Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

६९ लाखांच्या चोरीमुळे पोलिसही चक्रावले

$
0
0
रजिस्ट्री कार्यालयाच्या आवारातून बुधवारी सायंकाळी कारची काच फोडून ६९ लाखाची रक्कम लंपास केल्याचा प्रकार घडला. रजिस्ट्री कार्यालयाच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेंजबाहेर हा प्रकार घडल्याचे फूटेजमध्ये समोर आले.

क्रांतीचौक पाण्याच्या टाकीचे छत कोसळलेलेच

$
0
0
क्रांतीचौक पाण्याच्या टाकीचे छत कोसळलेल्या अवस्थेतच आहे. छत कोसळल्यामुळे ताडपत्री टाकून ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न पालिकेच्या प्रशासनाने केला होता. आता ही ताडपत्रीही कुजली असून त्यामुळे नागरिकांना दुषित पाणीपुरवठा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ढगाळ वातावरणाचा पिकांना अडसर

$
0
0
पंधरा दिवसात दोन वेळेस झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. तसेच गव्हाची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीची ५१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

संपन्न वारसा गमावल्याबद्दल हळहळ

$
0
0
मराठवाड्यातील दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी लोटू पाटील यांच्या मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केल्यानंतर नाट्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या गलथान कारभाराबद्दल ज्येष्ठ रंगकर्मींनी नाराजी व्यक्त केली. तसेच या मौल्यवान दुर्मिळ वस्तूंचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

महापौरांचा अंबरदिवा संकटात

$
0
0
महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्रालयाने काढलेल्या अध्यादेशानुसार ‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिकेच्या महापौरांचा अंबरदिवा संकटात सापडला आहे. या महापौरांना त्यांच्या गाडीवर अंबरदिवा लावण्याची परवानगीच नाही, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

२५ वॉर्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0
रेल्वेस्टेशन परिसरात हाती घेण्यात आलेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सुमारे २५ वॉर्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यापैकी काही वॉर्डात पाच दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही, त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

अपघातात आजोबा-नातू ठार

$
0
0
स्कॉर्पिओ व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील आजोबा व नातू हे ठार झाले. हा अपघात बुधवारी सांयकाळी शेवगाव येथील आखेगाव चौकात झाला.

एसटी विभाग राबविणार ''प्रवासी डे''

$
0
0
एसटी विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच, प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन त्यांना सेवा देण्यासाठी, एसटी विभाग १० डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी ‘प्रवासी डे’ साजरा केला जाणार आहे. या माध्यमातून प्रवासी थांब्यावर, थांबलेल्या प्रवाशांसाठी बसची व्यवस्‍था करणे, बस किती वाजता येणार आहे? याची माहिती देणे, याशिवाय बस थांबवून प्रवाशांना बसमध्ये बसवून देणे ही कामे कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे.

‘बुद्ध सांगणार, मी भीम सांगणार...’

$
0
0
परंपरेच्या जोखडात अडकलेल्या दलित समाजाला नवी वैचारिक जाणीव देण्याचे काम एकेकाळी आंबेडकरी जलशांनी केले. विचारांचा वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम भीमगीतांच्या माध्यमातून सुरू आहे.

तरुणीकडून नाट्यअभिनेत्याची फसवणूक

$
0
0
पहिले लग्न झालेले असताना तरुणीने व तीच्या नातेवाईकांनी नाट्यकलाकाराशी दुसरे लग्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी रात्री क्रांती चौक पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसात या तरुणीने घरातील दागीने व रोख रक्कम घेऊन पलायन केले होते.

मराठा समाजाला जातीचे दाखले द्या

$
0
0
राज्य शासनाने २००४ मध्ये कुणबी-मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश केला आहे; पण मराठवाड्यातील कुणबी समाजाची नोंद शासनाकडे नसल्याने या समाजाला जातीचे प्रमाणपत्र दिले जात नाही. परिणामी, कुणबी मराठा समाजालाओबीसी आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

व्यापारी संकुलातील गाळे लाटले

$
0
0
देगलूर पालिकेने दिवंगत पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या नावाने बांधलेल्या व्यापार संकुलातील बहुतांश गाळे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांनी लाटल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. लिलावाच्या नावाखाली संबंधीतांनी गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे.

ठेवीदारांसाठी भाजपचा मोर्चा

$
0
0
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्वसामन्य ठेवीदारांना त्यांच पैसा मिळाला पाहिजे तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेला राज्य सरकारने दोनशे कोटीची मदत द्यावी. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

अवैध मार्गदर्शकांना कोणाचा ‘आशीर्वाद’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पात्रता नसतानाही ५१ जणांना संशोधन मार्गदर्शक (पीएचडी गाइड) म्हणून मान्यता दिल्याचे समोर आले आणि संशोधन क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

रोज बदलणाऱ्या उत्तरांनी पोलिस वैतागले

$
0
0
प्रारंभी वितरण केंद्राकडे बोट, नंतर पाकिट गहाळ प्रकरण, इतर विषयाचे पाकिट ‘मॅथ्स-१’च्या पाकिटात मिसळल्याचा प्रकार, त्यानंतर खाजगी संस्थेला हे पाकिट दिल्याचा दावा आणि आता मुख्य कार्यालयाकडूनच पाकिट कमी असल्याचे मंडळाच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सांगत आहेत.

तिसऱ्या आरोपीचीही जामिनावर सुटका

$
0
0
पॉलीटेक्निकच्या पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेला तिसरा आरोपी राहुल मकासरे याची गुरुवारी जामिनावर सुटका करण्यात आली. बुधवारी याच प्रकरणातील दोन आरोपींना जामीनावर सोडण्यात आले आहे.

‘इंजिनीअरिंग’ परीक्षा वेळापत्रकानुसारच

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सुरू होणाऱ्या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या परीक्षा ७ डिसेंबरपासून सुरू होत आहेत. रिड्रेसलचा निकालाला उशीर झाल्याने या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

आता तरी वसतिगृहात प्रवेश द्या

$
0
0
शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी आदिवासी समाजातील शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. किरायाच्या रुममध्ये राहणे परवड नाही, असे सांगून वसतिगृहात प्रवेश द्या, असा टोडा फोडून विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

पाणचक्कीत बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0
ऐतिहासिक पाणचक्कीत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणचक्की बघायला हजारो देशीविदेशी पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

२० लाखांच्या खंडणीची मागणी

$
0
0
महिला हॉटेल व्यवसायिकाच्या घरी जाऊन ठार मारण्याची धमकी देत २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष अरुण बोर्डे व सहा आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images