Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डायरी (२० एप्रिल २०१८)

$
0
0

- जीवन विकास ग्रंथालयातर्फे बालकथामाला.

स्थळ : ग्रंथालयाचे बालकक्ष, सावरकर चौक

वेळ : सायंकाळी ५.३०

- महिलांसाठी शाहिरी शिबिर.

स्थळ : गरवारे कम्युनिटी सेंटर, सिडको एन-सहा

वेळ : सायंकाळी ५

…....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोकणवाडी परिसरात सुनील अशोक उंटवाल (वय ३८) या बांधकाम ठेकेदाराचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह घरात आढळून आला. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये उंटवाल यांच्या गळ्यावर गळफास घेतल्यानंतर दिसून येतात तसे वळ दिसून आले नाहीत. त्यामुळे ही आत्महत्या आहे का घातपात याबाबत संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उंटवाल यांचे कुटुंब बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य बाहेर गेले होते. या दरम्यान उंटवाल यांनी वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत जाऊन फॅनला बेडशीटने गळफास घेतला. त्यांच्या कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांना तत्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान उंटवाल गेल्या तीन ते चार दिवसापासून तणावात असल्याची माहिती कुटुंबीयानी दिली. उंटवाल यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आले. त्यापूर्वी डॉक्टर व पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाची पाहणी केली.

\Bतपास सुरू

\Bआत्महत्या केल्यानंतर दिसणाऱ्या चिन्हाप्रमाणे उंटवाल यांच्या गळ्यावर काहीही आढळून आलेले नाही. ही बाब संशयास्पद वाटल्याने उंटवाल यांच्या मृतदेहाची व्हिसेरा काढून छावणी येथील फॉरेंन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. जमादार तडवी या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाश्रमात अन्नदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी नगरसेवक अनिल मकरिये यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील मातोश्री वृद्धाश्रम आणि सिडको परिसरातील भारतीय समाज सेवा केंद्रात अन्नदान करण्यात आले. तसेच गोशाळेत चारा वाटप करण्यात आले.

आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर, नगरसेवक दिलीप थोरात, गोकुळ मलके, शिवाजी दांडगे, विकास पाटील, प्रशांत देसरडा, कचरू घोडके, विकास कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी, राहुल खरात, प्रशांत नांदेडकर, राजू वाडेकर, नीलेश मकरिये, सनी दामले, शेख रफिक, सिद्धांत साळवे, शुभम खिल्लारे, अथर्व विटेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिमाखदार नृत्योत्सवाने फेडले डोळ्यांचे पारणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणेशस्त्रोत्र, संगीतबद्ध तालासुरलयीत पदन्यास, जतिस्वरम, कौतुकम, पद्म, कीर्तनम आदी नृत्याविष्कारातील भरतनाट्यमने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. निमित्त होते ध्यास परफॉर्मिंग आर्टसच्या वार्षिक नृत्योत्सवाचे.

नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात पुणे येथील अरुंधती पटवर्धन आणि मानसी जोग यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाचा कळस चढवला. वार्षिक नृत्योत्सवाची सुरुवात ध्यासच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी गणेशस्त्रोत्राने केली. यानंतर सचिन नेवपूरकर यांनी संगीतबद्ध केलेले तराणा आणि मनाचे श्लोक छोट्या विद्यार्थ्यांनीच्या पदन्यासातून प्रेक्षकांना तरल अनुभव दिला. कौतुकम, पद्म, कीर्तनम, अभिनय यांची प्रचिती देत विद्यार्थीनींनी अलारिपू, तिल्लाना, हे पारंपारिक असणारे शास्त्रीय नृत्य आधुनिक संगीतावरही सादर करता येते हे दाखवून दिले. रसिकांनी याला प्रतिसाद दिला. पहिल्या सत्राचा शेवट शिवावर आधारित तांडव नृत्याद्वारे करून मेहनत आणि सचोटी दर्शवली.

\Bरसिक मंत्रमुग्ध

\Bदुसऱ्या सत्रात बक्षीस वितरण झाले. नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी मार्गदर्शन केले. 'तुका म्हणे' या विशेष सादरीकरणासाठी आमंत्रित केलेल्या अरुंधती पटवर्धन व मानसी जोग यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. तासभर चाललेल्या भक्तीपूर्ण आविष्कारामध्ळे रसिक तल्लीन झाले होते. यावेळी संजीव शेलार, संतोष नेवपूरकर, नायबराव देशमुख, सुजित नेवपूरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी तुळपुळे यांनी केले. ध्वनी व्यवस्था अविनाश ठिगळे यांनी सांभाळली. केतकी नेवपूरकर आणि सचिन नेवपूरकर व टीमने परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. प्रा. ॠषिकेश कांबळे यांचा ‘सरस्वती भुवन’मध्ये सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रा. ॠषिकेश कांबळे यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचा २०१७-१८चा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्याबद्दल सरस्वती भुवन संस्थेतर्फे अध्यक्ष बॅ. जे. एम. गांधी यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन सत्कार केला.

डॉ. कांबळे हे साहित्यिक, समीक्षक, सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक असून, औरंगाबाद जिल्ह्यातून पुरस्कार मिळालेले ते एकमेव असे व्यक्ती आहेत, असे बॅ. गांधी म्हणाले. संस्थेच्या एका विद्वान प्राध्यापकाला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर होतो, ही संस्थेतील सर्व घटकांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.

दुःखीतांचा कैवार घेऊन साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कायम लढत राहिलो, त्याची शासनाने दखल घेतली, ही अतिशय समाधानाची व आनंदाची अशी गोष्ट आहे, असे डॉ. कांबळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. हा पुरस्कार समाजातल्या सर्व थरातील दीन दुबळ्यांसाठी झटत रहाण्याची प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले. यावेळी संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. दिनेश वकील, सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, सदस्य मिलिंद रानडे, क. वि. व्याहाळकर, मोहिनी रसाळ व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांसमोर कचरा, पाण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवनियुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पदभार घेताच शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चिघळलेल्या कचराप्रश्नाविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. कचराप्रश्नासोबतच जिल्हाधिकाऱ्यांसमोर जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई, समृद्धी महामार्ग भूसंपादनाचा काही भागांमध्ये रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील कचराप्रश्न पेटला आहे. महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार १७ मार्चपासून जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानंतर तत्कालिन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कचराप्रश्न सोडवण्यासाठी तत्काळ सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करून शहरातील विविध भागात एकूण ४३३ कंपोस्ट पिट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत यातील केवळ दीडशे कंपोस्ट पिट तयार झाले असून, पावसाळ्यापूर्वी कंपोस्ट पिटचे काम पूर्ण करावे लागणार आहे. शहरातील कचऱ्याप्रश्नावर नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांना कचऱ्याप्रश्नी शासनाने नियुक्त केलेल्या सनियंत्रण समितीचे सचिव म्हणून कचराप्रश्नाच्या प्रगतीबाबत हायकोर्टातही उत्तर द्यावे लागणार आहे.

जिल्हाधिकारी चौधरी यांना जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईचेही नियोजन करावे लागणार आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला असताना टँकरची संख्या ३२४वर पोचली आहे. यावरून तत्कालिन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात टँकरलॉबी सक्रिय झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या टँकर सुरू असलेल्या गावांत टँकरची खरोखर गरज आहे काय; तसेच या गावाची पाण्याबाबतची सद्यस्थिती तपासण्यासाठी चार उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले होते. या पथकाच्या अहवालावरूनही जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करावी लागणार आहे.

शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे भूसंपादन प्रकरण रखडले असून, खुलताबाद, गंगापूर तालुक्यांमधील काही गावांमधील शेतकरी भूसंपादनाचा दर वाढवण्याची मागणी करत आहेत. हे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

\Bपहिला दिवस कचराप्रश्नावर\B

शहरातील कचराप्रश्नी शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी चौधरी यांनी रुजू होताच महसूल; तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शहरातील कचराप्रश्न, शासन तसेच प्रशासनाकडून झालेल्या कार्यवाहीबाबत व न्यायालयाने दिलेल्या निर्देशांबाबत माहिती जाणून घेतली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा पहिला दिवस कचराप्रश्नाने सुरू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम फोडीच्या गुन्ह्यास तपास थंडावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेव्हन हिल्स् परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम गोळीबार करून फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (५ एप्रिल) घडली होती. या घटनेला दोन आठवडे उलटले आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणी आरोपींचा कोणताही माग काढण्यामध्ये शहर पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, या गुन्ह्यामध्ये जानेवारी महिन्यात कॉन्स्टेबलच्या चोरीस गेलेल्या रिव्ल्ल्वरचा वापर केल्याची शक्यता आहे. या रिव्हॉल्वरचा देखील तपास लावण्यामध्ये पोलिस अपयशी ठरले आहेत.

सहा जानेवारी रोजी आकाशवाणी चौकातून पोलिस मुख्यालयातील कर्मचारी अमित स्वामी याचे मद्यधुंद अवस्थेत असताना शासकीय रिव्हॉल्वर व नऊ एमएमची दहा जिवंत काडतुसे चोरीस गेली होती. याप्रकरणी स्वामीसह रिक्षाचालक व एका मित्राची कसून चौकशी करण्यात आली. मात्र या रिव्हॉल्वरचा तपास लावण्यामध्ये पोलिसांना यश आले नाही. दरम्यान दोन आठवड्यापूर्वी सेव्हन हिल्स् परिसरात पहाटेच्या सुमारास एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरचे मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीने मशीनवर गोळीबार केला. यामध्ये नऊ एमएमच्या काडतुसाचा वापर करण्यात आला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले रिव्हॉल्वर व काडतूस हे स्वामी याचे चोरीस गेलेले रिव्हॉल्वर असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान गुन्हे शाखेने स्वामीसोबत असलेल्या दोन्ही साथीदारांना एटीएमच्या घटनेनंतर पुन्हा एकदा चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यांच्याकडून अद्यापही रिव्हॉल्वरबाबत कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुंड महाराज यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: येथील लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट नाशिक (जि. केंद्र, औरंगाबाद)चे शक्तिपात दीक्षाधिकारी गोविंद नागनाथ पुंड महाराज (वय ८७) यांचे बुधवारी रात्री सव्वाएक वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी पुष्पनगरी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास नाशिक येथील लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज ट्रस्टचे प्रधान विश्वस्त प्रकाश प्रभुणे महाराज व सूर्यकांत राखे महाराज व ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते. तसेच पुणे येथील श्री वासुदेव निवासच्या वतीने प्रमोद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एटीएम यंत्रणा अखेर पूर्वपदावर

$
0
0

औरंगाबाद: चार-पाच दिवसांपासून शहरातील ग्राहकांना होणारा एटीएम बंदचा त्रास गुरुवारी कमी प्रमाणात जाणवला. शहरातील बँकिंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२० हून अधिक एटीएमचे सर्व्हर, एटीएमवरील कॅश आणि ऑफ-ऑनलाइन सिस्टीम पूर्वपदावर आली. यामुळे गुरुवारी खासगी बँका सोडून राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम सुरू झाले. प्रायव्हेट बँकांमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकांचे एटीएम काही प्रमाणावर सुरू होते. सुरू असलेल्या एटीएममध्ये निराला बाजार, बजाज हॉस्पिटल परिसर ,पदमपुरा परिसर आणि कॅनॉट मधील एचडीएफसीचा समावेश होता. शुक्रवारी किंवा शनिवारी या बँकांचे एटीएम सुद्धा पूर्वपदावर येतील असा अंदाज आहे. बुधवार आणि गुरुवारी खासगी एजन्सीजद्वारे खासगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएमवर रोकड पोहचवण्यात आली. दरम्यान स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँकेचे एटीएम गुरुवारी सुरू होते. शहरात २१ राष्ट्रीयकृत बँकांचे २३० आणि खासगी बँकांचे ११० असे एकूण ३४० एटीएम आहेत. यापैकी बहुतांश एटीएम सोमवार, मंगळवारपासून बंद होते. यामुळे ग्राहकांना रोकड टंचाई जाणवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी दोन पदभार

$
0
0

चौधरी यांनी जिल्हाधिकारीपदासोबतच महापालिका आयुक्त आणि मराठवाडा विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही स्वीकारला. कचरा आणि कचरा डेपोचा प्रश्न गांभिर्याने न हाताळल्यामुळे १७ मार्च रोजी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची शासनाने मराठवाडा विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली केली. सरकारने पालिका आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला. त्यामुळे नव्या जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्तपदाचाही कार्यभार स्वीकारावा लागला. दरम्यान, मुगळीकर मराठवाडा विकास मंडळात रुजू झालेले नाहीत. त्यामुळे नवनियुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे महापालिका आयुक्तपदासह मराठवाडा विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदाचा कार्यभारही सोपविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकच घर दोघांना विकले; तीन वर्षे सक्तमजुरी, दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तिसगाव ग्रामपंचायतीतील एकच घर दोघांना विकून फसवणूक करणारा आरोपी तुकाराम सीताराम जाधव याला तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी ठोठावली.

या प्रकरणी संगीता गौतम साळवे (रा. तिसगाव, एमआयडीसी वाळूज) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी तुकाराम सीताराम जाधव (रा. तिसगाव) याने फिर्यादीला तिसगावातील घर हे २० जून २०१३ रोजी ५० हजार रुपयांना विकले व आरोपीने त्याची नोटरीही करून दिली होती. मात्र त्यानंतर आरोपीने ग्रामपंचायतीमध्ये खोटा ठराव घेऊन आधीचा ठराव रद्द केला आणि अंजन लक्ष्मण साळवे यांना तेच घर हे दोन लाख ३९ हजार रुपयांना १४ जुलै २०१४ रोजी विकले. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यामध्ये कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील गौतम कदम यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला कलम ४२० अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी टिप्परचालकावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेपत्ता कामगाराचा मृतदेह वाळूच्या ढिगाऱ्याखाली आढळल्याची घटना दोन एप्रिल रोजी हडको एन अकरा भागात घडली होती. याप्रकरणी कामगाराच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून ही वाळू टाकणाऱ्या टिप्परचालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान किसन म्हस्के (रा. नवनाथनगर, हडको) या कामगाराचा मृतदेह एन अकरा परिसरातील राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मैदानातील वाळूच्या ढिगाऱ्याखाली आढळला होता. सुरुवातीला हा खुनाचा प्रकार असल्याची शंका व्यक्त होत होती. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासामध्ये म्हस्के यांचा मृत्यू वाळू दबल्याने झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी बुधवारी म्हस्के यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून टिप्पर चालक शेख सलाम शेख कचरू याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरसाठ विमानाने नव्हे तर इमानाने काम करणारे शिवसैनिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या कोकणवाडी येथील नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शुभेच्छा देताना ठाकरे यांनी शिवसैनिक मोठा होत असेल तर त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणे आपले काम आहे, शिरसाठ हे विमानाने नाहीतर इमानाने काम करणारे सच्चे शिवसैनिक असल्याचे सांगितले. या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विजय वाघचौरे, नगरसेवक सिध्दांत शिरसाठ यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी सेवा केंद्रांवरील कारवाईला ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी; तसेच दर्जेदार व प्रमाणित बी-बियाणे, खत शेतकऱ्यांना मिळावे म्हणून कृषी विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या गुण नियंत्रण निरीक्षक कार्यालयाने गेल्या वर्षभरात १४७ कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली. यात एका दुकानाचा परवाना रद्द केला असून, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, २०१६-१७ या वर्षाच्या तुलनेत ही कारवाई नाममात्रच असून, आधीच्या वर्षी ७०२ केंद्रावर कारवाई करण्यात आली होती.

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालय क्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत खते, बियाणे आणि किटकनाशक विक्री परवाने प्राप्त कृषी सेवा केंद्राची संख्या अनुक्रमे सहा हजार १३२, सहा हजार १९५ आणि पाच हजार ३११ एवढी आहे. या केंद्राकडून विक्री होणारे बियाणे, खत, किटकनाशके प्रमाणित, गुणवत्तापूर्ण आहेत, बनावट विक्री होत तर नाही ना, याची पडताळणीची जबाबदारी गुणनियंत्रक विभागाकडे असते. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षकांपासून, तर विभागीय सहसंचालक कृषी अधिकारी असे विभागात ९४ गुण नियंत्रण निरीक्षक आहेत.

एका दुकानाचा परवाना रद्द

दरम्यान, गुण नियंत्रण निरिक्षकांनी २०१७-१८ मार्चअखेरपर्यंत विविध केंद्राच्या केलेल्या पाहणीत परवान्याचे उल्लंघन करणे, यासह अन्य कारणांमुळे विभागातील १४७ केंद्राचे परवाने निलंबित केले. त्यात औरंगाबादेतील एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला असून, औरंगाबाद व जालन्यात प्रत्येकी तीन गुन्हे संबंधितांविरुद्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, २०१६-१७ या वर्षात विभागात ६५ परवाने निलंबित करण्यात आले होते, तर ७०२ परवाने रद्द झाले होते. यात १२ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले होते, अशी माहिती सूत्रांनी देत खरिप हंगामात बनावट खते, बियाणांची विक्री होणार नाही, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी खास दक्षता घेतली जात असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यास विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याला शिवसेनेने विरोध केला आहे. विदर्भाच्या हिताचे निर्णय मुंबईत बसूनही घेता येऊ शकतात. यामुळे मुंबईतच पावसाळी अधिवेशन घेण्यात यावे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी, विदर्भातील शेतकऱ्यांबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे अभिनंदन केले. विदर्भातील शेतकऱ्यांना जसा न्याय दिला तसाच न्याय मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अन्य शेतकऱ्यांना देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पावसाळी अधिवेशन मुंबईत घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी, विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मुंबईत बसून सोडविण्यात आले आहेत. पावसाळ्यात विदर्भात विशेष बैठक घेण्याची गरज काय? मुंबईतून सर्व निर्णय घेतले जाऊ शकतात. मुंबईतच बसून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय होणे अपेक्षित आहे, असे मत व्यक्त केले. मराठवाड्यासाठी औरंगाबादेत मंत्रिमंडळ बैठक घेणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले.

भाईंचा उपयोग पक्षाच्या गरजेप्रमाणे

राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे औरंगाबादचे पालकमंत्री असते तर कचऱ्याचा प्रश्न मिटला असता, पण खैरे आणि कदम यांच्यातील वादामुळे पालकमंत्री पदावरून कदमांची बदली केल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, 'भाईंची गरज मला जेथे लागते, तेथे भाई जातात. दोघांमध्ये तसा काहीच वाद नाही,' असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

स्वबळाची चाचपणी

मराठवाड्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आलेलेल्या आहे. डिसेंबरअखेर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकासोबत घेण्याबाबत वृत्त पत्रातून वाचत आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत. स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी सुरू आहे. आगामी काळात मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागातही अशाच बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हर्षवर्धन जाधवची तक्रार नाहीच

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत विचारले असता, उद्धव ठाकरे यांनी जाधव यांचे नाव न घेता, 'शिवसेना शिस्तीचा पक्ष आहे. जाधव यांची तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढदिवस -संतोष ताठे

कठुआप्रकरणी लाक्षणिक उपोषण

$
0
0

औरंगाबाद : कठुआ येथे आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार व हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे शहरप्रमुख शफिक धांडे व संपर्क प्रमुख रऊफ पटेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. याप्रकरणी दोषींना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली. या उपोषणस्थली प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि आमदार इम्तियाज जलील यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली जाईल, असे आमदार कडू व जलील यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रसिद्धी प्रमुख सिराज पटेल, अक्रम खान, परवेज शेख, अफजल पटेल, प्रदीप तुपे पाटील, जावेद शेख, सोमेश पगार, तरबेज शेख, जाहेद शेख, लुकमान खान, रहेबर खान आदी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर जयंती साजरी

औरंगाबाद : सिडको एन-दोन भागातील तानाजीनगर येथील बालधम्म संस्कार केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहास साजरी करण्यात आली. यावेळी दीपंकर भंते, जयंती समितीचे अध्यक्ष अरूण जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना केक, आइस्क्रिम व शरबत यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गौतम दाभाडे, कारभारी वाहूळ, अलका वानखेडे, सरपंच प्रकाश आठवले यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, उपासक, उपासिका, प्राध्यापक, डॉक्टर, वकिल, व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपावरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटीस

$
0
0

औरंगाबाद : निश्चित वेतन मिळावे या मागणीसाठी आंदोलन करीत असलेले वैद्यकीय अधिकार, कर्मचारी कामावर हजर राहत नाही. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची अंतिम नोटीस बजविण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिका प्रशासनाला दिले. नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत (एनयूएचएम) आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, परिचारिका, आशा स्वयंसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची १८२ पदे भरली होती. त्यांना केंद्र सरकारकडून येणार निधीतून वेतन दिले जात आहे. केंद्र शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. हे कर्मचारी आठ दिवसांपासून संपावर आहेत. शहरात कचरा प्रश्न निर्माण झाल्याने साथीचे आजार पसरू शकतात. अशावेळी आरोग्य कर्मचारी नोटीस दिल्यानंतरही कामावर आले नाहीत. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावी. त्यानंतरही ते कामावर आले नाही, त्यांना सेवेतून कमी करावे, असे आदेशही महापौर घोडेले यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारित दरसूचीने रस्त्यांची काम करा

$
0
0

औरंगाबाद : महापालिका १५० कोटी रुपये खर्चून शहरातील रस्त्यांची कामे करणार आहे. रस्त्यांचीकामे २०१७-१८च्या सुधारित दरसूचीने करून महापालिकेच आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी शहर अभियंत्यांना निवेदन दिले आहे. सरकारने २०१७-१८ची सुधारित दरसूची जाहीर केली आहे. त्यातील दर जुन्या सूचीपेक्षा कमी आहेत. दोन्ही दरांमध्ये १७ ते १८ टक्क्यांचा फरक असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले होते. त्यानुसार तुलनात्मक तक्ता सादर करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या होत्या, असे या निवेदनात म्हटले आहे.

सरकारने दिलेल्या १५० कोटी रुपयांच्या कामांची सध्या निविदाप्रक्रिया सुरू आहे. या कामांसाठी कंत्राटदार निश्चित करणे किंवा कार्यादेश देणे आदी प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचे नुकसान टाळण्यासाठी नव्या दरसूचीनुसार रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणी या निवेदनत करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास येथील क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूलतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी धम्माल केली. विद्यार्थ्यांसह पालकांना आंनदोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली.

सविता खामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रमोद मारावार आणि सरोज मारावार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपनृत्याने झाली. त्यानंतर लावणी, लोकनृत्य, लोकगीते सादर करत विद्यार्थ्यांनी धम्माल उडवून दिली. मुकअभिनयाच्या माध्यमातून बाल कलाकारांनी शेतकरी आत्महत्या या विषयावर प्रकार टाकत साऱ्यांनाच विचार करण्यास भाग पाडले. दुर्गा सुरासे, शिवानी शिंदे, गायत्री पिवळ, रेणुका घोडके, साक्षी मदगे, सानिका घोडके यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितींची मने जिंकली. दिलीप कोळी, प्रदीप मापारे, प्रदीप विखे, वाय.एस. पाटील, योगेश काथार, अविनाश हिवराळे, अनिता बोराडे आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images