Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वेडसर महिलेवर कारवाईची मागणी

$
0
0
गुलमंडी, दिवाण देवडी भागात नागरिकांना त्रास देणाऱ्या मनोरुग्ण महिलेवर कारवाई करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी सिटीचौक पोलिसांकडे केली. या महिलेमुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोंढा नाका येथे भुयारी मार्ग अशक्य

$
0
0
इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार हायवेवर भुयारी मार्ग तयार करता येत नाही, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने निधी दिल्यास अमरप्रीत चौकापासून आकाशवाणीपर्यंत उड्डाणपुल करण्याची तयारी दर्शविण्यात आली.

पेट्रोल पंप आज राहणार बंद

$
0
0
शहरात पेट्रोल डिजेल खरेदीवर शासनाने अतिरिक्त व्हॅट आकारणी केली आहे. शहरातून पेट्रोल डिजेल खरेदी घटल्याने, याचा परिणाम शहरातील पेट्रोल पंप चालकांच्या व्यवसायावर झाला आहे.

डोंगरकाप्यांवर कारवाईची मागणी

$
0
0
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखावा व डोंगरकाप्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पर्यावरण समितीच्या सदस्यांनी केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी समितीची बैठक झाली.

महापौरांचे खासदारांवर शरसंधान

$
0
0
महापौर व सभागृहनेत्यांनीआज मंगळवारी थेट खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरच सरसंधान साधले आहे. काही ठराविक नेते अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावतात, त्यामुळे अधिकारी मुख्यालयात रहात नाहीत.

विद्यापीठ टेंडर प्रक्रियेवर शंका

$
0
0
विद्यापीठाच्या परीक्षाप्रक्रियेसाठी काढण्यात येणाऱ्या टेंडर प्रक्रिया शंकेच्या भोवऱ्यात सापडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठात परीक्षेच्या संदर्भातील टेंडरप्रक्रिया दोन टप्प्यात राबविली गेली. त्यात तांत्रिक आणि आर्थिक टप्प्यांचा समावेश होता. तांत्रिक प्रक्रिया मॅन्युपलेट करताना केवळ एकाच कंपनीला पात्र ठरविण्यात आले.

वेरूळ महोत्सव यंदा होणारच

$
0
0
दोन वर्षांपासून रडखडलेल्या वेरूळ अजिंठा महोत्सव यंदा घेण्यात येणार आहे. शहराच्या ऐतिहासिक सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या महोत्सवाचे आयोजन जानेवारी अखेरच्या आठवड्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली.

अधिकारी ‘रडार’वर

$
0
0
एसटी विभागात नोकरी लावण्यासाठी एका उमेदवाराला खाते क्रमांकाचा एसएमएस पाठविणाऱ्या निलंबित एसटी कर्मचारी डी. के. हिवराळे याची चौकशी सुरू करण्यात आली.

कारवाईत मंडळ ‘थंड’च

$
0
0
पॉलिटेक्निक पेपरफुटी प्रकरणानंतर गुन्हा दाखल करण्याव्यतिरीक्त मंडळाने आपल्या स्तरावर ठोस कोणती‌ही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. पेपरफुटीचे रोज नवेऱ्नवे पैलू समोर येत आहेत; तसेच प्रश्नपत्रिकेला मंडळाच्या विभागीय कार्यालयातून पाय फुटल्याचे स्पष्ट असताना विभागातील अधिकाऱ्यांवरील कारवाई किंवा चौकशीबाबत मंडळ मात्र अद्याप ‘थंड’च आहे.

स्टोन क्रशर, खदान मालकांना मिळणार तात्पुरती परवानगी

$
0
0
दंडाची रक्कम वाढवून वाहतुकीसाठी स्टोन क्रशर व खदान मालकांना पास देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी जाहीर केला. स्टोन क्रशर व खदानमालकांची बैठक जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या दालनात झाली.

ग्रामीण पोलिसांचे ‘मिशन ऑल आउट’

$
0
0
गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी हाती घेतलेल्या मिशन ऑल आउट अंतर्गत सोमवारी रात्री पैठण, बिडकीन परिसरात कोबिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले होते.

आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडणार

$
0
0
जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीच्या आंदोलनानंतर जलसंपदा विभागाने जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही बंधाऱ्याच्या लाभधारक शेतकऱ्यांनी पेढे वाटून स्वागत केले आहे.

पावसाचा फटका; मक्याचे नुकसान

$
0
0
सोमवारी रात्री पावसाने जोरदार तडाखा दिल्याने बाजार आवारातील सुमारे एक हजार क्विंटलपेक्षा जास्त मक्याचे नुकसान झाले आहे. माल काही प्रमाणात काळाही पडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आठ दिवसांत हा दुसरा तडाखा पावसाने दिल्याने व्यापारीवर्ग त्रस्त झाला आहे.

झाड पडून म्हैस दगावली

$
0
0
सोमवारी रात्री बेमोसमी पावसाने खुलताबाद तालुक्यात जोरदार हजेरी लावली . पावसाच्या तडाख्यात झाड अंगावर पडल्याने तिसगाव येथील साहेबराव मांगू राठोड यांची म्हैस दगावली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ .आर. एम. इंगळे यांनी म्हशीचे शवविच्छेदन केले. तलाठी आप्पासाहेब सोनवणे यांनी मृत म्हशीचा पंचनामा केला.

कन्नड तालुक्यातील ऊसतोड मजुरांचे हाल

$
0
0
सोमवारी रात्री झाल्यामुळे तालुक्यात कापूस, मका, गहू, तुरीचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे कारखाना परिसर, टापरगाव, हतनूर शिवारातील ऊसतोड मजुरांचे हाल झाले.

मोदींच्या सभेसाठी लाखावर कार्यकर्ते

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेसाठी मराठवाड्यातून एक लाखाहून अधिक कार्यकर्ते जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सहा विशेष रेल्वेंची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक बूथवरून एका जीपची सोयही करण्यात आली आहे.

मराठवाड्यात आणखी पावसाची शक्यता

$
0
0
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होऊन येत्या ४८ तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. औरंगाबाद शहराला सोमवारी रात्री पावसाने अचानक झोडपून काढले. शहरात ६० मिलीमीटर पाऊस पडला.

उद्धव ठाकरेंनी केलेली कारवाई योग्यच

$
0
0
पक्षावर किंवा पक्ष नेतृत्वावर टीका करून कुणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जात असेल तर त्याच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेली कारवाई योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आज मंगळवारी व्यक्त केली.

पेपर जाळल्याचा पुरावा सापडेना

$
0
0
पॉलिटेक्निकच्या पेपर चोरल्यानंतर जाळल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. मात्र, त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे पेपर जाळण्याच्या विषयावर सांशकता निर्माण झाली आहे.

‘सीएम’कडून भ्रष्टाचाराची पाठराखण

$
0
0
‘‘आदर्श’ घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत,’ असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या विभागीय बैठकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images