Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तिघींचे मंगळसूत्र पळवले

$
0
0
मंगळसूत्र चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गारखेडा व उल्कानगरी परिसरातून गुरूवारी दोन मंगळसूत्र पळवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिसरी घटना गुरूसाहनी नगरमध्ये संध्याकाळी साडे सात वाजता घडली.

राजेश टोपे यांची आमदारकी कायम

$
0
0
२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे हे घनसावंगी मतदारसंघातून निवडून आले. पराभूत उमेदवार अर्जुन खोतकर यांनी निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

‘सलीम अली’वरून वादाची चिन्हे

$
0
0
सलीम अली सरोवराचे लोकार्पण करण्याच्या मुद्यावरून पालिकेचे आयुक्त आणि पदाधिकारी आमनेसामने आले आहेत. येत्या सात-आठ दिवसांत या सरोवराचे लोकार्पण करण्याची घोषणा कालच (बुधवारी) आयुक्तांनी केली आणि आज पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या नावे पत्र देऊन सर्वसाधारण सभेच्या निर्णयानंतरच हे सरोवर जनतेसाठी खुले करा, असे बजावले आहे.

भाजपबद्दल शिवसेनेचे आस्ते कदम

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भात मुंबईत शिवसेना - भाजप मध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसाद औरंगाबादेत उमटू लागले आहेत. निवडणुकीच्या प्रचारात पूर्णपणे उडी घेताना भाजप बद्दल ताकही फुंकून पिण्याची तयारी सेनेच्या गोटात केली जात आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पुतळे का आठवतात?

$
0
0
राज ठाकरे यांचा ‌शिवरायाच्या स्मारकला विरोध असल्याबाबत शंका निर्माण केल्या जाते, मात्र शिवरायांच्या स्मारकाला कोणी विरोध करू शकत नाही, असे मत राज ठाकरे यांनी यावेळी मांडले.

मनसेत ‘खासदारकी’वरून जुंपली

$
0
0
वेळ रात्री दहा ते अकरा वाजेची... स्थळ मनसे प्रमुख राज ठाकरे थांबलेले पंचतारांकीत हॉटेल रामा इंटरनॅशनल... मनसेचे सर्व पदाधिकारी राज ठाकरे यांची बीडहून परतण्याची वाट पाहत होते, तेवढ्यात दोन पदाधिकाऱ्यांमध्ये ‘खासदार’ शब्दावरुन डिवचल्यामुळे सुरू झालेली श‌ाब्दिक चकमकीचे स्वरुप हातघाईवर येणार होते.

आपच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग

$
0
0
पक्ष स्थापनेनंतर अवघ्या एका वर्षातच दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी सुरु केली आहे. परंतु निवडणूक लढवण्याचा अनुभव नसल्यामुळे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

मनसे प्रमुखांच्या मुक्कामी ‘वेटिंग’

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. यावेळी हॉटेलच्या परिसरात आपल्यावर साहेबांची मेहेरनजर व्हावी, यासाठी लोकसभा व नंतर येणाऱ्या विधानसभ निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती, मात्र त्यांना शेवटपर्यंत ‘वेटिंग’वरच ठेवण्यात आले.

छोट्या पक्षांची छुपी युती

$
0
0
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आघाडी, तिसरी आघाडी, युती, महायुती असे प्रयत्न सुरू आहेत. तर छोटया पक्षांनी आपल्या छुप्या युतीसाठी प्रयत्न सुरू केलेत. त्यातून मतांची संख्या वाढविण्याचा छोटया पक्षांचा प्रयत्न सुरू आहे.

प्रायमरीजमध्ये बनसोडे विजयी

$
0
0
काँग्रेस पक्षाचा लातूर मतदार संघातील लोकसभा उमेदवार ठरविण्यासाठी पक्षाने राबविलेल्या प्रायमरीज च्या प्रक्रियेत जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी निर्णायक विजय मिळवला.

काँग्रेसकडून विलास औताडे

$
0
0
लोकसभेसाठी युतीचे खा. रावसाहेब दानवे विरोधात कॉँग्रेसने विलास औताडे यांना गुरुवारी उमेदवारी जाहीर केली. युवक कॉँग्रेसच्या गोटातून जालन्यात जल्लोष साजरा झाला.

पथकाने घेतला नुकसानीचा आढावा

$
0
0
मराठवाड्यात गेल्या तीन आठवड्यांत गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी पाहणी करण्यासाठी आलेल्या नऊ सदस्यांच्या केंद्रीय पथकाचे गुरुवारी (१३ मार्च) झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

धनंजय मुंडेंना अटक व सुटका

$
0
0
राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे यांना नांदेडच्या केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क विभागाकडून गुरुवारी अटक करून सुटका करण्यात आली. परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या एका कंत्राटाच्या कर चुकवेगिरी प्रकरणात ही अटक झाली होती.

‘समांतर’ योजना रडारवर

$
0
0
सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली समांतर जलवाहिनीची योजना आता राज्य शासनाच्या लोकलेखा समितीच्या रडारवर आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर या समितीसमोर समांतरबद्दलच्या विविध प्रश्नांचा खुलासा पालिकेला करावा लागणार आहे.

सुवर्ण स्मृतींना उजाळा

$
0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आजपासून (दि. १४ मार्च) सुरू झाले. उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिराच्या कलादालनात १६ मार्चपर्यंत हे प्रदर्शन असेल.

सोशल साईटसवर रंगोत्सवाची धूम

$
0
0
औरंगाबादमध्ये युवावर्ग आता व्हर्च्युअल होळीचा ट्रेंड आणत आहे. सोशल साईटसवर रंगोत्सवाची धूम आहे. स्टीकर्स, रंगकार्ड ऑनलाईन पाठवण्यावर भर आहे. स्मार्टफोन्सवर व्हॉट्स-अप, लाईन, चॅट अशा विविध अॅप्सद्वारे कॉन्व्हर्जन्स केले जात आहे.

बंजारांच्या पारंपरिक नृत्याने वेधले लक्ष्य

$
0
0
सकाळी साडेदहाची वेळ... ढोल....ताशे नगारेंचा तर्रार्रा आवाज... पारंपरिक वेशभुषेतील बंजारांचे नृत्य.... घोषणाबाजींचा जल्लोष अन् क्रांती चौकात जमलेला जनसमुदाय निमित्त होतं राज्यस्तरीय स्पर्धेचे.

रिपब्लिकन सेना वेगळ्या पर्यायाच्या शोधात

$
0
0
लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन सेना वेगळ्या पर्यायाच्या शोधात आहे. शुक्रवारी मुंबईत पक्षाची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीसंदर्भातही काय भूमिका घ्यावी, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

खैरे यांचे विधान क्लेषदायक

$
0
0
‘गडकरी यांनी आता तरी सुधारावे,’ हे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेले विधान क्लेशदायक आहे, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी थेट खैरे यांच्यावर तोफ डागली आहे.

भाजपच्या प्रवक्त्यांची रोज ‘मोबाइल कॉन्फरन्स’

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील सर्व प्रवक्त्यांची रोज ‘मोबाइल कॉन्फरन्स’ होत आहे. राष्ट्रीय मुद्यांवर पक्षाची भूमिका काय मांडायची, याबद्दल गाइड लाइन ठरविण्यात येते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images