Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लातूर बाजारपेठ चौथ्या दिवशीही बंद

$
0
0
हरभरा आणि तुरीची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने करू नये, अशी सक्ती सहकार विभागाने केल्यामुळे लातूर आडत बाजारातील आडते आणि खरेदीदारांनी गुरुवारीही बाजार बंदच ठेवला.

नव्या बांधकामांचा मालमत्ताकर वाढणार

$
0
0
पालिकेच्या क्षेत्रात होणाऱ्या नवीन बांधकामांचा मालमत्ताकर साडेएकवीस टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव उद्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनातर्फे ठेवण्यात आला आहे. रेडी रेकनर दर वाढल्यामुळे त्याच्या तुलनेत ही दरवाढ पालिकेने सुचवली आहे.

एमजीएमच्या नाट्य महोत्सवाची सांगता

$
0
0
महात्मा गांधी मिशनच्या नाट्यशास्त्र ‌‌विभागाच्या दहाव्या नाट्यमहोत्सवाची सांगता ‘मॅड-मॅड- फॉर इच अदर’ने एकांकिकेने बुधवारी (दि.१९ फेब्रुवारी) झाली. यावेळी महागामीच्या पार्वती दत्ता यांची विशेष उपस्थिती होती.

अण्णा, ‘आप’ला पाठिंबा नको

$
0
0
‘आम आदमी पार्टीला भवितव्य नसल्यामुळे अण्णा हजारे यांनी त्यांना पाठिंबा देऊन नये,’ असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केले आहे.

परीक्षेची सुरुवात कॉपीमुक्तीने

$
0
0
कॉपीमुक्त अभियानाची फलश्रुती बारावीच्या पहिल्या पेपरलाच पहायला मिळाली. पहिल्या दिवशी भरारी पथकांनी औरंगाबाद विभागातील परीक्षा केंद्रावर धडक दिली. विभागात बीड वगळता इतर जिल्ह्यांमध्ये कॉपीप्रकरणांची संख्या शून्य आहे. बीडमध्ये तीन विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली.

धडपड बालरंगभूमीसाठी

$
0
0
औरंगाबादेत आता बालरंगभूमीसाठी धडपड सुरू झाली आहे. सध्या एक्झाम फीव्हर असला तरी, लवकरच लागणारी उन्हाळी सुटी ही सृजनशीलतेसाठी वाव देणारी ठरते. मुलां-मुलींसाठी सुटीचे नियोजन करणे सुरू झाले आहे.

आठवणीत राहणारे अधिकारी

$
0
0
पोलिसांच्या बदल्या नवीन नाहीत. शहरात अनेक अधिकारी येतात व जातात. मात्र, काही जण आपली वेगळी ओळख निर्माण करतात. नोकरीच्या काळात आपण या शहराचे काही देणे लागतो, या भावनेतून काम करणारे अधिकारी कमी असतात. नुकतीच आयुक्त संजयकुमार, सोमनाथ घार्गे, नवीनचंद्र रेड्डी यांच्या बदल्या झाल्या. बदली झाली, तरी ते कायमस्वरूपी आठवणीत राहणारे ‌हे अधिकारी आहेत.

आईनेच अर्भकाचा गळा घोटला

$
0
0
पोटच्या एका दिवसाच्या अर्भकाची जन्मदात्या आईनेच गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार गेल्या आठवड्यामध्ये घाटी हॉस्पिटलमध्ये घडला होता. अनैतिक संबंधांमधून या मुलाचा जन्म झाल्यामुळे या महिलेने या अर्भकाचाच जीव घेतल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली.

काँग्रेसने लाटली दलितांची मते

$
0
0
‘काँग्रेसने भूलथापा देऊन आतापर्यंत दलितांची मते घेतली. सतत जातीयवादी पक्ष असल्याची भीती दाखवून दलितांना भाजप-शिवसेनेपासून दूर ठेवले,’ असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शिवना येथील जाहीर सभेत केला.

फॅशन डिझायनिंगच्या क्लासने बनवले स्वावलंबी

$
0
0
शिकणाऱ्या मुलींना करिअर करण्यास वाव असतो, पण समाजातील वंचित घटकातील मुली बिकट परिस्थिती मुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत.

‘टेक्नोब्लिझ २०१४’ ला जल्लोषात प्रारंभ

$
0
0
विद्यार्थ्यांच्या ‌विविध अंगी गुणांना वाव देणाऱ्या दोन दिवसीय ‘टेक्नोब्लिझ २०१४’ ला एमआयटीत जल्लोषात प्रारंभ झाला. आज सकाळी प्राचार्य विजय दिवाण यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले.

रोबोरेसमध्ये तरुणाईची धूम

$
0
0
गो.. गो .. गो.... कमऑन कमऑन... कल्लोळ अन् डिजेच्या तालावर ठेका धरत आपल्या टीमच्या रोबोला कोण अधिक प्रोत्साहन देतो अशी जणू स्पर्धाच तरुणांमध्ये लागली होती.

चला, जग जिंकूया या!

$
0
0
‘आता पेटवू सारे रान...’ ‘घन ओथंबून येती मनात राघू...’; ‘भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं...’; अशा अनेकविध गाण्यांवर धमाल नाच, मजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत तब्बल २५० गतिमंद मुलांनी थक्क केलं...निमित्त होतं ‘गुंजन-२०१४’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचं.

व्हा असेही हिरो-हिरॉइन

$
0
0
औरंगाबादमध्ये साखरपुडा ते लग्न हा सोहळा शूटिंग करताना त्यात अनोखे बदल करत अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करत शूटिंगमध्ये चक्क हिरो-हिरॉइन्सची आभासी दुनिया निर्माण करण्याचा बिझनेस सध्या जोरात आहे.

कार्यकर्त्यांचा गोंधळात गोंधळ

$
0
0
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवार निवडण्यासाठी चाचपणी करण्यासाठी आलेल्या पक्ष निरीक्षकांना शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. आमच्याच उमेदवाराला तिकिट मिळाले पाहिजे, गद्दार व्यक्तीला पक्षातून काढून टाका अशा घोषणांनी गांधीभवन दुमदुमून गेले होते.

आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण

$
0
0
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे दिले जाणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार शनिवारी वितरित करण्यात येणार आहेत. वर्ष २०१ -१२ व २०१२ -१३ या दोन वर्षांसाठी नऊ तालुक्यांतून प्रत्येकी दोन अशा १८ ग्रामसेवकांना शनिवारी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरविण्यात येईल.

मराठी समृद्ध करण्याची ताकद साहित्याची

$
0
0
‘संत साहित्याच्या आसऱ्याला जाण्याची आपली परंपरा खूप मोठी आहे. ‘आपण’, ‘आपली मराठी भाषा’ आणि ‘वारसा’ संपन्न करण्याची ताकद या साहित्याने दिली,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक व संत तुकोबारायांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

एलबीटीविरोधात मार्केट बंद

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात राज्यातील व्यापारी एकवटले आहेत. या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मुंबईत विराट महासभा होत असतानाच शुक्रवारी शहरातही व्यापाऱ्यांनी दुकानाचे शटर डाउन केले होते. या बंदला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे शंभर कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा संघटनेने केला.

तापमानाची अचानक उसळी

$
0
0
शहराच्या तापमानात पुन्हा एकदा तीव्र बदल झालेत. दिवसाचे व रात्रीचे तापमान गुरुवारपासून वाढण्यास सुरुवात झाली. दोन दिवसांत रात्रीच्या तापमानाने ८.५ अंश सेल्सिअसची उसळी मारली. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही तापमानात तीव्र बदल झाले असून ढगाळ वातावरण आहे.

पाणीपट्टी वाढ रद्द करण्याचा प्रस्ताव

$
0
0
दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टी वाढ करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय रद्द करावा, असा प्रस्ताव आपण मांडणार आहोत. याशिवाय मालमत्ता करात प्रशासनाने सुचवलेली वाढही अन्यायकारक आहे. त्यामुळे या वाढीच्या संदर्भात सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असा पवित्रा पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी घेतला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images