Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अट्टल घरफोड्यास एक वर्ष सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम परिसरात घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तर यांनी ठोठावली.

एमजीएम परिसरातील कॉटेजमध्ये राहणारे कृष्णा दगडुबा प्रधान हे १५ जुलै २०१७ रोजी आपल्या खोलीमध्ये झोपले असताना चोरट्याने संधी साधून खुंटीला लटकवलेली पँट व रोख रक्कम लंपास केली होती. प्रधान यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून शेख रफिक शेख अय्युब उर्फ व्हॉईटनर (३५, रा. चिश्चिया कॉलनी) याला अटक केली होती; तसेच तपास पूर्ण करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद व साक्ष पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला कलम ३८० अन्वये एक वर्ष सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुक्या कचऱ्याचे गठ्ठे बनवून घेण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

$
0
0

सुक्या कचऱ्याचे गठ्ठे बनवून

घेण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सुक्या कचऱ्याचे ढीग वाढत असल्याने हा कचरा आता जिनिंग प्रेसिंगला देऊन त्यांच्याकडून कचऱ्याचे गठ्ठे बनवून घेण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती व सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार कचरा वेचकांची नियुक्ती करून शहरभर कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी ४३३ पीट तयार करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे सुक्या कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. गोदामे भाड्याने घेऊन हा कचरा साठवण करा, असे आदेश महापौरांनी दिले आहेत. प्रशासनाने सुक्या कचऱ्याचे गठ्ठे तयार करण्यासाठी जिनिंग प्रेसिंग सोबत बोलणी सुरू केली आहे. प्रतिकिलो चार रुपये असा भाव सांगण्यात येत असल्याने यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी - आरोग्य कर्मचारी आंदोलन सुरूच

$
0
0

आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे

काम बंद आंदोलन सुरूच

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारले आहे.आठवडा उलटून गेला तरी त्यावर तोडगा न निघाल्याने हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील जिल्हा परिषदांसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. दरम्यान औरंगाबादेत अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. सरकारने वेळीच दखल घेतली नाहीतर मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना मिळाला १७ वर्षांनंतर न्याय

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विमानतळ विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १३ शेतकऱ्यांना १७ वर्षांच्या लढ्यानंतर हक्काच्या जमिनी देण्यात आल्या असून, मिळालेल्या जागेला या शेतकऱ्यांनी 'चिकलठाण विमातळ विस्तारीकरणग्रस्त शेतकरी वसाहत' असे नाव दिले आहे.

औरंगाबाद शहरात १९९३ रोजी विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानाचा अपघात घडला होता. त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. विमानतळ विस्तारीकरण करताना विमानतळाच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित आल्या होत्या. त्यावेळी या शेतकऱ्यांना १२.५ टक्के जमिनी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जमिनी आतापर्यंत देण्यात आल्या नव्हत्या. यासाठी चिकलठाणा भागातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. शिवाय वेळोवेळी अर्जांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता.

याबाबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती. त्यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांनीही पुढाकार घेतला होता.

या शेतकऱ्यांना बीड बायपास रोडवर सावंगी शिवारात महापालिका क्रमांक ३७मधील (गट नंबर २३१) गायरान जमिनी देण्यात आल्या आहेत. १३ शेतकऱ्यांना जागा मिळाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरण समिती सदस्य मदन नवपुते यांनी दिली. या वसाहतीचे बुधवारी (१८ एप्रिल) उद्घाटन करण्यात आले. यावेळी बापुसाहेब दहीहंडे, सदाशिव पाटील, नितीन राठोड, रमेश दुतोढे, आत्माराम ढुबे यांची उपस्थिती होती.

……………………

२२ एकर जमीन मिळाली

विमानतळ विस्तारीकरणात जमीन गेलेल्या १३ शेतकऱ्यांना २२ एकर जागा मिळाली आहे. मुकुंदवाडी भागातील काही शेतकऱ्यांचा समावेश आहे, मात्र त्यांनी जागा अद्यापही घेतली नसल्याची माहिती मदन नवपुते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दामोदर जोशी यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: बेगमपुरा येथील जेष्ठ नागरिक दामोदर जगन्नाथ जोशी (वय ८५) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्याच्यावर प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीता माढेकर यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: नीता नरेश माढेकर (वय ६८) यांचे बुधवारी पहाटे दोन वाजता आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगी, दोन मुले, नांतवंडे असा परिवार आहे. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी नरेश माढेकर यांच्या त्या पत्नी होत. बुधवारी १८ एप्रिल रोजी सकाळी प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदस्य नियुक्तीप्रकरणी तीन महिन्यांत निर्णय घ्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सदस्य नियुक्तीप्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. के. सोनवणे यांनी याचिकाकर्त्यांनी कुलपती यांच्याकडे अपील दाखल करावे व त्यांनी तीन महिन्यांत याविषयीचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले.

प्रा. विलास खंदारे व उस्मानाबाद जिह्यातील भूम येथील प्रा. अप्पासाहेब हुंबे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा कलम ४०(२)(ब)नुसार कुलगुरू यांना अभ्यास मंडळावर सदस्य नेमण्याचे अधिकार प्राप्त आहेत, पण लोकशाही पद्धतीने सदस्यांची नियुक्ती न करता अपात्र सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. अनेक प्रकरणात विशिष्ट विषयाच्या प्राध्यापकाला दुसऱ्या विषयाच्या मंडळावर नियुक्ती देण्यात आली. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व सिद्ध झालेल्या; तसेच शिक्षा सुनावण्यात आलेल्या काही जणांना नियुक्ती दिल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला होता. सुनावणीअंती विद्यापीठ कायदाच्या कलम १४० अन्वये याचिकाकर्त्यांनी कुलपतींकडे अपील सादर करावे व त्यांनी तीन महिन्यात निर्णय द्यावा, असे निर्देश खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्यांची बाजू शंभुराजे देशमुख व रामराजे देशमुख यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाची सीईटी होणार १८ केंद्रांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे (सीईटी) आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा २० एप्रिल ते तीन मेदरम्यान विद्यापीठाच्या कार्यक्षेत्र असलेल्या चार जिल्ह्यांतील १८ केंद्रांवर होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.

गेल्यावर्षी विद्यापीठाच्या सीईटीचा बोजवारा उडाला होता. या पार्श्वभूमीवर यावर्षी होणाऱ्या सीईटीसाठी प्रशासनाकडून अधिक काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे सीईटी जूनऐवजी एप्रिलमध्येच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज तीन सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दोन हेल्पलाइन सेंटर तयार करण्यात आले आहे. २० एप्रिल ते तीन मे या कालावधीत विविध ६४ विषयांची सीईटी घेण्यात येणार आहे.

मागील वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक परीक्षा केंद्रावर समन्वयक, पर्यवेक्षक देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे. रसायनशास्त्र, संगणकशास्त्र अशा प्रतिसाद असणाऱ्या विषयांची सीईटी तीन मे रोजी होणार असून, या दिवशी सेंटरची संख्या वाढणार आहे, नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची वेळ एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे डॉ. तेजनकर यांनी सांगितले.

\Bनोंदणी केलेले विद्यार्थी\B

जिल्हा...... विद्यार्थी.........केंद्रांची संख्या

औरंगाबाद.....९८१७............०७

उस्मानाबाद...३०१७............०७

बीड............३१०८.............०२

जालना........२१९४.............०२

एकूण..........१८१३६..........१९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुष्याचे नवे पर्व...

$
0
0

नाम फाउंडेशनच्या सहकाऱ्याने जायंटस ग्रुप, भाईश्री फाउंडेशन आणि अॅड. रामेश्वर तोतला यांनी आयोजित केलेल्या सामुदायिक सोहळ्यात बुधवारी अल्पभूधारक व आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील ३२ जोडप्यांचा विवाह झाला. आयुष्याचे नवे पर्व सुरू करताना नववधूंच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.

वृत्त...३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किड्स कार्निव्हल

$
0
0

कार्टून्स, गोष्टी आणि बरेच काही

'मटा'चा किड्स कार्निवल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कार्टून्स हा तर मुलांचा अतिशय आवडीचा विषय असतो. दिवसभर टीव्हीवरचे कार्टून्स बघताना मुले थकत नाहीत, पण हे कार्टून तयार कसे होतात, त्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते, हे जर शिकायचे असेल तर मटा किड्स कार्निवलमध्ये नक्की यायला पाहिजे. असेच कार्टून्स, भरपूर गोष्टी आणि बरेच काही उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मुलांना या कार्निवलमध्ये शिकायला मिळणार आहे.

वर्षभर शाळा, परीक्षांमुळे थकलेल्या मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. या सुट्यांमध्ये काय काय धम्माल करायची याचे प्लानिंग 'मटा'ने मुलांसाठी केले असून त्यातून मुलांना भरपूर आनंद मिळणार आहे. यावर्षीचा किड्स कार्निवल सोमवार, २३ एप्रिलपासून सुरू होत आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्निवलमध्ये मुलांसाठी कार्टून्स तयार करण्यापासून गोष्टी सांगणे, गिटार वाजविणे, हस्ताक्षर कार्यशाळा असे अनेक धमाल उपक्रम घेतले जाणार आहे.

आठवड्याभराचा हा किड्स कार्निवल सिडको एन-७ येथील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे दररोज सकाळी १० ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. २३ एप्रिल रोजी कार्टून्स मेकिंग वर्कशॉप होणार आहे. कार्टून्स कसे तयार करायचे आणि त्यात रंग कसे भरायचे, याचे या कार्यशाळेत मार्गदर्शन लाभणार आहे. २४ एप्रिल रोजी सायन्स स्कूलचा धमाल उपक्रम घेतला जाणार आहे. मुलांची विज्ञानाविषयीची जिज्ञासा यातून पूर्ण केली जाणार आहे. यात हसत-खेळत विज्ञान कसे शिकायचे, याचे मार्गदर्शन लाभणार आहे. विज्ञानाशी संबंधित वेगवेगळे खेळही मुलांना खेळायला मिळतील.

मुलांना गोष्ट ऐकायला फार आवडते. परी, राक्षस, राजा यांच्या गोष्टी म्हणजे मुलांसाठी पर्वणीच असते. पण कथेतून विज्ञानाला अधिक सोपे करणाऱ्या कथा मुलांना २५ एप्रिल रोजी या कार्निवलमध्येही ऐकायला मिळणार आहेत. या कथांमधून मुलांचे मनोरंजन, शिक्षण तर होईलच शिवाय संस्कारही मिळतील. २६ तारखेला हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहेत. सुंदर अक्षर कसे काढावे याबाबत मुलांना सहजसोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाणार आहे. याच दिवशी फेस पेंटिग कार्यशाळाही घेतली जाणार आहे. त्यानंतर २७ एप्रिल रोजी गिटार वादनात मुलांना सहभागी होता येणार आहे.

कार्निवलमधील या विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी नावे नोंदणी करणे आवश्यक आहे. सोमवारपासून सुरू होणारा 'मटा' किड्स कार्निव्हल मुलांसाठी पूर्णत: मोफत आहे. त्यामुळे वर्षभर अभ्यास करून कंटाळलेल्या आपल्या मुलांना या कार्निव्हलसाठी अवश्य पाठवा. दिवसभर टिव्हीसमोर बसणाऱ्या तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावर हा कार्निव्हल झाल्यावर बघा कसे वेगळेच तेज आलेले तुम्हाला जाणवेल. तेव्हा त्वरित तुमच्या पाल्याची नोंदणी पुढील दूरध्वनीवर करा. अधिक माहितीसाठी व नावे नोंदणीसाठी 9822630555 या मोबाइलवर किंवा 0240-6630200 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

असे आहे वेळापत्रक

स्थळ : गरवारे कम्नुनिटी सेंटर, एन-७ सिडको

कार्यक्रमाचे सहप्रायोजक - टेंडर स्माईल प्री स्कूल

वेळ : सकाळी १० ते १२

२३ एप्रिल : कार्टून मेकिंग वर्कशॉप

२४ एप्रिल : सायन्स स्कूल

२५ एप्रिल : स्टोरी टेलिंग

२६ एप्रिल : फेस पेंटिंग

२६ एप्रिल : हस्ताक्षर कार्यशाळा

२७ एप्रिल : गिटार वादन

नोंदणीसाठी संपर्क : 9822630555/0240-6630200

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकनेते बाळासाहेब पवार चरित्रग्रंथाचे शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

सहकार महर्षि, लोकनेते बाळासाहेब पवार यांचे जीवन चरित्र उलगडणाऱ्या 'नीतीधुरंधर' या पुस्तकाचे शनिवारी (२१ एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. या पुस्तकातून बाळासाहेब पवार यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती जनतेसमोर येईल, अशी माहिती चंद्रशेखर राजुरकर, प्रफुल्ल मालानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई. खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. राजुरकर म्हणाले की, बाळासाहेब पवार यांची जडणघडण तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या ग्रंथातून घेण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेस उल्हास उढ्ढाण, मानसिंग पवार, जसवंत सिंह, जितेंद्र देहाडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

……………मराठवाड्याच्या अविकसितपणाची जबाबदारी जनतेची

पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा अभ्यास केला असता, तेथील विकास होण्यामागे तेथील राजकारण्यांवर जनतेचा दबाव हे मूळ कारण आहे. विकास केला नाही तर तेथील जनता त्या राजकारण्यांना धडा शिकविते. मराठवाड्यातील अविकसितपणासाठी आपल्याकडील जनताच जबाबदार आहे, असेही मत राजुरकर यांनी मांडले.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंबेडकरनगर परिसरात राहणाऱ्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह बुधवारी (१८ एप्रिल) जाधववाडी जवळील सनीसेंटर समोरच्या विहिरीत सापडला आहे. राहुल दिलीप बनसोडे (वय २८, रा. गौतमनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, राहुल हा मजुरी काम करत असून, दोन दिवसांपासून बेपत्ता होता. दोन दिवसांपूर्वी तो कामावरून घरी परतला. डबा घरी ठेवल्यानंतर मी आता बाहेरून येतो असे त्याने सांगितले. त्यानंतर मात्र तो घरी परतलेला नव्हता. त्यामुळे कुटुंबियांनी शोध सुरू केला. मित्र परिवार, नातेवाईक आणि परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर कुटुंबियांनी सिडको पोलिस ठाण्यात राहुल बेपत्ता झाल्याची नोंद केली. बुधवारी सकाळी सनीसेंटरमधील विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिकांनी सिडको पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार बी. के. घेटरे घटनास्थळी गेले. स्थानिकांच्या मदतीने त्याला तत्काळ उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. राहुलचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. प्रथम दर्शनी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकरणाचा तपास हवालदार जाधव करीत आहेत. दरम्यान, राहुलच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ लाखांसाठी विवाहितेचा छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी. औरंगाबाद

लग्नात एक कोटीचा हुंडा ठरला. त्यातील चाळीस लाख दिले. उरलेल्या साठ लाखांचा हुंडा मिळावा यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी उत्तरप्रदेशातील यादव परिवारावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे लग्न २०१५मध्ये उत्तरप्रदेशाचील आग्रा येथील विजय आधार चैतन्य यांच्याशी झाले होते. लग्नापूर्वी हुंड्यापोटी एक कोटी रुपये, तसेच एक चारचाकी गाडी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. यातील चाळीस लाख रुपये आणि चारचाकी गाडी हुंड्यात देण्यात आले. उर्वरित पैसे लग्नानंतर दिले जातील, अशा आश्वासनावर लग्न झाले. लग्नानंतर पैसे न मिळाल्याने विवाहितेचा पती आणि त्याच्या परिवारातील सदस्यांनी हुंड्यासाठी छळ सुरू केला. या छळाने कळस गाठला. विवाहितेवर दबाव टाकून पतीने कोर्टात जाऊन घटस्फोट अर्जावर विवाहितेची सही घेतली. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर विवाहितेला घरी ठेवून तिच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आले.

\Bएक कोटी घेतला हुंडा

\Bयादव कुटुंबने लग्नात एक कोटीचा हुंडा घेतला होता. त्यापैकी चाळीस लाख वधूपक्षाने दिले होते. त्यानंतर उरलेल्या ६० लाखांसाठी विवाहितेचा छळ सुरू केला. विवाहितेच्या माहेराकडील नातेवाईक आग्राल्या आल्यानंतर या महिलेची सुटका करण्यात आली. या सुटकेनंतर विवाहितेने पोलिस आयुक्तांना भेटून आपली कथा मांडली. या कथेनंतर छावणी पोलिस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पती विजय आधार चैतन्य (यादव) व अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्तांनी सदर प्रकरण आग्रा पोलिसांकडे वर्ग केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस - मराठवाड्यात अभ्यासगट स्थापन

$
0
0

मराठवाड्यासाठी काँग्रेसचा अभ्यासगट

आमदार अमर राजूरकर समन्वयक, आमदार मधुकरराव चव्हाण, दिलीप देशमुख प्रमुख

Makarand.Kulkarni@timesgroup.com

Tweet@makarandkMT

औरंगाबाद - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यातील सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन त्यादृष्टीने आगामी व्यूहरचना आखण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मराठवाड्यातील नेत्यांचा एक अभ्यासगट नेमण्यात आला आहे. या गटाचे समन्वयक आमदार अमर राजूरकर असतील. गटाच्या अध्यक्षपदी तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण व आमदार दिलीप देशमुख यांच्यावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जबाबदारी सोपविली आहे. गटामध्ये आठही जिल्ह्यांमधील नेत्यांचा समावेश आहे.

प्रदेश काँग्रेसची राज्यस्तरीय आढावा बैठक सोमवारपासून मुंबईत सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यभरातील आमदार, जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित आहेत. तीन दिवसांत राज्यातील ३६ जिल्ह्यांचा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येत आहे. विभागनिहाय स्वतंत्र अभ्यास करून आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखणे, व्यूहरचनेत काय बदल करायचे आहेत, याचे इनपूट मिळविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मराठवाड्याचा स्वतंत्र अभ्यासगट नेमला आहे. गटाचे समन्वयक म्हणून आमदार अमर राजूरकर यांची नियुक्ती केली असून गटाच्या अध्यक्षपदी आमदार मधुकरराव चव्हाण व आमदार दिलीप देशमुख यांची नियुक्ती केली आहे. अभ्यास गटाचे सदस्य म्हणून खासदार राजीव सातव (हिंगोली), माजी खासदार रजनी पाटील, राजकिशोर मोदी (बीड), आमदार बसवराज पाटील मुरूमकर (उस्मानाबाद), माजी आमदार सुरेश वरपूडकर (परभणी), सुरेश जेथलिया (जालना) आणि आमदार अब्दुल सत्तार (औरंगाबाद) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यस्तरीय बैठक बुधवारी संपणार आहे. त्यानंतर अभ्यासगट मराठवाडाभर दौरा करण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधील ज्येष्ठ सदस्य अभ्यासगटात घेऊन अशोक चव्हाण यांनी आगामी निवडणुका काँग्रेस सर्व ताकदीनिशी लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी धरणातून ३१ टीएमसी पाणी चोरी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

एक वर्षापूर्वी जायकवाडी धरणातून ३१ टीएमसी पाणी चोरी प्रकरणी दाखल फौजदारी जनहित याचिकेच्या अनुषंगाने उत्तर दाखल करण्यासाठी शासनाने वेळ मागून घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. संभाजी शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. या याचिकेची सुनावणी ३ मे रोजी होणार आहे.

जायकवाडी धरणातून ३१ टीएमसी पाणी चोरी झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले होते. कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. एकूण पाणी उपशातून एकूण पाणी वापर वजा करता १२८८.९१ दलघमी पाण्याचा हिशेब उपलब्ध नसल्याचे त्यांना कळविण्यात आले. साधारणत: एका वर्षात एकूण पाणी साठ्याच्या २० टक्के पाणी बाष्पीभवनाने उडते. नऊ महिन्यात ४०० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे स्पष्ट झाले. १२८८.९१ मधून ४०० दलघमी पाणी वगळता ८८८.९१ दलमघी (३१ टीएमसी) पाण्याचा हिशेब लागत नाही. या पाण्यावर कोणी दरोडा घातला असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाला तब्बल ९५२४.२३ लाखांवर पाणी सोडावे लागल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे यांची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परभणीत तहसीलदारांच्या दालनात ग्रामस्थांचे विषप्राशन

$
0
0

परभणी:
मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या काही तास आधीच शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील ग्रामस्थांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मानोली गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, २२ बोगस बंधाऱ्यांची चौकशी करावी आणि गावातील इतर गैरव्यवहारांची चौकशी करावी, अशा मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी १० एप्रिलला
तहसीलदारांना दिले होते. या समस्या न सोडवल्यास १९ एप्रिलला सामूहिक आत्महत्येचा इशाराही त्यांनी दिला होता.

आज सकाळी १०.४५ च्या सुमारास हे हे ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाले़. पोलीस प्रशासनाने या ग्रामस्थांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नदेखील केला. त्यामुळे पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापटी सुरू झाली. या झटापटी दरम्यान लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम ,शेख शगिर या चौघांनी विष प्राशन केले. या चारही ग्रामस्थांना तातडीने मानवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चंद्रकांत तळेकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणीत पाठवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींची आयुक्तालयावर धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सरकारने जाहीर केलेले धोरण अन्यायकारी आहे. त्यातील त्रुट्या तातडीने दूर करा, या मागण्यांसाठी मराठवाड्यातील जिल्हा परिषदेत शाळेच्या शिक्षकांनी गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चासाठी शेकडो गुरुंजीनी रणरणत्या उन्हात हजेरी लावली.

शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत क्रांती चौकातून भरदुपारी अडीचच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा परिषद शिक्षक कृती समितीचे निमंत्रक दिलीप ढाकणे, मराठवाडा समन्वयक राजेश पवार, संतोष ताठे, सदानंद माडेवार, श्रीराम बोचरे, महेंद्र बारवाल, मोईन शेख, संतोष जाधव, इल्हाजोद्दिन फारुकी आदी यावेळी उपस्थित होते. सार्वत्रिक बदली प्रक्रियेला आमचा विरोध नाही, पण जाहीर झालेल्या धोरणात बदलीची टक्केवारी निश्चित नाही, सुगम दुर्गम निकष निश्चित नसणे, पती पत्नी एकत्रीकरणाला समान न्याय नसणे यासह अनेक त्रुटी आहेत. बदली धोरण राबविताना या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. अन्यथा शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होईल. याकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले. बदल्यांची खो - खो पद्धत रद्द करा, पती पत्नीला समान न्याय द्या, शिक्षक एकजुटीचा विजय असो आदी घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण मोर्चामार्ग दणाणून सोडला होता. पैठणगेट, गुलमंडी, किलेअर्क मार्गे काढण्यात आलेला मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केले असून तातडीने न्याय मिळाला नाही, तर राज्यातील शिक्षकांचा मुंबईत मोर्चा काढू, असा इशाराही कृती समितीने दिला आहे.

\Bपाणी वाटप

\Bभर उन्हात मोर्चा असल्याने शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय साळकर पाटील यांनी पुढाकार घेत मोर्चामार्गावर जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. जय भगवान महासंघातर्फेही पाणी वाटप करण्यात आले. या सोयीमुळे भर उन्हात मोर्चा काढणाऱ्या शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला.

\Bअशा आहेत मागण्या \B

- बदली पदनिहाय टक्केवारीनुसार करा

- बदली पात्रतेसाठी एकूण सेवा धरू नये

- शाळेतील उपस्थिती दिनांकानुसार बदली करा

- सर्व जिल्ह्यांसाटी एकच निकष निश्चित करा

- दुर्गम गावे घोषित करून, निकष राज्यात असावे.

- बदल्यांची खो - खो पद्धत बंद करण्यात यावी

- संवर्ग दोनमध्ये पती पत्नीला नकाराधिकार द्यावा

- समायोजन व पदोन्नती करूनच बदली प्रक्रिया राबवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरांनो माफ करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आमच्यावर विश्वास ठेवून जनतेने महापालिकेत सत्ता दिली, पण शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यात अपयश आले. या त्रासाबद्दल शहरवासीयांची जाहीर माफी मागतो. येत्या दहा दिवसांत कचऱ्याची समस्या दूर करण्यात येईल,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत औरंगाबादकरांची माफी मागितली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह नगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. सुभेदारी विश्रामगृहात गुरुवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'कचरा इतरत्र टाकता येत नसल्यामुळे शहरात कचरा साचला आहे. कचराकोंडी सुटली नसल्याने जनता त्रास सहन करीत आहे. जनतेला त्रास झाल्याबद्दल मी माफी मागतो. कचऱ्याचा प्रश्न का निर्माण झाला आणि प्रश्न सोडविण्यासाठी उशीर का झाला, असे विचारून राजकारण करायचे नाही, मात्र शहरात कचरा प्रश्न पेटलेला असताना महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली. कचरा प्रश्न सोडविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचीही ऐनवेळी बदली झाली,' असे सांगत ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल उपस्थित होते.

आढावा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना कचऱ्याचा प्रश्न कधीपर्यंत सोडवणार, असा सवाल केला. कचऱ्याची समस्या का निर्माण झाली आणि आतापर्यंतच्या प्रयत्नांची माहिती घोडेले यांनी दिली; तसेच येत्या दहा दिवसांत शहरात कचरा दिसणार नाही, असे सांगितले. 'या शहरावर माझे प्रेम आहे. शहरातील नागरिकांची गैरसोय होणे वाईट आहे. प्रयत्न करा आणि लवकर कचरा निर्मूलन करा,' असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. कचरा हटवण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नाही, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. इंदूर येथील कंपनीशी करार करून काही यंत्रे खरेदी करण्याची गरज असल्याची माहिती ठाकरे यांना अधिकाऱ्यांनी दिली. इंदूर दौरा करून यंत्र खरेदी करा, पण कचरा लवकर दूर करा, असे उद्धव यांनी सुचविले. येत्या २२ एप्रिल रोजी महापालिकेचे पदाधिकारी इंदूरला जाणार आहेत. कचरा प्रश्नामुळे शिवसेनेची राज्यभर नाचक्की झाल्याची चर्चा आढावा बैठकीत झाली.

दरम्यान, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कचरा प्रश्नावर बोलण्यास नकार दिला. 'मी जिल्ह्याचा पालकमंत्री नाही. कचरा प्रश्नावर उपाय सुचवल्यास इथेसुद्धा नाक खुपसतो अशी तक्रार काही लोक करतील,' असे सांगत त्यांनी बोलणे टाळले.

\Bदहा दिवसांची चिंता\B

शहरातील कचरा दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महापौरांना दहा दिवसांची मुदत दिली. दहा दिवसानंतर पुन्हा पाहणीसाठी येईल असे त्यांनी सांगितले. रस्त्यावर तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही असे आश्वासन घोडेले यांनी दिले. दहा दिवसानंतर पुन्हा कचरा दिसल्यास पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, असे ठाकरे यांनी सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. दहा दिवसांच्या 'डेडलाइन'मुळे महापौर व पदाधिकारी चिंताक्रांत आहेत.

\Bमटा भूमिका

उशिरा सुचलेले शहाणपण

\Bमहापालिकेत गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला अखेर कचराप्रश्नी जनतेची माफी मागावी लागली. हे कचराप्रश्न न सोडविण्याचे पाप स्थानिक शिवसेना नेत्यांचेच होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागून एक प्रकारे औरंगाबाद शहरातील शिवसेनेच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. खरे तर ही माफी यापूर्वीच शहराचे आणि पक्षात बढती मिळालेले खासदार चंद्रकांत खैरे यांनीची मागायला हवी होती. काहीही असो, अखेर शिवसेनेला उशिरा शहाणपण सुचले, हेही नसे थोडके. औरंगाबाद खंडपीठात कचराप्रश्नावर पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलेही होते. त्याकडेही दुर्लक्ष झाले. ६२व्या दिवशी औरंगाबाद शहरातील कचराप्रश्न सुटलेला नाही. खंडपीठात औरंगाबाद महापालिकेला तब्बल १९ प्रतिज्ञापत्रे दाखल करावी लागली, तरीही खंडपीठाचे समाधान झालेले नाही. या शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडेही आता उद्धव ठाकरे यांना लक्ष द्यावे लागले. 'समांतर'चे पाणी, भूमिगत गटार योजना या योजनांकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. आदित्य ठाकरे यांनी दर तीन महिन्यांतून एकदा औरंगाबाद पालिकेने केलेल्या विकास कामांचा आढावा घेऊ, असे सांगितले होते, पण हा आढावा गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत केवळ एकदाच घेण्यात आला. पक्षप्रमुखांनी माफी मागणे, ही नामुष्कीच म्हणावी लागेल, आता शिवसेनेला ३० एप्रिलपर्यंत कचराप्रश्न सोडवावाच लागणार आहे. या माफीची जाण पदाधिकाऱ्यांनी ठेवावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील निवासी इमारतीला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी हॉस्पिटलच्या परिसरात असलेल्या शासकीय निवासस्थानातील 'सी-एक' या इमारतीला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वादहा वाजता घडली. या इमारतीमधील दोन घरांना ही आग लागली. आगीची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला व बेगमपुरा पोलिसांना दिली. अग्निशमन दलाच्या चार बंबानी तात्काळ घाटी परिसर गाठला. एका घराची आग अग्निशमन दलाने तात्काळ विझवली, तर दुसऱ्या घराच्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शॉर्टसर्किटमु‌ळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून आर्थीक नुकसान व घरगुती सामान जळाल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’चा आठ कोटी ३० लाखाचा निधी प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशाच्या प्रतिपूर्तीचे आठ कोटी ३० लाख रुपयाचा निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला नुकताच प्राप्‍त झाला आहे. शाळेच्या प्राप्‍त प्रस्तावांनुसार साडेपाच कोटींची बिले वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून, उर्वरित शाळांनी १५ दिवसांत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्ताव निर्धारित वेळेत आले नाही, तर निधी शासनाकडे परत जाईल, अशी शक्यता शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल यांनी दिली.

जिल्ह्यातील खासगी शाळांनी 'आरटीई'अंतर्गत दिलेल्या प्रवेशाचा गेल्या पाच वर्षांपासून प्रतिपूर्ती निधी रखडला होता. हा आकडा आठ कोटींवर होता. जानेवारीमध्ये शाळा आणि संघटनांनी निधी मिळवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. आरटीई प्रवेश प्रक्रियेस सहकार्य न करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रवेश प्रशिक्षण शिबिरात सहभाग न घेणे, आंदोलन करणे, निवेदने देणे, अशा विविध मार्गांनी या संबंधित शाळांनी रोष व्यक्‍त केला.

\B१५ दिवसांची मुदत\B

दरम्यान, प्रतिपूर्तीचे आठ कोटी ३० लाख रुपये जिल्हा परिषद शिक्षण विभागाला नुकतेच प्राप्‍त झाले आहेत. यातील साडेपाच कोटींच्या वितरणाचे नियोजनही करण्यात आले आहे. यात प्रतिपूर्ती निधीसाठी प्रस्ताव, बिलांचे अर्ज प्राप्‍त शाळांचा निधी काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्ताव दाखल न केलेल्या शाळांना आणखी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतरही बिल किंवा प्रस्ताव दाखल न केल्यास उर्वरित निधी शासनाला परत पाठवला जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images