Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तरुणीवर अत्याचार, पोलिसाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमीष दाखवून 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहून तरुणीवर वर्षभर अत्याचार करणारा पोलिस कर्मचारी अमोल शिवाजी सोनटक्के याला सोमवारी (१८ जून) अटक करुन मंगळवारी (१९ जून) कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला शुक्रवारपर्यंत (२२ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.

कन्नड तालुक्यातील २३ वर्षीय तरुणी शहरातील विधी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आली असताना पोलिस आयुक्तालयातील पोलिस कर्मचारी अमोल शिवाजी सोनटक्के याने संबंधित तरुणीचा मोबाइल नंबर मिळवून त्या क्रकांवर शुभेच्छांचे संदेश पाठविले तसेच बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी अमोलने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यावर कुंकू लाऊन खोटे मंगळसूत्र घातले. त्यानंतर घर भाड्याने घेऊन तिला 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये ठेवले आणि वेळोवेळी अत्याचार केला, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपी सोनटक्के याच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात २४ एप्रिल २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता व तेव्हापासून तो फरार होता. आरोपी सोनटक्के हा सोमवारी रात्री पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला अटक करून मंगळवारी कोर्टात हजर केले असता, तरुणीची वैद्यकीय तपासणी करावयाची आहे, तसेच तरुणीला कुठे-कुठे नेले होते, याचा तपास करावयाचा असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रासेयो’ची आज बैठक

$
0
0

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या वतीने 'कॉलेज-नॉलेज-व्हिलेज' संकल्पना राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील सिफार्ट सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्र-कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर, रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील, अप्पर आयुक्त विजय फड, उपआयुक्त सूर्यकांत हजारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनंत कुंभार यांच्यासह रासेयोचे जिल्हा समन्वयक, गट समन्वयक व कार्यक्रमाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयटी पॉलिटेक्निकच्या गुणवंतांचा सत्कार

$
0
0

औरंगाबाद : एमएसबीटीई बोर्डाकडून २०१८मध्ये घेण्यात आलेल्या पॉलिटेक्निक पदविका परीक्षेत यश संपादन केलेल्या एमआयटी पॉलिटेक्निकच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

मेकॅनिकल विभागातून आदित्य पुजारी ८९.८८, सोहम हापसेनकर ८८.६३, सौरभ बागूल ८६.३८, सागर शेलकी ८६.१३, प्रसाद पावरे ८५.३८, सागर मुळे ८४.८८, शाहरूख शेख ८४.७५, ऋत्विक देशमुख ८३.२५, सलीम शेख ८३.२५, विशेष मेकॅनिकल विभागाचा आदित्य पुजारी याने इंडस्ट्रिअल फ्लूड पावर या विषयात १००पैकी ९६; तसेच प्रसाद पावरे याने १००पैकी ९५ गुण प्राप्त केले आहेत. मेकॅनिकल द्वितीय वर्षात वरद गाग ८३.६७, सत्यम मनगटे ८३.२२ टक्के गुण मिळविले.

कम्प्युटर विभागातून ऐश्वर्य बकारिया ८५.५० टक्के, वेदांत कर्मलकर ८४.३८, तेजस्विनी जाधव ८२.७५, द्वितीय वर्ष रश्मी रानमाले ८६.००, सोहम मोहिते ८४.७८, स्वाती मनगटे ७६.७८ टक्के गुण मिळविले. स्थापत्यशास्त्र विभागातून अजय सिरसाठ ८६.८८, मानसी जाधव व प्रथमेश जंगले ८२.२५, प्रणव राठोड ८१.५०, अभिषेक चौधरी ८१.३८ टक्के गुण मिळविले. इलेक्ट्रॉनिक्स विभागतून आशा मुरागी ८८.४१ व अंकिता झालवार ८४.४२ टक्के गुण मिळविले. विद्युत अभियांत्रिकी विभागतून अभिषेक सांगवी ८३.८३, कृष्णा भावले ८२.१२, आरती रिंगे ७८.८५, द्वितीय वर्षात हर्ष खात्री ८३.०६, अविनाश पाठक ८२.८२, यशोधन पाठक ७७.५३ टक्के गुण मिळविले. प्रथम वर्षामधून सपना चव्हाण ८३.७९, प्रणित राठोड ८०.८३, ओंकार थोरवे ८०.२५, सुयोग कुकरणी ८०.०९, कुणाल जाधव ७९.६८ टक्के गुण मिळविले.

सर्व यशवी विद्यार्थांचे एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनीष शर्मा व प्राचार्य सुनील देशमुख यांनी अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, शिक्षण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पाठीमागून दुचाकीस दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार पेंटरचा मंगळवारी उपचारादरम्यान घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.

सुनील मुरलीधर लोखंडे (वय २८, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील पेंटिंग कामाचे कंत्राट घेत असे. अमरावती जिल्ह्यात पाण्याच्या टाकीला रंग मारण्याचे त्यास नुकतेच कंत्राट मिळाले होते. त्यासाठी १५ जून रोजी काही मजुरांना त्याने सिडको बसस्थानकातून अमरावतीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसविले. त्यानंतर रात्री सव्वा अकराच्या सुमारास दुचाकीने (एमएच २० ईयू २८३६) ते घराकडे जात होते. जालना रोडवरील राज पेट्रोल पंपासमोरून ते जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने सुनील लोखंडे याच्या दुचाकीस धडक दिली. यात सुनील गंभीर जखमी झाला. त्यास खासगी हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर सोमवारी घाटीत दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी त्याचे निधन झाले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार रमेश सांगळे, विठ्ठल फरताळे हे करीत आहेत.

दोन महिन्यापूर्वी झाले होते लग्न

सुनील लोखंडे याचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न रंगवित असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला असल्याचे सांगताना त्याच्या मित्र परिवाराला शोक आवरणे कठीण झाले होते. ७ जून रोजी त्याने नातेवाईक, मित्रासमवेत मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला पावसाने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादला हुलकावणी देणाऱ्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (१९ जून) रात्री ढगांच्या गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावासने जोरदार हजेरी लावली. शहराच्या बहुतांश भागामध्ये पावसाच्या दमदार सरी बरसल्या.

दमदार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एन ४ येथे एक झाड उन्मळून पडले तर सेवन हिल्स येथे एक मोठे ‌होर्डिंग रस्त्यावर पडल्याने अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. दीर्घ प्रतीक्षेनंतर सलग दुसऱ्या दिवशी पावसाने शहरात हजेरी लावली. रात्री साडेनऊ वाजेपासून शहरात दमदार पावसाला सुरुवात झाली, रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. सकाळपासून शहरातील नागरिक प्रचंड उकाडा सहन करत होते. बदललेल्या वातावरणामुळे सायंकाळी पावसाची शक्यता होती, अखेर साडेनऊ वाजता दमदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जोरदार वारे अन् पावसामुळे शहरातील काही भागात वीज गेल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद पालिका उपायुक्तांचं निलंबन

$
0
0

औरंगाबाद

जयभवानी नगरमधील उघड्या नाल्यात पडून एका रहिवाशाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. या घटनेला जबाबदार धरत औरंगाबाद पालिका आयु्क्तांनी उपायुक्तांना निलंबित केलं आहे. महापौरांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

औरंगाबादमध्ये मंगळवारी रात्री जोरदार पाऊस सुरू होता. पावसाचे पाणी साचल्यानं जयभवानी नगरमधील रहिवासी भगवान मोरे यांना या परिसरातील एका उघड्या नाल्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते या नाल्यात पडले. नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्यानं त्यात ते वाहून गेले. रात्रभर त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. नाल्याचे दुसरे टोक विश्रांती नगरमधील रस्त्यालगत आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मोरे यांचा मृतदेह सापडला. या घटनेची गंभीर दखल औरंगाबाद पालिका आयुक्त डॉ. विनायक निपुण यांनी घेतली. त्यांनी पालिका उपायु्क्त रवींद्र निकम यांना निलंबित केलं. तर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मोरेंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगल प्रकरणातील चौघांचा जामीन मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागच्या महिन्यात शहरात उसळलेल्या दंगलीतील चौघा आरोपींचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवतकर यांनी बुधवारी (२० जून) मंजूर केला.

या प्रकरणामध्ये आरोपी इम्रान अहमद शेख अहमद (३१, रा. जुना बाजार, औरंगाबाद) याला १८ मे रोजी अटक होऊन २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती व त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती. आरोपी शेख जाफर शेख शब्बीर (२०, रा. म्हाडा, औरंगाबाद) याला १५ मे रोजी अटक होऊन २२ मेपर्यंत पोलिस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली होती. आरोपी शुभम स्याम गुराले (२३, रा. अंगुरीबाग, औरंगाबाद) याला १६ मे रोजी अटक होऊन १९ मेपर्यंत पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तसेच आरोपी लक्ष्मण उर्फ लच्छू बाबुलाल बाखरिया (४४, रा. धावणी मोहल्ला, औरंगाबाद) याला १६ मे रोजी अटक होऊन २१ मेपर्यंत पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. चौघा आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाल्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्यावर सुनावणी झाली असता, प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर चौघा आरोपींना नियमित जामीन मंजूर करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिनी घाटी’मध्ये आजपासून आपत्कालिन सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अखेर चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) आज गुरुवारपासून आपत्कालिन सेवांना प्रारंभ होत आहे. कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीतील रुग्ण उपचाराशिवाय परत जाऊ नये याची काळ‍जी घ्या, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या असून त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून केली जाणार आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे रुग्णालय सुरू होण्याची प्रतीक्षा असताना सतत तारखा जाहीर करून घोळ घातला जात होता. मे महिन्यात रुग्णालयाचे उद्घाटन होण्याची शक्यता असताने ते लांबणीवर पडले. वेगवेगळी कारणे देत उद्घाटन करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर रुग्णालयामध्ये आपत्कालिन सेवा गुरुवारपासून सुरू होत आहे. रुग्णालयामध्ये कोणताही रुग्ण आपत्कालिन उपचारासाठी आल्यास त्याच्यावर उपचार करावेत, त्यांना उपचाराशिवाय परत पाठवू नका, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. सद्यस्थितीत या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, अनेक महत्त्वाची उपकरणे-साहित्य उपलब्ध असल्याने आपत्कालिन सेवा देणे शक्य आहे. आतापर्यंत रुग्णालयामध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी, नेत्रतपासणीही झाली आहे. त्यामुळे आपत्कालिन सेवा देणे शक्य असल्याचे लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bउद्घाटन महिन्याभरात?

\B

या जिल्हा रुग्णालयाचे औपचारिक उद्घाटन महिन्याभरात होऊ शकते, असेही सूत्रांकडून समजते. या संदर्भात आतापर्यंत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आली नसली तरी, अनेक आवश्यक उपकरणे-साहित्य उपलब्ध झाल्यामुळे महिन्याभरात रुग्णालयाचे उद्घाटन होऊ शकते, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उल्कानगरी भागात एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीपर्यंत केबल वायरला बांधून ठेवणारी लोखंडी तार तुटली. ही तार व केबल लघुदाब वीज वाहिनीवर पडली त्यावेळी वीज प्रवाह सुरू होता. भर पावसात एखाद्या वाहनधारकाचा तारेला स्पर्श सानिध्यात आला असता तर निश्चितच प्राणहानी होण्याची शक्यता होती. वीज कर्मचाऱ्यांनी भर पावसात ही वायर हटवून परिसरात वीजपुरवठा सुरळीत केला.

मंगळवारी (१९ जून) रात्री दहा ते साडेदहादरम्यान पावसासोबत जोरदार वारा सुरू होता. या वाऱ्यामुळे एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीपर्यंत लोखंडी तारेने बाधली जाणारी केबल खाली पडली. या वायरचा एक भाग हा कॅफे ९९जवळ पडलेला होता. या घटनेमुळे या कॅफेजवळ थांबलेले लोक बाहेर पडले. या घटनेची माहिती या परिसराचे वरिष्ठ तंत्रज्ञ एस. पी. शाहीर यांना दिली. शाहीर यांच्यासह महेश वडस्कर, नितीन पाटील हे कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी भर पावसात परिस्थिती पाहून, आधी उल्कानगरी भागाचा वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर त्यांनी ही केबल काढण्याचा प्रयत्न केला. केबल झाडाच्या फांद्यात अडकत असल्याने या कर्मचाऱ्यांनी पावसात झाडाच्या फांद्या तोडून केबल वायर लघुदाब वीज वाहिनीवरून बाजुला केली. त्यानंतर उल्कानगरी भागातील वीजपुरवठा सुरळीत केला. प्रसंगावधान राखत महावितरण कर्मचाऱ्यांनी वेळीत अवरोध हटविल्यामुळे या भागात प्राणहानी किंवा वित्तहानी झाली नाही.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहितेला पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत रॉकेल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिनानगर, रशीदपुरा भागात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी सासरच्या पाच आरोपींविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने मंगळवारी या प्रकरणी तक्रार दाखल केली. या विवाहितेचा लग्न झाल्यापासून सप्टेंबर २०१४पासून विविध कारणांनी छळ सुरू होता. ही विवाहिता सोमवारी आईच्या घरी राहण्यासाठी आली होती. यावेळी संशयित आरोपी आतिक शेख जहीरोद्दीन शेख, जहीरोद्दीन शेख, शेख आवेज, लियाकतखान व विवाहितेची सासू (सर्व रा. कैसर कॉलनी) हे तिच्या घरी आले. पाच लाख रुपये घेऊन आताच आमच्या सोबत चल, अशी मागणी त्यांनी केली. विवाहितेने पैसे देण्यास नकार दिला. यावेळी तिचा पती व त्याच्या भावाने तिला मारहाण केली; तसेच सासूने रॉकेल टाकून पेटवून दिले. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नागरे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कोठडी जलमय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे लोहमार्ग पोलिसांना धावपळ करावी लागली. पावसाचे पाणी थेट पोलिस कोठडी व ठाण्यातही घुसल्याने पोलिसांसह आरोपींनाही रात्रभर एका कोपऱ्यात बाकांवर बसून काढावी लागली.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनमध्ये लोहमार्ग पोलिस ठाणे आहे. तेथे व पोलिस कोठडीत पावसाचे पाणी शिरत असल्याची तक्रार दरवर्षी केली जाते. यंदाही पहिल्या पावसानंतर संबंधित पोलिस विभागाने रेल्वे विभागाला याबाबत कळविले होते, मात्र त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. मंगळवारी (१९ जून) रात्री झालेल्या पावसाचे पाणी पुन्हा एकदा लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या कोठडीत शिरले. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलिस कोठडीतून बाहेर काढून ठाण्यात एका कोपऱ्याला बसविण्यात आले. पाऊस वाढल्यानंतर पाणी पोलिस ठाण्यातही शिरल्याने आरोपींना एका बाकावर बसवावे लागले. पोलिसही आरोपींबरोबर बारावर बसून होते.

………………

\Bरेल्वे विभागाचे दुर्लक्ष\B

पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री पावसाचे पाणी शिरण्याचे प्रकार गेल्या तीन ते चार वर्षांपासून होत आहेत. रेल्वे विभागाला याची माहिती देऊनही त्यांच्याकडून पोलिस ठाण्यात पावसाचे पाणी येऊ नये म्हणून काहीही केले नाही, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभाग येथे वारी आणि राहुरी स्थानकांदरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीच्या कामामुळे या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. या कामामुळे मराठवाड्याच्या प्रवाशांचे हाल झाले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

- पुणे ते निझामाबाद : १७ जून २०१८ ते १६ जुलैदरम्यान रद्द

- निजामाबाद ते पुणे : १९ जून २०१८ ते १८ जुलैदरम्यान रद्द

- निजामाबाद ते पंढरपूर पॅसेंजर : १८ जून ते १७ जुलैदरम्यान रद्द

- पंढरपूर ते निझामाबाद पॅसेंजर : १९ जून ते १८ जुलैदरम्यान रद्द

अंशतः रद्द करण्यात आलेल्या रेल्वे

- नांदेड ते दौंड पॅसेंजर : १७ जून २०१८ ते १५ जुलैदरम्यान कोपरगाव ते दौंडदरम्यान रद्द

- दौंड ते नांदेड पॅसेंजर : १७ जून ते १६ जुलैदरम्यान दौंड ते कोपरगावदरम्यान रद्द

…………………….

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनवेगिरीमुळे ८८ शिक्षकांना नोटिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामविकास विभागातर्फे राबविलेल्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी बनावट कागदपत्रे दिल्याच्या तक्रारी विस्थापित शिक्षकांनी केल्या होत्या. याबाबत प्रशासनाकडे काही लेखी तक्रारी पण आल्या होत्या. त्याच्या चौकशीनंतर तब्बल ८८ शिक्षकांनी बनवेगिरी केल्याचे समोर आले आहे. या शिक्षकांची गुरुवारी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेत सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या शिक्षकांना कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यांतर्गत शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण निश्चित करण्यात आले.यग्रामविकास विभागाने ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले होते. या पोर्टलवर संबंधित शिक्षकाने बदलीसाठी माहिती भरून देण्याचे सांगण्यात आले होते. सोप्या क्षेत्रातील शाळा मिळावी, यासाठी अनेक शिक्षकांनी खोटी माहिती भरून दिल्याच्या तक्रारी झाल्या. बदल्या झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी यासंदर्भात ओरड केली होती. चौकशीची मागणीही मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली होती. कौर यांनी चौकशी समिती नेमली असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे हे प्रमुख आहेत. संबंधित गटशिक्षणाधिकारी, संबंधित बीट विस्तार अधिकारी हे सदस्य तर शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल हे सदस्य सचिव आहेत. तक्रारी प्राप्त झालेल्या ८८ शिक्षकांना नोटिसा बजवण्यात आल्या असून आपण खोटी माहिती दिल्यामुळे शिस्तभंगाविषयीच्या तरतुदीस पात्र आहात. गुरुवारी सकाळी दहा वाजता बदलीच्या अर्जात केलेल्या अर्जामध्ये उल्लेख केलेल्या कागदपत्रांसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिाऱ्यांच्या दालनात सुनावणीसाठी उपस्थित राहावे, अनुपस्थित राहिल्यास आपण दिलेली माहिती खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे गृहित धरून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत रुग्णांसाठी प्रतीक्षालय सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी परिसरात खासदार निधीतून रुग्णांसाठी दहा लाख रुपये खर्चून ८०० चौरस फुटांचे प्रतीक्षालय (शेड) बांधण्यात आले असून, त्याचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते बुधवारी (२० जून) झाले.

मेडिसिन विभागाच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना बसण्यासाठी जागा अपुरी असल्यामुळे रुग्णांसाठी प्रतिक्षालय बांधण्याच निर्णय घेण्यात आला. अभ्यागत समिती सदस्य नारायण कानकाटे यांच्या प्रयत्नांनी खासदार निधीतून दहा लाख रुपयांचे निधी नुकताच मिळवला आणि त्यातून हे शेड बांधण्यात आले. ५० हजारांच्या निधीतून सहा पंखे व सहा ट्यूबही बसविण्यात आले आहेत. या छोटेखानी कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, नगरसेवक सचिन खैरे, हिरा सलामपुरे, सुनंदा खरात यांची उपस्थिती होती. डॉ. भारत सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास दीड तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे सर्वसाधारण सभेला उशीर होत असल्याचे लक्षात येताच महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे व नगरसेवक गजानन बारवाल निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलोख्यासाठी फुटबॉल सामना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धार्मिक सलोखा व शांतता अबाधित राहावी म्हणून शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी नागरिकांसाठी फ्रेंडस चषक फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर हे सामने उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उदघाटन आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात विविध कारणांनी दंगलीच्या घटना घडल्या आहेत.जातीय सलोख्याला या दंगलीमुळे झळ पोचली आहे. या दंगलीच्या जखमा भरून काढण्यासाठी; तसेच शहरात धार्मिक सलोखा व शांतता अबाधित ठेवण्यावर पोलिस यंत्रणेचा भर आहे. दोन समाजातील तेढ दूर व्हावी म्हणून पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी नागरिक, पोलिस यांच्यात फुटबॉलचे सामने घेण्यात आले. यामध्ये आठ संघ सहभागी झाले होते. जिन्सी, सिटीचौक, क्रांतीचौक व बेगमपुरा हद्दीतील तरुणांचे चार संघ, दोन पोलिस बॉइजच्या टीम व दोन वरिष्ठ फुटबॉल खेळाडूंच्या टीमचा यामध्ये समावेश होता.

सुरुवातीला पोलिस आणि सिडको प्रशासन यांच्यात मैत्रीपूर्ण सामना झाला. हा सामना बरोबरीत राहिला. यामध्ये आयुक्त चिरंजीवप्रसाद, महावितरणचे सिडको प्रशासक ओमप्रकाश बकोरिया यांनी सहभाग घेत सामन्याची रंगत वाढवली. यानंतर नागरिकांच्या विविध गटांचे मैत्रीपूर्ण सामने झाले. सामन्यानंतर सहभागी संघाना टी शर्ट व फुटबॉलचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, सिडको प्रशासक बकोरीया, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, डॉ. नागनाथ कोडे, अनिता जमादार, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, ज्ञानेश्वर साबळे, अनिल गायकवाड, अनिल आडे, श्रीपाद परोपकारी, राजश्री आडे यांच्यासह इतरांची उपस्थीती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ.अजय शेष यांचे रविवारी व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संत तुकाराम मेडिकल फाऊंडेशन व एम.जी.एम वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वेळा गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डधारक व प्रख्यात वत्ते डॉ. अजय शेष यांचे येत्या रविवारी प्रेरणादायी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. आपल्या जीवनात कसे यश मिळवावे, सकारात्मक विचार, विद्यार्थी युवक व शारीरिक आरोग्य, व्यायाम व झोप, मानसिक योग्यता, करिअर क्षेत्र, नातेसंबंध व मित्र पालक व शिक्षक इत्यादी अनेक गोष्टींवर डॉ. शेष मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी, पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. पंडित पळसकर, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. संजय खंडागळे, डॉ. रोहित गडकरी, डॉ. सुनील गव्हाणे, डॉ. योगेश लक्कस यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपकऱ्यांच्या हाती ‘एसटी’चा नारळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेतनवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या राज्यातील एकूण ११३८ कर्मचाऱ्यांना 'एसटी' महामंडळाने बडतर्फ केले असून, त्यात औरंगाबाद विभागातील आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी वेतन कराराला विरोध करत पुकारलेल्या अघोषित आंदोलन पुकारले. त्यात आठ व नऊ जून रोजी अनेक नवीन कामगार (चालक आणि वाहक) सहाय्यक व अनुकंपा तत्वावरील कर्मचारी सहभागी झाले. आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांना सेवामुक्त करा, असे आदेश विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. या आदेशानंतर मंगळवारी (१९ जून) रात्री सात नंतर औरंगाबादसह राज्यभरातील ११४० कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे पत्र देण्यात आले आहे. दरम्यान, 'एसटी'मध्ये एखाद्या व्यक्तीचे निलंबन किंवा सेवा समाप्त करण्यासाठी शिस्त व आवेदन पद्धतीची अंमलबजावणी करावी लागते. या कामगारांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची शिस्त वा आवेदन पद्धतीची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे या निर्णयाविरोधात एसटी कामगार संघटना आगामी काळात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे. तसेच कामगार न्यायलयातही दावा दाखल करण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

\Bइंटक याचिका दाखल करणार

\B'वेतनवाढच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या कामगारांवर कारवाई करणार नाही, असा शब्द परिवहन मंत्र्यांनी दिला होता. तो पाळला नाही. आता बडतर्फीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करून कामगारांना न्याय मिळवून देऊ,' असे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बोन मॅरो ट्रान्स्पान्ट’ने कर्करुग्णास जीवनदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीड वर्षात दोन वेळा किमोथेरपीचे उपचार घेऊनही रक्ताचा कर्करोग नियंत्रणात येत नसलेल्या ३६ वर्षीय महिलेवर एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट यशस्वी झाले. विशेष म्हणजे साडेतीन लाख रुपयांत प्रत्यारोपण झाले आणि त्यापैकी दोन लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून, तर ५० हजार सिद्धीविनायक ट्रस्टकडून मिळाले.

फुलंब्री तालुक्यातील ३६ वर्षीय महिलेला 'हॉजकिन लिम्फोमा' या रक्ताचा कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर दोन किमोथेरपीचे उपचार घेऊनही कर्करोग नियंत्रण येत नसल्याने बोन मॅरो ट्रान्स्प्लान्टचा निर्णय घेऊन २७ मे रोजी 'एमजीम'मध्ये प्रत्यारोपण झाले. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यारोपणासाठी याच महिलेचेच स्टेम सेल्स वापरण्यात आले, याला 'ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट' असे म्हणतात. यामुळे प्रत्यारोपणानंतर काही प्रमाणात रक्त व प्लेटलेट द्यावे लागले असले तरी आता अपेक्षेप्रमाणे महिन्याभरात रक्तनिर्मिती सुरू झाली आहे. रुग्णाची आर्थिक स्थिती हलाकीची असल्याने मुख्यमंत्री निधी व सिद्धीविनायक ट्रस्टकडून मदत मिळवण्यात आली, असे 'एमजीएम'चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी व ट्रान्स्प्लान्ट फिजिशियन हिमॅटोलॉजिस्ट डॉ. मनोज तोष्णीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

\Bथॅलेसेमियामध्ये यशाचे प्रमाण जास्त \B

रक्ताच्या कर्करोग वगळता अप्लास्टिक अॅनेमिया, थॅलेसेमिया आदी आजारांमध्ये 'बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट' यशस्वी होण्याची शक्यता ९० टक्के आहे. 'ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट'साठी तीन ते चार लाखांचा व 'अॅलोजेनिक बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट'साठी म्हणजे 'डोनर'च्या सहाय्याने होणाऱ्या प्रत्यारोपणासाठी सात ते आठ लाख रुपयांचा खर्च येतो. तसेच आता 'हाफ मॅच ट्रान्स्प्लान्ट'ही (ज्यात दाता हे आई किंवा वडील असतात) यशस्वी होत असल्याचे डॉ. तोष्णीवाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त गीताविरुद्ध पुरोहित संघटनेची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यू ट्यूबवर असलेल्या एका वादग्रस्त गाण्यावर पुरोहित संघटनेने आक्षेप घेतला आहे. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेत त्यांना निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. हे गाणे यू ट्यूबवरून काढावे व सबंधित गीतकार, संगीतकारावर कारवाईची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

ब्राह्मण समाजाची बदनामी होईल असे वादग्रस्त गाणे गेल्या काही दिवसापासून यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात येत होते. ही संगीत दोन समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हे गाणे सादर करणारे कलाकार सचिन म्हस्के व राजरत्न सावंत यांना अटक करावी, अशी मागणी देखील तक्रारी करण्यात आली आहे. यावेळी पुरोहित संघटनेचे सुभाष मुळे गुरुजी, आशिष सुरडकर, आनंद तांदुळवाडीकर, स्वप्नील जोशी, स्वप्नील पैठणकर, युवराज दिवेकर, रवी माहोरकर, मिलिंद पिंपळे, सुधीर नाईक, वाडे पाटील, अनिल पैठणकर, अभिषेक कादी, वनिता पत्की, विजया कुलकर्णी, अंजली गोरे, गीता आचार्य, सुरेखा पारवेकर, मेघा दिवेकर, माधुरी जोशी, मयूरी जोशी, अनिरुद्ध देशमुख, रामदूत मुळे, महेश जोशी, अक्षय तांदुळजे, संतोष पटवर्धन, आनंद मुळे, अभय खंडाळकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाऊ, दादा पोस्टरबाज पोलिसांच्या रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या एक वर्षात शहरातील भाऊ, दादा, पोस्टरबाजांनी डोके वर काढले होते. शहरातील अशा गुंडाची यादी गुन्हे शाखेने तयार केली आहे. लवकरच या गुंडाना हिसका दाखवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यकाळात प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीतील टॉप २० गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर कोंम्बिग ऑपरेशन मोहीम राबवत या गुंडाना उचलून आणण्यात येत होते. या गुन्हेगारांची हजेरी लावण्यात येत होती. यामध्ये राजकीय पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता. पोलिसांच्या या मोहिमेमुळे शहरातील भाऊ, दादा, पोस्टरबाज थंडावले होते. गेल्या वर्षभरात मात्र ही मोहीम बारगळली होती. आयुक्त बदलल्यानंतर पुन्हा एकदा ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. शहरात सध्या पोस्टरबाज बोकाळले आहेत. यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. गुन्हे शाखेच्या वतीने या समाजकंटकावर नजर ठेवण्यात येत आहे. शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादीच पोलिसांनी तयार केली आहे. आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यकाळात ज्या पद्धतीने गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे पुन्हा या गुन्हेगारांना हिसका दाखवण्यात येणार असून, त्या पद्धतीने गुन्हे शाखेची तयारी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images