Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हज यात्रेनंतर ‘उमराह’ यात्रेचेही हज कमिटीचे नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

दरवर्षी सौदी अरेबिया येथे यात्रेकरूंना हज कमीटीच्या माध्यमातून हज यात्रेला पाठविले जाते. हज यात्रेशिवाय सौदी अरेबियाला पवित्र शहर मक्का येथे मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात. उमराहला जाणाऱ्या भाविकांसाठी हज कमिटीच्या वतीने आगामी काळात नियोजन करण्याचा विचार सुरू आहे.

औरंगाबाद विमानतळावरून दरवर्षी हज यात्रेला दोन ते अडीच हजारावर हाजी जातात. दरवर्षी या यात्रेसाठी औरंगाबादहून पाच ते आठ हजाराच्यावर अर्ज दाखल होत असतात. ज्यांना हज यात्रेला जाणे शक्य होत नाही, असे भाविक वर्षभरात केव्हाही सौदी अरेबिया येथे मक्का आणि मदिना येथे जात असतात. याला उमराह म्हटले जाते. उमराह यात्रेचे आयोजन अनेक खासगी टूर्स ऑपरेटर करतात. हज यात्रेच्या दरम्यान येणाऱ्या खर्चापेक्षा निम्म्या खर्चात उमराहचा खर्च होतो. हज कमिटीच्या वतीने उमराह यात्रेचेही नियोजन करावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. मात्र, हज कमिटीकडून याबाबत विचार करण्यात आलेला नव्हता. शिवाय ही वर्षभर केली जाणारी प्रक्रिया असून यासाठी तेवढे मनुष्यबळ हज कमिटीकडे नाही. यामुळे याबाबत अद्याप विचार झाला नव्हता. आता हज कमीटीचे अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांनी उमराह यात्रेच्या नियोजनाबाबत हज कमिटीकडून विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. केंद्र आणि राज्य स्तरावर हा प्रयत्न सुरू आहे. खासगी टूर्सपेक्षा हज कमिटीचा उमराहचा खर्च कमी असेल, असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सरताज खान, अलहाज रहेनुमाईचे अध्यक्ष अहेमद पटणी, सचिव सय्यद साबेर, जिल्हा हज कमिटी उपाध्यक्ष अब्दुल कय्यूम, दौलत पठाण, शाकेर राजा, नबी पटेल, फारूख पठाण, जाकिया बानो, मुख्तार खान आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक पिशवीत पाणी विकण्यास खंडपीठाची मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पिण्याच्या पाण्याच्या पिशव्याची जाडी, फेरवापराची क्षमता आणि विस्तारित उत्पादक जबाबदारी ही अधिसूचनेच्या खंड चारप्रमाणे असेल तर, पिशवी निर्मिती करण्याचा व्यावसाय सुरू ठेवू शकतात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाल आणि न्यायमूर्ती ए. एम. ढवळे यांनी दिले, मात्र शासनाने निश्चित केलेल्या नियमावलींचे काटेकोरपणे पालन करूनच ही विक्री करता येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट केले.

'महाराष्ट्र पॅकेज्‌ड ड्रिकिंग वॉटर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन' यांच्यातर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली. महाराष्ट्र शासनाने २३ मार्च २०१८ रोजी अधिसूचना आणि ११ एप्रिल २०१८ रोजी काढण्यात आलेले शुद्धीपत्रक रद्द करण्यात यावे, पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक पाऊचवर (पिशवी) लागू केलेली बंदी भेदभाव करणारी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्याच्या प्लास्टिक फेरवापरास योग्य नसताना देखील त्याच्यावर बंदी आणण्यात आली नाही मात्र, पिण्याच्या पाण्याचा पाऊच फेरवापरास योग्य असताना त्याच्यावर बंदी आणण्यात आली. हे समानतेच्या हक्काविरोधात आहे, असा दावा न्यायलयासमोर करण्यात आला.

मूळ अधिसूचनेला अनुसरून ३० जून २०१८चे शुद्धीपत्रक सादर करण्यात आले. त्यात ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडी, २० टक्क्यांपेक्षा जास्त फेरवापराची क्षमता आणि विस्तारित उत्पादक जबाबदारी घेणारे हमी उत्पादकाने घेतली असेल तर, त्यास प्लास्टिक उत्पादनास परवानगी देण्यास हारकत नाही. याचिकाकर्ता व त्यांच्या असोसिएशनच्या सदस्यांकडून वापरली जाणारी प्लास्टिकची पिशवी ६० मायक्रॉन जाडीती आहे. तिचा फेरवापराची जबाबदारीही असोसिएशनने घेतली आहे, असा युक्तीवाद अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी न्यायलयासमोर केला. तो ग्राह्य धरून खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

या याचिकेवर पुढील सुनावणी सहा जून रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सतिश तळेकर, अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी तर, प्रतिवादींतर्फे अ‍ॅड. ए. आर. काळे यांनी काम पाहिले.

\Bसाधारण आठ कोटींचे नुकसान \B

प्लास्टिक बंदीचा नियम लावल्यानंतर मराठवाड्यातील १२५ ड्रिकिंग वॉटर करणाऱ्या उद्योगापैकी ५० टक्के उद्योग बंद झाले आहे. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झालेले आहेत. आतापर्यंत उद्योजकांचे आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर सरकारचा दोन कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे या उद्योगांना जीवदान मिळाले असल्याचे अर्जदार सय्यद जावेद अख्तर यांनी सांगितले.

\Bग्रामीण भागाची सोय होईल\B

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दोन रुपयांना मिळणाऱ्या या पाऊचमुळे अनेक नागरिक, प्रवासी यांची तहान भागात होती. या आदेशामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची सोय होणार आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे; तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या प्लास्टिकच्या बॅगचा फेरवापर करण्यासाठी गो ग्रीन या संस्थेच्या मदत घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर परिसरात सात ठिकाणी आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर आणि परिसरात शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी दिवसभरात सात ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. यामध्ये चितेगाव येथील व्हिडियोकॉन कंपनीचा देखील समावेश आहे. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या आगींवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे या आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगीची पहिली घटना रविवारी पहाटे चितेगाव येथील व्हिडीयोकॉन कंपनीच्या व्हॅल्यु इंडस्ट्रिज रेजफ्रिरेटर प्लाँट-स्टोन १५ येथील मोकळ्या जागेतील भंगार आणि कच्चा मालाला लागल्याची घडली. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा आणि पदमपुरा येथील अग्निशमन दलाच्या तीन बंबानी चितेगाव गाठले. वाऱ्याने आग पसरत असल्याने ती विझवण्यात अडचण येत होती. अग्निशमन दलाने ही आग काही वेळात आटोक्यात आणली. शनिवारी मध्यरात्री देवळाई चौकातील एका फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. चिकलठाणा येथील अग्निशमन दलाच्या बंबाने धाव घेत ही आग आटोक्यात आणली. रविवारी पहाटे बीड बायपासवरील उमरीकर लॉन्स येथील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली. सिडको येथील अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळ गाठत ही आग आटोक्यात आणली. रविवारी दुपारी पाऊण वाजता चित्ते पिंपळगाव येथील संभाजीराजे साखर कारखाना परिसरातील भंगार सामानाला आग लागल्याची घटना घडली. चिकलठाणा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. रविवारी दुपारी हिमायतबाग येथील फळझाडांना दुपारी आग लागल्याची घटना घडली. पदमपुरा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. रविवारी सायंकाळी हर्सूल सावंगी परिसरात कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली होती. सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत ही आग विझवली. रविवारी सायंकाळी मुकुंदवाडी बसस्टॉपजवळ कचऱ्याला तसेच टपऱ्यांना आग लागल्याची घटना घडली होती. चिकलठाणा अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटने या आगी लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. पदमपुरा येथील मुख्य अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी चोरी थांबेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात विविध भागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरूच असताना अनेक भागांतील उघड्या पाइपमधून अनधिकृत नळ जोडणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. नळ जोडणीसाठी फोडण्यात येणाऱ्या जलवाहिनी दुरुस्त करताना महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. शहानूरमिया दर्गा उड्डाणपुलाखाली जलवाहिनीतून रविवारी हजारो लिटर पाणी वाहून गेल्याचे समोर आले तर, पैठण येथे तांत्रिक अडचणीमुळे ही काहीवेळ पाणीपुरवठा थांबला होता.

जायकवाडी धरणाची उपयुक्त जलसाठ्याची पातळी शून्य टक्क्यांच्या खाली पोचली आहे. त्यात शहरात पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाची दमछाक झाल्याचे चित्र आहे. अनेक विभागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा नाही. सिडको-हडको जलकुंभावर दररोज ४०० टँकर सुरू असून, त्यात मागणीची आणखी भर पडते आहे. त्याचवेळी शहरातील उघड्या पाइपवरून रात्री बेकायदा नळ जोडणीकरून पाणी घेणाऱ्यांवर महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नाही. रविवारी शहानूरमिया दर्गा पुलाच्या खाली अनाधिकृत नळांसाठी फोडण्यात आलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाहून गेले. पाच दिवसांपासून हे पाणी वाया जात असल्याचे सांगण्यात येते. बेकायदा नळ जोडणीसाठी किंवा पाण्यासाठी पाइप फोडल्यानंतर तो तसाच सोडून दिला जातो. त्यातून पाणी खाली सांडते व वाया जात आहे. अशा अनेक ठिकाणी दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडे मागणी होत आहे. त्यावर उपाय काय करावा, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. नळासाठी पाइपला छिद्र पाडले जाते. त्यात पाणी सोडल्यानंतर पाण्याच्या अधिक दाबामुळ‌े हे पाइप निखळतात.

\Bपथक कागदावर; कारवाई शून्य\B

अनधिकृत नळ जोडणी शोधण्यासाठी पालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले होते. शहानूरमिया दर्गा परिसरात ३० नळजोड अनिधकृत आढळले. शहरातील इतर भागातही अशाच प्रकारची परिस्थिती आहे. असे असले तरी, पथकाच्या तपासणीचे काम गुलदस्त्यात आहे. त्यासह अनधिकृत नळ जोडणी घेणाऱ्यांवर कारवाई ही नसल्याने अशा प्रकारांना बळ मिळते आहे. त्यात अशा प्रकारे पाणी वाया जात असल्याने अशा प्रकारांना तरी प्रशासनाने आळा बसवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शहराला पाणी आवश्यक...१९० एमएलडी

प्रत्यक्षात मिळते...............११५-१२० एमएलडी

पाइप लाइनवरून होणारी गळती थांबविण्यात आम्हाला यश मिळते आहे. काही ठिकाणची माहिती आम्हाला मिळाली की, त्यावरही आम्ही योग्य ती कारवाई करतो.

- हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता, महापालिका, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर बस धावण्यासाठी आणखी महिनाभराची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी योजनेतून शहरात दीडशे सिटी बस धावणार, असे सांगण्यात येते. जानेवारीतच शंभर बस धावतील असे सांगणाऱ्या महापालिकेला त्याचे अद्याप नियोजन करता आले नाही. सध्या रस्त्यावर केवळ ३६ बसच धावत आहेत. नवीन ८१ बस दाखल झाल्या आहेत, परंतु त्याबाबतची कायदेशीर कार्यवाही नाही. शंभर बस रस्त्यावरून धावण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागेल, असे चित्र आहे.

शहर बससेवेचा शुभारंभ २३ डिसेंबरला युवासेनेच प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शंभर बस शहरातील रस्त्यावरून धावतील, असा दावा लोकप्रतिनिधींनी केला होता. प्रत्यक्षात एप्रिल संपला तरी शंभर बस रस्त्यावर आलेल्या नाहीत. शहर बससेवेचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे बैठक झाली. एसटी महामंडळाचे प्रशांत भुसारी, सहायक आयुक्त सुरेश कवडे, मो. रा. थत्ते आदी प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी शहरात ३६ बसच धावत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शंभर बस केव्हा धावणार हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

सध्या शहरात ८१ बस उपलब्ध आहेत. उर्वरित बसही लवकरच येणार असून, शंभर बस रस्त्यावर धावण्यासाठी एक महिना किंवा त्यापेक्षा अधिकचा कालावधी लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. शहर बसच्या ताफ्यात ५० इलेक्ट्रिक बसही असतील. त्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. इलेक्ट्रिक बस महागडी असून, एका बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. बस खरेदीसाठी राज्य सरकार मदत करणार असल्याचे सांगण्यात येते.

\Bनागिरकांची गैरसोय\B

शहर बससेवेमुळे नागरिकांना सुविधा झाली असली तरी, मागणी प्रमाणात पुरेशा बस नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पुरेशा बस नसल्याने वेळापत्रकही पाळणे अनेकदा कोलमडते आहे. बस थांबे, त्या ठिकाणी वेळापत्रकाची माहिती फलक या सुविधा केव्हा होणार, असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी, बीएडचे पेपर पुढे ढकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सोमवारी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. विधी, बीएड, एमएड अशा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे पेपर कधी होणार याबाबतचे वेळापत्रकही विद्यापीठाने जाहीर केले. २९ एप्रिल रोजी राज्यातील १७ लोकसभा मतदार संघांत मतदान होत असून यापैकी अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विधी, बीएड, एमएड, शारिरिकशिक्षणशास्त्र, बीव्होक अशा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षेचे पेपर होते. हे पेपर विद्यापीठ प्रशासनाने पुढे ढकलले आहेत. प्रवेश पूर्व परीक्षेमुळे विद्यापीठांतर्गत कॉलेजमध्ये राज्यभरातील विविध भागातून विद्यार्थ्यांना येथील विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागला. चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघातील मतदान आहे. ज्यामध्ये नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई आदी ठिकाणाहून विद्यार्थ्यांचे प्रवेश येथे आहेत. त्यामुळे त्या दिवशी पेपर ठेऊ नये, अशी मागणी पुढे आली होती. याबाबत प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते. अखेर विद्यापीठाने सोमवारी होणारा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत विद्यापीठाने म्हटले आहे की, विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात राज्याच्या अनेक जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहे. विद्यापीठातर्फे विधी, शिक्षणशास्त्र व शारिरिकशिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचा २९ चा पेपर आता ३० एप्रिल रोजी होणार आहे. यासह सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ३० एप्रिल रोजी होणारी परीक्षा ५ मे रोजी घेतली जाणार आहे. तर, बीएस्सी अँड बीव्होक, बीकॉम, बीबीए आणि बीसीए (८०-२० पॅर्टन)ची २९ रोजी होणारी परीक्षा ५ मे रोजी होणार आहे.

..

निर्णयाला विलंब

राज्यातील विविध लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या तारखा पूर्वीच जाहीर झालेल्या आहेत. त्यावर २९ एप्रिल रोजी राज्यातील सतरा लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्या अनुशंगाने काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी प्रशासकीय पातळीवरून याबाबत विचारणा केली होती. मात्र, सुरुवातीला प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. विद्यार्थी संघटनांनी निवेदनही दिले. त्यानंतर प्रशासनाने पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत कॉलेजांना शनिवारी सायंकाळी त्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले. रविवारी कॉलेज बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना उशिराने त्याची माहिती मिळाली. विद्यापीठाने परीक्षांचे नियोजन करतानाच अशा बाबींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

असे आहे नवे वेळापत्रक..

अभ्यासक्रम................................................ परीक्षांची सुधारित दिनांक

सर्व पदव्युत्तर, विधी, बीएड, बीपीएड................ ३० एप्रिल

सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम............................... ५ मे

बीएस्सी आणि बीव्होक, बीकॉम, बीबीए आणि बीसीए(८०.२०) ५ मे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाकट्टातर्फे गुरुवारपासून शहरात अभिनय कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या कलाकट्टातर्फे मोफत महासमर कँम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोमवारपासून (२९ एप्रिल) मॉडेल फोटोशूट आणि गुरुवारपासून (२ मे) अभिनय कार्यशाळेला सुरुवात होणार आहे.

कॅम्पमधील कार्यशाळांमध्ये टाकाऊपासून टिकाऊ, विज्ञानाचे प्रयोग, फ्लॉवर मेकिंग, रांगोळी, क्राफ्ट, मेंदी, नृत्य कार्यशाळा, कॉफी, चारकोल, टी शर्ट, मधुबनी पेंटिंग अशा कार्यशाळा होतील. अभिनय कार्यशाळेत प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अमेय दक्षिणदास मार्गदर्शन करतील. पहिल्या शिबिरात बेसिक ऑफ अॅक्टिंग, अभिनयासंबंधित खेळ याद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर काहींची निवड करुन त्यांना पुढील मोफत प्रशिक्षण सातत्याने दिले जाईल. शिबिरात २ ते ६ मे दरम्यान सायंकाळी ६ ते ८ या वेळेत अभियन कार्यशाळा, ६ ते १० मे दरम्यान टाकाऊ ते टिकाऊ, विज्ञानाच्या प्रयोगावर दुपारी १२ ते २.३०, ३ ते १० मे दरम्यान महिला-मुलींसाठी फ्लॉवर मेकिंग, रांगोळी, क्राफ्ट, मेंदी कार्यशाळा, ११ ते १७ मे दरम्यान दुपारी १२ ते २.३० या वेळेत नृत्य कार्यशाळा, महिला-मुलींसाठी नृत्य कार्यशाळा, १८ ते २२ मे दरम्यान दुपारी ३ ते ५.३० या वेळेत कॉफी, चारकोल, टी शर्ट, मधुबनी पेंटिंगवर कार्यशाळा होईल. ही कार्यशाळा प्लॉट नं. ५, कुलकर्णी हॉस्पिटलसमोर, पिरॅमिड चौक ते प्रोझोन रोड, सेक्टर ए, एन-१, सिडको येथे होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हळदीत नाचण्याचा वाद; तरुणाला बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये डोक्याला वार लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता भाग्यनगर भागात घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी जखमी तरुण कृष्णा कैलास आठवले (वय १९, रा. संसारनगर) याने तक्रार दाखल केली. आठवले हा त्याचा मित्र रवी डोंगरे याच्या लग्नानिमित्त हळदी समारंभासाठी गेला होता. यावेळी त्याच्या डोक्याला संशयित आरोपी सुमित नाथभंजन (रा. क्रांतीनगर) याचे लोखंडी कडे लागत होते. आठवले याचा मित्र रोहन साळवे हा सुमितला नीट नाच कडे लागत आहे, असे समजावून सांगण्यासाठी गेला होता. यावेळी सुमित आणि त्याच्या मित्राने रोहनला शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. आठवले हा भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना सुमितने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. यामध्ये आठवले गंभीर जखमी झाला. या प्रकरणी आठवलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुमित नाथभंजन आणि साथीदाराविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार बनकर हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेष्ठ पत्रकार लटपटे आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जेष्ठ पत्रकार सुंदर लटपटे आत्महत्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी पुंडलिकनगर भागात लटपटे यांनी गळफास घेत आत्महत्या केली हेाती. मृत्युपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये संजीव उन्हाळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला होता. याप्रकरणी सुंदर लटपटे यांचे चुलत भाऊ भाऊसाहेब नानासाहेब लटपटे (वय ३९, रा. बावी, ता. आष्टी) यानी दिलेल्या तक्रारीवरून संजीव उन्हाळे आणि एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय फसाटे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील टँकरने पार केली हजारी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईने टँकरचा उच्चांक गाठला आहे. एप्रिल अखेर टँकरचा आकडा १००० पार करून गेला आहे. नांदूर मधमेश्वरचे आवर्तन न सोडल्याने वैजापूर व गंगापूर तालुक्यातील गंगथडीच्या गावांमधील जलस्त्रोत आटले आहेत आणि तिकडच्या गावांमधून टँकरची मागणी वाढली आहे. जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. यासंदर्भाने सोमवारी विभागीय आयुक्त तर आठवडाभरात मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे.

गेल्यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला. भर पावसाळ्यात गंगापूर व वैजापूर तालुक्यातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. परतीच्या पावसावर प्रशासनाची भिस्त होती, पण त्यानेही दगा दिला आणि पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई निवारण आराखडा तयार करताना संभाव्य टँकरची संख्या जी अपेक्षित होती. तो आकडा पार झाला आहे. एप्रिल अखेर जिल्ह्यात १००० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीच्या आठ फिलर्स पॉइंटवरुन टँकर भरले जातात आणि १५ लाख नागरिकांची तहान भागविली जात आहे. अजून मे आणि वेळेवर पाऊस आला नाही तर जून महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. त्यासाठी युद्धपातळीवर नियोजन करणे सुरू आहे.

गंगापूर व वैजापूर तालुक्यातील जी गावे गोदावरी नदीच्या पात्रालगत येतात. तिथे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत विहिरींना थोडेफार पाणी होते. त्यातून स्थानिक गावकऱ्यांची तहान भागवली जात होती, पण नांदूर मधमेश्वर मधून उन्हाळी आवर्तन अद्याप सोडलेले नाही. त्यामुळे हे जलस्त्रोत आटत चालले आहेत. दोन्ही तालुक्यातील गावांमधून टँकरची मागणी गेल्या आठवड्यात वाढली आहे. विहीर अधिग्रहण करावयाची तर तिथे पाणी नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. याच अनुषंगाने सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या सर्व यंत्रणा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. याशिवाय २ मे रोजी मुंबईत मुख्य सचिवांनी राज्याची पाणीटंचाई आढावा बैठक बोलावली आहे.

या दोन्ही बैठकांमधून जुलैपर्यंत ग्रामीण भागात पाणी कसे पुरवायचे ? या संदर्भाने निर्णय अपेक्षित आहे.

१००० टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाणीटंचाई तीव्र असून १५ लाख ३१ हजार ६७५ नागरिकांची तहान भागवली जात आहे. औरंगाबाद तालुक्यातील १४०, गंगापूर १३७, कन्नड ४९, खुलताबाद २९, पैठण ९४, फुलंब्री ६३,सिल्लोड ९०, सोयगाव ९० तर वैजापूर तालुक्यातील १०९ गावांना तसेच २५४ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्यक्षात २०२३ खेपा मंजूर असून १९९८ खेपा झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. ४८२ खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.पुढील महिन्यात यामध्ये मोठी वाढ अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मटा भूमिका

नियोजनाकडे दुर्लक्ष

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्यावर्षी पाऊस कमी पडला. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार, हे उघड होते. या टंचाईच्या संकटाला विचारात घेऊन प्रशासनाच्या पातळीवर नियोजन अपेक्षित आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यावर टँकर सुरू करा, विहिरी अधिगृहित करा या परंपरागत उपायांवर प्रशासनाचा भर असतो. त्यापेक्षा पाऊस कमी पडल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासूनच पाण्याच्या वापराचे नियोजन करणे गरजेचे होते. धरणांमधील पाणीसाठा रब्बी, उन्हाळी हंगामांसाठी वापरला जातो. उसाच्या क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात पाणी दिले जाते. त्यावेळी पाणीवापरण्याची कार्यक्षमता वाढावी, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्याची परंपरा सोडल्याशिवाय टंचाईचा काळ सुसह्य होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारीही पारा ४३.६ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल ६१ वर्षांनंतर शनिवारी औरंगाबादच्या तापमानाने उच्चांकाची बरोबरी गाठली होती. रविवारीही ४३.६ अंश तापमान नोंदविले गेले. सलग दोन दिवस तापमानाचा उच्चांक गाठला. सकाळपासूनच प्रचंड ऊन असल्याने औरंगाबादवासियांचे हाल झाले. रविवारची सुटी असल्याने शहरवासियांनी घरी बसणे पसंद केले. त्यामुळे सायंकाळपर्यंत रस्त्यांवर अक्षरश: शुकशुकाट होता.

सकाळी सातपासूनच कडक ऊन आणि अंगातून निघणाऱ्या घामाचा धारांनी औरंगाबादकर त्रस्त झाले. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास तापमानाचा पारा ४३.६ अंशांवर पोचला. १९५८ मध्ये २६ एप्रिल रोजी एवढे उच्चांकी तापमान नोंदविले गेले होते. तब्बल ६१ वर्षांनी सलग दुसऱ्या दिवशी या रेकॉर्डची बरोबरी झाली. सोमवारीही उन्हाचा पारा ४३ अंशांवर असेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी दुपारी एक ते तीन उन्हामुळे जणू अघोषित संचारबंदी लागल्याचे चित्र होते. सायंकाळी शीतपेये, रसवंत्यांवर गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केळगाव, जांभई, अंभईत पॉइंट वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

टँकरच्या नियोजित फेऱ्या पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील केळगाव, जांभई येथे एक पॉइंट वाढवा, तसेच अंभई येथील जलशुद्धीकरण केंद्रावर टँकर भरण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महसूल प्रशासनाला केल्या आहेत.

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी शुक्रवारी केळगाव प्रकल्प व जांभई जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत पाणीटंचाईचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे, उपअभियंता रमेश कोयेलवार, नायब तहसीलदार संजय सोनवणे, पांडुरंग जिवरग आदी उपस्थित होते.

तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असून ९० गावांना १७४ टँकरच्या २८६ खेपा करून पाणी पुरवठा केला जात आहे. काही गावांना कन्नड तालुक्यातील नेवपूर, तर काही गावांना केळगाव व जांभई जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी पुरवठा केला जात आहे. नेवपूरचे अंतर लांब, तर केळगाव व जांभई येथे दोन-दोन पॉइंट असल्याने टँकर भरण्यास अडचण येत असल्याने नियोजित खेपा पूर्ण होत नाहीत. यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड लागत आहे. याची दखल घेत केंद्रेकर यांनी हे आदेश दिले आहेत.

\Bअंभई येथे उपाययोजना \B

अंभई येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ही टँकर भरण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी करताच गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे यांनी अंभई येथे जाऊन सरपंचासोबत चर्चा केली. तीन ते चार दिवसांत तात्पुरती पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करून तेथून टँकर भरण्याची व्यवस्था केली जाईल व नियोजित खेपा पूर्ण केल्या जातील, अशी माहिती प्रकाश दाभाडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक १२ दरवाजांची दुरुस्ती पुढील महिन्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून महापालिका खर्च करणार आहे. ५२ दरवाजांची ओळख असलेल्या शहरातील अस्तित्वात असलेल्या १२ दरवाजांची डागडुजी करत त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. मे महिन्यात दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.

शहरातील अनेक ऐतिहासिक दरवाजांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. काही दरवाजांची दुरुस्ती व सुशोभिकरणही करण्यात आले मात्र, निधी नसल्याने दरवाजांच्या डागडुजीकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. स्मार्ट सिटी योजनेतून दरवाजांसह ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात येणार असल्याचे कळते. त्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने हालचाली वाढविल्या आहेत. यामध्ये १२ दरवाजांची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांचे काम तेजस्विनी आफळे यांना देण्यात आले आहे. आचारसंहितेमुळे हे काम थांबले होते. मे महिन्यामध्ये दरवाजांच्या सुशोभिकरणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. १२ दरवाजांमध्ये दिल्ली दरवाजा, मेहमूद दरवाजा, रंगीन दरवाजा, रोशन गेट, कटकट गेट, मकई गेट, काळा दरवाजा, भडकल गेट, पैठण गेट, फाफर गेट, बारापुल्ला दरवाजा आदींचा समावेश आहे.

\Bचार वर्षांपासून प्रयत्न\B

दरवाजांची दुरुस्ती करून शहराचे वैभव टिकविण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न झाले, मात्र ते अयशस्वी ठरले. त्यात निधीची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. यात आता पुन्हा चार वर्षांपासून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. स्मार्ट सिटीसाठी आलेल्या निधीतून डागडुजी केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेचा २८३ कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे आहे. स्मार्ट सिटीच्या मंडळाने विषय प्रकल्पात हा प्रकल्प मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार आता हे काम सुरू होणार आहे. त्यामुळे शहराची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याच्या डोळ्यादेखत खात्यातून ६० हजार लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंडियन आर्मीतून बोलत असल्याची थाप मारत पंख्याची ऑर्डर देत एका इलेक्ट्रिकल वस्तूंच्या व्यापाऱ्याला ऑनलाइन ६० हजारांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार १५ एप्रिल रोजी दुपारी धावणी मोहल्ला येथील लक्की स्टोअर्स येथे घडला. या प्रकरणी अज्ञात मोबाइलधारकाविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी श्यामलाल भगवानदास आहुजा (वय ८९, रा. सिंधू भवन, सिंधी कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली. आहुजा यांचे धावणी मोहल्ल्यात लकी स्टोअर्स हे इलेक्ट्रिकल वस्तू विक्रीचे दुकान आहे. १५ एप्रिल रोजी त्यांचा मुलगा आकाश आहुजा याच्या मोबाइलवर अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने इंडीयन आर्मी बटालीयन सहा येथून बोलत असल्याचे सांगत उषा कंपनीचे बारा पंखे खरेदी करायचे असल्याचे सांगितले. तुमच्या बँकेच्या अकाउंट क्रमांकावरील मोबाइल क्रमांक कळवा, तुम्हाला ऑनलाइन पैसे पाठवतो, तसेच पंखे घेण्यासाठी माझा माणुस येईल, असेही सांगितले. यावर आहुजा यांचा विश्वास बसला, त्यांनी अकाउंट क्रमांकाला जोडलेला मोबाइल क्रमांक कळवला. त्यानंतर त्यांची फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने आहुजा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अनोळखी मोबाइलधारकाविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक शिनगारे हे तपास करीत आहेत.

\Bअशी झाली फसवणूक \B

व्यापारी आहुजा यांनी फोनवर बोलणाऱ्यावर विश्वास बसल्यामुळे अकाउंट क्रमांकाला जोडलेला मोबाइल क्रमांक त्याला कळवला.

यानंतर काही वेळातच आहुजा यांच्या मोबाइलवर १२ हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज मोबाइल डिस्पेलवर आला. त्यावर पे नावाचे एक ऑप्शन होते, ते ऑप्शन आहुजा यांना दाबण्यास सांगण्यात आले. आहुजा यांच्या मुलाने ते दाबले असता आहुजा यांच्या खात्यातूनच रक्कम समोरील अकाउंटवर ट्रान्सफर होऊ लागली होती. आहुजा यांनी ते ऑप्शन रद्द करेपर्यंत प्रत्येकी १२ हजाराप्रमाणे पाच वेळेस, एकूण ६० हजार रुपये त्यांच्या खात्यातून समोरील व्यक्तीला वळते झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदाराच्या मोफत जलसेवेतून नेत्यांना पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमदाराच्या मोफत टँकर सेवेतून सर्वसामान्य नागरिकांना नव्हे तर नेत्यांना पाणी पुरवठा होत असल्याचे सोमवारी उघडकीस आले. ही बाब उघडकीस येताच आमदाराच्या वॉटर टँकरचा चालक पाणी पुरवठ्याच्या नोंदीचे रजिस्टर घेऊन पळून गेला.

जयभवानीनगर, विश्रांतीनगर, आनंदनगर येथील गुंठेवारी भागातील नागरिक पाण्याची तक्रार घेऊन सोमवारी सिडको एन ५ येथील जलकुंभावर आले होते. पैसे भरूनही आम्हाला पाच-सहा दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाही अशी त्यांची तक्रार होती. त्यांनी जलकुंभावरील टँकरची सेवा बंद पाडली. त्याचवेळी आमदार अतुल सावे यांचे मोफत जलसेवेचे टँकर घेऊन टँकरचालक जलकुंभावर आला. आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी हा टँकर अडवला आणि टँकरची हवा सोडण्याचा प्रयत्न केला. याच गडबडीत एका नागरिकाने टँकरचालकाच्या केबीन मधील रजिस्टर हाती घेतले आणि मोफत जलसेवेच्या माध्यमातून कुणाकुणाला पाणी दिले जाते याची यादीच वाचायला सुरुवात केली. या यादीत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, स्वत: अतुल सावे अशी नेतेमंडळींची नावे होती. रजिस्टर मधील नावे एकामागून एक या पद्धतीने जाहीर होऊ लागल्यामुळे टँकरचालक गोंधळला. त्याने त्या नागरिकाच्या हातातील रजिस्टर हिसकावले व पळ काढला. त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी नेत्यांच्या मोफत जलसेवेवर प्रश्नचिन्हच उभे केले. आम्हाला पैसे भरूनही टँकर मिळत नाही आणि नेत्यांना पैसे न भरता घरपोच टँकर मिळते ही बाब अशोभनीय आहे. प्रशासनाने अशा मोफत जलसेवेवर निर्बंध घातले पाहिजेत, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका उपअभियंत्यावर पाणीप्रश्नी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन ६ अयोध्यानगर वॉर्डातील पाणी प्रश्नाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी महापालिकेचे उपअभियंता अशोक पद्मे यांना घेराव घातला. यावेळी पद्मे यांनी आरेरावी केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पद्मे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती राहुल खरात यांनी दिली. ते म्हणाले, अयोध्यानगर वॉर्डातील सात ते आठ गल्यांमध्ये पाणीच येत नाही. या गल्ल्यांमध्ये जलवाहिन्या टाकाव्यात, अशी नागरिकांनी मागणी आहे. काही महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा केला जात आहे, पण पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून या कामासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे सोमवारी नागरिकांनी पद्मे यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. त्यानुसार पद्मे पाहणी करण्यासाठी आले, पण त्यांनी वरवर पाहणी केली. जलवाहिनी टाकण्याबद्दल काहीच आश्वासन दिले नसल्याने नागरिकांनी पद्मे यांना घेराव घातला. त्यात महिलांचा समावेश अधिक होता. महिलांशी बोलताना पद्मे यांनी आरेरावी केल्याचे खरात यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी पद्मे यांना जाब विचारला, परंतु ते बोलण्यास तयार नव्हते.

\Bआयुक्तांनी आता तरी लक्ष द्यावे \B

या प्रकारामुळे महिलांनी थेट सिडको पोलिस स्टेशन गाठून पद्मे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पद्मे यांनी महिलांना आरेरावी केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. या तक्रारीवरून पद्मे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. राहुल खरात म्हणाले, अयोध्यानगरातील पाणीप्रश्नाबद्दल आम्ही अनेकवेळा आंदोलन केले. आयुक्तांना पाणीप्रश्नाची कल्पना दिली पण त्यांनी देखील लक्ष घातले नाही. शेवटी नागरिकांचा संयम सुटला. आता तरी आयुक्तांनी आमच्या वॉर्डच्या पाणीप्रश्नात लक्ष घातले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा चित्रांची मोहक मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अजिंठा लेणीच्या शोधाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काल्डा कॉर्नर येथील मालती आर्ट गॅलरीमार्फत भरवण्यात आलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाने रसिकांना खिळवून ठेवले आहे. तब्बल ११ कलावंतांच्या ६६ कलाकृती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या ठरत आहेत. या कलाकृती पाहण्याची संधी मंगळवारीदेखील (३० मे) मिळणार आहे. ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी २८ एप्रिल १८१९ रोजी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी शोधली. या प्रदर्शनात दिवंगत कलावंत मारोतीराव पिंपरे यांच्यासह ११ कलावंतांच्या वेधक कलाकृतींनी प्रती अजिंठा उभे केले आहे. अनेक खराब झालेली शिल्पे सुंदर चित्रांच्या माध्यमातून अतिशय बोलकी झाल्याचा अनुभव रसिक घेत आहेत. प्रदर्शनास रसिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मालती आर्ट गॅलरीच्या संचालिका विजया पातूरकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरीचा प्रयत्न; आरोपीस अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्न समारंभाच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील आरोपी सुनिल माणिक मोरे याला शनिवारी (२७ एप्रिल) रात्री अटक करून रविवारी कोर्टात हजर केले असता आरोपीला मंगळवापर्यंत (३० एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी दिले.

याप्रकरणी ईश्वर राजेंद्र उकिर्डे (२५, रा. करमाड) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, उकिर्डे हे शनिवारी (२७ एप्रिल) रात्री वडिलांसोबत दुचाकी हिवर लाडगाव येथील आदिती लॉन्सवर लग्न समारंभासाठी गेले होते. त्यांनी दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली. समारंभ आटोपून उर्किर्डे हे बाहेर आले असता आरोपी सुनील मोरे (२६, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) हा उकिर्डे यांची दुचाकी चोरून नेण्याच्या प्रयत्नात असताना दिसला. त्यामुळे उकिर्डे यांनी इतर लोकांच्या मदतीने आरोपी मोरे याला पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षांतील गैरप्रकार, तपासणी प्रक्रिया संथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी, बारावी परीक्षेत गैरप्रकारात अडकलेल्या शाळांवर अद्याप मंडळाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. शाळांमधील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या तपासणीची प्रक्रिया महिनाभरानंतरही पूर्ण झाली नसल्याचे समोर आले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदा अनेक गैरप्रकार समोर आले. कॉपी प्रकरणांनी यंदा पाचशेचा आकडा पार केला. त्यात अनेक केंद्रावर सामूहिक कॉपीचे प्रकारही समोर आले. यामध्ये गोंदेगाव येथील सरस्वती भुवन हायस्कूल या परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीचा बीजगणिताच्या परीक्षेदरम्यान भरारी पथकाला शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवित असल्याचे आढळून आले. पोरगाव, बिडकीन अशा अनेक केंद्रावरही असेच प्रकार समोर आले. शटरमध्ये परीक्षा, जमिनीवर बसून परीक्षार्थींना परीक्षा देण्याची वेळ, असे अनेक गैरप्रकार समोर आले. मंडळाने कॉपी प्रकरणी ३१ संस्थांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. यामध्ये दहावीला १५, तर बारावीला १६ जणांचा समावेश करण्यात आला. याबाबत काही संस्थांच्या चौकशीसाठी शिक्षणाधिकारी, अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समित्या नेमण्यात आल्या. मात्र, या प्रकरणाची त्यांच्याकडून चौकशीची प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याचे समोर आले आहे.

\Bशाळा, कॉलेजांकडून नोटीसकडे कानाडोळा \B

दहावी, बारावीची परीक्षा होऊन महिना पूर्ण झाला. तरी, गैरप्रकारांत दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधित केंद्रावर काय कारवाई करण्यात येणार याबाबत साशंकता आहे. मंडळाने ३१ संस्थांना नोटीस पाठविण्यात आल्या. त्यांनी अनेक शाळा, कॉलेजांनी या नोटीसचे उत्तर दिलेले नाही. यंदा दहावी, बारावी परीक्षेत कॉपी बहाद्दरांची संख्या वाढली आहे. बारावी परीक्षेत ३२०, तर दहावीत २०७ परीक्षार्थी कॉपी करताना आढळले. त्यांच्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

शिक्षणाधिकारी किंवा भरारी पथकांनी ज्या शाळांना भेटी दिल्या त्यांचे अहवाल आलेले आहेत. चौकशी समिती आहे, त्याचे अहवाल येणे शिल्लक आहेत. त्यानंतर संबंधित प्रकरणी कारवाई करण्यात येईल.

-सुगता पुन्ने, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई अटळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जिल्ह्यात आतापर्यंत पक्षाचा कारभार हा अब्दुल सत्तार काँग्रेस म्हणून चालविण्यात येत होता. आता ही राहुल गांधी काँग्रेस आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करणाऱ्यांचा अहवाल मिळाला आहे. बुथनुसार मतदान स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याबद्दल कडक निर्णय घेतला जाईल,' असा इशारा प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी दिला. प्रसंगी पक्षातील काही जणांना लाथा घालून समजवावे लागण्याची गरज आहे. महापालिकेसाठीची मॅचफिक्सिंग बंद करा, असे त्यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (२९ एप्रिल) घेण्यात आली. या बैठकीला प्रभारी जिल्हाध्यक्ष पटेल यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव औताडे, अशोक सायन्ना, पृथ्वीराज पवार, शहराध्यक्ष नामदेवराव पवार आदींसह ज्येष्ठ नते व पदाधिकारी उपस्थित होते. जालना लोकसभा मतदारसंघात पक्षाला निश्चित यश मिळेल, अशी खात्री व्यक्त करताना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पक्षाला पारंपरिक मतदान चांगले झाल्याचा दावा त्यांनी केला. औरंगाबाद व आणि जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी पक्षाचे काम केले नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी मांडले. पक्षाचे काम न करणाऱ्यांचा अहवाल मिळाला असून उमेदवारांचा अहवाल अद्याप मिळाला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर बंडखोरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले. विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासून करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. दुष्काळावर आक्रमक आंदोलन करावे, वॉर्डनिहाय पक्षाची यत्रंणा कार्यरत करून त्याद्वारे पक्षाचे कार्यकर्ते, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवाव्यात, सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना पटेल यांनी केल्या.

\Bदोन शहर कार्याध्यक्षांची नेमणूक \B

या बैठकीत महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते मीर हिदायत अली व संतोष भिंगारे यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केली. त्यानंतर कार्याध्यक्ष हे पद कोठून आले, अशी चर्चा उपस्थितांत सुरू झाली. याबाबत विचारणा केली असता, शहर किंवा जिल्ह्याच्या गरजेनुसार हे पद निर्माण करता येते, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणिस गणेश पाटील यांनी सांगितले. येत्या काळात शहराध्यक्षपदाची नियुक्ती होणार आहे, त्यावेळी मीर हिदायत अली हे विरोधात राहू नये, याकरिता शहराध्यक्षांनी ही खेळी केल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images