Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाच कोल्हापुरी बंधाऱ्यांना मिळणार पुनरुज्जीवन

$
0
0
शहरापासून ५० किलोमीटर अंतरावरील सेलूद व चारठा गावाच्या परिसरातील दूधना नदीवरील पाच नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे ‘तुषार समृद्धी’ योजनेंतर्गत पुनर्जिवित होणार आहेत.

महाराष्ट्र पब्लिक स्कूल सुरू राहणार!

$
0
0
मागील वर्षीप्रमाणे महाराष्ट्र पब्लिक स्कूल (माध्यमिक) यंदा बंद राहणार की सुरू यावर पालक, विद्यार्थ्यांमध्ये अद्याप संभ्रमाची अवस्था आहे. त्यामुळे काय तो योग्य तो निर्णय आम्हाला सांगा, असे सांगत रविवारी पालकांनी शाळेत धाव घेतली.

दोन महिन्यांत ९२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0
मराठवाड्यामध्ये २२ फेब्रुवारी ते २९ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ९२ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. ९२ पैकी चौकशी समितीने ६७ प्रकरणांची सखोल चौकशी केली. यापैकी ४१ प्रकरणांना पात्र ठरवण्यात आले असून केवळ १९ जणांच्या वारसांना मदत देण्यात आली आहे, तर २५ आत्महत्यांबाबतची चौकशी सुरू आहे.

गारपीटग्रस्तांना आता ४८४ कोटींची प्रतीक्षा

$
0
0
गारपीटग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेल्या निधीपैकी २२० कोटी रुपयांचा पहिला टप्पा तर २९० कोटी रुपयांचा दुसरा टप्पा मिळाला आहे. प्रशासनच्या वतिने या निधीचे ९३ टक्के वाटपही करण्यात आले. मात्र आणखी ४८४ कोटी रुपयांचा निधीकडे मराठवाड्यातील शेतक-यांचे डोळे लागले आहेत.

घाटीचा डायलिसिस विभाग फक्त एकाच मशिनवर

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) डायलिसिस विभागातील पाचपैकी चार मशीन बंद पडल्या असून केवळ एका मशीनवर विभाग सुरू आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून विभागात केवळ दोन मशीन सुरू होत्या.

३८ प्रवाशांना मरणाच्या दाढेतून काढले

$
0
0
३८ प्रवाशांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्याचे काम, एका बहाद्दर एसटी चालकाने केले. बस सुरू असतानाच अचानक गाडीचे स्टेअरिंग लॉक झाले. पुढे पूल आणि खालून वाहणारी नदी.

एमएच - सीइटीसाठी ७ हजार विद्यार्थी

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व (एमएच-सीइटी) परीक्षेसाठी औरंगाबाद शहरात ६,९९४ विद्यार्थी आठ मे रोजी परीक्षा देणार आहेत. १८ केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी ५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘महावीर भूषण’ने डॉ. श्रॉफ सन्मानित

$
0
0
महावीर मेडिकल फाऊन्डेशनचा शपथविधी कार्यक्रम नुकताच हॉटेल वृंदावन येथे झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष झांबड हे होते. देवेंद्रकुमार काला यांनी शपथविधी प्रदान केला. या वर्षीचा महावीर भूषण पुरस्कार एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ यांना प्रदान करण्यात आला.

पहिला टेस्ट ट्यूब बॉय झाला ‘कॉलेजकुमार’

$
0
0
जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म १९७८मध्ये लंडनमध्ये झाला, तर हेच तंत्र औरंगाबादमध्ये येण्यास तब्बल वीस वर्षांचा कालावधी लागला. या तंत्राने १९९८मध्ये औरंगाबादमध्ये पहिला टेस्ट ट्यूब बॉय जन्माला आला.

सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षणाच्या परीक्षेनंतर गोंधळ

$
0
0
सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण देणाऱ्या ‘डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूट’ने (डीसीआय) देवगिरी कॉलेजमध्ये प्रवेशाचे खोटे आश्वासन देत फसवणूक केल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला.

न्या. चांदीवाल यांना आज निरोप

$
0
0
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. यु. चांदीवाल हे बुधवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना सोमवारी वकील संघातर्फे निरोप देण्यात येत आहे. हायकोर्टातील कॉन्फरन्स हॉलमध्ये दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होईल.

आठवड्यात गारपिटीची शक्यता

$
0
0
यंदा वर्षभर प्रत्येक महिन्यात पाऊस हजेरी लावतो आहे. आता येत्या आठवड्यातही गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

‘मायनर सनस्ट्रोक’चा फटका

$
0
0
‘मेजर’ नसला तरी ‘मायनर सनस्ट्रोक’ अर्थात उष्माघाताचा सौम्य फटका आता औरंगाबादकरांना बसू लागला आहे. यामुळे रुग्णांना दाखल करण्याची वेळ येत नसली तरी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.

‘शिष्यवृत्ती’ निकाल जूनमध्ये

$
0
0
पूर्व माध्यमिक (चौथी) आणि माध्यमिक (सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची निकालाची अद्याप ‘अन्सर की’च जाहीर नाही. तर निकालाला जून महिना उजाडण्याची शक्यता आहे. राज्यभरात सुमारे चौदा लाख ‌विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिलेली आहे.

नागरिक नगरसेवकाच्या घरी

$
0
0
सिडको-हडको भागातील पाणीप्रश्न पेटला असून, सातत्याने खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्या मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. संतापलेल्या नागरिकांनी नगरसेवकाच्या घरी हंडी मोर्चा काढला तर नगरसेवक पाणीपुरवठ्यातील विस्कळितपणाबद्दल जाब विचारण्यासाठी कडा कार्यालयाच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ जमा झाले.

पाच दिवसांपासून निर्जळी

$
0
0
महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडको हडकोवासियांना उन्हाची पर्वा न करता पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक वसाहतींमध्ये तब्बल चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही.

‘इको बाप्पां’चा राष्ट्रीय विक्रम

$
0
0
दीपशिखा फाउंडेशनच्या ‘इको गणपती’ चळवळीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. एकाच कार्यशाळेत शाडू मातीचे गणपती तयार करण्याच्या कार्याचा राष्ट्रीय विक्रम नोंदवण्यात आला आहे.

अश्वारुढ छत्रपतींचे देखणे शिल्प

$
0
0
वैविध्यपूर्ण शिल्पाकृतींमुळे देशभर ख्याती मिळवलेले प्रसिद्ध शिल्पकार सुनील देवरे सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या निर्मितीत मग्न आहेत. शहरातील यशवंत कला महाविद्यालयाच्या प्रांगणात पुतळा घडवण्याचे काम सुरू असून लवकरच मुखेड (जि. नांदेड) इथं पुतळा पाठवला जाणार आहे.

सोयाबीन पिकाचे क्षेत्र परभणी जिल्ह्यात वाढणार

$
0
0
येत्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबिन पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. बियाण्यांची कमतरता होऊ नये म्हणून संबंधितांनी पुरेशी दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पेन्शनधारकांची बँकांकडून अडवणूक

$
0
0
पेन्शन धारकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या जिल्हा कोषागार अधिकाऱ्यासहीत (ट्रेझरी ऑफिसर) विविध बँकांच्या शाखाधारकांची चौकशी करावी, अशी मागणी पेन्शन धारक मंडळींनी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय गायकवाड यांची भेट घेऊन केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images