Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

Maratha Protest: आणखी एका आंदोलकाचा मृत्यू

$
0
0

औरंगाबाद:

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान मंगळवारी विषप्राशन करणाऱ्या जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (५५) यांचा आज मृत्यू झाला. आंदोलनातील हा दुसरा बळी असून त्यामुळं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून सोनवणे यांनी काल विष प्राशन केलं होतं. ते औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी इथं राहणारे होते. कालच त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते.

याआधी कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांनी नदी उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर सरकारचा निषेध म्हणून मराठा संघटनांनी काल महाराष्ट्र बंद व आज मुंबई, ठाणे, पालघर व रायगड बंदची हाक दिली होती. हे आंदोलन सुरू असतानाच सोनवणे यांचा आज मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामास्त्र

$
0
0

औरंगाबाद :

मराठा आरक्षणासाठी आता राजीनामास्त्र उगारण्यात आले असून शिवसेनेचे कन्नड मतदारसंघातील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवला आहे.

मराठा आरक्षणाबाबत तातडीने अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी करत हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. हर्षवर्धन यांनी ई-मेलद्वारे आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवला आहे.

अध्यादेश काढा

मराठा आरक्षणावर केवळ चर्चाच सुरू आहे. त्यातून काहीच निष्पन्न होताना दिसत नाही. त्यात आता आत्महत्या होऊ लागल्याने स्थिती गंभीर बनली आहे. अशावेळी सरकारने अध्यादेश काढून स्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. मात्र सरकार स्वस्थ बसून आहे. त्यामुळेच मला विधानसभेचा सदस्य राहण्यात कोणतेही स्वारस्य राहिलेले नसून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन यांनी माध्यमांना दिली.

आणखी एक आमदार राजीनामा देणार

हर्षवर्धन जाधव यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूर मतदारसंघातील आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनीही राजीनामा देऊ केला आहे. ते उद्या आपला राजीनामा विधानसभाध्यक्षांना सुपूर्द करणार आहेत. माझ्या मतदारसंघातील कानडगाव येथील मराठा बांधव काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे जलसमाधी घेतली. ही दु:खद घटना आणि मराठा समाजाचा स्वाभिमान लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला आहे, असे चिकटगावकर यांनी आपल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. दरम्यान, औरंगाबाद पंचायत समितीचे सदस्य अनुराग शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी चालकांना २५ रुपयांत पोळी-भाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी महामंडळात काम करणाऱ्या एसटी चालक, वाहक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना वाजवी दरात जेवण मिळावे यासाठी २५ रुपयांमध्ये पोळी भाजी देण्याची योजना मध्यवर्ती बस स्थानक आणि सिडको बस स्थानकावर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

एसटी महामंडळात कार्यरत असलेले कर्मचारी स्वत:च्या घरापासून दूर प्रवासात कर्तव्यावर असल्याने अशा परिस्थितीत त्यांना घरचे जेवण मिळत नाही. या कर्मचाऱ्यांना रास्त दरात पोळी भाजी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आगामी २७ जुलैपासून आरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानक येथे दररोज सकाळी ११ ते दुपारी तीन व सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत फक्त २५ रुपये अल्पदरात पोळी भाजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा लाभ मुक्कामी असणाऱ्या व इतर ठिकाणी मुक्कामी जाणाऱ्या चालक - वाहक यांना होणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीकांत महाराज पादुकांचे पूजन शुक्रवारी

$
0
0

औरंगाबाद : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अन्वा येथील आजूबाई संस्थानचे सदगुरू लक्ष्मीकांत महाराज यांच्या पादुकांच्या महापूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी (२७ जुलै) आयोजित करण्यात आला आहे. सिडकोतील सप्तपदी मंगल कार्यालयात सकाळी आठ वाजता पूजन होणार आहे. चंद्रग्रहणामुळे पादुका पूजन सकाळीच होईल, असे संयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. यावेळी सव्वाकोटी जपानुष्ठान सोहळ्याची सांगता, सदगुरूच्या पोथीचे पारायण व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पारायणासाठी इच्छुक भाविकांनी संतोष ठाकरे, मंदार देशपांडे यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्त विविध कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुरुपौर्णिमेनिमित्त येत्या शुक्रवारी (२७ जुलै) शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. गुरू कल्कीजी महायोग परिवारातर्फे तिवारी मंगल कार्यालय येथे शुक्रवारी दुपारी चार वाजता श्री. गुरुपूजा करण्यात येणार आहे. यात ध्यान, धारणा, भजन, हवन, पूजन होणार असून गुरू कल्कीजी यांचे मार्गदर्शन, प्रवचन सायंकाळी सहा वाजता होणार आहे. तर रात्री भजनांचा कार्यक्रम होणार असून भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन महायोग परिवाराचे लक्ष्मीकांत चाटे यांनी केले आहे.

\Bसमन्वय परिवार

\Bशुक्रवारी खग्रास चंद्रग्रहण असल्याने समन्वय परिवारातर्फे गुरुवारी गारखेडा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेदरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महर्षी वेद व्यास, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन, भजन, प्रवचन नंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल. शिष्य, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंडीत विजयकुमार पल्लोड, सत्यनारायण जाजू, शिवप्रसाद तोतला, जगदीश सारडा, सतीश साबू, यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समिती सदस्य शिंदे यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षण देण्यास सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून औरंगाबाद पंचायत समितीतील काँग्रेस सदस्य अनुराग शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला आहे.

पंचायत समितीमध्ये शिंदे यांनी राजीनामा सुपुर्द केला. ते गेवराई (ब्रुकबॉंड) गणातून काँग्रेसतर्फे निवडून आले आहेत. 'गेल्या चार वर्षांत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने राज्यभर ५८ मराठा क्रांती मोर्चे शांततेने काढले, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्यापासून झुलवत ठेवून प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवून मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. मराठा तरुणांना शासकीय नोकरीत आरक्षण नसल्याने मराठा तरुण नोकरीच्या शोधात आत्महत्या करत आहेत. कानडगाव (ता.गंगापूर) येथील काकासाहेब शिंदे यांनी कायगाव टोका येथे मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. या घटनांचा निषेध म्हणून व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी माझ्या पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा देत आहे,' असे त्यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री टी पॉइंटवर ठिय्या आंदोलन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी फुलंब्री टी पॉइंटवर बुधवारी मराठा समाजाने ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, पंढरपूर येथून परतणाऱ्या सुमारे चार हजार भाविकांना फुलंब्री टी पॉइंटवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांनी मंगळवारी रात्रभर चहा व दुधाचे वाटप करून आदर्श निर्माण केला आहे.

मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू होते. यामध्ये सोमवारी गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या मराठा बांधवाने आरक्षणास उशीर होत असल्याने जलसमाधी घेतली. त्यानंतर राज्यामध्ये गावागावांत आंदोलनासह चक्काजाम करून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. फुलंब्री तालुक्यातही मंगळवारी कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली; तसेच फुलंब्री येथील टी पॉइंटवर मंगळवारी सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन केले. मराठा समाजबांधवांचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन फुलंब्री टी पॉइंटवर मंडप उभारून मागण्या पूर्ण होई पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे फुलंब्री तालुका सकल मराठा समाज बांधवांनी सांगितले.

\Bवारकऱ्यांसाठी चहाची सोय\B

याचदरम्यान फुलंब्री टी पॉइंटवर ठिय्या आंदोलने सुरू असताना श्री क्षेत्र पंढरपूर येथून परतणाऱ्या भाविकांची वाहने थांबून त्यांना चहा व दुधाचे रात्रभर वाटप करून फुलंब्री सकल मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी जोपासली. एकापाठोपाठ एक अशी शेकडो वाहने रात्रभर थांबल्याने सुमारे चार हजार भाविकांना रात्रभर चहा व दुधाचे वाटप केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी ३० टक्क्यांवर !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडीच्या उर्ध्व भागात झालेल्या दमदार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या दीड महिन्यांमध्ये जायकवाडी धरणामध्ये तब्बल २५३.८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाढ झाली असून, सध्या धरणामध्ये ६६०.३१ दलघमी (३०.४१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. सध्या धरणस्थळी ६ हजार ६१५ क्युसेकने पाणी येणे सुरू आहे.

आठवड्याभरापूर्वी ‌नाशिक तसेच उर्ध्व भागातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे नांदूर मधमेश्वर, दारणा तसेच नागमठाणमधून पाणी सोडणे सुरू झाले होते. आता चार दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने आता जायकवाडीत पाणी येणे सुरू झाले आहे. सध्या नांदूर-मधमेश्वरमधून सहा हजार ३१० क्युसेक, गंगापूर एक हजार २४८, दारणा दोन हजार ४३८, नागठाण तीन हजार ६०० तर कडवामधून एक हजार १६५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विशेष तपासणी समितीस ४९ निवेदने प्राप्त

$
0
0

औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यात तसेच औरंगाबाद महसूल विभागात नामसाधर्म्याचा फायदा घेऊन अनुसूचित जमातीची बोगस जात प्रमाणपत्रे, पडताळी समितीचे बोगस आदेश, न्यायालयाचे बनावट आदेश आदींची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या विषेश समितीला औरंगाबाद आणि किनवटमधून ४९ निवेदने प्राप्त झाली. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली असून या समितीने बुधवारी (२५ जुलै) विविध संघटना, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य लोकांची भेट घेऊन निवेदने स्वीकारली.

विशेष तपासणी समितीची कामकाजाचा भाग म्हणून २४ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे व २५ जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे विशेष तपासणी समिती उपस्थित राहिली. यावेळी समितीने विविध संघटना, लोकप्रतिनिधी व व्यक्तींचे निवेदन स्वीकारून म्हणने ऐकूण घेतले. किनवट येथे ३६ तर, विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये १३ अशी एकूण ४९ निवेदने विशेष तपासणी समितीला प्राप्त झाली आहेत. सदर निवेदने व पुरावे याचा विचार विशेष तपासणी समितीचा अहवाल अंतिम करण्यापूर्वी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष प्रमुखांनी घेतले पदाधिकाऱ्यांचे शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे गेल्या आठवड्यात मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्याच्या समारोपप्रसंगी, मंगळवारी त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना एका प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले. स्थानिक कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले.

ठाकरे यांनी नियुक्ती केलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, विजय चव्हाण, गौतम आमराव, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, बिपीन नाईक, वैभव मिटकर, विधानसभा संघटक - मध्य विशाल आहेर, इम्रान शेख, विधानसभा संघटक पश्चिम - प्रवीण मोहिते, चेतन पाटील, विधानसभा संघटक पूर्व - वैभव मिटकर, किशोर पांडे.\B

\Bराज ठाकरे यांनी पूर्वीची शहर कार्यकारिणी व नवी कार्यकारिणी यांचे प्रशिक्षण शिबिर घेतले. सुमारे दीड तास हे मार्गदर्शन शिबिर सुरू होते. यावेळी ठाकरे यांनी पक्ष वाढवण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ठाकरे यांच्या मार्गदर्शनामुळे पदाधिकाऱ्यात चैतन्य निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज हाउसचे रखडलेले काम सुरू

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागील दहा महिन्यांपासून रखडलेले हज हाउसचे काम अखेर मार्गी लागले असून, या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. वर्षभरात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली.

आमदार इम्तियाज जलील आणि सिडकोचे मुख्य प्रशासक ओमप्रकाश बकोरिया यांनी बुधवारी हज हाउसला भेट दिली. या भेटीत जुन्या कंत्राटदाराने केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. नवीन कंत्राटदाराला कशा प्रकारे काम सुरू होईल, हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल याची पाहणी करण्यात आली. या भेटीत बकोरिया यांनी हज हाउसचे काम सिडकोच्या नियमाप्रमाणे कधीपर्यंत पूर्ण कसे करता येईल, याबाबत संबंधित कंत्राटदाराने आगामी काळात काम करण्याची गरज असल्याचे मत मांडले. शासनाचा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. हज हाउसच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार जलील यांनी प्रश्न उपस्थितीत केला होता. याबाबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी या कामाबाबत विशेष बैठक बोलाविली होती. बैठकीत सिडकोच्या अधिकाऱ्यांना हज हाउसचे प्रलंबित काम लवकर सुरू करण्याबाबत आमदार जलील यांच्या उपस्थितीत सूचना केल्या होत्या. हज हाउसचे १८ कोटीचे काम सध्या राहिले आहे. या कामासाठी तीन वेळेस निविदा काढण्यात आल्या. अखेर तिसऱ्यांना हे काम स्थानिक कंत्राटदाराला देण्यात आले आहे. जुन्या कंत्राटदाराचे सामान हटवून हज हाउसचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती हज हाउसच्या नवीन कंत्राटदाराने आमदार इम्तियाज जलील यांना दिली.

\Bहज हाउसचा इतिहास

\Bऔरंगाबादमधील शाही मशिदच्या मैदानावर दोन एकर जागेत हज हाउस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१३मध्ये तत्कालीन शासनाने याची घोषणा केली होती. २८ कोटी रुपयांमध्ये हज हाउस तयार करण्यात येणार होते. काम सुरू झाल्यानंतर कंत्राटदाराला अडचणीत येत असल्याने त्याने काम बंद केले. या कंत्राटदाराला सिडकोने काळ्या यादीत टाकले. त्यानंतर उर्वरित कामाची पुन्हा निविदा काढण्यात आली.

हज हाउसचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची आपली मागणी होती. त्याप्रमाणे पाठपुरावा सुरू होता. अखेर या कामाला सुरुवात झाली आहे. आगामी वर्षात औरंगाबादहून जाणारे हज यात्रेकरू या हाउसमधूनच हजला रवाना होतील. असा माझा विश्वास आहे.

- इम्तियाज जलील, आमदार, औरंगाबाद मध्य

…………

\B अशा असतील सुविधा

\B- सौर ऊर्जा, जलफेरभरण

- २४ सामूहिक वसतीगृहे

- ३५० यात्रेकरुंची सोय

- अल्पोहार, भोजन कक्ष

- ४५० आसन व्यवस्थेचे सभागृह

- प्रशासकीय कार्यालय

- प्रार्थना सभागृह

- वाहनतळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यापासून कलात्मक वस्तू तयार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचराप्रश्नाची दखल केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी घेतली आहे. त्यांनी शहर सुशोभीकरणाकरिता कचऱ्यापासून कलात्मक पुतळे, वस्तू तयार करता येतील, असे सूचवले आहे. दक्षिण दिल्ली महापालिकेने कचऱ्यापासून तयार करून बसवलेले पुतळे, विविध कलात्मक वस्तुंच्या छायाचित्राची पुस्तिकाच त्यांनी महापौर नंदकुमार घोडले यांना पाठवली आहे.

शहरात १६ फेब्रुवारीपासून कचऱ्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. यावरून शहरात दंगाही उसळला, पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली. त्यामुळे हा प्रश्न देशभर पोहोचला आहे. या विषयावरून मुख्यमंत्र्यांनी महापालिका बरखास्तीचा इशारा दिल्याने त्याला शिवसेना-भाजपात राजकीय युद्धही पेटले आहे.

शहरात निर्माण झालेल्या कचराप्रश्नाची दखल केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी घेतली आहे. त्यांनी दक्षिण दिल्ली महापालिकेने राबवलेल्या उपक्रमाची पुस्तिकाच महापौरांना पाठवली आहे. या महापालिकेने कचऱ्यापासून विविध कलात्मक वस्तू तयार केल्या आहेत. त्या वस्तू चौकांमध्ये लावल्या आहेत. त्यामुळे शहर सौंदर्यीकरणाचे काम देखील आपोआप झाले आहे. हा उपक्रम औरंगाबाद शहरात राबवावा, असे त्यांनी कळवले आहे. 'राज्यमंत्र्यांनी केलेली सूचना स्वागतार्ह आहे. दक्षिण दिल्लीच्या धर्तीवर औरंगाबादेत कचऱ्यापासून कलात्मक वस्तू तयार करून त्याचा शहर सुशोभीकरणासाठी वापर करता येतो का याचा निश्चित विचार करू,' असे महापौर घोडेले यांनी सांगितले.

\Bत्यातून सजवा चौक \B

औरंगाबादमध्येही अशाच प्रकारे उपक्रम राबवता येईल. कचऱ्यापासून कलात्मक वस्तू तयार करून त्या चौक, उद्यान, उड्डाणपुलाच्या दर्शनी भागात लवता येतील, असे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी महापालिकेला सूचवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसील कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी सकल मराठा समाजातर्फे पैठण तहसील कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले.

यावेळी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी मराठा समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून पैठण पोलिसांनी मोठ्या प्रमावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकल मराठा समाजाचे पदाधिकारी दीपक मोरे, विकास गोर्डे, शहादेव लोहारे, अतिष गायकवाड, सोनू शिंदे, अक्षय कर्डिले, केलास बोबडे, वैभव गरड, ऋषी फासाटे, मनोज गायके, राजू पातकल, विजय जाधव, दत्ता काळे, महेश बोबडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूपीआय’द्वारे फसवणूक;आरोपीच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जनधन योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमीष दाखवून 'युपीआय अॅप'द्वारे अनेकांना लाखोंचा गंडा घालणारा आरोपी संतोष प्रल्हाद जाधव याच्या पोलिस कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत (२७ जुलै) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी बुधवारी दिले.

या प्रकरणात जनधन योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमीष दाखवून अनेकांची तब्बल २० ते २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात आरोपी संतोष प्रल्हाद जाधव (३३, रा. स्वामी विवेकानंदनगर) याला अटक करुन बुधवारपर्यंत (२५ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, फसवणूक करुन जमवलेली रक्कम आरोपीकडून जप्त करणे बाकी असून, आरोपीने आतापर्यंत कोणाकोणाची फसवणूक केली तसेच आरोपीने जमवलेल्या पैशांची विल्हेवाट कशी लावली आदी बाबींचा तपास करावयाचा असल्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुपौर्णिमा महोत्सवात उद्या विविध कार्यक्रम

$
0
0

औरंगाबाद : मिटमिटा येथील श्री स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिर येथे शुक्रवारी गुरुपूजन दर्शन सोहळा होणार असून, या अंतर्गत चित्रकुट करवी (उत्तर प्रदेश) येथील विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनात पीठाच्या संस्थानचे विद्यमान अधिपती डॉ. योगेश्वरानंद, मंगलनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच सायंकाळी भजन तसेत भक्तीगीतांचाही कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावृक्षारोपण अभियान

$
0
0

औरंगाबाद : गुरुपौर्णिमेनिमित्त 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या माध्यमातून शुक्रवारी (२७ जुलै) जालन्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या नांगरतास, गोखुरेश्वर, पांगरी गोसावी डोंगर रांगा (वाटूरजवळ) येथे महावृक्षारोपण अभियान आयोजित करण्यात आले आहे. सकाळी सहापासून हे अभियान होणार असून, अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भालसिंग रुजू, मुथा नगररचनाच्या समन्वयक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुमारे ३५ दिवसांच्या रजेनंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग महापालिकेत बुधवारी रुजू झाले. उपायुक्त मंजुषा मुथा यांना आयुक्तांनी नगररचना विभागाचे समन्वयक म्हणून नेमले आहे. या विभागाच्या सर्व फाइल आता मुथा यांच्या माध्यमातून आयुक्तांकडे सादर केल्या जातील.

पावसामुळे पूर आलेल्या नाल्याला पडून सिडको एन ६ येथे दुचाकीवरून जाणाऱ्या एका युवकाचे निधन झाले होते. त्या घटनेची पाहणी करण्यासाठी भालसिंग गेले असता जमावातील एकाने त्यांना मारहाण केली होती. मारहाणीनंतर भालसिंग दीर्घ रजेवर गेले होते. पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्याचा कार्यभार कार्यकारी अभियंता डॉ. डी. पी. कुलकर्णी यांच्याकडे सोपवला होता. आयुक्तांनी उपायुक्त मंजुषा मुथा यांना नगररचना विभागाचे समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे. नगररचना विभागाच्या फाइल आता मुथा यांच्या माध्यमातून आयुक्तांकडे सादर केल्या जाणार आहेत. मुथा यांना समन्वयक नेमून आयुक्तांनी नगररचना विभागावर तिसरा डोळा लावल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज चित्र रंगवा स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेतर्फे गुरुवारी ( २६ जुलै) चित्र रंगवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाच गटांत होणार असून, इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. चित्र रंगवा स्पर्धा विश्वविक्रमी असेल, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कळविले आहे. विभागीय क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

खासदार चंद्रकांत खैरे, पंडित नाथराव नेरळकर, एस. पी. जवळकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, शिवसेना महिला आघाडीच्या कला ओझा, सुनीता आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्पर्धकांना छापील चित्र देण्यात येणार असून, स्पर्धकाने चित्रात रंग भरायचा आहे. प्रत्येक गटातून दहा विजेते आणि उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती प्रक्रिया उशिराने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उच्च शिक्षण विभागातला सावळा गोंधळ सरता सरत नाही. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने'ची अंमलबजावणी करण्याचे शहाणपण या विभागाला सुचले आहे. विद्यार्थ्यांकडून अनेक कॉलेजांनी प्रवेशाच्या वेळीच शुल्क आकारले. त्यानंतर आता, 'शुल्क आकारू नका' अशा आशयाचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले असून, गुरुवारी उच्च विभागाने प्राचार्यांची बैठक बोलविली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध अभ्यासक्रमांना शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती देण्यात येते. तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी योजनेतील विद्यार्थ्यांकडून शुल्क आकरणी कॉलेजांकडून होवू नये यासाठी नोडल ऑफिसरांची नेमणूक केली. मात्र, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उच्च शिक्षण विभागाला जाग आली आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम प्रवेशाच्यावेळी आगाऊ स्वारूपात घेऊ नये, असे निर्देश आता कॉलेजांना दिले आहेत. जेथे कॉलेजांनी प्रवेशाच्या वेळीच विद्यार्थ्यांकडून सर्व शुल्क आकारल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता सगळी प्रक्रिया झाल्यानंतर विभागाची अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी याबाबत प्राचार्यांची बैठक घेत सूचना देण्यात येणार आहे. पदवी, पदव्युत्तर प्रवेशाच्या वेळी शुल्क भरलेल्या या विद्यार्थ्यांचे शुल्क परत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. योजनेतून पन्नास टक्के शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात दिल्या जाते.

\Bकॉलेजांचीच भरती\B

मागील वर्षी विभागातील उच्च शिक्षण घेणाऱ्यांपैकी १६ हजार १९४ विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे उच्च शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, हा सगळा निधी कॉलेजांकडे वर्ग करण्यात आला. त्यात अनेक कॉलेजांनी विद्यार्थ्यांकडूनही आकारला. त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालाच नसल्याचे सांगण्यात येते. यावर शिक्षण विभाग काय करणार असा प्रश्न आहे.

प्रवेशाचे शुल्क आकारताना कॉलेजांनी योजनेतील विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काची रक्कम आकारू नये असे स्पष्ट निर्देश आहेत. गुरुवारी आम्ही कॉलेज प्राचार्यांची बैठक घेत त्यांना सूचना देत आहोत. मागील वर्षी ज्या कॉलेजांनी विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे शुल्क आकारले, त्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करू. पूर्णपणे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला की नाही हेही पाहण्यात येईल.

\B- डॉ. सतीश देशपांडे, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, औरंगाबाद

\B

\Bशिष्यवृत्तीची रक्कम\B

- २०१७-१८ मध्ये....७ कोटी १८ लाख

- योजनेतील विद्यार्थी संख्या............. १६१९४

- अनुदानित कॉलेज संख्या... ११५

- विना अुनादनित कॉलेज संख्या...२५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमबीए’ प्रवेश घेण्याचे संस्थेला आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या मिलेनियम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपिठाचे न्या. प्रसन्ना वराळे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी सय्यद झिशन सय्यद नईम या विद्यार्थ्याला दिले आहेत. या विद्यार्थ्याला संस्थेने तोंडी प्रवेश नाकारला होता.

'एमबीए' अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आठ जुलैपासून सुरू आहे. कॅपच्या फेरीनंतरचा प्रवेशाचा शेवटचा दिवस गुरुवारी आहे. कॅपमधून प्रवेश मिळालेल्या सय्यद झिशन सय्यद नईम याला संस्थेने प्रवेश नाकारला होता. अभ्यासक्रम बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. याला या विद्यार्थ्याने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने संस्थेला नोटीस बजावली आणि राज्य सरकारला शपथपत्र देण्याचे आदेश दिले होते. खरे तर ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच संस्थेने अभ्यासक्रम बंद होत असल्याचे कळविले पाहिजे होते. मात्र, तसे न करता प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तोंडी कळविले. याला याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. कोर्टाने मिलेनियम संस्थेला विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारता येणार नाही असा अंतरिम आदेश दिला आहे. या संस्थेने नियमाचे पालन करावे असेही आदेश देण्यात आले आहेत. सय्यद झिशनने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. याचिकाकर्त्याची बाजू सुशांत दीक्षित यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images