखरे, नाभिक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संत सेना महाराज, हुतात्मा भाई कोतवाल व सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात दत्तोपंत अनर्थे, राजेंद्र अनर्थे, चंद्रकांत अनर्थे व देविदास अनर्थे या चार भावांनी त्यांच्या मालकीची १३५ चौरल मीटर जागा नाभिक समाजासाच्या सार्वजनिक उपयोगासाठी दान केली. त्याबद्दल त्यांचा बाळासाहेब संचेती यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ५७ गुणवंत विद्यार्थी व २१ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद पठारे यांनी केले तर, सुधाकर आहेर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठ विस्तारीकरण डिसेंबरपासून

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात मंजूर संख्येपेक्षा कमी न्यायमूर्ती आहेत आणि न्यायदान कक्ष नाहीत त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या पाऊण लाखापेक्षा जास्त आहे. गेल्यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मान्यता दिलेल्या खंडपीठ विस्तारीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होईल, अशी माहिती खंडपीठाचे प्रशासकीय न्या. रवींद्र बोर्डे यांनी रविवारी दिली.

औरंगाबाद खंडपीठाच्या ३६व्या वर्धापनदिनानि‌मित्त आयोजित कार्यक्रमात न्या. बोर्डे बोलत होते. गेल्यावर्षी औरंगाबाद खंडपीठाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात न्या. बोर्डे यांनी केलेल्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. खंडपीठाच्या विस्तारीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी ५४ कोटी ५७ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. याशिवाय न्यायमूर्तींच्या सहा बंगल्यांसाठी १७ कोटी ८६ लाख आणि खंडपीठ आवारात क्लब हाउससाठी चार कोटी ७४ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. या विस्तारीकरणाचे काम डिसेंबरपूर्वी सुरू होईल. सध्या औरंगाबाद खंडपीठात १३ कोर्ट हॉल आहेत. विस्तारीकरणामुळे त्यात आणखी न्यायदानकक्ष उपलब्ध होणार आहेत. औरंगाबाद खंडपीठ १९८१मध्ये सुरू झाले, त्यावेळी अवघे दोन न्यायमूर्ती न्यायदान करत होते. आज १९ न्यायमूर्ती न्यायदान करत आहेत. औरंगाबाद खंडपीठात मंजूर असणाऱ्या न्यायमूर्तींची संख्या २४ आहे. त्याशिवाय दोन किंवा तीन सभागृह वकिलांच्या चेंबरसाठी दिले जाणार आहेत, असे न्या. बोर्डे यांनी सांगितले.

लॉ स्कूल सुरू
औरंगाबादच्या नॅशनल लॉ स्कूलमध्ये आजपर्यंत ५४ विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला आहे. ६ जागा आज रिक्त आहेत, त्याही लवकर भरल्या जातील असे न्या. बोर्डे यांनी सांगितले. या स्कूलसाठी वाल्मीजवळ आठ एकर जागा राज्य शासनाकडून मिळाली आहे. नक्षत्रवाडीच्या या जागेजवळच ३० ते ४० एकर जागा राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. या लॉ स्कूलचे वर्ग पहिले दोन वर्षे देवगिरी कॉलेजजवळील बीएड कॉलेजमध्ये होणार आहेत. या स्कूलचे कुलपती व सुप्रीम कोर्टातील न्या. रंजन गोगई, कुलगुरू डॉ. सूर्यप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली या स्कूलची वाटचाल सुरू राहणार आहे, असे न्या. बोर्डे यांनी सांगितले.

- २०१६ ः १२८७२ याचिका दाखल; १०७४० याचिका निकाली
- २०१७ ः १५ ऑगस्टपर्यंत दहा हजार २३४पैकी आठ हजार याचिका निकाली
- याशिवाय २० हजार याचिकांपैकी १४ हजार याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ समर्पित ‘ध्यानचंद’

$
0
0

समर्पित ‘ध्यानचंद’

सुधीर भालेराव
Sudhir.Bhalerao@timesgroup.com
@SudhirbMT
चॅट रूम
........................
फोटो ओळ - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद लाइफ टाइम अॅचिव्हमेंट पुरस्कार स्विकारताना फुटबॉल लिजेंड एस. एस. हकीम.
.....................................................

एन्ट्रो ः एस. एस. हकीम हे फुटबॉल क्षेत्रातील एक दबदबा असलेले नाव. वयाच्या ७५व्या वर्षीही फुटबॉलपटू घडवण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची त्यांची तयारी. रोम ऑलिंपिक स्पर्धेत खेळणारे औरंगाबादचे एकमेव ऑलिंपियन फुटबॉलपटू. १९५०च्या दशकापासून फुटबॉलपटू, फिफा रेफ्री, प्रशिक्षक आणि संघटक अशा विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलणारे हकीम यांना फुटबॉल क्षेत्रातील कामगिरीबद्दल मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘मटा’शी संवाद साधताना कीम यांनी कारकीर्दीचा उलगडलेला हा प्रवास....

- मेजर ध्यानचंद यांच्या नावाच्या पुरस्काराचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे ?
- मेजर ध्यानचंद हे माझे ‘हिरो’ आहेत. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळाला याचा मला विशेष आनंद अभिमान आहे. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची माझी पहिली भेट १९६८ मध्ये झाली. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यावेळी त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. फुटबॉल शिबिराच्यावेळी ते भेटत. खेळाविषयी खूप चर्चा करीत असत. माझ्या खेळाचेही त्यांनी कौतुक केले होते. मी त्यांचा मोठा फॅन होतो. ध्यानचंद पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोत्कृष्ट क्षण आहे आणि कायम राहील. ध्यानचंद यांना क्रीडा क्षेत्रातील पहिला भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा होता, असे वाटते. दिल्लीतील एका कार्यक्रमात ध्यानचंद यांच्यासोबतचा माझा फोटो आजही माझ्या जीवनातील आनंददायी ठेवा आहे.

फुटबॉलचा संपन्न वारसा तुम्ही कसा जोपासला ?
- आमचे कुटुंबच फुटबॉलमय आहे. माझे वडील एस. एस. रहीम हे त्यांच्या काळात भारतातील सर्वोत्तम फुटबॉल प्रशिक्षक होते. माझे काका एस. ए. रज्जाक हे हैदराबादेतील एक नामवंत फुटबॉलपटू होते. तसेच एस. ए. गफ्फार व एस. ए. करीम यांनीही फुटबॉलचे मैदान त्यांच्या काळात गाजवलेले आहे. या पिढीचा वारसा आम्ही संपन्नपणे चालवला याचा मला अभिमान वाटतो. माझ्यासह एस. एस. सलीम, एस. एस. वसीम, एस. ए. रहीम यांनीही फुटबॉल क्षेत्रात अमीट ठसा उमटविला आहे. जवळपास शंभर वर्षांपासून हकीम कुटुंब हे फुटबॉलची सेवा करीत आहे.

- ऑलिंपियन, स्क्वॉर्डन लीडर ते ध्यानचंद पुरस्कारापर्यंतची तुमची वाटचाल कशी होती?
- वडिलांकडून फुटबॉलचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर फुटबॉल हेच जीवनाचे मुख्य सूत्र राहिले आणि ते आजही कायम आहे. माझ्या वडिलांनी १९५२, १९५६ व १९६० च्या ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. सलग तीन ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची संधी अद्यापही कोणालाही मिळालेली नाही. त्यांच्या छायेत मी तयार झालो व घडलोही. १९६० मध्ये रोम ऑलिंपिकमध्ये मला प्रथम भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली. हंगेरी, फ्रान्स, पेरू व भारत हे संघ एकाच गटात होते. या स्पर्धेत भारतीय संघ पराभूत झाला असला तरी भारतीय संघाची कामगिरी चांगली होती. त्यानंतर भारतीय फुटबॉल संघ ऑलिंपिकपर्यंत मजल मारू शकलेला नाही.
रोम ऑलिंपिकनंतर एअर फोर्समध्ये १९६२ मध्ये पायलट ऑफिसर म्हणून मी नोकरीस लागलो. स्क्वॉर्डन लीडर पदापर्यंत पोहचलो. २२ वर्षांच्या सेवेनंतर मी निवृत्ती घेतली आणि त्यानंतर फुटबॉल क्षेत्राला वाहून घेतले. १९८६ मध्ये एनआयएस डायरेक्टर म्हणून काम सुरू केले. रिजनल डायरेक्टर म्हणून साईमधून निवृत्त झालो. औरंगाबादेतील साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा मी पहिला संचालक होतो. तीन वर्षांच्या काळात औरंगाबादच्या फुटबॉलचा दर्जा उंचावला. महिंद्रा क्लब, मोहमेडन स्पोर्टिंग क्लब, साळगावकर क्लब, महाराष्ट्र अंडर २१, जे. के. बँक या संघांचा प्रशिक्षक म्हणून मी काम केले आहे. साईचे महासंचालक इंजेटी श्रीनिवास यांच्यामुळे मी सध्या साई फुटबॉल सेलचा चीफ प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून भूमिका बजावत आहे. ध्यानचंद पुरस्काराने वयाच्या ७५व्या वर्षीही एक नवी ऊर्जा दिली आहे. फुटबॉलची सेवा करता येईल तेवढी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.

- मराठवाड्यातील फुटबॉलच्या स्थितीविषयी काय सांगाल?
- साई केंद्राचा मी संचालक होतो तेव्हा म्हणजे १९८९ च्या काळात औरंगाबासह मराठवाड्यातील फुटबॉल आघाडीवर होते. विविध महाविद्यालयातून शिकणारे विदेशी विद्यार्थीही फुटबॉल मैदान गाजवत होते. आजची स्थिती विदारक आहे. फुटबॉल हा अतिशय स्वस्त खेळ असूनही मराठवाड्यात या खेळाची पिछेहाट होताना दिसतेय, हे दुर्देवी आहे. हे चित्र बदलण्याकरिता फुटबॉल प्रशिक्षकांची संख्या वाढवणे नितांत गरजेचे आहे. शिवाय प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षकांना देखील फुटबॉलचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देता आले पाहिजे. त्यादृष्टीने क्रीडा शिक्षकांची कार्यशाळा सातत्याने घेतली गेली पाहिजे.

- मिशन फुटबॉलचा कितपत फायदा होईल, असे तुम्हाला वाटते?
- १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कप प्रथमच भारतात होत आहे. या स्पर्धेच्यानिमित्ताने मिशन फुटबॉल हाती घेण्यात आले आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु, वर्षभर उपक्रम घेऊन काही साध्य होणार नाही. खेळाडू घडवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करत राहावे लागतात. फुटबॉल वाटल्याने प्रत्येक विद्यार्थी फुटबॉल खेळू लागेल अशी कल्पना करणे चुकीचे आहे. फुटबॉल खेळात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शाळा व क्लब या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. शाळेच्या माध्यमातूनच हा खेळ जिवंत राहू शकतो. त्यामुळेच विविध वयोगटातील फुटबॉल स्पर्धा नियमित होणे आवश्यक आहे. आंतरशालेय स्पर्धा वर्षातून एकदा घेऊन काही होणार नाही. किमान दोन-तीन वेळेस शालेय पातळीवर फुटबॉलची स्पर्धा झाली पाहिजे.

- उदयोन्मुख फुटबॉलपटूंसमोर कोणती आव्हाने आहेत?
- फुटबॉल हा गरिबांचा खेळ म्हणून गणला जातो. अनेक दिग्गज फुटबॉलपटू हे गरिबीतून घडले आहेत. फुटबॉल व व्हॉलिबॉल या दोन खेळांसाठी फारसा खर्च येत नाही. एक चेंडूही पुरेसा असतो. खास करून ग्रामीण भागात हा खेळ अधिक प्रमाणात सहजपणे खेळला जाऊ शकतो. आज क्रिकेट जसे गल्लोगल्ली खेळले जाते. त्याच धर्तीवर फुटबॉल खेळले जाऊ लागले तर मातब्बर फुटबॉलपटू घडणे अवघड नाही. फुटबॉल लीगचा देशातील फुटबॉलपटूंना कितपत फायदा होत आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. खेळाडूंना वर्षभर स्पर्धात्मक खेळ दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे. मी एअर फोर्समध्ये असताना वर्षभरात २५-३० दर्जेदार स्पर्धा खेळत होतो. तशी संधी आताच्या खेळाडूंना मिळत नाही हे वास्तव्य आहे.
साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात सिंथेटिक फुटबॉलचे मैदान होणार आहे. या मैदानाच्या उभारणीनंतर फुटबॉलचे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र उभारले जावे असे वाटते. तसेच निवासी पद्धतीने खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची योजना राबवली गेली तर मराठवाड्यातील फुटबॉलला पुन्हा चांगले दिवस येतील असा विश्वास वाटतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी मोर्चा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून संवैधानिक मान्यता द्यावी या मागणीसह इतर मागण्यासाठी रविवारी लातूरात लिंगायत समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने लिंगायत समाज बांधव सहभागी झाले होते.
जिल्हा क्रीडा संकुल मैदानावरुन निघालेला मोर्चा शिवाजी पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना बाबासाहेब कोरे, माधव पाटील टाकळीकर, सोनु डगवाले आदिच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांना देण्यासाठीचे निवेदन सादर केले. या निवेदनात लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी, लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्याक वर्गामध्ये समाविष्ट करावे, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, २०२१ मध्ये होणाऱ्या भारताच्या जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद करावी, लिंगायत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मंडळाची किंवा प्रकल्पाची निर्मिती करावी या मागण्यांचा समावेश आहे.
या मोर्चाला कर्नाटकचे जलसंधारण मंत्री महालिंग पाटील, खाण आणि विज्ञान मंत्री विनय कुलकर्णी, कर्नाटक परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष बस्वराज गुन्ना, श्रीकांत स्वामी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रातील तर जिल्ह्यातूनही लिंगायत समाजाचे नागरिक उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांच्या सेवेसाठी मुस्लिम संघटनेसह इतर अनेक संघटनानी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
मोर्चेकऱ्यांसमोर लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक अविनाश भोसीकर, डॉ. माता महादेवी, बसव महामृत्युंजय महास्वामी, कृतिका गायकवाड यांची भाषणे झाली.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्यापुर्वी लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता होती. परंतु, पंडित नेहरुनी घात केला. त्यांचे प्रतिस्पर्धी निजलिंगअप्पा यांना दूर करण्यासाठी त्यांनी जत्ती यांना जवळ करून काही जणांना आम्ही विरशैव आहोत असे सांगण्यास भाग पाडल्याने ती मागणी प्रलबिंत राहिली.’
इस्लाम, ख्रिश्चन हे या देशातील धर्म नसताना त्यांना मान्यता आहे. परंतु, लिंगायत हा भारतातीलच धर्म असताना त्याला मान्यता का नाही ? असा सवाल करून त्यांनी लिंगायत समाज हा शांतताप्रिय असल्याचे सांगून सरकारने या मागणीचा गांभिर्यानी विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईत महामोर्चा
स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखालीच मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तीर्ण, एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी

$
0
0

उत्तीर्ण, एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दुसरी फेरी सोमवारपासून (४ सप्टेंबर) सुरू झाली आहे. या फेरीमध्ये पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण, गुणपत्रिकेत एटीकेटी असा शेरा असलेल्या विद्यार्थीही पात्र असतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शिक्षण विभागाने या विशेष फेरीत कोण सहभागी होऊ शकते याबाबत सोमवारी सूचनापत्र प्रसिद्ध केले. त्यानुसार ७ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी नंतर कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यावयाचा आहे. अद्याप प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण व एटीकेटी, प्रवेश नाकारलेले, भाग-१ अपूर्ण राहिलेले, अद्यापपर्यंत एकदाही ऑनलाइन अर्ज न भरलेले विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. एटीकेटीमध्ये फेब्रुवारी-मार्चसह जुलै-ऑगस्ट पुरवणी परीक्षेत एटीकेटी मिळालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. दहावीत दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर एटीकेटी असा शेरा लिहून येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रा. नितीन रिंढे यांना बी.रघुनाथ पुरस्कार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

प्रा. नितीन रिंढे यांना यंदाचा 'बी. रघुनाथ साहित्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. रिंढे यांच्या‘लिळा पुस्तकांच्या’या पुस्तकास हा पुरस्कार जाहीर झाला असून ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात येईल.

हा पुरस्कार समारंभ मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बुधवारी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. पुरस्कार वितरणानंतर लगेचच कवी संमेलन होणार आहे.

मागील २८ वर्षांपासून ‘बी. रघुनाथ स्मृतीसंध्या’ हा कार्यक्रम नाथ समूह व परिवर्तन संस्थेच्या वतीने बी. रघुनाथ यांच्या स्मृतीदिनानिमित्त घेतला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्यातून वाहतूक नियमांचे प्रबोधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद शहरातील गवळीवाडा परिसरातील श्रीकृष्ण गणेश मंडळातर्फे शिवाजी गवळी (पंगुडवाले) यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे अखंडपणे सुरू आहे.
१९९२ पासून जनजागृती व प्रबोधनावर आधारित विविध देखाव्यांच्या माध्यमातून हे गणेश मंडळ या मंडळाचे सर्वेसर्वा खंडू राऊत व सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा करीत आहेत. १९९३ मध्ये हुंडाबळीचे परिणाम, १९९४ मध्ये स्त्री चळवळ, त्यांनतर पल्सपोलिओ, लसीकरण, साक्षरता, पर्यावरण, एड्स मुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, राष्ट्रीय एकात्मता, बालविवाह, अशा विविध देखाव्यातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे.
यावर्षी उभारलेल्या देखाव्यातून मंडळाने वाहतुकीच्या नियमाबाबतची जाण नागरिकांना करून देण्याचा प्रयत्न केला आहे. दुचाकीवरून जाताना हेल्मेटचा
वापर करा, चार चाकी वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करा, वाहन चालवताना मोबाइलची दोस्ती टाळा, वाहन चालवताना वेगमर्यादाचे पालन करा,
सिग्नलचे काटेकोरपणे पालन करा, शक्यतो ओव्हरटेक टाळा, धोकादायकरित्या
वाहन चालवू नका, आदी नियमांची शिकवण देणारा देखावा या मंडळाने उभारला
असून, जनतेलाही तो भावला आहे.
तसेच या देखाव्यात वाहतूक नियमांची माहिती देणारे फलक व वाहतूक पोलिसचाही समावेश केलेला आहे. या शिवाय या मंडळाने वाहतूक नियमांचे पत्रकही प्रसिद्ध केले असून, त्याची प्रत गणेशभक्तांना हातोहात दिली जात आहे. याकमी मंडळाचे आनंद मिसाळ, राजेश दहीहंडे, सुरेश गवळी हे विशेष प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न १७ वर्षांपासून रखडला

$
0
0

औरंगाबाद : विनाअनुदानित शाळा, ज्युनिअर कॉलेजांमधील शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न १७ वर्षांपासून रेंगाळलेला आहे. राजकीय, प्रशासकीय गोंधळात मराठवाड्यातील १५ हजार शिक्षक, कर्मचारी भरडले जात आहेत. उच्च माध्यमिक कृती समितीने या प्रश्नावर आंदोलनाचे द्विशतक पूर्ण केले. त्यानंतरही प्रश्न ‘जैसे थे’ आहे.

राज्यात २०००मध्ये कायम विनाअनुदानित धोरण आले. त्यानंतर शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेले शिक्षकांचे प्रश्न कायम आहे. फेब्रुवारी २०१४मध्ये ‘कायम’ शब्द निघाल्यानंतर प्रशासकीय पातळीवरून प्रक्रिया रखडलेलीच आहे. शाळा मूल्यांकनाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. १७ वर्षांपासून पगाराविना काम करणाऱ्या या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आहे. त्यांचे विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत, परंतु या शिक्षकांना पगाराविना काम करावे लागते आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक स्तरांवर हे शिक्षक कार्यरत आहेत. माध्यमिक स्तरावर एक हजार ६५८ शाळांचे मूल्यांकन झाले. त्या सगळ्या शाळांचा सरसगट २० टक्के अनुदानाच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यानंतर एक व दोन जुलै २०१६ रोजी काही शाळांची यादी जाहीर करण्यात आली. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर मूल्यांकन बाकी असलेल्या शाळांची संख्याही ५०० असल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेक वर्षांपासून विनापगार काम करत असलेल्या शिक्षकांची प्रशासकीय दिरंगाईमुळे फरफट कायम आहे. पगार नसल्याने शाळेनंतर अनेक कर्मचारी कंपनीत, दुकानात काम करत आहेत.

उच्चमाध्यमिकचा मूल्यांकनाचा गोंधळ
उच्च माध्यमिकस्तरावरील (ज्युनिअर कॉलेज) मूल्याकंनाची तर प्रक्रियेचा घोळ अद्याप कायम आहे. जिल्हास्तर, विभागस्तरावर तपासणी होऊन मूल्यांकन निकष पात्र यादी संचालक, आयुक्तांकडे पाठविण्यात आली. आयुक्त कार्यालयाने ही यादी १३ जून २०१६ रोजी मंत्रालयात पाठविली. वर्षानंतर अद्याप ही यादी घोषित झालेली नाही. २०१४पासून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. २०१७ संपत आला तरी, हा प्रश्न रेंगाळलेलाच आहे.

शिक्षकांना प्रशासनाने अक्षरशः वेठीस धरले आहे. आंदोलनानंतर शासनाची मानसिकता बदलली, त्यानंतरही हा प्रश्न प्रशासनाने प्रलंबित ठेवला आहे. १६ वर्षांपासून पगाराशिवाय काम करत आहोत. मुलांचे शिक्षण, आई-वडिलांचे आजारपण, कौटुंबिक व इतर अडचणी, समाजातील मानहानी यामुळे शिक्षक पुरता खचला आहे. अनेक शिक्षकांनी तर आत्महत्येचा प्रयत्न केला.
- दीपक कुलकर्णी, विभागीय अध्यक्ष, विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती.


दृष्टिक्षेपात मराठवाड्यातील शाळांची संख्या
एकूण शाळा : २१७४२
एकूण विद्यार्थी : ४२ लाख ४० हजार २०३
शिक्षक संख्या : एक लाख ४० हजार २१४

माध्यमनिहाय शाळा
हिंदी : ४६
मराठी : २२०८३
उर्दू : २७८९
इंग्रजी : ४६६७
शासकीय शिक्षक : १४६
जिल्हा परिषद : ९३९४
महापालिका : ५५०
नगरपालिका : ६७
अनुदानित शिक्षक : ११६९७
विनाअनुदानित : ७६०२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसापचे ‌लेखिका साहित्य संमेलन बीडला

$
0
0

मसापचे ‌लेखिका साहित्य संमेलन बीडला
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा साहित्य परिषदेचे लेखिका साहित्य संमेलन यंदा बीडला होणार असल्याची माहिती अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील व कार्यवाह दादा गोरे यांनी सोमवारी दिली. २९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे होत असलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षांची निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, यंदा होत असलेल्या संमेलनाचे हे आठवे वर्ष आहे. अहिल्याबाई होळकर महिला प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष अॅड. उषा दराडे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेला दिलेले संमेलन आयोजनाचे निमंत्रण मसापने स्वीकारले आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत प्रा. किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नादुरुस्त मोबाइल हँडसेटची किंमत देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवीन हँडसेट खरेदी करूनही त्यात वारंवार दोष निर्माण झाले. दुरुस्त केल्यानंतरही मोबाइल व्यवस्थित सुरू झाला नाही. मोटोरोला आणि कुणाल टेलिकॉम यांनी ग्राहकाला मोबाइल हँडसेटची किंमत १४ हजार ९९९ रुपये परत करावी, असे निर्देश औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष नीलिमा संत, सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी दिले आहेत.
तक्रारदार समीर दिगंबर कुलकर्णी यांनी मोटोरोला कंपनीचा हँडसेट अॅमॅझॉन इलेक्ट्रॉनिक्स या ऑनलाइन पोर्टलवरून १४ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी केला. या मोबाइलला एका वर्षाची वॉरंटी देण्यात आली होती; परंतु मोबाइल घेतल्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांनंतरच त्यात दोष निर्माण झाले. मोटोरोलाचे येथील सर्व्हिस सेंटर कुणाल टेलिकॉममध्ये तक्रारदार समीर कुलकर्णी यांनी मोबाइल दुरुस्तीसाठी दिला. १५ दिवसांनंतर सेवा केंद्राने स्वतःकडेच हँडसेट ठेवला व नंतर तात्पुरता दुरुस्त करून तो तक्रारदारास दिला. दुरुस्त केल्यानंतरही २४ डिसेंबर २०१६, १६ जानेवारी २०१७, १ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि ९ मार्च २०१७ रोजी दुरुस्तीसाठी मोबाइल दिला; परंतु दुरुस्त करूनही या मोबाइलमधील दोष तसेच राहिले. आजही हा मोबाइल समर्थनगरमधील कुणाल टेलिकॉमने दुरुस्त करून दिला नाही. तक्रारदाराने मोबाइलची रक्कम व्याजासहित मिळावी आणि तक्रारीचा खर्च १० हजार रुपये मिळावा, अशी विनंती केली. अॅमॅझॉन, कुणाल टेलिकॉम आणि मोटोरोला मोबाइल इंडिया या प्रतिवादींना मंचाची नोटीस मिळाली; मात्र ते हजर झाले नाहीत.
कुणाल टेलिकॉमकडे हँडसेट देऊनही योग्य पद्धतीने तो दुरुस्त झाला नाही. मोबाइल कॉल आपोआप स्विच ऑफ होने आणि मोबाइल आपोआप क्लिक होणे, असे दोष हँडसेटमध्ये होते. प्रतिवादींनी तक्रारदाराला देण्याच्या सेवेत कमतरता केली आहे. वॉरंटी काळामध्येच मोबाइल अनेकवेळा नादुरुस्त झाला. सहा महिन्यांपासून हँडसेट कुणाल टेलिकॉममध्येच पडून आहे. त्यामुळे मोबाइल दुरूस्त करून देण्याचा आदेश उचित ठरणार नाही. त्यामुळे मोटोरोला, अॅमॅझॉन आणि कुणाल टेलिकॉम यांनी तक्रारदार समीर कुलकर्णी यांना मोबाइल हँडसेटची किंमत १४ हजार ९९९ रुपये परत करावी, असे निर्देश मंचाने दिले आहेत; तसेच या तिन्ही प्रतिवादींनी तक्रारदारास नुकसानभरपाई व तक्रार खर्च मिळून दीड हजार रुपये द्यावेत, असेही निर्देश मंचाने दिले आहेत. तक्रारदाराची बाजू स्नेहल कुलकर्णी यांनी मांडली.

१५ ऑगस्ट २०१६ ः मोबाइलची खरेदी
डिसेंबर २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ ः चारवेळा मोबाइल दुरुस्तीसाठी दिला.
९ मार्च २०१७ ः दुरुस्तीसाठी दिलेला मोबाइल सेवा केंद्रातच
२७ मार्च २०१७ ः मंचामध्ये तक्रार दाखल
८ ऑगस्ट ः मंचाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images