Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद शहर व परिसरात शनिवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शहरात गुरुवारी ६०.८ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा विमानतळावरील वेधशाळेत करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत जून महिन्यांत एका दिवसातील सर्वाधिक पावसाची ही नोंद आहे. शहरात २९ जून २०१५ रोजी ५९.४ मिली मीटर पाऊस पडला होता.

दरम्यान, शनिवारी (२३ जून) शहरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. २४ आणि २५ जून रोजीही शहरात पाऊस पडले. त्याचबरोबर २६ जून रोजी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदेड - पनवेल मार्गावर धावणार विशेष रेल्वे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड - पनवेल मार्गावर विशेष रेल्वे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिकंदराबाद - नांदेड - जबलपूर या रेल्वेच्याही फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

नांदेड येथून पुणे आणि पनवेलला जाण्यासाठी आता चार विशेष रेल्वे आहेत. नांदेड ते पनवेल रेल्वे (क्रमांक ०७६१७) नांदेड येथून चार आणि अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल. ती परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद, पुणे मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोहोचेल. तर पनवेल - नांदेड विशेष रेल्वे (क्रमांक ०७६१८) पनवेल येथून पाच आणि बारा ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता नांदेडला पोहोचेल. नांदेड येथून जबलपूर आणि सिकंदराबादला जाण्यासाठी विशेष रेल्वेच्या २६ फेऱ्या होणार आहेत. जबलपूर ते सिकंदराबाद रेल्वे (क्रमांक ०१७०४) जबलपूर येथून दर सोमवारी रात्री आठ वाजता सुटेल. अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेडमार्गे ती दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सिकंदराबादला पोहोचेल. ही रेल्वे जबलपूर येथून जुलै महिन्यात २, ९, १६, २३, ३० तारखेला सुटेल. तर ऑगस्टमध्ये ६, १३, २०, २७ आणि सप्टेंबरमध्ये ३, १०, १७, २४ तारखेला धावेल. ही गाडी जबलपूर येथून दर सोमवारी रात्री आठ वाजता सुटेल. ती सिकंदराबाद येथे मंगळवारी रात्री सात वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात सिकंदराबाद - जबलपूर रेल्वे (क्रमांक ०१७०३) सिकंदराबाद येथून जुलैमध्ये ३, १०, १७, २४, ३१ रोजी सुटेल. ऑगस्ट महिन्यात ७, १४, २१, २८ आणि सप्टेंबर महिन्यात ४, ११, १८, २५ रोजी धावेल. ही गाडी सिकंदराबाद येथून दर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता सुटेल, तर जबलपूर येथे बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजता पोहचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तटबंदी संवर्धनाचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराभोवतीची तटबंदी, ऐतिहासिक दरवाजे, नहरींचे संवर्धन करण्याचा निर्णय शनिवारी महापालिकेत झालेल्या हेरिटेज कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. पावसामुळे मेहमूद दरवाजाचे लाकडी गेट निखळले, त्याची दुरुस्ती देखील महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. दरम्यान शहरातील वारसास्थळांच्या संवर्धनासाठी स्मार्टसिटी प्रकल्पातून निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कमिटीच्या सदस्यांना दिला.

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक झाली. बैठकीला हेरिटेज कमिटीचे सदस्य उपस्थित होते. महमूद दरवाजाच्या निखळलेल्या लाकडी गेटबद्दल बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरवाजाचे महत्त्व लक्षात घेता निखळलेले लाकडी गेट महापालिकेच्या माध्यमातून त्रुस्त करण्याचा शब्द डॉ. विनायक यांनी दिला. औरंगाबाद शहराला ऐतिहासिक तटबंदी आहे. ही तटबंदी जागोजागी तुटलेली आहे. त्यामुळे तटबंदीची दुरुस्ती करण्याची सूचना सदस्यांनी कमिटीच्या बैठकीत केली. काही महत्त्वाच्या ठिकाणी तटबंदीची दुरुस्ती झाल्यास ऐतिहासिक वारसा जपला जाईल, पर्यटकांना देखील त्याचे महत्त्व लक्षात येईल असे मत सदस्यांनी व्यक्त केले. तटबंदीच्या बरोबरच ऐतिहासिक दरवाजांचा प्रश्न देखील चर्चिला गेला. अस्तित्वात असलेल्या काही महत्त्वाच्या दरवाजांची देखभाल दुरुस्ती महापालिकेने केली पाहिजे अशी भूमिका सदस्यांनी मांडली. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नहर-ए-अंबरी, नहर-ए-पानचक्कीच्या संवर्धनाबद्दल देखील यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तटबंदी, ऐतिहासिक दरवाजे, नहर याच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहरातील वारसास्थळांच्या संवर्धनासाठी स्मार्टसिटी प्रकल्पातून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी सदस्यांना दिली. वारसास्थळांच्या संवर्धनाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.

टाउन हॉल, सलीम अली सरोवरासाठी विशेष योजना

टाउन हॉल आणि डॉ. सलीम अली सरोवराच्या संवर्धनासाठी व सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या माध्यमातून विशेष योजना हाती घेतली जाणार आहे. पर्यटकांच्या दृष्टीने ही दोन्हीही ठिकाणे येत्या काळात आकर्षण ठरतील अशा पद्धतीने काम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांनी दिली कायद्याची ‘परीक्षा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रागाच्या भरात गुन्हा घडला. शिक्षा झाली. तुरुंगात खितपत पडले. भूतकाळ बदलता येणार नाही. मात्र, उज्ज्वल भविष्य आपण नक्कीच घडवू शकतो हा निर्धार करत हर्सूल कारागृहातील तब्बल ४६ कैद्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला असून, त्यातील २२ कैद्यांनी आठ जूनपासून कायदा, पत्रकारिता, पदवीच्या परीक्षाही दिल्या.

गेल्या वर्षापासून शासकीय केंद्रीय कारागृह हर्सूल येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठच्या विदयमाने विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी बी. पी. पी (बॅचलर्स प्रिपेअरटी प्रोगाम) या अभ्यासक्रमांतर्गत दहावी पास असलेल्या कैद्यांना बारावी, तर बारावी पास असलेल्या कैद्यांना पदवी अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो. पदवी तसेच पदवीत्तर अभ्यासक्रमामध्ये यंदा एकूण ४६ जणांनी विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. त्यातील बावीस कैद्यांच्या विविध अभ्यासक्रमांची आठ जून पासून परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा शेवटचा पेपर १८ जून रोजी संपला. परीक्षा देणाऱ्या कैद्यांमध्ये १५ पुरूष आणि सहा महिला कैद्यांचा समावेश होता. यातील दोघांनी कायद्याची, दोघांनी बी.कॉमची, बारा जणांनी बीएची, दोघांनी पत्रकारितेची आणि चार जणांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा दिली. ही परीक्षा कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे, वरिष्ठ जेलर डी. डी. काळे, अभ्यासक्रम समन्वयक डी. पी. निरफळे, प्रशिक्षक एस. जि. गीते तसेच प्रशिक्षक सौ. पी. डी. चौहान यांच्या प्रयत्नामुळे यशस्वी झाली. इग्नूचे प्रादेशिक संचालक डॉ. मसूद परवेझ यांच्या प्रयत्नाने कारागृहात हे अध्यासक्रम सुरू झाले आहेत. परीक्षा पारदर्शकरपणे पार पाडण्याकरिता मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशनचे सहायक प्राध्यापक सोहेल झकीऊद्दीन यांची कारागृहात निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

---

\Bअशीही माणुसकी

\B---

हर्सूल कारागृहात कैद्यांच्या जेवणाची वेळ सकाळी दहाची असते. दहा वाजताच परीक्षा सुरू असल्याने परीक्षा देणाऱ्या कैद्यांसाठी दहाच्या पूर्वी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. एका पेपरची सर्व कैदी परीक्षा देत होते. अचानक एक कैदी दुसऱ्यावर ओरडला. परीक्षकाने त्या कैद्याला विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर देण्यास टाळले. पुन्हा काही वेळेनंतर हाच प्रसंग घडला. त्यावेळी परीक्षक सोहेल झकियोद्दीन यांनी त्या कैद्याला ओरडण्याचे कारण विचारले. तेव्हा तो केदी म्हणाला, 'सर, याला 'रोजा' आहे. मी त्याला तेव्हापासून म्हणतोय. पंख्याखाली जाऊन बस. हा बसतच नाही.' समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळयामध्ये ही अंजन घालणारी घटना आहे, अशी माहिती सोहेल झकियोद्दीन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यज्ञ मंडपाचे भूमिपूजन

$
0
0

औरंगाबाद : मराठवाड्यात भरपूर पाऊस पडावा या उद्देशाने आर्य समाजातर्फे २७ जून ते एक जुलैदरम्यान पर्जन्य महावृष्टी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञाच्या मंडपाचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. प्रभाकर मनोहर रसाळ मंगल कार्यालयात गांधेली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महंत आनंद गिरी महाराज, नवनाथ महाराज आंधळे, नगरसेवक आत्माराम पवार, सरपंच सरदार पटेल, पोलिस पाटील हरिभाऊ रसाळ, दत्तू वाघमोडे, दयाराम बसैये, भूषण पटेल, लालदास जव्हेरी, अजय शहा, रमणभाई पटेल, अॅड. जोगेंद्रसिंह चौहान, रफिक मिस्त्री, शेख कासीम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयभवानीनगर, सिडको घटनेच्या चौकशी अहवालाला मुहूर्त लागेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगर, सिडकोतील घटनेच्या चौकशी अहवालाला मुहूर्त लागत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सादर केला जाणारा चौकशी अहवाल मंगळवारपर्यंत सादर केला जाण्याची शक्यता आहे.

जयभवानीनगरमधील नाल्यात पडून वाहून गेल्यामुळे भगवान मोरे यांचा मृत्यू झाला. ही घटना १९ जूनच्या रात्री घडली. त्यानंतर २१ जूनच्या मध्यरात्री सिडको एन ६ येथील नाल्यात पडून चेतन चोपडे या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मोरे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आयुक्तांच्या स्तरावर केली जात आहे. दोन दिवसांत त्याचा अहवाल सादर केला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते, पण अद्याप अहवाल सादर झालेला नाही. चोपडे मृत्यू प्रकरणाचा अहवाल शुक्रवारी सायंकाळ पर्यंतच सादर केला जाणार होता. शहर अभियंता सखराम पानझडे यांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. पानझडे यांचा अहवाल देखील सादर झाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग दोन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. ते परतल्यानंतर चौकशी अहवाल पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारी अहवाल महापौर व आयुक्तांना सादर केला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकासह अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

$
0
0

औरंगाबाद : जयभवानीनगर येथे भगवान मोरे यांचा, तर सिडको एन सहा भागात चेतन चोपडे यांचा नाल्यात पडून मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये स्थानिक नगरसेवक, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी एन सहा माता मंदिर चौकात नाल्यात पडून एकाचा मृत्यू झालेला होता. अशा घटनानंतरही संबंधितांनी कोणतीही काळजी घेतली नाही. या प्रकरणात संबंधित नगरसेवक तसेच महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोश पवार, सतनामसिंग गुलाटी, आशिष सुरडकर, अशोक पवार, भारत गायकवाड यांनी पोलिस उपायुक्तांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका आयुक्त-महापौरांवर गुन्हा दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नालेसफाई नसल्याने दोन नागरिकांना जीव गमवावा लागल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तसेच महानगरपालिका बरखास्त करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसला आहे. योग्य पद्धतीने नालेसफाई नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. भगवान मोरे व चेतन चोपडे यांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतरही प्रशासन उदासीन आहे. या घटनेला जबाबदार आयुक्त व महापौर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा असे संभाजी ब्रिगेडने निवेदनात म्हटले आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मदत करावी आणि तात्काळ नालेसफाई करा अशी मागणी संघटनेने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, राहुल भोसले, वैशाली खोपडे, रेणुका सोमवंशी, रेखा वाहटुळे, रवींद्र वाहटुळे, जयसिंग वाहटुळे, वैभव बोडखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाजाला भिडणारा ‘ब्ल्यू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सामाजिक अंगाने वास्तवाचा वेध घेणारा 'ब्ल्यू' हा फ्रेंच चित्रपट रसिकांसाठी नावीन्यपूर्ण पर्वणी ठरला. तत्कालीन समस्यांवर मात करण्याचा मानवी स्वभाव आणि सामाजिक अडथळे चित्रपटात खुबीने मांडले आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या वतीने चित्रपट चावडी उपक्रमात ब्ल्यू (फ्रेंच) चित्रपट दाखवण्यात आला. एमजीएमच्या आइन्स्टाइन सभागृहात शनिवारी सायंकाळी हा उपक्रम झाला. फ्रेंच भाषेत ब्ल्यू, व्हाइट आणि रेड या तीन चित्रपटांची मालिका तयार करण्यात आली होती. पोलिश दिग्दर्शक कियास्लोव्हस्की याने फ्रान्सच्या ध्वजावरील तीन रंगानुसार तीन चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांद्वारे स्वातंत्र्य, समता व बंधुता या नैतिक मूल्यांचे तत्त्वज्ञान मांडले आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्ल्यू चित्रपटातून जीवनाचे अंग, प्रखरता आणि लढा यांचे समग्र दर्शन घडते. रस्ते अपघातात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या एका स्त्रिची ही गोष्ट आहे. ही ज्युली नावाची स्त्री संगीतकाराची पत्नी असते. अपघातात मुलगा व पती गमावल्यानंतर तिच्या आयुष्याच्या अर्थच नष्ट होतो. खचलेले ज्युली आत्महत्या करण्याचा प्रयत्नसुद्धा करते. शेवटी अनिच्छेने परिस्थितीशी जुळवून घेत जगण्यासाठीची धडपड करते. पूर्वायुष्यातील अनेक प्रसंगांशी सतत होणाऱ्या संघर्षाला तोंड देत तिने घेतलेला स्वातंत्र्याचा शोध म्हणजे ब्ल्यू चित्रपट आहे.

\Bउत्तम अभिनय

\Bकथानकाला साजेसे चित्रीकरण, पार्श्वसंगीताचा नेमका वापर आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवले. विशेषत: कुटुंबाच्या विरहानंतर ज्युलीने स्वत:चा घेतलेला शोध प्रत्ययकारकरित्या दाखवण्यात आला. एमजीएम फिल्म आर्टचे संचालक शिव कदम यांनी प्रास्ताविक केले. तर सोहम पिंगळीकर यांनी चित्रपटाची माहिती दिली. या उपक्रमासाठी सुबोध जाधव, प्रा. रेखा शेळके आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त आयुक्तांवर हल्ला करणाऱ्यास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना मारहाण करणाऱ्या राजू गायकवाड यास सिडको पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दहातोंडे यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सिडकोतील एन-६ परिसरातील रस्त्यावरील सखल भागात पावसाचे पाणी साचल्यामुळे नाल्याचा अंदाज न आल्याने बुलेटस्वार चेतन चोपडे हा त्यात पडून मरण पावल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पाहण्यासाठी आलेल्या अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करत असताना त्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधत असताना संभाजी कॉलनीमध्ये राहणाऱ्या राजू गायकवाडने या घटनेस तुम्हीच जबाबदार असल्याच्या म्हणत भालसिंग यांच्या श्रीमुखात भडकावली. भालसिंग यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गायकवाड विरोधात भादंवि ३५३, ५०४,५०६ कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गायकवाड यास शुक्रवारी रात्री अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. बचाव पक्षाच्या वतीने प्रवीण कांबळे यांनी त्याची बाजू मांडताना पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत अटक केल्याचे सांगितले. या घटनेचे वेळी उपस्थित असलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असताना देखील त्याच्यावर गुन्हे दाखल केले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने रवी गायकवाड यास कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बससाठी चार कंपन्या सरसावल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटी बससाठी देशपातळीवर मान्यता असलेल्या चार कंपन्यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या कंपन्यांनी निविदा दाखल केली, तर स्मार्टसिटीसाठी स्थापन केलेली एसपीव्ही निकषानुसार कोणत्या कंपनीची निविदा स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सिटी बस सुरू करण्यासाठी पंधरा ऑगस्टचा मुहूर्त साधला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महापालिकेच्या प्रयत्नाने सिटी बस सेवा सुरू केली जाणार आहे. स्मार्टसिटी प्रकल्पात अर्बन ट्रॅफिक मोबॅलिटी अंतर्गत सुमारे १४८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीमधून सिटी बससेवा सुरू करण्यात यावी यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पालिकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी स्मार्टसिटीच्या एसपीव्हीचे (स्पेशल पर्पज व्हेकल) अध्यक्ष सुनील पोरवाल यांच्याकडे पाठपुरावा केला. पोरवाल यांनी सुरुवातीला १५० पैकी ५० बस खरेदीला मान्यता दिली. डॉ. निपुण विनायक यांनी पालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबईत जावून पोरवाल यांची भेट घेतली आणि औरंगाबाद शहरात सिटी बस सेवा सुरू करणे किती गरजेचे आहे हे पटवून सांगितले. पन्नासच्या ऐवजी शंभर बस खरेदी केल्यास मेंटेनन्स आणि ऑपरेटरच्या नियुक्तीत स्पर्धा होईल. मोठे कंत्राटदार यात सहभागी होतील आणि शहराला चांगली सुविधा प्राप्त होईल असे मत मांडले. त्यामुळे पोरवाल यांनी शंभर बसेस खरेदीला मान्यता दिली. पोरवाल यांची मान्यता मिळताच डॉ. विनायक यांनी सिटी बस खरेदीसाठी निविदा काढली.

दर्जेदार बससाठी प्रयत्न

निविदा काढल्यानंतर चार बड्या कंपन्यांचे प्रतिनिधी एसपीव्हीचे मुख्याधिकारी या नात्याने डॉ. विनायक यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. प्रीबिड बैठकीत त्यांनी आपले मुद्दे मांडले. ६ जुलै रोजी निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. चारही बड्या कंपन्यांनी निविदा दाखल केल्यास चांगली स्पर्धा होईल व दर्जेदार बस मिळतील असे मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शंभर सिटीबस प्राप्त होण्यासाठी डिसेंबर महिना उजाडणार आहे. त्यापैकी दहा ते पंधरा सिटी बस पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर सुरू केल्या जातील, तसे प्रयत्न देखील पुरवठादार कंपनीची नियुक्ती करताना केले जाणार आहेत.

असे आहे स्वरूप

- १४८ कोटींची तरतूद

- १५० बसची खरेदी

- १०० बस पहिल्या टप्प्यात

- ३४ आसन क्षमता

- डिझेल बस , नॉन एसी प्रकार

- मिडीबस आकारात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद : ध्यानाचे ‘गोल्ड रेकॉर्ड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी शनिवारी अर्धा तास ध्यानधारणा करत गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले. जागतिक पातळीवर रेकॉर्ड झाल्याची नोंद घोषित होताच सहभागी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला.

योग, ध्यानधारणेबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी तापडिया कासलीवाल मैदानावर दिव्य ऊर्जा योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य कुशाग्रनंदी महाराज, आचार्य देवनंदीजी, एनर्जी गुरू अरिहंतऋषी भट्टारक स्वामी, आचार्य जितेंद्र स्वामी, क्रिकेटपटू धवल कुलकर्णी, गायक स्टीवन बेन, अभिनेता अस्मित पटेल, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडले, विनोद घोसाळकर, संयोजक किशनचंद तनवाणी, संजय कासलीवाल यावेळी उपस्थित होते. एक हजार १९ विद्यार्थ्यांनी ओंकार, चंद्र, गोलाकार, त्रिकोण या आकारात एक चिन्ह तयार केले. आणि अर्धा तास ध्यान करत रात्री आठ वाजून ४८ मिनिटांनी 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'वर नाव कोरले. असा विक्रम पहिल्यांदाच झाला आहे, अशी घोषणा कंपनी अधिकारी निखिल पटेल यांनी करताच उपस्थितींनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी ऊर्जा योगचे संस्थापक तथा एनर्जी गुरू अरिहंत ऋषी म्हणाले, 'आजघडीला महाराष्ट्रात शेतकरी, तर देशभर किरकोळ कारणामुळे असंख्य व्यक्ती नैराश्यात जाऊन आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. ज्या भारताच्या संतानी जगाला योगासन आणि ध्यान दिले. त्या देशात आत्महत्या होणे धक्कादायक बाब आहे. संपूर्ण भारतीयांनी योगासन आणि ध्यान अंगिकारले तर भारतात आत्महत्या होणार नाहीत.'

आचार्य कुशाग्रनंदी म्हणाले, 'आज जगभरात अशांतता आणि हिंसेचे वातावरण आहे. मनशांती हवी असल्यास योगासन आणि प्राणायामाची नितांत आवश्यकता आहे. योगासन आणि प्राणायाम सर्व जाती आणि धर्मांचा आत्मा आहे.' 'आजघडीला प्रत्येकजण एकमेकापासून दूर गेलेला आहे. सर्व दुखाचे मूळ मोह मायेमध्ये आहे. साधना करताना मोह मायेपासून दूर राहिल्यास तुमच्या साधनेत अडथला निर्माण होणार नाही,' असे आचार्य देवनंदी म्हणाले.

मान्यवरांचा गौरव

कार्यक्रमात ऊर्जा रत्न पुरस्काराने आचार्य देवनंदी दिव्य, सिंधूताई सपकाळ, आनंद वैशंपायन, डॉ. गिरीश वेलणकर, रावसाहेब दानवे, किशनचंद तनवाणी, संजय कासलीवाल, माणिकचंद गंगवाल, ललित पाटणी, प्रमोद कासलीवाल, मनोज साहुजी यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी ऊर्जा रत्न जीवनगौरव पुरस्काराने डी. बी. कासलीवाल, मिठालाल कांकरिया, कमल पहाडे, जी. एम. बोथरा, मंजू ठोळे, डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ, सुनील साहुजी यांचा सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोगले, सोनींसह सहा सदस्य कार्यकारिणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील उद्योजकांना एकत्रित करणाऱ्या चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए)च्या कार्यकारिणी सदस्य मंडळात नियमानुसार सहा नवीन सदस्यांना शनिवारी झालेल्या सुवर्णमहोत्सवी सर्वसाधारण सभेत निवडण्यात आले. त्यात ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, गिरीधर संगनेरिया, द्वारकाप्रसाद सोनी यांच्यासह सहा सदस्यांचा समावेश आहे. एक जुलै रोजी नवीन कार्यकारिणी जाहीर होईल.

सीएमआयएची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी सीएमआयए हॉलमध्ये झाली. अध्यक्ष प्रसाद कोकिळ यांनी गेल्यावर्षीच्या कामकाजाचा आढावा घेतला. सचिव विनोद नांदापूरकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सीएमआयएच्या घटनेप्रमाणे दर दोन वर्षांनी सहा कार्यकारिणी सदस्य निवृत्त होतात. त्यानुसार २०१६ मध्ये असलेले सहा सदस्य निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर राम भोगले, गिरीधर संगनेरिया, द्वारकाप्रसाद सोनी, नितीन काबरा, अद्वैत कंक, सुरेश तोडकर यांची बिनविरोध निवड झाली. नवीन कार्यकारिणी सदस्य व गेल्या कार्यकारिणीतून जे निवृत्त झाले नाहीत अशांमधून वर्ष २०१८ -१९ ची कार्यकारिणी निवडण्यात येईल. निवडणूक समिती अध्यक्ष म्हणून प्रा. मुनिष शर्मा यांनी तर सदस्य म्हणून गौतम नंदावत, आशिष गर्दे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलताबाद रस्त्यासाठी तरतूद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दौलताबाद घाट सुरू होताना ऐतिहासिक कमानीतून वाहनांना ये - जा करावी लागते. हा रस्ता अरुंद असल्याने वर्षानुवर्षे नागरिकांना त्रास होत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी प्रस्तावित बायपाससाठी सविस्तर प्रकल्प अहवालही सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी देऊन यंदाच्या कामात समावेश करावा, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

खासदार खैरे यांनी दिल्लीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चेअरमन वाय. एस. मल्लिक यांची भेट घेऊन शहराशी संबंधित चार प्रस्तावांचे सविस्तर निवेदन दिले. औरंगाबाद - धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ विस्तारीकरण व मजबुतीकरण सुरू आहे. सोलापूर - येडशी व येडशी - औरंगाबाद या दोन टप्प्यांचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. औरंगाबाद ते धुळे हा तिसरा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही. करोडी - तेलवाडी मार्गे कन्नड असा हा रस्ता प्रस्तावित आहे. या संदर्भात करोडी तेलवाडी परिसरात पाच किलोमीटरचा वळविण्याबाबत विचार होऊ शकतो. असे झाले तर परिसरातील अनेक गावांची अडचण दूर होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू होण्यापूर्वी याबाबत विचार करावा, असे पत्रात म्हटले आहे.

जालना रोड व बीड बायपासच्या मजबुतीकरणाची घोषणा २५ डिसेंबर २०१५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक धोरणामुळे हा प्रस्ताव अद्याप मार्गी लागलेला नाही. दोन्ही रस्ते शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार खैरे यांनी केली आहे. औरंगाबाद - पैठण रस्ता चौपदरी करण्याची घोषणा झाली होती. या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. मात्र हे करताना नागरिकांना अजिबात विचारात घेतले जात नाही. पर्यटन व धार्मिकदृष्ट्या या रस्त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रस्त्याबाबत काही आक्षेप आहेत. डीपीआरमध्ये सुधारणा केली तर दहा किलोमीटरच्या रस्त्याचा फायदा होऊ शकते, याबाबत आपण लक्ष घालावे असे मल्लिक यांना खैरे यांनी लिहिले आहे.

\Bदौलताबाद बायपास करा

\Bदौलताबाद ते खुलताबाद रस्त्यावर घाट सुरू होण्यापूर्वी ऐतिहासिक कमानीतून रस्ता सद्यस्थितीत वापरात आहे. हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आली की वाहतूक कोंडी होते. वेरूळ, खुलताबाद, म्हैसमाळ ही पर्यटन, धार्मिक स्थळे परिसरात आहेत. जगभरातील पर्यटक या भागात येतात. वाहतूक कोंडीमुळे मोठी अडचण होते. बायपाससाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्यात आला आहे. ३.५० किलोमीटरच्या रस्त्यासाठी ७८ कोटींची आवश्यकता आहे. 'एनएचएआय'च्या यंदाच्या नियोजनात या बायपासचा समावेश करावा, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगदिन उत्साहात

$
0
0

औरंगाबाद : जन शिक्षण संस्थानतर्फे औरंगपुरा येथील बलवंत वाचनालयात योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष झंवर होते. योग शिक्षिका सुशिला बन्सवाल, जन शिक्षण संस्थानचे प्रभारी संचालक रणधीर गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास संस्थानच्या प्रशिक्षिका, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालक पौर्णिमा कुलकर्णी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीनही ऐतिहासिक पुलांकडे दुर्लक्ष

$
0
0

मेनलीड (फोटो वेगळ्या फाइलमध्ये सोडले आहेत.)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

बारापुल्ला गेट, मकाई गेट आणि महेमूद दरवाजा (पानचक्कीचा पूल) येथील तीनही ऐतिहासिक पुलांकडे महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पश्चिम औरंगाबादला जोडणारे हे तीनही पूल धोकादायक झाले आहेत, तरीही त्यावरून दररोज सुमारे दीड लाख नागरिकांची ये-जा सुरू असते. या पुलांच्या दुरुस्तीचे मात्र पालिका नाव घेत नाही.

जुन्या औरंगाबाद शहरातून पश्चिम भागाकडे शहराबाहेर जाण्यासाठी खाम नदीवरून तीन पुल बांधण्यात आले होते. यात बारापुल्ला गेट, मकाई गेट आणि महेमूद दरवाजा पानचक्कीचा पूल या तीन पुलांचा समावेश आहे. या पुलांचे वय आता ३०० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. हे दगडी पूल जुन्या पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. या पुलांचे काही भाग पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलांचे वय संपल्याचे जाहीर केले होते. यानंतर महानगर पालिकेनेही पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले. या पुलांचा वापर जड वाहतूकीसाठी करून नये, अशी सूचनाही काढण्यात आली होती. शहर वाहतूक पोलिसांनी धोकादायक पुलावरून जडवाहनांची वाहतूक बंद केली होती. यानंतर या पुलावरून बससह अन्य मोठ्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. बारापुला गेटवरून टिप्पर आणि छोट्या आकाराच्या ट्रकची वाहतूक होत असल्याने या पुलांच्या बाहेर लोखंडी पोल लावण्यात आले आहेत.

ऐतिहासिक पुलांची कालमर्यादा संपल्याने पर्यायी पूल उभारावा, या मागणीसाठी शहरातील इकबालसिंग गिल यांनी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. तसेच तत्कालीन नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनीही पुलाचे काम सुरू करा, या मागणीसाठी उपोषण केले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही पूल तयार करण्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बारापुल्ला गेटच्या बाहेर असलेला हा पूल काही ठिकाणी कमकुवत झालेला आहे. शिवाय खालच्या भागातूनही वाहतूक सूरू आहे. महेमूद दरवाजाच्या बाहेरचा पूल आणि मकाई गेट या पुलांचीही अवस्था खराब झाली आहे.

…………

असा होतो वापर

बारापुला या पुलावरून दररोज छावणी, भावसिंगपुरा, भीमनगर, नंदनवन कॉलनी, मिलिंद नगरसह वाळूज, दौलताबादकडे शहरातून जाणारी वाहने जात असतात. तर महेमूद दरवाज्याच्या पुलावरून विद्यापीठ, मिलिंद इंजिनीअरिंग कॉलेजसह आंबेडकर लॉ कॉलेजकडे जाणारी वाहने जात असतात. मकाई गेट या पुलाचा वापर हा बेगमपुरा या भागात राहणाऱ्या नागरिकांचा हा रस्ता आहे. या पुलावरून हजारो छोटी वाहने दररोज जात असतात.

……………

असे झाले पयत्न

तत्कालीन आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या काळात तीन ऐतिहासिक पुलांना पर्यायी पूल बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याबाबत तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय मांडला होता. अजित पवार यांनी ११ कोटी रुपये पुलासाठी देण्याची घोषणा केली होती. यासाठी महापालिकेकडून प्रस्ताव देण्याबाबत सूचना केली होती. महापालिकेने प्रस्ताव देण्यास उशीर केला. यामुळे किंमती वाढल्या तसेच तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या शासनाकडून एक रुपयाही पुलांसाठी मिळाला नाही.

…………………

खाम नदीला पूर असल्यास पुलाचे होऊ शकते नुकसान

वर्ष २००५ ला शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन खाम नदीला मोठा पूर आला होता. पूर ओसरल्यानंतर पूल जीर्ण झाल्याचे लक्षात आले होते. यंदाही मोठा पाऊस होऊन खाम नदीला पूर आल्यास पुलाची अवस्था आणखी खराब होऊ शकते.

……………

कोट

मागील दोन वर्षांपासून विधानसभेसह राज्यपातळीवर या तीनही पुलांच्या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. महाड पूल तुटल्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही औरंगाबादच्या या पुलाच्या विषयाबाबत कल्पना देण्यात आली होती. या पाठपुराव्यानंतरही महापालिकेकडून कोणताही प्रतिसाद नव्हता. मकाई गेटच्या सौंदर्यीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र, पुढे काहीही पाऊल उचलले गेले नाही. या प्रकरणात आता पीडब्ल्युडीने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यासह संबंधित विभागाला पाठविण्यात आला आहे. या पुलामुळे जर कोणताही अपघात घडला यासाठी महापालिका आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील.

आमदार इम्तियाज जलील

………

पाठपुरावा करावा

दीड लाख लोकसंख्या असलेल्या भागाचा हा महत्त्वाचा विषय आहे. याबाबत विधानसभेत आवाज उचलला होता. तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांनी ११ कोटी रुपये जाहीर केले होते. हे पैसे का आले नाही? याची विचारणा आताच्या आमदारांनी विधानसभेच्या विशेष कमिटीला करायला हवी. महापालिकेच्या हद्दीमधीला हा महत्त्वाचा विषय असताना, याकडे संबधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यांनी वेळीच या पुलांना पर्यायी रस्त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडून निधीची मागणी केली असती तर हा प्रश्न मिटला असता. या पुलाला पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी कार्यवाही लवकरात लवकर करून या भागातील जनतेला जाण्याची सोय व्हायला हवी.

माजी आमदार प्रदिप जैस्वाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमपीएससी’ परीक्षेला ५९ टक्के उपस्थिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगतर्फे (एमपीएससी) रविवारी 'महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा' घेण्यात आली. औरंगाबाद शहरातील १४ परीक्षा केंद्रातून दोन हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उपस्थितीचे प्रमाण ५९ टक्के आहे.

एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या या पूर्व परीक्षेसाठी औरंगाबाद केंद्रातून चार हजार ८५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सकाळी ११ ते १२ या दरम्यान परीक्षा झाली. परीक्षा कक्षात परीक्षार्थींना सोडताना त्यांची कसून तपासणी करण्यात आली. नोंदणी केलेल्यापैकी दोन हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एक हजार ९६९ परीक्षार्थी गैरहजर होते. नोंदणी करूनही ४१ टक्के विद्यार्थी गैरहजर होते. नोंदणीनंतरही परीक्षा देणाऱ्यांची संख्या निम्मिच होते आहे. शहरात झालेल्या या परीक्षेसाठी ४८० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियुक्त करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचारप्रकरणी पोलिसाची रवानगी हर्सूल कारागृहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवून 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहून तरुणीवर वर्षभर अत्याचार करणारा पोलिस कर्मचारी अमोल शिवाजी सोनटक्के याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांनी रविवारी (२४ जून) दिले.

कन्नड तालुक्यातील २३ वर्षांची तरुणी शहरातील विधी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आली असताना पोलिस आयुक्तालयातील पोलिस कर्मचारी अमोल शिवाजी सोनटक्के याने संबंधित तरुणीचा मोबाइल नंबर मिळवून त्या क्रमांकावर शुभेच्छांचे संदेश पाठविले; तसेच बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीने नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी अमोलने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यावर कुंकू लावून खोटे मंगळसूत्र घातले. त्यानंतर घर भाड्याने घेऊन तिला 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये ठेवले आणि वेळोवेळी अत्याचार केला, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी आरोपी सोनटक्के याच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात २४ एप्रिल २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता व तेव्हापासून तो बेपत्ता होता. आरोपी सोनटक्के हा १७ जून रोजी रात्री पोलिसांना शरण आला होता. पोलिसांनी त्याला १८ जून रोजी अटक करून कोर्टात हजर केले असता, त्याला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणप्रश्नी बुधवारी उपोषणवैजापूर-तालूक्यातील संवदगाव येथील पाझर तला

$
0
0

वैजापूर : संवदगाव येथील पाझर तलाव दोनमध्ये झालेले अतिक्रमण काढण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने २७ जून रोजी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संवदगाव येथील पाझर तलाव क्रमांक दोनमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढावे, यासाठी गावातीलच निवृत्ती रंगनाथ सोनवणे हे काही दिवसापासून पाठपुरावा करीत आहेत, परंतु संबंधित अधिकारी अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करीत आहेत. अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांशी हातमिळवणी केली असून, या अधिकाऱ्यावर कारवाई करावी; तसेच अतिक्रमण काढावे, या मागण्यांसाठी सोनवणे हे उपोषण करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवरील दोन्ही कँटिन बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनवरील दोन्ही कँटीन बंद झाल्या असून सध्या प्रवाशांना जेवणाकरिता फक्त फुड प्लाझा हे एकमेव रेस्टॉरंट राहिले आहे. फुड प्लाझामध्ये आगीची घटना घडल्यानंतर ते काही दिवसांसाठी बंद करण्याचे संकेत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर दररोज दहा ते बारा हजार प्रवाशांची वर्दळ असते. त्यांच्यासाठी फलाट क्रमांक एक व दोन वर प्रत्येकी एक कँटीन आहे. याशिवाय आणखी तीन कँटिन चालविण्याचे कंत्राट बेंगळुरूच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने फलाट क्रमांक दोनवर कँटीन उभारणीला सुरू केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी फलाट क्रमांक एकवरील कँटीनचे कंत्राट संपल्यामुळे ते बंद करण्यात आले. फलाट क्रमांक दोनवरील कँटीन बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना फक्त फुड प्लाझाचा पर्याय आहे. फुड प्लाझामध्ये नुकतीच आग लागल्याची घटना झाल्यानंतर ते काही दिवसांसाठी बंद केले जाणार असल्याचे संकेत आयआरसीटीसीकडून मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images