Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तामिळनाडूचे शिष्टमंडळ आज पालिकेत येणार

$
0
0

औरंगाबाद: शहरात निर्माण झालेला तीव्र पाणीप्रश्न व त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सूचवण्यासाठी तामिळनाडू राज्यातील तज्ज्ञांचे पथक मंगळवारी महापालिकेत येणार आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी या पथकाला पाचारण केले आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त अधिकारी दशसहस्त्रे हे देखील येणार आहेत. हे पथक पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून उपाययोजना सूचविण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टँकरचालकाला सिडकोत मारहाण

$
0
0

औरंगाबाद: सिडको एन ७ येथील जलकुंभाच्या परिसरात टँकरचालकाला काही जणांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. एन ७ येथील जलकुंभातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणाहून टँकर भरून ते विविध भागात पाठवले जातात. टँकर भरले जात असताना मुलांचे एक टोळके तेथे दाखल झाले व त्यांनी टँकर चालकाला मारहाण केली. आमच्याकडे पाच-सहा दिवसांपासून पाणी नाही आणि तुम्ही टँकर इतरत्र कसे घेवून जाता, असा जाब त्यांनी टँकर चालकांना विचारला. या प्रकरामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा एक तास बंद पडली. अधिकाऱ्यांनी जलकुंभावर धाव घेतली व त्या टोळक्याची समजूत काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान वाढताच विजेच्या मागणीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात उन्हाचा पारा वाढल्याने विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान, शहरातील विजेची मागणी २१७ मेगा युनिटपर्यंत पोहोचल्याची माहिती महावितरणमधून देण्यात आली.

शहरात उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. गेल्या सहा ते आठ दिवसांत ४० अंश सेल्सीयसपेक्षा जास्त तापमान नोंदले गेले. २८ मे रोजी शहराचे तापमान ४२.६ अंश सेल्सीयस नोंदवले गेले. त्यामुळे शहरात कुलर आणि वातानुकूलित यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विजेचा वापर जास्त होत असल्याने मागणीत वाढ झाली आहे. औरंगाबाद शहरात दोन लाख ८० हजार वीजग्राहक आहेत. शहरातील वीज ग्राहकांकडून मे महिन्यात सुरुवातीला २०१ ते २०५ मेगा युनिटपर्यंत मागणी होती. मागील काही दिवसांत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ही मागणी थेट २१७.६० मेगा युनिटपर्यंत पोहोचली. औरंगाबाद परिमंडळात ही मागणी ७४२. ९७ मेगा युनिट आहे. राज्यात विजेची मागणी २० हजार ७४६ मेगायुनिट नोंदवली गेल्याचे सांगण्यात आले. मागणीनुसार वीजपुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

रमजानमध्ये अखंडित वीज

रमजान महिन्यात अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास, आपातकालीन परिस्थितीत नियंत्रण कक्ष मोबाइल क्रमांक ७८७५७५६६५२/०२४०-२३४३१२४ तसेच शहर विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता यांचा मोबाइल क्रमांक ७०६६०४२४४४, औरंगाबाद शहर विभाग क्रमांक कार्यकारी अभियंता ७०६६०४२४४५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापारेषणचा घोळ कायम

हर्सूल येथील १२० केव्ही फिडरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने काही दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा खंडित होत होता. हे फिडर दुरुस्त करण्यासाठी शुक्रवारी खंड घेण्यात आला. त्यानंतरही समस्या सुटलेली नाही. पाचव्या दिवशी नवीन फिडर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती महावितरणमधून देण्यात आली.

शहरातील वीज ग्राहक

२ लाख ८० हजार

..

विजेची मागणी

..

२१७.६० मेगा युनिट

औरंगाबाद शहर

७४२. ९७ मेगा युनिट

औरंगाबाद परिमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लिपकार्टवर मागवल्या १२ तलवारी, १३ चाकू

$
0
0

औरंगाबाद: गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुकुंदवाडी व नागेश्वरवाडी येथे काल रात्री टाकलेल्या छाप्यात १२ तलवारी व १३ चाकूंसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यात गुप्ती, कुकरीचाही समावेश असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ही शस्त्रे फ्लिपकार्टवरून ऑनलाइन मागवली होती. इंस्टाकार्ट सर्विसेस प्रा. लिमिटेड या कुरियर सेवेमार्फत ती त्यांच्याकडं पोहोचवण्यात आली. पंजाबमधील अमृतसर येथून ही शस्त्रं पाठवण्यात आली होती. कुरियर कंपनीच्या नागेश्वरवाडी आणि जयभवानी नगर येथील कार्यालयावर छापा टाकून ती ताब्यात घेण्यात आली. ही शस्त्रास्त्रे नेमकी कशासाठी मागवण्यात आली होती, याची चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळ पीक विमा योजना

$
0
0

औरंगाबाद: प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळ पीकविमा योजना २०१८च्या मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू या फळ पिकांना लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना राज्यात १९८ तालुक्यात १४९३ महसूल मंडळात लागू करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ११२ महसुली मंडळात फळ पीकधारकांना याचा लाभ घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्यात वाढती महागाई, कुपोषण, महिलांची सुरक्षितता आणि आरोग्याची गंभीर‌ स्थिती झाली आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस येणाऱ्या काळात आक्रमक भूमिका मांडेल. यासाठी खेडोपाडी बुथस्तरावर महिला राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी करून नेटवर्किंग मजबूत करू,' असा निर्धार राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंगळवारी (२९ मे) व्यक्त केला.

सिडको येथे फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथी कॉलेजमध्ये वाघ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसची मराठवाडा विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना वाघ म्हणाल्या, 'पक्षाच्या महिला संघटनेकडून आतापर्यंत सरकारला वेळोवेळी धारेवर धरण्यासाठी राज्यभरात आंदोलने करण्यात आली. मात्र, आता लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. यामुळे प्रत्येक विभागामध्ये महिला आघाडीची काय तयारी आहे, याचा आढावा घेण्यात येत असून मराठवाड्याची ही आढावा बैठक त्याचाच एक भाग आहे. आतापर्यंत राज्यभरात महागाईविरोधात, सॅनटरी पॅड जीएसटीतून वगळ्यासाठी महिला आघाडीतर्फे मोठ्याप्रमाणावर आंदोलन करण्यात आले. आज राज्याची आरोग्यसेवा व्हॅन्टिलेटरवर आहे. महिला सुरक्षिततेचा केवळ नारा देण्यात येतो. मनोर्धर्य सारखी योजनेतील मदत दहा लाखापर्यंत वाढवली. मात्र या योजनेत अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे हजारो महिला पुनर्वसनापासून वंचित राहिल्या. मुख्यमंत्र्याकडे गृहखाते आहे, तर अन्य दोन गृह राज्यमंत्री आहेत. ते कोणतीही ठोस भूमिका मांडत नसल्यामुळे राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. येणाऱ्या काळात आरोग्य, महिला सुरक्षा यासह कुपोषणमुक्ती, रिक्तपदभरती आदी विविध मुद्द्यांवर आम्ही आक्रमकपणे भूमिका मांडणार आहोत,' असे वाघ म्हणाल्या. पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अनुपमा पाथ्रीकर यांचीही उपस्थिती होती.

आतापर्यंत आम्ही अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, कल्याण, डोबिंवली येथे आढावा घेतला. ३० मे नवी मुंबई आणि रत्नागिरीला बैठक घेणार आहोत. सर्वसामान्य जनतेत सरकारविरोधात असंतोष आहे. सरकारला पर्याय म्हणून महिला राष्ट्रवादीकडे पाहते आहेत. त्यांना यापक्षाकडून अपेक्षा असून, या अपेक्षा पूर्ण करू.

- चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण डाक सेवक संप अधिक तीव्र करणार

$
0
0

औरंगाबाद: कमलेश चंद्र यांच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात या मुख्य मागणीसाठी ग्रामीण डाक सेवकांचा देशव्यापी संपाला मंगळवारी आठ दिवस पूर्ण झाले. पोस्ट विभागातील भारतीय मजदूर संघाच्या सदस्यांनी एक दिवस कामबंद आंदोलन करून पाठिंबा दिला. दरम्यान,सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संपाला भारतीय टपाल कर्मचारी संघटना, भारतीय डाक कर्मचारी संघ, भारतीय मजदूर संघ, एनएफटीई या संघटनांनी पाठिंबा दिला. मंगळवारी मुख्य टपाल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर प्रवर डाक अधीक्षक अनंत रसाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नईम शेख, श्रीपाद कुटासकर, प्रकाश कुलकर्णी, रणजित चव्हाण, शकील शेख, राजेंद्र खरे, अनिल वारुळे, प्रमोद होळे, देवेंद्र् परदेशी,अण्णा बुजाडे, टी. एन.साळवे,शेख जमील अण्णा दराडे, सुदाम चौरे, सागर गोरे, सागर चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिसार नियंत्रणाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झिंकच्या कमतरतेने होणाऱ्या अतिसाराला नियंत्रित करण्यासाठी पाच वर्षांखालील बालकांना दिनांक २८ मेपासून नऊ जूनपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवड्यांतर्गत 'ओआरएस'च्या पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या अतिसार नियंत्रण पंधरवडा बैठकीत चौधरी बोलत होते. सर्व अंगणवाड्यांमध्ये अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविताना पोस्टर्स, बॅनर्स लावावेत. प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ओआरएस व झिंक कोपरा स्थापन करावा. सर्व लाभार्थ्यांना हात धुण्याची प्रात्यक्षिके दाखवून हातांच्या स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करावे. अतिसार आढळल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. अंगणवाडी केंद्रात ओआरएस तयार करण्याची पद्धत व त्याचे महत्त्व महिला व बालकल्याण विभागाच्या सहभागाने पार पाडावे, सर्व शाळांमध्येही कार्यवाही शिक्षण विभागाने पार पाडावी व प्रत्येक शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढावी, अशा सूचना जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टेपिंग स्टोन हायस्कूल

$
0
0

स्टेपिंग स्टोन हायस्कूल

फरिहा खान

९६.४

रिया करवनकर

९६.२

समृद्धी नाईकवाडे

९५.८

खलिद समी कादरी

९४.६

वरुन ओसवाल

९४.६

पार्थ जाजु

९४.४

वैभवी साहुत्रे

९४

कुलसुम खान

९४.२

सिद्ध जैन

९३.८

कुणाल झवर

९३.८

सानिका कपुर

९३.६

विशाखा तुंगर

९३.६

एश्वर्या पवार

९३.६

कुशफ जाफरी

९३.६

साक्षी कोऱ्हाळे

९३.२

विनीत जाधव

९३

आर्यन कुलकर्णी

९३

यश पांडे

९२.२

मैत्री उपाध्याय

९२.२

तेजस वैष्णव

९१.८

नेहा बापट

९१.८

एहतेशाम शेख

९१.४

उमर फारुकी

९१.२

प्रथम नाथनी

९१

श्रृती देशमुख

९०.८

आदिती माळवतकर

९०.४

शिवम यादम

९०

मिथिलेष पटेल

९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लोव्हर डेल स्कूल

स्कॉलर्स व्हॅली स्कूल

प्राणिसंग्रहालय सुरू ठेवण्यासाठी धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द होणार असल्याची धास्ती महापालिकेने घेतली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्राणिसंग्रहालय संचालकांना मास्टर प्लॅनची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाच्या परवानगीचे २०१३ पासून नुतनीकरण केलेले नाही. परवान्याचे नुतनीकरण न करता प्राधिकरणाने पालिकेला निर्वाणीचा इशारा देणाऱ्या नोटीस बजावल्या. त्यावर २४ मे रोजी दिल्ली येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात सुनावणी झाली. ही सुनावणी महापालिकेच्या दृष्टीने हितकारक झाली नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे प्राणिसंग्रहालय परवान्याचे नुतनीकरण संकटात सापडल्याचे मानले जात आहे.

महापौर घोडेले यांनी मंगळवारी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यासोबत चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. प्राणिसंग्रहालयाच्या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्याचे आदेश डॉ. नाईकवाडे यांना दिल्याचे महापौरांनी सांगितले. प्राणिसंग्रहालयातील वाहतूक उद्यान तातडीने हटविले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. प्राणिसंग्रहालयाच्या परवान्याचे नुतनीकरण होईल, असे गृहीत धरून मास्टर प्लॅननुसार काम केले जाईल. या कामासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी तीस कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी साठ टक्के खर्च केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. उर्वरित खर्च राज्य शासन व महापालिका यांना प्रत्येकी वीस टक्के याप्रमाणे करावा लागणार आहे.

\Bखासदारांना साकडे

\B

दरम्यान, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. नाईकवाडे यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना पत्र दिले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या प्राणिसंग्रहालयाचा २०१४ ते २०२४ पर्यंतचा मास्टर प्लॅन तयार असून त्याला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्याच्या अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाकडून निधी मिळावा, परवानगी रद्द होऊ नये, नूतनीकरण व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करून पालिकेला मदत करावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते, विश्रामगृह कामास मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाजार समिती येथील भाजीमंडईत रस्त्यांचे काँक्रेटीकरण, बाजार ओट्यावर प्रीकोटेड शेड आणि विश्रामगृह बांधकाम आदी कामांच्या निविदा काढण्यास कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. या प्रस्तावित कामांवर तीन कोटी १० लाख रुपये खर्च होणार आहे.

संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीत वीस हजार चौरस फुट जागेवर शीतकरणगृह उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याला माजी सभापती संजय औताडे यांनी विरोध केला. उपसभापती रामचंद्र ठोंबरे, रघुनाथ काळे, श्रीराम शळके, शिवाजी वाघ, दामोधर नवपुते, दायमा, नारायण मते, संजय औताडे, बाळासाहेब मुगदल, गणेश दहिंहंडे, देविदास किर्तीशाही आदी बैठकीला उपस्थित होते. 'पिसादेवी रोडवरील व्यापारी संकुलाच्या जागेवर २००१ मध्ये दिवाणी न्यायालयाने स्टे आणला असतानाही गाळे विकण्यात येत आहेत,' असा आरोप माजी सभापती औताडे यांनी केला. करमाड येथील व्यापारी संकुलाची जागा साडेसात एकर असून ती केवळ साडेतीन एकर असल्याचे दाखवण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी निकालात औरंगाबादचे यश

$
0
0

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या मंगळवारी लागलेल्या निकालात औरंगाबादमधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. गुणवत्ता यादीत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. औरंगाबादमधून ईषिका खंडेलवाल आणि वरद मनियार यांनी ९८.२ टक्के गुण मिळवित यश मिळविले. मंडळातर्फे १ मार्च ते २५ मार्च दरम्यान ही परीक्षा झाली होती. औरंगाबादमधून अकरा शाळांमधून दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. यंदा गुणदानसाठी सीजीपीए पद्धत बंद करण्यात आली. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शाळांमध्ये ही विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती.

- फोटो : आतील पानांमध्ये...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान अपघात टळला; ९३ प्रवाशांचे वाचले प्राण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबईला मंगळवारी सकाळी जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात इंजिन बंद पडून बिघाड झाल्याने होणारा मोठा अपघात वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळला आणि तब्बल ९३ प्रवाशांचे जीव वाचले.

जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यू ३५५ या विमानात मुंबईला जाण्यासाठी राज्याचे अतिरिक्त सचिव संजय कुमार, खासदार रावसाहेब दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, आमदार नारायण कुचे, विकास जैन यांच्यासह एकूण ९३ प्रवासी बसले होते. विमान धावपट्टीवर आणताना इंजिनमध्ये मोठा आवाज झाला. त्यानंतर वैमानिक निखिल नेरूरकर यांनी त्वरित विमान पुन्हा 'एप्रोन'कडे नेऊन उभे करून तपासणी केली. त्यानंतर विमान रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी जेट एअरवेज कंपनीच्या प्रतिनिधींचा यावेळी चांगलाच समाचार घेतला. प्रवाशांनी आक्रमक होत दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्याची मागणी केली. हा वाद सकाळी साडेनऊपर्यंत सुरू होता. ज्या प्रवाशांना मुंबईहून लगेच दुसरे विमान पकडायचे होते त्यांना कारने पुण्याला पाठविले. अन्य प्रवाशांची हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती. सायंकाळपर्यंत विमान दुरुस्त करण्यात आले. हेच विमान सायंकाळी ७.३० वाजता चाळीस प्रवाशांना घेऊन मुंबईला गेले.

विमान सुरू झाल्यानंतर आवाज आला. वैमानिक आणि इतर अभियंत्यांनी पाहिले. त्यानंतर विमान रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. वेळीच निर्णय घेतल्याने दुर्घटना टळली.

- रावसाहेब दानवे, खासदार, जालना

विमानमध्ये आवाज झाल्यानंतर मनात शंका आलीच होती. अखेर विमान रद्द करण्यात आले. आम्ही थोडक्यात वाचलो. जेट एअरवेजने प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.

- नंदकुमार घोडेले, महापौर

तांत्रिक कारणामुळे विमान रद्द करावे लागले. काही प्रवाशांना कारने पुण्याला पाठवले. उर्वरित प्रवाशांची हॉटेलमध्ये थांबण्याची सुविधा करून दिली. प्रवाशांची अडचण होऊ दिली नाही.

- गौरव साहनी, उप महाव्यवस्थापक, जेट एअरवेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंगल कार्यालयाशेजारी आग, वऱ्हाडींची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोतील राणाजी मंगल कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी कापून टाकलेल्या फांद्या व पाचोळ्याल मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. यावेळी मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू होते, आग भडकत असल्याने एकच गोंधळ उडला. या भागातील तरुणांनी धाव घेऊन ही आग विझवली.

मंगल कार्यालयाजवळ पालापाचोळा, कचरा साचला होता. त्याला आग लागून तिचा भडका उडाला. आग पसरत गेल्याने मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्न समारंभातील वऱ्हाडाने बाहेर धाव घेतली. ही आग पसरू नये यासाठी या भागातील तरूण सार्थक पांडे, विद्याधर पांडे, मंगल कार्यालयातील युवराज, श्रीपाद हराळ, वैभव वाडेकर, रसवंतीचालक श्रीखंडे, सात ते आठ वऱ्हाडी यांनी प्रयत्न केले. पांडे व इतरांनी त्यांच्या घरातून नळीद्वारे पाणी ओतून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. पण, या आगीत अशोकाचे झाड जळाले, तसेच दोन स्कुटरने पेट घेतला.

\Bवीज बंद करण्यास नकार \B

आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल, पोलिस व महावितरण कार्यालयात फोन केला. पोलिस, अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत तरुणांनी आग आटोक्यात आणली होती. त्यानंतर महावितरणचा एक कर्मचारी आला. मात्र, विजेचा खांब महापालिकेचा असल्याने त्याने वीजप्रवाह तोडण्यास नकार दिला. मात्र, नागरिकांच्या आग्रहामुळे त्याला वीजप्रवाह तोडावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गॅस्ट्रो’प्रकरणी तंबी हीच ‘कारवाई’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी परिसरातील दूषित पाण्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल दहा ते बारा हजार नागरिकांना गॅस्ट्रो उद्रेकाचा फटका बसला होता आणि म्हणूनच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन थेट मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत दिले होते, मात्र घटनेच्या सहा महिन्यानंतरही कोणावर कारवाई न होता केवळ तिघांना तंबी देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. अर्थात, छावणी परिषदेच्या मंगळवारी (२९ मे) झालेल्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणात केलेली कारवाई जाहीर करण्याचे आदेश अध्यक्षांनी मुख्य कार्य अधिकारी यांना दिल्यानंतर, तिघांवर 'तंबी रुपी कारवाई' करण्यात आल्याचे सीईओंनी स्पष्ट केले.

छावणी परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी परिषदेच्या सभागृहात झाली. परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा, उपाध्यक्ष प्रशांत तारगे यांच्यासह सर्व सात नगरसेवक तसेच नियुक्त सदस्य उपस्थित होते. सभेत सुरुवातीच्या टप्प्यातच गॅस्ट्रो प्रकरणावर काय कारवाई झाली, हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावर सीईओ विजयकुमार नायर यांनी दोन अभियंते व एका स्वच्छता निरीक्षकावर कारवाई झाल्याचे सभेत सांगितले, मात्र नेमकी कोणती कारवाई झाली, याविषयी सभेत विचारणा झाल्यानंतर 'झालेली कारवाई जाहीर करा' असे अध्यक्षांनी सीईओंना आदेश दिले. त्यानंतर सीईओंनी दोन अभियंते व स्वच्छता निरीक्षकाला तंबी (सेन्शुअर) देण्याची कारवाई केल्याचे सांगितले. छावणीच्या टोल नाक्यांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाते आणि दररोज लाखोंची लूट केली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन, महिन्याभरात तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. या संदर्भात, प्रत्येक टोल नाक्यावर दुपटी-तिपटीने लूट केली जात असून, लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या रजनी सत्यनारायण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

\Bनवीन जलवाहिनीला लागणार महिना\B

कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन जलवाहिनी तयार करण्याचे आदेश नोव्हेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत देण्यात आले होते, मात्र सहा महिने लोटले तरी अजूनही जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले नाही आणि हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एखाद्या महिन्याचा कालावधी लागू शकतो, असेही सीईओंनी स्पष्ट केले; तसेच पाच वॉर्डांतील अंतर्गत जलवाहिनी बदलण्यासाठी अडीच ते तीन कोटींच्या निधीची आवश्यकता असून, या निधीची प्रतीक्षा आहे, असेही सीईओंनी सांगितले.

\Bपुन्हा अनेक वॉर्डांत दूषित पाणी\B

याच सभेत अनेक वॉर्डांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नगरसेवक रफत बेग, नगरसेवक शेख हनीफ, नगरसेवक किशोर कच्छवाह व इतरांनी केली. अंतर्गत जलवाहिनी खूप जुनी व जीर्ण झाल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे मत अभियंत्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी योजनेची तपासणी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालिकेच्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेची ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे (जीपीएस) तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त सदस्य सचिव तथा दहसहस्त्र वॉटरनेट सोल्युशन्सचे प्रमुख डॉ. संजय दहसहस्त्र यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. याचवेळी व्हॉल्व्ह ऑपरेटर्सच्या कामाचेही मुल्यमापन केले जाणार आहे.

शहराच्या पाणीप्रश्नावरील उपाययोजना जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी डॉ. दहसहस्त्र यांना पाचारण केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. दहसहस्त्र म्हणाले, समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाले तरी ते पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागतील. तोपर्यंत सध्याच्या योजनेतूनच पाणी द्यावे लागेल. त्यामुळे या योजनांची शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी केली पाहिजे. 'समांतर'च्या कंपनीने जीपीएस मॅपिंग केले होते. त्याआधारेच योजनेची तपासणी केली जाणार असून त्याला एक महिना लागेल. तपासणीनंतर नेमकी समस्या लक्षात येईल. त्यानुसार उपाययोजना आखता येतील, असे डॉ. दहसहस्त्र यांनी नमूद केले. यावेळी आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सरताजसिंग चहेल आदी उपस्थित होते.

\Bव्हॉल्व्हवर निगराणी \B

पाणीपुरवठा योजनेवर १४०० व्हॉल्व्ह असून त्यांची हाताळणी योग्य प्रकारे होत नसावी, अशी शंका आहे. व्हॉल्व्ह ऑपरेटर व्हॉल्व्ह योग्य प्रकारे सुरू करतात की नाही यावर पाणीपुरवठा अवलंबून असतो. त्यामुळे जीपीएस यंत्रणेव्दारे व्हॉल्व्हची नोंदणी केली जाणार आहे. या कामासाठी प्रत्येक व्हॉल्व्हमनसोबत जबाबदार अधिकारी व कर्मचारी दिला जाणार आहे. प्रत्येक व्हॉल्व्हचा फोटो जीपीएसद्वारे जोडला जाणार आहे. त्यामुळे व्हॉल्व्ह उघडणे, बंद करण्याची वेळ, व्हॉल्व्ह किती उघडला याची माहिती मिळेल, अशी माहिती डॉ. दहसहस्त्र यांनी दिली.

\Bफारोळ्यापर्यंत नवी जलवाहिनी \B

समांतर जलवाहिनीला अवकाश असल्याने शासनाच्या परवानगीने जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत नवीन जलवाहिनी टाकली पाहिजे, असे मत डॉ. संजय दहसहस्त्रे यांनी व्यक्त केले. नवीन तंत्रानुसार, ट्युब सेटलर लावून जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवणे शक्य आहे. संपूर्ण पाणीपुरवठा योजनेसाठी 'स्काडा' (सुरवाजरी कंट्रोल डेटा अॅक्विजिशन) ही यंत्रणा तातडीने उभारली पाहिजे, ही यंत्रणा कंट्रोलरुम प्रमाणे असते. त्यामुळे योजनेवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. शहरातील ८५० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांपैकी ६५० किलोमीटरच्या जलवाहिन्या निरुपयोगी झाल्याने तातडीने बदलाव्या लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान-तंत्रज्ञानात देश अग्रेसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आकाशातील ग्रहताऱ्यांचे गणित खगोलशास्त्र मांडत होते. प्राचीन खगोल वारसा जाणून घेतल्यास आपल्याला अभिमान वाटेल. आपला देश उपग्रहांची यशस्वी निर्मिती करीत आहे. भारत विज्ञान-तंत्रज्ञानात नेहमीच अग्रेसर राहिला,' असे प्रतिपादन खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केले. ते व्याख्यानात बोलत होते.

महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोलशास्त्र विज्ञान केंद्र यांच्या वतीने 'आगामी काळातील खगोलीय घटना' या विषयावर खगोल अभ्यासक सोमण यांचे मंगळवारी सायंकाळी एमजीएम कॅम्पसमधील आर्यभट्ट सभागृहात व्याख्यान झाले. यावेळी मंचावर प्राचार्य प्रतापराव बोराडे व केंद्र संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांची उपस्थिती होती. भारताच्या खगोल वाटचालीवर प्रकाश टाकत सोमण यांनी आगामी घटनांचा वेध घेतला. 'भारताने नेहमी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान दिले. अमेरिकेने सुपर कम्प्युटर देण्यास नकार दिल्यानंतर भारताने शोध लावला. एकाचवेळी १०४ उपग्रह यशस्वीपणे सोडले. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पद्धतीने पंचांग तयार होते. १५२० मध्ये पंचांगात असूनही ग्रहण दिसले नाही. त्यामुळे 'ग्रहलाघव' ग्रंथ तयार करण्यात आला. १९२० मध्ये ग्रहण दिसले नसल्यामुळे 'करणकल्पलता' हा मराठी व संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिण्यात आला. या ग्रंथावरून खग्रास सूर्यग्रहण, सण, तिथी याची मांडणी शक्य झाली. विदेशी संशोधकांनाही या ग्रंथाचा आधार घ्यावा लागला,' असे सोमण यांनी सांगितले.

\B२०३४ मध्ये खग्रास सूर्यग्रहण

\B

आगामी खग्रास सूर्यग्रहण २० मार्च २०३४ रोजी आहे. सूर्यग्रहण न पाहिलेल्या प्रत्येकाने ते पहावे. गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहिल्यास व्यंग असलेले अपत्य जन्मते, ग्रहणात जेवण करू नये, आदी अनेक अंधश्रद्धा आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही ग्रहणात केल्या असून त्यात न अडकता सूर्यग्रहणचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सोमण यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदल्यांमुळे कही खुशी कही गम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या सोमवारी झाल्या. या याद्या प्रिंट काढल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी पाठविल्या गेल्या. याद्या पाहिल्यानंतर अनेक शिक्षकांना आनंद झाला तर अनेक जण नाराज झाले. मात्र बदल्या झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची मंगळवारी अधिकृतपणे यादी जाहीर झाली. जिल्ह्यातील ३ हजार ५७५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. बदलीपात्र असूनही पर्याय दिलेल्या ठिकाणी नियुक्ती न मिळालेल्या शिक्षकांना विस्थापित गटात नोंदविले गेले आहे. जिल्ह्यात विस्थापित शिक्षकांची संख्या ५२७ आहे. या शिक्षकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. जिल्हांतर्गत बदल्यांसाठी चार हजार शिक्षक पात्र होते. यापैकी ३ हजार ५७५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या; तर बदलीपात्र असतानाही बदल्यांसाठी जे २० पर्याय दिले नव्हते ते उपलब्ध न झाल्याने विस्थापित गटात मोडलेल्या शिक्षकांची संख्या ५२७ आहे. यामुळे या ५२७ शिक्षकांना संकेतस्थळ उघडून नव्याने अर्ज करण्यासाठी आता नवीन २० पर्याय दिले जातील असे सांगण्यात आले.

\Bतालुकानिहाय संख्या

\Bतालुका मराठी माध्यम उर्दू माध्यम एकूण

औरंगाबाद ५३७ ४५ ५८२

गंगापूर ५१० २२ ५३२

कन्नड ५१३ ८ ५२१

खुलताबाद १९३ २१ २१४

पैठण ४८६ २९ ५१५

फुलंब्री २८७ ११ २९८

सिल्लोड ३८३ ३३ ४१६

सोयगाव १२८ ३ १३१

वैजापूर ३६६ ० ३६६

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images