Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आकाशवाणी देणार कानसेनांसाठी मेजवानी

$
0
0
शहरातील संगीत रसिकांसाठी आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वतीने तीन दिवसांच्या रेडिओ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक रेडिओ दिनानिमित्त होणारा हा महोत्सव तापडिया रंगमंदिरात होणार आहे.

हावभाव ‘टिपणं’ हीच आमची ‘कला’

$
0
0
फोटो काढणं, हावभाव टिपणं, क्षण बंद‌ीस्त करणं इथपर्यंत आजकाल फोटोग्राफीचं क्षेत्र मर्यादित राहिलेलं नाही. कॅमरा हाताळणं, एडिटिंग करणं, सॉफ्टवेअरवर विविध फोटोंचे मिक्सिंग करणं, अल्बम बनवणं, आणि पॅकेज‌िंग करून ते ग्राहकांना हवे त्यानुसार त्याचं एक पॅकेजिंग करून देणं इथपर्यंत आता हे क्षेत्र विस्तारलं गेलं आहे.

मुख्यालयी न राहणारे केवळ २४

$
0
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी केवळ २४ अधिकारी, कर्मचारीच मुख्यालयी राहत नाहीत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शारदा जारवाल यांना दिली.

घरकुल योजनेमध्ये फसवणुकीचा आरोप

$
0
0
सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावे लाखोंचे कर्ज उचलून घरकूल योजनेत फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी घाटी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक गुन्हेशाखेकडे धाव घेतलीय. पोलिस आयुक्तांकडेही ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

अपंग तरुणीला ‘दामिनी’चा हात

$
0
0
देह‌विक्रीसाठी आणलेल्या अपंग तरुणीची सिडको पोलिस व ‘दामिनी’ पथकाने सोमवारी सायंकाळी सुटका केली. सिडको परिसरातील हॉटेल विजय येथे छापा मारून पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये दोन दलालासह दोन ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. या मुलीला फितवणारी महिला आणखी एक आरोपी पसार झाला आहे.

दुचाकी अपघातात एक मृत्युमुखी

$
0
0
काळीपिवळी दुचाकी अपघातात एक ठार व दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता सिल्लोड रोडवरील पालफाटा येथे घडली. जखमींना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाची नोंद मेडिकल पोलिस चौकीमध्ये करण्यात आली आहे.

‘घाटी’ची ड्रेनेजव्यवस्था कोलमडली

$
0
0
गोरगरिबांसाठी असलेल्या घाटी हॉस्पिटलमधील बहुतांश इमारतींचे ड्रेनेजलाइन चोक-अप झाले आहेत, डागडुजीची कामे नेहमीच सुरू असली, तरी कामाच्या निकृष्ट दर्जामुळे वॉर्डात ड्रेनेजची गळती सुरूच असते. यामुळे शेकडो किलोमीटरवरून उपचारासाठी आलेल्या पेशंटचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

घोटी रस्त्याची दुरुस्ती वेगात

$
0
0
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ए.एस. क्लब ते लासूर स्टेशन रस्त्याची दुरुस्ती जवळपास पूर्ण होत आल्यामुळे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. हा रस्ता पुणतांब्यापर्यंत दुरूस्त करणार असल्याची माहिती देण्यात आली.

रोहयोच्या गुन्ह्यात ५ आरोपींना अटक

$
0
0
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामातील गैरव्यवहारा प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पाच आरोपींना अटक केले. त्यांना सिल्लोड न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने शनिवारपर्यंत (१५ फेब्रुवारी) पोलिस कोठडी सुनावली आहे.

बोर्डाच्या अध्यक्षांना प्राध्यापकांचा घेराव

$
0
0
बारावीच्या परीक्षांच्या हॉल तिकीट दुरुस्ती शुल्काबाबत मंडळ आणि ज्युनिअर कॉलेजांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मंडळ अधिकारी कॉलेजांशी पत्रव्यवहार न करता वर्तमानपत्रांना मात्र कॉलेजांबाबत स्पष्टीकरण देत आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत शहरातील ज्युनिअर कॉलेजांच्या शिक्षकांनी विभागीय मंडळ अध्यक्षांना मंगळवारी घेराव घातला.

उपायुक्तांना धरले नगरसेवकांनी धारेवर

$
0
0
‘जबरदस्ती केल्याशिवाय या शहरातील नागरिक मालमत्ता कर भरत नाहीत,’ असे विधान शहरातील सर्वच नागरिकांबद्दल केल्यामुळे नगरसेवकांनी कर आकारणी विभागाचे प्रभारी उपायुक्त शिवाजी झनझन यांना चांगलेच धारेवर धरले.

स्वस्त गॅस सिलिंडरसाठी नगरसेविका सरसावल्या

$
0
0
‘गॅसधारकांची अडवणूक थांबवा, सिलिंडरवरील ‘एलबीटी’ रद्द करा,’ अशी एकमुखी मागणी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविकांनी केली. या मागणीला नगरसेवकांनीही साथ दिली.

‘आधार’मुळे खिसा रिकामा

$
0
0
गॅस सिलिंडरचे अनुदान अधार कार्डाची सांगड घालून बँकेत जमा करण्याच्या सरकारच्या धोरणाचा बार फुसका ठरला आहे. गॅस ग्राहक क्रमांक आधारच्या माध्यमातून बँक खात्याशी जोडणाऱ्या ग्राहकाच्या खिशातून व्हॅटच्या माध्यमातून सरकारने हात मारला आहे. अनुदान बँक खात्यात जमा करताना सरकार सिलिंडरच्या संपूर्ण किमतीवर व्हॅटची वसुली करत आहे.

बंद मॉलला संशयास्पद आग

$
0
0
उस्मानपुरा प‌रिसरात असलेल्या एन मार्टच्या बंद मॉलला मंगळवारी सकाळी आग लागली. या आगीमध्ये गोदामामधील काही माल जळाला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या एक वर्षापासून हा मॉल पोलिसांनी सील केला असून या आगीमागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर लावण्यात पालिका बॅकफुटवर

$
0
0
नवीन मालमत्तांना कर लावण्यात पालिका बॅकफुटवर गेली आहे, असा आरोप करीत मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी करमूल्य निर्धारक व संकलकांसह कर आकारणीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

अहवाल सादर करण्याचे आदेश

$
0
0
पेठेनगरातील टीडीआर प्रकरणात सविस्तर अहवाल सादर करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना दिले.पेठेनगरातील टीडीआर घोटाळ्याचे प्रकरण ‘मटा’ ने ७ फेब्रुवारीच्या अंकात सर्वप्रथम उघडकीस आणले. त्यामुळे पालिकेत खळबळ उडाली.

‘मनसे’च्या ४२ पदाधिकाऱ्यांना नोटिसा

$
0
0
महाराष्ट्र न‌वनिर्माण सेनेतर्फे बुधवारी होणाऱ्या ‘रास्ता रोको’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘मनसे’च्या ४२ पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावली आहे. दरम्यान, पोलिस सज्ज असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिली.

प्रॅक्टिकल हॉ‌लतिकीटाविना

$
0
0
दहावीच्या ‘प्रिलिस्ट’मध्ये नापास झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यंदा दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा चक्क हॉल तिकीटविना घेणार आहे. प्रिलिस्टमधील चुकांची संख्या प्रचंड असून, त्यांची दुरुस्ती तात्काळ शक्य नसल्याने ही वेळ आली आहे.

नाट्यरसिकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

$
0
0
वाढता प्रवास खर्च, कलाकारांचे मानधन आणि रसिकांचा घटणारा प्रतिसाद पाहून मोठ्या नाट्यसंस्था अभावानेच औरंगाबाद शहरात नाट्य प्रयोग आयोजित करतात. त्यामुळे रसिकांना नवीन दर्जेदार नाटकांचा आनंद घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर ‘पवन इव्हेंट मॅनेजमेंट’ संस्थेने नाट्यरसिकांसाठी वाजवी दरात सभासद योजना सुरू केली आहे.

तरुणाईचे श्रमदान

$
0
0
श्रीयश इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या श्रमदानातून गेवराई (ब्रुक) येथे श्रमदानातून बंधारा बांधला. शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित आपल्या अभियांत्रिकी कौशल्यातून बंधाऱ्यासह, आरोग्याबाबतही जागरुकता निर्माण केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>