Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रकल्पाला जमीन नाही, वीजही मिळेना

$
0
0
ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या रेडिमेड गारमेंट प्रकल्पाला सरकारी यंत्रणांकडून जमीन मिळाली नाही. त्याचबरोबर विजेचा पुरवठाही नियमितपणे करण्यात आला नाही. सरकारी विभागांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम या प्रकल्पावर झाला.

आता एसटी बनणार अधिक स्ट्राँग!

$
0
0
एसटी बसला तयार करताना अॅल्युमिनियमचा सांगडा टाकला जातो. मात्र, नवीन गाडी असूनही एका वर्षातच बसला क्रॅक पडल्याचे लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे एसटीचा वाढणारा आवाज कमी करण्यासाठी आता एसटीचा सांगडा तयार करताना अॅल्युमिनियमसह लोखंडाचाही वापर केला जाणार आहे.

कंडक्टरचा प्रवाशांना 'नमस्कार'

$
0
0
‘नमस्कार, मी ... या बसचा कंडक्टर. बसमध्ये सर्व प्रवाशांचे स्वागत’, असे सांगत एसटीच्या कंडक्टर्सनी नव्या सेवेला सुरूवात केली. कंडक्टर गाडीत बसलेल्या प्रवाशांना या उपक्रमाद्वारे गाडी कुठे जाणार, तिचा मार्ग कसा असे याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.

रस्त्यांवरील पॅचवर्कही खड्ड्यांत

$
0
0
गांधी पुतळा ते अभिनय टॉकीजचा दहा वर्षांपूर्वी केलेला रस्ता आता नागरिकांसाठी त्रासदायक ठरला आहे. या रस्त्यावर वारंवार करण्यात आलेले पॅच वर्कही खड्ड्यात गेले आहे. या रस्त्यावर पॅचवर्क नाही; पण खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य निर्माण झाले आहे.

रेडीरेकनरमुळे टीडीआर संकटात

$
0
0
रेडीरेकनरच्या (आरआर) वाढीव दरामुळे विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात टीडीआरची मागणी कमी होईल, असे पालिकेच्या नगररचना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. टीडीआरची मागणी घटल्यास पालिकेकडे रोख मोबदल्याची प्रकरणे वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कवी श्री. दि. इनामदार यांचे निधन

$
0
0
‘मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर’, अशी ख्याती असलेले प्रसिद्ध कवी श्री. दि. इनामदार (वय ८६) यांचे बुधवारी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या तरल कवितांतून श्रीदिंनी स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला होता.

वर्षभरात १३२ शेतकऱ्यांची आत्महत्या

$
0
0
मराठवाड्यात गेल्या वर्षभरात १३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्यापैकी ५८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीला पात्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेली दोन वर्षे मराठवाड्याने मोठ्या दुष्काळाचा सामना केला.

तुळजाभवानी अभिषेक पूजा पंचामृतानेच व्हावी

$
0
0
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील मुख्य मूर्तीची होणारी झीज थांबविण्यासाठी श्री तुळजाभवानी मातेच्या मुख्यमूर्तीला पंचामृताऐवजी केवळ दुधाचा अभिषेक घालण्यासंदर्भात देवस्थान समितीने घेतलेल्या निर्णयास आता या देवस्थान समितीच्या सदस्य असलेल्या नगराध्यक्षासह पुजारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविण्यामुळे यांना या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे.

सराफाच्या दुकानातून २१ लाखांचे सोने पळवले

$
0
0
जुन्या नांदेडातील सराफा बाजारपेठमध्ये असलेल्या सोमाणी ज्वेलर्समधून २१ लाख रुपयांचे सोने एका भामट्याने नजर चुकवून पळवून नेले. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली.

जीटीएल विरोधात तक्रारी

$
0
0
जीटीएलच्या ग्राहकविरोधी कारभाराला नागरिक कंटाळले असून विविध समस्या ताबडतोब सोडवल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा दिला जात आहे. भारतीय जनता पक्षाने जीटीएलच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या.

‘क्लासिकल’ची सोनेरी संधी

$
0
0
रिअॅलिटी शोच्या व्यापक लोकप्रियतेमुळे नृत्य वर्गांमध्ये गर्दी वाढली आहे. या परिस्थितीतही शास्त्रीय नृत्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे. प्रत्येक नृत्याचा पाया शास्त्रीय नृत्य असल्यामुळे उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांची मेहनतीची तयारी आहे.

प्रचाराच्या मुद्यांची चाचपणी

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे वेध आता राजकीय पक्षाबरोबर प्रशासनाला लागले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन तयार आहे काय याचा आढावा येत्या अकरा जानेवारीस होणाऱ्या बैठकीत घेणार आहेत.

पालिका निवडणुकीचा बाजार बहरला

$
0
0
नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला नऊ दिवस शिल्लक असल्याने सर्व पक्षाचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी, लाऊडस्पीकरचा गोंगाट, जाहीर सभा व प्रचार फेऱ्या यामुळे निवडणुकीचा बाजार चांगलाच बहरला आहे.

रोहयो मजुरांच्या आत्महत्येची आयोगाकडून दखल

$
0
0
सिल्लोड तालुक्यात केलेल्या रोजगार हमी योजनेवरील कामाची मजुरी न मिळाल्याने कर्जबाजारी मजुरांच्या आत्महत्या प्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने महाराष्ट्र शासन, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.

‘DMIC’मुळे कायापालट दृष्टिपथात

$
0
0
जपान सरकारच्या मदतीने भारतात होऊन घातलेला महत्त्वांकाक्षी ‘दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’ (डीएमआयसी) प्रकल्प साऱ्या विभागासाठी आमूलाग्र औद्योगिक विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे ठेकेदारांची पाठ

$
0
0
पालिकेने तीस कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्याची घोषणा केली व त्याचे टेंडरही काढले, पण या टेंडरकडे डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारांनी पाठ फिरवल्याचे गुरुवारी (दोन डिसेंबर) स्पष्ट झाले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारांनी टेंडर खरेदीच केले नाहीत. त्यामुळे आता सर्वच रस्ते व्हाइट टॉपिंगचे करण्याचा विचार पालिकेत सुरू झाला आहे.

‘TDR’: मूल्यांकनात आणखी ४० टक्के वाढ

$
0
0
हस्तंतरणीय विकास हक्क (टीडीआर) वापरण्यायोग्य असलेल्या भूखंडांचे मूल्यांकन निश्चित करताना रेडीरेकनर दरामध्ये ४० टक्के वाढ ग्रहित धरावी, अशा सूचना नोंदणी व मुद्रांक विभागाने दिल्या आहेत. राज्यातील नऊ महापालिकांना ही ४० टक्के वाढ करण्यात आली आहे.

औरंगाबादचा विकास भूमिपुत्रांकडूनच

$
0
0
औरंगाबादचा आत्ताचा औद्योगिक विकास हा येथील भूमिपुत्रांनी केलेला स्थायी विकास आहे. लहान उद्योगांतूनच रोजगारास मोठी संधी प्राप्त होते. औरंगाबादकर उद्योजकांनी त्या दृष्टीने अतिशय मोलाचे काम केले आहे. लहान उद्योगांतूनच रोजगारास मोठी संधी मिळते.

‘समांतर’ची चौकशी करा

$
0
0
रखडलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाची जबाबदारी निश्चित करून त्याची चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली. भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली समांतर जलवाहिनीचा प्रकल्प दडवला जात आहे असा आरोप त्यांनी केला.

विकेंद्रीकरणाचा प्रस्ताव

$
0
0
सरकारी विभागांतील समन्वयाचा अभावामुळे सुरू होऊ न शकलेल्या रेडिमेड गारमेंटच्या प्रकल्पाचे विकेंद्रीकरण करावे, असा प्रस्ताव समोर आला आहे. गेल्या सहा वर्षांत सरकारी कार्यालयात आलेले अनुभव ध्यानात घेऊन प्रकल्प पुढे रेटण्यास कल्पतरू शिक्षण प्रसारक मंडळाने असमर्थता दर्शविली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images