Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रशासनामुळे निकालाचा विचका

$
0
0
साऱ्या देशात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दहा फेऱ्या संपलेल्या असताना औरंगाबादेत मात्र ढिसाळ कारभार आणि लालफितीच्या उदासीनपणामुळे लेटलतीफीचा सामना करावा लागला. दुपारी बारापर्यंत केवळ दोनच फेऱ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

उत्साह, चौकाचौकातून जल्लोष

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना - भाजपच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी केली. शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीच्या चौकात नरेंद्र मोदींचे भव्य छायाचित्र लावण्यात आले होते.

जिल्हाध्यक्षांनी कौल स्वीकारला

$
0
0
चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीतील सलग चौथा विजय म्हणजे औरंगाबादच्या जनतेचा विजय आहे.

आमदार काय म्हणतात ?

$
0
0
देशातील जनता काँग्रेसच्या सरकारला वैतागली होती. भ्रष्टाचार, घोटाळे, महागाईविरुद्ध लोकांनी भरभरून मतदान दिले. औरंगाबादमधील विजय हे त्याचे द्योतक आहे, अशा प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त केल्या.

‘मी आत्मपरीक्षण करणार आहे’

$
0
0
‘भोकरच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य यावेळी घटले आहे. मी आत्मपरीक्षण करणार आहे,’ अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडून आल्यानंतर व्यक्त केली. चव्हाण म्हणाले, ‘ २५ एप्रिल रोजी नांदेडची जागा मला लढवण्याचा आदेश दिला गेला.

दर्डांना धोक्याची घंटा

$
0
0
देशभरात नरेंद्र मोदींची लाट असल्याचा फायदा औरंगाबादेत चंद्रकांत खैरे यांना झाला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून खैरेंना आघाडी मिळाली नाही. काँग्रेसला ३ हजार ३०० मतांची आघाडी मिळवून देण्यात शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यशस्वी झाले, तरी त्यांना आगामी विधानसभेसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.

विजयात ‘पश्चिम’चे पारडे जड

$
0
0
लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मताधिक्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बदलाची शक्यता धूसर झाली आहे.

मराठवाड्यात महायुतीची सरशी

$
0
0
मोदी लाटेमध्ये मराठवाड्यातील सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांना लोकसभेत पोचविले आहे. नांदेड मतदारसंघात आशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद गमावल्याच्या सहानभुतीमुळे तारले, तर हिंगोलीत राहुल ब्रिगेडचे राजीव सातव यांनी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर निसटता पराभव केला.

उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी भुईसपाट

$
0
0
उस्मानाबाद लोकसभातंर्गत असलेल्या विधानसभेच्या सहाही मतदार संघातून यंदाच्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे मतदारसंघात दोन मंत्री व दोन आमदार असताना राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट झाली आहे.

‘निकालाचे आत्मपरीक्षण करणार’

$
0
0
लोकसभेची झालेली निवडणूक अत्यंत आगळीवेगळी झाली. त्यानंतर लागलेला निकाल हा तर अनपेक्षीत आणि आश्चर्यकारक आहे. त्याचे आम्ही आत्मपरीक्षण करून पुढची वाटचाल करणार असल्याचे मत आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

बीडमध्ये राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा

$
0
0
बीड लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दुसऱ्या वेळी विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी देवून मुंडेसमोर आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता.

केशर आंब्याची गोडी वाढणार

$
0
0
मराठवाड्यात केशर आंब्याचे क्षेत्र वाढवण्यासाठी हिमायतबागेत भारत आणि इस्त्रायल यांच्या समन्वयाने केशर आंबा गुणवत्ता केंद्र सुरू करण्यात आले आहे. तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या केंद्रात उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केशर आंब्याची कलमे तयार केली जाणार आहेत. या कामासाठी नुकतीच अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.

खैरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील सलग चौथ्या विजयानंतर खासदार चंद्रकांत खैरे शनिवारी (१७ मे) सायंकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबईला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला रवाना झाले. निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (१६ मे) रात्री जाहीर झाला. त्यानंतर शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

अधिकारी, ठेकेदाराच्या अरेरावीने वैताग

$
0
0
रस्त्याचे काम करणारे पालिकेचे अधिकारी व ठेकेदाराच्या अरेरावीमुळे क्रांती चौकातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. अडीच महिन्यांपासून रस्त्याचे काम करण्याच्या नावाखाली या भागातील पाइपलाइन उखडून टाकली आहे.

महापालिकेत भाजपला ‘अच्छे दिन!’

$
0
0
मोदी लाटेने देशभर काँग्रेससह अन्य महत्वाच्या पक्षांना त्यांचे अस्तित्व टिकवता टिकवता नाकीनऊ आले. महाराष्ट्रात मोदी लाटेमुळे भारतीय जनता पक्षाची परिस्थिती कमालीची सुधारली तर शिवसेनेची ‘नैय्या’ या लाटेमुळे पार झाली.

पीएचडीच्या फाईल गहाळ

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका संशोधनासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ही बसला आहे. पात्र ठरलेल्या अने‌क विद्यार्थ्यांच्या फाईल गहाळ झाल्याने या विद्यार्थ्यांना संमतीपत्रच मिळालेले नाही.

कुठे कमी पडलो, काय चुकले?

$
0
0
भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या आम आदमी पार्टीने अवघ्या एका वर्षाच्या प्रवासातच दिल्लीची सत्ता काबीज करण्यात यश मिळविले. लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करू, असा विश्वास कार्यकर्त्यांना होतो, परंतु झालेल्या सभासद नोंदणीपेक्षा निम्मेही मते ‘आप’ला मिळविता आली नाहीत.

इच्छुकांची पदवीधरसाठी ‘फिल्डिंग’

$
0
0
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभुतपूर्व यशामुळे भारतीय जनता पक्षात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. नवी ऊर्जा मिळाल्याने कार्यकर्तेही अधिक सक्रिय झाले आहे.

‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या’

$
0
0
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही तृतीयपंथीयांना माणुसकीची वागणूक मिळणे दुरापास्त आहे. सीमा या तृतीयपंथीयाने गंगापूर शहरात प्लॉट विकत घेऊन घराचे बांधकाम सुरू केले; मात्र परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे गंगापूर नगर परिषदेने सीमाला बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावली

कॉलेजांची तपासणी उद्यापासून

$
0
0
कॉलेजांमधील सोयी-सुविधांच्या तपासणीला सोमवारपासून (१९ मे) सुरुवात होणार आहे. औरंगाबाद विभागातील कॉलेजांच्या तपासणीसंदर्भात सहसंचालकांनी शनिवारी बैठक घेऊन पथकांना सूचना दिल्या. विभागात ३० पथके नेमण्यात आले असून, २५ मेपर्यंत ही तपासणी पूर्ण करण्याचे पथकाला निर्देश देण्यात आले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images