Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सलीम अली सरोवराचे अखेर लोकार्पण

$
0
0
उद‍्घाटनाच्या भानगडीत न पडता आठवडाभरात सलीम अली सरोवराचे लोकार्पण केले जाणार आहे, सुरुवातीच्या काळात या सरोवरातील प्रवेशासाठी शुल्क आकारले जाणार नाही, असे पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

येत्या पावसाळ्यात १८ कोटींवर वृक्ष लागवड

$
0
0
येत्या पावसाळ्यात राज्यात १८ कोटी ४१ लाख ३९ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. गेल्या पावसाळ्यात १९ कोटींवर झाडे लावण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के जमिनीवर झाडे लावणे आवश्यत आहे.

मोहपुरी येथून १२ जुगारी पकडले

$
0
0
घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ जुगाऱ्यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून रोख ५० हजार रूपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी शहरातील सर्व जुगार अड्डे बंद केलेत.

वाळूजमध्ये ट्रक-कारचा अपघात

$
0
0
एमआयडीसीतून तिरंगा चौकाकडे जाणाऱ्या कारला ट्रकने धडक दिली. यात कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील उद्योजक बालंबाल बचावले.बुधवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मतदार नोंदणीसाठी शनिवारी पुन्हा संधी

$
0
0
लोकसभेच्या सर्वत्रिक निवडणुकीपूर्वी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याची आणखी एक संधी मतदारांना देण्यासाठी येत्या शनिवारी (१५ मार्च) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

मुंडेंचे मुक्काम पोस्ट कमळेवाडी

$
0
0
गारपिटग्रस्त भागाचा दौरा करताना राजकीय नेत्यांकडून आगामी लोकसभा निवडणुकीचीही मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यातही याचाच प्रत्यय आला.

शरद पवारांची बीडमध्ये ‘डीनर डिप्लोमसी’

$
0
0
राज्याच्या विविध भागांमध्ये गारपिटीचा फटका बसला असून, बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी गारपिटग्रस्त भागामध्ये राजकीय अजेंडे काही काळासाठी गुंडाळून ठेवण्यात आले.

राष्ट्रवादी भीमसेना आठ जागा लढणार

$
0
0
मराठवाड्यातील लोकसभेच्या आठही जागा लढणार असल्याचे राष्ट्रवादी भीमसेनेने जाहीर केले. पक्षनेते विशाल पाखरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली.

काँग्रेसचे उमेदवार आठवडाभरानंतर?

$
0
0
मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे सर्वच राजकीय पक्षात अस्वस्थता पसरली आहे. मराठवाड्यातील राजकीय मूड बदलला असून, सर्वच राजकीय पक्षांनी सध्या निवडणुकांचा विषय बाजूला ठेवला आहे. काँग्रेसने चार दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केली.

मृताच्या वारसाला एक लाख

$
0
0
बीड जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी भेट दिली. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली, पिम्पला धायगुडा आणि परळी तालुक्यातील डाबी व वडवणी तालुक्यातील पिंपरखेड या गावांना भेट देवून झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली.

आज केंद्रीय पथकाचा दौरा

$
0
0
अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची आठ पथके गुरुवारी (१३ मार्च) महाराष्ट्रात येत आहेत. त्यापैकी चार पथके मराठवाड्यातील जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. या पथकाचा पाहणी दौरा दोन दिवसांचा आहे.

कुणी जागा देता का जागा?

$
0
0
गेल्या सहा महिन्यांपासून आरटीओ कार्यालयासाठी शहर परिसरात जागेसाठी सुरू असलेला शोध अद्यापही सुरूच आहे.नवीन रुजू झालेले प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनीही शहर परिसरात जागेचा शोध सुरू केला असून काही ठिकाणी जागेची पाहणीही केली आहे.

एअरपोर्टवर सुरू झाले पोस्ट कार्यालय

$
0
0
गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर विमानतळावर पोस्ट कार्यालय सुरू करण्यात आले. पोस्ट मास्टर ऑफ जनरल यांच्या हस्ते या कार्यालयाचे बुधवारी उदघाटन करण्यात आले. औरंगाबाद विमानतळाचे विस्तारीकरण करून नवीन विमानतळाचे उदघाटन २१ नोव्हेंबर २००८ मध्ये करण्यात आले.

गॅसच्या भडक्याने लाखाचे नुकसान

$
0
0
गॅसच्या नळीने पेट घेतल्याने भडका झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी पाच वाजता सिडको भागातील ‌शिवनेरी कॉलनीत घडला. या घटनेत एका लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अवैध मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
वडगाव कोल्हटी येथील तलावातून अवैध मुरुम उपसा करणारी चार वाहने बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतली. ‘मटा’ने याबाबत बुधवारच्या अंकात बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर तात्काळ ही कारवाई करण्यात आली.

राज्याच्या कारभाऱ्यासमोर फुटला अश्रूंचा बांध

$
0
0
अवकाळी पाऊस, वादळी गारपिटीने आम्हाला रस्त्यावर आणलं. या संकटाने आमचं होत्याचं नव्हतं झालं. डौलानं डोलणारी आमची पिकं डोळ्यादेखत नस्तनाबूत झाली. जनावारांना चारा नाही. रानोमाळ उजाड झाली. हाताला काम नाही. आता काय करावे अन् जीवन कसे जगावे.

शहरात पावसामुळे तारांबळ

$
0
0
शहराच्या विविध भागात बुधवारी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसामुळे सिडको टाउनसेंटर या भागात काही वेळ वीज गूल झाली. दिवसभर कडक उन्हामुळे उकाडा आणि रात्री थंडी व पाऊस अशी परिस्थिती आठवडाभरापासुन शहरात होती. बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली.

५० गावांचा पाणीप्रश्न सुटला

$
0
0
अवकाळी पावसाने हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्याची पाणीपातळी वाढली आहे. परिणामी पन्नास गावचा सहा महिन्यापर्यंतचा पाणी प्रश्न सुटला आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून शहर व तालुक्यात सर्वत्र गारपीट होते आहे. तालुक्यात रब्बीपिके व फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्याच्या पाणीपातळीत अनुक्रमे दोन व दीड फुटांनी वाढ झाली आहे.

खंडणीसाठी डॉक्टरला धमक्या

$
0
0
शहरातील डॉक्टराला एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या भूखंड माफियांच्या टोळीतील तीन आरोपींना गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. कांचनवाडी येथील जमिनीचा वाद मिटवण्यासाठी तसेच विनयभंगाच्या गुन्ह्याचे बलात्काराच्या गुन्ह्यात रुपांतर करण्याची धमकी देत ही मागणी करण्यात आली होती.

होलिकोत्सवावर गारपिटीचे सावट

$
0
0
होलिकोत्सवानिमित्त विविध रंग, पिचकऱ्यांनी बाजार सजला आहे; परंतु अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही, ग्राहकांची फारशी वर्दळ नसल्याने विक्रेते चिंताग्रस्त झाले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images