Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कचरा हटवा अन्यथा आंदोलन

$
0
0

औरंगाबाद :

आगामी तीन दिवसांत जकात नाका येथे टाकलेला कचरा हटविण्यात यावा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवकांनी दिला.

जकात नाक्यावर टाकण्यात येणारा कचरा दिवसंदिवस वाढत चालला आहे. या कचऱ्यामूळे आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळा असल्यामुळे त्यावर पाऊसही मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे माशांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. जकात नाका येथे टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ही प्रक्रिया अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही.

आगामी तीन दिवसांत जकात नाक्यावरील कचरा उचलावा, अशी मागणी मोहसीन अहेमद, शेख मुनाफ, मोहम्मद नवाज, फजलुल्लाह खान, इब्राहिम पटेल, मीर हिदायत अली, डॉ. जफर खान, इसाक अंडेवाला, आबेदा बेगम, सलमा बानो, शमशाद बेगम, सिद्दीकी नईम सुल्ताना या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास जनआंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही माजी नगरसेवकांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकोणीस जणांच्या खांद्यावररेल्वे सुरक्षेचा ओझे

$
0
0

पान पाच मेनलीड, फोटोसाठी दोन कॉलम जागा सोडणे

औरंगाबाद :

औरंगाबाद ते मनमाड एवढ्या प्रचंड मोठ्या रेल्वेच्या परिसराच्या सुरक्षेसाठी अवघे २२ कर्मचारी कागदोपत्री आहेत. त्यातील एक अनफीट ठरला आहे तर दररोज कोणत्या तरी दोन जणांची साप्ताहिक सुटी येतेच. त्यामुळे दररोज केवळ १९ कर्मचारी रेल्वेच्या सुरक्षेचा भार वहात आहेत. यातही एखाद दुसऱ्याची रजा असल्यास ही संख्या आणखी कमी होऊन जाते. त्यामुळे रेल्वेसह रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वर्ष २००० मध्ये औरंगाबाद रेल्वे मार्गावरून दहा रेल्वे धावत होत्या. त्या काळात औरंगाबाद रेल्वे सुरक्षा दलाला २८ कर्मचारी देण्यात आले होते. १८ वर्षानंतर औरंगाबाद रेल्वे मार्गावर ५० रेल्वे धावत आहेत. तरीही सुरक्षेसाठी मंजूर पदे केवळ ३० आहेत. यातही मागील चार वर्षात आठ कर्मचारी कमी झालेले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांची बदली जालना व अन्य ठिकाणी करण्यात आली आहे. यामुळे फक्त २२ कर्मचारी या भागासाठी सध्या रेल्वे सुरक्षा दलाकडे आहेत. यातही एक कर्मचारी अनफिट ठरला आहे. तर कोणत्या ना कोणत्या अन्य दोन कर्मचाऱ्यांची निश्चितपणे साप्ताहिक सुटी येते. यामुळे सुरक्षेच्या ड्यूटीवर कायमस्वरूपी राहतात ते के‌वळ १९ कर्मचारी. त्यातही आणखी कोणाची आवश्यक रजा असल्यास कर्मचारी आणखी कमी होतात.

एवढ्या कमी संख्येतही पुन्हा औरंगाबादहून धावणाऱ्या सहा रेल्वेंवर यातीलच कर्मचाऱ्यांची स्कॉटिंग (गस्त) असते. त्यासाठी प्रत्येकी एका रेल्वेवर एक याप्रमाणे सहा कर्मचारी स्कॉटिंगवर जातात. उर्वरित कर्मचाऱ्यांमधूनच औरंगाबाद रेल्वे स्टेशनची सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरील ड्यूटी असलेला कर्मचारी, कोर्ट किंवा कार्यालयीन कामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक असते. हे सर्व गणित पाहता रेल्वे सुरक्षेचा या भागात आनंदीआनंदच आहे.

दोन पाळ्यांमध्ये हे सर्व कर्मचारी विभागले जात असल्यामुळे ही कर्मचारी संख्या अत्यंत अपुरी पडत आहे. ही बाब वारंवार रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आली. वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, संबंधितांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या संदर्भातील अनेक काम पडून रहात आहेत.

गुन्हे वाढले

औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या अख्त्यारित असलेल्या स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आहे. रेल्वेमध्ये मागील सहा महिन्यांत ५०० पेक्षा अधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हा आकडा मागीलवर्षी २३० इतका होता. गेल्या दोन महिन्यांत गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. तरीही रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

अनेक गाड्यांमध्ये स्कॉटिंगच नाही

देवगिरी, अजिंठा, शिर्डी साईनगर तसेच नगरसोल नरसापूर, सचखंड या गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात असतात. तर तपोवन एक्सप्रेससह अन्य गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाकडे कर्मचारी नसल्याने या गाड्यांची स्कॉटिंग होत नाही. यामुळे प्रवाशांसोबत अनेक अनुचित घटना घडतात. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथेही प्रवाशांना लुटीच्या घटना झालेल्या आहेत. तसेच फलाटावरून दुचाकी वाहने चालविण्याच्याही घटना या भागात घडल्या आहेत. अशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे कर्मचारीच नाहीत, मग गुन्हेगारांवर कारवाई होणार तरी कशी, असा प्रश्न पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टार्गेट ३९ हजारांचे, पूर्तता ३३ हजारांची

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद,

एकीकडे मागेल त्याला शेततळे योजनांचा सरकार डंका पिटवत असताना मराठवाड्यात मात्र योजना कासवगतीने सुरू आहे. विभागात ३९ हजार ४०० शेततळे तयार करण्याचे टार्गेट असताना आतापर्यंत केवळ ३३ हजार ३५ शेततळे पूर्ण करण्यात आले आहेत. योजनेअंतर्गत ८३ टक्के काम पूर्ण झाल्याने आता मराठवाड्यात योजनेचे हत्ती गेला शेपूट राहिले अशी अवस्था आहे.

पावसाची अनियमितेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना मुबलक पाणी त्यांच्या जवळच असावे यासाठी शासनाने शेतकऱ्यांची गरज ओळखुन मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली होती. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये ३९६०० शेततळे वाटप करण्याचे उद्दीष्ट होते, शेततळे बांधल्यानंतर प्रत्येक शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार होते, मात्र आतापर्यंत यातील केवळ ३३ हजार ३५ शेततळे (८३ टक्के) पूर्ण करण्यात आली आहे. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे पुन्हा शेततळे तयार करण्याला ब्रेक लागला आहे.

---.

४ हजार शेततळे उधारीवर

शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानानुसार ५० हजार रुपये देण्यात येतात, सध्या विभागात ३३ हजार ३५ शेततळे तयार असून यातील २८ हजार ६३१ शेततळे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना १३५ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. मात्र अद्यापही यातील ४ हजार ३७४ शेततळ्यांचे अनुदान देणे अद्यापही शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध तपासणी मोहीम

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते व मांस मटण मच्छी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत ७० जणांची तपासणी करून स्वच्छता ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

पावसाळी वातावरणात अन्नपदार्थ दूषित होण्याची शक्यता असते. माशांचा प्रादूर्भाव पसरून रोगराई पसरू शकते. या दृष्टिकोनातून उघड्यावर पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी मोहीम घेण्यात आली. जुना मोंढा भागात तसेच रेल्वे स्टेशन जवळील हमालवाडा येथे ही मोहीम घेण्यात आली. यामध्ये ३८ मटण, मच्छी विक्रेते तसेच मसाला, फरसाण, चायनीज, बिर्याणी, मिठाई विक्रेते अशा ३२ जणांची दुकाने तपासण्यात आली. या विक्रेत्यांना अन्नपदार्थ झाकून ठेवण्याचे तसेच इतर आवश्यक खबरदारी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या. ही कारवाई सह आयुक्त च. भा. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मि. दा. शाह, अधिकारी प्रशांत अजिंठेकर, निखिल कुलकर्णी, संजय चट्टे, अनिकेत भिसे, ऋषीकेश मरेवार व जाधवर यांनी केली. यापुढे देखील अशा विक्रेत्यांच्या तपासण्या नियमित करण्यत येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त शाह यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बंदिवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आजारी असलेल्या हर्सूल येथील महिला बंदिवानाचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मंगला दत्ता शिंदे (वय २७, रा. अंबानगर, सांगवी बुद्रूक, जि. नांदेड) असे या बंदिवानाचे नाव आहे. २७ जूनपासून या बंदिवानावर घाटीमध्ये उपचार सुरू होते. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मंगला शिंदे यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नांदेडच्या भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. कोर्टाने त्यांना डिसेंबर २०१५ मध्ये दोषी ठरवत सात वर्षाची शिक्षा सुनावली होती. मंगला शिंदे यांना नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हर्सूल कारागृहात रवानगी करून उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्ट - आयटी पार्कमधील उद्योजकांना वाजवी भाडे आकारणीबाबत दोन महिन्यात होणार निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमध्ये भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या गाळ्यांचे दर उद्योजकांना परडवतील असेच आकाराले जातील. यासाठी आगामी दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (१९ जुलै) विधान परिषदेत केली. आमदार सतीश चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये सूचना उपस्थित करून आयटी पार्कमधील उद्योजकांकडून जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचा सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता.

चिकलठाणा औद्योगिक परिसरात आयटी पार्क तयार करण्यात आले आहे. या आयटी पार्कमधील उद्योजकांकडून एमआयडीसी वसूल करीत असलेले भाडे जास्त असल्याचे प्रकरण महाराष्ट्र टाइम्सने उचलले होते. तीन भागांच्या मालिकेत 'मटा'ने उद्योजकांची सद्यस्थिती मांडली होती. या विषयावर गुरुवारी (१९ जुलै) रोजी सभागृहात आमदार सतीश चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आमदार सतीश चव्हाण यांनी चिकलठाणा औद्योगिक परिसरात माहिती व तंत्रज्ञान उद्यान इमारत ३५ वर्षापूर्वीची आहे. या ठिकाणी आयटी उद्योजक विविध सॉफ्टवेअरची निर्मिती करतात. सदरील सॉफ्टवेअर विदेशात देखील पाठविले जातात. मात्र, एमआयडीसीकडून याठिकाणी असलेल्या उद्योजकांना जाचक अटी घालून दिल्या असून जागेचे भाडे उद्योजकांनी परडवणारे नाही. एमआयडीसीकडून आयटी उद्योजकांसाठी आकारलेल्या भाड्याचे दर ७ रू. प्रति चौरस फूट दरावरून ४६ रू. प्रति चौरस फूट करण्यात आल्याने आयटी उद्योजक औरंगाबाद सोडण्याच्या तयारित असल्याची माहिती सभागृहात दिली. याशिवाय आपण स्वत: यासंदर्भात पुढाकार घेऊन उद्योगमंत्री महोदयांसोबत यापूर्वी बैठक घेतली होती. त्यात उद्योगमंत्र्यांनी सदरील भाडेवाढ कमी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, यावर अद्यापही काहीच कार्यवाही झाली नसल्याची माहितीही आ. सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडली.

या प्रश्नाच्या लेखी उत्तरात गाळेधारकांना लावण्यात येत असलेले प्रचलित विक्रीदर व मासिक भाडेपट्टीची पुनर्पडताळणी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर सादर करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले होते. मात्र, संचालक मंडळ यासंदर्भात किती दिवसात निर्णय घेईल? असा प्रश्न आ. सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला.

आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीने आयटी उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या गाळ्याचे दर जास्त वाढवले असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असल्याचे मान्य केले. यासंदर्भात आपण सदरील दराची पुनर्पडताळणी करून दर कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रस्तुत सुचनेनुसार गाळेधारकांना लावण्यात येत असलेला प्रचलित विक्रीदर व मासिक भाडेपट्टीची पुनर्पडताळणी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडून दोन महिन्यात यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन आयटी उद्योजकांना परडवतील, असे भाडे आकारले जाईल, अशी घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सभागृहात दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागात वीजबिल भरण्यासाठी मोबाइल व्हॅन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

ग्रामीण भागातील ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी महावितरणने मोबाइल व्हॅन सुरू केली आहे. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या हस्ते किन्ही (ता. सोयगाव) येथे या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.

वीजबिल भरणा केंद्र नसल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना नियमित वीजबिल भरणा करण्यास अडचण येत होत्या. त्यामुळे महावितरणने अशा गावात जाऊन ग्राहकांना वीजबिल सहजरित्या भरता यावे, यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्याचा निर्णय घेतला. कन्नड, औरंगाबाद ग्रामीण-१ व जालना-१ विभागात सध्या प्रायोगिक तत्त्वावर अशा मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आल्या आहेत. आठवडी बाजाराला आलेल्या नागरिकांना बाजाराच्या ठिकाणीच अथवा त्यांच्या गावातच वीजबिलाचा भरणा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. या मोबाइल व्हॅनमध्ये इंटरनेट, संगणक आणि प्रिंटर आदीची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय या वाहनात ग्राहकांना माहिती मिळण्यासाठी उद्घोषणा करण्याची सुविधाही आहे. वीजबिल भरणा केंद्र नसलेली गावे, दुर्गम वस्ती आणि गावे तसेच दाट लोकवस्ती मात्र मोजकेच वीज बिल भरणा केंद्र असलेल्या गावांमध्ये या व्हॅन जाणार आहेत. ज्या गावातील वीजबिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावातूनही या मोबाइल व्हॅन फिरविली जाणार आहेत.

कन्नड विभागासाठी मोबाइल व्हॅनचा शुभारंभ मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या हस्ते किन्ही (ता.सोयगाव) येथे करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, उपकार्यकारी अभियंता किरण पवार, सहायक अभियंता रवींद्र राऊळ, शाखा अभियंता अविनाश कुंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटन झाल्यानंतर लगेचच अनेक ग्राहकांनी बिल भरून या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. वीजबिल भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी वीज ग्राहकांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच तासात तीन एटीएम मशीन फोडणारा निघाला मनोरुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकाच दिवसात तीन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीला पकडण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सीसीटीव्ही आधारे शोध घेऊन पोलिसांनी लखन उर्फ प्रदीप वानखेडे (रा. छोटा मुरलीधरनगर) याला शुक्रवारी ताब्यात घेतले. संशयित आरोपी लखन हा मनोरुग्ण असून दारू व गांजाचे त्याला व्यसन आहे.

१३ जुलै रोजी शहरातील क्रांतीचौक व गारखेडा रिलायंस मॉल शेजारील एटीएम सेंटरमधील मशीन चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यामध्ये त्याला यश आले नसल्याने आरोपीने तेथून पलायन केले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकांकडून तपास सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणी एटीएम सेंटरच्या मशीन मधल्या कॅमऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज व शहरातील उस्मानपुरा, जालना रोड, गारखेडा भागातील सेफसिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यामध्ये एटीएम सेंटरमध्ये मशीन फोडणारा संशयित आरोपी निष्पन्न झाला. रेल्वे स्टेशनकडून हा आरोपी आला असल्याचे दिसत होते. पोलिसांनी पाळत ठेऊन शुक्रवारी सकाळी लखन उर्फ प्रदीप याला रेल्वे स्टेशन भागातच मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेतले. एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल वाघ, मनोज चव्हाण, भगवान शिलोटे, संतोश सूर्यवंशी, संजय खोसरे व हकीम पटेल यांनी ही कारवाई केली.

सात किलोमीटर अंतरात तीन एटीएमवर प्रयत्न

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये हा आरोपी १३ जुलै रोजी सकाळी साडेसात पावणे आठ वाजता रेल्वे स्टेशन भागाकडून कोकणवाडी परिसरात आला. या ठिकाणी त्याने एका खाजगी बँकेचे एटीएम स्क्रू ड्रायव्हरने फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याने क्रांतीचौक परिसरातील सेंट्रल बँकेच्या एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सायरन वाजल्यानंतरही आरोपी लखन हा निर्धास्त एटीएम सेंटरमधून बाहेर पडला. चालत चालत तो अमरप्रीत सिग्नल मार्गे गारखेडा भागातील रिलायंस मॉलकडे गेला. या ठिकाणी त्याने पुन्हा एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न देखील अयशस्वी झाल्यानंतर तो पुन्हा पायी चालत दर्गा चौकामार्गे रेल्वे स्टेशनला आला. एकूण सात किलोमीटरच्या पायपीटीत त्याने तीन वेळा हा प्रयत्न केला.

पोलिसांच्या चौकशीत कबुली

आरोपी लखन याला चौकशीसाठी एसीपी थोरात यांच्या दालनात आणण्यात आले. या ठिकाणी एसीपी थोरात व निरीक्षक सावंत यांनी त्याची चौकशी केली. यावेळी हा आरोपी असंबध बडबड करीत होता. त्याला एटीएम सेंटरमधील आरोपीचे फोटो दाखवले असता हा तर मीच आहे असे म्हणत तो कबुलीही देत होता. रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांनी देखील एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून हा आरोपी येडा लखन असल्याची माहिती दिली.

राँग साइड चालण्याची सवय

आरोपी लखनने त्याला आई भाऊ बहीण नसल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याला दारु व गांजाचे व्यसन आहे. रस्त्यावरून चालताना त्याला राँगसाईड चालण्याची सवय आहे. शुक्रवारी सकाळी दारुच्या नशेत तो रेल्वे स्टेशन भागात फिरत होता. त्याला पाळत ठेवून पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन वर्षानंतर अतिवृष्टीचे ४९९ कोटी प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल दोन वर्षांनंतर मराठवाड्यातील आठ लाख ९५ हजार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी ४९९ कोटी १८ लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. नेहमीच दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना २०१६ मध्ये एप्रिल, मे, जून ते ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने झोडपले होते.

२०१६ मधील अतिवृष्टीनंतर प्रत्येक विभागातील महसूल विभाग व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून संयुक्त पंचनामे करण्यात येऊन आवश्यक निधीसंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्या अतिवृष्टीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. २०१६ मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यभरात झालेल्या या नुकसानीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला होता. बहुतांश शेतकऱ्यांनी पीकवीमा काढला असल्यामुळे त्यांना भरपाई मिळाली. मात्र ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही अशांना मात्र कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नाही. शासनाच्या या निर्णयामुळे आता विभागातील पीक विमा न घेतलेल्या तब्बल नऊ लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. आवश्यक असलेल्या निधीची मागणी सर्व विभागीय आयुक्त कार्यलयाकडून मागवण्यात आली होती. सर्व विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या निधीच्या मागणीच्या प्रस्तावानसार आवश्यक निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत झालेला निर्णयही झाला होता. त्यानुसार आता राज्यभरात ५१५ कोटी २४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता शासनाने दिली आहे. यामुळे तब्बल ४९९ कोटी १८ लाख रुपये मराठवाड्यातील ८ लाख ९५ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासाठी विभागीय कार्यालयाकडून रक्कम जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील नागपूर विभागाला १७ लाख ८९ हजार रुपये, अमरावती सात कोटी ९९ हजार रुपये, नाशिक एक कोटी ६६ लाख रुपये, पुणे एक कोटी सहा लाख रुपये व कोकण विभागाला चार कोटी ४१ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

\Bदहा दिवसांत दुसऱ्यांना मदत \B

अवघ्या दहा दिवसांमध्येच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठी नुकसान भरपाई मिळाली आहे, १२ जुलै रोजी बोंडअळी बाधितांसाठीचा ४०७ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मिळाला होता. त्यानंतर आता ४९९ कोटी १८ लाख रुपयांचे वाटप होणार आहे.

\Bजिल्हानिहाय मंजूर भरपाई \B

जिल्हा.......................... शेतकरी ...................... रक्कम

औरंगाबाद........................२०१९................................५१ हजार

परभणी..............................३३५७...............................५ लाख ३५ हजार

हिंगोली..............................७९३४..............................१ कोटी २७ लाख

नांदेड.................................४९३९३९.........................२६१ कोटी ९५ लाख

बीड.................................१७८०१७...........................६८ कोटी १५ लाख

लातूर...............................९००२३.............................५५ कोटी २१ लाख

उस्मानाबाद..........................१२०६४०........................११२ कोटी ६ लाख

------------------------------------------------------------------.

एकूण...............................८९५९२९.........................४९९ कोटी १८ लाख

--------.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवसांत उचलला एक हजार टन कचरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडीचा प्रश्न पेटल्यानंतर गेल्या चार दिवसांत एक हजार टन कचरा उचलण्यात आल्याचा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. आजूनही ५०० ते ७०० टन कचरा रस्त्यावर पडून आहे. येत्या दोन दिवसांत हा कचरा देखील उचलला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरात साचलेला आणि उचलण्यात आलेला कचरा याबद्दल महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, '१६ जुलै रोजी पोलिस बंदोबस्त घेतला. त्यानंतर पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथील जागांवर कचरा टाकण्याचे काम सुरू केले. कांचनवाडी येथील जागेवर रोज २० ट्रक कचरा टाकणे सुरूच आहे. पडेगाव आणि चिकलठाणा येथे नागरिकांचा विरोध होत होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात या दोन्ही ठिकाणी कचरा टाकण्यात आला. १७ जुलै रोजी १५५ ट्रक कचरा टाकण्यात आला, त्यापैकी ९० ट्रक कचरा पडेगावला तर ७५ ट्रक कचरा चिकलठाणा येथील जागेवर टाकण्यात आला. १८ जुलै रोजी ७५ ट्रक कचरा शहरातून उचलण्यात आला. त्यापैकी २९ ट्रक कचरा पडेगावच्या जागेवर तर ४६ ट्रक कचरा चिकलठाणा येथील जागेवर टाकण्यात आला. १९ जुलै रोजी ४६ ट्रक कचरा चिकलठाणा येथे टाकण्यात आला. २० जुलै रोजी देखील २५ ट्रक कचरा चिकलठाणा येथे टाकण्यात आला. पडेगाव येथे कचरा टाकणे सध्या बंद करण्यात आले आहे.'

गेल्या चार दिवसांत सुमारे एक हजार टन कचरा उचलण्यात आला. ५०० ते ७०० टन कचरा शिल्लक आहे. पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी येथे टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर बायोकल्चर फवारण्याचे काम सुरू आहे, या तिन्ही ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रत्येकी वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रियेसाठी तीन निविदा पात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांच्या सिव्हिल वर्कसाठी तीन कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या आहेत. प्रकाश कन्स्ट्रक्शन, एन. के. कन्स्ट्रक्शन आणि हायटेक कन्स्ट्रक्शन या तीन कन्न्यांचे टेक्निकल बिड उघडण्यात आले आहे. शनिवारी कमर्शियल बिड उघडण्यात येणार आहे. यानंतर दर तपासून कमी दराची निविदा स्वीकारली जाणार आहे. पडेगाव आणि चिकलठाणा येथे संनियंत्रण समितीने निश्चित केलेल्या जागेवर १९ कोटी रुपये खर्च करून प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम केले जाणार आहे. त्यासाठी या निविदा मागविल्या होत्या.

दरम्यान, औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सिटीबस खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदेच्या दोन प्रयत्नांत टाटा कंपनीची एकच निविदा प्राप्त झाल्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडताळणीला दिरंगाई; सीआयडी चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुसुचित जमाती प्रमाणपत्र समितीचे सदस्य सचिव, उपायुक्त बी. पी. जगताप यांच्या मालमत्तेची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे; तसेच त्यांना निलंबित करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिल्याचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले.

आमदार सावे म्हणाले,'अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीचे सदस्य, सदस्य सचिव, उपसंचालक अशा विविध पदावर कार्यरत असताना जगताप यांनी कोर्टाने रद्द केलेल्या उमेदवाराला वैधता प्रमाणपत्र दिले. यामाध्यमातून मोठा संपत्ती गोळा केला; तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिक्षण सेवक पदावर कार्यरत असलेल्या प्रशांत बारलावार यांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली. हा मुद्दा मी सभागृहात मांडून चौकशीची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी संपत्तीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून, पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलगा होत नाही म्हणून वारंवार छळ करणारा, उपाशी ठेवणारा आणि मुलींसमोर बेदम मारहाण करुन पत्नीच्या मृत्युस कारणीभूत ठरलेला पती दिपक लक्ष्मण भिवसने याला जन्मठेप व चार हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी शुक्रवारी (२० जुलै) ठोठावली.

या प्रकरणी मृत सुनिता दिपक भिवसने (२५) हिचा भाऊ ज्ञानेश्वर सांडू नवगिरे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी दिपक लक्ष्मण भिवसने (२९, रा. वडोदचांदा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) याचे लग्न सुनिता हिच्याशी २००४ मध्ये झाले होते व लग्नानंतर त्यांना तिन्ही मुलीच झाल्या होत्या. सुनिता हिला मुलगा होत नाही म्हणून पती दिपक यासह सासरच्या मंडळीकडून तिचा सातत्याने शारीरिक-मानसिक छळ केला जात होता. शिविगाळ-मारहाण केली जात होती. २ ऑगस्ट २०१५ रोजी सुनिता मरण पावल्याचा फोन फिर्यादीला आला. फिर्यादी तिथे गेल्यावर त्याला मृत सुनिताच्या शरीरावर मारहाणीचे वळ दिसून आले. तसेच मृताची मुलगी मयुरी (८) ही फिर्यादी म्हणाली, सकाळी पप्पाने मम्मीला काठीने मारहाण केली व तू का मरत नाही असा जाब विचारला. आरोपी दिपक घराबाहेर निघून गेल्यानंतर मक्क्याच्या पोंग्यावर फवारणी करण्यात येणारे विषारी औषध मम्मीने प्राशन केले व झोपून गेली. त्यानंतर तिला सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भादंवि ४९८ (अ), ३०२ कलमान्वये सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दोन कलमान्वये शिक्षा

खटल्यावेळी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये मयुरी, डॉ. अनिरुद्ध गायकवाड व मयुरी यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ३०२ कलमान्वये जन्मठेप व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास, तर भादंवि ४९८ (अ) कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली.

मारहाणीमुळेच रक्तस्त्राव

या प्रकरणात, मारहाणीमुळे रक्तस्त्राव होऊन मानसिक धक्क्याने सुनिताचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी दिला आणि हा अहवाल महत्वपूर्ण ठरला. या अहवालाचा विचार करुन कोर्टाने शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारा ताब्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वादग्रस्त प्रकरणात महावितरणाच्या कर्मचाऱ्याला धमकावत गोळ्या खाऊन आत्महत्या करतो, असे म्हणत घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी मिलकॉर्नर येथील महावितरणाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

शेख मोबीन शेख नूर असे या तरुणाचे नाव आहे. मोबीन यांनी पडेगाव येथील त्यांचा वीज जोडणी कायमस्वरुपी खंडित करण्याचा अर्ज २५ एप्रिल रोजी महावितरणाला दिला होता. त्यानुसार त्यांचा पुरवठा खंडीत करून मीटर काढण्यात आले होते. यानंतर २४ मे रोजी मोबीन यांनी या जागेवर नवीन वीज पुरवठा देऊ नये असा अर्ज केला होता. दरम्यान २३ मे रोजी शेख अब्दुल राजीख अब्दुल रहीम रा. अन्सार कॉलनी यांनी ती जागा खरेदी केल्याची इसार पावती, नगरसेवकाचे रहीवासी प्रमाणपत्र तसेच आवश्यक कागदपत्र सादर करीत नवीन वीज पुरवठा देण्यासाठी अर्ज केला होता. विधी सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार ९ जून रोजी या ठिकाणी नवीन वीज पुरवठा देण्यात आला होता. हा वीज पुरवठा खंडित करण्याची मागणी करीत शुक्रवारी मोबीन यांनी महावितरणाच्या कार्यालयात येऊन गोंधळ घातला. सुरक्षारक्षकाची देखील त्यांनी दमदाटी करीत आत्महत्या करतो, असे म्हणत कोणत्या तरी गोळ्या खाल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सिटीचौक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मोबीनला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर च्या बातमीला जोड

$
0
0

समांतर जलावाहिनीच्या प्रस्तावाबद्दल २४ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना व भाजपतर्फे प्रस्तावाला अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त होणार असल्याचे मानले जात आहे. पाणीपट्टीत वाढ नको, योजनेचे काम पूर्ण झाल्यावर अडीच वर्षांनी नळ जोडण्यांना मीटर बसवण्याचे काम सुरू करणे आणि योजनेच्या वाढीव खर्चाची हमी शासनाने घेणे या मुद्यावर शिवसेना, भाजपतर्फे समांतर जलवाहिनीच्या नवीन प्रस्तावाबद्दल सकारात्मक विचार केला जाणार आहे. 'पीपीपी' तत्त्वावरच्या या प्रस्तावाबद्दल महापालिकेतील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या 'एमआयएम'ची भूमिका काय असेल, याबद्दल पालिका वर्तुळात उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीकविम्याचे अर्ज ऑफलाइन स्वीकारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पीकविमा भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असून सर्व्हर डाउन असल्याने शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यास अडचणी होत येत आहेत. त्यामुळे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेने औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच सहकार विभागाला दिला. पीकविमा भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै आहे.

पीकविमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी होणाऱ्या त्रासबद्दल शिवसैनिकांनी गुरुवारी जिल्हा सहकारी बँकेवर धडक मारली. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना अर्ज दाखल करता आलेले नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धतीमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. तांत्रिक अडचण, सर्व्हर डाउन असणे, यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत, बँक कर्मचारी शेतकऱ्यांशी अत्यंत उद्धटपणे बोलतात, असा आरोप शिवसैनिकांनी केला. बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची भेट घेत शिवसैनिकांनी ऑफलाइन अर्ज स्वीकारा, अन्यथा तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा दिला. पाटील यांच्यासह सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनाही मागण्याचे निवेदन दिले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हा प्रमुख कृष्णा डोणगावकर, राजेंद्र राठोड, मारूती साळवे, अनिल पोलकर, बाळासाहेब थोरात, संतोष जेजुरकर, नगरसेवक मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरुंच्या समर्थनात मूक मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आमदार सतीश चव्हाण व उत्कर्ष पॅनलचा हस्तक्षेप वाढला आहे. 'उत्कर्ष'चे अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य विद्यापीठाची हेतुपुरस्सर बदनामी करीत असल्याचा आरोप करीत विद्यापीठ विकास मंचने मूक मोर्चा काढला. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मंचने केली.

विद्यापीठातील राजकारण वेगळ्या वळणावर पोहचले आहे. उत्कर्ष पॅनलने बुधवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला शह देण्यासाठी विद्यापीठ विकास मंचने शुक्रवारी मूक मोर्चा काढला. तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलकांनी कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण दूषित होऊ देऊ नये, बहुजन व अल्पसंख्याकांना विविध प्राधिकरणावर भयमुक्त काम करू द्या, आमदार सतीश चव्हाण यांची दादागिरी थांबवा आणि माजी व्यवस्थापन परिषद सदस्यांची लुडबुड बंद करण्याची मागणी मंचच्या शिष्टमंडळाने केली. द्वेषभावनेतून कुलगुरूंवर निराधार आरोप करण्यात येत आहेत. उलट मागील पंधरा वर्षांच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. याबाबत कुलगुरू चोपडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंचचे निमंत्रक डॉ. गजानन सानप, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे, सिनेट सदस्य डॉ. भगवानसिंग डोभाल, योगिता होके पाटील, कालिदास भांगे, किशोर साळवे, प्रकाश तुरूकमाने, डॉ. सय्यद शरफून निहार, डॉ. वैशाली खापर्डे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

\Bआंदोलनाचे राजकारण\B

विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर काही संघटनांनी बुधवारी आंदोलन केले. या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती का आणि शैक्षणिक क्षेत्रात लाउडस्पीकरचा वापर करणे कितपत योग्य आहे असा सवाल मंचने उपस्थित केला. असंविधानिक शब्दांचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेने केली. तर विद्या परिषद निवडणुकीवेळी मंचने डॉल्बीचा दणदणाट कोणत्या नियमानुसार केला असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा बुधवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सक्षम समाज घडवण्यासाठी समाजात डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, शिक्षक यासह चांगले प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी घडवण्याची गरज आहे. यासाठी युवक, युवतींना या विषयीचे कौशल्यवर्धक मार्गदर्शन मिळावे याकरिता अखील भारतीय ब्राह्मण महासंघाने बुधवारी (२५ जुलै) रोजगार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सर्व समाजातील युवक, युवतींना या मेळाव्यामध्ये सहभाग घेता येणार आहे.

निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिरामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग सहसंचालक बी. एस. जोशी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये शासकीय सेवेत उपलब्‍ध असलेल्या जागा, त्यासाठी असलेले नियम व अटी, स्पर्धा परीक्षा, त्यातील विषय व कौशल्य, पेपर सोडवण्यासाठी वेळेचे नियोजन आदी आवश्यक बाबींवर अनुभवी व विषय तज्‍ज्ञांद्वारे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दोन सत्रामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातूनही युवक, युवती येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी अर्ज प्रत्येक जिल्ह्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या जिल्हा अध्यक्षांकडे उपलब्‍ध आहेत. पत्रकार परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक, एम. व्ही. देशमुख, प्रमोद झाल्टे, मिलिंद पिंपळे, गणेश उपाध्ये, कृष्‍णा देशपांडे, आकाश हर्सूलकर, गीता आचार्य, सुरेखा पारवेकर, अंजली गोरे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटे गुन्हे दाखल केल्याचा शिवसेनेचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी शिवसेनेने केलेले 'कचरा फेको' आंदोलनप्रकरणी राजकीय हेतूने जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केला आहे. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे केली. याप्रकरणी पारदर्शकपणे तपास करणार असल्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

कचरा प्रश्न सुटावा म्हणून शिवसेनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा फेकला. हा आंदोलनाचा एक भाग असल्याचे स्पष्टीकरण घोसाळकर यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान, पर्यावरण सरंक्षण अधिनियम, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट आदी कायद्यांच्या कलमाचा समावेश आहे. ही कलमे मागे घेण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. या शिष्टमंडळामध्ये संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, प्रदीप जैस्वाल, सभापती राजू वैद्य, विकास जैन व महिला जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी यांचा समावेश होता. या गुन्ह्यासंदर्भात सर्व माहिती घेऊन निपक्षपातीपणे तपास करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी शिष्टमंडळाला दिले.

अनेक जण पसार

जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा फेकल्यानंतर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये सहा कलमांचा समावेश आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह सव्वाशे जणांना आरोपी करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते फोन बंद करून पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वार्धक्यात कुटुंबाचे आदर्श व्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'वार्धक्य म्हणजे जीवनाचे नकारात्मक दिवस नाहीत. या काळात आयुष्याची नवी सुरुवात करता येते. आपले आयुष्य आपण जगलो. आता उरलेले दिवस स्वतःची काळजी घ्या. नव्या गोष्टी शिका व आपल्यासारख्याच इतरांचे आधार व्हा. तुमच्या कुटुंबाचे आदर्श व्हा,' असे आवाहन डॉ. नरेंद्र वैद्य यांनी केले.

मेघमल्हार व्याख्यानमालेत डॉ. नरेंद्र वैद्य यांनी गुरुवारी 'निरामय वार्धक्य' या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. त्यांनी वृद्धांना आरोग्य जपण्याचा सल्ला दिला. आपण कुणावर ओझे नसून समाजाचे स्वयंसेवक आहोत हा नवा विचार दिला. व्यासपीठावर प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी व स्फूर्ती महिला मंडळाच्या अध्यक्ष अलका अमृतकर होत्या.

डॉ. वैद्य म्हणाले की, वार्धक्याची चाहूल लागताच सर्वप्रथम माझी प्रकृती ठीक आहे ना या प्रश्नाने सुरुवात करा. या वयात भावनांचा उद्वेग अधिक असतो. अपेक्षाभंग झाला की, त्रास होतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ नीट ठेवा. आपल्या मुलांना तुम्ही कसे मोठे केले आणि नातवंड कशी मोठी होत आहेत. याची तुलना करू नका. नातवंड, मुलांपासून दूर न होता त्यांचे आधार व्हा. त्यांना आनंद देण्यापेक्षा त्यांच्याकडून आनंद घ्या. नव्या पिढीमध्ये विविधता व विपुलता दोन्ही आहे. त्यामुळे त्यांच्या सवयी वेगळ्याच असणार. वाद घालण्यापेक्षा नव्या पिढीसोबत जुळवून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी गायत्री कुलकर्णी यांनी गायन केले. समन्वयक पांडुरंग पाथ्रीकर यांनी सहाय्य केले. यावेळी उपाध्यक्ष मंगला जोशी, सचिव प्रभाकर सुभेदार, सहसचिव भरत कुलकर्णी, कोषाध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, व्ही. टी. चिकिरअप्पा, पांडुरंग नांदेडकर, उज्ज्वला तुल्ले, जयश्री पांडे, शिवकुमार पाडळकर, शोभना धारवाडकर, स्मिता जोशी उपस्थित होत्या.

\Bहलका व्यायाम करा \B

हलका व्यायाम, चालणे, धावणे किंवा सायकल चालवा, यामुळे स्नायूंना बळकटी मिटते. शरीर लवचिक ठेवण्यासाठी योगासने करा. हालचालींवर मर्यादा आल्या की, एकटेपणाची भावना बळावते. मलमूत्रविसर्जनाच्या अडचणी असेल तर खुशाल डायपर वापरा. विस्मरण, स्मृतीभंश सारख्या आजारांचे गांभीर्य ओळखा, असा सल्ला वैद्य यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images