Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जखमी

$
0
0

वाळूज महानगर : औरंगाबाद - नगर महामार्गावर वाळूज जवळील चौकात अज्ञात वाहनाच्या घडकेत दुचाकीस्वार ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी सातच्या सुमारास घडली आहे़

गजानन विठ्ठल गाडेकर (४९, रा़ गणेशवाडी, ता़ गंगापूर) असे अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव असून, तारासिंह जयसिंह राजपूत (२८, रा़ गणेशवाडी, ता़ गंगापूर) हा गंभीर जखमी झाला आहे़ गजानन दुचाकी चालवत होता व तारासिंह मागे बसलेला होता दोघेही वाळूज एमआयडीसीत कीर्ती इंडस्ड्रीज या कंपनीत कामाला आहेत़ ते दुचाकीवरून (क्रमांक एमएच २० ईव्ही ७०१६) गणेशवाडी येथून एमआयडीसीत येत होते. वाळूजजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात दोघेही रस्त्यावर कोसळले होते़ यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घाटी हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरानी तपासून गजानन यास मृत घोषित केले, तर तारासिंहवर उपचार सुरू आहेत़ तारासिंग राजपूत याच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक प्रीती फड या करत आहेत़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस गस्त घालणार घाटीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी परिसरात दिवसा-रात्री दारू पिऊन गोंधळ घालणारे तसेच कारणाशिवाय घाटी रुग्णालय परिसरात थांबणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या हेतुने पोलिस यापुढे दररोज घाटी परिसरात रात्री किमान तीनदा गस्त घालणार आहेत. तसेच पार्किंगला शिस्त लावण्याचे तसेच अनधिकृत वाहने घाटी परिसरात उभी राहणार नाहीत, या दृष्टिकोनातूनही पोलिस कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घाटी प्रशासनाला सांगितले.

घाटी परिसरात धुडगूस घालणारे मद्यपी तसेच व्यसनाधीन व्यक्तींमुळे घाटीला निरनिराळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी बेशिस्त पार्किंगमुळेही रुग्ण व रुग्णवाहिकांना विविध वॉर्डांपर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्याचा ताण घाटी प्रशासनावर येत असल्यामुळेच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी बुधवारी (१७ ऑक्टोबर) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. या वेळी घाटी प्रशासनाने आयुक्तांशी विविध विषयांवर चर्चा करून सुरक्षेच्या दृष्टीने विविध मागण्या सादर केल्या. त्यानंतर आयुक्तांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वादातून खुनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या वादातून तरुणाच्या तोंडावर उशी दाबून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता एन सहा भागात घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जगदीश केशवराव सांगळे (वय ३०, रा. साईनगर, एन सहा सिडको) याने तक्रार दाखल केली. यामध्ये सांगळे संशयित आरोपी सारंग श्रीकांत जहागीरदार (वय ३०, रा. गारखेडा) हा परिचयाचा आहे. जुन्या वादातून गेल्या काही दिवसापासून सारंग हा सांगळे याला त्रास देत होता. सोमवारी सांगळे एकटा घरी असताना सारंग त्याच्या घरी आला. 'एकटा बरा सापडलास, थांब तुला आता खतम करून टाकतो,' असे म्हणत त्याने सांगळेच्या तोंडावर उशी दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला; तसेच सांगळेच्या खांद्यावर हेल्मेट मारून त्याला जखमी केले. याप्रकरणी सांगळेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सारंगविरुद्ध पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’ च्या निर्णयानंतर या रस्त्यांची कामे होणार सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखवलेल्या अठरा रस्त्यांच्या कामांच्या निविदा स्थायी समितीच्या बैठकीत 'विनातक्रार' मंजूर झाल्यास रस्त्यांच्या कामांचा 'श्रीगणेशा' लगेचच होऊ शकतो. काम सुरू होऊ शकणाऱ्या अठरा रस्त्यांची नावे अशी

१) सोहम मोटर्स ते महालक्ष्मी चौक

२) रामनगर ते मोरया मंगल कार्यालय मार्गे विश्रांतीनगर

३) कामगार चौक ते हायकोर्ट

४) धुत हॉस्पिटल ते मुर्तीजापूर

५) अहिल्याबाई होळकर चौक ते रेल्वे ट्रॅक विश्रांतीनगर

६) जानकी हॉटेल ते मेहरसिंग नाईक शाळा

७) मकईगेट ते बीबी का मकबरा

८) निरालाबाजार ते महापालिका कार्यालय मार्गे खडकेश्वर

९) इटखेडा महापालिका शाळा ते नाथ व्हॅली स्कूल

१०) हर्सूल वॉर्डातील विविध रस्ते

११) व्हीआयपी स्टोअर ते पानदरिबा आणि औरंगाबाद बुक डेपो ते अंगुरीबाग

१२) सिद्धार्थ चौक ते ताज हॉटेल

१३) विजय चौक ते कालिकामाता मंदिर ते राज कॉर्नर

१४) आझाद चौक ते बजरंग चौक

१५) सिटीचौक ते पैठणगेट

१६) संताजी पोलिस चौकी ते गंगासागर सोसायटी

१७) माता रमाबाई आंबेडकर प्रवेशद्वार ते माउली चौक

१८) शहागंज चमन ते निझामुद्दिन दर्गा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये लवकरच दोन हजार रोजगार संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'चेक प्रजासत्ताक येथील १२५ वर्षे जुन्या व अलिशान कार निर्मितीत जगप्रसिद्ध असलेल्या स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्रकल्प २.० कार्यक्रमांतर्गत गाड्यांचे सुटे भाग ९० टक्क्यांपर्यंत भारतीय बनावटीचे वापरले जाणार आहेत. त्याअंतर्गत औरंगाबाद येथे २००० जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे,' अशी माहिती बुधवारी स्कोडाच्या सहायक व्यवस्थापकांनी दिली.

स्कोडाने भारतात १९९९मध्ये उद्योग सुरू केला. स्कोडाच्या कार बनविताना फक्त असेंब्ली लाइनचा वापर केला जात होता. आता इंडिया २.० कार्यक्रमांतर्गत २०२० पासून ९० टक्के सुटे भाग भारतात तयार झालेले वापरले जाणार आहेत. भारतातील कार मार्केटमध्ये नवीन एसयूव्ही स्कोडा तयार करत असून दोन वर्षांत ही गाडी बाजारात येईल, असे स्कोडाचे सहायक व्यवस्थापक आशिष कौशिक यांनी सांगितले.

औरंगाबादेतील प्लँटमध्ये स्कोडा, ऑडी आणि फोक्सवॅगन कंपन्यांच्या ११ गाड्या आणि त्याला लागणारे ४१ व्हेरियंट तयार होतात. एकाच प्रकारची चेसिस वापरून विविध वाहनांचे उत्पादन करण्याचे काम सध्या कंपनीतर्फे सुरू आहे. त्यानुसार २०२०मध्ये पहिली गाडी भारतीय बाजारपेठेत येईल, असा विस्वास कौशिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. याअंतर्गत ७८०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून औरंगाबाद व पुण्यात प्रत्येकी २००० अशा ४००० रोजगार निर्मिती होईल, अशी शक्यता आहे.

स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्रकल्प २.० कार्यक्रमांतर्गत सात हजार आठशे कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या उपक्रमात

गाड्यांचे सुटे भाग ९० टक्क्यांपर्यंत भारतीय बनावटीचे वापरले जाणार आहेत. त्याअंतर्गत औरंगाबाद येथे २००० जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे

- आशिष कौशिक, सहायक व्यवस्थापक, स्कोडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणला फसविणाऱ्यास पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट प्रमाणपत्रे तयार करून अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवत महावितरण कंपनीची फसवणूक करणारा आरोपी शेख मोहसिन शेख अहेमद याला बुधवारी (१७ ऑक्टोबर) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, शनिवारपर्यंत (२० ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी दिले.

याप्रकरणी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता (ग्रामीण) नामदेव राणबा गांधले (५४) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फुलंब्री उपविभागीय कार्यालयात अहेमद शेख हुसेन हे तंत्रज्ञपदी कार्यरत असताना १४ एप्रिल २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी अहेमद शेख यांचा मुलगा आरोपी शेख मोहसिन शेख अहेमद (रा. नवी ईदगावनगर, सिल्लोड) याने सहा ऑगस्ट २०१४ रोजी शैक्षणिक अर्हतेसह अर्ज सादर केला होता. २७ जानेवारी २०१५ रोजी आरोपी मोहसीन शेख याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विजतंत्री व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र परस्पर मिल कॉर्नर येथील परिमंडळ कार्यालयात सादर केले होते, मात्र प्रमाणपत्र संशयास्पद वाटल्याने महावितरणने याबाबत बदनापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला विचारणा केली तेव्हा संबंधित प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगितले.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीने महावितरण कंपनीत सादर केलेले बनावट कागदपत्र कुठून आणले व कुठे तयार केले, बनावट कागदपत्र बनविण्यासाठी कुणाची मदत घेतली आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवार यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अंतर्गत वादातून घरामध्ये घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी सारंग राजेंद्र श्रीकांत (जाहगिरदार) याला अटक करून बुधवारी (१७ ऑक्टोबर) कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला शनिवारपर्यंत (२० ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

याप्रकरणी अन्न तंत्रज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक जगदीश सांगळे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा १६ ऑक्टोबर रोजी आपल्या घरात असताना आरोपी सारंग राजेंद्र श्रीकांत (जाहगिरदार) (रा. गारखेडा) हा घरात शिरला व अंतर्गत वादातून आरोपीने डोक्यातील हेल्मेटने फिर्यादीच्या डोक्यात मारले. त्यात फिर्यादी खाली पडला व आरोपीने उशीने फिर्यादीचे नाक-तोंड दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीने यापूर्वीही फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अ‍ॅड. सूर्यकांत सोनट्टके यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चोरीप्रकरणात आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रान्स्पोर्ट कार्यालयासमोर उभा असलेला ट्रक चोरून नेणारा आरोपी सुशील नामदेव वक्ते याला बुधवारी (१७ ऑक्टोबर) गेवराई येथून अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, शुक्रवारपर्यंत (१९ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.

याप्रकरणी शेख अफरोज शेख दादामिया (२८, रा. रेंगटीपुरा, जिन्सी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचे झाल्टा येथील गट क्रमांक चार येथे ट्रान्सपोर्ट कार्यालय असून, फिर्यादीची ट्रक फिर्यादीच्या आईच्या नावावर आहे. पाच ऑक्टोबर रोजी चालक विष्णू गायकवाड याने ट्रान्सपोर्ट कार्यालयासमोर ट्रक लावला होता. चालकासह फिर्यादी बाहेर गेले असता, आरोपी सुशील नामदेव वक्ते (३०, रा. गडी, ता. गेवराई, जि. बीड) याने ट्रक पळवून नेला. दुसऱ्या दिवशी ट्रकची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावरुन चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला गेवराई येथून अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कमिशनच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा सात टक्के लाभ देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४७ लाखांची फसवणूक करण्यात आली. जून २०१५ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत गारखेडा भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रवीण प्रभाकर हस्तक (वय ५७, रा. उल्कानगरी, गारखेडा) यांनी तक्रार दाखल केली. हस्तक यांचा ट्रॅव्हल्स गॅरेज दुरुस्तीचा व्यवसाय आहे. हस्तक हे गारखेडा गजानन महाराज रोडवरील कॅपिटल ग्रोथ या कंपनीत जून २०१५मध्ये गेले होते. यावेळी त्यांची तेथील रत्नेश रामदास वर्मा व अजय अशोक जोशी यांच्यासोबत ओळख झाली. वर्मा व जोशी यांनी त्यांना कंपनीत जेवढी गुंतवणूक कराल तेवढ्या रक्कमेवर दरमहा सात टक्के लाभ कंपनी देईल व ती रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल, असे आमिष दाखवले; तसेच या रक्कमेची सुरक्षा म्हणून १८ महिन्यांची प्रॉमिसरी नोट शंभर रुपयाच्या बाँडवर लिहून दिली. त्याचबरोबर गॅरंटी म्हणून कंपनीचे आयसीआयसीआय बँकेचे चेक देणार असल्याचे आश्वासन दिले.

या आमिषाला भुलून हस्तक यांनी कंपनीत तीन लाख रुपये गुंतवले. यापोटी त्यांना आयसीआयसीआय बँकेचा तीन डिसेंबर २०१६चा चेक देण्यात आला. मुदत उलटून गेल्यावर हस्तक यांनी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यांनी बँकेत चेक वटवण्यासाठी टाकला असता तो देखील बाऊंस झाला. हस्तक यांच्यासह इतर गुंतवणूकदारांची देखील वर्मा व जोशी यांनी ४४ लाखांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी हस्तक यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रत्नेश रामदास वर्मा (रा. एन ९, एम २, ज्ञानेश्वर नगर) आणि अजय अशोक जोशी (रा. प्लॉट क्रमांक ४०१, आदिनाथ हाइट, ब्रिजवाडी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचा आयुक्तांभोवती बिलांसाठी पिंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे दहा दिवस रजेवर जाणार असल्यामुळे काही नगरसेवकांनी बिलांसाठी त्यांच्याभोवती बुधवारी पिंगा घातला. हातात फाइल घेवून त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी घेण्यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ लागली होती.

काही नगरसेवकांचे कंत्राटदारांशी लागेबांधे असून कंत्राटदारांना काम देण्यापासून त्याचे बिल काढण्यापर्यंत काही नगरसेवक सक्रीय असतात. लेखा विभागाशी त्यांचा सतत संपर्क असतो. पालिकेच्या तिजोरीची स्थिती नाजूक असल्यामुळे काही महिन्यांपासून प्रशासनाने कंत्राटदारांचे बिल थांबवले आहे. त्यामुळे नगरसेवक व कंत्राटदारांत रोष आहे. बिल काढून देण्यासाठी त्यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मागे लकडा असतो.

डॉ. निपुण विनायक यांनी दहा दिवसांची रजा टाकली आहे. रजेवर जाण्यापूर्वी ते बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास महापालिकेत आले. त्यांनी महापौर दालनात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी काही नगरसेवक पत्रकार आणि आयुक्त यांच्यातील संवाद केव्हा संपतो याची वाट पाहत होते. संवाद संपताच नगरसेवकांनी आयुक्तांना अक्षरश: घेराव घातला. हातात फाइल घेवून ते आयुक्तांच्या मागे पुढे फिरत होते. फाइलवर आयुक्तांची स्वाक्षरी घेऊन द्या, असा लकडा या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांच्या मागे लावला.

\Bनगरसेवकांची बोळवण \B

नगरसेवकांची ही 'धडपड' लक्षात घेऊन महापौर नंदकुमार घोडले यांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावले, परंतु एकूण रागरंग लक्षात आल्यावर मुख्य लेखाधिकाऱ्यांनी हळूच काढता पाय घेतला, तर आयुक्तांनी सांगतो, पाहतो असे म्हणत त्या नगरसेवकांची बोळवण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोसीन खुनप्रकरणी आणखी तिघे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल येथील मोसीन पठाण खुनप्रकरणात पसार झालेल्या आणखी तीन आरोपींना हर्सूल पोलिसांनी जेरबंद केले. वाळूज परिसरात बुधवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आता आरोपींची संख्या नऊ झाली आहे.

१४ ऑगस्ट रोजी फातेमानगर भागात व्हॉटस् अॅपवरील पोस्टमुळे झालेल्या वादातून १४ जणांनी प्राणघातक हल्ला करून मोसीन पठाण याचा खून केला होता. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी रविवारी रात्री कोंम्बिग ऑपरेशन करून सहा आरोपींना अटक केली होती. उर्वरित आरोपी पसार झाले होते. यापैकी तीन आरोपी वाळूज परिसरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी शोधमोहीम राबवत आरोपी शोहेब सलीम पटेल (वय २६), मेहराज नूर पटेल (वय २५) आणि आसेफ गुलाब पटेल (वय २३ सर्व रा. हर्सूल) यांना अटक केली आहे. अन्य पसार आरोपींचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारणीसाठी चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिंगापूर सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या लॉजिस्टिक पार्कची उभारणी शेंद्रा ऑरिक (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) या दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी)च्या शेंद्रा टप्प्यात करता येईल काय ? याबाबत सिंगापूर येथील शिष्टमंडळाने मंगळवारी जागेची पाहणी केली. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

भविष्यात 'डीएमआयसी'च्या कनेक्टिव्हिटीला रेल्वेमार्गाची महत्वपूर्ण जोड असणार आहे. जालना येथे उभारण्यात येणारे ड्राय पोर्ट उद्योगांसाठी फायदेशीर ठरणार आहे. औद्योगिक उत्पादनांची ने -आण करण्यासाठी रेल्वे, रस्ते मार्गाचा वापर जेवढा महत्त्वपूर्ण असतो. तेवढेच महत्त्व लॉजिस्टिक पार्कची असते. सिंगापूर सरकारच्या वतीने भारतात उद्योगांसाठी लॉजिस्किट पार्क उभारण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) चा महत्वाचा टप्पा असलेल्या शेंद्रा भागात जर लॉजिस्टिक पार्क उभारले, तर उद्योगांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळू शकतात. या दृष्टीने सिंगापूर सरकारचे प्रतिनिधी तसेच लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या सिंगापूरमधील दोन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी शेंद्रा 'डीएमआयसी'ला भेट दिली. 'डीएमआयसी'चे व्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील यांनी या शिष्टमंडळाला जागा दाखविली तसेच या भागात सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामेही दाखविली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंटरनॅशनल एंटरप्रायजेस (आ. ई.) सिंगापूरला १०० एकरात लॉजिस्टिक पार्क उभारावयाचे आहे. ऑटोमोबाइल, औषधी, प्लास्टिक, टायर निर्मितीचे बडे उद्योग औरंगाबादेत आहेत. सिंगापूर लॉजिस्टिक पार्क औरंगाबादला उभारल्यास त्याचा फायदा उद्योगांना होणार आहे.

आय. ई. सिंगापूरला लॉजिस्टिक पार्क उभारावयाचे आहे. शेंद्रा डीएमआयसीमध्ये जागा पाहणीसाठी त्यांचे शिष्टमंडळ येऊन गेले. अगदी प्राथमिक पातळीवरची ही भेट होती. पुढचा निर्णय त्यांच्याकडून लवकरच अपेक्षित आहे.

- गजानन पाटील, व्यवस्थापकीय संचालक, डीएमआयसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग, शेतीच्या पाण्यात कपात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाच्या दारात उभ्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, येत्या काही दिवसांमध्ये समिती अध्यक्ष तथा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाणी आरक्षणासाठी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणासाठी उद्योग आणि शेतीच्या पाण्याची कपात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

जिल्ह्यात सध्या जायकवाडी धरणामध्ये ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, १६ मध्यम प्रकल्पांमध्ये १० तर ९३ लघु प्रकल्पांमध्ये २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात १८० टँकर सुरू आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने सरासरी न गाठल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे दरम्यानच्या काळात औरंगाबाद, फुलंब्री या तालुक्यांमध्येही टँकर सुरू झाले. अद्याप खुलताबाद, कन्नड आणि सोयगाव तालुक्यात टँकर सुरू नसले तरी उर्वरित जिल्ह्यातील १६५ गावांमधील तीन लाख ६२ हजार नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. अत्यल्प पाऊस आणि कोरडे पडलेले पाणीसाठे यामुळे गाव परिसरातील विहिरी टँकरसाठी व आसपासच्या नागरिकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून अधिग्रहीत करण्यात येत आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जिल्ह्यातील २७१ गावे टंचाईच्या फेऱ्यात येतील. यात सिल्लोड तालुक्यातील २८, फुलंब्रीतील १५, कन्नडमधील २२, औरंगाबाद १६, वैजापूर ४७, खुलताबाद २, पैठण ५३, आणि गंगापूर तालुक्यातील ८८ गावांचा समावेश असेल, असे भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. ऑक्टोबर संपण्याआधीच जिल्ह्यातील १६५ गावे टंचाईला तोंड देत असल्याचे टँकर अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

\Bटंचाई आराखड्याचे ‌भिजत घोंगडे

\Bटंचाई आराखडा तयार करण्याचे काम अद्यापही प्रशासनाकडून पूर्ण झालेले नाही. टंचाईच्या कालावधीत जिल्ह्यात काय उपाययोजना राबवायच्या त्यासाठी आवश्यक असलेला निधी आदींची माहिती जिल्हा परिषदेकडून जिल्हाप्रशासन व शासनाला कळवावी लागते. टंचाई आराखडे तयार करण्याचे निर्देश दहा दिवसांपूर्वीच विभागीय प्रशासनाने दिले होते.

\Bटँकर सुरू असलेले तालुके

\Bतालुका.................... टँकरसंख्या

औरंगाबाद.....................६

फुलंब्री.........................४

पैठण.........................४७

गंगापूर........................६८

वैजापूर.........................४८

सिल्लोड......................७

--------------------------

एकूण........................१८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी अभ्यासक्रमाला कॅरिऑन देण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधी अभ्यासक्रम बदलल्यामुळे जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कॅरिऑन द्या, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपोषण सुरू केले आहे.

यंदा विधी शाखेचा अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. त्यामुळे जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन लागू करा, अशी मागणी पुढे आली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. प्रशासनाने त्यावर कोणता निर्णय न घेतल्याने पुन्हा विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. जुन्या अभ्यासक्रमातील विद्यापीठाच्या चुकीच्या परीक्षा पद्धतीमुळे ७८ टक्के विद्यार्थी नापास झाल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला. बदलेल्या अभ्यासक्रमामुळे नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एका वर्गात दोन्ही अभ्यासक्रम सोबत शिकवणे शक्य नाही. अभ्यासक्रम बदलल्यामुळे द्वितीय वर्षातील काही विषय प्रथम वर्षात आले आहेत. अभ्यासक्रम बदलल्यामुळे ७८ नापास विद्यार्थ्यांना भरपूर विषयाचा अभ्यासक्रम शिकावयास मिळणार नाही. त्यामुळे कॅरिऑन देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नवनाथ देवकते, राम टकले, रवी गिते, विश्वजीत बडे, शिद्धेश्वर बिरादार, अझहर पटेल, ऋषभ लोहाडे, शरद पाटील, प्रदीप तोडकर, अमोल होनमने, मनीषा हाडे, स्नेहा शेळके, शिल्पा मुंडे, रुचा कुलकर्णी, सुमेध आवारे, सुदर्शन धुमक, मनोहर जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा उत्‍खननावर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले असून, बुधवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी धडक मोहीम राबवत बाळापूर शिवारात दगडी खदाणींमधून अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाने चार जेसीबीसह दोन ट्रक, दोन टॅक्‍टर जप्त केले.

गेल्यावर्षीपासून जिल्ह्यात वाळूपट्ट्यांच्या कंत्राटासह खदानींची व्यवस्थाही बिघडली आहे. खदानींमधून बिनदिक्कतपने गौण खनिजाची तस्करी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद केवळ वाळूवरच लक्ष केंद्रित करीत असून, शहर परिसरातील डोंगर कापण्याच्या कामाकडे डोळेझाक करण्यात येते. ही बाब सातत्याने जिल्हा प्रशासनासमोर आल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार औरंगाबाद तालुक्‍याचे अपर तहसीलदार रमेश मुनलोड यांच्या पथकातील केशक डकले, योगेश पंडित, आशिष पुपले, दिनेश हापत, विजय भंडारे, संजय आधाने, किशोर जाधव, गोपीनाथ जयवळ, अविनाश जाधव यांनी बाळापूर गट क्रमांक ७१मधील गायरान जमिनीमध्ये असलेल्या दगड खदानींवर छापा मारला व वाहने जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्णपुरा यात्रेत रहाट पाळणा पडल्याची अफवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्णपुऱ्यातील रहाट पाळणा पडल्याचा खोटी चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बुधवारी शहरात एकच खळबळ उडाली. अधिक चौकशीनंतर ही चित्रफित कर्णपुरा येथील नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, अशी कोणतीही घटना घडल्याचे नमूद केले आहे.

बुधवारी सकाळपासून व्हॉटस् अॅपवर एक चित्रफित व्हायरल झाली होती. यामध्ये रहाट पाळण्यातील एक पाळण्याची कडी तुटल्याने महिला खाली पडल्याचे यामध्ये दिसत होते. 'ही घटना कर्णपुरा यात्रेतील असून, एक ठार, तीन जखमी,' अशी अफवा पसरली होती. या चित्रफितीमुळे शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते. असा प्रकार घडला का याबाबत पोलिस नियंत्रण कक्षात देखील नागरिकांनी विचारणा केली, मात्र ही चित्रफित जुनी असून, शहरातील नसल्याचे नंतर स्पष्ट झाले.

याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रात्री असा कोणताही प्रकार कर्णपुरा यात्रेत घडला नसल्याचे स्पष्ट केले. कर्णपुरा यात्रेत पोलिसांचा नियंत्रण कक्ष आहे. त्याचबरोबर यात्रेमध्येही पोलिस तैनात केले आहेत. हे पोलिस यात्रेमध्ये फिरत असतात. बुधवारी अशी कोणतीही घटना कर्णपुरा यात्रेत घडलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकाम करणाऱ्या महिलांसाठी दांडिया

$
0
0

औरंगाबाद:

नवरात्र उत्सवानिमित्त पवनगरमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना डोळ्यासमोर ठेऊन आयोजित पवन सिद्धी दुर्गा माता रास दांडियात पवननगरसह शेजारच्या भागातील महिला गर्दी करत आहे. या दांडियामुळे या भागातील वातावरण बदलून गेले आहे.

नारायण आघाव, जिजा जाधव, दिलीप कुलकर्णी, प्रमोद पोवळ, राजू औटे, प्रल्हाद जायभाये आणि गणेश मानकुसर यांनी दोन वर्षांपूर्वी पवननगरमध्ये रास दाडियांची सुरुवात केली. येथील गणपती मंदिरात नवरात्रात देवीची स्थापना केली जाते. नवरात्र उत्सवाच्या आयोजनात तरुण-तरुणींचा मोठा सहभाग आहे. नवरात्रात घरकाम करणाऱ्या महिलांना अनेक कामे असतात. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणे मुश्किल असते. त्यामुळे त्यांच्यासाठीच रास दांडियाचे आयोजन करण्यात येते.

पवनगरसह शेजारच्या भागातील अनेक महिला घरातील कामे आटोपून दांडियात उत्साहात सहभाग घेत आहेत. साधारणत: रात्री नऊ वाजता सुरू होणारा दांडिया रात्री उशिरापर्यंत रंगतो. महिलांनी निर्धोकपणे दांडिया खेळावा यासाठी संयोजकांनी स्वयंसेवकांची फौज तयार केली आहे. शिवाय चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा उपाय कडक केले आहेत, अशी माहिती नारायण आघाव आणि तिलोतमा आघाव यांनी दिली. या रास दांडियात दररोज २५० ते ३०० महिला सहभागी होत असल्याची माहिती अघाव यांनी दिली.

सामाजिक उपक्रम
रास दांडियासोबतच नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात येते. तसेच रांगोळी, स्पर्धा लहान मुलांच्या स्पर्धेांचे आयोजन केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मराठा आरक्षणासाठी सेनेनं सत्ता का सोडली नाही?'

$
0
0

औरंगाबाद:

'मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेने सत्तेला लाथ मारण्याची भूमिका घ्यायला हवी होती. पण शिवसेनेनं तसं केलं नाही, कारण त्यांना सत्ता प्रिय होती,' असा आरोप कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला.

मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हाच त्यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे संकेत दिले होते. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली. वाकी संस्थानचे सुखदेव महाराज यांच्या हस्ते त्यांच्या पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी जाधव बोलत होते. शिवसेनेवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. 'पक्षशिस्तीच्या नावाखाली शिवसेनेचं वाटोळं होत आलं आहे. शिवसेनेत हुजरेगिरी करणाऱ्यांनाच महत्त्व आहे,' असं ते म्हणाले. खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. 'खैरे यांनी औरंगाबादमध्ये हिंदुत्वाचा बाजार मांडला आहे. खासदारकी टिकवण्यासाठी त्यांनी दंगल घडवली आहे,' असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी अद्याप हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा संकलन वाहतुकीचे टेंडर मंजुरीसाठी आज स्थायी समितीसमोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याचे संकलन आणि वाहतुक करण्यासाठीची निविदा उद्या शुक्रवारी स्थायी समितीच्या समोर पालिका प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवली आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्यास बंगरुळू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला सात वर्षासाठी हे काम मिळेल.

कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीन्सच्या निविदा अंतिम झाल्यावर महापालिका प्रशासनाने कचऱ्याची वाहतुक आणि संकलन करण्यासाठीची निविदा काढली आहे. शहरात घरोघरी कचऱ्याचे संकलन करून कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत पोचवणे हे कामाचे स्वरूप आहे. सात वर्षांसाठी हे काम कंपनीला देण्यात येणार आहे. पालिकेने या कामासाठी काढलेल्या निविदेला तीन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. त्यात पी. गोपीनाथ रेड्डी, स्वच्छता कॉर्पोरेशन व ऑपरचून हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. यापैकी पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची निविदा तुलनेने कमी दराची असल्यामुळे या कंपनीची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत मांडला आहे. पी. गोपीनाथ रड्डे या कंपनीने दररोज कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी प्रतिटन १८७२ रुपये असा दर पालिकेला दिला होता. प्रशासनाशी झालेल्या वाटाघाटीनंतर १८६३ रुपये प्रतिटन या दराने काम करण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. कचरा संकलनाबरोबरच ७५ हातगाड्या, ३०० अॅटोटिप्पर, हायड्रॉलिक जॅक असणारे ३० टिप्पर, नऊ कॉम्पॅक्टर्स याशिवाय गरजेप्रमाणे लागणारी वाहने कंपनीला उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. सात वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा उल्लेख देखील प्रस्तावात करण्यात आला आहे.

रस्त्याच्या निविदा ऐनवेळी

शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या अनुदानातून १८ रस्त्यांची कामे सुरू करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने रस्त्यांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या समोर ठेवला तर तो मंजूर केला जाईल, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो अनुयायांचे वंदन !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बौद्ध उपासकांनी गौतम बुद्धाला अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तनदिन उत्साहात साजरा केला. बौद्ध लेणी परिसरात दिवसभर अनुयायांची वर्दळ राहिली. धम्म ध्वजारोहण, अन्नदान, रक्तदान, प्रबोधन, भीमगीत गायन आणि पुस्तक प्रदर्शन अशा विविध उपक्रमांची रेलचेल होती.

६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध लेणी परिसरात गुरुवारी विजयादशमीच्या दिवशी विविध कार्यक्रम झाले. बुद्ध विहारात सकाळी धम्म ध्वजारोहण झाले. त्यानंतर भदन्त विशुद्धानंद बोधी यांच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ करण्यात आले. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा विशेष कार्यक्रम दुपारी झाला. यावेळी मंचावर भदन्त विशुद्धानंद बोधी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. उन्मेष टाकळकर, माजी नगरसेवक कृष्णा बनकर, माजी पोलिस अधिकारी दौलतराव मोरे, रिपाइंचे शहाध्यक्ष विजय मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुपारच्या सत्रात विशुद्धानंद बोधी यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. या धम्म प्रवचनाला हजारो उपासक-उपासिका उपस्थित होते. 'लुंबिनी बुद्ध विहार बांधण्यासाठी अनुयायांच्या सढळ मदतीची गरज आहे. प्रत्येकाने स्वत:च्या क्षमतेनुसार दान द्यावे' असे आवाहन बोधी यांनी केले. यावेळी शेकडो अनुयायांनी स्वेच्छेने मदत प्रदान केली. २२ प्रतिज्ञांचे पठण आणि भिख्खू संघाच्या प्रवचनाला विशेष गर्दी झाली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह लाखो अनुयायी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ शिरसाट यांचे बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम सादर झाला. विद्यापीठ गेटसमोर रिपब्लिकन सेनेने मनूचे दहन आंदोलन केले. जातीय उतरंड बळकट करण्याच्या यंत्रणेच्या निषेधार्थ हे आंदोलन झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन निकम यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर घेण्यात आले. लोकमान्य ब्लड बँक आणि आदर्श रक्तपेढीच्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. आंबेडकर फोर्स संघटनेच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले. सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी अन्नदान उपक्रमातून सेवा पुरवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जय भीमचा जयघोष करीत तरुणांनी प्रवर्तन दिनाचा उत्साह वाढवला. नागरिकांना विद्यापीठापर्यंत जाण्यासाठी शहर बसची व्यवस्था करण्यात आली. वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले होते. मात्र, विद्यापीठात एका बाजुच्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सोनेरी महलजवळ वाहनतळ असल्यामुळे सायंकाळी गर्दी वाढल्यानंतर लेणीपर्यंत पोहचण्यासाठी एक तास लागला.

----पुस्तकांची विक्री

धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त लेणी परिसरात पुस्तकांची दालने लावण्यात आली. खेळणी, खाद्य पदार्थ, घरगुती वस्तूच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी होती. पुस्तक विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असे विक्रेत्यांनी सांगितले. विशेषत: परिवर्तनवादी चळवळीतील पुस्तकांना अधिक मागणी होती. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शिंदे, अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज, धनाजी जाधव यांच्यावरील चरित्रर पुस्तकांची सर्वाधिक विक्री झाली. कॉ. शरद पाटील, बाळासाहेब आंबेडकर, सचिन माळी, रावसाहेब कसबे, ज. वि. पवार आदी लेखकांच्या वैचारिक पुस्तकांना विशेष मागणी होती. भीमा कोरेगाव दंगलीनंतर या विषयावरील ऐतिहासिक पुस्तकांचा खप वाढला आहे. या पुस्तकांची तुलनेने जास्त संख्या होती. परिसरात पुस्तकांचे २५ दुकाने लावण्यात आली होती.

-----पथनाट्यातून प्रबोधन

देशातील धार्मिक उन्मादावर भाष्य करणारे पथनाट्य तरुण कलाकारांनी सादर केले. भीमगीतांच्या माध्यमातून देशातील सद्यस्थितीवर परखड भाष्य करणाऱ्या नाट्याला मोठा प्रतिसाद मिळाला. भीमा कोरेगाव दंगल, राजकीय गुलामगिरी, दलितांचे हक्क आदी विषय कलाकारांनी प्रभावीपणे मांडले. ज्ञानपर्व आणि ज्ञान उत्सव कमिटीने 'मतदान माझा अधिकार, तो विकल्या जाणार नाही' या विषयावर प्रबोधन केले. या कॅम्पला हजारो नागरिकांनी भेट दिली. तर पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाने २२ प्रतिज्ञा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, सिद्धार्थ बुद्ध प्रवास या विषयावर भित्तीपत्रके, छायाचित्रे यांचा प्रदर्शन भरवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images