Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तीन वर्षांत स्टेशन होणार चकाचक

$
0
0
परदेशी पर्यटकांची कायम रेलचेल असणाऱ्या औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर आता लवकरच आंतरराष्ट्रीय धर्तीच्या सुविधा मिळतील. या कामांसाठी मॉडेल रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी १४ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, तीन वर्षांमध्ये ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

गुन्हेशाखेचे ‘टार्गेट हद्दपार’

$
0
0
गुन्हेशाखेच्या नव्या अधिकाऱ्यांनी पदभार घेतल्यानंतर हद्दपार व कुख्यात गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील वाढते गुन्हे रोखण्याच्या दृष्टिकोनातून ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून गेल्या तीन दिवसांमध्ये तीन हद्दपारांना अटक करण्यात आली आहे.

धनंजय मुंडेंची हर्षवर्धनना धमकी

$
0
0
आमदार हर्षवर्धन जाधव यांना मोबाइलवर धमकी दिल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा रविवारी (८ जून) दुपारी दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षित वाहतुकीकडे कॉलेजांचे दुर्लक्ष

$
0
0
बेशिस्त वाहतूक, नियमांचे खुलेआम उल्लंघन याचे मूळ शालेय संस्कारात दडलेले आहे. शहरातील कोणत्याही शाळेत वाहतूक सुरक्षा नियमांचे प्रशिक्षण दिले जात नाही. शहरात अनिर्बंध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे. या बेशिस्तीमुळे गेल्या वर्षी १२५ तरुणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला.

कुख्यात गुंडाचा पोलीस ठाण्यात थयथयाट

$
0
0
सिडको पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीत कुख्यात गुंडाने थयथयाट करत अशांतता निर्माण केली. गांजा, दारू विक्री करू द्या, म्हणत मद्यधुंद अवस्थेत या गुंडाने हातावर काचा मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी (९ जून) सायंकाळी हा प्रकार घडला.

आमदार जाधव यांची दुसऱ्याच दिवशी माघार

$
0
0
आमदार धनंजय मुंडे यांनी धमकी दिल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला अदखलपात्र गुन्हा मागे घेत असल्याचे लेखी पत्र आमदार हर्षवर्धन जाधव क्रांती चौक पोलिसांना मंगळवारी (१० जून) सकाळी दिले. गैरसमजुतीमधून हा प्रकार घडला असल्याचा पत्रात उल्लेख असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

माळीवाड्यात ‌दुकान फोडून बियाणे पळवली

$
0
0
माळीवाडा व उस्मानपुरा परिसरात दुकाने फोडल्याच्या घटना सोमवारी रात्री घडल्या. या घटनेत माळीवाडा येथे कृषी केंद्रातून बियाणांच्या बॅग तर उस्मानपुऱ्यातून टीव्ही, लॅपटॉप असा दोन घटनांत दोन लाखांचा ऐवज पळविला.

१५ मिनिटांनी एक सिटीबस

$
0
0
चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप मार्गावर १६ जूनपासून वीस सिटीबस धावणार आहेत. दर पंधरा मिनिटाला एक बस धावेल. एस. टी. महामंडळाच्या मंगळवारी (१०जून) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

औरंगाबादला ६५ क्रीडा प्रकारांत एकच राज्य स्पर्धा

$
0
0
यंदाच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या मोसमात औरंगाबाद शहरात केवळ एकच राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय ठिकाण असूनही स्पर्धा आयोजन करण्यासंदर्भात जिल्हा क्रीडा कार्यालयाने फारसा पुढाकार न घेतल्याने एकाच स्पर्धेवर समाधान मानावे लागणार आहे.

पुलांसाठी आता ३० कोटींचा प्रस्ताव

$
0
0
पूर्व आणि पश्चिम औरंगाबादला जोडणाऱ्या व मोडकळीस आलेल्या मकाई गेट, बारापुल्ला दरवाजा व महेमूद दरवाजा येथील पुलांच्या बांधकामासाठी शासनाने ११ कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु महापालिकेने या पुलांसाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

काँग्रेस- सेनेच्या पत्रकयद्धात नागरिक?

$
0
0
जालना शहराच्या नागरी समस्यांवरून सत्ताधारी काँग्रेस व विरोधी शिवसेना- भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. या वादात आता नागरी संघटनाही उतरल्या असून नगर पालिका बरखास्त करून पाच वर्षांसाठी प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.

मुंडेंच्या दशक्रिया विधीसाठी येणार दोन लाख कार्यकर्ते

$
0
0
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या दशक्रिया विधीच्या गुरुवारी (१२ जून) होणार आहे. राज्यातून सुमारे दोन लाख कार्यकर्ते दशक्रियाविधीला येण्याची शक्यता ग्रहित धरून पोलिसांना तयारी केली आहे.

तुळजाभवानी मंदिरातील ‘तत्काळ दर्शना’ला विरोध

$
0
0
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांना तात्काळ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू असताना या योजनेला पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. या योजनेमुळे लोकांमध्ये भेदभाव निर्माण होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

लोह्यात प्रतीक्षा ‘ताईं’च्या आदेशाची

$
0
0
ग्रामीण भागाशी नाळ जोडणारा; तसेच लोकनेते असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सामान्य कार्यकर्ता अद्यापही सावरलेला नाही. लोहा-कंधार तालुक्यात मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मुंडे यांच्यानंतर त्यांच्या वारस म्हणून पंकजा मुंडे यांचे नाव समोर येत आहे. त्यामुळे ताईंच्या आदेशाचीच सर्वजण वाट पाहात आहेत.

पालिका पोटनिवडणुकीसाठी अकरा उमेदवारांचे बारा अर्ज

$
0
0
लातूर महापालिकेच्या प्रभाग क्र. ‘१३ अ’च्या नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी १२ उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांनी दिली.

नदीकाठावरील शेतकरी अनुदानापासून वंचित

$
0
0
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तलाठ्याची चौकशी न केल्यामुळे शेतकरी तीन महिन्यांनतही अनुदानापासून वंचित आहेत.

झेडपीत आजपासून बदल्यांचा हंगाम

$
0
0
पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेत स्थगित झालेल्या सार्वत्रिक बदल्यांना बुधवारपासून (११ जून) सुरुवात होणार आहे. बुधवारी पंचायत विभागाच्या बदल्या होतील.

७६ कंत्राटी जागा; १३६५ उमेदवार

$
0
0
नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या (एनयूएचएम) ७६ कंत्राटी जागांसाठी राज्यभरातून एकदम १३६५ उमेदवार आल्यामुळे महापालिकेत झुबंड उडाली. या सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी मंगळवारी (१० जून) करण्यात आली. बुधवारी (११ जून) मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

पोलिसांदेखत आरोपींचे पलायन

$
0
0
नाकाबंदी करताना विनाक्रमांकाची कार वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पकडल्याची घटना महानुभाव आश्रम चौकात घडली. मात्र पोलिसांच्या देखत कारमधील तरुणांनी पलायन केले असून ही कार चाकण येथून दोन दिवसांपूर्वी चोरल्याचे निदर्शनास आले आहे.

पहिल्या पावसाचा ‘जीटीएल’ला शॉक

$
0
0
पहिल्या पावसाच्या फटक्याने जीटीएलने केलेल्या पावसाळी कामांना उघडे पाडले आहे. सोमवारी (९ जून) रात्री पावसामुळे शहराच्या अनेक भागात वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली. त्यामुळे सुमारे २५ घरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी (१० जून) दुपारपर्यंत अनेक भागांतील वीज पुरवठा सुरू झाला नव्हता. मान्सूनपूर्व कामे करूनही पावसामुळे वीज पुरवठा विस्कळित झाला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images