Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह

$
0
0

११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त मिलकॉर्नर येथून वीज सुरक्षा जनजागरण रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीच्या उद्घाटनापूर्वी वीज कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेची शपथ घेतली. तसेच क्रांतीचौक येथे रॅलीचा समारोप वीज सुरक्षेवर आधारित सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या नाट्य विभागाच्या कलाकारांनी नाटक तयार करून उपस्थितांना वीज सुरक्षेच्या महत्त्वाबाबतची माहिती दिली.
११ जानेवारी ते १७ जानेवारी या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महावितरण आणि उर्जा व कामगार विभागाच्या विद्युत निरीक्षक विभागाच्या संयुक्त विद्यमाने महावितरणाच्या मुख्यालय येथून गुरुवारी (११ जानेवारी) रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या आधी सहव्यवस्‍थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी उपस्थितीत वीज कर्मचारी, वीज कंत्राटदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना वीज सुरक्षेबाबत शपथ दिली. बकोरिया यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. ही रॅली मिलकॉर्नर, औरंगपुरा, टिळकपथ, पैठण गेट मार्गे क्रांतीचौक येथे पूर्ण झाली. यावेळी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, विद्युत निरीक्षक मंडळाचे अधिक्षक अभियंता विनय नागदेव, इलेक्ट्रिकल फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल काँन्ट्रक्टर असोसिऐशनचे अरूण अवघव पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सरवस्ती भुवन महाविद्यालच्या नाट्य विभागाच्या मुलांनी विद्युत सुरक्षेबाबत नाटक सादर करून उपस्थितांमध्ये जनजागरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

$
0
0

कन्नड ः अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन सतत दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची घटना कन्नड तालुक्यात घडली. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून; घुसूरतांडा (ता. कन्नड) येथील अल्पवयीन मुलीस आरोपी विनोद नरसिंह जाधव याने आकाश वासुदेव केवट, रहेमानखान गुलाबखान पठाण व विधी सर्घष बालक या मित्रांच्या मदतीने मंगळवारी सांयकाळी सहाच्या सुमारास संगनमत करून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. आरोपी विनोद याच्या घराजवळ सोडून दिले. यानंतर आरोपी विनोद याने मंगळवारी रात्री व बुधवारी रात्री यादरम्यान राहत्या घराजवळ व अंधानेर शिवारात लैंगिक अत्याचार केले. पीडिताच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केला असता बुधवारी रात्री पीडित मुलीचा शोध लागला आहे.

यातील तिन्ही आरोपींना कन्नड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडिताच्या वाडिलांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (११ जानेवारी) पहाटे कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निविदेची मुदत संपल्याने अनेक वसाहती अंधारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या निविदेची मुदत संपली असून पालिका प्रशासनाने मुदतवाढ देण्यात चालढकलपणा केल्याने शहरातील बहुतांश वसाहती अंधारात आहेत, अशा भावना नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केल्या. कामाच्या संदर्भात महापालिका प्रशासनाची अनास्था आहे, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
एलईडी लाइटच्या नावाखाली शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वारंवार तक्रार केल्यानंतरही बंद पथदिवे सुरू केले जात नाहीत. कंत्राटदारही काम करीत नाही, अशा तक्रारी नगरसेवक राजगौरव वानखेडे, राखी देसरडा, सीताराम सुरे, कीर्ती शिंदे, मनीषा मुंडे, संगीता वाघुले यांनी मांडल्या. सभापती बारवाल यांच्या निर्देशानुसार विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. देशमुख यांनी खुलासा केला. निविदेची मुदत ३१ डिसेंबरला संपली असून मुदतवाढ देण्याचा विषय सहा महिन्यापासून प्रलंबित आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. वानखेडे म्हणाले, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे नागरिकांच्या शिव्या आम्हाला खाव्या लागत आहेत. शहर अभियंता पानझडे म्हणाले, कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याची प्रक्रिया वेळेत सुरू करायला हवी होती. ती वेळेत सुरू न केल्यामुळे मी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना समज दिली आहे. या संदर्भात बावीस कंत्राटदारांची बैठक लवकरच बोलवण्यात येईल. संपूर्ण शहरात एलईडी लाइट लावण्यात येणार आहेत. टप्प्या टप्प्याने हे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य रस्त्यावरील पथदिवे एलइडीमध्ये बदलण्यात येतील, असे पानझडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजस्तंभाची जागा ‘सीएमआयए’कडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रांतिचौकातील स्मरणीय ध्वजस्तंभाची जागा आणि तेथील स्मारक देखभाल दुरुस्तीसाठी उद्योजकांच्या चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) या संघटनेला देण्याचा ठराव गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. पाच वर्षांसाठी हा परिसर सीएमआयएच्या ताब्यात देण्यात येणार आहे. क्रांतिचौकातील काला चबुतरा आणि झाशी राणी उद्यानाच्या जागेवर स्मरणीय ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. ध्वजस्तंभ उभारून तेथे स्वातंत्र्यवीरांचे स्मारक करण्यासाठी सीएमआयए या संघटनेने पुढाकार घेतला होता. या संघटनेमुळे तेथील काम योग्य प्रकारे पार पडले. ध्वजस्तंभाच्या परिसराचे पावित्र्य कायम राखण्यासाठी त्या परिसराच्या देखभाल दुरुस्तीचे काम सीएमआयए या संघटनेला देण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता, त्याला मंजुरी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात १३९ संभाव्य अपघात स्थळे

$
0
0

शहरात १३९ संभाव्य अपघात स्थळे
विद्युत सुरक्षेच्या दृष्टिने जिल्ह्यात ४९६ अपघात प्रवण क्षेत्र
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
घरापासून काही अंतरावर असलेल्या विजेच्या तारा, उघड्या डीपी आणि लोंबकळलेल्या तारांसह विद्युत सुरक्षेच्या दृष्टिने धोकादायक असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील ४९६ जागांची अपघात प्रवण क्षेत्र म्हणून नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात अशा संभाव्य अपघात स्‍थळांची संख्या १३९ इतकी असल्याची माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या अहवालावरून स्पष्ट झाली आहे.
शासनाच्या उर्जा, उद्योग आणि कामगार खात्यातंर्गत कार्यरत असलेल्या राज्यामधील सर्व विद्युत निरीक्षक कार्यालयांना त्यांच्या विभागातंर्गत अपघात प्रणव क्षेत्राची माहिती राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. औरंगाबाद विभागाचे तत्कालीन विद्युत निरीक्षक एस. वाय. मुजावर यांनी यासंदर्भातील सर्वेक्षण सुरू केले. त्यानंतर विद्युत निरीक्षक मिलिंद कुऱ्हाडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात विविध गावे तसेच विविध भागाचा दौरा केला.
या दौऱ्यामध्ये उघड्या डीपी, वाकलेले खांब, दोन खांबामधील तारांचे अंतर वाढल्याने लोंबकळलेल्या तारा, दोन विजेच्या वाहिन्यांच्या तारा एकमेकांना क्रॉस करीत आहेत. पत्र्याच्या घरावरील विजेच्या तारांसह ग्रामीण भागातील वीज वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात औरंगाबाद शहरापेक्षा ग्रामीण भागात विजेच्या पायाभूत सुविधांची कामे वेगाने होत नसल्यामुळे तेथे अपघात होऊन जिवित आणि वित्तीय हानी होण्याचा धोका अधिक आहे, असे लक्षात आले.
ग्रामीण भागासह शहरातही अशाच अपघात प्रवण स्‍थळांची माहिती देण्यात आली आहे. जुन्या औरंगाबाद आणि नवीन औरंगाबादमध्ये जुन्या केबल वाहिन्या, तारांच्या जवळच इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. मंजुरपुरा, शिवशंकर कॉलनी, विष्‍णुनगर तसेच अन्य वसाहतींचा समावेश या अहवालात करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरात अनेक ठिकाणी डीपी उघड्या असलेल्या स्‍थळांची माहिती देण्यात आलेली आहे. औरंगाबाद शहरात लोंबकळलेल्या तारांचा विषय हा पडेगाव, मिटमिटा‌ आणि जुन्या शहरातही आढळत असल्याचा अहवाल विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून देण्यात आला आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
अहवाल शासन दरबारीच
वर्ष २०१७ मध्ये अपघात प्रवण स्‍थळांचा अहवाल शासनाने मागितलेला होता. त्यानुसार अहवाल देण्यात आला आहे. याबाबत पुढे काय कारवाई झाली? याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
महावितरण कार्यालयाची कारवाई चालूच
या अहवालाबाबत महावितरण कार्यालयात विचारणा केली असता, या अहवालाबाबत त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. मात्र, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी काही परिमंडळात काही भागामधील डीपींचे फोटो काढलेले होते. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी अशा ग्रामीण आणि शहरातील उघड्या डीपी दुरुस्त करणे तसेच ट्री कटिंग करणे यासारखी कामे त्वरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागात काम सुरू असल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात आरोपींचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक करणाऱ्या सात आरोपींचा नियमित जामीन अर्ज जिल्हा कोर्टात फेटाळण्यात आला, तर याच प्रकरणात वैद्यकीय कारणासाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या सहा आरोपींना अटक करून गुरुवारी (११ जानेवारी) कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना सोमवारपर्यंत (१५ जानेवारी) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच दंगलीतील २८ आरोपींना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर शहरात उसळलेल्या दंगलीतील आरोपींवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी सिडको पोलिसांनी संतोष सांडू साळवे (३६, रा. हडको), उषा साहेबराव जोगदंड (३५), रुपाली देवराव मिसाळ (२६), सुनिता ज्ञानेश्वर साळवे (सर्व रा. सिद्धार्थ नगर), अतुल उत्तमराव दाभाडे (२७, रा. मुकुंदवाडी) व राजपाल धनराज सावळे (रा. हडको) या आरोपींना अटक होऊन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अशोक भाऊसाहेब वाहूळ (रा. वाळूज), संदीप भुजंगराव कांबळे (वडगाव कोल्हाटी) व जालिंदर रघुनाथ सोनवणे (रा. वडगाव कोल्हाटी) या आरोपींना अटक करून त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व आरोपींनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, आरोपींचा भविष्यात दंगलीमध्ये सहभाग नाकारता येत नाही. या आरोपींना जामीन मंजूर करण्यात आल्यास भीतीमुळे या प्रकरणात तक्रार करण्यास कोणी धजावणार नाही, तपास कामात हे आरोपी अडथळा आणू शकतात व त्यामुळेच या आरोपींना नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा अतिरिक्त सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी कोर्टात केली.

आरोपींकडून वसूल होणार नुकसान भरपाई
दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या २६ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन व जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जामिन मंजूर केला. आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला. कोर्टाच्या परवानगीशिवाय शहर सोडून जाऊ नये, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत रोज संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावावी आणि तपास अधिकाऱ्यांना सर्व सहकार्य करावे, दोन जामीनदार द्यावेत व तुरुंग अधिकाऱ्यांकडे हमीपत्र द्यावे, त्या हमीपत्राची पडताळणी करण्यासाठी तुरुंग अधिकारी कोर्टात येतील व त्यानंतरच मुक्तता आदेश दिला जाईल. परिसरामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याची सर्व जबाबदारी आरोपींवर राहील व सीसीटीव्ही चित्रिकरणात आरोपींनी मालमत्तेचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याची नुकसान भरपाई आरोपींकडून वसूल केली जाईल. तसेच आरोपींनी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास आरोपींचा जामीन रद्द होईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे व जिल्हा अतिरिक्त सरकारी वकीस सतीश मुंडवाडकर यांनी बाजू मांडली.

सहा आरोपींना कोठडी
याच प्रकरणात उस्मानपुरा पोलिसांनी नारायण सुभाष साळवे (रा. नागसेन नगर), आनंद उत्तम दाभाडे (रा. फुलेनगर), शुभम दिलिप मगरे (रा. सातारा परिसर), विशाल राजेंद्र खरात (रा. फुलेनगर), राजू दादाराव गायकवाड (रा. लाडगाव), अजय अशोक म्हस्के (रा. फुलेनगर) यांना अटक करून तीन जानेवारी रोजी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार आरोपींनी केली होती. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वाशे गावे केली जलसमृद्ध, ‘सीएम’कडून गौरव

$
0
0

सव्वाशे गावे केली जलसमृद्ध
महात्मा फुले जलमित्र पुरस्काराने पुरुषोत्तम वायाळ सन्मानित; अडीच हजार युवकांना केले व्यसनमुक्त
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागच्या दोन ते तीन वर्षांत तब्बल सव्वाशे ते दीडशे गावे जलसमृद्ध करुन या गावांतील शेती व शेतकरी समृद्ध करणाऱ्या आणि त्याचवेळी अडीच हजार युवकांना व्यसनमुक्त करुन सहा ते सात हजार युवकांना योग्य मार्गावर आणण्याचे काम करणाऱ्या जालना येथील प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराने डॉ. वायाळ यांना मागच्या आठवड्यात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सन्मानित करण्यात आले. दशकापेक्षा जास्त कालावधीपासून त्यांनी शेती, शेतकरी व युवकांसाठी वाहून घेतले आहे.
या पुरस्कारानिमित्त परतूर येथील लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्रा. वायाळ यांच्याशी ‘मटा’ने संवाद साधला असता, ते भरभरुन बोलते झाले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून व स्वयंसेवकांच्या सहकार्यातून-श्रमदानातून प्रा. डॉ. वायाळ यांनी २०१५ पासून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. पहिल्याच वर्षी जालना जिल्ह्यातील ६० गावांमध्ये १२७ किलोमिटरपर्यंत खोलीकरणाची व रुंदीकरणाची कामे करण्यात आली व ही गावे जलसंपन्न झाली. या गावांमध्ये पूर्वी शेतकरी वर्षातून एखादे पिक घेत होता, आता तो दोन ते तीन पिक घेत आहे. २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षातही जलसंधारणाची कामे केली जात आहेत आणि आतापर्यंत परतूर, मंठा, घनसावंगी व अंबड तालुक्यातील सव्वाशे ते दीडशे गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्याचाच भाग म्हणून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गलाटी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तसेच ‘जॅबियन स्ट्रक्चर’चा बंधारा शंभर-सव्वाशे स्वयंसेवकांच्या श्रमदानातून २१ दिवसांत बांधण्यात आला. ६१ मिटर लांब, ६.५ मिटर रुंद व २.५ मिटर उंच असलेला हा बंधारा उभा करण्यासाठी सरकारदरबारी १७ ते १८ लाखांचा खर्च येणार होता; परंतु स्वयंसेवकांच्या श्रमदानातून केवळ पाच-साडेपाच लाखांत बंधारा उभा केला. त्यामुळेच परिसरातील शेती व शेतकरी समृद्ध होत गेल्याचे वायाळ म्हणतात.
अडीच हजार शेतकऱ्यांकडून नैसर्गिक शेती
केवळ जलसंधारणाची कामे नव्हे तर नदी पुनरुज्जीवन व नैसर्गिक शेतीवर भर देण्यात येत आहे. रासायनिक शेतीमुळे होणारे व्यापक व गंभीर नुकसान लक्षात घेता, नैसर्गिक शेती करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. देशी गायीचे गोमुत्र व इतर नैसर्गिंक घटकांपासून नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व प्रशिक्षण दिल्यामुळे सद्यस्थितीत दोन ते अडीच हजार शेतकरी शंभर टक्के नैसर्गिक शेती करीत आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी शिबिरे-कार्यशाळा घेण्यात येत आहेत. तसेच स्वच्छतेवरही भर देण्यात येत असून त्यासाठीच परतूर व मंठा तालुक्यातील यदलापूर, नांद्रा, खडकी व खंडवीवाडी, श्रीधरजवळ या गावांमध्ये ८०० टॉयलेट बांधण्यात आल्याचेही वायाळ म्हणाले.
नैराश्यातून बाहेर काढण्याचे आव्हान
नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे आदींमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे कारण केवळ ६० टक्के आहे, तर शेतकरी आत्महत्येचे ४० टक्के कारण हे शेतकऱ्यांमधील नैराश्य आहे. आज बहुतांश शेतकऱ्यांची मुले शेती न करता मिळेल त्या नोकऱ्या करीत आहेत व शेती करण्यासाठी कोणीच नाही अशी एकीकडे स्थिती आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची १७-१८-२० वर्षांची मुले दारुच्या आहारी गेली आहेत. कोणतेही काम नाही, अभिनव पद्धतीने शेती करण्यासाठी कोणतीही दिशा नाही व त्यातच वाढलेली व्यसनाधीनता, यामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये मनोविकार लक्षणीयरित्या वाढत आहेत. परिणामी, कर्त्या शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत आहे व त्यातूनही आत्महत्या होत आहेत. अशा शेतकऱ्यांना व तरुणांना नैराश्यातून बाहेर काढणे हे एक आव्हान आहे व हे आव्हान पेलण्यासाठीच दिवसाचे १८-१८ तास काम करतो, असेही डॉ. वायाळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सरपंचाला बनवेगिरी भोवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
खोटे बनावट दस्तऐवज व चुकीची माहिती सादर करून सरपंचपद उपभोगल्याप्रकरणी बोजगावचे माजी सरपंच हरिदास शेलार यांना सिल्लोड न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी व्ही. जे चव्हाण यांनी तीन वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणाची माहीती अशी की, हरिदास दगडुबा शेलार यांनी २००५मध्ये जळकीघाट-बोजगाव ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्जात १२ सप्टेंबर २००१नंतर दोन आपत्यापेक्षा जास्त आपत्ये असताना निरंक असे दर्शविले. ग्रामसेवकाच्या खोट्या सहीचे दोन अपत्य असल्याचे बनावट प्रमाणपत्र खरे असल्याचे भासविले. बोजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा लाभ घेतला. निवडणुकीतील पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवार संतोष आंबादास देखणे (रा. जळकीघाट) यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, परंतु त्यावर काही कार्यवाही झाली नाही.

त्यानंतर देखणे यांनी १८ ऑक्टोबर २०११ रोजी अॅड. विजय मंडलेचा यांच्यामार्फत सिल्लोड न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला. न्यायालयाने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सहा साक्षीदार तपासले
सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी याने कुमावत उर्फ गणेश; तसेच अभिषेक या दोन मुलांचे बनावट दाखले तयार करून निवडणूक जिंकली. सरपंचपदाचा फायदा घेतला. ही बाब अभियोग पक्षाने सिद्ध करून न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधीचे नियोजन होईना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेला सरकारी अनुदान, उपकरातून मिळालेल्या; तसेच दरवर्षीच्या नियोजित योजना राबविण्यासाठी कोट्यवधींचे अनुदान प्राप्त होते. त्यापैकी ३३ कोटींच्या निधीचे नियोजन अद्याप झालेले नाही. आर्थिक वर्ष संपताना हा निधी अखर्चित राहण्याची भीती आहे. किमान उरलेल्या काळात तरी नियोजन व्हावे, यासाठी सदस्यांना आता स्थायी समितीच्या बैठकीची प्रतीक्षा आहे. स्थायी समितीच्या शुक्रवारी (१२ जानेवारी) होणाऱ्या बैठकीत या विषयांवर वादळी चर्चा अपेक्षित आहे.

जिल्हा परिषदेच्या गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत समाजकल्याण, महिला व बालकल्याणसह अन्य विभागांच्या योजनांवर चर्चा होऊन नियोजन होणे अपेक्षित होते. पण प्रशासन आणि सदस्यांनी केवळ विषयांची चर्चा करण्यात आली. संबंधित विभागप्रमुख आणि विषय समित्या नियोजन करतील, असे सांगण्यात आले. त्याला महिना उलटून गेला तरी अद्याप अनेक योजनांची अंमलबजावणी प्रलंबित आहे. समाजकल्याण विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांची यादी अजून तयार झालेली नाही. स्थायी अधिकारी नसल्याने समाजकल्याण अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार ज्या अधिकाऱ्यांकडे सोपविला होता ते अधिकारीसुद्धा सुटीवर गेले आहेत. त्यामुळे हे नियोजन अजूनही झालेले नाही. अशीच परिस्थिती अनेक विभागांची आहे. पशुसंवर्धन विभागाने मात्र बहुतांश योजनांची पूर्तता केली आहे.

भाजप कोंडी करणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ३३ कोटींच्या निधींचे नियोजन डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला बाकी होते. आता आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीमध्ये नियोजन पूर्ण होणे आवश्यक आहे. याबाबत शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षात बसलेल्या भाजपकडून कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समान पाणी वाटपासाठी एमआयएमचे ठिय्या आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समान पाणी वाटपाच्या मुद्यावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी गुुरुवारी महापालिकेत स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे बारवाल यांनी बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली. बैठक सुरू झाल्यानंतर बारवाल यांनी समान पाणी वाटपासंदर्भात आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
स्थायी समिती बैठकीत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी समान पाणी वाटपाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, जुन्या शहरात पाच-सहा दिवसानंतर पाणी येते आणि इतर भागात दर तीन दिवसआड पाणीपुरवठा होतो. सर्व वसाहतींना समान पाणीपुरवठा करण्याचे आदेश सभापतींनी यापूर्वी तीन वेळा दिले, पण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल या आदेशाची अंमलबजावणी करीत नाहीत. चहल यांच्याकडील पाणीपुरवठ्याचा कार्यभार काढून घ्या, जुन्या शहरातही दर तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करा, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे राजू वैद्य म्हणाले, पाण्याची समस्या खूप गंभीर असून चहल यांना पाणीपुरवठ्यासारखे मोठे काम देऊ नका, त्यांना ते झेपत नाही. त्यांना जायकवाडी येथे नियुक्त करा आणि शहराचा पाणीपुरवठा इतर सक्षम अधिकाऱ्याकडे द्या. चहल यांच्याकडचा पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार काढेपर्यंत स्थायी समितीची सभा तहकूब करा, अशी मागणी वैद्य यांनी केली. वैद्य यांच्या वक्तव्यानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृहात सभापतींच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे सभापती बारवाल यांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब करून स्थायी समितीचे सदस्य व अधिकारी यांची स्वतःच्या दालनात बैठक घेतली. त्यानंतर सभा पुन्हा सुरू झाल्यानंतर समान पाणीपुरवठा व चहल यांच्याकडील कार्यभार याबद्दल आयुक्तांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन बारवाल यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना दिले. त्यानंतर स्थायी समितीची बैठक सुरळीत पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात उद्या ‘हिरण्य पतंगोत्सव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मकर संक्रांतीला पंतग उडविण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आली आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात महाराष्ट्र टाइम्स आणि हिरण्य रिसॉर्ट्सच्या वतीने शनिवारी (१३ जानेवारी) सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ‘हिरण्य पतंगोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
‘काटे...काटे...’म्हणत पतंग उडवण्याचा आनंद अनुभवण्याची संधी महाराष्ट्र टाइम्स आणि हिरण्य रिसॉर्ट्सने आणली आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी कसलेही शुल्क आकारले जाणार नाही. सुमधूर संगीताच्या तालावर, बालपणीच्या आठवणींना उजाळा देत पतंग उडविण्याचा आनंद घेता येऊ शकेल. महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पतंग, मांजा आणि पतंग उडविण्यासाठी लागणारे साहित्य पुरविले जाणार आहे. यासोबतच धम्माल सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शहरीकरणामुळे व वेगवान जीवनमानामुळे आपले बरेच पारंपरिक धार्मिक आणि सामाजिक सण साजरे करायच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. पूर्वी सर्व नातलग आणि मित्रमंडळींबरोबर साजऱ्या होणाऱ्या सणांसाठी आता वेळ काढणे, एकत्र येणे मुश्किल झाले आहे. नववर्षातील पहिला पारंपरिक सण म्हणजे संक्रांत. महिलांसाठी हळदी-कुंकू, तर उर्वरित कुटुंबासाठी पतंगबाजीची धमाल असते. महिलांच्या हौसेमुळे हळदी-कुंकू टिकून आहे, पण वडीलधारी मंडळी, बालगोपाळांसह पतंग उडवायची मौज धम्माल मागे पडली आहे. त्यामुळे मित्र, कुटुंबासोबत पतंग उडवणे, पेच लावणे, काटाकाटी करणे यासाठी बरोबरच सहभागींना खास हिवाळी, सणाच्या जेवणाचा आनंद घेता येणार आहे.
डोंगरदऱ्या, तलावस हिरवळीचा नयनरम्य परिसर, निळ्या नभी झेपावणारे रंगबिरंगी पतंग, असा अनोखा नजारा प्रत्येकाने आपल्या स्मरणात ठेवावा, असा असणार आहे. दौलताबादच्या किल्ल्याच्या ऐतिहासिक परिसरात साजरा होणाऱ्या हिरण्य-महाराष्ट्र टाइम्स आयोजित हिरण्य पतंगोत्सव स्थानिकांना आणि पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

‘उबाडियु’चाही आस्वाद

पतंगोत्सवानिमित्त रुचकर जेवणाबरोबरच सहभागींना दक्षिण गुजरातमध्ये प्रसिद्ध मातीच्या भांड्यात शिजवलेल्या चटपटीत मिश्र भाज्यांचा ‘उबाडियु’चा स्वाद सहभागींना घेता येणार आहे.

येथे मिळतील पास

महाराष्ट्र टाइम्स आणि हिरण्य रिसॉर्टसच्या संयुक्त विद्यमाने हिरण्य रिसॉर्ट्स येथे आयोजित ‘हिरण्य पतंगोत्सवा’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सहभागी घेण्यासाठी विनामूल्य पास घेण्याकरिता महाराष्ट्र टाइम्स कार्यालय, उस्मानपुरा येथे अमोल शेरकर (९८८१०१५६००) यांच्याशी संपर्क साधवा. जास्तीत जास्त वाचकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घडमोडेंनी वळवलेले अडीच कोटी मूळ ठिकाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माजी महापौर भगवान घडमोडे यांच्या वॉर्डात आता महापालिका फंडातून विकास कामे केली जाणार आहेत. त्यांनी शासकीय निधीतून अडीच कोटी रुपये वॉर्डातील कामांसाठी वळविण्याचा प्रयत्न केला होता, पण शासकीय निधी वळवता येत नसल्याचा खुलासा महापालिका अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. त्यामुळे हे अडीच कोटी रुपये कैलासनगर-एमजीएम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.
राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी मंजूर केलेल्या २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीतून साडेसहा कोटी रुपये कैलासनगर रस्त्यावर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, या रस्त्याचे काम रखडल्याने तत्कालीन महापौर घडमोडे यांनी त्यापैकी अडीच कोटी रुपये स्वतःच्या वॉर्डातील विकास कामांकरिता वळविण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. या अडीच कोटींबद्दल गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.
स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत भाजप नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी या अडीच कोटींचा विषय मांडत त्यासाठी शासनाची मंजुरी घेतली का, अशी विचारणा केली. त्यावर कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला, पण नगरसेवकांचे समाधान झाले नाही. ‘शासनाने दिलेल्या कामांसाठीच तो निधी वापरला पाहिजे. शासनाच्या परवानगीशिवाय अन्य कामांसाठी निधी वळवता येत नाही. निधी वळविल्यास कोणी कोर्टात गेले, तर अधिकाऱ्यांना बेड्या पडतील,’ असा इशारा शिवसेनेचे राजू वैद्य यांनी दिला. भाजपच्या राखी देसरडा यांनी हे अडीच कोटी रुपये कैलासनगर रस्त्यावर खर्च करण्याची मागणी केली.

पालिका फंडातून काम

सभापती गजानन बारवाल यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना खुलासा करण्यास सांगितले. ‘घडमोडे यांच्या वॉर्डात महापालिका फंडातून काम करण्याचा निर्णय आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ते अडीच कोटी रुपये कैलासनगर रस्त्यासाठीच खर्च केले जातील,’ असे पानझडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत एकनाथ रंगमंदिर दुरुस्तीसाठी एकत्र निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संत एकनाथ रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीची आता एकत्रित निविदा काढण्यात येणार आहे. हा निर्णय गुरुवारी झालेल्या महापालिका स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला. येत्या सर्वसाधारण सभेत निविदेला मंजुरी मिळाल्यावर दुरुस्तीचे काम सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
शिवसेनेचे नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांनी संत एकनाथ रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीचा विषय मांडला. ‘रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी दोन कोटी रुपये दिले असून आमदार, खासदारांही निधी देण्याची घोषणा केली आहे. पण अद्याप काम सुरू झालेले नाही. रंगमंदिराबद्दल प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे,’ अशी विचारणा त्यांनी केली. सभापती गजानन बारवाल यांच्या निर्दशावरून कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना खुलासा केला. ‘पालकमंत्र्यांनी जाहीर केलेले दोन कोटी रुपये मिळाले असून त्याआधारे निविदा तयार करण्यात आली आहे. पण आठ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत निविदा सादर करता आली नाही. आगामी सर्वसाधारण सभेत ती सादर केली जाईल. सभेच्या मंजुरीनंतर काम सुरू केले जाईल,’ असे सिकंदर अली यांनी सांगितले. त्यावर महापौरांचे पत्र घेवून कार्योत्तर मान्यतेच्या आधीन राहून काम का सुरू केले जात नाही, नेमकी कोणती कामे केली जाणार आहेत, अशी विचारणा वैद्य यांनी केली.
‘रंगमंदिरातील खुर्च्या बदलणे, रंगमंचाचे काम करणे, साउंड सिस्टिम व साउंड मिक्सिंग ही कामे पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून केली जाणार आहेत. पालिकेच्या पन्नास लाखांच्या निधीतून स्वच्छतागृह आणि विश्रामगृहाचे काम केले जाणार आहे. वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव थोडा बाजूला ठेवण्यात आला आहे,’ अशी माहिती सिकंदर अली यांनी दिली. त्यावर रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे एकत्रित नियोजन करा, कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. कामासाठी निधी उपलब्ध असताना अयोग्य नियोजनामुळे तो वाया गेला, तर रंगमंदिराची स्थिती तशीच राहिल, असे मत वैद्य यांनी मांडले. या चर्चेनंतर सभापती बारवाल म्हणाले, देखभाल दुरुस्तीच्या कामाची एकत्रित निविदा काढणे व कार्योत्तर मंजुरीसाठी महापौरांना पत्र देण्यात येईल. योग्य नियोजन करून काम करा, असे निर्देश सभापतींनी अधिकाऱ्यांना दिले.

नाटक पाहणे बंदः वैद्य

‘मी नाट्यवेडा माणूस आहे. संत एकनाथ रंगमंदिरात आलेले एकही नाटक मी सोडत नाही. ते पाहतोच. पण रंगमंदिराची दुर्दशा झाल्यापासून नाटक पाहणे बंद केले आहे. नाटकाच्या मध्यांतरात कलाकार व नाट्यरसिक महापालिकेचा प्रतिनिधी म्हणून गराडा घालतात आणि रंगमंदिर केव्हा दुरूस्त करणार असे विचारतात. त्यांना आश्वासन देवून मी थकलो आहे,’ अशा भावना नगरसेवक राजू वैद्य यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडल्या .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ भाषिक तुच्छता जातीयवादापेक्षा भयंकर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भाषिक तुच्छता ही जातीयवादापेक्षा भयंकर आहे. आपल्याकडे बोली बोलणारा माणूस प्रमाण भाषकांच्या दृष्टीने तुच्छ असतो. खरे तर बोली ही सहज, स्वाभाविक अभिव्यक्ती असते. तिचे आपल्याशी भावनिक नाते असते. ते नाते माझ्या लेखनातून जपण्याचा प्रयत्न केला,’ असे प्रतिपादन साहित्यिक बब्रूवान रूद्रकंठावार यांनी केले. ते गुरुवारी मराठी विभागात ते बोलत होते.

यंदा राज्य शासनाचा वाड्मय पुरस्कार लेखक बब्रूवान रूद्रकंठावार यांना जाहीर झाला आहे. यानिमित्त डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागात आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘गप्पा - बब्रूवान रूद्रकंठावारांशी’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचावर प्रा. दासू वैद्य, श्रीकांत उमरीकर व समन्वयक डॉ. कैलास अंभुरे उपस्थित होते. रूद्रकंठावार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘आपण ज्या भाषेत बोलतो, ती वाचकांना आपलीशी वाटते. त्या भाषेचा मी लेखनात अवलंब केला आहे; परंतु केवळ एकच भाषा वा बोलीतून पूर्ण व्यवहार होत नाही. इतरही भाषांचा अवलंब केला जातो. यामुळे माझ्या लेखनात इंग्रजी शब्द मराठी वळणाने येतात,’ असे रूद्रकंठावार म्हणाले.

कार्यक्रमाचा समारोप दासू वैद्य यांनी केला. ‘रूद्रकंठावार यांच्या साहित्यातील बोली ही जाणीव-नेणिवेतून आलेली आहे. तिच्यामध्ये भाषिक संगम पाहायला मिळतो’ असे वैद्य म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामप्रसाद वाव्हळ यांनी केले, तर मंगेश शेवाळे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. रमेश जाधव, डॉ. दैवत सावंत, डॉ. विठोबा मस्के, रामेश्वर वाकणकर, वाल्मिक वाघमारे, सुनील कल्याणकर आदी उपस्थित होते.

कंपोझिंगचे कंपोस्टिंग
रूद्रकंठावार म्हणाले, ‘भाषा आणि अनुभव यांचा रियाज झाला आणि कंपोझिंगचे कंपोस्टिंग झाले की, वाचकांशी संवाद साधणारे साहित्य निर्माण होते. लेखक म्हणून बोलण्यापेक्षा माझ्या व्यक्तिरेखा बोलतात. या व्यक्तिरेखा माणसांवर प्रहार करण्यापेक्षा मानवी प्रवृत्तीवर प्रहार करतात. माझ्या साहित्यातील व्यक्तिरेखा आणि विनोद हा समाजातील संतापातून, उद्रेकातून आला आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषा जतनाचे काम कुटुंबातूनः चौधरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठी भाषा समृद्ध करण्याचे काम कुटुंबातून होत आहे. मुले इंग्रजी शाळेत शिकली तरी कुटुंबात मात्र मराठी भाषा बोलली जाते. त्यामुळे मराठी भाषा टिकून आहे. पर्याय म्हणून इंग्रजीचा वापर वाढला असून मराठीतून वाचन, लिखान होणे गरजेचे आहे,’ असे मत स. भु. महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक संदीप चौधरी यांनी मांडले.

विभागीय मराठी भाषा कार्यालयात गुरुवारी झालेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोज‌ित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय माहिती व जनसंपर्क औरंगाबाद कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. रवींद्र ठाकूर, विभागीय भाषा संचालनालयाचे सहायक संचालक चंद्रकांत पारकर, शासकीय लेखन सामग्री व ग्रंथालयाचे ज्येष्ठ तंत्रज्ञ आनंद काकडे, निवडणूक विभागाचे ईश्वर वाघ यांची उपस्थिती होती. शासकीय ग्रंथगार विभागाच्या वतीने एक दिवसीय पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले होते.

चौधरी म्हणाले, ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वाधिक बोलल्या जात असलेल्या भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो. व्यावसायिक, वैद्यकीय, तंत्रशिक्षण आदी शिक्षण हे इंग्रजी माध्यमाऐवजी मराठीतून व्हावे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना सर्वक्षेत्रात काम करण्यास संधी उपलब्ध होईल. डॉ. रवींद्र ठाकूर म्हणाले, ‘मराठी भाषा विभागाने सुरू केलेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा स्तुत्य उपक्रम आहे. आजकाल मराठी भाषेवर इंग्रजीने अतिक्रमण केलेले आहे. प्रत्येकाने मराठी भाषेला प्राधान्य द्यावे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड मुदखेड लोहमार्ग विद्युतीकरण एप्रिलमध्ये

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मनमाड ते मुदखेड रेल्वे मार्गावरील विदयुतीकरण कामाला एप्रिलमध्ये सुरुवात होणार असून, डिसेंबर २०१८ पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी नांदेड येथे रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली.

नांदेड येथे गुरुवारी अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मराठवाड्यातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी यादव यांनी मराठवाड्याच्या विविध रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशीची भेट घेतली. या बैठकीत रेल्वे संघटनेचे अरुण मेघराज, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा, जालना रेल्वे संघर्ष समितीचे फिरोज अली, सोंधळे गुरुजी, राजेंद्र मुंडे,

प्रवीण थानवी, दयानंद दीक्षित, नमो हायवे रेल्वे संघटनेचे गौतम नाहटा यांची उपस्थिती होती. यावेळी मनमाड ते परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासह विदयुतीकरणाच्या कामाबाबत संघटना पदाधिकाऱ्यांनी यादव यांना विचारले. तेव्हा मनमाड ते परभणी प्रस्तावित रेल्वे दुहेरीकरण मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच मनमाड ते मुदखेड विद्युतीकरणाचे काम एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. हे काम ‌डिसेंबर २०१८पर्यंत पूर्ण केले जाईल, असे यादव म्हणाले. रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेड पुणे पनवेल ही रेल्वे नियमित करावी, नांदेड - मनमाड - मुंबई ही नवी रेल्वे सुरू करावी, नांदेड मनमाडपर्यंत राज्यराणी एक्स्प्रेसला नऊ डबे जोडावे, नांदेड ते बिकानेर ही रेल्वे मनमाड मार्गे सोडावी, अशी मागणी केली.

...तर आत्मदहन करू!
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नमो हायवे रेल्वे संघटनेचे गौतम नाहटा आणि जालना रेल्वे संघर्ष समितीचे फिरोज अली यांनी नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडला नाही, तर आत्मदहन करू असा इशारा दिला. नांदेड विभागात मराठवाड्यासाठी कमी, तर दक्षिणेतील प्रवाशांसाठी जास्त रेल्वे सोडण्यात येतात. मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड तालुक्यात शेतकरी आत्महत्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कन्नड
औराळा (ता. कन्नड) येथील बापू जनार्दन जिवरख (वय ४०) या तरुण शेतकऱ्याने नवीन विहिरीला पाणी न लागल्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (सात जानेवारी) घडली घडली.

याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहितीवरून, मृत बापू जिवरख यांना वडिलाेपार्जित वाटणीची जुनी ५६ फूट खोलीची हाेती, पण गेल्या सहा-सात वर्षांपासून समाधानकारक पाऊस नसल्याने ही विहीर काेरडी पडली आहे. या विहिरीला अधिक खाेल केल्याने पाणी लागेल, या आशेवर त्यांनी उसनवारी पैसे घेऊन विहीर २८ फूट (चार परस) खोल करण्याचा करार केला, पण विहीर १२ परस हाेऊन एक थेंबही पाणी लागले नाही. त्यामुळे त्यांना विहीर खोदकामासाठीचे उसनवार घेतलेले पैसे फेडण्याची चिंता होती. याच चिंतेत त्यांनी रविवारी विषारी औषध प्राशन करून जिवनयात्रा संपवली. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या शेतकरी कुटुंबाची पाच दिवस उलटूनही महसूल प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. ग्रामस्थाकडून व जिवरख कुटुंबीयांकडून प्रशासनाविषय तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ निलंबनाविरोधात कटके हायकोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
निलंबित उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी आपले निलंबन बेकायदा आणि द्वेषबुद्धीतून करण्यात आल्याचा दावा करीत, निलंबन रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली आहे.

न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी, याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचे निर्देश सरकारी वकिलांना देत सुनावणी १७ जानेवारी रोजी ठेवली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी संबंधित व्यवहार केले असून, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी जमिनीच्या विक्रीचे आदेश दिलेले आहेत. असे असताना त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करता केवळ आपल्याविरुद्धच कारवाई करण्यात आल्याचा दावा कटके यांनी याचिकेत केला आहे.

निलंबनाविरुद्ध कटके यांनी शासनाकडे अपील करणे गरजेचे असताना त्यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी थेट उच्च न्यायालयात येण्याची गरज नाही. यासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट ) त्यांचे म्हणणे नामंजूर केलेले आहे, असा युक्तीवाद खंडपीठातील सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी केला. खंडपीठाने सरकारी वकिलांना यासंदर्भात सविस्तर माहिती घेण्यास सुचविले. विभागीय आयुक्तांना अशा निलंबनाचे अधिकार आहेत काय आणि या प्रकारे निलंबन या आधी झाले आहे काय, या बाबींचा या माहितीत समावेश असावा, असे खंडपीठाने सुचविले.

विभागीय आयुक्तांना अधिकार नाही
विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांना नियुक्ती अथवा शिस्तभंग कारवाईचे अधिकार नाहीत. हे अधिकार केवळ सचिवांना आहेत. राज्यपालांची यासंदर्भात अधिसूचनाही नाही. अशा प्रकारे निलंबन या आधी कुठेही झालेले नाही. केवळ द्वेषबुद्धीने आपले निलंबन करण्यात आलेले आहे, असा युक्तीवाद कटके यांचे वकील प्रज्ञा तळेकर यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत झालेले आपले निलंबन रद्द केले आहे आणि आपली पुनर्स्थापना करण्याची शिफारस केली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

घटनाक्रम
- एक जुलै २०१४ ते ३० जून २०१७ ः उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कटके यांनी केला जमिनीचा व्यवहार
- जुलै २०१७ ः जमिनीच्या व्यवहारांची तपासणी करण्याकरिता उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांची नेमली समिती. त्यात एस. पी. सावरगावकर, तहसीलदार मंगेश परांडेकर, नायब तहसीलदार अरुण पावडे, अव्वल कारकून पैठणकर आणि मुकुंद गिरी यांचा समावेश
- २१ ऑगस्ट २०१७ ः समितीने सादर केला अहवाल
- १८ डिसेंबर २०१७ ः अनियमितता आढळल्याने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी तत्कालीन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना केले निलंबित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषी आधिकाऱ्यांना फुटला घाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा बीड जिल्हा दौरा सध्या सुरू आहे. दुसऱ्या दिवशी समितीचे पाच गट करून जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या बैठकी लावण्यात आल्या. विविध योजनेच्या झालेल्या चुका व अनियमिततेमुळे आधिकाऱ्यांना समितीने चांगलेच धारेवर धरले. विविध खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक बाबीमध्ये मोठ्या गंभीर चुका झाल्याचे समितीने संबधित खाते प्रमुखांना चांगलेच झापले असून संबंधित दोषी आधिकाऱ्यांना चांगलाच घाम फोडल्याचे दिसून आले. माजलगाव वडवणी गट प्रमुख आमदार आर. टी. देशमुख होते. त्यांच्या उपस्थितीत माजलगाव येथे बैठक होती. मात्र, त्यांना बैठकीत अचानक चक्कर आल्याने पंचायत राज समितीची बैठक अर्ध्यावर सोडून जावे लागले.

ग्रामविकासबाबत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद बीड व जिल्ह्यातील इतर पंचायत समितीच्या महाराष्ट्र विधिमंडळच्या पंचायत राज समितीच्या बैठक होत असताना सायंकाळी पाचच्या दरम्यान माजलगाव पंचायत समितीमध्ये दाखल झाली. या समितीचे गटप्रमुख आमदार आर. टी. देशमुख देवराव होळी, मंत्रालय सचिव चरण वाघमारे व किशोर आरीकर जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनाचे उपमुख्यकार्यकारी आधिकारी एम. एम. वासनिक हे आले होते. पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या बैठक सुरू होती. या बैठकीत अचानक पंचायत राज समितीचे गट प्रमुख आमदार आर. टी. देशमुख यांना चक्कर आल्याने त्यांना तात्काळ बैठक सोडून जावे लागले.
यानंतर उर्वरीत पंचायत राज समितीचे डॉ. देवराव होळी यांनी माजलगाव पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या सर्व खाते प्रमुख गेल्या काही वर्षांपासून असलेल्या गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन विविध योजनेतंर्गत राबवलेल्या योजनेच्या झालेल्या चुका व अनियमिततेमुळे अधिकाऱ्यांना समितीने चांगलेच धारेवर धरले. विविध खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक बाबीमध्ये मोठ्या गंभीर चुका झाल्याचे समितीने संबधित खाते प्रमुखांना चांगलेच झापले असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फोडल्याचे दिसून आले.
या बैठकीसाठी पंचायत समितीचे विभाग प्रमुख गेल्या चार दिवसांपासून पंचायत समितीची डागडुजीसह विविध विभागाच्या फाईली व संबधित दस्तवेज जमा करण्यात दिवसरात्र एक केले होते. एरव्ही भकास असलेल्या पंचायत समितीमध्ये कधीही अधिकारी व इतर कर्मचारी हजर नसतांना लोकांना आपल्या कामाबाबत चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, गुरुवारी माजलगावात विधिमंडळाची पंचायत राज समिती येणार असल्याने या परिसरात स्वच्छता व रांगोळी व या समितीमध‌ील गट प्रमुख व सदस्यांना पायघड्या टाकण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई-वडीलाला न सांभाळणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
ऐंशीवर्षीय आई-वडीलाला न सांभाळणाऱ्या मुलाविरुद्ध महिन्याला दहा हजार रुपये पोटगीचा आदेश दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्या आदेशान्वये या मुलाविरुद्ध वसुलीसाठी आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

उस्मानाबाद तालुक्यातील दारफळ येथील रहिवाशी ८० वर्षीय लक्ष्मण जनार्दन देशपांडे व त्यांची पत्नी प्रभावती यांचा मुलगा श्यामसुंदर लक्ष्मण देशपांडे (पाटील)जो व्यवसायाने टाईपरायटींग इन्सीट्युट व शेतकरी आहे. त्याने आईच्या नावावरील मौजे मेडसिंगा येथील जमिनीमध्ये लाईट कनेक्शन घ्यावयाचे आहे, असे कारण दाखवत शंभर रुपयाचा स्टॅम्प आईच्या नावे खरेदी करून त्यावरती आईची सही घेतली. त्यावरती जमिनीचे वाटणीपत्र लिहून घेतले. या वाटणी पत्राआधारे स्वतःचे नाव लावून घेऊन त्यातून आईला बेदखल केले. त्याचप्रमाणे वडीलाच्या नावे सांजा रोड भागातील फ्लॉट, दारफळ येथील राहते घर स्वतःच्या नावे करून घेऊन आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे वृद्ध मातापित्यांनी मुलाविरुद्ध उस्मानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे मातापिता संगोपन कायद्यातंर्गत दाद मागितली. यावर उपविभागीय दंडाधिकारी यांनी दोन्ही बाजू म्हणणे ऐकूण घेऊन यामध्ये मुलाने मातापित्यास फसवणूक व संगोपन करत नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी मुलाने मातापित्यास त्यांच्या चरितार्थ व निर्वाह खर्चासाठी दरमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश १० जुलै २०१७ रोजी दिला. परंतु त्या आदेशविरुद्ध श्यामसुंदर त्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. या अपीलावर जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेला आदेश कायम ठेवला. यामध्ये दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश कायम ठेवला. परंतु, आदेश देवूनही श्यामसुंदर यांने त्या आदेशानंतरही एक रुपयाही मातापित्यास दिला नसल्याने वृद्ध मातापित्यावर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे मातापित्यास उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पोटगी मिळावी यासाठी मागणी अर्ज केली. यावरुन श्यामसुंदर यांने एसडीओ व जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याचे निर्देशनास आले. त्यावरुन भादंविचे कलम १८८ व ज्येष्ठ नागरिकांचे चरितार्थ व लोक कल्याणासाठीचे अधिनियम २००७ मधील कलम २४ व २५ नुसार गुरन ११/१८ आनंदनगर पोलिस ठाण्यात श्यामसुंदर देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक मुरळीकर हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images