Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नवजात स्त्री अर्भकाचे अवशेष सापडले

$
0
0
बीड जिल्हा गेल्या वर्षी स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी व शून्य ते सहा वयोगटातील मुलींच्या घटत्या प्रमाणामुळे चर्चेत आला होता. असे असताना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी टाकलेले एक दिवसाचे नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडले आहे.

रब्बीच्या उत्पादनात दीडपट वाढ

$
0
0
जिल्ह्यात अनुकूल हवामान आणि नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे रब्बीच्या उत्पादनात तब्बल दीडपट वाढ अपेक्षित आहे. तुलनेने ज्वारीचे क्षेत्र घटले असून हरभरा व गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या सर्व पिकांची स्थिती चांगली असून उत्पादनात भरीव वाढ होणार आहे.

हातगाडीधारकांचे बजाजनगरात सर्वेक्षण

$
0
0
परिसरातील हातगाडीवर भाजीपाला; तसेच इतर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या गाडी धारकांना लायसन्स उपल्ब्थ करून देण्यासाठी अन्न औषध विभागाने पुढाकार घेतला असून त्यासाठी शनिवारी सायंकाळी सर्व्हे करण्यात आला.

‘लिबरल अलायन्स’ची स्थापना

$
0
0
राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एन. डी. ए.) सोबत सोडल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी काही पक्ष व संघटनांची मोट बांधून ‘लिबरल अलायन्स’ ही नवीन आघाडी स्थापन केली आहे.

कामगारांमधून अनेक कलावंत मोठे झाले

$
0
0
कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून अनेक कलावंत मोठे झाले, अनेक कामगार उद्योजक झाले, कलावंतांना नेहमीच मदत मिळाली पाहिजे असे प्रतिपादन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.

चंगळवादाविरोधात सायकल रॅली

$
0
0
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघात रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत शेकडो साधक उत्साहात सहभागी झाले. मानाच्या संस्थान गणपती येथे रॅलीला नगरसेवक प्रफुल्ल मालाणी, प्रमोद भाईवाला, वास्तूविशारद नाडकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखविला. तापडिया कासलीवाल मैदानावर रॅलीची सांगता झाली.

अनेक पदाधिकाऱ्यांची ‘छावा’ला सोडचिठ्ठी

$
0
0
‘छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देविदास वडजे पाटील यांच्या निधनानंतर, त्यांच्या वारसदार म्हणवणाऱ्यांनी स्वत:हून संघटनेचे नेतृत्व स्विकारले आणि संघटना वाढवणाऱ्यांना दूर जावे लागले. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी ‘छावा’ला सोडचिठ्ठी दिली आहे,’

आरक्षणाच्या मागणीसाठी २४ जानेवारीला मोर्चा

$
0
0
राज्यात जाट समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २४ जानेवारी रोजी मालेगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समितीने या मोर्चाचे आयोजन केले आहे.

चोरीच्या भंगार मालाच्या सूत्रधाराचा शोध सुरू

$
0
0
ट्रॅव्हल्समधून बाहेरगावी पाठवण्यात येत असलेला चोरीचा भंगार मालाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध गुन्हेशाखेकडून घेण्यात येत आहे. शनिवारी ट्रॅव्हल्समधून बाहेरगावी पाठवण्यात येत असलेला लाखो रुपयाचा माल गुन्हेशाखेने जप्त केला होता.

चंपा चौकात घरफोडीत ४४ हजारांचा ऐवज लंपास

$
0
0
खुलताबाद येथे नवस फेडण्यासाठी गेलेल्या नागरीकाचे घर फोडून ४४ हजारांचा ऐवज पळवल्याची घटना चंपा चौक भागात घडली. शुक्रवारी हा प्रकार घडला असून याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडी : ३ सुरक्षारक्षकांची चौकशी सुरू

$
0
0
वेदांतनगर भागातील प्राईडपार्क येथे उद्योजकाचे घर फोडून सवादहा लाखाचा ऐवज पळवल्याचा प्रकार शनिवारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी तेथील तीन सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेत चौकशी केली.

‘अपात्र नियुक्त्या रद्द कराव्यात’

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत १२८ केंद्रप्रमुखांची पदे १९९५ मध्ये निर्माण झाली. त्यानंतर आजवर केंद्रप्रमुख पदोन्नती झालेली नाही. ९० पदे रिक्त झाली आहेत. या जागांवर ४० ते ५० शिक्षकांना केंद्रप्रमुखांचा पदभार देण्यात आला आहे.

आम आदमी योजनेचा ३५० कुटुंबांना लाभ

$
0
0
आम आदमी विमा योजनेत यावर्षी जिल्ह्यातील ३५० कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर या योजनेत ६५ हजार ७९४ नव्या लाभार्थींची भर पडली आहे. आता जिल्ह्यातील लाभार्थींची संख्या एक लाख ८३ हजारांपर्यंत पोचली आहे.

अन्न सुरक्षेच्या लाभार्थींच्या याद्या रेशनवर

$
0
0
येत्या एक फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत असलेल्या अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या ‘एपीएल’ लाभार्थींच्या याद्या संबंधित रेशन दुकानांवर लावण्यात येणार आहेत. यादीबाबत आक्षेप दाखल करण्यासाठी येत्या २४ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक लढविण्यापासून दमानिया तूर्त लांब राहणार

$
0
0
भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा करून लक्ष वेधून घेणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’च्या नेत्या अंजली दमानिया यांनी आता मात्र निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

रेल्वे फाटक नाही, तर उद‍् घाटनही नाही

$
0
0
शहानूर मियाँ दर्गाह रेल्वे उड्डाणपूल झाल्यानंतर, देवानगरी ते सातारा परिसराला जोडणारा रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे क्रॉसिंग बंद झाल्यास या भागातील लोकांची चांगली अडचण होणार आहे.

‘रोहमी’ची मजुरी ‘राम भरोसे’

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (एमआरईजीएस) औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत झालेल्या कामांतून दिले जाणारे साडेपाच कोटी रुपये तांत्रिक अडचणींमुळे थकित आहेत.

नव्या उपविभागांसाठी २ कोटींच्या गाड्या

$
0
0
राज्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या महसूल उपविभागांसाठी सरकारने ३४ नव्या गाड्या खरेदी करण्याला मान्यता दिली आहे. त्यासाठी दोन कोटी चार लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

कर्जदारांची सीबीआय चौकशी करा

$
0
0
राष्ट्रीयकृत बँकांनी मोठ्या उद्योगांना दिलेली कोट्यवधी रुपयांची कर्ज बुडीत निघाली आहेत. अशा कर्जदारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यामुळे प्रकरणात कर्जदारांसह बँकेतील अधिकारीही अडकले आहेत अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी समता नागरी पतसंस्थेच्या वैजापूर शाखेच्या उदघाटनप्रसंगी दिली.

नशेत लावली स्वतःच्या घराला आग

$
0
0
दारूच्या आहारी जाऊन अनेकांनी आपले कुटूंब उद्धवस्त केल्याच्या गोष्टी ऐकल्या असतील. पण, चक्क एक मद्यपी आपल्या घरात झोपलेला असताना, त्याच्या हातातील सिगरेट घरातील बिछान्यावर पडली आणि आग लागली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images