Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रंगीन दरवाजा बहरणार

$
0
0
सुभेदारी विश्रामगृहाच्या जवळील ऐतिहासिक रंगीन दरवाजाच्या सुशोभीकरणाचे काम बुधवारी पालिकेने सुरू केले. आता या परिसरात चाफा फुलणार असून हिरवळही बहरणार आहे. रंगीबेरंगी कारंजे नागरिकांचे लक्ष वेधून घेतील.

नाला वळवण्याचा घाट

$
0
0
‘संतसृष्टी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महापालिकेतर्फे नाला वळवण्याचा घाट घातला जात असून नागरिकांनी याला तीव्र विरोध केला आहे. नाला वळवला, तर आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण होईल; याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होईल, असे बोलले जात आहे.

शिक्षणमंत्र्यांनी घेतला ‘समाचार’

$
0
0
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी बुधवारी आंदोलनकर्त्या मुख्याध्यापकांचा खरपूस समाचार घेतला. ‘आंदोलन मागे घ्या, अन्यथा जसे शिक्षकांच्या पाठिशी उभे राहिलो; तसेच आता विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे राहू,’ असा खणखणीत इशारा दिला.

बस वेळापत्रकाला केराची टोपली

$
0
0
एसटी महामंडळाच्या सिटी बस वाहतूक सेवेचे नियोजन सध्या पुरते विस्कळित झाले आहे. त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. सिटी बसचे वेळापत्रक तयार करण्यात आले. मात्र, त्याचा प्रचार-प्रसार झाला नाही. चालकांकडून या वेळापत्रकाचे कधी पालन झाले नाही. ते कधी अस्तित्वातच आले नाही.

शेती मालाला मिळणार वरदान

$
0
0
मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यातील शेती मालाला परदेशात बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ऑटो क्लस्टरप्रमाणेच अॅग्रो प्रोडक्ट क्लस्टरची स्थापना करण्यासाठी अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव डिसेंबर २०१४अखेरपर्यंत सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

राहुल यांचा फॉर्म्यूला ‘अनफिट’

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातून १५ मतदारसंघाचे उमेदवार स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ठरविण्याचा फॉर्म्यूला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरविला होता. त्यात महाराष्ट्रातून औरंगाबाद आणि यवतमाळ या मतदारसंघांचा समावेश होता. सगळी प्रक्रिया पूर्ण होतानाच ऐनवेळी दोन्ही मतदारसंघांमधून माघार घेण्यात आली आहे.

आमदार समर्थकांची ‘NOC’साठी गर्दी

$
0
0
विकास कामांसाठी वितरित करण्यात आलेल्या निधीच्या संदर्भात ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी आमदारांच्या समर्थक कंत्राटदारांची पालिकेत गर्दी होऊ लागली आहे. पालिकेचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय कामे सुरू होणार नाहीत आणि निधीचा विनियोगही होणार नाही.

जोर लावूनही ७१ कोटींचीच वसुली

$
0
0
महावितरणने जोर लावूनही औरंगाबाद व जालना जिल्ह्यात कृषी ग्राहकांकडून जानेवारी अखेर पर्यंत ७१ कोटी १५ लाख रूपयांचीच थकबाकी वसूल झाली आहे. दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे एप्रिल ते डिसेंबरपर्यंतच्या मागणीपैकी १९० कोटी कोटी रूपये थकबाकी आहे.

नगरसोल-चेन्नईसाठी औरंगाबादकर वेटिंगवर

$
0
0
आगामी ३ मार्चला नगरसोलहून चेन्नईकडे जाणाऱ्या रेल्वेसाठी औरंगाबादकरांना तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता कमी आहे. औरंगाबादसाठी तिकिटाचा कोटा कमी दिल्याने, याचा फटका औरंगाबादकरांना बसणार आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

$
0
0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्‍णालयातील कोन बिन कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी (सीबीसीटी) या यंत्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. मराठवाड्यातील शासकीय रुग्‍णालयात हे पहिलेच यंत्र आहे.

दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करा

$
0
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, यांसह अन्य मागण्यांसाठी समितीच्या कार्यकर्त्यांसह समविचारी संघटनेने गुरुवारी पैठणगेट येथे धरणे आंदोलन केले.

पुन्हा एकदा साखरकोंडी

$
0
0
रेशन कार्डधारकांना लेव्ही साखर देण्यास साखर कारखान्यांकडून अद्यापही टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे रेशनवरून साखर मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने साखर देण्यास नकार दिल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी गुरुवारी (१७ फेब्रुवारी) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिली.

एक्सलेटरचे काम लवकरच

$
0
0
रेल्वे स्‍थानकात प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्‍ध व्हाव्यात यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत रेल्वे स्‍थानकाच्या नवीन इमारती समोरील दादरच्या बाजुला नवीन एक्सलेटर बसविण्यात येणार आहे. त्याचे काम मार्चच्या पहिल्या आठवड्यापासुन सुरू केले जाणार आहे.

मेडिकल कॉलेजचे बारामतीत उद्घाटन

$
0
0
बारामतीमध्ये गुरुवारी मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते संपन्न झाले. या मेडिकल कॉलेजमुळे बारामतीच्या वैभवात भर पडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कॉलेजसाठी ४०६ कोटी ७३ लाख रुपये खर्च होणार आहे.

पेपर तपासणीवर बहिष्काराचे सावट

$
0
0
प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत होत नाही, तोच आता उत्तरपत्रिका तपासणीवर राज्यातील ज्युनिअर कॉलेजांच्या शिक्षकांनी बहिष्काराची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे उत्तपरत्रिका तपासणीवर बहिष्कराचे सावट आहे.

डॉक्टर लेनमधील बांधकामे नियमित होणार

$
0
0
‘डॉक्टरलेन परिसरातील अनधिकृत बांधकाम मंजूर ले-आउटमधील असल्यामुळे हार्डशिप प्रीमियम व टीडीआरच्या माध्यमातून नियमित करण्याचाच पर्याय शिल्लक आहे. या दोन्ही माध्यमातून सदर बांधकामे नियमित करण्यासाठी आपण अतिशय सकारात्मक आहोत.

अडथळा करणारी धार्मिकस्थळे हटवा

$
0
0
औरंगाबाद शहरातील रस्त्यांवरील ४१ धार्मिक स्थळे व विद्युत खांब ३१ मेपर्यंत हटविण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. रवींद्र घुगे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेला दिले आहेत.

सोशल मीडियाकडेही निवडणूक आयोगाचे लक्ष

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक उमेदवार, राजकीय पक्ष सोशल मीडियाचाही वापर करणार आहेत, मात्र निवडणूक आयोगाने सोशल मीडिया, इंटरनेट यांकडे बारकाईने लक्ष देण्याचे ठरविले आहे.

खर्च होणार नसेल तर, निधी मागू नका

$
0
0
‘घाटीसाठी निधी नाही अशी नेहमीच ओरड होते, आम्ही भांडून घाटीसाठी निधी आणतो मात्र, येथे निधी खर्च न करता हा निधी परत पाठवला जातो. जर निधी खर्च होत नसेल तर, मागू नका, तुम्ही अधिष्ठातांवर कारवाई करा’, असा घरचा आहेर आपल्या भाषणातून आमदार सतीश चव्हाण यांनी दिला.

लग्नात चोऱ्या करणारी टोळी कार्यरत

$
0
0
जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नातून अल्पवयीन मुलीने साडेतीन लाख रुपयांची बॅग लांबवल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी मध्य प्रदेशच्या टोळीवर संशय व्यक्त करण्यात आला असून, दोन वर्षांपूर्वी सातारा पोलिसांनी या टोळीला अटक केली होती. फुटेजच्या आधारे या मुलीचा शोध सुरू आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>