Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘मोन्सँटो’ कंपनीचे बियाणे नष्ट

$
0
0
उगवण क्षमता नसलेले ‘मोन्सँटो’ कंपनीचे ४५ लाख रुपये किमतीचे बियाणे कृषी विभागाच्या गुण नियंत्रण शाखेच्या पथकाने नष्ट केले. अप्रमाणित बियाणे पुन्हा वापरात येऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली अशी माहिती गुण नियंत्रण शाखेचे तंत्र अधिकारी भीमराव कुलकर्णी यांनी दिली.

निलंबित कर्मचा-यांचे चौकशीसाठी उपोषण

$
0
0
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील कंटक्टर चोरी प्रकरणात चौकशी करून निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी महावितरणच्या पाच निलंबित तांत्रिक कर्मचाऱ्यांनी परिमंडळ कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण केले.

पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले

$
0
0
प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहनासाठी आलेल्या पालकमंत्र्याना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार रविवारी पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर घडला. मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण देण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी करीत हा प्रकार केला.

शासना विरोधात ‘जवाब दो’ मोर्चा

$
0
0
आदर्श, सिंचन घोटाळ्यातील भ्रष्ट मंत्री, सनदी अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम राज्य शासन करत आहे, असा आरोप महाराष्ट्र लोकशाही आघाडीने करत शासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर जबाब दो मोर्चा काढला. भ्रष्टाचाऱ्यांवर त्वरीत गुन्हे दाखल करा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

बनावट नोटा : फरार आरोपी गजाआड

$
0
0
वाळूज एमआयडीसी भागात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या पसार आरोपीला सायबर सेलच्या प‌थकाने रविवारी अटक केली. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्यामध्ये एका आरोपीला पूर्वीच अटक करण्यात आली होती. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातातील ट्रकचालकाला तात्काळ अटक करा

$
0
0
दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पसार ट्रकचालकाला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मृत तरुणाच्या नातेवाइकांनी सोमवारी पोलिस आयुक्तालय गाठून आयुक्त संजयकुमार यांना निवेदन दिले. पैठण रोडवर गुरुवारी हा अपघात झाला होता.

अॅपेरिक्षा-दुचाकी धडकेत ३ जणांचा मृत्यू

$
0
0
भरधाव दुचाकी अॅपेरिक्षावर धडकल्याने तीन जण ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले. सावंगी शिवारात रविवारी रात्री हा अपघात झाला असून, फुलंब्री पोलिस अधिक तपास करत आहे.

उपसरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

$
0
0
सातारा येथील उपसरपंच अयुबखान जब्बारखान पटेल यांच्याविरोधात शिवसेनेने सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावर अलका शिरसाठ यांचे सरपंचपद गेल्यानंतर अयुबखान पटेल हे प्रभारी सरपंच म्हणून काम पाहत आहेत.

नवा बायपास आता जुन्याच वळणावर

$
0
0
बीड बायपास रोडला पर्याय म्हणून ‘नॅशनल हाय-वे ऑथॉरिटी’ने (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) तयार केलेल्या प्रस्तावाला प्रशासनाने अखेर मान्यता दिली आहे. हा प्रस्तावित रस्ता बीड बायपासपासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे. हा रस्ता साताऱ्याच्या डोंगरापलिकडून आणि प्रस्तावित शेंद्रा-बिडकीन मेगा इंडस्ट्रिअल पार्कजवळून न्यावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने मांडली होती.

कार्यकर्त्यांच्या दादागिरीविरोधात आंदोलन

$
0
0
कुलगुरूंना अर्वाच्या भाषेत बोलणाऱ्या संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात सोमवारी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. कुलगुरूंच्या समर्थनात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कर्मचाऱ्यांनी आवाज दिला आणि विद्यापीठाचे कामकाज काहीवेळा पुरते थांबले.

आचारसंहितेच्या धास्तीने वायफळ चर्चा, बैठक

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या धास्तीने सोमवारी महापौरांच्या दालनात तब्बल दोन तास बैठक झाली. या बैठकीत वायफळ चर्चा झाली. त्यामुळे बैठकही निष्फळ ठरल्याचे बैठकीस उपस्थित असलेल्या काही नगरसेवकांनी सांगितले.

NCP कार्यालयात २ वेळा ध्वजवंदन?

$
0
0
राष्ट्रवादी ‌काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमीत्त दोन वेळा ध्वजवंदन करण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या वादामध्ये हा प्रकार घडला असल्याची चर्चा असली तरी जिल्हाध्यक्षांनी या गोष्टीला नकार दिला आहे.

शेअरिंगपेक्षा मीटर रिक्षा परवडली

$
0
0
हकीम समितीने शिफारशीप्रमाणे औरंगाबाद शहरातील ‘सिबीएस’ आणि ‘रेल्वे स्टेशन’ येथून एकूण ९६ मार्गासाठी शेअरिंग रिक्षांचे दर जाहिर करण्यात आले. या जाहिर झालेल्या दरांमुळे आता शेअरिंग रिक्षातूनही प्रवास महागला आहे.

स्टेशन परिसरात ‘जादूचा बॉम्ब’

$
0
0
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत रेल्वे स्टेशनच्या परिसरात बॉम्बशोधक व नाशक पथकाने रविवारी सकाळी ‘मॉक ड्रिल’ केले आणि त्यानंतर काही तासांमध्येच स्टेशन परिसरामध्ये पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. एका बेवारस मारूती व्हॅनमधून गॅस गळती सुरू झाली.

उड्डाणपुलाच्या उद‍्घाटनासाठी ‘संग्राम’

$
0
0
शिवसेनेने संग्रामनगर उड्डाणपुलाचे उद‍्घाटन करून केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची तारीख मिळवण्याची खटपट करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पोलिसांच्या सहकार्याने उद‍्घाटनानंतर एका तासात पुलावरील वाहतूक पुन्हा बंद केली आहे.

'MICU' मेडिसीन विभागात हलवणार

$
0
0
शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वैद्यकीय अतिदक्षता विभाग (एमआयसीयू) चार दिवसांमध्ये मेडिसीन विभागात हलवण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण मेडिसीन विभाग एका छताखाली येईल.

संशयाची सुई धुळ्याकडे

$
0
0
फाजलपुरा भागातील नाल्यात सापडलेल्या रिवॉल्वर प्रकरणी अद्याप ठोस धागेदोरे तपासात पुढे आलेले नाही. मध्यंतरी धुळे येथील काही आरोपी गुन्हेशाखेने शस्त्र विक्री करताना पकडले होते. या दिशेने देखील पोलिसांचा तपास सुरु आहे.

लाचखोर PSI अखेर गजाआड

$
0
0
पोलिस ठाण्यात अडकवून सोडलेली रिक्षा सोडण्यासाठी दहा हजारांची लाच घेणा-या वाळूज पोलिस ठाण्याच्या पोलिस ‌उपनिरीक्षकाला लाच लाचपुत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले. वाळूज पोलिस ठाण्यात सय्यद मुकद्दर सय्यद नबी यांच्या विरुध्द तक्रारअर्ज आलेला होता.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या रामराई परिसराची पाहणी

$
0
0
गेल्या महिन्यात रामरार्इ येथील जलकुंभावरून उडी मारून तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने मंगळवारी घटनास्थळाची पाहणी केली होती. या तरुणाच्या नातेवाइकांनी या घटनेविषयी संशय व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर, ही पाहणी करण्यात आली.

सेप्टी टँकवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

$
0
0
बजाजनगर येथील नंदनवन हाउसिंग सोसायटीच्या बाजुला सेप्टी टँकसाठी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. या जागेवर काही टपरीधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी सेप्टी टँक इतर सांडपाण्याचे पाइप थेट नाल्यात सोडल्याने त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images