Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विजेत्या कलाकारांचा सत्कार

$
0
0
समाजकारण आणि राजकारणार विशेष भाष्य करीत ‘अंधारयात्रा’ नाटकाने रसिकांना अंतर्मुख केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने सोमवारी विद्यापीठाच्या नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

$
0
0
सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यातर्फे व लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने ११ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रेमासाठी सज्ज

$
0
0
शहरातील बाजारपेठा विविध भेटवस्तूंनी सजल्या आहेत. तिला किंवा त्याला प्रेमाची भेट देण्यासाठी तरुणाई आतुर झाली आहे. त्यामुळे खरेदीची झुंबड उडाली आहे. ‘ही गुलाबी हवा.. वेड लावी जीवा..’ मराठी गीतातील या ओळींप्रमाणेच सध्या सगळीकडचे वातावरण गुलाबी रंगात न्हाऊन निघत आहे.

मॉल-मल्टिप्लेक्सचा ‘आधार’

$
0
0
औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रेमी युगुलांना फिरायला जायचं झालं तर, प्रोझोन मॉल, शहरातील चार-पाच मल्टिप्लेक्स हा नव्याने तयार झालेला पर्याय आहे. संपूर्ण सुरक्षितता, उत्तम वातावरण आणि निवांत फिरण्याची, बसण्याची सोय ही त्यामागची कारणं आहेत.

द्राक्ष उत्पादक आर्थिक विवंचनेत

$
0
0
द्राक्ष उत्पादकांना मिळणारे दर हे बाजारपेठेतील द्राक्षविक्रीच्या दराच्या तुलनेत अत्यल्प असल्यामुळे उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. द्राक्ष उत्पादन खर्चाच्या तुलनेत त्यांना विक्रीद्वारे मिळणारा नफा हा अत्यल्प आहे.

लोहा ठाण्यासमोरच विनापरवाना वाहनतळ

$
0
0
लोहा पोलिस ठाण्यासमोर विनापरवाना वाहनतळ गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता त्यांनी तर चक्क लोहा ठाण्यातच आपल्या गाड्या लाऊन पोलिसांनच आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

रापेयोची पाणंदमुक्तीसाठीची अट शिथील

$
0
0
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी शासनाने पाणंदमुक्तीचे सुधारीत धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार संबंधित गावाने पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करताना पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालय असलेल्या कुटुंबसंख्येमध्ये २५ टक्के वाढ करणे आवश्यक आहे.

पोलिसांचा निषेध करणे आले अंगलट

$
0
0
कोर्टाच्या आदेशानंतर दुचाकी देण्यासाठी रक्कमेची मागणी करणाऱ्या पोलिसाचा फलक लावून निषेध करणे भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांच्या अंगलट आले आहे. भाजपने या कृतीबद्दल दाखल झालेल्या गुन्हा मागे घेण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे.

बजाजनगरात खड्ड्यांची धास्ती

$
0
0
बजाजनगर भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या व आकार दिवसेंदिवस वाढतच असून, त्यावर दुरूस्तीसाठी कोणतेच प्रयत्न होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यांमुळे मुख्य रस्त्यांबरोबरच मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, डॉ. आंबेडकर चौक या परिसराची दुरवस्था झाली आहे.

भेदरलेले प्रवासी, हादरलेले विद्यार्थी

$
0
0
राज्यभर टोलविरोधात मनसेने आंदोलन केले. बुधवारी वेगवेगळ्या वाहनातून प्रवास करणारे मुठीत जीव धरुन होते. अचानक सुरू झालेल्या दगडफेकीने ते घाबरले होते.दगडफेकीत एक एसटी चालक जखमी झाला. त्याला पोलिसांनी बाहेर काढून आपल्या सरंक्षणात एसटी स्टॅँण्डवर नेऊन सोडले.

मनसेच्या ‘रास्ता रोको’ला हिंसक वळण

$
0
0
टोलवसुली थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. शहर कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी बसला ‘लक्ष्य’ केले.

‘ओपीडी’त ‘एमआर’चे मोहोळ

$
0
0
घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये (ओपीडी) गेल्या काही दिवसांपासुन औषध कंपन्यांचे प्रतिनिधींचे (एम.आर.) डॉक्टरांच्या भोवती मोहोळ तयार होत असल्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे.

‘GTL हटाव’ला अण्णा हजारेंचे सम‌र्थन

$
0
0
शहरातून जीटीएल कंपनी हटाव मोहिमेला अण्णा हजारेंने सम‌र्थन दिले आहे. नुकतीच जीटीएल विरोधी नागरी कृती समितीच्या सदस्यांनी अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. शहरात जीटीएलच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो.

फिश, मटण मार्केटला उशिर का झाला?

$
0
0
औरंगाबाद शहरात उघड्यावर मांसविक्री केली जाते. जनावरांची कत्तलही विनापरवाना केली जाते. फिश मार्केट बांधण्यात उशिर का झाला, अशी विचारणा करणारे शपथपत्र औरंगाबाद महापालिकेने दाखल केले; मात्र त्यावर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

...तर सिलिंडर होईल ३५ रुपयांनी स्वस्त

$
0
0
गॅस सिलिंडरवरचा एलबीटी रद्द करून नागरिकांवरचा आर्थिक बोजा कमी होणार असेल, तर पालिकेने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हवा; पण त्याचबरोबर शासनानेही गॅस सिलिंडरवरचा व्हॅट कमी करावा. सध्या साडेबाराटक्के व्हॅट आकारला जातो.

गांधेलीवासीयांचा शहराशी संपर्क तुटला

$
0
0
बीड बायपासपासून गांधेली गाव जवळपास अडीच किलोमीटर अंतरावर आहे, तर शहरापासून १४ किलोमीटर अंतर आहे. परंतु, या गावाचीही परिस्थिती देवळाईसारखीच आहे. येथील ग्रामस्थांनी काही वर्षापूर्वी सिटी बस पाहिल्याचे ते सांगतात.

व्हॅलेंटाईन वीकच्या धाकाने कॉलेजमध्ये मुली फिरकेनात

$
0
0
शहरात व्हॅलेंटाईन वीकच्या धाकाने कॉलेजमध्ये मुली फिरकत नसल्याचे चित्र आहे. अनेक मुलांच्या अतिरेकी वागण्याचा त्रास मुलींना होतो आहे. त्यामुळे त्यांनी कॉलेज सोडले आहे. त्यात त्यांच्या अभ्यासाचे मात्र नुकसान होते आहे.

बनावट २९८ स्वातंत्र्य सैनिकांवर आता गुन्हे

$
0
0
बीड जिल्ह्यातील बनावट स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रकरणात न्यायमूर्ती पालकर आयोगाने काढलेले निष्कर्ष ध्यानात घेऊन फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचबरोबर या २९८ बनावट स्वातंत्र्य सैनिकांकडून सन्मान निवृत्ती वेतनाची सव्याज वसुली करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

सिलिंडरवरचा ‘एलबीटी’ रद्द करा

$
0
0
गॅस सिलिंडरवरची एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द करून पालिकेने शहरातील नागरिकांना व प्रामुख्याने गृहिणींना दिलासा द्यावा, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना केली आहे.

राहुल गांधींकडेच उमेदवारी मागितली

$
0
0
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे, त्यासाठी थेट राहुल गांधींकडे उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती माजी आमदार नितीन पाटील यांनी पत्रकारांना दिली. शिवसजयंतीच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करून पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आपली ताकद आणून देऊ, असेही ते म्हणाले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images