Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मिटमिट्यात अग्निकांड; सात सिलिंडर पेटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
मिटमिटा येथील चिली ढाबा येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सात गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. पण, वेळीच मदत पोचल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा या भागात मोठी जीवितहानी झाली असती.
चिली ढाब्यातील स्वयंपाकी अन्वर पठाण हे स्वंयपाक करताना कढईतील गरम तेलाने अचानक पेट घेतला. ही आग एका सिलिंडरच्या पाइपर्यंत पोहचली. त्यामुळे सिलिंडरने पेट घेतला. पेटलेल्या सिलिंडरच्या शेजारी असलेल्या तीन सिलिंडर त्या पाठोपाठ पेटले. असे करता करता एकूण सात सिलिंडर पेटले. यामुळे येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांनी आरडाओरड करून धावपळ केली. हा आवाज ऐकूण मिटमिटा गावातून काही तरूण व गावकऱ्यांनी धाव घेतली. संपूर्ण गाव व हॉटेलमधील कामगार पाणी, वाळूच्या गोण्या घेवून आगीत फेकत होते.
याची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन अधिकारी भंडारे, डी. डी. साळुंके, एच. वाय. घूगे, रमेश सोनवणे, राजू निकाळजे, वाहनचालक अशोक खोतकर, फायरमन संग्राम मोरे, राम सोनवणे, शेख समीर, शेख तनवीर, शेख आमेर, परमेश्वर साळुंके, भुरेलाल सलामपुरे, अप्पासाहेब गायकवाड, हेमंत कुमावत, कैलास तुपे, गोविंद घोडके आदींनी आग विझवण्यासाठी मदत केली.
आग लागल्यानंतर घटनास्थळी छावणी पोलिस एक तासानंतर पोहोचले. पोलिस निरीक्षक श्रीकांत देशमुख, पीएसआय गिरी, पीएसआय सुरवसे, बीट अंमलदार नागरे यांनी विझवलेले व सिलबंद गॅस सिलिंडर ताब्यात घेतले.

आज ढाबाचालकांची बैठक

या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमिवर शनिवारी सकाळी दहा वाजता छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व ढाबाचालकांची बैठक बोलवण्यात आली आहे.

मदतकार्यामुळे दिलासा

ही आग पसरून गॅस सिलिंडरचे स्फोट झाले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मिटमिट्याचे गावकरी व तरुणांनी वेळीच धाव घेऊन मदत कार्य केले. अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्यामुळे सिलिंडरची आग पसरली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संकल्प जगण्याचा, जगविण्याच्या या उपक्रमातून जनजागृती करण्याचे काम कुलस्वामिनी प्रतिष्ठाणने हाती घेतला आहे. पथनाट्य, मार्गदर्शन, शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची माहिती देत तरूण कार्यकर्त्यांमार्फत जिल्ह्यात उपक्रम राबविला जात आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे व सचिव अलका कोरडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मावसाळा, खिर्डी तसेच खुलताबाद येथील जिल्हा परिषद शाळेत जनजागृती करण्यात आली. ‘मी आत्महत्या करणार नाही व करू देणार नाही,’ असे घोषवाक्य असलेले टी शर्ट परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी शेतकरी, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याचा सामना करत त्यावर मात मिळविणारा शेतकरी हा विषयावर पथनाट्य सादर केले. प्रत्येक आठवड्यात किमान दहा गावात हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे विलास कोरडे यांनी सांगितले. वैभव कोरडे, कैलास खंदारे, चंद्रमुनी जायभाये, प्रल्हाद गायकवाड, संतोष गायकवाड, अनिल गावंडे आदी कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस दिवस उलटूनही मारेकरी मोकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
लातूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेला २० दिवस झाले तरी मारेकरी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्वरित अटक करावी या मागणीसाठी शुक्रवारी (१९ ‌जानेवारी) वडार समाज संघर्ष समितीतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
क्रांती चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने समाजातील महिला व पुरूष सहभागी झाले होते. टेंभूर्णी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील विद्यार्थिनीवर अत्याचार करून ‌तिची हत्या करण्यात आली. घटनेला २० दिवस उलटून गेले तरीही गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक लातूर व अहमदपूर पोलिस स्टेशन तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, अशी विनंती विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या निवदेनात करण्यात आली आहे. निवेदनावर टी. एस. चव्हाण, राजू डुकळे, रवी डुकळे, संतोष गायकवाड, पिराजी शिंदे, रामदास कुसमुडे, सोनाजी गायकवाड, संभाजी शिंदे, विलास शिंदे, अनिल जाधव, सुनील जाधव, दिलीप गायकवाड, भानुदास सुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महापालिकेचे अजब तर्कट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीने दिलेल्या पत्रावर आता महापालिका प्रशासनाने कडी करून महापौरांकडे मत नोंदविण्यासाठी चक्क ‘समांतर’ कंपनीच्याच वकिलांचा अभिप्राय मागवला आहे. प्रशासनाच्या या अजब तर्कटाबद्दल तर्कवितर्क आणि चर्चेला उधाण आले आहे.

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने महापालिका आयुक्तांच्या नावे पत्र देवून सर्वसाधारण सभेत बाजू मांडू देण्याची विनंती केली आहे. महापालिकेने कंपनीबरोबरचा समांतर जलवाहिनीचा ‘पीपीपी’ तत्वावरचा करार रद्द केला आहे. करार रद्द करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात सुरू आहे. हे प्रकरण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कंपनीतर्फे महापालिकेला पत्र पाठवण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेत आम्हाला बाजू मांडू द्या, अशी मागणी या पत्रातून केली आहे. न्यायालयाबाहेर कंपनीबरोबर तडजोड करून समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. काही नेत व पदाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कंपनीला सर्वसाधारण सभेत बाजू मांडण्याची परवानगी देण्यास हरकत नाही असा मतप्रवाह आहे. सर्वसाधारण सभेत कोणते विषय घ्यायचे व कोणते घ्यायचे नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार महापौरांना आहे. त्यामुळे प्रशासनाने कंपनीचे ते पत्र महापौरांकडे पाठवले आहे. महापौरांनी ते पत्र विधीसल्लागारांकडे पाठवले असून, कंपनीला पालिका सभागृहात बाजू मांडू देण्याबद्दल कायद्यानुसार अभिप्राय कळवा असे सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधीसल्लागार विभागाने आता हे पत्र पुन्हा कंपनीच्या दिल्लीस्थीत वकिलाकडे अभिप्रायासाठी पाठवले आहे. त्या पत्रावर कंपनीच्या वकिलाचे म्हणणे काय आहे, हे महापालिकेला जाणून घ्यायचे आहे. कंपनीच्या वकीलाचा अभिप्राय आल्यानंतर पालिकेचा विधी विभाग आपले मत महापौरांना कळविणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिवृत्त बदलाची चौकशी करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इतिवृत्त बदलाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी माजी महापौर भगवान घडमोडे यांनी महापालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. इतिवृत्त बदलण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकणात आपण जातीने लक्ष घालावे अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने काही अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव २० जुलै २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत मांडला होता. ११३० ते ११३३ अशा क्रमांकाचे ते प्रस्ताव होते. महापौर घडमोडे यांना हे प्रस्ताव मंजूर केले. त्यानंतर सचिव विभागातर्फे या सभेचा कारणापुरता उतारा काढण्यात आला. त्यावर घडमोडे यांची स्वाक्षरी घेण्यात आली. स्वाक्षरी केल्यानंतर तो कारणापुरता उतारा चुकीचा होता हे घडमोडे यांच्या लक्षात आले. अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यास आपण सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली होती. कारणापुरता उतारा तयार करताना मात्र गरज भासल्यास विभागीय चौकशी करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याला घडमोडे यांनी आक्षेप घेतला आहे. कारणापुरता उताऱ्याच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले इतिवृत्त चुकीचे आहे. कारणापुरता उताऱ्यावर माझी घाईघाईने स्वाक्षरी घेण्यात आली. त्यानंतर मी तो उतारा वाचला तेव्हा त्यात चूक असल्याचे लक्षात आले. कारणापुरता उताऱ्यातील मजकुराशी मी सहमत नाही, असे घडमोडे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. इतिवृत्त बदलाचे प्रकरण फार गंभीर असून त्यात आयुक्त म्हणून आपण जातीने लक्ष घालावे, त्याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देखील घडमोडे यांनी आयुक्तांकडे केली आहे. याच संदर्भातले पत्र त्यांनी गेल्या आठवड्यातली सचिवांना आणि महापौरांना दिले होते. त्यानंतर त्यांनी आता आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटी’ टेंडर काढण्याचा अधिकार अखेर मिळाला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्मार्टसिटी अंतर्गत केल्या जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञानावरील कामांचे टेंडर काढण्याचा अधिकार ‘आम्हाला’ (एसपीव्ही) मिळाला आहे. राज्याच्या नगरविकास खात्याने टेंडर काढण्याची परवानगी दिली आहे. टेंडर काढण्याचा प्रस्ताव ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘एसपीव्ही’च्या बैठकीत मांडण्यात येईल,’ अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली

स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत शहरात माहिती तंत्रज्ञानावर आधारित विविध कामे केली जाणार आहेत. त्यात सीसीटीव्ही लावणे, वायफाय झोन तयार करणे, स्मार्ट बसस्टॉप तयार करणे, ई - ऑफिस करणे आदी कामे केली जाणार आहेत. त्यासाठी तब्बल सत्तर कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांच्या संदर्भात दोन आठवड्यापूर्वी मुंबईत राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. सत्तर कोटींच्या कामांचे टेंडर आयटी कॉर्पोरेशनतर्फे काढण्यात येईल आणि कामे देखील आयटी कॉर्पोरेशन तर्फे केली जातील, असे त्यांनी त्या बैठकीत पालिका आयुक्तांना सांगितले होते. यामुळे पालिकेचे पदाधिकारी अस्वस्थ झाले. स्मार्टसिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेकल) स्थापन करण्यात आली आहे. एसपीव्हीच्या माध्यमातूनच आयटी कामांचे टेंडर निघाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. यासंदर्भात स्मार्टसिटी प्रकल्पाचे मिशन डायरेक्टर समीर शर्मा, राज्याच्या नगरविकास खात्याच्या सचिवांकडे देखील मागणी करण्यात आली होती. समीर शर्मा यांनी नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेवून टेंडर काढण्याचे अधिकार ‘एसपीव्ही’ला देण्यास हरकत नाही असे स्पष्ट केले. त्यानंतर म्हैसकर यांनी ही माहिती महापालिकेला कळविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबस सुरू करण्यासाठी चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात प्रायोगिक तत्वावर सिटीबस सुरू करण्याबद्दल शनिवारी चाचपणी करण्यात आली. एसटी महामंडळाला ज्यांनी ‘शिवनेरी’ बस उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांनाच महापौरांनी साकडे घातले असून किमान पाच बस उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. शिवनेरीवाल्यांबरोबरची बोलणी यशस्वी झाली, तर फेब्रुवारीत महापालिकेच्या पाच सिटीबस सुरू होतील असे मानले जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी, म्हणजे २३ जानेवारी रोजी सिटीबस सेवा सुरू करण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती. स्मार्टसिटी योजनेतून ही सेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्नदेखील करण्यात आले, परंतु ते सुरू करण्यास उशीर झाला. स्मार्टसिटीच्या एसपीव्हीची बैठक ३० नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यात प्रथमच सिटीबसचा प्रश्न चर्चेत आला. त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी स्मार्टसिटीच्या एसपीव्हीचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांनी ३२ सिटीबस खरेदी करण्यास परवानगी दिली. त्यापैकी पाच बस खरेदी करून त्या २३ जानेवारीच्या मुहूर्तावर महामंडळातर्फे सुरू करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला, परंतु निविदाप्रक्रिया पूर्ण करून सिटीबस खरेदी कराव्या लागणार असल्यामुळे हा मार्ग तूर्तास बाजूला ठेवण्यात आला. ३१ जानेवारी रोजी एसपीव्हीची पुन्हा बैठक होणार आहे, त्यात सिटीबसबद्दलचे धोरण ठरविले जाईल. निविदाप्रक्रिया पूर्ण करून सिटीबस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा अवधी लागेल असे मानले जात आहे.
त्यामुळे दरम्यानच्या काळात शिवनेरीवाल्यांच्या मदतीने पाच सिटीबस सुरू करण्याची योजना महापौरांनी मांडली आहे. एसटी महामंडळाला प्रदीप निझामपूरकर यांनी शिवनेरी बस उपलब्ध करून दिल्या आहेत. घोडेले यांनी थेट निझामपूरकरांशीच संपर्क साधला व चर्चा केली. त्यानुसार निजामपूरकरांचे पुत्र हर्षल शनिवारी महापालिकेत आले, त्यांनी महापालिकेच्या यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महापौरांनादेखील ते भेटले. याबद्दल माहिती देताना महापौर म्हणाले,‘ निझामपूरकर यांनी पाच बस देण्याची तयारी दाखवली आहे. एका बसचा प्रवास एका दिवसात तीनशे किलोमीटर व्हावा अशी त्यांची अट आहे. चाळीस आसनांची एक बस असेल. दिवसभरात ती किमान दहा फेऱ्या करेल. तिकीटदर एसटी महामंडळाचेच असतील. या बस सुरू करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ, आठ ते दहा दिवसांत बस सुरू होऊ शकतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘बोगस’ डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, कोणतीही वैद्यकीय अर्हता नसताना डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या एकावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. संबंधित व्यक्ती डॉक्टर असल्याचे सांगून सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालीत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यावरून बालाजीनगर भागातील आर. जी. आढाव (रा. सिंदखेड राजा, ओम कलेक्‍शन, जुने पोस्ट ऑफिसजवळ बुलडाणा याच्याकडे जाऊन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा बळवंत भोडवे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र, तसेच अर्हतेबाबत विचारणा केली. आढाव यांनी कोणतेही प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे तो बोगस असल्याचे पथकाच्या निर्दशनास आले. पथकाने कारवाई केल्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी गायके तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तापमानाने तिशी ओलांडली

$
0
0

औरंगाबादेतून थंडीचा काढता पाय

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जानेवारी महिन्यातच उन्हाचा पारा तिशीच्या पार गेला असून, एका हातात छत्री, दुसऱ्या हातात रुमाल आणि तोंडाला स्कार्फ... अशा अवस्थेत शहरातील नागरिक घराबाहेर पडत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचावासाठी छत्री उघडून चालावे लागत असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसत आहे. उन्हाचा चढता आलेख पाहता थंडीने कधीच काढता पाय घेतला असून, १५ दिवसांपासून तापमान २८ अंशावरून आता ३० अंशाच्या पार गेल्याने यंदाचा उन्हाळा कडक असण्याची चिन्हे आहेत.

गेल्या आठवड्याभरात कमाल तापमानाचा तिशीच्या पार गेलेला पारा रविवारीही ३० अंश सेल्यियस होता, तर किमान तापमान किमान तापमान १२ अंश सेल्सियस होते. मकर संक्रांतीपासून तापमानात किंचित वाढ झाली असली, तरी रात्री वातावरणात गारवा कायम आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानातही घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पहाटे थंडी व त्यानंतर उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात होत आहे. दुपार होताच उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून, संध्याकाळी उन्ह कमी झाले तरी वातावरणात उकाडा मात्र जाणवत आहे. १७ जानेवारी रोजी कमाल तापमानात वाढ होऊन तापमान ३३ अंशावर पोचले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात उन्हाचा पारा ३० अंश सेल्सियस गाठण्याची शक्यता आहे.

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शहरातील औरंगपुरा, निराला बाजार, कॅनॉट, टी.व्ही. सेंटर, गारखेडा परिसरात रसवंती, लिंबू सरबत यांची दुकाने थाटण्यात आले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, स्कार्फ, गॉगल खरेदीकडेही नागरीकांचा कल आहे.

आठवड्याभराचे तापमान

दिनांक..............कमाल तापमान

१४ जानेवारी.........३१.६

१५ जानेवारी.........३१.८

१६ जानेवारी.........३१.४

१७ जानेवारी.........३३.०

१८ जानेवारी.........३०.८

१९ जानेवारी.........३०.२

२० जानेवारी.........३०.२

२१ जानेवारी.........३०.०

(तापमान अंश सेल्सियसमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंदिरांत भाविकांची रिघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\R
शहरातील विविध गणेश मंदिरात रविवारी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहराचे आद्यदैवत संस्थान गणपती\R, समर्थनगर येथील वरद गणेश मंदिर, सिडको\R एन-१ मधील काळा गणपती, सिडको एन-३ येथील भक्ती गणेश मंदिर येथे महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सर्व गणेश मदिरांत दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती.
गणेश चतुर्थी या गणरायांच्या जन्मोत्सवदिनी रविवारी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती येथे आकर्षक फुलांची सजावटी, विद्युत रोषणाई करण्यात आली. पहाटे गणपती अथर्वशीर्ष\R, महायाग\R, अभिषेक आणि महाआरतीनंतर दुपारी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. २१ जोडप्यांच्या हस्ते गणेश याग होमहवन करून पूर्णाहुती देण्यात आली. ओम गं गणपतेय नम:\R, गणपती अथर्वशिर्ष पठणाने परिसर मंत्रमुग्ध झाला.
जुन्या औरंगाबाद परिसरातील यादगार मंडळाने मुर्तीला सजवले होते. दिवाण देवडीत पावन गणेश मंदिरात गणेश याग झाला. समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरात २१ कुंडी महायाग करण्यात आला. केळीबाजार येथील चतुर्थी गणेश मंडळातर्फे महायाग व भंडारा करण्यात आला. काथार गणेश मंडळातर्फे दलालवाडी येथील गणेश मंदिरात पहाटे गणेश याग महाआरती करून महाप्रसादाचे वाटप केले. सिडको जळगाव रोड येथील एन-१ काळा गणपती मंदिर , जवाहर कॉलनी येथील सिद्धीविनायक मंदिरासह शहरातील चौराहा\R, केळीबाजार, जाधवमंडी आदी भागातील गणेश मंडळानी गणेश जयंती उत्साहात साजरी केली. काही ठिकाणी रक्तदान शिबिर, समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे असाल, तरच विकासनिधी

$
0
0

सोयगाव: 'भाजपामध्ये प्रवेश केला तरच मतदारसंघाच्या विकासासाठी निधी देतो, असे कुटील धोरण भाजप सरकाराने अवलंबिले आहे. त्यामुळेच दोन विधानसभा मतदार संघात विभाजन झालेल्या सोयगावच्या रस्त्यांची दुरवस्था आहे,' असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.
सोयगाव ते चाळीसगाव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याने तालुक्यातील पत्रकारांनी २६ जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्याबद्दलचे निवेदन स्वीकारण्यासाठी आमदार जाधव बुधवारी सोयगाव येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. चार महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोयगाव तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी गट ब मध्ये टाकण्यासाठी पाठपुरावा केला, परंतु गट ब बंद झाल्याचे मंत्रालयातून सांगण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये आमदार प्रशांत बंब यांना याच निधीतून गंगापूर तालुक्यातील २७ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बारा कोटी दिले. बंब हे केवळ भाजपचे आमदार असल्याने हे शक्य झाले. मी शिवसेनेचा आमदार असल्याने भाजप विकासकामाच्या निधीसाठी मुस्कटदाबी करत आहे, असा आरोप आमदार जाधव यांनी केला. गट ब मधून निधीची तरतूद नसतांना गंगापूर तालुक्याला बारा कोटी कसे मिळाले याची विचारणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यातील रस्ते विकास केवळ भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे करू शकतात, त्यामुळे उपोषणार्थिंनी त्यांना गळ घालावी, अशी टिप्पणी त्यांनी केली. पण, दानवे हे सासरे असले तरी राजकीय शत्रू आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

फेब्रुवारीत निविदा

कवली ते तिडका या दहा किलोमीटर रस्त्याची मंजुरी २०१७ मध्ये मिळविली. परंतु नोव्हेंबरमध्ये उद्घाटन होवूनही निधी मिळत नसल्याने हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला. त्यानंतर रस्त्याची निविदा काढण्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. ही निविदा फेब्रुवारीमध्ये निघण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएम नगरसेवकांचा अहवाल शासन दरबारी

$
0
0

कामात अडथळा आणल्याचे प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय महापालिकेच्या सहा जानेवारी रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत झाला होता. या निर्णयानुसार पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी नगरसेवकांसंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. शासन काय निर्णय घेते, याबद्दल पालिका वर्तुळात उत्सुकता आहे.

दमडी महल परिसरातील श्रीराम पवार यांच्या घराचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू असताना एमआयएम नगरसेवकांनी अधिकाऱ्यावर दबाव आणला, शिवीगाळ केली अशी तक्रार होती. याबाबत सहा जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. सभेत व्हिडिओ चित्रिकरण देखील दाखवण्यात आले. कामात हस्तक्षेप करणाऱ्या एमआयएम नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केली, तर एमआयएम नगरसेवकांनी, कारवाईत कुठलाही अडथळा आणला नाही, असे मत व्यक्त केले.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी विरोधी पक्षनेते फोरोज खान, गटनेता नासेर सिद्दिकी, नगरसेवक जमीर कादरी, नगरसेविका सरवत बेगम यांचे पती आरेफ हुसेनी, साजेदा फारुकी यांचे पती सईद फारुकी हे या ठिकाणी आल्याचे दिसून आले. असे चित्रिकरण पाहून स्पष्ट केले. फेरोज खान यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी बोलताना अर्वाच्य भाषा वापरली. त्यांचे हे वर्तन अशोभनीय आहे, असा ठपका ठेवत महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलमान्वये या पाच जणांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे आदेश महापौरांनी दिले होते. सभेतील निर्णयाचा कारणापुरता उतारा महापौरांनी प्रशासनाकडे दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी कारवाईची शिफारस करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड वर्षांत उभारणार हज हाउस

$
0
0

नव्याने निविदा मागविल्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेले हज हाउसचे काम फेब्रुवारी २०१८मध्ये पुन्हा सुरू होणार असून, ते १८ महिन्यांत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सिडको कार्यालयातून देण्यात आली आहे.

औरंगाबाद येथे हज हाऊस बांधण्याची घोषणा तत्कालीन राज्य सरकारने केली होती. या घोषणेप्रमाणे हज हाउसचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणीचे पत्र जनजागरण समिती महाराष्ट्र अध्यक्ष मोहसीन अहेमद यांनी सिडको प्रशासनाला दिले होते. सिडको प्रशासनाकडून मोहसीन अहेमद यांना हज हाउसच्या कामाबाबतची माहिती देण्यात आली आहे.

सिडकोचे कार्यकारी अभियंता एस. आर. राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरात प्रस्तावित हज हाउसचे काम संबंधित एजन्सीला दोन मार्च २०१५ रोजी देण्यात आले होते. हे काम ऑगस्ट २०१७पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. संबंधित एजन्सीकडून कामात दिरंगाई करण्यात येत होती. यामुळे वारंवार नोटीस देऊन कामात वेग येत नसल्याने अखेर सिडको प्रशासनाने आठ सप्टेंबर २०१७ रोजी हज हाउसच्या कामाचे कंत्राट रद्द केले आहे.

हज हाउस उभारणीचे जुनं कंत्राट रद्द केल्यानंतर नवीन निविदा काढण्यात आली आहे. या नवीन निविदेप्रमाणे हज हाउसचे काम फेब्रुवारी २०१७पासून सुरू करण्यात येणार आहे. हे काम येत्या १८ महिन्यांत, साधारणतः जुलै २०१९पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

हज हाउसच्या उभारणीला विलंब होत असल्याने सिडकोला पत्र दिले होते. सिडकोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम झाल्यास हाज यात्रेकरूंना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

- मोहसीन अहेमद, अध्यक्ष, जनजागरण समिती महाराष्ट्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद मैदान बनले कचऱ्याचे आगार

$
0
0

जिल्हा परिषद मैदानाची दुरवस्था

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे हे मैदान आता शहरातील कचरा डेपो बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील रहिवाशांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

शहरातील मध्यवस्तीमध्ये औरंगपुरा जिल्हा परिषद मैदान आहे. गणेश विसर्जनाची सार्वजनिक विहीर देखील याच मैदानात आहे. मैदानाच्या एका बाजूला जुनी स्वातंत्र्य सैनिक कॉलनी ही वसाहत आहे. गेल्या वर्षी या मैदानावर भरलेल्या फटाका मार्केटला आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर मैदानाला अवकळा आली आहे. गेल्या काही दिवसापासून या मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. या कचऱ्यामध्ये हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ देखील टाकण्यात येतात. हे पदार्थ खाण्यासाठी या ठिकाणी जनावरांची देखील गर्दी होत आहे, तसेच हे पदार्थ सडत असल्याने त्याची दुर्गंधी या परिसरात पसरत आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. येथील नागरिकांनी महापालिकेकडे यासंदर्भात वारंवार पत्राद्वारे तक्रारी केल्या आहेत, मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. येथील कचरा उचलण्याऐवजी या ठिकाणी कचऱ्यामध्ये भरच पडताना दिसत आहे.

मैदानालगत मुलींची शाळा आहे. त्याचबरोबर काही वसाहती आहेत. शाळेतील विद्यार्थिनी, परिसरातील मुले या मैदानावर खेळत असत. गेल्या काही महिन्यांत मैदानावर कचरा साचला आहे. त्यामुळे मैदानावर मुलांचे खेळणे बंद झाले आहे.

महापालिकेचाही कचरा मैदानावर

जिल्हा परिषद मैदानाच्या परिसरालगत अनेक दुकाने, हॉटेल आहेत. तेथील कचरा या मैदानावर आणून टाकण्यात येत आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या काही गाड्याही याच मैदानावर कचरा आणून टाकला जातो, अशीही नागरिकांची तक्रार आहे.

या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भात मी स्वतः महापालिकेकडे लेखी तक्रारी दिली आहे, मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतल्या गेली नाही. या कच ऱ्यामुळे येथील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
- अमोल जोशी, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या विरहाने पतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पत्नी माहेरी राहत असल्याने तिच्या विरहात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी उस्मानपुरा, फुलेनगर भागात उघडकीस आली. आशिष दिलीप निकम (वय २४), मृताचे नाव असून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
आशीष हा फुलेनगर भागात आई व वडिलांसह राहत होता. त्याची आई शनिवारी सायंकाळी घराबाहेर भांडे घासत होती, तर वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी आशिषचे मेहुणे उमेश साळवे हे घरी आले. त्यांनी आशिषला आवाज दिला असता त्याच्या खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता आशिषने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. आशिषला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आशिष आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद असल्याने दोन वर्षांपासून त्याची पत्नी माहेरी राहत होती. यामुळे तो तणावात होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्यात राजकारण नको

$
0
0

पंकजा मुंडे यांची अपेक्षा, लेखिका संमेलनाचा समारोप

म. टा. प्रतिनिधी, बीड

राजकारणात वेगवेगळे रंग दिसतात. राजकारणात जात-पात बघितलं जात हे दुर्दैवी आहे. मात्र, आता साहित्यात देखील राजकारण वाढते आहे. ते तरी जाती-पातीच्या रंगा पलीकडे जायला हवे, अशी अपेक्षा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. बीड येथे आयोजित आठव्या लेखिका साहित्य संमेलनाचे रविवारी सूप वाजले.

बीड येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या आठव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. संमेलनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जेष्ठ समाजसेविका विद्या बाळ, अध्यक्षा दीपा क्षीरसागर, स्वागताध्यक्ष उषा दराडे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, 'नवसमाज घडवायचा असेल तर समाजातील जन्मण्याआधी गर्भात मुली मारण्याचे थांबले पाहिजे. महिलांनीच पुढाकार घेऊन इतर महिलांना सक्षम करण्याची गरज आहे. महिलांनी व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे. हे व्यक्त होणे म्हणजेच साहित्य निर्मिती होय. आज जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्याला टिकून राहायचे असेल तर स्त्रीला माणूस म्हणून जगता आले पाहिजे.'

आज राजकारणात जातीपातीच्या शिरकाव झाला आहे. मात्र हे असले जातीवर आधारित राजकारण दुर्दैवी असून हे बदलायला हवे. विकासाभिमुख राजकारण करण्याची गरज आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाले तरी आम्हाला शौचालय बांधावे लागतात याची लाज वाटते. आज साहित्य विश्वात ही जात पात शिरली आहे. राजकारण साहित्यिकात मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. किमान साहित्य क्षेत्रात तरी हे जातीय वेगवेगळे रंग येऊ नयेत अशी अपेक्षा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

संत कवयित्रींचा ठेवा जतन करण्याची गरज

संत कवयित्रींनी समाजव्यवस्थेची चौकट मोडून विद्रोह केला. त्यांनी ज्या काळात ही बंडखोरी केली ती आजच्या समाजासाठी प्रेरणादायी आहे. संत कवयित्रींचा हा ठेवा जतन करण्याची गरज असल्याचा सूर 'मराठी संत कवयित्रींची बंडखोरी' या विषयावरील परिसंवादात उमटला.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या आठव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात डॉ. मीरा घांडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला. सुशीला सोलापुरे, वैशाली गोस्वामी, सुलभा मुंडे, संगीता मोरे यांनी यात सहभाग घेतला. वैशाली गोस्वामी यांनी संत मुक्ताबाईने बंडखोरी केली; पण केवळ स्त्री म्हणून नाही असे मत मांडले. स्त्री- पुरुषापलीकडे जाऊन अवघे वात्सल्य काव्याच्या रूपाने मुक्ताबाईने मांडले. जनाबाईने देखील स्त्रीत्वाचा गौरव केला. व्यवस्थेची चौकट उखडून टाकताना त्यांनी सक्षमपणे स्वत:चे स्थान निर्माण केले. संत कवयित्रींच्या मागे पुरुष खंबीरपणे उभे होते हे मान्य केले पाहिजे असे परखड मतही त्यांनी मांडले. प्रस्थापितांविरुद्ध बंड करताना स्वत: सक्षम असले पाहिजे हा विचार संत कवयित्रींनी दिला. यावेळी महदंबा, कान्होपात्रा, सोयराबाई यांच्या जीवनकार्यावर व साहित्यावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

संगीता मोरे यांनी संत साहित्यिकांनी लोकभाषा रुजविल्याचे सांगून त्यांचे विचार समाजाला दिशा देण्याचे काम कायम करत राहतील असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. मीरा घांडगे म्हणाल्या, 'नाथ संप्रदयाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ होता. तेराव्या शतकात संत कवयित्रींनी बंडखोरी केली. तो काळ खडतर होता; परंतु त्यावेळी संत कवयित्रींच्या मागे संत साहित्यिक खंबीरपणे उभे राहिले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिंसानगरात कुंटणखान्यावर छापा

$
0
0

तीन पीडित महिलांची सुटका

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अहिंसनागर भागातील एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून तीन पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत महिलेसह एका ग्राहकाला अटक केली. ही कारवाई बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि गुन्हे शाखेने रविवारी सायंकाळी केली. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी याच कुंटणखान्यावर कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतरही कुंटणखाना कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता, या चौकशीचे आता पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

बीड येथील विशेष पथकाला औरंगाबाद शहरातील अहिंसनागर भागात एका घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पथकाने औरंगाबाद गाठले. शहर गुन्हे शाखेला ही माहिती दिली गेली. दोन्ही पथकांनी रविवारी सायंकाळी सापळा रचला. या कुंटणखान्यावर बनावट ग्राहक पाठवला. पथकाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे या ग्राहकाने इशारा केला आणि पोलिसांनी छापा मारला. याठिकाणी तीन पीडित महिला, तसेच एक ग्राहक आढळून आला. पोलिसांनी आंटी शोभा शुक्लसह ग्राहकाला अटक केली. पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात 'पीटा' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बीडचे विशेष पथकाचे डीवायएसपी भरत गाढे, पोलिस निरीक्षक अनिलकुमार जाधव, पोलिस उपनिरीक्षक भारत माने, शेख पाशा, अप्पासाहेब सानप, सतीश बहिरवाल, नीलवती खटणे, रेखा गोरे, सोनाली चौरे, मीना घोडके, विकास नेवडे, औरंगाबाद गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलिस उपनिरीक्षक योगेश धोंडे, संतोष सोनवणे आणि पथकाने ही कारवाई केली.

विशेष पथकाची शहरात पहिली कारवाई

बीड शहरात २०१५मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षांतर्गत बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबाद शहर हा भाग येतो. औरंगाबाद शहरात या पथकाने केलेली ही पहिली कारवाई आहे. अहिंसनागर येथील याच कुंटणखान्यावर गुन्हे शाखेने दोन महिन्यांपूर्वी छापा टाकला होता. त्यावेळीही आंटीला अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंर पुन्हा कुंटणखाना सुरू करण्यात आला आणि आज बीडच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेक बाऊन्सप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उधारीवर टायर खरेदी केल्यानंतर दुकानमालकाला दिलेला धनादेश अनादर झाल्याप्रकरणी रमेश माधवराव सुपेकर याला तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा व दोन लाख २१ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मंद यांनी दिले. ही रक्कम एक महिन्याच्या आत जमा केली नाही, तर आणखी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात म्हटले आहे.
या प्रकरणात कृष्णा सीताराम पवार यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पवार यांचे टीव्ही सेंटर भागात टायर विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून सुपेकर हा वेळोवेळी उधारीवर तर कधी नगदी अशा स्वरुपात टायर खरेदी करत होता. टायर खरेदी केल्याची उधारी देण्यासाठी सुपेकर याने पवार यांना १ लाख १० हजार ५०० रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र बँक खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश अनादरीत झाला. यावरून फिर्यादी पवार यांनी अड. एस. एस. बारहाते यांच्यामार्फत कलम १३८ अभिलेख अधिनियमानुसार कोर्टात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात फिर्यादी पवार व संशयित आरोपी सुपेकर यांच्या साक्षी कोर्टात नोंदविण्यात आल्या. फिर्यादीतर्फे पुरावे सादर करण्यात आले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने सुपेकर याला शिक्षा ठोठावली

.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅपल प्रिमिअम रिसेलर 'इन्स्पायर'ची सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील पहिले अॅपल प्रिमिअम रिसेलर स्टोअर 'इन्स्पायर'चे दालन औरंगाबादकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. या दालनाचे उद्घाटन कुमार व दीपा काळे यांच्या हस्ते करण्यात आले. आकाशवाणीजवळील सागर ट्रेड सेंटर येथे हे दालन सुरू करण्यात आले आहे.
अॅपल कंपनीतर्फे निर्मित सर्व वस्तू येथे उपलब्ध राहणार आहेत. येथे अधिकृत सर्व्हिस सेंटर देखील राहणार आहे. नव्याने आलेले अॅपलचे आयफोन एक्स, टीव्ही, घड्याली आणि सर्व श्रेणीचे अॅपल मॅकबुक्स व आयमॅक्स मिळणार आहे. शालेय, औद्योगिक तसेच व्यवसायात असणाऱ्या प्रत्येक घटकाकरिता इन्स्पायर स्टोअरमुळे विविध प्रॉडक्टसची शृंखला असेल. येथे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स देखील ठेवण्यात आल्या आहेत. मॅकबुक एअर १२८ जीबीच्या खरेदीवर २५ टक्के सूट म्हणजेच ५७ हजार ९०० रुपयात, तर ३२ जीबीचा आयफोन ७ हा केवळ ३९ हजार ९९० रुपयांत मिळणार आहे. अॅपल टीव्ही व एअरपॅडच्या खरेदीवर ५ हजारांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी आहे. नागपूर, इंदूर, भोपाळनंतर औरंगाबादेत रिसेलर स्टोअर 'इन्स्पायर' दाखल झाले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतरप्रश्नी मध्यस्थी करा; खैरेंची मुख्यमंत्र्यांना विनंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीप्रकरणी व्यापक जनहित लक्षात घेवून महाराष्ट्र शासनातर्फे मध्यस्थी करा. महापालिकेसाठी सर्वोच्च न्यायालयात वस्तुस्थिती निदर्शनास आणून बाजू मांडा व शहरवासियांना सहकार्य करा, असे साकडे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे.
खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना समांतर जलवाहिनीच्या संदर्भात सविस्तर निवेदन दिले. निवेदनात खैरे यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद महापालिका राबवित असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत यापूर्वीच शासनास माहिती सादर करण्यात आली आहे. १ सप्टेबर २०१४ रोजी अस्तित्वातील पाणीपुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पुढील कार्यवाहीसाठी हस्तांतरित केली. महापालिकेने आवश्यक ते सहकार्य करून देखील कंपनीने योजनेची कामे समाधानकारकरित्या पूर्ण केली नाहीत. कामात अनियमितता केल्यामुळे भविष्यात विहित मुदतीत पाणीपुरवठ्याची कामे होण्याची शाश्वती नसल्यामुळे महापालिकेने कंपनीबरोबरचा करार रद्द केला.
कंपनीने करारनामा व बँक गॅरंटी वसुलीच्या संदर्भात महापालिकेविरुद्ध जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल केले. जिल्हा न्यायालयाने कंपनीच्या बाजुने निकाल दिला. त्याला महापालिकेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने महापालिकेच्या बाजुने निकाल दिला. त्यावर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अनुज्ञा याचिका दाखल केली आहे. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याबद्दलचे सविस्तर पत्र महापालिका आयुक्तांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 'जैसे थे' आदेशापासून आजमितीस दैनंदिन पाणीपुरवठा व योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिका करत आहे. तसेच पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही देखील महापालिकेतर्फे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 'जैसे थे' आदेशामुळे भविष्यात कायदेशीर अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडा

व्यापक जनहित लक्षात घेता सुमारे १५ लाख लोकसंख्येस पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक बाबींचा त्रास होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयातील अनुज्ञा याचिका प्रकरणात महाराष्ट्र शासनातर्फे मध्यस्थी होवून महापालिकेसाठी सर्वोच्च न्यायालयात वस्तुस्थिती मांडावी, अशी विनंती खासदारांनी मुख्यमंत्र्यांना केलीआहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images