Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता

$
0
0
लाखो रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा करणाऱ्या जात पडताळणी समितीच्या निवृत्त अधिकाऱ्यास अँटी करप्शन ब्युरोने गुरुवारी गजाआड केले. त्याच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत बारा लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे.

आघाडीला धडकी

$
0
0
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील संख्याबळात फारशी उलथापालथ झालेली नसली तरी, मराठवाड्यातील मतदारांचा हाच मूड विधानसभा निवडणुकीपर्यंत राहिला तर, विधानसभेच्या ४६पैकी तब्बल ४० जागा महायुतीच्या पारड्यात पडू शकतात. याच धास्तीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धडकी भरली आहे.

रिक्षा चालकाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
त्रिमूर्ती चौक भागात सोमवारी (२६ मे) सकाळी एक रिक्षाचालक बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तपासून मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जाफरगेट, हर्सूल भागात आगडोंब

$
0
0
जाफरगेट येथील ट्रान्सपोर्टच्या गोदामाला व हर्सूल भागात फर्निचरच्या टपरीला रविवारी मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली. दोन्ही घटनेत सव्वासहा लाखांचे नुकसान झाले आहे.

वर्षातले ४०वे मंगळसूत्र हिसकावले

$
0
0
सुस्त पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी वर्षातले ४० वे मंगळसूत्र सोमवारी सकाळी जवाहरकॉलनी भागातून पळवले. जवाहरकॉलनी भागातील पोलिस मित्र कॉलनी येथे सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

मराठवाड्याला यंदा संधी

$
0
0
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला दोन मंत्रिपदे मिळाली. बीडचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि जालन्याचे रावसाहेब दानवे यांना केंद्रात संधी मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर याचा भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.

पोलिस-ग्रामस्थांमध्ये चकमक

$
0
0
अवैध दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस आणि स्थानिक नागरिकांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन साठपेक्षा जास्त जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथे घडली. जखमींमध्ये ४ पोलिस आणि ६० ग्रामस्थांचा समावेश आहे.

शेतांच्या बांधांवर खरीपाची लगबग

$
0
0
मे महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला असून, शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांकडून शेतीच्या विविध कामांना सुरुवात होत असतानाच प्रशासनाकडूनही तयारी करण्यात येऊ लागली आहे.

लातूर पालिकेच्या ‘चाव्या’ मिस्त्रींकडे

$
0
0
लातूर महापालिकेच्या स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. पालिकेत मंगळवारी राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी अख्तर मिस्त्री यांची निवड झाली.

आरोग्य अधिकारी मुख्यालयीच

$
0
0
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले.

कुठे उकाडा, तर कुठे शिडकावा

$
0
0
मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मंगळवारी ढगाळ हवामान आणि वाऱ्यामुळे चाळीशीच्या घरामध्ये बसलेला तापमानाचा पारा खाली घसरला. मात्र, लातूरसह नांदेड, परभणीमध्ये उन्हाची काहिली कायम राहिली.

सोयगावात सापडले दुर्मिळ ‘मनचंदी’

$
0
0
सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी परिसरात औषधी गुणधर्म असलेले दुर्मिळ वराहकंद सापडले आहेत. या कंदाचे संवर्धन करण्यासाठी वन विभाग पर्यटनस्थळी त्याची लागवड करणार आहे. सध्या विभागाच्या मुख्य कार्यालयात कंद जतन केले आहे.

मका हबची उभारणी ‘पीपीपी’वर

$
0
0
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मका हबच्या उभारणीसाठी ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीत (पी.पी.पी.) उभारला जाणार आहे. ७० कोटी रुपयांपैकी ३५ कोटी रुपये खासगी क्षेत्रातून मिळविण्यात येणार आहेत.

आठ वर्षांपासून विकास प्रक्रिया ठप्प

$
0
0
बहुचर्चित झालर क्षेत्र प्रारूप आराखडा एका आठवड्यात राज्य शासनाला मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. सिडकोतर्फे प्रारूप आराखड्यावरील आक्षेपावर सुनावण्या घेऊन अहवाल तयार केला जात आहे.

नेत्र शस्त्रक्रियांना सोमवारचा ‘वायदा’

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) सुमारे दोन ते अडीच महिन्यांपासून खंडित झालेल्या नेत्र शस्त्रक्रियांना सोमवारपासून (२ जून) ‘मुहूर्त’ लागण्याची चिन्हे आहे.

पाणीवाटपाला प्राधिकरण अनुकूल

$
0
0
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यातील तरतुदीनुसार जायकवाडी प्रकल्पाला पाणी देण्यासाठी प्राधिकरण अनुकूल आहे, अशी माहिती निवृत्त कार्यकारी अभियंता आणि मराठवाडा विकास आणि संशोधन प्रतिष्ठानचे संचालक या. रा. जाधव यांनी दिली.

जुन्या इमारतींच्या ‘धोक्याची’ घंटा

$
0
0
पावसाळा आला तरी पालिकेच्या प्रशासनाने अद्याप शहरातील धोकादायक इमारतींची दखल घेतलेली नाही. कोणत्याही धोकादायक इमारतीवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे पावसाळ्यात या इमारतींचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठ्यावरून नुसत्याच बाता

$
0
0
गेल्या आठ - पंधरा दिवसांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याबद्दल पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महावितरणच्या मुख्य अभियंत्यांशी चर्चा करणार आहेत. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.

जालना रोडसाठी छदामही नाही !

$
0
0
ऐतिहासिक औरंगाबादची लाइफलाइन असलेल्या जालना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने एक छदामही गेल्या सात वर्षांत दिला नाही. औरंगाबादचे सौंदर्य अबाधीत राहण्यासाठी सरकारने जालना रोडसाठी भरीव निधी द्यावा आणि लोकांचा त्रास थांबवावा, अशी मागणी शहरातील उद्योजकांनी केली.

कचरा डेपोसाठी तिसगावचा प्रस्ताव

$
0
0
कचरा डेपोच्या जागेसंदर्भात पालिकेच्या प्रशासनाने तिसगावचा प्रस्ताव तयार केला असून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. त्या संदर्भात पाठपुरावाही सुरू आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images