Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘एसपीआय’मध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील (एसपीआय) प्रवेशासाठी २०२१पासून प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ६० जागांवर प्रवेशासाठी राज्यभरातून आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी दरवर्षी रांगेत असतात. यंदा ४३व्या तुकडीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेसाठी यंदा राज्यभरात विविध केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. पाच मे रोजी औरंगाबादमध्ये परीक्षा झाली. वाढलेली परीक्षार्थींची संख्या अन् विविध शहरांमधून घ्यावी लागणारी लेखी परीक्षा, मुलाखतीची प्रक्रिया. त्यामुळे श्रम, वेळ जातो आहे. त्यासाठी आगामी दोन वर्षांत परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार 'एसपीआय' करते आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील एजन्सीची मदत घेतली जावू शकते. त्याची चाचपणी केली जाते आहे. ऑनलाइन परीक्षा औरंगाबादमधून घेतली जाईल. त्यामुळे विद्यार्थांचा त्रास कमी होणार आहे. राज्यात एकमेव असलेल्या या संस्थेने साडेचारशेपेक्षा अधिक विद्यार्थी भारतीय संरक्षणदलात विविध अधिकारी दिले आहेत. एसपीआयने ४३व्या तुकडीचे नुकतीच निवड प्रक्रिया पूर्व केली. संस्थेत प्रवेशासाठी अर्ज भरण्यास तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थी, पालकांना दिला जातो. यंदाही प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. प्रत्यक्ष सात हजार ७४ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली होती. गुणांनुसार मुलाखतीसाठी ३२६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया झाली. ही प्रक्रिया ही अतिशय खडतर असते. त्यानंतर अंतिम प्रवेशासाठी ६६ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीकोनातून या क्षेत्राकडे पहावे, प्रवेशासाठीचा कल वाढावा, या हेतुने आम्ही नवनवीन योजना आखतो आहोत. याचाच भाग म्हणून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार करतो आहोत. तसे प्रयत्न सुरू आहेत.

- कर्नल अमित दळवी, संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थायी सभापतिपदी पहिल्यांदा महिला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या इतिहासात स्थायी समितीच्या सभापतिपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली असून, त्याचा मान भाजपच्या नगरसेविका जयश्री कुलकर्णी यांना मिळाला आहे. त्यांनी 'एमआयएम'चे उमेदवार नासेर सिद्दिकी यांचा सात मतांनी पराभव केला.

'स्थायी' सभापतिपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात भाजपच्या जयश्री कुलकर्णी, राजू शिंदे यांच्यासह 'एमआयएम'च्या नासेर सिद्दिकी यांचा समावेश होता. सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रारंभी नगरसचिव डी. डी. सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. त्यात शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणात जयश्री कुलकर्णी आणि नासेर सिद्दिकी हे दोनच उमेदवार शिल्लक राहिले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली. जयश्री कुलकर्णी यांना अकरा मते मिळाली, नासेर सिद्दिकी यांना चार मते मिळाली. काँग्रेसचे अब्दुल नवीद तटस्थ राहिले. स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे सहा, भाजपचे तीन, एमआयएमचे चार, अपक्ष आघाडीचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहे. सभापतिपदी विजयी झाल्यानंतर जयश्री कुलकर्णी यांनी मावळते सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर, गटनेते प्रमोद राठोड, शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी, नगरसेवक सचिन खैरे, राजेंद्र जंजाळ, गजानन बारवाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील महापालिकेत येत कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.

\Bइंजिनिअर ते सभापती

\Bजयश्री सुरेंद्र कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतले आहे. श्री मंगल केंद्र व केटरर्सच्या त्या प्रोप्रायटर आहेत. त्याशिवाय गार्गी महिला बचत गटाच्या अध्यक्ष, ओंकारेश्वर मंदिर समितीच्या सचिव, अग्निहोत्र हाउसच्या सदस्य, श्रीराम म्युझिकल फाउंडेशनच्या संचालक सदस्य, तेजस्विनी ग्रुपच्या सदस्य अशा विविध संस्थांवर त्या सध्या काम करीत आहेत. वॉर्ड क्रमांक ७७, जवाहर कॉलनी वॉर्डातून भाजपच्या तिकीटावर त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नगरसेविका म्हणून काम करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. त्यांचे पती सुरेंद्र कुलकर्णी तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २०१४-१५च्या पालिका निवडणुकीत त्यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीन झाला. त्यामुळे त्यांच्याऐवजी पक्षाने त्यांच्या पत्नी जयश्री कुलकर्णी यांना तिकीट दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा–देवळाई, शेंद्रासाठी सिटी बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तिकीट दरात कसलिही वाढ न करता उलट सातारा - देवळाई, शेंद्रा, वळदगाव, पाटोदा, सावंगी या भागात सिटी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दर शनिवारी खुलताबादला भद्रामारोती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी देखील बस सेवा सुरू करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीला महापौर तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक नंदकुमार घोडेले, मुख्याधिकारी तथा पालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपस्थित होते. महापौर बैठकीतल्या निर्णयाची माहिती देताना म्हणाले, 'सध्या वीस मार्गांवर सिटी बस सुरू आहे. त्यापैकी १७ मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. सिटीबस सेवेसाठी ८८ चालक व ६० वाहक आहेत. आणखी २०३ चालक आणि ५६ वाहक कंत्राटी पद्धीतीवर नियुक्त केले जातील. सिटी बसचा दर दिवसाचा खर्च तीन लाख ४४ हजार आहे, तर उत्पन्न एक लाख २० हजार रुपये आहे. कमी तिकीट दरामुळे सिटी बसचा तोटा होत असला तरी, तिकीट दरात वाढ करायची नाही असा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाची मुकुंदवाडी येथील बस डेपोची जागा लीज मिळावी म्हणून मागणी केली आहे. बस शेल्टरच्या निविदेलाही दिली. बस स्वच्छ करण्याच्या कामासाठी नवा कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.'

\Bप्रवासी वाढवण्यासाठी पासची योजना

\Bसिटी बसचे प्रवासी वाढवण्यासाठी आठवडी, मासिक, तिमाही पास दिले जाणार आहेत. हे पास घेवून प्रवास करणाऱ्यांना सवलत देखील दिली जाणार आहे. शाळेपर्यंत सिटी बस न नेण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी पास घेऊन बसमध्ये बसावे व शाळेच्या जवळच्या थांब्यावर उतरून शाळेत जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुडबुड करण्यासाठी नाही, शुभेच्छा देण्यासाठी आलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लुडबूड करण्यासाठी नाही तर, स्थायी समितीच्या नवनिर्वाचीत सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेत आलो, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

महापालिकेच्या प्रत्येक कामात, निर्णयात चंद्रकांत खैरे लुडबूड करतात अशी टीका लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर केली जात होती. महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या बहुतेक कामात त्यांचा हस्तक्षेप असतो, यावरही अनेक वेळा चर्चा झाली आहे. मंगळवारी महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतींची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपच्या जयश्री कुलकर्णी विजयी झाल्या. कुलकर्णी यांना शुभेच्छा देण्यासाठी खैरे महापालिकेत आले होते. महापालिकेच्या प्रांगणात महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते सभापतींच्या दालनात गेले. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सभापतींचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. महापौरांच्या दालनात त्यांनी चहापान केले.

यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी मोजक्याच शब्दात संवाद साधला. ते म्हणाले, 'मी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. लुडबूड करण्यासाठी आलो नाही. महापौरपदाची निवडणूक आणि सभापतिपदाची निवडणूक या दोन वेळेसच मी महापालिकेत येतो.'

सभागृह नेता बदलला जाणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, 'याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील. येत्या १५-२० दिवसांत पुन्हा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. पुन्हा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सर्वजण परिश्रम घेणार आहोत.'

लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला. या प्रश्नांना उत्तर देणे मात्र खैरे यांनी टाळले. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार आहे, असे ते म्हणाले. पत्रकार परिषद केव्हा घेणार असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'केव्हा तरी पत्रकार परिषद घेऊ.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोहात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

$
0
0

परभणी :

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथील श्रीराम महादेव काष्टे ( वय १२ ) या शाळकरी मुलाचा मंगळवारी (४ जून) दुधना नदीपात्रातील डोहात बुडून मृत्यू झाला.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुधना प्रकल्पातून तीन दिवसांपूर्वीच नदीपात्रात पाणी सोडल्याने गावांत आनंदाचे वातावरण असताना श्रीरामच्या मृत्यूने त्यावर जणू विरजणच पडले.
नदीला पाणी आले.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर झाला.पण बेसुमार वाळू उत्खननामुळे पात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत. पाण्याने भरलेले डोह नेमके कुठे आहेत ? हेही ओळखणे कठीण आहे. अशाच एका ठिकाणी श्रीराम बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला असता पाय घसरून तो डोहात बुडाला.
त्याचवेळी काही अंतरावर कपडे धुणार्‍या शिलाबाई विश्वनाथ काष्टे यांनी त्याला पाण्यात बुडत असतांना पाहिले. गावकर्‍यांना माहिती समजताच अंकुश सुतार, भगवान काष्टे यांनी श्रीरामाचा मृतदेह डोहातून बाहेर काढला. घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली आहे.

सर्वांशी मनमोकळेपणाने वागणारा, विनोदीशैलीने शाळेत वक्तृत्व स्पर्धा गाजवून खळखळून हसविणारा गावचा लाडका रामा सहावीत जाणार होता. पण आता अचानक दिसेनासा झाल्याने त्यांच्या सवंगड्यासह गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमानियांचे पावणे दोन लाखांचे घड्याळ सापडले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पावणेदोन लाख रुपये किमतीचे घड्याळ चोरट्यांनी लांबवले. हा प्रकार सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळदरम्यान निराला बाजार येथील पर्ल हॉटेलमध्ये घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी घड्याळ हॉटेलमधील ‘लॅन्ड्री’मध्ये सापडले. बेडशीटमध्ये घड्याळ अडकली होती, अशी माहिती क्रांतीचौक पोलिसांनी दिली.

सोमवारी अंजली दमानिया (वय ४० रा. ५०२, विजयश्री दुर्ग, सांताक्रुझ) त्यांच्या कामानिमीत्त शहरात आल्या होत्या. निराला बाजार येथील हॉटेल पर्लमध्ये खोली क्रमांक १०४मध्ये त्या मुक्कामाला थांबल्या होत्या. सोमवारी रात्री नऊ वाजता त्यांनी हॉटेलमध्ये ‘चेक-इन’ केले. सकाळी स्वच्छतागृहात जाताना त्यांनी त्यांचे लॉगीन्स वॉच या विदेशी कंपनीचे एक लाख ७३ हजार रुपये किंमतीचे घड्याळ रॅकमध्ये ठेवले होते. यानंतर दमानिया यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास हॉटेलमधून ‘चेक-आउट’ केले. दुपारी चारच्या सुमारास दमानिया यांना हातामध्ये घड्याळ नसल्याची आठवण आली. त्यानी पुन्हा हॉटेलमध्ये येऊन घड्याळाबाबत व्यवस्थापनाकडे विचारणा केली. यावेळी त्यांना घड्याळ नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. बुधवारी या खोलीची पुन्हा सायंकाळी झाडाझडती घेण्यात आली.

दमानिया यांनी हॉटेलची खोली सोडल्यानंतर तेथील चादरी, बेडशीट धुण्यासाठी लॅन्ड्रीमध्ये नेण्यात आली. दमानिया यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर हॉटेलमध्ये चौकशी सुरू झाली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनानेही शोधाशोध सुरू केली. त्यावेळी लॅन्ड्रीमधील एका बेडशीडला घड्याळ अडकल्याचे आढळले. हॉटेल व्यवस्थापनाने घड्याळ सापडल्याचे पोलिसांना कळविले आणि ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पाच संशयितांची चौकशी

दरम्यान क्रांतीचौक पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक या प्रकरणी तपास करीत होते. दमानिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राहूल सुर्यतळ यांनी पथकासह हॉटेलला भेट दिली. यावेळी हॉटेलमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. यामध्ये दमानिया यांच्या रुममध्ये सफाई कामगार तसेच वेटर जात असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेत चौकशी केली आहे. तसेच मंगळवारी तीन संशयितांच्या घराची झडती देखील घेण्यात आली मात्र या झडतीमध्ये काही मिळाले नसल्याची माहिती एपीआय राहूल सुर्यतळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाखांची टोपी; कंत्राटदारास बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराचे बांधकाम करून देण्यासाठी अडीच लाख घेऊन पसार झालेला आरोपी कंत्राटदार मोहम्मद रिजवान मोहम्मद रमजान याला मंगळवारी (चार जून) अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (सात जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी दिले.

याप्रकरणी नसीर अहेमद वहीद अहेमद शेख (६०, रा. चाऊस कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची मुलगी रुबिना हिने चाऊस कॉलनीतील भूखंडावर सात लाख रुपयांच्या बांधकामाचे कंत्राट आरोपी मोहम्मद रिजवान मोहम्मद रमजान (४५, रा. भारतनगर, ता. जि. अकोला) याला दिले होते. त्यासाठी आरोपीने शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर करारनामा केला होता आणि त्यावर रुबिना, आरोपीने सह्या केल्या होत्या. करारानुसार बांधकामाचे संपूर्ण साहित्य कंत्राटदाराने आणण्याचे ठरले होते व कामासाठी रुबिना हिने आरोपीला फिर्यादीसमोरच अडीच लाख रुपये दिले होते. त्यातून आरोपीने बांधकाम साहित्य आणून फुटिंग, जिना, कॉलम व भिंतीचे काम पूर्ण केले. त्यानंतर नऊ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता आरोपी रिजवान हा त्याच्याकडे काम करणारा कामगार सय्यद अय्युब सय्यद रऊफ याच्यासह फिर्यादीच्या घरी आला. त्याने स्लॅब, भिंतीचे काम व प्लास्टरसाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे फिर्यादीसमक्ष आरोपीला अडीच लाख रुपये देण्यात आले. दुसऱ्या दिवशीपासून आरोपीने काम सुरू करणे अपेक्षित असताना, आरोपी मात्र पसार झाला. त्याला फोन केला तरी फोन लागला नाही. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bरक्कम जप्त करणे बाकी

\Bयाप्रकरणी आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपीला बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीकडून अडीच लाख रुपये जप्त करणे बाकी असून, आरोपीने रकमेची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली याचा शोध घेणे बाकी आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहे का, आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का आदी बाबींचाही तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करबन न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या सायरनचा वापर; दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांचे बोधचिन्ह (लोगो) आणि सायरनचा विनापरवानगी वापर केल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री सिटीचौक भागात करण्यात आली.

सिटीचौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी अभिजित गायकवाड हे सोमवारी रात्री ११ वाजता पोलिस ठाण्यासमोर कारवाई करीत होते. यावेळी एका स्कुटीवर चालक वाजेद सलीम बेग (वय २२, रा. सिल्कमिल कॉलनी) हा जाताना दिसला. वाजेदच्या हॉर्नचा आवाज पोलिसांच्या सायरनसारखा असल्याने पोलिसांनी त्यांना थांबवले. त्याच्या मोपेडवर देखील पोलिसांचा लोगो होता. विनापरवागनी त्याने हे वापरले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. ही मोपेड त्याच्या वडीलांच्या नावावर असल्याचे दिसून आले. याप्रकरणी वाजेद बेगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार देशमुख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावणेदोन लाखांचा ऐवज विविध घटनांत लंपास

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरट्यांनी दोन विविध घटनांत सोन्याच्या गंठणासह रोख ४८ हजारांची रक्कम लंपास केली. हे प्रकार सोमवारी रात्री गजानननगर भागात तर, मंगळवारी दुपारी टीव्ही सेंटर भागात घडले. याप्रकरणी पुंडलिकनगर आणि सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चोरीची पहिली घटना सोमवारी मध्यरात्री गजानननगर, शिवनेरी चौक गल्ली क्रमांक नऊ येथे घडली. येथील रामराव अप्पाराव तरटे (वय ६५) हे उकाडा असल्याने कुटुंबियांसह घराबाहेर झोपले होते. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरटे घरात शिरले. लाकडी कपाटात ठेवलेले साडेसहा तोळ्याचे सोन्याचे गंठण (किंमत एक लाख ३० हजार रुपये) त्यांनी चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी सकाळी लक्षात आला. याप्रकरणी तरटे यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीचा दुसरा प्रकार मंगळवारी टीव्ही सेंटर भागातील जियो स्टोअरसमोर घडला. ऋषिकेश लक्ष्मीकांत व्यवहारे (वय १९, रा. मयूरपार्क) हा तरुण छोटा हत्ती वाहनामध्ये मित्रासोबत टीव्ही सेंटर भागात गेला होता. जियो स्टोअर्समध्ये ते दोघे कार्ड रिचार्ज करण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी वाहनाच्या चालकाच्या सिटच्या मागे रोख ४८ हजार रुपये आणि स्वॅप मशीन ठेवलेले होते. चोरट्यानी वाहनाचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत ही रोख रक्कम आणि मशीन लंपास केले. याप्रकरणी व्यवहारेच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून चार तरुणी बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध भागांतून चार तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून या तरुणींना पळवून नेल्याचा संशय आहे. याप्रकरणी मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपींविरुद्ध अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुलगी बेपत्ता होण्याची पहिली घटना २४ मे रोजी मुकुंदवाडी परिसरात घडली. येथील मजुराची मुलगी दुपारी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. याप्रकरणी तिच्या वडिलांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यामध्ये त्यांनी त्यांच्या शेजारी राहणारा तरुण अमोल मिलिंद खैरे, अमोलचे वडील, आई, भाऊ अनिल यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी अपहरणाची घटना देखील मुकुंदवाडी परिसरातच मंगळवारी दुपारी घडली. येथील ३३ वर्षांच्या महिलेची मुलगी घरातून निघून गेली आहे. जाताना या मुलीने सोबत ५० हजार रुपयांची रोख रक्कम देखील नेली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या अपहरणाचा तिसरा गुन्हा सोमवारी वेदांतनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. येथील ३५ वर्षांच्या महिलेची मुलगी सोमवारी दुपारी घरातून निघून गेली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी जालिंदर पठारे याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुलगी घरातून निघून जाण्याची चौथी घटना जिन्सी भागात घडली. येथील ३८ वर्षांच्या महिलेची मुलगी सोमवारी दुपारी घरातून निघून गेली आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हे परमेश्वरा, दुष्काळ आहे, पाऊस पाड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी येथील मुख्य ईदगाह मैदानावर रमजान ईदची विशेष नमाज बुधवारी अदा करण्यात आली. नमाजनंतर झालेल्या विशेष दुआमध्ये दुष्काळ असल्यामुळे माणसे, जनावरे यांच्यावर कृपेचा पाऊस पाडू दे, अशी दुआ (प्रार्थना) पवित्र परमेश्वर अल्लाहकडे मागण्यात आली. यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत ईद शहर व जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

छावणी येथील इदगाह मैदानावर ईद-उल-फित्रच्या विशेष नमाजासाठी बुधवारी (५ जून) सकाळपासूनच मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी केली. येथे नमाजपूर्वी विविध संघटनांचे पदाधिकारी, धर्मगुरूंनी रमजान ईदचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. नुमांईदा काउंन्सिलचे मौलाना शरीम निजामी यांनी ठराव मांडले. मौलाना नसीम मिफ्ताई यांनी सूत्रसंचालन केले. जमात-ए-इस्लामी हिंदचे काझी कवी फलाही यांनी ईदती माहिती दिली. मौलाना मोईजोद्दीन फारूखी यांनी मुस्लिम बांधवांना वर्षभर रमजान महिन्याप्रमाणेच इबादत (प्रार्थना) कायम ठेवण्याचे आवाहन केले. येथील नमाज जामा मशीदीचे मौलाना हाफिज जाकीर साहब यांच्या नेतृत्वात अदा करण्यात आली. विशेष नमाजनंतर महिनाभर ठेवलेले रोजे व कबुल करून या भागात पाऊस पाडण्याची विनंती अल्लाहकडे करण्यात आली. नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी महापौर रशीद खान मामू आदींची उपस्थिती होती. छावणी येथील ईदगाहसह शहरातील विविध मशिदींमध्येही ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यात आली.

\Bइतर तीन ईदगाहवर विशेष नमाज \B

ईदगाह रोजेबाग येथे जमात-ए-इस्लामी हिंदचे अब्दुल वाजेद कादरी यांनी रमजान महिन्यातील शिस्त जीवनभर पाळण्याचे आवाहन केले. रमजान ईदचे महत्त्व इमारत-ए-शरियाचे अध्यक्ष मौलाना मोईजोद्दीन कासमी यांनी सांगितले. उस्मानपुरा ईदगाहवर प्रा. वाजेद अली खान व ईदगाहचे अध्यक्ष शरफोद्दीन सिद्दिकी यांनी मार्गदर्शन केले. ईदगाह शाहशोक्ता मियॉ दर्गाह येथे जमात-ए-इस्लामी हिंदचे मोहम्मद आरेफ, नुमांईंदा काउंन्सिलचे मौलाना नुमान नदवी, मौलाना अन्वरूल इशाती यांनी मार्गदर्शन केले.

……

\Bशिरखुर्रमा, शेवया, गुलगुले, भज्यांवर ताव \B

महिन्याभराच्या उपवासानंतर रमजान ईदचा सण साजरा केला जातो. ईदनंतर एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देत शिरखुर्रमा देण्यात आला. अनेकांनी शिरखुर्रमा, शेवया, गुलगुले, भजे, बिर्याणी, नान कलियावर ताव मारला.

………

\Bपावसाच्या हजेरीने उत्साह

\Bसध्या कडक ऊन असून त्याचा नमाज अदा करताना त्रास होऊ नये यासाठी नमाजाच्या वेळा काही प्रमाणात बदलण्यात आल्या होत्या. मात्र, बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने, नमाजसाठी आलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास जाणवला नाही. शहरात काही भागातील मशिदीमध्ये दुआ सुरू असताना पावसाच्या सरी पडल्याने ईदच्या उत्साहात भर पडली.

………

\Bपेंडखजूर देऊन मानले पोलिसांचे आभार \B

नमाजानिमित्त छावणी ईदगाह मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. या पोलिस कर्मचाऱ्यांना जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे पेंडखजूरचा बॉक्स देऊन आभार व्यक्त करण्यात आले. शहरातील इतर ईदगाहवरही याप्रमाणेच पोलिसांना पेंडखजूर देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा निर्मूलनाचा फज्जा; नागरिकांचा घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंदावरली चाचणी यंत्र बंद पडल्यामुळे फसली. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला, तर यावेळी महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अंदाज घेऊन काढता पाय घेतला.

कचरा प्रक्रिया केंद्रावरील यंत्राची चाचणी करताना महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक, स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी, महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती शोभा बुरांडे, नगरसेविका अर्चना नीलकंठ, अंकिता विधाते, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, जनसंपर्क तथा सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, स्वछता निरीक्षक सचिन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रावरील यंत्रात कचरा आणून टाकण्यात आला. त्याचे खत होऊन यंत्राबाहेर पडणे अपेक्षित होते. मात्र, यंत्रात कचरा टाकला आणि कचराच बाहेर निघाला. त्यामुळे चाचणी फसली. सध्या चिकलठाणा येथील केंद्रावर कचऱ्याचा डोंगर उभा आहे. त्याची दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे आरोग्य, शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे खरे तर या चाचणीवेळीच घनकचरा प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना घेराव घातला. मात्र, त्यांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्‍वासन देत स्वतःची सुटका करून घेतली. ग्रामस्थ संतापले असून त्यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती होत असल्याचे दिसताच महापौरांनी शेतकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनीही आयुक्तांकडे कचऱ्याचे ढीग कधी कमी होणार, अशी विचारणा केली. एकंदर सारे वातावरण पाहून महापौर आणि आयुक्तांनी येथून काढता पाय घेतला. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख भोंबे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी रोष पाहताच करतो, काम सुरू आहे, अशी मोघम उत्तरे द्यायला सुरुवात केली. रोष वाढत असतानाच आश्वासन देऊन त्यांनी ही काढता पाय घेतला. यावेळी बाळासाहेब दहिहंडे, संतोष रिठे, दिगंबर कावडे, अंकुश कावडे, संतोष गोटे विजय जाधव यांनी महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली.

\Bकाय होते आश्वासन

\Bचिकलठाणा केंद्रावर १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या खताचा शेतीसाठी वापर करण्याचे नियोजन आहे. मात्र, केंद्राच्या चाचणीलाच गोंधळ झाल्याने केंद्राची क्षमता आणि कचरा याचा ताळमेळ बसविणे पालिकेला अवघड आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. ९१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. शहरातील उर्वरित कचरा प्रक्रिया केंद्रावरही लवकर यंत्र आणून ती केंद्र सुरू करण्यात येणार होती. मात्र, ही यंत्रे किती सक्षम आहेत याचा अंदाज नमनाला आला.

\Bआश्वासन पाळण्यात अपयशी

\Bनारेगाव डेपोवर कचरा टाकण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे १६ फेब्रुवारी २०१८पासून कचरा प्रश्न गंभीर झाला. कोट्यवधी खर्चून राबविलेला कंपोस्ट पीट प्रयोगही फसला. त्यानंतर चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल आणि कांचनवाडी अशा ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची तयारी केली. चिकलठाणा केंद्रावर नागरिकांचा तीव्र विरोध असताना, येथे केंद्र सुरू केले. चार महिन्यात कचरा दिसणार नाही, असे आश्वास दिले. मात्र, हे आश्वासन पाळण्यात महापालिका पुन्हा एकदा अपयशी ठरली.

महापालिकेने कचऱ्याचे डोंगर चार महिन्यांत नष्ट करू असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले नाही. आज या ठिकाणी अजूनही कचऱ्याचे डोंगर उभे आहेत. पावसाळा सुरू होतो आहे. त्यामुळे दुर्गंधीसोबतच आता रोगराई पसरण्याची भीती आहे. महापालिकेने आमच्या जीवाशी खेळू नये.

- मुरलीधर काकडे, नागरिक, चिकलठाणा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीव रक्षक कार्यशाळेचे एमजीएममध्ये आयोजन

$
0
0

औरंगाबाद : दिव्य योग साधना मंडळ आणि सिद्धार्थ उद्यानातील इतर संघटनांच्या सदस्यासाठी एमजीएम हॉस्पिटलमध्ये प्राण वाचवा व जीव रक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४५ सदस्यांन प्रशिक्षण घेतले. डॉ. साधना कुलकर्णी, डॉ. वासंती केळकर आणि डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी प्रात्याक्षिकासह यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. विठ्ठलराव कुंटे, सुनील सारडा, प्रा.डॉ. होळरकर, बोरखेडे, जुगल तोतला, अजमेरा, प्रेरणा सारडा यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अत्याचारप्रकरणी सिडकोत एकाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

११ वर्षांच्या मुलीवर लैंगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला सिडको पोलिसांनी अटक केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी एन सात भागात घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार; संशयित आरोपी विशाल मिलिंद पारधे (वय २८) या तरुणाच्या शेजारी ११ वर्षांची मुलगी कुटुंबासह राहते. या मुलीला विशालने मंगळवारी दुपारी त्याच्या घरी बोलावले. या मुलीला गच्चीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीने घरी आल्यानंतर आजीला हा प्रकार सांगितला. आजीने तात्काळ सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विशालला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची उद्या मुंबईत आढावा बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी व चर्चा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने शुक्रवारी औरंगबााद जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची आढावा बैठक मुंबईत बोलाविली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. राज्यातून काँग्रेसला यंदा केवळ एक जागा मिळाली मात्र, पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने विधानसभेच्या कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना केले. राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचा त्याग केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपच्या तंबूत दाखल होऊ शकतात. या घडामोडींच्या पुढे जात काँग्रेसने शुक्रवारपासून दोन दिवस राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची आढावा बैठक बोलाविली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, लोकसभा उमेदवार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, राज्य कार्यकारिणी सदस्यांची आढावा बैठक सकाळी दहा वाजता बोलाविली आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय चर्चा, संभाव्य उमेदवारांची चर्चा, आघाडीमध्ये कोणते मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांना सोडायचे यासंदर्भात जिल्ह्यातील नेत्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा; तसेच सूचना मांडण्यासाठी शुक्रवारी मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

- अनिल पटेल, प्रभारी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा प्रक्रिया केंद्रावर पालिकेचे ‘दाट जंगल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतर्फे चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरात सहा हजार झाडांचे दाट जंगल (डेन्स फॉरेस्ट) विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीचा वृक्षारोपण मोहिमेचे उद्‌घाटन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापौर, आयुक्तांनी वृक्षारोपण करून केले.

चिकलठाणा परिसरात महापालिकेचे कचरा प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे. केंद्राच्या मोकळ्या जागांमध्ये जागतिक पातळीवरील संकल्पनांवरील आधारित दाट जंगल विकसित केले जाणार आहे. यासाठी प्रयास युवा फाउडेशनचे सहकार्य घेतले जात आहे. या ३० एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या केंद्रात काही मोकळी जागा असेल, त्यातील १८ हजार चौरस फूट जागेवर हे जंगल विकसित केले जाणार आहे. विदेशातील संकल्पनेवर आधारित या प्रकल्पाची सुरुवात बुधवारी करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आला. दाट पद्धतीने सुमारे सहा हजार झाडे या ठिकाणी लावण्यासह संगोपन करण्यात येणार आहे. विविध ५० जातीची देशी झाडे येथे लावण्यात येणार आहेत. दोन, अडीच वर्षांपर्यंत झाडांची उंची ३० फुटांपर्यंत जाईल, असे सांगण्यात येते. या झाडांचे ऑक्सिजन देण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी जास्त असते, असे रवी चौधरी यांनी सांगितले. महापक्रिया केंद्र ज्या भागात उभारले जात आहे. त्या परिसरातील शेतकरी, पालिका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक, स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी, नगरसेविका शोभा बुरांडे, अर्चना निळकंठ, अंकिता विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

\Bशहरात लावणार २५ हजार झाडे \B

महापालिका शहरात विविध ठिकाणी विविध योजनेतून २५ हजार झाडे लावणार असून त्याचे संगोपन करणार आहे, असे महापौर घोडेले यांनी सांगितले. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसाला शिविगाळ; मद्यपी महिला हर्सूल कारागृहात

$
0
0

औरंगाबाद : महिला पोलिस कर्मचाऱ्याला शिविगाळ करून अंगावर धावून जाणाऱ्या मद्यपी महिला आरोपीला मंगळवारी (चार जून) अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी दिले.

याप्रकरणी पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी मीना नागनाथ जाधव (२५) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, शहरातील एका हॉटेलमधून संबंधित आरोपी महिलेने नियंत्रण कक्षात फोन करून स्वत:ची पर्स व मोबाइल हरवल्याची तक्रार दिल्यानंतर फिर्यादी पोलिस कर्मचाऱ्याला त्या हॉटेलला जाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार फिर्यादीने त्या हॉटेलवरील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासणी केल्यानंतर संबंधित आरोपी महिलेने हॉटेलमध्ये जाताना पर्स व मोबाइल नेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबाबत जाब विचारला असता, आरोपी महिलेने मद्यप्राशन केल्याची कबुली देत फिर्यादीला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. धमक्या देत ग्लास फेकून मारण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला मंगळवारी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची रवानगी हर्सूल येथील न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात वृक्षारोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते बुधवारी वृक्षारोपण करण्यात आले.

मुख्य प्रशासकीय इमारतींसमोरील मैदान व रसायशास्त्र विभाग परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. अंजली राजभोज, उद्यान अधीक्षक डॉ.गोविंद हुंबे, डॉ. टी.आर.पाटील, डॉ. सुहास मोराळे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुनील शंकरवार, डॉ. मछिंद्र लांडे, डॉ.भास्कर साठे, डॉ. बापू शिंगटे, डॉ. सतीश मोकाशे, विष्णू कऱ्हाळे, संजय राजपूत, एस.जी. शिंदे, भगवान फड यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

\Bआठवणींना उजाळा\B

डॉ देवानंद शिंदे यांनी रसायनशास्त्र विभागात १९८४ ते ८६ दरम्यान एम. एस्सी., तर १९८६ ते ९१ दरम्यान पीएचडीचे संशोधन केले आहे. त्यामुळे आपल्या मूळ विभागास भेट देऊन त्यांनी आनंद व्यक्त केला. जुन्या आठवणींना उजाळा देतांना त्यानी संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजली दमानियांच्या घड्याळाच्या चोरीचे नाट्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पावणेदोन लाख रुपये किमतीचे घड्याळ चोरट्यांनी लांबवले. हा प्रकार सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळदरम्यान निराला बाजार येथील पर्ल हॉटेलमध्ये घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी घड्याळ हॉटेलमधील 'लॅन्ड्री'मध्ये सापडली. बेडशीटमध्ये घड्याळ अडकली होती, अशी माहिती क्रांतीचौक पोलिसांनी दिली.

सोमवारी अंजली दमानिया (वय ४० रा. ५०२, विजयश्री दुर्ग, सांताक्रुझ) त्यांच्या कामानिमीत्त शहरात आल्या होत्या. निराला बाजार येथील हॉटेल पर्लमध्ये खोली क्रमांक १०४मध्ये त्या मुक्कामाला थांबल्या होत्या. सोमवारी रात्री नऊ वाजता त्यांनी हॉटेलमध्ये 'चेक-इन' केले. सकाळी स्वच्छतागृहात जाताना त्यांनी त्यांचे लॉगीन्स वॉच या विदेशी कंपनीचे एक लाख ७३ हजार रुपये किंमतीचे घड्याळ रॅकमध्ये ठेवले होते. यानंतर दमानिया यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास हॉटेलमधून 'चेक-आउट' केले. दुपारी चारच्या सुमारास दमानिया यांना हातामध्ये घड्याळ नसल्याची आठवण आली. त्यानी पुन्हा हॉटेलमध्ये येऊन घड्याळाबाबत व्यवस्थापनाकडे विचारणा केली. यावेळी त्यांना घड्याळ नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. बुधवारी या खोलीची पुन्हा सायंकाळी झाडाझडती घेण्यात आली.

दमानिया यांनी हॉटेलची खोली सोडल्यानंतर तेथील चादरी, बेडशीट धुण्यासाठी लॅन्ड्रीमध्ये नेण्यात आली. दमानिया यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर हॉटेलमध्ये चौकशी सुरू झाली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनानेही शोधाशोध सुरू केली. त्यावेळी लॅन्ड्रीमधील एका बेडशीडला घड्याळ अडकल्याचे आढळले. हॉटेल व्यवस्थापनाने घड्याळ सापडल्याचे पोलिसांना कळविले आणि ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पाच संशयितांची चौकशी

दरम्यान क्रांतीचौक पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक या प्रकरणी तपास करीत होते. दमानिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राहूल सुर्यतळ यांनी पथकासह हॉटेलला भेट दिली. यावेळी हॉटेलमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. यामध्ये दमानिया यांच्या रुममध्ये सफाई कामगार तसेच वेटर जात असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेत चौकशी केली आहे. तसेच मंगळवारी तीन संशयितांच्या घराची झडती देखील घेण्यात आली मात्र या झडतीमध्ये काही मिळाले नसल्याची माहिती एपीआय राहूल सुर्यतळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण रक्षणाची मानवी साखळीतून हाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सतत बलदते हवामान, जागतिक तापमान वाढ आदी समस्यांकडे लक्ष वेधून पर्यावरण रक्षणाची हाक बुधवारी सायंकाळी क्रांतीचौकात आयोजित मानवी साखळीतून देण्यात आली. लोक पर्यावरण मंचच्या वतीने पुढाकार घेत पर्यावरणदिनानिमित्त तमाम औरंगाबादकरांचे लक्ष पर्यावरणाकडे वेधण्यात आले. या निमित्त मुलांपासून प्रौढांपर्यंत आणि महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वस्तरीय नागरिक सहभागी झाले होते. पर्यावरणीय समस्यांचे मूळ हे मानवनिर्मित असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानवी अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकला आहे. याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images