Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मुख्यमंत्र्यांच्या सभेची कॉँग्रेस नेत्यांनाच माहिती नाही

$
0
0
मुख्यमंत्र्यांची शहरात सभा. या सभेची कॉँग्रेस नेत्यांनाच माहिती नाही, अशी परिस्थिती रविवारी उद्भवली. एकूणच काय तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसमध्ये ढिसाळ नियोजन होत आहे. देश व राज्य पातळीवरील नेते कधी येणार, सभा कुठे होणार याची माहिती काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना होत नसल्याने अनेक जण नाराज आहेत.

नॅशनल लॉ विद्यापीठाची घोषणा फसवी

$
0
0
प्रवेशासाठी देशपातळीवर होणाऱ्या ‘कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट’साठी राज्याने प्रक्रियाच पूर्ण केलेली नाही. त्यामुळे नॅशनल लॉ विद्यापीठाचे वर्ग २०१४-१५च्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार, ही सरकारची घोषणा फसवीच ठरणार आहे. विशेष म्हणजे २०१५-१६ वर्षासाठीच्या ‘क्लॅट’साठीही मे अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परंतु, अद्याप कुलगुरूंची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे या प्रक्रियेला सुरुवात करणेही कठीण झाले आहे.

राजनाथसिंहांचा डाव मोदींनी उलटवला

$
0
0
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, मात्र निवडणुकीसाठी पैसे नसल्याने त्यांनी नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला. मोदींनी मात्र आपले जोरदार मार्केटिंग करून घेतले आहे. त्यामुळे राजनाथसिंहांचा गेम त्यांच्यावरच उलटला आहे.

शेतकऱ्यांच्या हाती ६८ कोटी

$
0
0
जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ९५ कोटी रूपयांचे अनुदान आले आहे. त्यापैकी ६८ कोटी ४ लाख रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

औरंगाबादमध्ये मनसे तटस्थच

$
0
0
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. राजकीय पक्षांकडून याबाबत अपप्रचार करण्यात येत असून पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी अशा प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन मनसेचे संपर्कप्रमुख सतिश नारकर यांनी केले आहे.

उमेदवार बॅँकेचा डिफॉल्टर नसावा

$
0
0
‘पडद्यामागे त्यांचा आपआपसात करार आहे, लोकांसाठी निवडणुकीचा सारा थरार आहे, कुठे आहे विकासाचा मानवी चेहरा, पुढच्या पाच वर्षांसाठी सारे फरार आहे’ असा सतत फरार होणारा खासदार आम्हाला नकोय. खासदारकीला उभा राहणारा उमेदवार बॅँकेचा ‘डिफॉल्टर’ नसावा,’ अशा भावना शहरातले बॅँकर्स पोटतिडकीने मांडत होते. ते रविवारी ‘मटा’ने आयोजित केलेल्या राउंडटेबलमध्ये बोलत होते.

मतासाठी व्यवस्थापन ‘पणाला’

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदार संघात शिवसेना, कॉँग्रेस आणि ‘आप’ने मतदानासाठी चोख नियोजन केले आहे. बूथनिहाय, जिल्हा परिषदेच्या गट आणि गणनिहाय कार्यकर्ते तैनात केलेत. या व्यवस्थानाचा ‘मटा’च्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा.

पाणी काय अजित पवारांच्या घरचे?

$
0
0
‘समोर पराजय दिसत असल्याने राष्ट्रवादीचे नेते दादागिरीची भाषा बोलत आहेत. मत दिले नाही, तर गावाचे पाणी बंद करू अशा धमक्या गावक-यांना देण्यात येत आहेत. पण पाणी बंद करायला, पाणी काय अजित पवारांच्या घरचे आहे का?’ अशी घणाघाती टीका भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.

मतदार यादीतील घोळ, तिसरा अंक?

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील प्रत्यक्ष मतदानाला तीन दिवसांचाच अवधी उरला असताना मतदार यादीतील चुकांमुळे मोठा गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील अनेक मतदारांना अद्याप पोलचिट मिळालेल्या नसून, नवीन मतदारांना ओळखपत्रांचीही प्रतीक्षा आहे. मतदारांना मिळालेल्या पोलचिटमध्ये प्रचंड चुका असल्यामुळे मतदार व ‘बीएलओं’ची अडचण होत आहे.

खबरदार जर याल पुढे तर...!

$
0
0
गुरुवारी होणारे लोकसभेचे मतदान निर्भय वातावरणात व्हावे, यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. तीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांसह एक हजार होमगार्ड, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक कंपनी असा तगडा बंदोबस्त ग्रामीण भागात तैनात केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

प्रचारात स्थान‌िक प्रश्न

$
0
0
महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा मंगळवारी बसला. यंदाच्या प्रचारात सुरुवातीपासून मरगळ होती. शेवटच्या आठवड्यात शिवसेना, काँग्रेस आणि आपच्या नेत्यांनी प्रचार सभांचा मतदारसंघात धडाका लावला आणि कुठे वातावरण थोडे तापले होते.

‘समृद्धी’ने दिली गोड बातमी

$
0
0
दीड वर्षाने सिद्धार्थ उद्यानात वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आणि जणू प्राणिसंग्रहालयातील सर्वच प्राण्यांना आनंदाचा धक्का बसला. वाघाचा जन्म ही दुर्मिळ ठरलेली घटना सहा आठवड्यांपूर्वी घडली आणि या बछड्यांना सुदृढ बनविण्यासाठीच जगाच्या नजरेपासून दूर ठेवण्यात आले.

पुणे मार्गावरील २ ‘शिवनेरी’ बंद

$
0
0
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढत असताना कंत्राट झाले नसल्याने पुणे मार्गावरील दोन शिवनेरी बसगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे दररोज चार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. दरम्यान, या सेवेतील आणखी एक बस बुधवारी (२२ एप्रिल) करार संपल्यामुळे बंद करण्यात येणार आहे.

अजमेरसाठी विशेष रेल्वे

$
0
0
​ख्वाजा गरीब नवाज दर्गाह अजमेर यांच्या ८०२ व्या उरुसाठी हैदराबाद व इतर भागातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने चार विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिली विशेष रेल्वे २ मे रोजी हैदराबादहून निघून ३ मे रोजी औरंगाबादला येईल.

लक्ष्मी, सरस्वती औरंगाबाद सोडणार

$
0
0
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील ‘लक्ष्मी’ आणि ‘सरस्वती’ या दोन हत्तीणी लवकरच औरंगाबाद सोडून जाणार आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने तशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत प्राणिसंग्रहालयातील हत्तीगृह ओस पडलेले दिसणार आहे.

आमुचा राम राम घ्यावा...

$
0
0
प्राणिसंग्रहालयात हत्ती ठेऊ नये, असा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. त्यामुळे सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील दोन्ही हत्तीणींचीही लवकरच विशाखापट्टणमच्या पार्कमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.

सिंहासन पणाला

$
0
0
लोकसभेच्या औरंगाबाद आणि जालना मतदार संघात गुरुवारी मतदान होईल. औरंगाबाद मतदारसंघात महायुतीचे चंद्रकांत खैरे, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नितीन पाटील तर आम आदमी पक्षाचे सुभाष लोमटे यांच्यात चुरशीची लढत आहे.

निवडणुकीची लगीनघाई

$
0
0
जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रावर बंदोबस्त पोहचला का ? वाहनांची कुठे काही समस्या तर नाही ना ? असेल तर त्यासंदर्भात संबंधितांना माहिती देत त्याची पूर्तता करणे, फोनाफोनी करणे अशी लगीनघाई सध्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील इलेक्शन सेलमध्ये सुरू आहे.

करडी नजर; खडा पहारा

$
0
0
लोकसभेसाठी उद्या, गुरुवारी होणारे मतदान निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी पोलिस सज्ज झालेत. फौजफाटा नियोजितस्थळी रवाना झाला असून औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांनी बुधवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला.

बंदोबस्तासाठी ३१० वाहने

$
0
0
गुरुवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी मोटार परिवहन विभागाने २७५ वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. तर अतिरिक्त ३६ वाहने मागवण्यात आली आहेत. मात्र मनासारखी वाहने न मिळाल्याने बंदोबस्तावरील काही अधिकारीऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images