Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तोतया पोलिस पुन्हा अवतरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला थाप मारीत ९० हजारांचे दागिने लंपास केले. हा प्रकार रविवारी सकाळी शिवाजीनगर भागातील मेहरसिंग नाईक शाळेजवळ घडला. सातारा परिसरात ज्येष्ठ नागरिकाला १५ दिवसांपूर्वी याच पद्धतीने लुबाडण्यात आले होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी सुनंदा सूर्यकांत गरुड (वय ७२, रा. शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली. रविवारी गरुड या किराणा दुकानात जात होत्या. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. आपण पोलिस अधिकारी असून पुढे खून झाला आहे, अशी थाप मारली. तुमच्या सोन्याच्या बांगड्या पिशवीत ठेवा, असा सल्ला दिला. गरुड यांनी हातातील बांगडी आणि पाटली काढून पिशवीत ठेवली. दुसऱ्या हातातील बांगडी काढताना आरोपींनी पिशवीला गाठ मारण्यााचा बहाणा करीत हातचलाखीने ९० हजारांची बांगडी आणि पाटली लांबवली. पिशवी गरुड यांना देत ते पसार झाले. घरी गेल्यानंतर पिशवी उघडून पाहिली असता दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय खटके तपास करीत आहेत.

\Bतोतया पोलिसांनी लुबाडल्याची तिसरी घटना\B

गेल्या महिन्याभरात तोतया पोलिसांनी थाप मारून लुबाडण्याची ही तिसरी घटना आहे. सातारा परिसरात छगन कुलकर्णी या ज्येष्ठ नागरिकाला देखील अशाच पद्धतीने लुबाडण्यात आले होते. तसेच जिकठाण परिसरात देखील या आरोपींनी असाच गुन्हा केला आहे. या प्रकरणी सातारा आणि वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याचे खासगीकरण नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे खासगीकरण करण्याचा प्रश्नच नाही. पाणीपुरवठा ही सेवा आहे. त्यामुळे या सेवेचे खासगीकरण होऊच शकत नाही,' अशी रोखठोक भूमिका महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मांडली. आयुक्तांनी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या 'डीपीआर'चे सादरीकरण पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसमोर केले. त्यानंतर ते महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलत होते.

समांतर जलवाहिनीचे काम खासगीकरणातून करण्याचा घाट काही स्थानिक नेत्यांच्या हट्टामुळे पालिकेने घातला. त्या पार्श्वभूमीवर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम खासगीकरणातून होणार, की शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून, असा प्रश्न पत्रकारांनी आयुक्तांना विचारला असता ते म्हणाले, 'खासगीकरणाचा प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र, या कामासाठी निविदा काढून कंत्राटदार नेमावा लागेल. तयार केलेला 'डीपीआर' महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता घेवून १५ जुलैपर्यंत शासनाला सादर केला जाईल. शासन 'डीपीआर'ला प्रशासकीय मान्यता देईल. काम सुरू झाल्यावर तीन वर्षांत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईल. या योजनेत पाणीपट्टी कमी असावी असाच प्रयत्न केला जाईल,' असे ते म्हणाले.

महापौरांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रानुसार पाणीपट्टी कमी करण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत ठेवणार आहे का, असे आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले, 'सध्याची चार हजार रुपये पाणीपट्टी जास्तच आहे. मात्र, एकूण खर्चाच्या तुलनेत ती फार कमी आहे. तरी पण पाणीपट्टी कशी कमी करता येईल याचा विचार आम्ही करीत आहोत. जे लोक पाणीपट्टी भरत नाहीत त्यांनी पाणीपट्टी भरणे सुरू केले तर पाणीपट्टी वाढीचा बोजा कुणावरही पडणार नाही. पाणीपट्टी आपोआप कमी होईल. मुख्य जलवाहिनीवरून ज्यांनी अनधिकृत नळ जोडण्या घेतल्या आहेत त्यांना जबर दंड करण्याचा प्रस्ताव प्रशासन सर्वसाधारण सभेत ठेवणार आहे. त्याला सर्वसाधारण सभेने मान्यता द्यावी,' अशी विनंती आयुक्तांनी महापौरांना केली. 'अंतर्गत वाहिन्यांवरील अनधिकृत नळ जोडण्या दंड आकारून नियमित करू,' असेही ते म्हणाले.

\Bमहापौरांना राग का येतो?

\Bशहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम महापालिकेच्या माध्यमातून न होता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून व्हावे, अशी भाजपची भूमिका आहे, असा प्रश्न पत्रकारांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना विचारला असता ते काहीसे चिडले. 'पाणीपुरवठा योजनेचे काम कुणाच्या माध्यमातून करायचे या बद्दल सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काम केले तरी आम्हाला काही हरकत नाही. शहरातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे. आम्ही शासनाच्या सोबत आहोत. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा,' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळे कामाला मुहूर्त मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम करण्यास कंत्राटदार टाळाटाळ करीत असल्यामुळे महापालिका आता दुसरा पर्याय शोधणार आहे. या पर्यायाचा निर्णय मंगळवारी (२ जुलै) घेतला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे. या मागणीला महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिवप्रेमींनी आंदोलनाचा पवित्र देखील घेतला होता. आंदोलनापुढे नमते घेत महापालिकेने स्वत:हून हे काम करण्याचा निर्णय घेतला. कामाची निविदा काढली. गायत्री कन्स्ट्रक्शन या संस्थेला काम देण्यात आले. या संस्थेने अगोदर पैसे द्या, नंतर काम सुरू करतो अशी भूमिका घेतली. संस्थेची भूमिका योग्य नसल्याचे प्रशासनाने लक्षात आणून दिल्यावर काम सुरू करण्याची तयारी कंत्राटदार संस्थेने दाखवली. पुतळ्याचे काम सुरू करण्याच्या नावाखाली पुतळ्याभोवती केवळ पत्रे लावून ठेवले. पंधरा - वीस दिवसांपासून पत्रे लावून ठेवल्याच्या पुढे काम सरकले नाही. त्यामुळे सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. बैठकीला उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, दिलीप थोरात, राजू शिंदे आदी उपस्थित होते.

\Bकंत्राटदाराकडून पैसे वसूल करणार

\Bकंत्राटदार संस्था पुतळ्याचे काम करीत नसेल तर रिस्क अँड कॉस्ट पद्धतीने काम करून घ्या असे आदेश महापौरांनी दिले. मूळ कंत्राटदार विशिष्ट किमतीत काम करणार असेल आणि त्याच्या जागी नियुक्त केलेला कंत्राटदार त्याच्यापेक्षा जास्त दराने काम करणार असेल तर, दोन्ही दरामधला फरक मूळ कंत्राटदाराकडून वसूल करणे याला रिस्क अँड कॉस्ट पद्धत म्हटले जाते. या पद्धतीने काम करण्याचा निर्णय मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत घेऊ, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त जागांचा वाढता पेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहणार आहेत. पुन्हा सीईटी घेऊन आणि स्पॉट अॅडमिशनद्वारे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मात्र, प्रशासकीय स्तरावर निर्णय झाला नसल्याने ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तीन वर्षांपासून रिक्त जागांची संख्या वाढत आहे. यावर्षी विज्ञान शाखा वगळता इतर विषयांना विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद आहे. किमान ४० ते कमाल ७० प्रवेश क्षमता असलेल्या विभागात जेमतेम नोंदणी आहे. रिक्त जागा भरण्यासाठी स्पॉट अॅडमिशनचा पर्याय विचाराधीन आहे. या प्रक्रियेसाठी डॉ. सुरेश गायकवाड यांच्यासह प्राध्यापकांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती रिक्त जागांबाबत निर्णय घेणार आहे. संबंधित विभागाने रिक्त जागांचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केल्यास समिती पर्याय सुचवणार आहे. 'पीजी सीईटी' कॅम्पसमध्ये घेतल्यामुळे कमी प्रतिसाद मिळाला. जिल्हानिहाय स्वतंत्र सीईटी घेतली असती तर, प्रतिसाद वाढला असता असे प्राध्यापकांनी सांगितले. वाणिज्य, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, वृत्तपत्रविद्या, कम्प्युटर सायन्स, प्राणिशास्त्र विषयांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. उर्दू, इंग्रजी, पाली, मराठी, लोकप्रशासन, फुले-आंबेडकर विचारधारा, फाइन आर्ट, नाट्यशास्त्र या विषयांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पुरातत्वशास्त्र, लिबरल आर्ट विषयांची अवस्था बिकट आहे. रिक्त जागा भरण्याच्या पर्यायावर प्रशासनाचे अजूनही एकमत नाही. नवीन कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानंतर मान्यता घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदव्युत्तर वर्ग प्रवेश रखडणार आहेत. कॅम्पसमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी ११ ते १३ जुलैदरम्यान जाहीर होणार आहे. दुसरी यादी १६ ते १७ जुलै आणि स्पॉट अॅडमिशन १९ जुलै रोजी होणार आहे.

पदव्युत्तर वर्गाच्या रिक्त जागांचा निर्णय विद्यापीठाची नियुक्त समिती घेणार आहे. अद्याप कोणत्याही विभागाकडून रिक्त जागांबाबत प्रस्ताव आलेला नाही. स्पॉट अॅडमिशन किंवा पुन्हा सीईटी अशा दोन्ही पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे.

- डॉ. साधना पांडे, प्रभारी कुलसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांच्या अडचणी मार्गी लावू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेवून त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील,' असे आश्वासन उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाला दिले.

'आयटी पार्क'मधील गाळ्यांच्या भाड्याचा प्रश्न गेल्या पाच वर्षांपासून सुटलेला नाही. राज्यातील अन्य आयटी पार्कच्या तुलनेत याठिकाणी अधिक दराचे भाडे आकारले जाते. त्याविषयी वारंवार मागणी केली गेली. सात रुपयांवरुन ४६ रुपये प्रतिचौरसफूट दर केले गेले. त्यात दाद मागितल्यानंतर सरकारने समिती नेमून हे दर २७ रुपये करण्याचा निर्णय घेतला. मात्र नाशिकमध्ये १२ रुपये प्रतिचौरस फूट दराने आयटीपार्कमध्ये गाळे भाड्याने दिले जातात. मग औरंगाबादेत एवढे वाढीव दर का ? असा सवाल उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी आमदार सतीश चव्हाण यांची भेट घेवून त्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सांगितल्या. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांना यासंदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. सोमवारी विधान भवनातील राज्यमंत्री सावे यांच्या दालनात बैठक पार पडली. आमदार चव्हाण, विनोद राठी, स्वप्नील महाजन यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आयटी पार्कमधील गाळ्यांच्या भाड्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती चव्हाण यांनी केली.

\Bअधिकाऱ्यांकडे उत्तर नाही

\Bऔरंगाबाद व नाशिक येथील औद्योगिक क्षेत्रातील इमारतीमधील गाळे भाडे तसेच गाळे खरेदी दरामध्ये एवढी तफावत का? अशी विचारणा सावे यांनी अधिकाऱ्यांकडे केली. मात्र अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय प्राध्यान्यक्रमाने मार्गी लावून 'आयटी पार्क'मधील लघु उद्योजकांच्या अडचणी सोडवल्या जातील असे आश्वासन सावे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कवयित्री धारूरकर यांची कविता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रख्यात कवयित्री, ललित लेखिका प्रिया धारूरकर यांच्या 'जीवनी' या कवितेचा समावेश नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

पदवीसाठीचा अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात आला असून, त्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१९पासून प्रथम वर्षाच्या 'साहित्यशिल्प' या संपादित ग्रंथासाठी या कवितेची निवड करण्यात आली आहे. विविध दैनिकातून ललित, वैचारिक, लेखन करणाऱ्या धारूरकर यांचे 'विदेही' आणि 'अंगभरून वाहणाऱ्या पान्ह्यातून'हे काव्यसंग्रह तर, 'घन दाटले स्वर' हा ललित लेखसंग्रह प्रकाशित आहे. स्त्री जाणिवा, तरल अनुभव, लालित्यपूर्ण भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. राज्यभर विविध कविसंमेलने आणि साहित्य संमेलनात आपल्या कविता सादर करून वेगळा ठसा उमटवणाऱ्या धारूरकर यांच्या कवितेचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याने साहित्यक्षेत्रातील लेखकांडून आणि साहित्य रसिकांकडून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आषाढस्य प्रथम दिवसे’निमित्त उद्या ‘ऋतुसंहार’चे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कालिदास दिनाच्या निमित्ताने आषाढाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (३ जुलै) परिवर्तन ग्रुपतर्फे 'आषाढस्य प्रथम दिवसे' या दृक-श्राव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी धनंजय बोरीकर हे 'ऋतुसंहार'च्या स्वैर भावानुवादावर बोलतील. टिळकनगर येथील जीवन विकास ग्रंथालयात सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन परिवर्तन ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड बाजार समिती सभापतिपदी गाढे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अर्जून गाढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती रामदास पालोदकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.

सभापतिपदाच्या निवडीसाठी सोमवारी दुपारी दोन वाजता बाजार समिती सभागृहात संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. गाढे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे सहायक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांनी घोषित केले. त्यांना बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील यांनी मदत केली. या विशेष सभेला संचालक नंदकिशोर सहारे, केशवराव तायडे, अर्जून गाढे, सुनील पाटणी, ईश्वर जाधव, दामोधर गव्हाणे, नरसिंग चव्हाण, सतीश ताठे, हरिदास दिवटे, रघुनाथ मोरे, लीलाबाई मिसाळ, अनुसयाबाई मोरे, रामू मिरगे, संजय गौर यांच्यासह विरोधी गटाचे मावळते सभापती रामदास पालोदकर, ठगणराव भागवत, भीमराव काळे, शंकर फुले उपस्थित होते. निवडीनंतर आमदार अब्दुल सत्तार यांचे बाजार समितीत आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस अधीक्षकांनी केले ‘डॉक्टर्स डे’निमित्त रक्तदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांनी स्वत: रक्तदान करून 'डॉक्टर्स डे'निमित्त घाटीत आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले आणि रक्तदानाविषयी समाजामध्ये असलेली भीती, गैरसमज दूर करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. यानिमित्त शिबिरात ३५ दात्यांनी रक्तदान केले आणि सर्व दात्यांना अधीक्षक पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

'डॉक्टर्स डे'निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) सोमवारी (एक जुलै) रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी, सहयोगी प्रा. डॉ. भारत सोनवणे आदींची उपस्थिती होती.

शिबिरात पाटील यांनी स्वत: रक्तदान केलेच; शिवाय रक्तदानाचे महत्वदेखील त्यांनी विषद केले. या वेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात डॉ. येळीकर यांनी, 'डॉक्टरांची समाजाप्रती असलेली रुग्णसेवेची समर्पित भावना व नैतिक कर्तव्ये,' याविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक बांधिलकीची जाणीव डॉक्टरांमध्ये निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही डॉ. येळीकर यांनी व्यक्त केली. डॉ. जोशी यांनी प्रास्ताविकात रक्तदानाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनवणे यांनी केले. सुनिता बनकर यांनी आभार मानले. शिबिरासाठी रक्तपेढीप्रमुख डॉ. एस. एन. गवई, रक्तपेढी तंत्रज्ञ देवकुमार तायडे, डॉ. पूजा पाटील, विभागीय रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सविता सोनवणे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेढ निर्माण करणारे तरुण ताब्यात

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनवर औरंगाबाद लिहिलेल्या फलकावर ऑइल पेंट फेकून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. शनिवारी सकाळी हा प्रकार केल्यानंतर त्याची व्हिडिओ क्लीप तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती.

शनिवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास काही तरुणांनी विनापरवाना प्रवेश करीत औरंगाबाद लिहिलेल्या फलकावर पिवळा ऑइल पेंट फेकला होता. यानंतर या ठिकाणी 'संभाजीनगर'चे कटआउट लावून हे तरुण पसार झाले होते. ही घटना त्यांनी मोबाइलवर शुटींग करीत व्हायरल केली. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रसंग निर्माण होण्याची शक्यता होती. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात लोहमार्ग पोलिस ठाण्यात दंगली भडकाविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने नितीन रामराव निर्मळ - देशमुख (वय ३५, रा. द्वारकानगर, एन अकरा) आणि रुद्राक्ष गणपतराव वाकोडे (वय २७, रा. गारखेडा परिसर) यांना अटक केली. त्यांचा तिसरा साथीदार पंकज दहिवाल (रा. दादर, मुंबई) हा पसार झाला आहे. या आरोपींना पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई विजय पवार, हेमंत तोडकर, मच्छिंद्र ससाणे, किरण गावंडे, गोविंद पचरंडे, दत्ता ढंगारे, विजय पिंपळे, नितीन देशमुख, नानासाहेब फुंदे आदींनी केली.…

\Bरेल्वे स्थानकावर बंदोबस्त वाढविला

\Bघटनेनंतर रेल्वे स्थानकावर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. दहा ते बारा युवकांनी रविवारी रात्री लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून शहराचे शांततामय वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. लोहमार्ग पोलिस ठाण्यात सदर प्रकरणाबाबत आधीच एफआयआर नोंदविण्यात आले असल्यामुळे हे युवक निघुन गेले होते, अशी माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक साबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका आयुक्तांना ‘बहुजन शक्ती’चे निवेदन

$
0
0

औरंगाबाद : महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबद्दल बहुजन शक्ती कामगार संघटनेने आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची भेट घेऊन निवेदन दिले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा बनकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, एक जानेवारी २०१६पासून ३१ डिसेंबर २०१८पर्यंतची थकबाकी पाच हप्त्यांत देण्यात यावी, एक जानेवारी २०१९पासून थकबाकी रोखीने द्यावी, कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला वेळेवर करावे, शासनाप्रमाणे महापालिकेतील कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन राखीव ठेवावे, अनुकंपाभरतीच्या जाचक अटी त्वरित रद्द कराव्यात, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम - समान वेतन हक्क देण्यात यावा. निवेदनात १८ मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. निवेदनावर बनकर यांच्यासह बबन सरोदे, धरमसिंह कानसा, ऐतेशाम अली, संजय घाटे, दिलीप मोरे, रमेश मगरे, वसंत मोकळे, हिंमत क्षीरसागर आदींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात वृक्षारोपण मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय शाखेच्या वतीने वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेचे उदघाटन व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी केले.

विद्यापीठातील मुद्रण तंत्रज्ञान व ललित कला विभाग परिसरात सोमवारी शंभर १०० झाडे लावण्यात आली. या उपक्रमासाठी बॅँकेने रोप व संरक्षक जाळी उपलब्ध करून दिली. राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत हा उपक्रम झाला. स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात चार हजार झाडे लावली जाणार आहेत. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, परीक्षा मंडळ संचालक डॉ. गणेश मंझा, बॅँकेचे विभागीय उपमहाप्रबंधक शेषू बाबू, सहायक महाप्रबंधक कुमार आशुतोष, मुख्य प्रबंधक संतोषकुमार सिन्हा व उपप्रबंधक ओम तोटेवाड, एम. एम. शाह उपस्थित होते. लेखाधिकारी प्रदीपकुमार जाधव, डॉ. प्रताप कलावंत, संजय शिंदे, डॉ. शिरीष अंबेकर, प्रा. पराग हासे, डॉ. गोविंद हुबे यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतराव नाईक यांची जयंती घाटीत साजरी

$
0
0

औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अधिष्ठाता यांच्या दालनात झाला. या वेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, समिती अध्यक्ष डॉ. शिल्पा आसेगावकर, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. विकास राठोड, समाजसेवा अधीक्षक बालाजी देशमुख व संदीप भडंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मेडिसिन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गजानन सुरवडे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. येळीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे यांनी केले, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ रामेश्वर लांडगे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफा पिता-पुत्रांना लूटणारे जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सराफा पिता-पुत्रांवर फिल्मी स्टाइल हल्ला करत ११ लाखांचा ऐवज लुबाडण्याची घटना २४ मे रोजी जालना जवळील घाणेवाडी फाटा येथे घडली होती. या गुन्ह्यातील सर्व आरेापी मुकुंदवाडी, राजनगर भागातील रहिवासी आहेत. यापैकी तीन दरोडेखोरांना जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुकुंदवाडीतून जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील दागिने, तसेच शस्त्र जप्त करण्यात आले.

विनयकुमार बाफना आणि त्यांचा मुलगा नवनीत बाफना यांचे राजूर येथे बाफना ज्वेलर्स हे दुकान आहे. २४ मे रोजी बाफना पिता-पुत्र सायंकाळी सहा वाजता दुकान बंद करून दागिने आणि रोख रक्कम घेऊन कारमधून जालना येथे जात होते. यावेळी घाणेवाडी फाट्याजवळ त्यांच्या कारला धडक देत कार अडवण्यात आली होती. यानंतर कारच्या काचा लोखंडी रॉडने फोडत तलवारीने हल्ला करण्यात आला, तसेच गावठी पिस्टलचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, असा ११ लाखांचा ऐवज लुबाडण्यात आला हेाता. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा प्रशांत अंकुश हिवाळे (रा. राजनगर, मुकुंदवाडी) याने साथीदाराच्या मदतीने केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांना खबऱ्याने दिली होती. या माहितीवरून मुकुंदवाडी येथे येऊन पथकाने आरोपी प्रशांत हिवाळे, विजय रामकिशन जईद आणि गणेश सांडू बदर (रा. जयभवानीनगर) यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली स्कोडा आणि टाटा इंडिगो कार, लोखंडी रॉड, तलवार, गुन्ह्यातील एक लाख ६० हजारांचे दागिने, रोख २२ हजार रुपये आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर, पीएसआय ज्ञानेश्वर सानप, दुर्गेश राजपूत, सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, रंजीत वैराळ, संजय मगरे, विनोद गडदे यांच्यासह इतरांनी केली.

\Bफिल्मी स्टाइल दरोडा\B

या दरोडेखोरांनी योजना आखून हा दरोडा टाकला. राजूर येथून बाफना यांची कार निघाल्यानंतर दोन कारने त्यांचा पाठलाग करण्यात आला. घाणेवाडी फाट्याजवळ दरोडेखोरांच्या इंडिगो कारने बाफना यांच्या कारला ओव्हरटेक करत त्यांच्या कारपुढे कार आडवी लावली. यावेळी बाफना यांची कार त्यांना धडकली. याच वेळी पाठीमागून आलेल्या दरोडेखोरांच्या दुसऱ्या कारने बाफना यांच्या कारला धडक देत त्यांची कार दोन्ही कारमध्ये अडकवली. यानंतर हल्ला करत ऐवज लुबाडण्यात आला.

व्हॉटसअपमुळे जाळ्यात

दरम्यान घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात दरोड्याची बातमी छापून आली. या बातमीनंतर या टोळीमध्ये ऐवजाचे समान वाटप झाले नसल्याच्या वादातून खटके उडायला लागले. त्यांच्या व्हॉटसअप ग्रुपवर दरोड्याच्या बातमीची जास्तच चर्चा होत होती. ही बाब निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांना समजल्यानंतर त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीतील पालिकेच्या पाण्याचे आरक्षण वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरासाठीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणातील महापालिकेच्या हिश्शाचे पाणी ४५ एमएम क्युबने वाढवावे लागणार आहे. पाण्याचे आरक्षण वाढवण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव पालिका शासनाला सादर करणार आहे.

महापालिकेची सध्याची १५६ एमएलडीची योजना पाणीपुरवठा योजना ६०५ एमएलडीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी जायकवाडी धरणातील ११३ एमएम क्युब पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी ५६ एमएम क्युब पाण्याचा वापर पालिका करते. महापालिकेने समांतर जलवाहिनीची योजना आखली होती. या योजनेसाठी तीस एमएम क्युब जास्तीच्या पाण्याच्या आरक्षणाची मागणी शासनाकडे नोंदवली होती. अद्याप ही मागणी मान्य झालेली नाही. आता महापालिकेने २५४० मिलिमीटर व्यासाची वाढीव पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. त्याचे सादरीकरण सोमवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी जायकवाडीतील पाणी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. 'वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याचे आरक्षण देखील वाढवावे लागेल. आरक्षण वाढवण्यासाठी पालिकेचा काही प्रस्ताव आहे का,' असे ते म्हणाले. यावर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी उत्तर दिले. 'सध्या ३० एमएम क्युब पाण्याचे आरक्षण वाढवावे अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे. आता सन २०५२चा विचार करून वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण ४५ एमएम क्युब पाण्याचे आरक्षण वाढवावे लागणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेतर्फे शासनाला द्यावा लागणार आहे, तो प्रस्ताव लवकरच दिला जाईल,' असा उल्लेख कोल्हे यांनी केला.

\Bनक्षत्रवाडीत जलशुद्धीकरण केंद्र

\Bदरम्यान, जायकवाडीवरील पंपहाउसमध्ये एकूण आठ पंप बसवले जाणार आहेत. त्यापैकी पाच पंप सुरू राहतील. तीन पंप राखून (स्टँड बाय) ठेवले जातील. नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी करण्यात आली असून, यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नक्षत्रवाडी येथे एक 'एमबीआर' आहेच. त्याशिवाय तेथे उंचावर आणखीन एक 'एमबीआर' बांधला जाणार आहे. नवीन 'एमबीआर'मधून १७० 'एमएलडी' तर, जुन्या 'एमबीआर'मधून ४३५ 'एमएलडी' पाणी उपलब्ध होऊ शकेल. दोन्ही 'एमबीआर' मिळून सहा वितरण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. नवीन 'एमबीआर'मधून सिडको-हडकोसह दूरवरच्या भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. जुन्या 'एमबीआर'मधील एका वितरण वाहिनी चिकलठाण्यापर्यंत (केंम्ब्रिज शाळेपर्यंत), दुसरी वितरण वाहिनी पडेगाव, ज्युबलीपार्क, हनुमान टेकडीपर्यंत, तिसरी वितरण वाहिनी ज्योतीनगर, विश्वभारती कॉलनी, गारखेडापर्यंत, चौथी वितरण वाहिनी क्रांतीचौक, शहगंज, दिल्लीगेट, किराडपुरा, जिन्सीसाठी आणि पाचवी वितरण वाहिनी उर्वरित शहरासाठी टाकण्यात येणार आहे. त्यात सातारा, देवळाई व 'नो नेटवर्क एरिया'चा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगारांचा बळी घेणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संरक्षक भिंत पडून पुण्यात १५ बांधकाम कामगार ठार झालेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या येथील माथाडी कामगारांनी सोमवारी क्रांतीचौकात तीव्र निदर्शने करून या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, मराठवाडा लेबर युनियन आणि स्वराज अभियानातर्फे हे आंदोलन करण्यात आले. प्रारंभी मृत कामगारांना आदराजंली अर्पण करण्यात आली. दुर्घटनेत १५ कामगारांचा बळी गेला. त्यासाठी जबाबदार बिल्डर व पुण्याचे कामगार आयुक्त यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत माथाडी कामगार, समाजसेवकांनी परिसर दणाणून सोडला होता.

बांधकाम कामगारांसाठी कायदा असताना अशा अमानुष घटना घडणे म्हणजे, मालक - बिल्डर्स तर कायदा पाळत नाहीतच, पण कायदा न पाळणाऱ्याकडे दुर्लक्ष करून सरकारचा कामगार विभाग, अशा बिल्डरांना मदतच करीत आहे, असा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला. संबंधित बांधकाम कायदेशीर होते का, या कामास कामगार खात्याची परवानगी घेतली होती का, बांधकाम कामगार कायद्याप्रमाणे नोंदीत होते का, पुण्याच्या कामगार आयुक्तांनी अशा बेकायदेशीर घटनेविरुद्ध काय कारवाई केली, असा सवालही यावेळी आंदोलकांनी उपस्थित केले.

दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना ५० लाख रुपये रोख व घरातील एकास कायम स्वरुपी सरकारी नोकरी दिली जावी. या घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अॅड. मनोहर टाकसाळ, अण्णासाहेब खंदारे, प्रा. एच. एम. देसरडा, सुभाष लोमटे, मुकुल निकाळजे, देविदास कीर्तीशाही, छगन गवळी, प्रवीण सरकटे, देवचंद आल्हाट, जगन भोजने, कैलास लोखंडे, सलीम भाई, सदाशिव सोळंके, रवी कदम, विलास इंगळे, संजय पवार, सिध्दार्थ शिव भगत, सुदाम मिरगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैराळ यांचे गायन रंगले

$
0
0

औरंगाबाद : वसंतराव नाईक महाविद्यालयात मेजर प्रा. डॉ. सुधीर जहागीरदार यांचा आजी-माजी छात्रांनी नुकताच सपत्नीक गौरव केला. यावेळी गायक राजेंद्र वैराळ यांचे बहारदार गायन रंगले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे संचालक कर्नल अमित दळवी, माजी छात्र तथा पोलिस निरीक्षक महेश आंधळे, प्राचार्य शिवाजी बिराजदार, प्राचार्य जगदीश खैरनार, निवृत्त उपप्राचार्य सुरेश भाले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात माजी छात्र आणि गायक राजेंद्र यांनी देशभक्तीपर गीत आणि गझलेलेचे बहारदार सादरीकरण केले. वैराळ यांच्या गायनाला उपस्थितांनी उत्फूर्त दाद दिली. यावेळी प्रजास्तक दिन संचलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयाच्या माजी छात्रांचा कर्नल दळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदाराला मारहाण; तिघांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आमचे रेशन कार्ड कुठे, सर्व गावाचे कार्ड तुम्ही दाबले' असे म्हणत महिला रेशन दुकानदाराला जातिवाचक शिविगाळ व मारहाण करणारे जितेंद्र भगवंता कोकणे, सुरेश बाबुराव निकम व भगवान भिकन इंगळे यांना कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची व प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सोमवारी (एक जुलै) ठोठावली.

या प्रकरणी रेशन दुकानदार हिराबाई चिंधा पवार (४०, रा. शिरोडी, ता. कन्नड) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २७ मार्च २०१५ रोजी त्या सकाळी दुकानावर असताना, जितेंद्र भगवंता कोकणे (३०), सुरेश बाबुराव निकम (३२) व भगवान भिकन इंगळे (२५, सर्व रा. शिरोडी, ता. कन्नड) हे आले व 'आमचे रेशन कार्ड कुठे' असा जितेंद्र याने सवाल केला. त्यावर हिराबाई यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे ऐकून न घेता 'तू जिल्हा परिषदेची सदस्य आहे, तू स्वस्त धान्य दुकान सोडून दे, तू सर्व गावाचे रेशन कार्ड दाबले आहे' असे म्हणत तिघांनी त्यांना जातिवाचक शिविगा‌ळ केली. तसेच जितेंद्रने उजव्या हातावर काठीने मारहाण केली, तर सुरेशने थापड मारली. त्याचवेळी 'आमच्याविरुद्ध तक्रार केली तर गावात राहू देणार नाही, गाडून टाकू' अशा धमक्या देत,पैशांची पिशवीही हिसकावून घेतली. त्या पिशवीत पाच हजार ५० रुपये होते, अशी तक्रार दिल्यावरुन भारतीय दंड संहितेच्या ३९२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह अॅट्रॉसिटी कायद्याच्या ३, १, १० कलमान्वये कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bदोन कलमान्वये ठरवले दोषी

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अजित अंकुश यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने तिघांना भारतीय दंड संहितेच्या ३२३ व ५०६ कलमान्वये दोषी ठरवले. तसेच ३२३ कलमाअंतर्गत तिघांना कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, तर ५०६ कलमाअंतर्गत तिघांना कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून जे. आर. पठाण यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्राहक संरक्षण’मधून आरोग्य सेवा वगळणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्राहक संरक्षण कायद्यातून आरोग्य सेवा वगळण्याचा केंद्रीय कॅबिनेटने निर्णय घेतला असून, या निर्णयाचे एकमुखी स्वागत देशातील खासगी डॉक्टरांची सर्वोच्च संघटना असलेल्या 'आयएमए'ने केले आहे. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यास हल्ल्यांमुळे डॉक्टरांचे खचलेले मनोधैर्य उंचावण्यास मदत होईलच, शिवाय डॉक्टर-रुग्ण संबंध सुधारण्यास या निर्णयाचा नक्कीच लाभ होईल. मुळात डॉक्टर-रुग्ण संबंध हे कधीच व्यापारी-ग्राहक असे नव्हते. उलट ग्राहक संरक्षण कायद्यातील आरोग्य सेवांच्या समावेशानंतर डॉक्टर-रुग्णांच्या संबंधात कटुता आली होती, असा सूर डॉक्टरांमधून उमटला.

यासंदर्भातील निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असला तरी प्रत्यक्षात कायद्यामध्ये बदल होऊन त्याची अंमलबजावणी होण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्थात, केंद्र सरकार त्यादृष्टीने सकारात्मक विचार करीत असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. याबाबतच्या कॅबिनेट निर्णयाचे राष्ट्रीय 'आयएमए'ने स्वागत केले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवादही दिले आहेत. हा निर्णय खरोखर झाला तर, डॉक्टर-रुग्ण संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल होतील, त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ जनतेलाच होईल. सद्यस्थितीत देशातील तीनपैकी एक डॉक्टर खटल्यांमध्ये भरडला जात आहे व डॉक्टरांना निरनिराळ्या हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे ते वेगळेच. पुन्हा देशभरातील खटल्यांचे एकूण प्रमाण कमी होण्यासाठीही या निर्णयाचा उपयोग होईल, असेही मत संघटनेने नोंदवले आहे.

या विषयी 'आयएमए'चे शहर सचिव डॉ. यशवंत गाडे म्हणाले, 'मुळात वैद्यकीय सेवा या कधीच ग्राहक सेवेत येऊ शकत नाहीत. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आपले ज्ञान-कौशल्य पणाला लावणारा डॉक्टर कधीच व्यापारी असू शकत नाही व रुग्णदेखील कधीच ग्राहक असू शकत नाही. त्यामुळे उशिरा का होईना घेण्यात येत असलेल्या या निर्णयाचा शंभर टक्के लाभ डॉक्टरांसह समाजालाही होणार आहे. त्याचवेळी ग्राहक संरक्षण कायद्यातून आरोग्य सेवा वगळल्या तरी गंभीर व हेतुपुरस्सर चूक करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध इतर कायद्यान्वये कारवाईचा अधिकारही अबाधित राहणार आहे.'

\Bपैसे नाही म्हणून उपचार नाही थांबत

\Bया निर्णयामु‌ळे रुग्णांचे आयुष्य नक्कीच वाढणार आहे, असे स्पष्ट मत नोंदवत, 'हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया'चे राज्य उपाध्यक्ष डॉ. कुलदीपसिंह राऊळ म्हणाले, 'पैसे नाही म्हणून व्यापारी ग्राहकाला नाही म्हणू शकतो; परंतु पैसे नाही म्हणून डॉक्टर रुग्णावरील उपचार थांबवू शकत नाही किंवा उपचारांमध्ये हलगर्जीपणाही करू शकत नाही. तशी शपथ प्रत्येक डॉक्टर घेत असतो आणि 'मेडिकल इथिक्स'शी डॉक्टर कायम बांधलेला असतो. या निर्णयामुळे डॉक्टर-रुग्ण संबंध नक्कीच सुधारतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टाच्या बँकेत २३ हजारांवर खाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोस्टाच्या बँकेत ११ महिन्यांत २३ हजारांवर नागरिकांनी खाती उघडली आहेत. डिजिटल इंडिया प्रोजेक्टचा चौथा वर्धापनदिनानिमित्त सोमवारी जुना बाजार येथील मुख्य डाकघर कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जुलै २०१५ रोजी डिजिटल इंडिया हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या चौथा वर्धापन मुख्य डाकघर कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी केक कापून वर्धापन दिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. पोस्ट मास्तर जनरल जयशंकर, प्रवर अधीक्षक बी. के. राहुल, सहाय्यक अधीक्षक अनिल सोळुंके, ए. एफ. दांडगे, असद शेख, आयईपीपीबी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना महापौर घोडेले यांनी, सुमारे १७० वर्षापूर्वी स्थापन झालेल्या टपाल विभागाचे कार्य आज डिजिटल माध्यमातून अधिक गतिमान, लोकाभिमुख झाले आहे अधिक किफायतशीर व लाभदायक झाल्याचे नमूद केले. पोस्ट मास्तर जनरल जयशंकर यांनी म्हणाले,'भारतात एकूण एक कोटी ५५ लाख पोस्ट ऑफिस असून, त्यापैकी ९० टक्के ग्रामीण भागात आहेत. भारत पोस्ट डिजिटल इंडियाच्या सरकारच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावतात'

आपली बँक आपल्या दारी, असे बीद्रवाक्य असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला (आयईपीपीबी) ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. ही बँक ग्राहकांच्या आधार आणि बायोमेट्रिकवर आधारित पेपरलेस बँकिंग सुविधा देते. एक सप्टेंबर २०१८ रोजी ही बँक सुरू झाली असून, जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजारांहून अधिक ग्राहकांनी खाते उघडले आहे. विभागात ४६ हजारांहून अधिक खाती नव्याने सुरु झाली आहेत.

\Bपाटोद्यात ७०० नवी खाती\B

या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने पाटोदा यागावात नवीन खातेदारांची नोंदणी कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, दोन दिवसांत ७००हून अधिक ग्रामस्थांनी खाती उघडले आहे, अशी माहिती सरपंच भास्कर पेरे यांनी दिली. अशा शिबिराचे जिल्ह्यात अन्यत्र आयोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images