Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठा सेवा संघाचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन

$
0
0
मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबादेत येत्या आठ जून रोजी राज्यस्तरीय विशेष महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

औरंगाबाद शहरातून पन्नास हजार परीक्षार्थी

$
0
0
टपाल विभागामधील सहाय्यक पदासाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. औरंगाबाद विभागात पाच शहरातून ही परीक्षा घेण्यात आली, परीक्षेला सत्तर हजार परिक्षार्थी होते. तर औरंगाबाद शहरातील ७५ परीक्षा केंद्रावरुन ५१ हजार पेक्षा अधिक उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

रेल्वे-बस स्थानक मुंबईसारखे हाऊसफुल्ल

$
0
0
पोस्टाच्या परीक्षेसोबत विद्यार्थ्यांना रविवारी प्रवासाची परीक्षा द्यावी लागली. रेल्वे फलाटावर हजारो प्रवासी, बसस्थानक तुडूंब भरलेले, जागा मिळवण्यासाठी जिवाच्या आकांताने सुरू असलेली धडपड. हे चित्र मुंबईतले नव्हे तर औरंगाबादचे होते. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. संध्याकाळी मनमाडकडे जाणाऱ्या हायकोर्ट एक्सप्रेसमध्ये तुफान गर्दी होती. एका कोचमध्ये जवळपास चारशे जणांनी प्रवास केला.

लग्नसराईने बाजारात चैतन्य सळसळले

$
0
0
वर्षभर निराश असलेल्या बाजारात लगीनसराईमुळे पुन्हा एकदा चैतन्य सळसळले आहे. सोने, कपडे, वाहन खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. येत्या पाच जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे बाजारात तेजी राहील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

मंगळसूत्र चोरट्याला पकडणाऱ्यांचा सत्कार

$
0
0
मंगळसूत्र चोरट्यास मोठ्या धाडसाने पकडणाऱ्या सहा सजग नागरिकांचा पोलिस आयुक्तालयातर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला.

दोन विविध घटनांत आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्याचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना शुक्रवारी रात्री शहरात घडल्या. संबंधितांवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

केंद्रप्रमुख पदोन्नतीला शिक्षकांची सेवाज्येष्ठता

$
0
0
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख पदोन्नती शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार भरली जातील, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. केंद्रप्रमुखांची ६८ पदे रिक्त आहेत. १९९५ नंतर जिल्हा परिषदेने पदोन्नतीने केंद्रप्रमुख पदे भरलीच नव्हती.

पुलावरून पडल्याने दुचाकीस्वार ठार

$
0
0
खामनदीच्या पुलावरुन पडून एका दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. वळदगाव परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

फुफ्फुसेतर क्षयरोगाची तपासणी आता घाटीत

$
0
0
फुफ्फुसाचा क्षयरोग (टीबी) तसेच नेहमीच्या औषधांना दाद न देणाऱ्या ‘मल्टिड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’च्या (एमडीआर-टीबी) तपासण्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) होतात.

पोस्टखाते निकालाआधीच ‘फेल’

$
0
0
पोस्ट विभागाने ‌रविवारी घेतलेल्या परिक्षेत केंद्रांची अदलाबदल करत अक्षरशः चुकांचा कळस गाठला. हॉलतिकीटमध्ये नमुद केलेला जालना जिल्ह्यातील परीक्षा केंद्राचा पत्ता चक्क औरंगाबादचा देण्यात आला.

नाचण्यावरून तरुणास मारहाण

$
0
0
हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणास बेदम मारहाण झाली. उस्मानपुरा भागातील मिलिंदनगर येथे शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

VIP पथकाकडे अत्याधुनिक शस्त्रे

$
0
0
व्हिआयपी व्यक्तींच्या रक्षणाची जबाबदारी असलेले विशेष सुरक्षा पथक अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. हा विभाग नुकताच अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज झाला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद केंद्राला अधिक मनुष्यबळ मिळण्याची शक्यता आहे.

स्वस्तातील घरे स्वप्नातच

$
0
0
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना स्वस्तातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने निर्माण केलेल्या कायद्यातील अटी व नियमात चलाखी केली आहे. जागेची निवड करण्यासाठीचे निकष अशक्यप्राय असल्याने ही घरे स्वप्नातच राहणार आहेत.

क्राँकिटीकरणाची पळ‘वाट’

$
0
0
क्रांती चौक-स्टेशन या २३ कोटी रुपये खर्च करून बांधल्या जात असलेल्या रस्त्याचे काम कसेबसे पूर्ण करून तो औरंगाबादकरांच्या माथी मारण्याची लगबग सुरू आहे. हे काम मोजमापाविना पूर्ण केले जात असून, त्यासाठी नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत.

अपात्र गाइडकडील ४०० विद्यार्थी अधांतरी

$
0
0
अपात्र पीएचडी मार्गदर्शकांकडील विद्यार्थ्यांचे करायचे काय? या विवंचनेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन अडकलेले आहे. आठ महिन्यानंतर ही विद्यापीठाने ठोस निर्णय घेतला नसल्याने ४०० संशोधक विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.

अन्न - औषध प्रशासनाबाबत उदासीनता

$
0
0
शासनाच्या उदासीन धोरणामुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोणत्याही सुरक्षेची हमी नसताना अन्न व औषध सुरक्षा संदर्भातील ८० टक्के बाजारपेठावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी केवळ चार अधिकारी पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे.

परभणीत बुधवारी आंबा महोत्सव

$
0
0
आंब्यांच्या विविध वाणांच्या प्रचारासह ते परभणीकरांना गोडीने चाखता यावेत, यासाठी प्रथमच बुधवारी आंबा महोत्सव होणार आहे. महोत्सवात कोकणातील हापूस, पायरी, लांगडा, केशर, रत्ना, सिंधू, तोतापुरी इत्यादी वाण ठेवली जाणार आहेत.

शहीद मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार

$
0
0
गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात शहीद झालेले जवान लक्ष्मण मुंडे यांच्यावर सोमवारी दुपारी त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना तीन तोफांची सलामी देण्यात आली. अंतरवेली (ता. गंगाखेड) गावावर पूर्णत: शोककळा पसरली होती.

केंद्रात ‘एनडीए’ची सत्ता

$
0
0
केंद्रात ‘एनडीए’ची सत्ता येणार व राज्यात महायुतीला ३२ जागा मिळतील. मराठवाडयातील आठ‌ही जागेवर महायुतीच्या उमेदवाराची वर्णी लागणार असा दावा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना केला.

आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

$
0
0
महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती नियंत्रण कक्षाच्या वतीने आगामी पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील विविध ठाण्यातील पोलिस आणि नांदेड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या प्रशिक्षण सभागृहात सोमवारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images