Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मावळत्या सभापतींचा बैठकांचा धडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या स्थायी समितीचे मावळते सभापती गजानन बारवाल यांनी शेवटच्या दिवसात बैठकांचा धडाकाच लावला असून, शुक्रवारी त्यांनी स्थायी समितीची बैठक घेतली. पुन्हा सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. तर रविवारी बारवाल सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

बारवाल यांच्या स्थायी समिती सभापतिपदाची मुदत सोमवारी (३० एप्रिल) सायंकाळी संपत आहे. त्यामुळे शेवटच्या काही दिवसात स्थायी समितीच्या जास्तीत जास्त बैठका घेवून काही महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी बारवाल यांना घाई झाली आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी स्थायी समितीची बैठक घेतली. त्यात महापालिकेची सिडको एन सात येथील शाळा फोर्ज्ब कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. ही शाळा जीर्ण झाली असून ती पडायला आली आहे. शाळा पूर्णपणे पाडून ती नव्याने बांधण्यासाठी फोर्ब्ज कंपनीला देण्याचा ठराव शिक्षण विभागाने ठेवला होता. त्याला मंजुरी देण्यात आली. सभापतिपदाची मुदत संपत असल्यामुळे बारवाल रविवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असताना त्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता बारवाल यांनी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. सुमारे दीड कोटींच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव या बैठकीत आहे. त्याशिवाय काही ऐनवेळेसचे प्रस्ताव प्रशासनातर्फे स्थायी समितीच्या समोर ठेवले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्राईम बातम्या - आठ बातम्या

$
0
0

दोन महिलांचा विनयभंग

औरंगाबाद :

शहरात दोन विविध ठिकाणी दोन महिलांचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्या. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान एक महिला आपल्या आईला स्कुटीवरून घेऊन जात होती. कारमध्ये आलेल्या एका व्यक्तीने महिलेला अडवून तिचा विनयभंग केला. या प्रकरणात या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून मनोज सोपानराव तोंडे (रा. लातूर रोड) या व्यक्तीच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत हैदराबादहून शहरातील विवाह समारंभासाठी एक महिला आपल्या आई-वडिलांसोबत आली होती. हैदराबादच्या परिवाराला २५ एप्रिल रोजी आमार यासिर सईद, आमान यासीर सईद यांनी आपल्या घरी बोलावून घेतले. घरी आलेल्या महिलेच्या अंगाला स्पर्श करून तुमच्या मुलीचा विवाह आमच्यासोबत करून देण्याची मागणी करीत, महिलेला मारहाण केली. या प्रकरणात दोघांविरोधात विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……दुकानाचे पत्रे उचकटून चोरी

हडको भागातील एका दुकानाचे पत्रे उचकटून दुकानात चोरीची घटना घडली. या प्रकरणात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय चोरडिया (रा. श्रीकृष्ण नगर, हडको) यांनी २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान दुकान बंद केले होते. २८ एप्रिल रोजी दुकान उघडण्यासाठी आलेल्या संजय चोरडिया यांना दुकानाचे पत्रे उचकटल्याचे दिसले. आत जाऊन पाहिले असता दुकानातील गल्ल्यात ठेवलेले १३ हजार रुपये चोरीस गेल्याचे लक्षात आले.

………दानपेटीतून २० हजार रुपये लंपास

सातारा भागातील बाबाजी मंदिर येथे २७ एप्रिलच्या रात्री ९ वाजेपासून ते २८ एप्रिल सकाळी ७.१५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराच्या दानपेटीत ठेवलेले २० हजार रुपये चोरल्याची घटना घडली. या प्रकरणात मंदिराचे सचिव ऋषिकेश लोटण पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

………………दुकानातून चॉकलेट पळविले

सूतगिरणी चौक गेटसमोर असलेल्या पानटपरीतून २८ एप्रिल रोजी एक वाजेच्या दरम्यान टपरीचे पत्रे उचकटून दुकानातून चॉकलेटसह ४ हजार ३०० रुपयांची रक्कम चोरल्याची फिर्याद विनोद अंकुश आदमाने यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. ही चोरी अल्पवयीन मुलांनी केल्याचा संशय तक्रारदाराने नोंदविला आहे.

……………मोटारसायकल चोरी

मुकुंदनगर भागात राहणाऱ्या दत्ता रमेश झरेकर यांनी आपली दुचाकी क्रमांक (एमएच २० बीआर ५७२८) ही २६ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता राम नगर भागातील मारोती मंदिराजवळ लावली होती. ते ममता हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना भेटून परत येईपर्यंत ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

………………मोबाइलची चोरी

अंबिकानगर भागात राहणारे महादेव किसन आंधळे यांनी आपला मोबाइल २७ एप्रिल रोजी आपल्या घरी ७ ते ७.१५ वाजेच्या दरम्यान चार्जिंगसाठी लावला होता. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून त्यांचा ८५०० रुपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस.. प्रा. मुनीष शर्मा

प्रेमलबाई मुळे यांचे निधन

$
0
0

प्रेमलबाई मुळे यांचे निधन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील ज्येष्ठ नागरिक प्रेमलबाई श्रीधरराव मुळे-नायगावकर (८६) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (२८ एप्रिल) शांतीनाथ सोसायटी शहानुरवाडी येथे निधन झाले. प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. अविनाश मुळे, अनिल मुळे यांच्या त्या मातोश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रशिक्षण प्रयोगशाळा सहाय्यकांवर अन्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषधनिर्माण कॉलेजांमधील प्रयोगशाळा सहाय्यकांवर तंत्रशिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे. सर्वाचे पदनाम, पदोन्नतीची रचना सुधारल्यानंतरही आमच्यावर अन्यायच का, असा प्रश्न प्रयोगशाळा सहाय्यकांनी तंत्रशिक्षण संचालकांना केला. शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये झालेल्या बैठकीला विभागातील विविध कॉलेजांचे प्रयोगशाळा सहाय्यकांची उपस्थिती होती.

तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्या उपस्थितीत प्रयोगशाळा सहाय्यकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी उपसचिव डॉ. आनंद पवार, सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांची उपस्थिती होती. बैठकीत सुरुवातीपासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांवरच भर दिला. अध्यक्ष डी. जी. पाटील, उपाध्यक्ष बी. के. सरोदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मागण्या मांडल्या. पाचव्या वेतन आयोगानंतर पदोन्नतीबाबतची रचना अद्याप अद्ययावत करण्यात आलेली नाही, तंत्रशिक्षणच्या संस्थांमध्ये काम करत असल्याने पदनाम बदलून तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक म्हणावे. समान काम समान वेतन, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.

संचालक डॉ. वाघ म्हणाले,'काही प्रश्न संचालकांच्या पातळीवरील तात्काळ सोडविण्यात येतील. काही प्रश्नावर कायदेशीर बाजू तपासून प्रश्न निकाली काढले जातील.' यावेळी डॉ. शिवणकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. पी. बी. मुरनाळ, डॉ. व्ही. के. मोर्य, एस. ए. खान, प्रा. आर. पी. चौधरी यांची उपस्थिती होती. मेळावा यशस्वीतेसाठी संघटनेचे डी. एस. कुकडे, डी. एन. आव्हाड, एम. सी. सपाट, विष्णू पंडित, प्रकाश नवघरे, वैशाली कोकणे, अनिल सराफ, आर. आर. शहा, एस. डी. पानगे, राहुल सूर्यवंशी, विजय तुरळकर, योगेश अढांगळे, चंद्रकांत काळे यांनी परिश्रम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवाना ५० सीसीचा; वाहनांचे उत्पादन बंद !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात अठरा वर्षांखालील वाहनधारकांना ५० सीसी वाहन चालवण्याचा परवाना आरटीओकडून दिला जातो. वाहन परवान्यावर तसे स्पष्टपणे लिहलेले असते. मात्र, शहरात ५० सीसीची वाहनेच विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. दुसरीकडे परवान्यावरील अटींचे उल्लंघन करून या वयोगटातील अनेक मुले सर्रास शंभर सीसीपेक्षा जादा क्षमतेची वाहन भन्नाट वेगाने पळवत आहेत.

आरटीओने एक वर्षापूर्वी वाहन परवाना नियमांत बदल केले आहेत. त्यानुसार, अठरा वर्षांखालील उमेदवारांना वाहन परवाना देताना ५० सीसी क्षमतेचे वाहन वापरण्याचा परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या वाहन परवान्यावर तसे स्पष्टपणे नमूद केलेले असते. या नियामाची अंमलबजावणी केली जात आहे. पण, शहरात ५० सीसी क्षमतेची वाहनेच विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. अनेक कंपन्यांनी पन्नास सीसी क्षमतेच्या वाहनांचे उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे पालक पाल्यांना शंभर सीसी किंवा त्यापेक्षा क्षमतेची वाहने वापरण्यास देत आहेत.

……………

\Bविमा मंजुरीस फटका \B

अठरा वर्ष वयोगटातील मुलांचा अपघात झाल्यास अपघात विमा मंजूर होण्यात अडचणी येऊ शकतात. वाहन परवान्यावर ५० सीसी वाहन चालवण्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्याचा विचार अपघात विमा मंजुरीवेळी होतो.

…………………

पालकांना प्रश्न

पुणे आणि हैदराबादमध्ये जास्त क्षमतेच्या दुचाकी चालविणाऱ्या अठरा वर्षे वयोगटातील वाहनचालकांसह त्यांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ५० सीसीची वाहनेच उपलब्ध नसल्याने काय करावे, असा प्रश्न शहरातील पालकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन विभागाचे मुख्यालय नव्हे, तळीरामांचा अड्डा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र शासनाकडून हजारो कोटी रुपये खर्च करून देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र औरंगाबाद शहरातील वन विभागातील विश्रामगृहाचा भाग मात्र तळीरामांचा अड्डा बनलेला आहे.

औरंगाबाद शहरातील वन विभागाच्या मुख्यालयाच्या आवारात विश्रामगृहाच्या परिसरात सरंक्षक भिंतीजवळ विदेशी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. विशेष म्हणजे, वन विभागाचे विश्रामगृह किंवा मोकळ्या जागेवर पार्टी करून बाटल्या फेकल्याचे स्पष्टपणे दिसते, शिवाय या माहितीला वन विभागातील सूत्रांकडून दुजोरा देण्यात आला. कार्यालय स्वच्छतेसाठी वन विभागात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पण, या परिसरातील ही घाण स्वच्छ करण्यात आलेली नाही. याबाबत स्थानिक वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी या बाटल्या आवाराबाहेरून फेकल्या असाव्यात, असा संशय व्यक्त केला. मात्र या बाटल्या विदेशी ब्रॅण्डच्या असल्याचे सांगितल्यानंतर ते निरुत्तर झाले. या बाटल्यामुळे वन विभागाच्या कार्यालयचा परिसार तळीरामांचा अड्डा झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्त प्रभारीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा कारभार अद्यापही प्रभारी पोलिस आयुक्तांकडेच आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकरच शहरासाठी पूर्णवेळ पोलिस आयुक्त देण्याची घोषणा शहरात केली होती. आठवड्याभरानंतरही नवीन पोलिस आयुक्त न मिळाल्याने ही घोषणा हवेत विरल्याची चर्चा पोलिस आयुक्तालयाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

मिटमिटा येथे कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाड्यांना या भागातील रहिवाशांनी रोखले होते. नागरिकांचा विरोध मोडण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरासह लाठीहल्ला केला होता. पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचे प्रकरण विधानसभेतही गाजले. या प्रकरणात विधानसभेतच मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून, या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती. आयुक्तांना रजेवर पाठविल्यानंतर शहराचा कारभार पोलिस महानिरिक्षक मिलिंद भांबरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

शहरात कचऱ्याचा प्रश्न कायम आहे. शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्यांचे प्रवेश त्या भागातील नागरिक नाकारत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कचऱ्यांच्या गाड्यांवर दगडफेकीच्या घटना सुरू आहेत. औरंगाबाद हे संवेदनशील शहर असल्यामुळे या ठिकाणी पूर्णवेळ पोलिस आयुक्त असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शहराला पोलिस आयुक्त देण्याची घोषणा केली होती. आठवड्याभरानंतरही शहरातील पोलिस आयुक्त पदाचा कारभार कोण असेल? याचा निर्णय मुंबईतून झालेला नाही. यामुळे लवकरच पोलिस आयुक्त मिळण्याची घोषणा आतापर्यंत फोल ठरल्याची चर्चा पोलिस आयुक्तालयातील वर्तुळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विंटेज गाड्यांवरील पर्यावरण कराचा भार हलका करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

अनेक जुन्या गाड्यांचा सांभाळ करणारे शहरात अनेक विटेंज वाहन प्रेमी आहेत. विंटेज कारसह विंटेज दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर कमी करण्याची मागणी विंटेज वाहन प्रेमींनी 'मटा'च्या वतीने आयोजित बैठकीत केली.

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरात विंटेज गाड्या असलेल्या वाहन मालकांची बैठक 'मटा' कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत सुरेंद्र सिंग लाला चव्हाण, रूस्तम खान, नवीद अख्तर, तौसिफ मोमीन, सचिन दिवेकर, याह्या खान, मोहम्मद कय्युम, सुनील माहोरा, सुनील गादिया, सागर देवतवाल, सायमल आव्हाड, अभिजीत कुरेकर यांची उपस्थिती होती.

शहरात सध्या १९२९ ची फोर्ड, १९६१ ची फियाट, १९७४ ची लॅण्डरोव्हर, १९७५ ची प्रिमीअर पद्मिनी, १९४०ची शेवरलेट, तसेच बेबी राजदूत, येझदी, बीएसए, लेम्रेटा, बुलेट अशा गाड्या अत्यंत प्रेमाने सांभाळणारे विंटेज प्रेमी आहेत. जुन्या गाड्यांचा वेग मर्यादित असतो, शिवाय या गाड्यांना चांगला अॅव्हरेज नाही. यामुळे क्वचितच या गाड्या रस्त्यावर धावतात. या गाड्यांचा वापर जास्त होत नसल्याने त्यावर लावलेला पर्यावरण कर कमी करण्याची मागणी विंटेज वाहन प्रेमींनी केली.

………जुन्या गाड्या मजबूत

विंटेज कार सांभाळणे ही अत्यंत अवघड बाब आहे. जुन्या गाड्यांना अपघात होत नाहीत. याचा वापरही कमी आहे. म्हणून पर्यावरण कराबाबत शासनाने पुनर्विचार करण्याची गरज आहे.

- सुरेंद्र सिंग लाला चव्हाण

……………………

ओल्ड ईज गोल्ड

एक मे रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने विटेंज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली महाराष्ट्र टाइम्स मुख्य कार्यालय साई स्क्वेअर, उस्मानपुरा येथून निघेल. उस्मानपुरा, नूतन कॉलनी, सिल्लेखाना चौक, निराला बाजार, औरंगपुरा सिग्नलपासून यु टर्न घेत एस. बी. कॉलेज रोड, सतीश पेट्रोल पंप, जालना रोड, आकाशवाणी, रामगिरी हॉटेल, कॅनाट मार्गे, एसबीआय बँक सिग्नल ते प्रोझोन मॉल येथे संपणार आहे. या रॅलीत २० ते २२ विंटेज वाहने सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकट्या २७८ प्रवाशांना दंड

$
0
0

औरंगाबाद : दक्षिण मध्ये रेल्वेच्या तपासणी मोहिमेत रविवारी २६ अनधिकृत फेरीवाले, २७८ विनातिकिट प्रवासी यांच्यावर कारवाई करण्यात आली. या मोहिमेतून दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईवेळी रेल्वे डब्यातील स्वछता, खाद्य पदार्थ, पाणी, त्यांच्या किमती, पाण्याची उपलब्धता, पंखे, लाइट यांची स्थिती तपासण्यात आली. पहाटे पाचपासून नांदेड ते सेलू दरम्यान दोन पॅसेंजर व ११ एक्स्प्रेस रेल्वेमध्ये छापा मारण्याकरिता बसचा वापर करण्यात आला. अनिधकृत फेरीवाल्यांकडून ५८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मोहिमेत सहायक वाणिज्य व्यवस्थापकांसह २४ तिकिट तपाणीसांनी सहभाग नोंदविला़ पाणी, खाद्यपदार्थांची चढ्या भावाने विक्री करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांची माहिती तयार करण्यात आली आहे. ते पुन्हा पदार्थ विकताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावरही पाच हजारांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन हरभरा खरेदीस अल्प प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाफेडमार्फत नऊ एप्रिलपासून हरभरा ऑनलाइन खरेदी करण्यात येत आहे. मात्र या प्रक्रियेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. सोमवारपर्यंत (२३ एप्रिल) फक्‍त ४२ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांच्याकडील २९४ क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.

नाफेडतर्फे ऑनलाइन पद्धतीने खरेदीचा निर्णय घेतल्यानंतर ११ मार्चपासून राज्यभरात ऑनलाइन नोंदणीला सुरवात झाली. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद, खुलताबाद, कन्नड येथेही हरभरा नोंदणी सुरू करण्यात आली. सोमवारपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू असली तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. सध्यातरी नोंदणीवर भर दिला जात असला तरी प्रतिहेक्‍टरी उत्पादकता जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याने नोंदणीला वेग येत नसल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख ४४ हजार ६३५ हेक्‍टर असून, यंदा नऊ लाख सात हजार८० हेक्‍टरवर पेरणी झाली. यंदा अनेक जिल्ह्यांत हरभऱ्यास एकरी चांगला उतारा मिळत असून आधारभूत किंमत प्रती क्विंटल चार हजार ४०० रुपये आहे. खुल्या बाजारात मात्र तीन हजार २०० ते तीन हजार ४०० रुपये दराने व्यापारी हरभरा खरेदी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला जबर मारहाण

$
0
0

औरंगाबाद : रुग्णालयात घेऊन जा, अशी विनंती केल्यानंतर पतीने पत्नीला लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास रोशन गेट येथील रहिवासी मोहम्मद अली फेरोज हुसेन याच्या पत्नीने रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात पतीने पत्नीला मुलांची तीनचाकी सायकलीच्या तुटलेल्या चाकाच्या लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेत पत्नीच्या डाव्या डोळ्याशेजारी जखमी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खूप संधी आहे; स्वप्नं पहायला शिका’

$
0
0

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. निकालात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी यशाची पताका फडकवली आहे. यंदाच्या निकालातही मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या परीक्षेत औरंगाबादच्या \Bडॉ. मोनिका घुगे \Bयांनी यश मिळवले. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉ. मोनिका घुगे यांनी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवून चार वेळा मुलाखतीपर्यंत पोहचल्या पण, त्यांना अपयश आले. पण, शेवटी त्यांनी यश मिळवलेच. हा प्रवास, 'यूपीएससी'त मिळविलेले यश, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मानसिकता याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद.

..

ashish.chawdhary@timesgroup.com

..

\Bनागरी सेवेकडेच वळावे असे का वाटले?\B

-नागरी सेवेकडे वळण्याची प्रेरणा मला शाळेतून मिळाली. मी शारदा मंदिर कन्या प्रशालेची विद्यार्थीनी आहे. शाळेत असताना मोहिनी रसाळ आदी शिक्षिकांनी या क्षेत्राकडे कमी जण जातात, असे सांगितले होते. तुझ्यात ती क्षमता आहे असून त्यासाठी प्रयत्न करण्याबद्दल शाळेतून प्रोत्साहन मिळाले. परंतु, फारसे कोणी मार्गदर्शन करायला नव्हते. कोणी 'आयकॉन'ही नव्हते. त्यातच जीवनात स्थैर्य मिळवण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रम करण्याचे ठरवून तो पूर्ण केला. माझे गुरू भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री त्यांनीही, नागरी सेवा क्षेत्रात मुलींची संख्या कमी असल्याने त्या क्षेत्रात जावे, असे सांगितले. त्यामुळे या क्षेत्रात प्रयत्न करण्याचे निश्चित केले. नियोजन हा माझ्या तयारीचा महत्त्वपूर्ण भाग होता. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिप करतानाय मी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. याच दरम्यान मी, वैद्यकीय कायदा आणि नैतिकता विषयावर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

..

\Bस्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली?\B

-मी स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी खऱ्या अर्थाने २०१२ पासून तयारी सुरू केली. त्यातच २०१३मध्ये अभ्यासक्रम बदलला. त्यावेळी फार अडचण झाली. पुन्हा सगळी तयारी नव्याने केली. अनेकदा दहा, बारा गुणांमुळे मी मागे पडले. चार वेळा मुलाखतीपर्यंत पोहचले. अभ्यास करण्यासाठी दिवसाचे, आठवड्याचे आणि महिन्याचे अभ्यासाचे नियोजन असायचे. महिन्याच्या सुरुवातीला नियोजन करायचे आणि दरारोज आणि आठवड्यात ते पूर्ण झाले का हे पहायचे. आठवड्याचा आढावा झाल्यानंतर जे राहिले ते पुन्हा पुढच्या आवड्यात पूर्ण करायचे. पुणे, दिल्ली येथे प्रशिक्षण घेतले आणि मुलाखतीची तयारी व्हावी या हेतुने काही दिवस औरंगाबादमध्ये 'प्रीआयएस कोचिंग सेंटर'मध्ये विद्यार्थ्यांना शिकवलेही. १६ सप्टेंबर २०१६ रोजी लागलेल्या पूर्वपरीक्षा निकालातील अपयशाने मी खूप नाराज झाले होते. हा माझ्या जीवनातील सर्वात वाईट क्षण. त्याच दिवशी ठरवले की, आजच्या नंतर रडायचे नाही. आपल्या जीवनाची दिशा स्वत:च ठरवायची आणि त्यानंतर पुन्हा मी उभारी घेत हे यश मिळवले.

..

\Bमेडिकल, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचा कल वाढता आहे, याबद्दल काय सांगाल?\B

-यात दोन गोष्टी आहेत असे मी मानते. आम्हाला फार जवळून समाज पहायला मिळतो. विशेषत: गरीब, सर्वसामान्यांचे आरोग्यासह सामाजिक, आर्थिक प्रश्न जवळून अभ्यासण्यास मिळतात. त्यांचे प्रश्न जाणवताना आपण फार हतबलत असल्याचे वाटते. त्यामुळे लोकसेवेची अत्यंत चांगली संधी म्हणून नागरी सेवांकडे पाहतो. सरकारला नाव ठेवणे फार सोपे आहे. परंतु, त्यामध्ये राहून चांगले काम करता आले, तर चांगले यामुळे नागरी सेवांकडे मेडिलक व इंजिनीअरिंगमधील विद्यार्थी वळत आहेत. ते यशस्वी ठरण्यामागे अभ्यासातील सातत्य, मेहनत हे प्रमुख कारण आहे. मेडिकलच्या अभ्यासाचा आवाका मोठा असल्याने नागरी सेवा परीक्षांच्या अभ्यासाचा ताण येत नाही.

..

\Bकुटुंबीयांचे पाठबळ कसे मिळाले?\B

-आमचे मुळ गाव अंबड तालुक्यातील नालेवाडी. माझे कुटूंब उच्चशिक्षित आहे. वडील श्रीधरराव घुगे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. व्यवस्थापनाचे धडे मी वडिलांकडूनच घेतले. आई शारदा यांचे एम. ए., बी, एड्. झाले आहे. डॉ. महेश घुगे भाऊ मेडिकलचे शिक्षण, बहिण आरती घुगे-ढाकणे वैद्यकीय क्षेत्रातच आहे. माझ्या कुटुंबाचे मला सतत प्रोत्साहन मिळाले. प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय ठरवले होते. आई-वडिलांचे पाठबळ, मार्गदर्शन याच्या बळावर आपण हे यश मिळाले. निश्चित केलेले ध्येय गाठताना अडचणी आल्या, परंतु कुटुंबाची मोठी साथ असल्याने त्यावर मात करता आली.

..

\Bमराठवाड्यातील विद्यार्थी, मुलींच्या प्रमाणाबाबत काय सांगाल?\B

-मराठवाड्यातील विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. आपल्या मातीचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे परिस्थितीशी सतत झुंज देणे हा आहे. एकतर आपला दुष्काळग्रस्त भाग. त्यामुळे परिस्थितीशी तोंड द्यावे लागते. हा गुण मला कामी आला. कारण इतके टिकण्यासाठी फार संयम लागतो आणि हा संयम या मातीने दिला आहे. बुद्धीमत्ता आहे पण कुठेतरी कमी पडतो. सामाजिक जाणीव नाही. समाजातून तेवढे प्रोत्साहन नाही मिळत. विशेषत: मुलींच्या बाबतीत. मुलींचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. मी, खूप मुलींचे पाहिले. लग्न एकमेव ध्येय ठरविले जाते आणि त्यांच्या सगळ्या संधी हिरावल्या जातात. माझे म्हणणे आहे, फार कमी हे लोक हे स्वप्न बघतात आणि त्यापेक्षा फार कमी लोक स्वप्न सत्यात उतरवू शकतात. मी, स्वत: पाच वेळा अपयश अनुभवले आहे. संधी आहेत, स्वप्नं पहायला शिकले पाहिजे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेसह शालेय शिक्षण आणि पदवी शिक्षणाकडे लक्ष द्यावे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्याला जोडून तुम्हाला स्वत:चे काही आले पाहिजे. ते शिकण्याकडे लक्ष द्यायला हवे. पुढे मराठवाड्यातील जेवढ्या मुलांना मार्गदर्शन करता येईल तेवढ्यांना मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न असेल. इथे 'शॉटकॉट' नाही, मेहनतीला पर्याय नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंतांचा आज सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यूपीएससी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा ख्वाहीश फाऊंडेशनतर्फे सोमवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोहंमद नूह सिद्दिकी, शेख सलमान पटेल यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मौलाना आझाद रिसर्च सेंटरमध्ये सायंकाळी साडेसात वाजता हा सत्कार सोहळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’चे त्रांगडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मोफत प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. पहिली फेरी पूर्ण होऊन १५ दिवस होत आले आहेत, तरी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. राज्यपातळीवरूनच प्रवेशाच्या नियोजनाचे वेळापत्रक अडकले आहे. पहिल्या फेरीत पात्र ठरूनही एक हजार २५६ प्रवेश बाद ठरले यात सर्वाधिक एक हजार २९ पालक शाळांपर्यंत पोचले नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

मोफत प्रवेशाच्या प्रक्रियेत १३ मार्च रोजी सोडत झाली. सोडतीनंतर १४ मार्चपासून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया १४ एप्रिलपर्यंत चालली. पहिल्या फेरीत शाळांनी प्रवेश नाकारल्याच्या लेखी तक्रारी अनेकांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत. फेरीत प्रवेश घेतला नाहीतर हे विद्यार्थी प्रक्रियेतून बाद ठरतात. अशावेळी बाद झालेल्यांना प्रवेशाचे काय, हा प्रश्न समोर असताना. दुसऱ्या फेरीचे नियोजनही १५ दिवस होत आले तरी, झालेले नाही. यामुळे पालक संभ्रमात आहे. अनेक पालक शिक्षण विभागाच्या 'आरटीई' कक्षाकडे वेळापत्रक कधी अशाप्रकारची चौकशी करत आहेत. औरंगाबादमध्ये पहिल्या फेरीत तीन हजार ३५४ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार ९८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. त्यात दीडशे विद्यार्थ्यांचे प्रवेश अपात्र ठरविण्यात आले. कागदपत्रातील त्रुटींमुळे हे प्रवेश बाद ठरविण्यात आल्याचे 'आरटीई' कक्षाकडून सांगण्यात आले. यात यंदा पात्र ठरूनही एक हजार २९ विद्यार्थ्यांनी शाळेत संपर्क साधलेला नाही.

\Bराज्यपातळीवरच अडचणी\B

मोफत प्रवेशाचा राज्यपातळीवर प्रवेशाची टक्केवारी ७० टक्क्यांच्या आत आहे; तसेच अनेक शाळांनी शुल्क परताव्याबाबत राज्य शासनाच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले. पात्र होऊनही प्रवेश न मिळाल्याने या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे. त्यामुळे राज्य पातळीवर वेळापत्रकाचे नियोजन रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रक्रियेचे वेळापत्रक ठरविताना एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाने नियोजन केले होते. प्रत्यक्षात यंदाही प्रक्रियेला विलंब झाला आहे.

\B'अॅटो रजिस्टर'मुळे नियोजन बिघडले\B

शाळांनी प्रवेशावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे शाळांची ऑनलाइन नोंदणी शिक्षण विभागाने स्वत: करून घेतील. मुख्याध्यापकांचे आयडी-पासवर्ड वापरत या नोंदी केल्या होत्या. त्यामध्ये मागील वर्षीच्या प्रवेशाची संख्याच जशाच तशी आली. अनेक ठिकाणी बदल झाले. प्रत्यक्षात ते बदलाच्या नोंदी न ठेवल्याने प्रत्यक्ष प्रवेशात अडचणी आल्या. यामध्ये अनेक शाळांनी प्रवेश नाकारले. हे प्रवेश पूर्ण होईपर्यंत पुढची फेरी न घेण्याचा 'आरटीई' कक्षाने स्पष्ट केले. त्यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवर हे प्रकरण प्रलंबित असल्याने सगळी फेरी रखडली आहे.

\Bऔरंगाबादमधील स्थिती\B

शाळा… : ५६६

जागा…… : ६४०२

पात्र……… : ३३५४

प्रवेश :… २०९८

प्रवेश न झालेली संख्या :…… १२५६

दुसऱ्या फेरीबाबत मार्गदर्शन मागविले आहे. शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना न आल्याने फेरीचे नियोजन झालेले नाही. हे मार्गदर्शन लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

- संगीता साळवे, आरटीई कक्षप्रमुख, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसपीआय ६० जागांसाठी आठ हजार विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा रविवारी घेण्यात आली. औरंगाबादमध्ये दोन केंद्रासह राज्यात नागपूर, कोल्हापूर आणि पुणे केंद्रावरून परीक्षा घेण्यात आली. आठ हजार १०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून गुणवत्तायादीनुसार ३०० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतात. संस्थेतील एका जागेसाठी १३५ विद्यार्थी रांगेत असे चित्र आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीत (एनडीए) प्रवेशासाठी तयारी करून घेणारी एसपीआय राज्यातील एकमेव संस्था आहे. संस्थेत २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झाली. विविध ठिकाणी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षार्थींना प्रवेशपूर्व परीक्षा देता येते. मागील वर्षीपासून राज्यातील इतर शहरांमध्येही परीक्षा घेण्यात येते. औरंगाबादसह नागपूर, कोल्हापूर, पुणे शहरांत आज परीक्षा घेण्यात आली. सकाळी नऊ ते दुपारी एक यादरम्यान झालेल्या परीक्षेत दोन पेपर झाले. पहिला पेपर गणित, दुसरा पेपर जनरल अॅबिलिटी विषयांचा होता. एक पेपर ७५ गुणांसाठी आहे. चार केंद्राहून आठ हजार १०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. औरंगाबादमध्ये मौलाना आझाद आणि गोदावरी हायस्कूल केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी पालकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

\Bमुलाखतीची प्रतीक्षा\B

लेखी परीक्षा झाली आता विद्यार्थी, पालकांना निकालाची प्रतीक्षा आहे. लेखी परीक्षेत ५० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी उत्तीर्ण ठरतात. विद्यार्थ्यांची मेरिटनुसार गुणवत्ता यादी जाहीर करून फक्त पहिल्या ३०० विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते. ही प्रक्रिया ही अतिशय खडतर अशी असते. सैनदलातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मुलाखती होतात यातून केवळ साठ विद्यार्थी पात्र ठरतात. मुलाखत औरंगाबाद आणि पुणे अशा दोन शहरांत होणार आहेत. अशी माहिती संचालक उदय पोळ यांनी 'मटा'ला दिली.

\Bविद्यार्थी संखेत वाढ\B

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेशासाठीची तयारी करून घेणाऱ्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत दहावीनंतर अकरावी, बारावी अशा दोन वर्षांसाठी प्रवेश दिला जातो. ६० जागांसाठी दरवर्षी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. यंदा राज्यभरातून आठ हजार १०० विद्यार्थी बसले. मागील वर्षी सात हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी एका जागेसाठी १३५ विद्यार्थी रांगेत असे चित्र आहे.

शहरात परीक्षा केंद्र : …२

विद्यार्थी संख्या……… : ३५००

कोल्हापूर : १८००

पुणे……………… : १४००

नागपूर : ……………१४००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीच्या आखाड्यात कुस्त्यांची ‘दंगल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र दिनानिमित्त टाइम्स ग्रुपच्या पुढाकाराने चार दिवसीय 'गर्जा महाराष्ट्' सोहळ्याला शनिवारपासून थाटात प्रारंभ झाला. या सोहळ्यात प्रोझोन मॉलमध्ये कुस्तीच्या 'दंगल'ची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मॉलमध्ये खरेदी व मनोरंजनासाठी आलेल्या हजारो औरंगाबादकरांनी पारंपरिक कुस्तीचा आनंद घेत खेळाडूंच्या प्रत्येक डावपेचाला टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने आयोजित 'गर्जा महाराष्ट्र' सोहळ्याला प्रोझोन मॉल, मॅजिस्टिक लँडमार्क्स, हिरण्य रिसॉर्ट्स, लिटिल एंजल्स स्कूल, आयसीडी, मृदुला टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हेअर स्टुडियोचे सहकार्य लाभत आहे. प्रोझोनमध्ये शनिवारी सायंकाळी मॅटवरील कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी बेगमपुरा येथील श्री हनुमान व्यायामशाळेचे कुस्तीपटू सहभागी झाले होते. पारंपरिक खेळ म्हणून मानल्या जाणाऱ्या कुस्तीचे फड शहरवासीयांना सहजपणे पहायला मिळत नसल्याने 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुढाकाराने मॉलमध्ये कुस्त्यांची 'दंगल' ठेवण्यात आली होती. या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक प्रा. डॉ. हंसराज डोंगरे यांच्या मार्गदर्शनात खेळाडूंनी कुस्तीचे विविध डावपेच सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आखाड्यातील कुस्तीचा आनंद चक्क मॉलमध्ये मिळाल्याने दर्शक खूश होते. प्रत्येक डावपेचावेळी दर्शकांनी टाळ्या वाजवून खेळाडुंचा उत्साह वाढवला. कुस्तीच्या मॅटवर केवळ मुलांनीच नव्हे, तर मुलींनी देखील प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेतील एकेरी पट, दुहेरी पट, लपेट, कलाजंग, ढाक, मोळी, आतील व बाहेरील टांग, गदालोट, एकचाक, भारंदाज, मोळी, धोबीपछाड, निकाल हे कुस्तीतंत्र लक्षणीय ठरले. यावेळी निकिता मांजरमकर यांनी सूत्रसंचलन केले.

कुस्ती हा भारतीय खेळ आहे. त्यामुळे विदेशी खेळाकडे आकृष्ट न होता कुस्ती या खेळाचे जतन होणे आवश्यक आहे. या खेळाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी अधून-मधून असे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि प्रोझोन मॉल यांनी घेतलेल्या पुढाकाराने त्यांचे आभार. कुठलाही खेळ असो त्याची वृद्धी व्हायलाच हवी. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक खेळ रुजविले गेले पाहिजे. यासाठी प्रत्येक शाळेत एक क्रीडा प्रशिक्षक असणे आवश्यक आहे. याठिकाणी औरंगाबादकरांनी आम्हाला भरभरून दाद दिली.

-प्रा. डॉ. हंसराज डोंगरे, प्रशिक्षक, श्री हनुमान व्यायाम केंद्र, बेगमपुरा

कुस्ती माझा आवडता खेळ असून घरामध्ये आजोबांपासून सर्वांना कुस्तीची आवड होती. त्यामुळे मी सुद्धा कुस्तीकडे वळालो. आशियायी खेळामध्ये कुस्तीसाठी गोल्ड मेडल मिळवायचे माझे स्वप्न आहे.

-संदीप डोंगरे, कुस्तीपटू

मी चार वर्षांपासून कुस्ती खेळत आहे. आता हेच माझे करिअर असणार आहे. हा खेळ शरीर पिळदार आणि लवचिक बनवतो. त्यामुळे मला या खेळाची आवड आहे. देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळून मेडल मिळवण्याची माझी इच्छा आहे.

-प्रवीण दसपुते, कुस्तीपटू

अगदी सुरुवातीपासूनच आयुष्यात करिअर म्हणून मी कुस्तीकडे पाहतो. सहा वर्षांपासून मी कुस्ती खेळत आहे. 'महाराष्ट्र केसरी' हा बहुमान मिळावा असे माझे ध्येय आहे.

-संदेश डोंगरे, कुस्तीपटू

मी कुस्तीत करिअर करावे अशी माझ्या वडिलांची इच्छा असून त्यासाठी भरपूर मेहनत घेत आहे. महाराष्ट्र केसरीचा बहुमान मला मिळावा यासाठी मी परिश्रम घेईल.

-चरण मेगावाले, कुस्तीपटू

कुस्ती हा माझा आवडता खेळ तर आहेच शिवाय मला पहेलवान व्हायचे आणि खूप रेकॉर्ड मोडून पुढे जायचे आहेत. मला घरातूनही कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

-दर्शन बागवले,कुस्तीपटू

मी मागील सात वर्षांपासून मी कुस्ती खेळत आहे. सुरुवातीला मला कुस्तीचा छंद होता पण आता भविष्यातही कुस्तीमध्येच करिअर करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवायचे माझे स्वप्न आहे.

-सौरभ राऊत, कुस्तीपटू

एक आवड म्हणून नाही, तर जिद्द म्हणून कुस्तीकडे वळले. आई-वडील दोघेही सहकार्य करतात. भरपूर मेहनत घेऊन देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून मेडल्स आणण्याचे माझे ध्येय आहे.

-कोमल पवार, कुस्तीपटू

मला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. आमच्या प्रशिक्षकामुळे आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मागील तीन वर्षांपासून कुस्ती खेळत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल जिंकण्याचे स्वप्न आहे.

-आमरीन सय्यद, कुस्तीपटू

--

'महाराष्ट्र टाइम्स'ने घेतलेल्या 'गर्जा महाराष्ट्र' सोहळ्यात ठेवलेल्या कुस्तीच्या प्रात्यक्षिकांमुळे नव्या पिढीला या खेळाप्रती अप्रूप वाटेल असे मला वाटते. आम्ही मित्रपरिवाराने या सोहळ्याचा आनंद घेतला.

- इंद्रजीत देशमुख (दर्शक)

खूप आनंद वाटला कारण प्रत्यक्षात कुस्तीचे सामने पहायला भेटले. 'दंगल' चित्रपटाने कुस्ती खेळासाठी जागरूकता आणण्याचे काम केले असले तरी प्रत्यक्षात असे प्रात्यक्षिके पाहून आनंद झाला. 'महाराष्ट्र टाइम्स' नेहमीच पारंपरिक खेळ, कार्यक्रमांना प्राधान्य देत आला आहे.

-पवनकुमार भोवरे (दर्शक)

प्रोझोनमध्ये खरेदी करण्यासाठी आलो होतो. परंतु 'महाराष्ट्र टाइम्स'ने ठेवलेल्या 'गर्जा महाराष्ट्र' कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद वाटतो. लहान मुलांमध्ये कुस्ती खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी चक्क मॉलमध्ये कुस्तीची 'दंगल' दाखवून सर्वांना आनंदित केले. विशेषतः त्यामधील मुलींची कुस्ती पाहून खरच खूप छान वाटले. मुली स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतात हे त्यांनी दाखवून दिला.

-कपिल कदम (दर्शक)

महाराष्ट्राच्या मातीतला खेळ म्हणजे कुस्ती. परंतु कुस्ती ही टीव्हीवर आणि चित्रपटामध्ये पहायला मिळते. प्रोझोनमध्ये प्रत्यक्ष कुस्तीचे सामने पाहून तळागाळात तिचे अस्तित्व असल्याची जाणीव झाली.

-समीर तडवी (दर्शक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षपदी सुवर्णा सिसोदिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जैन सोशल ग्रुप औरंगाबादच्या अध्यक्षपदी सुवर्णा सिसोदिया आणि सचिवपदी रुपाली भंडारी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत कटके, सहसचिव सुदर्शना रुणवाल, रुपाली फुरसुले, कोषाध्यक्षपदी सुहास कोठारी, तर सहकोषाध्यक्षपदी महावीर मेहता यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून संगीता ओस्तवाल यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष संदीप भंडारी यांनी त्यांचा पदभार नवनिर्वाचीत अध्यक्ष सिसोदिया यांना सोपवला. जैन ग्रुपच्या कार्यकारिणी सदस्यपदी अनिल ठोळे, मनीष बुनलिया, पृथ्वीराज शहा, रवींद्र सेठिया, दिलीप बेदमुथा, पारस चोरडिया, राजेंद्र पगारिया, संदीप जैन, स्वाती मल्हारा, मधू संचेती, साधना शहा आदी यांना शुभेच्छा देऊन शपथविधी दिली. मनीष बुनलिया व सुदर्शना रुणवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज महास्वच्छता अभियान

$
0
0

औरंगाबाद: 'कायम शहराच्या हितार्थ' या उद्देशाने औरंगाबाद कनेक्ट टीमची स्थापना करण्यात आली. त्या टीमने सोमवारी सकाळी सात वाजता शहरात महास्वच्छता अभियान राबवण्याचे ठरवले आहे. प्रत्येक झोन, वार्डात मनपा कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनी एकत्र यावे व शहराप्रति बांधिलकी दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिपीक कार्यशाळा ५ मे रोजी

$
0
0

औरंगाबाद: माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनातर्फे ५ मे रोजी माध्यमिक शाळेतील लिपिकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमधील लिपिकांची कार्यशाळा असणार आहे. टीव्ही सेंटर परिसरातील मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात सकाळी दहा वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. प्रशासकीय कामकाज मार्गदर्शन, आपले कार्यालय व लिपिकांचे कर्तव्य, सेवापुस्तिका, रजा, वेतन निश्चिती, वेतनेतर अनुदान आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>