Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

चोरीच्या सहा घटनांनी पुन्हा हादरले जयभवानीनगर

$
0
0
जयभवानीनगर भागात गुरुवारी रात्री चोरट्यानी पुन्हा सहा ठिकाणी चोऱ्या केल्याचा प्रकार घडला. एक फोटो स्टुडिओ व पाच घरांना लक्ष्य करत काल जवळपास ३० हजार रुपयांचा ऐवज व टी. व्ही. चोरांनी चोरून नेला. तसेच, प्रतिकार करणाऱ्या नागरिकांवर चोरट्यांनी हल्लादेखील केला.

नागरी समस्यांवर ‘छावा’चा मोर्चा

$
0
0
पैठण शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करा, शहरातील नागरिकांना नागरी सुविधा पुरवा या प्रमुख मागण्यासाठी शुक्रवारी अखिल भारतीय छावा युवा मराठा संघटनेच्या वतीने पैठण नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

जिजाऊ अभियान सर्वत्र राबवा

$
0
0
राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान लोकचळवळ म्हणून राबवावी. या अभियानात एकात्मिक बालविकास सेवा योजना व आरोग्य यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधींसह समाजाचे सर्व घटक यात सहभागी व्हावेत, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती लीलाबाई पवार यांनी केले.

सारोळ्याच्या ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा

$
0
0
सारोळा येथील चार ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. सरपंच व ग्रामसेवकांकडून त्यांच्या प्रभागात कामे केली जात नसल्याने नागरिकांची नाराजी वाढत असल्याने हे राजीनामे देण्यात आले आहेत.

मका उत्पादकांना प्रोत्साहन भत्ता

$
0
0
शासकीय भरड धान्य खरेदी केंद्रावर मका घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५ रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. तसा प्रस्ताव राज्य कृषी पणन मंडळास पाठविण्यात आला आहे.

FDA कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी

$
0
0
अवघ्या एकाच दिवसात तब्बल साडेआठशे अन्नपदार्थ व्यवसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) नोंदणी व परवाने घेतले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे प्रशासनातर्फे आयोजित शिबीरात व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत ही नोंदणी करून घेतली.

५५ कोटींची ZP अध्यक्षांची मागणी

$
0
0
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी ५५ कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शारदा जारवाल यांनी केली आहे.

शिक्षक समितीचे मंगळवारी उपोषण

$
0
0
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षक समितीने ३१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

परदेशी विद्यापीठांचा धोका की फायदा?

$
0
0
‘स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षानंतरही आपण आपली शिक्षण पद्धती फारशी सुधारू शकलो नाहीत. अशावेळी परदेशी विद्यापीठे डोक्यावर आणून का ठेवता?’ असा परखड सवाल करत कुणी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रोहित्र सुरू न केल्यास आत्मदहन

$
0
0
बंद असलेले रोहित्र सुरू करण्यासाठी महिला शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर शुक्रवारी उपोषण सुरू करताच विद्युत निरीक्षकांकडून रोहित्राच्या ठिकाणी तातडीने तपासणी झाली. तालुक्यातील गल्ले बोरगाव वाडीतील महिला शेतकऱ्यांच्या पुढाकारातून झालेल्या अनोख्या आंदोलनाला यश आले आहे.

साहित्य संमेलनासाठी उस्मानाबादचे आवतण

$
0
0
पुढील वर्षी होणारे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने निमंत्रण दिले आहे.

मोंढानाका पुलाविरोधात कोर्टात दाद मागणार

$
0
0
मोंढानाका उड्डाणपूल विरोधी नागरी कृती समिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राज्य सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने उड्डाणपुलाविरोधात कोर्टात दाद मागणार आहे.

रहिवासी उखडलेल्या रस्त्यांनी हैराण

$
0
0
समतानगरमधील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे चालणे मुश्किल झाले असून, छोटेमोठे अपघात नित्याचे झाले आहेत. हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

मुस्लिम आरक्षणासाठी मायनॉरिटी फ्रंटची धरणे

$
0
0
मुस्लिम समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून डॉ. महेमूद उर रहेमान यांनी सुचविलेल्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ‘मायनॉरिटी फ्रंट’तर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अभिमत विद्यापीठ समितीवर कुलगुरू निमंत्रित सदस्य

$
0
0
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे नवीन अभिमत विद्यापीठाच्या (स्वयं अर्थ सहाय्यित) तपासणी समितीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

घर फोडून १८ तोळ्यांचे दागिने लंपास

$
0
0
एन-४ भागात मित्राकडे झोपण्यासाठी गेलेल्या नागरिकाचे घर फोडून चोरट्यांनी १८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. दागिने ठेवण्यात आलेल्या कपाटाची चावी चोरट्यांना तिथेच मिळाल्याने त्यांचे काम सोपे झाले.

पिंपळेला कोर्टात नेण्यासाठी कारचा वापर

$
0
0
कुख्यात दरोडेखोर पिंपळेच्या पलायनाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. पिंपळेला राहता येथे नेत असताना नेवासा येथून पोलिसांनी खाजगी कारचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

बसच्या धडकेत स्कुटीस्वाराचा मृत्यू

$
0
0
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत पळशी येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाचा मृत्यू झाला. जळगाव रोडवरील अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबेडकरनगर चौकामध्ये हा अपघात शुक्रवारी दुपारी दीड वाजता घडला.

‘सोया-पनीर’ मुंबई-पुण्याच्या बाजारपेठेत

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील पाथरूड येथे उत्प‌ादित ‘सोया-पनीर’, ‘सोया-चिवडा’ आणि ‘सोया-दूध’ आता मुंबई-पुण्याच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. मराठवाड्याच्या बोहरील बाजारपेठेत ‘सोया’ उत्पादन दाखल होण्याची बहूधा ही पहिलीच वेळ आहे.

'तंत्रशिक्षण'चा ‘गुपचूप’ अभ्यास

$
0
0
पॉलिटेक्निक पेपरफुटी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. वितरण प्रणालीतील त्रुटींमुळे प्रश्नपत्रिकेला पाय फुटल्याचे पोलिस व मंडळाने नेमलेल्या समितीतून स्पष्ट झाले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images