Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नुकसानग्रस्त अनुदानापासून वंचित

$
0
0
हिमायतनगर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. त्यापैकी बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

रस्त्याचा अडथळा ६ वर्षांनंतर दूर

$
0
0
समर्थनगर येथील महामार्ग ते विलास राऊत यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यांतील अडथळा तब्बल सहा वर्षानंतर दूर झाला आहे. अडथळा दूर झाल्यामुळे नगर पालिकेतर्फे तातडीने जलवाहिनीचे काम हाती घेतले आहे.

२ डॉक्टरांविरूद्ध गुन्हा नोंदवा

$
0
0
बनावट दस्ताद्वारे सुमारे १७ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तुळजापूर येथील दोन वैद्यकीय अधिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उस्मानाबाद येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत.

मुंडेंच्या विरोधात कोण लढणार?

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून बीडमधील प्रत्येक निवडणूक रंगतदार ठरत आहे. राज्यातील एक महत्त्वाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. बीडची लोकसभा निवडणूक रणधुमाळी प्र्रतिष्ठेची ठरणार आहे. एकीकडे मुंडे माझी माणसे म्हणत तयारीला लागले असताना राष्ट्रवादीकडून त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असावा याचाच खल सुरू आहे.

असुकासाठी घरेलु कामगारांची निदर्शने

$
0
0
अन्न सुरक्षा कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी यासह अन्य मागणीसाठी मोलकरणी व घरेलू कामगार संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मागण्या मान्य न झाल्यास येत्या २७ जानेवारीपासुन बेमुदत सत्यागृह करू, असा इशारा त्यांनी दिला.

प्लास्टिक पिशव्या बंदीसाठी जनजागरण

$
0
0
प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही नागरिक व व्यावसायिकांकडून सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करणे व बंदीचे काटेकोर पालन करणे यासाठी दीपशिखा फाउंडेशनतर्फे शहरात जनजागरण मोहीम राबविली जात आहे.

धूत हॉस्पिटल येथे गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया

$
0
0
शहरातील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल येथे हद्याच्या झडपाची गुंतागुतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. छोट्या चिऱ्यातून दोन झडपांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात यश आले आहे.

रेल्वेची पेट्रोल वाहतूक धोकादायक

$
0
0
मनमाडहून परळीला पेट्रोल टॅँकरमधून पेट्रोल नेणारी मालगाडी औरंगाबाद रेल्वे स्‍थानकावर थांबली. या पेट्रोल टॅँकमधील एका टॅँकला पेट्रोलची गळती लागलेली होती. पेट्रोल टँकला लागलेल्या गळतीमूळे या रेल्वेचा प्रवास धोकादायक बनला असून रेल्वे अधिकाऱ्यांचे या धोकादायक प्रवासाकडे लक्ष नव्हते.

रिक्षा युनियनचा मोर्चा निघणारच

$
0
0
पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र रिक्षा चालकांचे मिटर दर वाढविले जात नाही. याविरोधात आता रिक्षाचालकांचा १० जानेवारीला मोर्चा पोलीस आयुक्तालयावर काढला जाणार आहे.

रिक्षा प्रवास होणार महाग

$
0
0
वारंवार पेट्रोल दरात होणारी वाढ लक्षात घेऊन रिक्षा मीटर दरात वाढ करण्याचा निर्णय आरटीए कमिटीने घेतला असून पहिल्या किलोमीटरसाठी १३ रूपये तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी ११ रूपये दरवाढ जाहीर केली आहे.

निधी वाटपात सूडबुद्धीची वागणूक

$
0
0
बीड जिल्ह्यात दोन मंत्री पाच आमदार आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विकास कामासाठी निधी वाटप करताना विरोधकाशी सूडबुद्धीने वागत आहे. जिल्ह्याला साखळी बांधाऱ्यासाठी आलेल्या पाच कोटींपैकी एक नवा पैसा आपल्या शिफारशीवरून देण्यात आला नाही.

महापौरांच्या वॉर्डासाठी पैसा कुठून आणला?

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी पालिकेकडे दोन कोटी रुपये नाहीत. महापौरांच्या वॉर्डात मात्र पाच कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. पाच कोटींच्या कामासाठी पैसा कुठून आणला असा सवाल आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे.

महापौरांनी राष्ट्रवादीपुढे हात पसरले

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून पालिकेत सत्ता गाजवत आहे. सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेच्या महापौरांनी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसपुढे हात पसरले आहेत.

निवडणुकीसाठी डावे-समाजवादी एकत्र

$
0
0
आगामी लोकसभा निवडणूक राज्यातील समाजवादी व कम्युनिस्ट विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचे ठरवले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यात लोकसभेच्या साधारणतः २० जागा लढविण्याविषयी प्राथमिक चर्चा झाली आहे.

कंत्राटदारांच्या बहिष्काराचा नगर लिंक-रोडलाही फटका

$
0
0
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बांधला जात असलेला नगरलिंक रोडचे बांधकाम अडथळ्याची शर्यत पार करीत अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, हॉटमिक्स रोड कंत्राटदारांच्या बहिष्काराचे नवीन संकट उभे ठाकले असल्याने फेब्रुवारीअखेर पूर्ण होणारे काम मेपर्यंत रखडण्याची शक्यता आहे.

खड्ड्यांमुळे ‍रिक्षाचालक आजारी

$
0
0
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षाचालकांचे आरोग्य धोक्यात आले असून ते विविध आजारांनी त्रस्त आहेत. लोकनीती मंचाच्या वतीने शहरातील रिक्षा चालकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या आरोग्य तपासणी शिबिरात १५४ रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली आहे.

रस्ते दुरवस्थेवरून ‘रिपाइं’ उखडले

$
0
0
‘शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर रिपाइं (आठवले) चे कार्यकर्ते उखडले असून भ्रष्टाचार थांबवा व रस्ते दुरुस्त करा; अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी दिला आहे.

होमिओपॅथिक डॉक्टरांचा जल्लोष

$
0
0
मॉडर्न मेडिसीन वापरण्याबाबतच्या विधेयकास राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ७० हजार होमिओपॅथिक डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर औरंगाबादेत होमिओपॅथिक डॉक्टरांनी जल्लोष केला.

पोलिसांच्या ताफ्यात ‘मार्क्समॅन’

$
0
0
औरंगाबाद शहरामध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवाया वाढल्याचे विविध घटनांतून दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीवरून विशेष बुलेटप्रूफ वाहन शहर पोलिस दलाकरीता मागवण्यात आले आहे.

‘PWD’च्या रस्त्यांना लवकरच मुहूर्त

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अखत्यारित असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून काही प्रमाणात निधी मिळाला. पण, कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे दोन वेळा जाहीर करूनही निविदा भरण्यात आल्या नव्हत्या.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images