Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राज्यात ९५० सुसज्ज अॅम्ब्युलन्स

$
0
0
नवीन वर्षात राज्यभरात ९५० सुसज्ज 'कार्डियाक अॅम्ब्युलन्स' पेशंटच्या सेवेसाठी देण्यात येणार आहेत अशी माहिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी दिली. लोहा शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रसुतिगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते.

‘नांमका’च्या पाण्यामुळे रब्बीला दिलासा

$
0
0
नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अठरा दिवस चालणाऱ्या पाण्याच्या आवर्तनातून वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या तीन तालुक्यांना १.३ दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे.

गैरहजर राहिल्याने कर्मचाऱ्यांना नोटीस

$
0
0
नगरपालिका निवडणूक कामात गैरहजर असलेल्या पंधरा कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसांना समाधानकारक उत्तर न दिल्यास पोलिस कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

आमच्याबद्दल भेदभाव का करता?

$
0
0
‘आम्हाला तुमच्यासारखेच निसर्गाने निर्माण केले, निसर्गाने स्वीकारले आहे. मग माणसांनीच भेदभाव का करावा,’ असा जळजळीत प्रश्न पुणे येथील नाटककार प्रा. जमीर कांबळे यांनी उपस्थित करताच त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.

देगलूरकरप्रकरणी दोन दिवसांत अहवाल

$
0
0
पीएसआय सुवर्णा देगलूरकरप्रकरणी दोन दिवसांत चौकशी अहवाल पोलिस आयुक्तांना चौकशी अधि‌कारी उपायुक्त सोमनाथ घार्गे सादर करणार आहेत. अॅपे रिक्षाचालकांना बनावट पावत्या देत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप वाहतूक शाखेच्या पीएसआय देगलूरकर यांच्यावर आहे.

‘सोलार सिटी’चा प्रकल्प रखडण्याची शक्यता

$
0
0
सोलार सिटीबद्दलचा निधी देण्याबद्दलचा शब्द शासनाने फिरवल्यामुळे औरंगाबादचा सोलार सिटी प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परवाना नूतनीकरणासाठी ‘आरटीओ’मध्ये रांगा

$
0
0
ऑटो रिक्षांचे रद्द झालेल्या परवाने नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आले आहे. परवाना नूतनीकरणासाठी वेळेच्या बंधनाची अट टाकल्याने आरटीओ कार्यालयात प्रस्तावांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. मागील पंधरा दिवसांत सातशे प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरोडेखोर पिंपळेचे पलायन श्रीरामपूरवरून?

$
0
0
कुख्यात दरोडेखोर ज्ञानेश्वर पिंपळेचे पलायन नियोजित असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्यासोबत असलेल्या पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. श्रीरामपूरवरून पिंपळे निसटला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान त्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथके बाहेरगावी रवाना झाली आहे.

दिल्लीच्या जोडप्याचा फ्लॅट बळकवणारा गजाआड

$
0
0
बनावट करारनामा तयार करून दिल्ली येथील जोडप्याने शहरात घेतलेला फ्लॅट बळकावल्याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राजकीय कार्यकर्ता, वकील आदींचा समावेश असून प्रमुख आरोपीला अटक केली आहे.

‘एनओसी’च्या प्रलंबित फायलींचा हिशेब लागेना

$
0
0
एलबीटीच्या एनओसीसाठीच्या प्रलंबित फाइलचा हिशेब लागत नसल्याचे आज पालिकेत स्पष्ट झाले. स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी या संदर्भात आयुक्त, उपायुक्तांना जाब विचारल्यावर दोघांनीही सांगितलेल्या आकडेवारीत तफावत असल्याचे लक्षात आहे.

जायकवाडीतून शेतीला सध्यातरी एकच रोटेशन!

$
0
0
जायकवाडी प्रकल्पातून यंदा रब्बी हंगामासाठी पाण्याचे दोन रोटेशन (आवर्तन) देण्याचा निर्णय जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी जाहीर केला असला तरी सध्या केवळ एक रोटेशन देण्याचेच नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) केले आहे.

परप्रांतीय मजुरांवर शेतीची भिस्त

$
0
0
जिल्ह्यात समाधानकारक पावसानंतर कपाशीचे भरघोस पीक आले; मात्र मजूर मिळत नसल्यामुळे वेचणीअभावी कापूस शेतात गळत आहे. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी परप्रांतीय मजुरांकडून कापूस वेचणी केली आहे. यंदा परप्रांतीय मजुरांचे लक्षणीय प्रमाण वाढले असून यामध्ये प्रदेशातील मजुरांचे सर्वाधिक प्रमाण आहे.

ज्वारीच्या क्षेत्रात लक्षणीय घट

$
0
0
वैजापूर तालुक्यात यंदा फक्त २२ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यातील ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या अपेक्षित असताना कमी पर्जन्यमानामुळे सिंचनाअभावी रब्बीच्या क्षेत्रात अत्यल्प घट झाली आहे. तर ज्वारीचे क्षेत्र लक्षणीय कमी झाले आहे.

व्यसन सोडा; माणूस जोडा

$
0
0
राज्यात वाढत चाललेले व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. व्यसन सोडा माणूस जोडा हा नारा घेवून व्यसन मुक्तीचे अभियान आता शासनातर्फे राबविण्यात येत आहे.

मुलीला फेकले रेल्वे ट्रॅकवर

$
0
0
रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक तीनवर एका ब्लॅँकेटमध्ये चार दिवसांच्या स्त्री अर्भकाला फेकून संबंधितांनी पळ काढल्याची घटना घडली. या घटनेबाबत संबंधितांविरोधात लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

२७८ गावांत टँकरची शक्यता

$
0
0
येत्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील २७८ गावांत ३३४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. त्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील संभव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सुमारे १६ कोटी ८३ लाख ६७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या टंचाई कृती आराखड्याला जिल्हा परिषदेने गुरुवारी (२६ डिसेंबर) मंजुरी दिली.

तापमान चढे; तरी थंडी बोचरी

$
0
0
या आठवड्यात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त व दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले जात आहे. या परिस्थितीमुळे किमान तापमान नेहमीपेक्षा जास्त असूनही बोचरी थंडी जाणवत आहे.

तरुणावर चौघांचा प्राणघातक हल्ला

$
0
0
चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर किरकोळ कारणावरून चौघांनी पेप्सीची बाटली व चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राह्मण विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षण द्यावे

$
0
0
राज्यातील ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षणाची सवलत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पेशवा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पालकमंत्र्यांशी गुफ्तगू

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेतून कोणाला उमेदवारी मिळाली तर फायदेशीर राहील, याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे शुक्रवारी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी आपली मते मांडली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images